SAA YCM SHSG anniversary

२००९ मध्ये आकाशवाणी वरील एका कार्यक्रमामुळे मी पुण्यातील स्किझोफ्रेनिया अवेरनेस असोसिएशन(‘सा’) शी जोडलो गेलो. त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, स्व-मदत गटाच्या बैठकांना हजर राहणे, आणि या ना त्या प्रकारे ‘सा’ च्या मूळ उद्दिष्टांच्या संदर्भात काही तरी योगदान देत राहणे सुरु होते. २०१२ च्या शेवटी शेवटी माझी ओळख भूषण कुलकर्णी यांच्याशी झाली. तसेच पिंपरी चिंचवड भागात असा स्व-मदत गट चालू करावा ही त्यांची इच्छा मला कळली. तो पर्यंत मी त्या दृष्टीने काही विचारच केला नव्हता. मी आणि भूषण कुलकर्णी मिळून नोव्हेंबर २०१३ मध्ये ‘सा’ तर्फे वाय सी एम मध्ये शुभांकारांसाठी मदत गट चालू केला. त्याला २०१४ मध्ये वर्ष होवून गेलं. नुकताच आम्ही पहिला वर्धापन दिन साजरा केला. त्याचा हा वृतांत आणि आढावा.

आमच्या मार्गदर्शिका आणि ‘सा’ च्या ज्येष्ठ सदस्य नीलिमाताई बापट यांनी प्रास्ताविक केले. ‘सा’ची सुरुवात, आणि त्याचे मानसिक आजार क्षेत्रातील स्थान बोलल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर गुजर यांची ओळख करून दिली. डॉ. गुजर हे वाय सी एम च्या मानसोपचार विभागाचे प्रमुख आहेत. त्यानंतर डॉ. गुजर यांनी वाय सी एम मधील मानसोपचार विभागाचा आढावा घेतला. त्यांच्या व ‘सा’ च्या संबंधाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मनोहर धडफळे यांची ओळख करून दिली. डॉ. धडफळे यांना ५० वर्षांचा मानसोपचार क्षेत्रातील भारतात तसेच परदेशातील गाढ अनुभव आहे. ते वाय सी एम च्या मानसोपचार विभागात व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करत असतात.

त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम आमच्या स्वमदत गटात येणाऱ्या काही शुभांकारनी त्यांचे अनुभव सांगितले. कामत, राजापुरे, नेकनारायण, भूषण कुलकर्णी यांनी त्यांच्या शुभार्थीबद्दल, त्याच्या एकूण प्रवासाबद्दल सांगितले. लाखापुरे यांनी मानसिक आजार आणि अंधश्रद्धा यावर त्यांचे अनुभव सांगितले. हे सर्व अतिशय हृद्य आणि उस्फुर्त अनुभव कथन झाले. माझ्या कथनात मी स्वमदत गटाचा आढावा घेतला. त्यानंतर,ज्याची सर्वांना खुपच उत्सुकता होती, ते डॉ. धडफळे यांचे बीजभाषण, तसेच मन मोकळा संवाद झाला. त्यांनी त्यांच्या इंग्लंडमधील आलेले अनुभव सांगितले आणि तेथे आता मानसिक आजारी व्यक्तीसाठी रुग्णालये जवळ जवळ नाहीत याबद्दल अतिशय रंजक माहिती दिली आणि अश्या व्यक्तींचे तेथील समाजातच कसे उपचार केले जातात याबद्दल सांगितले. ते पुढे म्हणाले की, ‘समाजात जशी जशी प्रगती होत जात आहे, तसे तसे मानसिक आजाराचे प्रमाण वाढत जाते. अंधश्रद्धाच्या मार्गाने न जाता, शास्त्रीय उपचार घेवून त्यावर मात करता येते’. त्यांनी स्वमदत गटाचे तसेच कुटुंबातील मदतीचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी त्यांचे परदेशातील प्रामुख्याने केनियातील आणि इंग्लंड मधील अनुभव सांगितले. शासकीय पातळीवर मानसिक आजाराबद्दल वेगवेगळे कायदे आणि जागृती कार्याबद्दल त्यांनी सांगितले.

त्यानंतर शेवटी वाय सी एम चे प्रकाश जुकंतवार यांनी आभारप्रदर्शन केले आणि कार्यक्रम संपला. प्रकाश हे Psychiatric Social Worker म्हणून काम पाहतात. त्यांचा ह्या सर्व उपक्रमामध्ये प्रथम पासूनच अतिशय रस आणि सहकार्य मिळत गेले आहे.

आज उद्या करत, शेवटी नोव्हेबर २०१३ तिसऱ्या शनिवारी गट सुरु झाला आणि आता वर्षभर चालू आहे. आम्ही महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी येथे भेटतो. गेल्या नोव्हेबर मध्ये एक वर्ष होवून गेले. तेव्हा पासूनच हा कार्यक्रम करावा असा विचार चालू होता. आतापर्यंत आम्ही जवळ जवळ ६० शुभांकारांशी जोडलो गेलो आहोत. त्यातील कमीत कमी १०-१२ तरी असे आहेत की ते नियमित ह्या बैठकीना येत असतात. ही तर फक्त सुरुवात आहे. आमच्या पुढे बरीच आव्हाने आहेत. उदाहरणार्थ, प्रत्येक बैठकीमध्ये वाय सी एम मध्ये येणारे नवीन शुभंकर येत असतात, जी एका दृष्टीने(समाजात जागृती होण्याच्या) चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे, प्रत्येक बैठकीत आम्हाला नवीन शुभांकाराबरोबर वेळ घालवावा लागतो. तसेच त्यातील बरेच जण बाहेरगावचे असतात, आणि त्यांच्या बरोबर बऱ्याचदा शुभार्थी सुद्धा असतात. स्व-मदत आधार गटात काही ठोस कार्यक्रम करण्यास त्यातील शुभंकरानी नियमित येणे आवश्यक आहे, जेणेकरून एखादा विषय घेवून त्यावर दर वेळेस चर्चा करणे शक्य होत नाही. अश्या मुळे हवा तसा बदल अथवा फरक काही काळानंतर दिसू लागतो. ह्या समस्येवर थोडे विचार मंथन करून काही उपाय केले पाहीजे. शुभांकारामध्ये आपण एकटे नाही आहोत अशी भावना निर्माण करण्यासाठी करावे लागणारे उपक्रम आम्ही अजून सुरु करू शकलो नाही(जसे की सर्वानी मिळून बाहेर जाणे). तसे असले तरी सुद्धा आम्ही औषधांच्या किमती आणि वाय सी एम मध्ये त्यांची उपलब्धता यावर बरीच चर्चा आम्ही करू शकलो आणि तो विषय बराच पुढे गेला आहे असे म्हणू शकतो. नीलिमाताई आमच्याबरोबर प्रत्येक वेळी असतात, पण त्याही कधी ना कधी थांबणार आहेत आणि हा गट आपल्यालाच सुरु ठेवायचा आहे याचे भानही आहे. ह्या अडचणीवर मात करून, शुभार्थीसाठीही गट सुरु करायचा आहे. ह्या भागात कार्यशाळा आणि इतर उपक्रम राबवायचे आहेत. पिंपरी चिंचवड भागातील औद्योगिक क्षेत्रातील संस्थांचा सहभाग करून घेवून शुभार्थींच्या पुनर्वसनाबाबतीत काम करायचे आहे. पाहुयात कसे काय जमते ते.

जाता जाता स्वमदत गटात म्हटली जाणारी प्रार्थना येथे देतो. ही प्रार्थना Serenity Prayer चे भाषांतर आहे.

जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया|

मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया||

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s