सचिन-एक अवलिया

नाही, हा लेख सचिन तेंडूलकर वर नाही. तो तर अवलिया आहेच आणि त्याच्या बद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. समाजात अशे इतरही बरेच सचिन आहेत ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात, त्याच्या ध्यासापोटी, वेडापोटी बरेच काही करून ठेवले आहे आणि करताहेत. मी बोलतोय ते सचिन जोशी याच्या विषयी. आमच्या पुण्यातला सचिन, ज्याने किल्ल्यांच्या ध्यास घेतला आहे. त्याच्या ह्या ध्यासाबद्दल मला लिहायचे होतेच बऱ्याच दिवसापासून, आज तो योग जमला तो त्याला डॉक्टरेट पदवी मिळायच्या निमित्ताने.

सचिनची आणि माझी ओळख झाली ती साधारण १९९८ साली. अर्थात एका किल्ल्यावर भटकंती करण्याच्या निमित्ताने. बहुधा रायरेश्वर असावा. साधारण २०-२२ वर्षाचा होता तेव्हा तो. ट्रेकचे नेतृत्व तोच करत होता. तेव्हाच मला त्याच्या वेगळेपणाची चुणूक मला दिसून आली. तो ज्या पद्धतीने १५-२० जणांचे टोळके हाताळत होता, ज्या तऱ्हेने किल्ल्याबद्दल माहिती, आसपासच्या परिसराची माहिती देत होता, आणि मुख्य म्हणजे, ट्रेक म्हणजे दंगा, मस्ती, टवाळखोरी या गोष्टीमध्ये बच्याच जणांना रस असतो, त्या सर्वाला फाटा देवून, अतिशय गंभीरपणे तो ते सर्व हाताळत होता.

सचिन त्यावेळेस नुकतेच BSc(Chemistry) संपवून MSc करत होता. किल्ले आणि एकूणच इतिहास हा त्याच्या आवडीचा विषय खूप लहानपणापासून होता. त्यानंतर मी आणि इतर जननी सचिनबरोबर बरेच ट्रेक्स केले आणि करतोय. मी काय किवा इतर जण हे सर्व हौशी कलाकार,
आम्हाला जमेल तसे आम्ही किल्ल्यावर भटकायला जायचो. पण त्याची हौस नव्हती तर त्याचा तो ध्यास होता. महाराष्ट्रात जवळपास आतापर्यंत माहीत असलेले ४००-४५० किल्ले आहेत. तो त्या बहुतेक सर्वावर आतापर्यंत जाऊन आला आहे. त्यातील कित्येक किल्ल्यावर ४०-५० वेळा गेला आहे. गेल्या १५ वर्षातील मला वाटत नाही की कुठलाही शनिवार रविवार असो, किवा कुठलीही एखादी मोठी सुट्टी असो, तो घरी अथवा पुण्यात राहिला आहे. कायम त्याने किल्ल्यावर कूच केले आहे.

आता गम्मत अशी आहे की किल्ल्यावर भटकणे एक आणि त्याच्या ध्यासापोटी एकूणच त्याबद्दल सतत विचार करत राहणे एक. पुण्यात राहत असल्यामुळे, आणि पुण्यात इतिहास संशोधनाची एक परंपरा आहे, ज्या वेग-वेगळ्या संस्था आहे, त्याचा त्याने यथोचित उपयोग करून घेऊ लागला. हा अवलिया, इतर दिवशी किल्ल्याची माहिती गोळा करणे, पुण्यातल्य भारत इतिहास संशोधन मंदिरात जाऊन जुनी कागदपत्रे शोधणे असे उद्योग करू लागला. इतिहासाचा कायम त्याने भावना बाजूला ठेवून पुरावा गोळा करण्यावर भर दिला आणि त्याच पद्धतीने तो त्या क्षेत्रातील इतर तज्ञाबरोबर चर्चा आणि वाद-विवादही करू लागला. ह्या सर्वांची आम्हाला वेळोवेळी भटकंतीच्या निमित्ताने मिळत जाते. आणि मुख्य म्हणजे एखाद्या किल्ल्याची माहिती सांगताना त्याला त्या माहितीचा खुपच उपयोग होवू लागला.

काही वर्षापूर्वी त्याने Deccan College मध्ये MA अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला जो पुरातत्वशास्त्र ह्या संदर्भात आहे. त्यामुळे त्याच्या ध्यासाला आणि संशोधनाला एक वेगळीच किनार मिळू लागली. त्याच्या मूळच्या Chemistry विषयामुळे आणि हा अभ्यासक्रम केल्यामुळे, त्याला तेथेच संशोधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हळूहळू जसे तंत्रज्ञान जसे उपलब्ध होऊ लागले तसे त्याने ते वापरून आपल्या आवडत्या विषयात-किल्ले, ते वापरू लागला. जसे की GPS सारखी यंत्रे वापरून किल्ल्यांचा परीघ मोजणे आणि त्याप्रमाणे संगणकावर त्याचे प्रतिरूप तयार करणे, तसेच किल्यावरील तोफा आणि इतर सामुग्रीची शास्त्रीय माहिती गोळा करणे आणि त्याचे पृत्थकरण करणे अशे उद्योग तो करू लागला. ह्या सर्वावर कळस म्हणजे Google Maps/Earth
सारखे तंत्रज्ञान वापरून त्याने 4-5 किल्ले शोधून काढले. काळाच्या उदरात गडप झालेल्या ह्या किल्ल्यांची माहिती मिळत नव्हती, त्या बद्दलचे तुरळक उल्लेख होते, पण त्यांचा थांगपत्ता त्याने शोधून काढला. त्याच्या या संशोधनाची खूप वाह-वाह झाली. वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणीवर त्याबद्दल समाजाला त्याचे काम कळले. सवंग प्रसिद्धीचा कुठलाही ध्यास न घेता, किवा कोठलेही सवंग विधान करून खळबळ न माजवता तो त्याचे काम निष्ठापूर्ण करत राहिला आहे.

काही वर्षापूर्वी त्याने किल्ल्याची यथोचित आणि शास्त्रीय आधारवर असलेली काही पुस्तके लिहिली, त्याचेही खूप कौतुक झाले. वेगवेगळ्या ठिकाणी लेख लिहिणे, निबंध लिहून ते वाचणे हे तर त्याचे चालूच आहे. Deccan College मधून MA झाल्यानंतर पुरातत्वशास्त्रातील एका विषयावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवण्याबद्दल प्रयत्न सुरु केले, आणि कालच त्याला ती पदवी मिळाली.

तर असा हा चहाबाज अवलिया, जो आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देवून, कसलीही पर्वा न करता काम करत आहे. त्याला सलाम आणि शुभेच्छा!

2 thoughts on “सचिन-एक अवलिया

    • Prashant Kulkarni says:

      Thanks for the comment. Appreciate it. Please let me know when you are in Pune, we can certainly meet him. Looks like using the tag in the post is not mandatory, else it would not have accepted it.

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s