मीरा घर

माझ्या सुदैवाने प्रो व्ही एन झा यांच्या सारखे जगप्रसिद्ध संस्कृत आणि न्यायशास्त्र यामधील तज्ञ, यांच्या बरोबर त्यांच्या वेगवेगळया कार्यक्रमात मला सहभाग होता येत असते. पुण्यातच वेगवेगळे कार्यक्रम करायची त्यांची योजना आहे. २-३ महिनापुर्वी त्यांनी नारद भक्ती सूत्र या विषयी ७-८ दिवसांची कार्यशाळा घेतली होती. आता ऑक्टोबर मध्ये त्याचाच पुढचा भाग म्हणून शांडिल्य भक्ती सूत्र या विषयी निवासी कार्यशाळा घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यानिमित्ताने आम्ही एक जागा पाहायला गेलो होतो. ते म्हणजे मीरा घर.

मीरा घर हे वृद्धाश्रम आहे. मी या पूर्वी पुण्यातील काही कार्यक्रमानिमित्ताने निवारा वृद्धाश्रम पहिले होते. पुण्याजवळ कामशेत येथील सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण असलेल्या ठिकाणी मीरा घर आहे. आम्ही तेथे ३-४ तास होतो. आम्हाला ते पूर्णपणे पाहता आले, त्यातील काही रहिवाश्यांबरोबर बोलता आले. वृद्धाश्रमाची कार्य-पद्धती समजली. त्यांचे काय प्रश्न असतात, त्यांना कशाची गरज असते, आणि हे वृद्धाश्रम त्या गरजा कशी पूर्ण करते याबद्दल समजले. इतक्या जवळून वृद्धाश्रम पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ. आपण समाजात असलेल्या वृद्धांच्या समस्या यावर बरेच विचार मंथन होत असलेले पाहतो.

वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. प्रश्न आहे वृद्धांची काळजी घेण्याचा, त्यांना चिंता मुक्त आणि आनंदी जगण्याच्या हक्काचा. विविध कारणांमुळे समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध जोडपी एकाकी पडत असतात, विविध आजारांनी ग्रस्त असताना, असे एकाकी राहणे नक्कीच अवघड आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीफार बरी आहे आणि ज्यांना अश्या सोयींची सुविधांची गरज आहे, त्या साठी मीरा घर, निवारा वृद्धाश्रम या सारखी ठिकाणे नक्कीच जीवन सुसह्य करू शकतात. याबद्दल बरेच लिहिले गेले आहे, विचार मंथन झाले आहे. अमेरिकेत सारख्या पाश्चात्य देशात ही संकल्पना असिस्टेड लिविंग सारखी संकल्पना आहे. गरज ही शोधाची जननी आहे. मी मानसिक आजाराच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे बऱ्याच वेळेला मानसिक आजार असलेले, किंवा अल्झायमर्स डिसीज यासारखे आजार असलेल्या वृद्ध व्यक्ती पाहण्यात येतात. घरच्या घरी आधार आणि मदत मिळत असेल तर उत्तमच, पण वृद्धाश्रमाचा पर्याय नक्कीच चांगला आहे. वृद्धाश्रमात काही कारणामुळे जाण्याची वेळ येणे हेच मुळात दुर्दैव आहे, पण त्या कडे पाहताना समाजाच्या, कुटुंबाच्या दृष्टीकोनात paradigm shift यायला हवे असे वाटून गेले.

तर ते असो. मीरा घर या वृद्धाश्रमाची व्यवस्था तेथील व्यवस्थापक श्री गायकवाड पाहतात. आमच्या भेटीदरम्यान त्यांचे आम्हाला मिळालेले सहकार्य, आदरातिथ्य, त्यांनी आम्हाला दिलेली माहिती, यावरून त्यांची संवेदनशीलता, तळमळ दिसली. तेथील स्वच्छता, वेगवेगळया सुविधा, ज्येष्ठांना अनुकूल अशी राहण्याची व्यवस्था, प्रसन्न वातावरण नक्कीच आशादायक वाटले. एकदा जरूर भेट द्यावी अशी ती जागा आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s