काय वाट्टेल ते होईल!

पू. ल. देशपांडे यांनी, त्यांच्या स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त, काही इंग्रजी पुस्तकांचा देखील अनुवाद केला आहे. हेमिंग्वेचे एका कोळीयाने, मनोहर माळगावकर यांचे कान्होजी आंग्रे, ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा ही नाटके देखील अनुवादित आहेत. ‘काय वाट्टेल ते होईल!’ या त्यांच्या अनुवादित पुस्तकाचा मला काही दिवसापूर्वी अचानकच शोध लागला आणि मी घेतले. त्या पुस्तकाबद्दल लिहिण्याचा हा प्रपंच.  त्यांचे हे पुस्तक तसे दुर्लक्षितच म्हणावे लागले.

जॉर्ज आणि हेलेन पापश्विली(George and Helen Papashvily) यांचे १९४० मध्ये प्रकाशित झालेले ‘Anything can happen’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. भूतपूर्व सोविएत रशिया(USSR) मधील जॉर्जिया या प्रांतातून जगभर फिरून अमेरिकेत गेलेल्या जॉर्जी नावाच्या माणसाच्या सफरीची ही कहाणी आहे. हे पुस्तक जवळ जवळ लेखकाचे आत्म-वृत्तांत असल्यासारखेच वाटते. जॉर्ज पापश्विली हा देखील मुळचा जॉर्जिया प्रांताचाच. पहिल्या महायुद्धात इराण पर्यंत गेला होता. त्यानंतर इस्तंबुलला राहून पुढे अमेरिकेत गेला. तेथे त्याने अनेक व्यवसाय केले, यंत्र विशारद झाला, आणि पुढे शिल्पकलेत त्याने प्राविण्य मिळवले. त्याच्या कलेची अमेरिकेत खूप प्रशंसा झाली. त्याची पत्नी हेलेन हीचा जन्म कॅलिफोर्नियाचा.

पुस्तक छोटेखानी आहे-अवघ्या १८० पानांचे, परचुरे प्रकाशनाने प्रकाशित केलेले. अमेरिकेत जहाजाने ३७ दिवसांचा प्रवास करून, पाय ठेवल्यापासून जॉर्जीचा सुरु झालेला प्रवास, कॅलिफोर्नियापर्यंत धडकून, तो अगदी त्याचा हेलेनशी विवाह होऊन परत पूर्वेकडे व्हर्जिनियामध्ये स्थिरावण्यापर्यंतचा प्रवास, यात विविध रेखाटण्यात आला आहे. जॉर्जी हा साधा, इमानी मनुष्य आहे. या दुनियेतले छक्के-पंजे त्याला सहसा समजत नाही. त्याचे चित्र थोडेफार भोळसर रंगवलेले आहे. पुस्तकातले प्रमुख पात्र जॉर्जी हा जसा साधा आणि इमानी आहे, तसाच हळवा, माणुसकी असलेल्या, आपल्या मातृभूमीच्या प्रती/मातृभाषेच्या प्रेम असलेल्या मनुष्य आहे. त्याचे प्रत्यंतर वारंवार येत राहते. पू. ल. देशपांडे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, त्याच्या स्वभाव-विशेषामुलेच त्यांना हे पुस्तक मराठी आणावेसे वाटले. त्याच्या ह्या निवेदन किती सत्य आहे आपल्याला लगेच उमजते, कारण त्यांचे सर्व लिखाणच अश्या प्रकारच्या व्यक्तीच्या रेखाटनानी भरलेले आहे.

अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावरून त्याचा पश्चिमेकडे झालेला प्रवास, वाटेत भेटली माणसे, आलेले अनुभव, पोटासाठी त्याने केलेले उद्योग, आणि ठिकठिकाणी त्याला भेटलेले जगभरातले लोक, तसेच त्याच्या देशातून/प्रांतातून आलेले लोक यांना भेटल्यानंतरचा त्याला होणार हळवा आनंद, याचे सारे रम्य चित्रण यात आले आहे. हे सर्व चित्रण १९३०-३५ च्या आसपासच्या अमेरिकेचे असावे. मी स्वतः अमेरिकेत २० वर्षापूर्वी गेलो होतो, तेथे राहिलो, भरपूर प्रवास केला. त्याचे स्वजन भेटल्यानंतरचा होणारा आनंद जसा चितारला आहे, त्याच्याशी मला समरस होता आले, कारण मीही त्याच अनुभवातून गेलो होतो. अमेरिकेत सध्या coast-to-coast प्रवास करणे खुपच सोपे झाले आहे. पण १९३०-३५ च्या सुमारास तशी परिस्थिती नव्हती. त्याचेही दर्शन यातून होते.

कॅलिफोर्नियात गेल्यानंतर तो हॉलीवूड मध्ये छोटी-मोठी कामे-पडद्यावरील आणि पडद्यामागील दोन्ही, करायला लागतो. एका प्रकरणात त्याचे तपशीलवार वर्णन आले आहे. ते वाचून तर मला अमेरिकेत १९५०-६० च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या Lucy I Love You नावाच्या टीव्ही सिरिअल मधील एका एपिसोडची आठवण झाली. यात लुसी आणि तिचा मेक्सिकन नवरा, त्यांचे मित्र, हे सर्व पूर्वेकडून कॅलीफोर्निआत जाऊन हॉलीवूड मध्ये काम करण्याची हौस कशी भागवतात आणि त्यांची  कशी तारांबळ उडते याचे बहारदार चित्रण आले होते. दुसऱ्या एका प्रकरणात, त्याचे ‘शुभ मंगल’ होते त्याचे वर्णन आले आहे. ते सुद्धा मजेशीर आहे. जॉर्जीअन माणसांची स्वभाव वैशिष्टे यांचे दर्शन होते.

पुलनी वापरलेल्या भाषांतराची शैली मात्र मजेशीर आहे आणि ती त्यांनी जाणून बुजुनच तशी ठेवली आहे हे उघडच आहे. जॉर्जीचा साधेपणा, भोळसरपणा दर्शवण्यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी बाळबोध आणि हास्यास्पद शब्द रचना वापरली आहे. त्यामुळे, माझा तरी बऱ्याच ठिकाणी पुस्तक वाचताना रसभंग झाला. लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकासारखे हे पुस्तक आहे असे वाटत राहिले. मुळात ते तसे नाही. मूळ इंग्रजी पुस्तक नंतर मी इंटरनेट वरून मिळवून वाचले. काही शब्द पहा: फर्स्टक्लासच्या एवजी फस्सक्लास, युअर ऑनेस्टी च्या एवजी युअर ऑनेष्टी, कस्टम अधिकारी एवजी कष्टमसाहेब, मूळ पुस्तकात काही ठिकाणी लेखकाने जॉर्जीअन व्यक्ती जेव्हा इंग्रजी बोलते तेव्हा त्याचा उच्चार थोडा वेगळा असतो, ते दाखवण्यासाठी काही इंग्रजी शब्दांची मुद्दामहून वेगळे वापरले आहेत. पण ते मराठी आणताना, त्यांनी वापरलेल्या मार्ग थोडा फसल्यासारखा वाटतो. काही ठिकाणी सरळ सरळ भाषांतर हे वादातीत ठरावेत असे दिसते. उदा. पनीर शब्द. हे त्यांनी इंग्रजी पदार्थ cheese याला वापरले असावे. मूळ इंग्रजी पुस्तकात जॉर्जीअन भाषा, खाद्य पदार्थ यांचे संदर्भ बरेच आहेत. त्यातील काही भाषांतरात उतरले आहेत, त्यामुळे थोडीफार कल्पना येते, पण काहीसा अपुरा, अधुरा राहिल्यासारखा वाटत राहतो.

सुभाष अवचटांची रेखाचित्रे आणि मुखपृष्ठ उत्तम झाली आहेत आणि अनुरूपपणे पुस्तकात वापरली गेली आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने इंटरनेट वर माहिती शोधताना आणखी संदर्भ मिळाले. जसे की अमेरिकेत मूळ लेखकाच्या नावाचे एक स्मारक आहे, तसेच जॉर्जिया आणि अमेरिका यामधील संबंध यावर असलेला एक ब्लॉग सापडला. ते संदर्भ आणखी अभ्यासायला आणि मूळ इंग्रजी पुस्तक विकत घेवून परत वाचायला मला नक्कीच आवडेल.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s