मी अल्बर्ट एलिस-पुस्तक परिचय

मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे, ‘सा‘ने Rational Emotive Behavior Therapy(REBT) संबंधित  कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्यात मी भाग घेतला होता. REBTचे आहेत प्रवर्तक डॉ. अल्बर्ट एलिस, जो एक प्रख्यात मानसशास्त्रज्ञ होता.  त्यांची REBT आणि मानसशास्त्राविषयी बरीच पुस्तके आहेत. डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र मला मिळाले. ते वाचल्या नंतर मला काय वाटले हे सांगण्याचा हा प्रपंच.

हे पुस्तक म्हणजे चरित्र आहे की कादंबरी आहे की मलपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. पुस्तकाचा मुख्य उद्देश त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा हा असेल तर तो मला तरी विशेष साधला गेला आहे असे वाटत नाही. पण त्यांचे जीवन कसे होते हे सांगण्याचा उद्देश जर या पुस्तकाचा होता तर, ते बऱ्यापैकी साधले गेले आहे. हे पुस्तक Novel of Formation(Buildungsroman) प्रकारातील आहे असे म्हणायला हरकत नाही. अश्या पुस्तकात मुख्य नायकाची जडण-घडण कशी झाली, त्याचे आयुष्य कसे होते हे सांगण्याचा प्रयत्न असतो. डॉ. अंजली जोशी ह्या स्वतः मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आहेत. हे पुस्तक त्यांचे गुरु कि. मो. फडके यांच्या अप्रकाशित इंग्रजी चरित्रावर बेतले आहे. त्यांचा आणि  डॉ. अल्बर्ट एलिस परिचय होता.

पुस्तक हे १८ प्रकरणातून आहे आणि स्वरूप हे प्रथम पुरुषी निवेदन असे आहे. डॉ. अल्बर्ट एलिस यांचे जीवन किती वादळी, खडतर होते हे समजते. REBTचा पाया विचार आहे, तो त्यांनी त्यांच्या आयुष्यात किती लवकर नियंत्रणाखाली आणून, परिस्थितीवर मात केली, तसेच REBT च्या दिशेने प्रवास सुरु केला. त्यांची प्रकृती देखील लहानपणापासूनच बेताची होती. या सगळ्यावर त्यांनी खडतर परिश्रम, शिस्तबद्ध विचार आणि अभ्यास याद्वारे आयुष्याच्या उद्दिष्टांच्या पायऱ्या चढत गेले. स्वतः वैद्यकीय शिक्षण घेतले असताना देखील, त्यांच्या आंतरिक ओढीमुळे, त्यांनी लैंगिक समस्या या विषयात प्राविण्य मिळवले, आणि लोकांना त्यांच्या संस्थेद्वारे(Love and Marriage Problems Institute) मार्गदर्शन करून लागले. असे असले तरी, त्यांचे स्वतःचे वैवाहिक जीवन खडतर होते. आश्चर्य म्हणजे  त्यांची दोन घटस्फोट झालेली होती(आणि सरत्या आयुष्यात त्यांनी पत्नी त्यांना सोडून गेली), तसेच विवाहबाह्य संबंध, स्वैर लैंगिक वर्तन यावर त्यांचा विश्वास होता. त्यांची याबद्दलची मते, ५०-६० वर्षापूर्वी अमेरिकेतदेखील वादग्रस्त होती. आणि पुस्तकात याबद्दल अतिशय सविस्तर आलेले आहे. १८ प्रकरणातून जवळ-जवळ १०-१२ प्रकरण ही त्यांचे लैगिक जीवन सांगणारे, तसेच त्यातून त्यांनी त्या विषयातील आपले ज्ञान अभ्यासातून कसे वाढवले यावर आहे.

अफाट वाचन, संगीत आणि चित्रपट यात रस त्यांना होता. त्यांचे बालपण आणि नंतरही न्युयॉर्क कर्मभूमी होती.  तो काळ, आणि त्यावेळचा न्युयॉर्क परिसर सविस्तर आलेला आहे. त्यांच्या बालपणी त्यांनी पाहिलेला Saturday Afternoon हा त्यांच्यावर कसा प्रभाव टाकून गेला हे सांगितले आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल पहिल्या काही प्रकरणातून माहिती आलेली आहे, पण नंतर-नंतर ती खुपच त्रोटक होत गेली आहे.  २०११ मध्ये न्युयॉर्क मध्ये जो हल्ला झाला, त्यातून बऱ्याच लोकांना बसलेल्या धक्क्यामुळे  मानसिक आजार जडले. त्यांनी त्यावेळेस कसे उपचार केले याबद्दलही पुस्तकात शेवटी शेवटी आले आहे. पुस्तकात त्यांच्या उत्तर आयुष्याबद्दल अजून सविस्तर यायला हवे होते असे वाटून गेले. निवेदनाच्या निमित्ताने त्यांचे विचार सविस्तर पणे आले आहेत, ते निवेदन मात्र वाचण्याच्या ओघात कृत्रिम वाटतात.

या पुस्तकात डॉ. अल्बर्ट एलिस यांच्या काळातील एक प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. अब्राहम लो(जे सुद्धा ज्युईश-अमेरिकन होते)  याबद्दल काहीच कसे आले नाही, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांची will training उपचार पद्धती प्रसिद्ध आहे. अर्थात मानसशास्त्र(psychologist), समुपदेशन(counselling) आणि मानसोपचारशास्त्र(psychiatrist) यात थोडा फरक आहे.

डॉ. अल्बर्ट एलिस यांचे एक पुस्तक Mind Over Mood डॉ चंद्रशेखर पांडे यांनी मराठीत माईंड प्रोग्रामिंग या नावाने आणले आहे. ते सुद्धा डॉ. अल्बर्ट एलिस यांचे सहकारी होते, त्या दोघांनी एकत्र काम केले होते. डॉ. अल्बर्ट एलिस यांची इतर पुस्तके देखील मराठी आली पाहिजे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s