राज्य गीत(state anthem) आणि त्याची परंपरा

पुढील महिन्यात महाराष्ट्र दिन(मे १) येतो आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्राचे गुणगान गाणारी वेगवेगळी गीते आहेत. त्यातील ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अधिकृत राज्य गीत आहे.  मी नारायणराय हुईलगोळ यांचे चरित्र असलेल्या पुस्तकाबद्दल ह्या ब्लॉगवर आधी लिहिले होते. त्यांचे सुप्रसिद्ध कार्य म्हणजे त्यांनी कर्नाटकाचे राज्य गीत लिहिले आहे. ते जेव्हा कर्नाटक राज्य स्थापन करण्याची चळवळ सुरु होती तेव्हा ते खुपच लोकप्रिय झाले होते.

काही दिवसापूर्वी मी माझ्याकडे असलेली जुनी कागदपत्रे चाळत असताना माझ्या हाती मी केलेल्या एका लेखाचे भाषांतर लागले. साधारण १०-१२ वर्षापूर्वी मी ते केलेले होते(ते यापूर्वी कुठे प्रकाशित झाले नव्हते!). तो मूळ लेखन होतं कन्नड मध्ये आणि विषय होता कर्नाटकाचे संस्कृत मधील राज्य गीत, जे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात लिहिले गेले होते. ह्या लेखात वेगवेगळ्या राज्यांच्या राज्य गीतांचा आणि ह्या परंपरेच्या इतिहासाचा त्या निमित्ताने आढावा घेतला आहे. परत संगणकावर लिहीत बसण्यापेक्षा मी तो मूळ कागदचं इथे देत आहे. स्वातंत्र्याच्या आधी भारतात वेगवेगळी संस्थानिकांचे राज्य होते. त्यातल्या बऱ्याच संस्थानांची राज्य गीते होती. मैसूर संस्थानाचे देखील कन्नड मध्ये राज्य गीत होते. स्वातंत्र्यानंतर जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा नवीन राज्यांची देखील राज्य गीते निर्माण करण्यात आली. पण राज्य गीतांची ही परंपरा संस्थानांमधून  सुरु झाली असावी. राज्य गीत आणि त्याचा इतिहास यावर संशोधन करायला बराच वाव आहे.

हा लेख परत वाचताना माझ्या असे लक्षात आले की, मी त्या संस्कृत गीताचा फक्त अर्थ दिला आहे. मूळ संस्कृत गीत दिलेले नाही. ते फक्त मी येथे देत आहे(कन्नड लिपीतून संस्कृत/देवनागरीत करणे तसे जरा अवघड आहे, पण मी प्रयत्न केला आहे-चूक भूल द्यावी घ्यावी)

वंदे कर्णाट मातरम्‌
कावेर्या कृष्णया पूता:
तुंगभद्रा निशेताम्
सह्यशैल्वविराजतम्
वंदे कर्णाट मातरम्‌|

आनंद शंकराचार्य
सराम बसवेश्वरै
विद्यारण्य कृतोद्भारम्
वंदे कर्णाट मातरम्‌|

विजयाख्य नगर्याम:
विर्यध्वज विशोभिनी
आर्यधर्मस्य रक्षर्तीम्
वंदे कर्णाट मातरम्‌||

20150214_063940 20150214_063959

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s