शांबरीक खरोलिका

कालच मी मूकपटाबद्दल थोडेसे लिहिले होते. विजय पाडळकर यांचे ‘सिनेमाचे दिवस-पुन्हा’ हे पुस्तक वाचताना मी काही वर्षापूर्वी(बहुधा २००९ मध्ये) पुण्यातल्या मध्ये शांबरीक खरोलिका ह्या कार्यक्रमाला National Film Archives of India(NFAI) मध्ये गेलो होतो त्याची आठवण झाली. त्याबद्दल थोडेसे.

शांबरीक खरोलिका म्हणजे काय, तर इंग्लिश मध्ये magic lantern. हे magic lantern यंत्र चित्रपट तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या बरेच आधी हलत्या चित्रांच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध होते. इंग्लंड आणि फ्रान्स मध्ये कार्यक्रम होत असत. या बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे आणि त्या यंत्राचा इतिहासही खुपच मनोरंजक आहे.

मुंबईतील पटवर्धन आणि पितळे ह्या गृहस्थांनी हे यंत्र १८८५ मध्ये मिळवले होते आणि ते त्यात भारतीयांच्या रुची नुसार काचेच्या स्लाईड्स वर पौराणिक प्रसंगावर आधारित कार्यक्रम ते करत असत. अशी त्यांनी हजारो स्लाईड्स बनवली होती. त्या यंत्राला शांबरीक खरोलिका असे भारतीय नावही त्यानीच दिले. दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ तयार करण्याच्या आधीची ही सगळी गोष्ट. पटवर्धन कुटुंबियांनी तो वारसा इतकी वर्षे जपून ठेवला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मचरित्रात या खेळाबद्दल बद्दल विस्तृत उल्लेख आहे. ह्या विचित्र नावाबद्दल त्यांनी असे लिहून ठेवले आहे: “‘शांबरिक खरोलिका’ या विचित्र नावाबद्दल एकदा आम्ही खुद्द त्या पटवर्धनालाच विचारले. तो होता अस्सल नाकीं बोलणारा कोकण्या. त्याने खुलासा केला की, अहो, शांबरिक म्हणजे ‘मॅजिक’ आणि खरोलिका म्हणजे लॅण्टर्न. ‘मॅजि म्हणजे आपला शंबरासूर, त्यावरून ‘शांबरिक’ असा शब्द आम्ही बनवला. ‘लॅण्टर्न’ला मराठीत आपण दिवा दीप म्हणतो. पण हे शब्द फारजण वापरतात, म्हणून अमरकोशातून आम्ही ‘खरोलिका’ काढली.”

NFAI मधील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे होते की त्या दिवशी पटवर्धन कुटुंबियांनी शांबरीक खरोलिकाचा कार्यक्रम त्यांनी प्रात्यक्षिक म्हणून केला. आणि ते यंत्र आणि त्या स्लाईड्स NFAI ला त्यांच्या संग्रहालयाला भेट म्हणून दिला.

ह्याचेच काहीसे वेगळे रूप काही वर्षापूर्वी पर्यंत गावागावात हलत्या चित्रांच्या खेळ दाखवणारी मंडळी करत असताना दिसत असत. अर्थात त्यात गाजलेल्या चित्रपटांच्या फिल्म्सच्या स्लाईड्स वापरून ती दाखवत असत. त्याला एकाच वेळी तीन चार जणांनी पाहण्याची सोय असे. त्याला bioscope box म्हणतात. तोही वारसा खरे पहिले तर जपून ठेवावा असाच आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s