मराठी रंगभूमी: सद्यस्थिती आणि भावी काळ-नारायणराय हुईलगोळ

पार्श्वभूमी

एक दोन महिन्यापूर्वीच बेळगाव मध्ये मराठी नाट्य संमेलन भरले होते. नारायणराय हुईलगोळ हे कर्नाटकातील १९व्या/२०व्या शतकातील प्रसिद्ध कवी, नाटककार. माझ्या हाती त्यांच्या समग्र साहित्याचा एक खंड लागला. त्यात त्यांनी मराठी आणि कन्नड नाटक याबद्दल त्यांनी विचार मांडले आहेत. हा लेख १९२१ मधील आहे. प्रस्तुत लेख त्याचा अनुवाद आहे.

मराठी रंगभूमी: सद्यस्थिती आणि भावी काळ
मूळ इंग्रजी: नारायणराय हुईलगोळ
मराठी अनुवाद: प्रशांत कुलकर्णी

अध्यक्ष महोदय, बंधू आणि भगिनीनो.

ह्या असोसिएशन तर्फे मला ‘मराठी रंगभूमी: सद्यस्थिती आणि भावी काळ’ या विषयावर निबंध वाचायला सांगितले गेले. मला हे कितपत जमेल याबद्दल मी साशंक आहे. तरीपण माझ्या कर्तव्याचे भान आणि त्यांच्या विनंतीचा मान ठेवून, मी हे साहस करत आहे.

सुरुवातीलाच हे सांगितले पाहिजे की मराठी रंगभूमीने कर्नाटकाकढून नाट्यअभिरुची आणि समाज घेतली आहे. मुद्देसूदच बोलायचे तर ई.स. १८७० च्या आधी मराठी रंगभूमी अस्तित्वातच नव्हती. मराठी रंगभूमीचा विकासाचा मी थोडक्यात इतिहास इथे सांगतो.

येथील विद्वतजनाना हे नक्कीच ठाऊक असेल की कर्नाटकात कित्येक वर्षापासून ‘गोम्बी अटाडवरू'(बाहुल्यांचा खेळ), ‘भागवत
अटाडवरू'(भागवत खेळ), आणि ‘यक्षगान अटाडवरू'(यक्षगानाचा खेळ) सारख्या आविष्कारांची परंपरा आहे. रामायण, महाभारत सारख्या महाकाव्यावर, भागवत पुराणासारख्या पुराणातल्या विषयावर हे खेळ बेतलेले असतात. ‘श्री कृष्ण पारिजात’ नावाचा लोकनाट्याचा आविष्कारही प्रसिद्ध आहे. हे सर्व खेळ वर घेतलेल्या एखाद्या फलाटावर होत असत, जसे इंग्लंड मध्ये शेक्सपिअरच्या काळात होत असे. ‘गोम्बी अटाडवरू’ मध्ये काम करणारे कलाकार वेगवेगळया पात्रांसाठी वेगवेगळे मुखवटे वापरत असत. ‘भागवत
अटाडवरू’ आणि ‘यक्षगान अटाडवरू’ मध्ये काम करणारे कलाकारसुद्धा वेगवेगळया भूमिका करत, नृत्य करत तसेच मोठमोठाले संवाद/भाषणे म्हणत. मुळची भाषा ही संस्कृतप्रचुर कन्नड जरी असली तरी, त्यात काम करणारे कलाकार, जे प्रामुख्याने ग्रामीण भागातील असल्यामुळे, त्याची गावठी कन्नड भाषा वारली जात असे.

त्यानंतर नाटक मंडळ्या आल्या, जी उत्तर कर्नाटकाच्या आसपास असलेल्या मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, कुरुंदवाड या सारख्या मराठी संस्थानिकांच्या राज्यात खेळ करण्यासाठी जात-येत असत. त्या भागात असलेलेल लोक प्रामुख्याने कन्नड बोलत असत. एकदा सांगली संस्थानिकाच्या राजाने असे खेळ मराठी व्हावे म्हणून विष्णुदास भावे नावाच्या व्यक्तीस नाटक मंडळी सुरु करण्यास पाचारण केले आणि ‘भागवत खेळ’च्या धर्तीवर नाटक करायला सांगितले. पैश्याची व्यवस्था केली, आणि नाटक मंडळी सुरु झाली. रामायण महाभारतातून कथानके घेवून नाटकं बसवू लागली. साधारण त्यांची पद्धत पुढील प्रमाणे असे:

प्रमुख नट, जो सूत्रधार असे, तो रंगमंचावर प्रवेश करे, आणि विदूषकाला बोलावे, त्याला मदत करण्यास संगे. विदुषक डोक्यावर झाडाच्या फांद्या घेवून प्रवेश करे. त्यानंतर सूत्रधार गणपतीची आणि सरस्वती देवतेच्या उपस्तीथीची प्रार्थना करे. गणपती त्याच्या गणसकट प्रवेश करून आलेली संकटे दूर करतो. त्याच तऱ्हेने विद्येची देवता सरस्वती सुद्धा तिच्या वाहनावर प्रवेश करून सूत्रधाराला सर्व मदतीचे वचन देवून जाते. अशा तऱ्हेने देवतांचे आशीर्वाद मिळाल्यावर सूत्रधार इतर पात्रांची एका मागून एक त्या त्या वेळेला ओळख करून देत असे. नाटकात संगीत नसे, सूत्रधार कधी कधी गात असे. रंगमंचावर वेगवेगळी देखावे आणि दृश्ये असत.

थोड्याच कालावधीमध्ये, मराठी संस्थानिकांच्या मदतीने इतर संस्थानमध्ये ही अशी नाटक मंडळी स्थापन झाली. भव्य रंगमंच, आणि कलात्मक पद्धतीने दाखवलेली दृश्ये यांनी सजलेली हे प्रयोग, त्यांना संस्थानमध्ये आणि सध्याच्या उत्तर कर्नाटकातील भागामधे बरीच लोकप्रियता मिळवु लागले. बरीच नाटककार मंडळी यात उतरू लागली आणि एकमेकाशी स्पर्धा करू लागली. अशा तऱ्हेने नाटकांचा आणि नाटक मंडळी यांचा विकास होवू लागला. त्याच वेळेला अण्णा किर्लोस्कर नावाच्या व्यक्तीने १८८० मध्ये ‘किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी’ नावाची संगीत नाटक मंडळी चालू केली. त्याबद्दल मी थोडेसे इथे सांगतो.

अण्णा किर्लोस्कर, कर्नाटकातील गुर्लहोसूर नावाच्या एका गावी राहत असत. ते आणि बेळगावचे शेषगिरी राव हे मित्र होते. दोघेही वनखात्यात काम करत असत. शेषगिरी राव हे संगीत शिकलेले होते तसेच थोडे फार काव्य आणि गीत रचना करत असत. त्यांनी नाटकात संगीत असावे असे सुचवले. त्यांनी अशी गीते रचली जी पात्रांच्या संवादाचा जणू काही भागच होती आणि ती त्यांनी पात्रांच्या करवी गाऊन घेतली. त्यांनी मध्ये कालिदासाचे ‘अभिज्ञान शकुंतल’ कन्नड मध्ये भाषांतरित केले. तसे करताना संवाद आणि गीते त्यात आणली. नाटकातील शेवटच्या गीतामध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी हे १८७१ मध्ये केले आहे असे दिसते. त्यांनी हे भाषांतर अण्णा किर्लोस्कर यांना दाखवले. त्यांनी ते शेषगिरी राव यांच्या पद्धतीने मराठीत भाषांतरित केले. पण अण्णा एवढे करून शांत बसणाऱ्यापैकी नव्हते. त्यांनी त्यांची कंपनी सुरु केली, आणि कलाकारांना एकत्र आणून ह्या नाटकाचे प्रयोग करायला सुरुवात केली. हा नवीन नाट्यप्रकार, ज्यात संगीत आणि गाणी होती, मराठी लोकांना आवडू लागला आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाले. त्यामुळे इतर बऱ्याच जणांनी संगीत नाटक मंडळी सुरु केली आणि त्यांचा प्रभाव वाढत गेला, त्या मुळे गद्य नाटकाचा प्रभाव हळू हळू ओसरू लागला.

अण्णा किर्लोस्काराना संगीत नाटकाचे जनक म्हणू लागले. मी ह्या सभेतील श्रोतृवृन्दाचे लक्ष्य एका गोष्टीकडे वेधू इच्छितो की, शेषगिरी राव जे खरे संगीत नाटकाचे जनक होते, ते कर्नाटकाच्या दुर्दैवाने मागे पडले. मला असे नमूद करावे असे वाटते की कर्नाटकातील लोकांच्या पाठींबा मिळाला नसल्यामुळे तसेच कन्नड लोकातील उत्साहाचा अभाव यामुळे असे घडले.

नाट्यक्षेत्रात हा बदल, म्हणजे, गद्य नाटकाकाढून संगीत नाटकाकडे समाज जात छोटा, त्याच वेळेस काही नाट्यक्षेत्रातील मंडळीनी नाटकाचे, नाट्याचे मर्म अभिनयात आहे हे जाणून, गाद्य नाटकासाठी कोल्हापुरात ‘शाहूनगरवासी नाटक मंडळी’ ही नाटक मंडळी स्थापन केली. सूत्रधाराने गणपती, सरस्वती यांना रंगमंचावर आणायची आणि इतर जुन्या पद्धतीना फाटा देवून नाटकांची रचना केली. त्यात शेक्सपिअरच्या नाटकाची पहिल्या प्रथमच मराठी रंगमंचावर आणली. केळकर, आगरकर, देवल या सारख्या प्रभृतींनी शेक्सपिअरची इंग्रजी नाटकं मराठीत आणली. आणि त्यात अभिनय हाच प्रमुख भाग होता. त्यानंतर राजस्थान आणि महाराष्ट्राच्या इतिहासवर आधारलेली नाटकेदेखील त्यांनी आणली. गणपतराव जोशी नावाच्या जुनी अभिनेत्यामुळे ह्या नाटक कंपनीला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यांनी वठवलेली ऑथेल्लो, ह्यामलेट, राणा भीमदेव सारखी पात्रे गाजली. त्यामुळे मराठी नाटकांनी एक वेगळीचं उंची गाठली असे नक्कीच म्हणता येईल. ही कंपनी संगीत नाटक मंडळी बरोबर स्पर्धा करत नव्हती, तरी सुद्धा दोन्ही गोष्टी लोकप्रिय झाल्या. असे असून सुद्धा दुसरी गद्य नाटक कंपनी सुरु झाली नाही, सर्व जण संगीत नाटक मंडळी चालू करण्यास भर होता. पाटणकर संगीत नाटक मंडळी, राजापुरकर संगीत नाटक मंडळी, नाट्यक्लाप्रवर्तक संगीत नाटक मंडळी, स्वदेशी हितचिंतक संगीत नाटक मंडळी, या आणि इतर बऱ्याच कंपन्या सुरु झाल्या.

पुरणावर आधारित तसेच इतिहासावर आधारित नाटके रचणारे देखील पुढे येवू लागले. देवल आणि श्रीपाद कोल्हटकर यांनी सामाजिक नाटके लिहून समाजातील वाईट चालीरितीवर भाष्य केले. अश्या नाटकांनी मनोरंजन आणि प्रबोधनही होत असे.

दुसऱ्या बाजूला, किर्लोस्कर कंपनीचा डंका वाजत होतं. जोगळेकर, बालगंधर्व, बोडस या सारख्या गायक नट मंडळीमुळे त्यांची नाटकं लोकप्रिय होत गेली. जोगळेकरांच्या निधनानंतर, बालगंधर्व आणि बोडस यांनी एकत्र येवून, बडोद्याच्या महाराजांच्या आश्रयाने गंधर्व नाटक मंडळी चालू केली. बालगंधर्वाना अमाप प्रसिद्धी मिळत गेली. केशवराव भोसले यांच्या रुपाने त्यांना प्रतिस्पर्धी मिळाला ज्यांच्या नाटक कंपनीचे नाव होते ललितकला आश्रक मंडळी. महाराष्ट्र नाटक मंडळी नावाची गद्य नाटक कंपनी देखील याच सुमारास सुरु झाली.

या घडीला निशितपणे असे म्हणता येईल की मराठी रंगभूमी ही जोमाने वाढत आहे. मात्र काही मुद्दे आहे ते मांडतो. संगीत नाटक मंडळी संगीताकडे जास्त लक्ष्य देतात, त्यामुळे गाण्यात असलेले भाव आणि त्यांची अभिव्यक्ती याकडे दुर्लक्ष होत आहे. गाणे परत म्हणण्याचे प्रयोजनच त्या गाण्यातील भाव काय आहेत आणि नटाला काय सांगायचे आहे हे आहे. फक्त संगीतातील कौशल्य याकडे लक्ष्य दिल्यास विशेष बोध होत नाही.

महाराष्ट्रातील नाटककार समाजातील समस्यावर, राजकीय आणि इतर धार्मिक विषयावर नाटके लिहीत आहेत. त्याद्वारे मराठी समाजात नाट्य अभिरुचीस खतपाणी मिळत आहे. तसेच विधवा विवाह, बाल विवाह या सारख्या समस्यावर नाटकं येत आहेत. राजकीय नाटकामुळे समाजात राष्ट्रीय भावना जागृत होत आहे. तसेच प्रत्येक वर्षी ‘नाट्यसमुदाय’ वेगवेगळ्या ठिकाणी भरवली जात आहेत. नाटककार, नट, आणि रसिकांना त्यात आमंत्रण असते. नाट्य क्षेत्रातल्या समस्यावर तेथे चर्चा होते. आतापर्यंत १५ अशी संमेलने भरवली गेली आहेत आणि ती अतिशय उपयुक्त ठरली आहेत.

मला खेदाने असे नमूद करावेसे वाटते की मराठी नाटक कंपन्यामध्ये हार्मोनियमचा साथीचे वाद्य म्हणून सर्रास वापर होत आहे. मी वर्तमान पत्रात असे वाचले आहे की गंधर्व नाटक मंडळीने आता सारंग, जे भारतीय वाद्य आहे, ते वापरण्यास सुरुवात केली आहे. माझी असी आशा आहे की इतर कंपन्या देखील असे करतील.

सरते शेवटी, माझी अशी आशा आहे की, आपली कर्नाटकातील रंगभूमी जी मागे पडली आहे, आणि जी अशिक्षित आणि अडाणी लोकांच्या हातात आहे, ते मराठी रंगभूमीचे अनुकरण करतील आणि मैसूर महाराजांच्या आश्रयाखाली आपली प्रगती साधतील.

माझा लेख शांतपणे ऐकून घेतल्या वाद्दल मी श्रोत्यांचे आभार मानतो आणि येथे थांबतो.

(मे १९२१ मध्ये बंगळूर येथे भरलेल्या Amateur Dramatic Association-ADA दुसऱ्या संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिकेतून हा लेख घेतला आहे)

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s