goodreads अर्थात पुस्तकांबद्दल सर्व काही

आपण पुस्तके वाचतो, त्याबद्दल बोलतो, लिहितोही बऱ्याचदा. पुस्तकांबद्दल बोलणारी पुस्तके देखील कित्येक आहेत. तुम्ही जी. ए. कुलकर्णी यांची पत्रे असलेली ४ खंडांची पुस्तके वाचली आहेत का? त्यांच्या पत्रातून ते प्रामुख्याने पुस्तकाबद्दलच. स्वतःच्या नाही, तर त्यांना आवडलेली, न् आवडलेली, हवी असलेली, वाचू नका असे सल्ले देणारी पुस्तके याबद्दलच ते प्रामुख्याने त्या पत्रातून लिहीत. मला तर कित्येक इंग्रजी पुस्तकांबद्दल त्या मुळेच माहिती समजली हे मान्यच करावे लागेल.

मराठीत आणि इंग्रजीत देखील अशी बरीच पुस्तके आहेत जी पुस्तकाबद्दल, त्यांच्या प्रभावावर, किंवा एकूणच ती कशी त्यांच्या जीवनाचा भाग आहेत, त्याबद्दल आहेत. वेगवेगळया ठिकाणी पुस्तकाबद्दल आलेली माहिती, त्यांची नावे आपण कुठेतरी नोंदवून ठेवतो. जेणेकरून, ती आपण नंतर मिळवण्याचा प्रयत्न करतो. आजकाल आपण पुस्तके ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकतो. फ्लिपकार्ट, बुकगंगा सारख्या ठिकाणी My Wishlist नावाची सोय असते. आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकांची आपण आपल्यासाठी तशी बनवू शकतो.

गेल्या काही वर्षात, goodreads.com नावाची एक साईट सुरु झाली आहे. ती सुद्धा ह्या कल्पनेचा एक ऑनलाइन अविष्कारच आहे असे म्हणायला हवे. त्यात आपण वाचत असलेली पुस्तके, वाचलेली पुस्तके, आपल्या कपाटात असलेली पुस्तके, हवी असलेली पुस्तके याबद्दल बोलू शकतो आणि एकमेकांना सांगू शकतो जेणेकरून इतरांना त्याबद्दल समजू शकते आणि ‘एकमेका साह्य करू’ ह्या उक्ती प्रमाणे संपर्क साधू शकतो. आपल्यापैकी जे लेखक आहेत, किंवा ज्यांची पुस्तके आहेत किंवा लिहिणार आहेत, ते सुद्धा त्याबद्दल त्यावर बोलू शकतो आणि पुस्तक प्रोमोट करू शकतो. लेखक आणि वाचक संवाद यामुळे वाढू शकतो. ह्या साईटचा एकूण पसारा पहिला तर कमी होत असलेल्या वाचन संस्कृती बद्दल जे बोलले जाते ते खरे की खोटे अशी शंका यावी.

फक्त मराठी पुस्तकांसाठी अशी एखाधी साईट असायला हरकत नाही. अश्या साईट्स वर एखादे दिवशी ई-साहित्य संमेलन भरल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s