दोन वेगळी नाटकं

मी नाटकवेडा आहे. पूर्वी खूप नाटकं पहायचो. परत आलेली जुनी milestone/classic नाटकं , संगीत नाटकं, काही नवीन नाटकं, प्रायोगिक नाटकं, वेगवेगळे नाट्यमहोत्सव, वगैरे. बंगळूरला गेलो की तेथील कन्नड नाटकं, ‘रंग शंकरा’ मध्ये पाहतोच पाहतो. पण ह्या माझ्या एकूण नाटकवेडाबद्दल परत कधी तरी. इतक्यात मी दोन चांगली नाटकं पहिली. आज त्याबद्दल.

त्यातील एक ग्रिप्स नाटक प्रकारातील आहे. त्याचे नाव-‘Du and Me’. हे पाहिलं गेल्या महिन्यात-जानेवरीत. जर्मनी मध्ये १९६० च्या सुमारास हा ग्रिप्स नाट्यप्रकार उदयास आला. जर्मनीत ‘GRIPS Theater’ या नावाचे एक नाट्यगृह आहे, जेथे अशा प्रकारची नाटकं उदयाला आली.  लहान/कुमार मुलांचे प्रश्न, त्यांचे भावविश्व अशा नाटकातून मांडले जातात. नुकतीच पुण्यात हा नाट्यप्रकार आल्याला २५ वर्षे झाली. मोहन आगाशे यांनी तो येथे आणला.

गेल्या काही वर्षात cultural exchange च्या नावाखाली परदेशातील विद्यार्थी भारतात येवून राहत आहेत तसेच भारतीय मूळ परदेशातील कुटुंबात जाऊन रहात आहेत, आणि आपले अनुभव विश्व विस्तारात आहेत. एखाद्या कुटुंबात राहणे आणि एकूण समाज आणि संस्कृतीचा अभ्यास हा उद्देश असतो. हे नाटक अतिशय धमाल पद्धतीने सादर केले गेले आहे. एका पक्क्या पुणेरी कुटुंबात जर्मनी वरून एक तरुण मुलगा येणार असतो. कुटुंबात एक तरुण मुलगीही असते. त्या घरात ३ पिढ्या एकत्र नांदत असतात.परदेशातून तरुण मुलगा कुटुंबात येतो म्हटल्यावर त्या कुटुंबात कशी गडबड होते, कसे गमतीदार प्रसंग घडतात. कुटुंबातल्या प्रत्येकाला कसा ‘cultural shock’ बसतो हे खुपच मजेदार पद्धतीने दाखवले आहे. मराठी संवाद, जर्मन संवाद, तेथील संस्कृतीची झलक, बदलत चाललेली मूल्ये, त्यावर केलेली मार्मिक टिप्पणी हे सर्व पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. हे नाटक विभावरी देशपांडे, श्रीरंग गोडबोले आणि जर्मनीतील नाटककार ल्युत्झ हब्नर यांनी एकत्र लिहिले आहे. आजकालच्या बदललेल्या, जागतिकीकरणाच्या जमान्यात आपल्या सांस्कृतिक जाणीवा रुंदावल्या पाहीजे हा संदेश अगदी हलक्या फुलक्या रीतीने देवून जातो.

दुसरं नाटक आहे ‘बिनकामाचे संवाद’. हे पाहिलं १४ फेब्रुवारीला. हे नाटक धर्मकीर्ती सुमंतने लिहले आहे. अलोक राजवाडेने दिग्दर्शित केले आहे. हे दोघे ही आजचे आघाडीचे युवा नाट्यकर्मी आहेत. हे अतिशय वेगळं असं नाटक आहे.

प्रयोग होता अक्षर नंदन शाळेत. मुख्य प्रयोगाच्या आधी पथनाट्यासारखा एक ५-७ मिनिटाचा अंक सादर केला. त्यातला प्रसंग घडतो तो एका रेल्वे फलाटावर. एका व्यक्तीचा मोबाईल रुळावर पडून बिनकामाचा होतो आणि इथे तो अंक संपतो. एक मग आम्ही सर्व प्रेक्षक नाट्यगृहात गेलो. तेही अतिशय वेगळे. बसायला सतरंज्या, काही खुर्च्या, तीही तीनही बाजूने. वरच्या मजल्यावर ही काही तरी नेपथ्य दिसत होतं. मुख्य नाटक सुरु होते ते त्या व्यक्तीच्या नवीन मोबाईल फोन विकत घेण्याच्या प्रक्रियेपासून. नाटकाला एक अशी कथा नाही हेच त्याचे वैशिष्ट्य. वेगवेगळ्या पात्रांच्या द्वारे नाटक आजकालच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत जाते. स्मार्टफोन, फेसबुकच्या आजच्या गतिशील जमान्यात समाज मनात निर्माण होणारी पोकळी ह्याचे चित्रण आहे. माहितीच्या स्फोटाच्या वातावरणात एखाद्या विषयावर सखोल चिंतन मनन न करता येणे ही चिंतेची बाब दर्शित केली आहे. नाटकाचा शेवट मात्र काही मला कळला नाही.

पुण्यात पुढच्या आठवड्यात विनोद दोशी नाट्य महोत्सव सुरु होत आहे. त्यातील ‘अपराधी सुगंध’ हे नाटकं पाहायचे आहे. कसे जमते ते बघायचे.

Advertisements

3 thoughts on “दोन वेगळी नाटकं

 1. तुम्ही नाटकवेडे आहात त्यामुळे हा प्रश्न. मला ’चांगली’ स्त्रीप्रधान विनोदी नाटकं सुचवाल का? आम्ही दरवर्षी शार्लट, अमेरिकेत नाटक करतो (https://marathiekankika.wordpress.com/) त्यामुळे सतत नवीन संहितेच्या शोधात असते. माझा इ मेल पत्ता – mohanajoglekar@gmail.com

  Like

  • Prashant Kulkarni says:

   माफ करा, थोडा वेळ लागला उत्तर द्यायला. संगीत देवभाबळी हे सध्या चर्चेत असलेले चांगले स्त्रीप्रधान नाटक. थोडे गंभीरच, पण संगीत छान, विषय देखील वेगळा. संत तुकाराम यांची पत्नी आणि विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी यांच्यात झालेला संवाद हा विषय आहे. त्यांच्या संवादाचा विषय अर्थातच त्यांचे स्वतःचे नवरे!

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s