Scent of a Woman

एखाद्या सुट्टीच्या दिवशी जर बाहेर पाऊस पडत असेल तर, रस्त्यावर कोंडलेल्या वाहतुकीत तडमडत जाण्यापेक्षा, एखादे पुस्तक घेवून बसणे किंवा एखादा छानसा सिनेमा पाहणे, मी पसंद करतो. परवाचीच गोष्ट. पुण्यात संध्याकाळी परतीचा पाऊस गडगडत करत सुरु झाला. काही कारणासाठी बाहेर जायचे होते, पण मी घरीच थांबलो. टीव्हीवर channel surfing करता करता मला दिसले की Scent of a Woman हा सुरु होणार आहे. त्या बद्दल ऐकले होते. पण पाहण्याचा योग आला नव्हता. मी तो पाहायचे ठरवले. आणि पुढचे तीन तास एका वेगळ्या अनुभतीमधून गेलो.

हा सिनेमा म्हणजे मानवी भाव-भावनांचे उत्कट चित्रण आहे. मुख्य पात्र सुप्रसिद्ध अभिनेता अल् पचिनो होता., जो अंध आहे, आणि सैन्यातील निवृत्त अधिकारी(कर्नल) आहे. सिनेमाच्या नावाचा अर्थ म्हणजे, त्याच्याकडे असणारी घ्राणेंद्रिय आणि त्यामुळे त्याला चटकन ओळखू येणारी सेंट्स आणि त्यांची नावे. अंधत्व आल्यामुळे, एकाकी पडलेला, निराश, पण हेकेकोर, हट्टी, करडा स्वभाव असलेला अधिकारी त्याने अफलातून रंगवलेला आहे. त्याच्या जोडीला आहे, कॉलेजकुमार मुलगा, ज्याला सुट्टीत काही काम हवे असते. त्यामुळे, तो ह्या अधिकाऱ्याच्या घरी थडकतो. त्याची मुलाखत अधिकारी ज्या प्रमाणे घेतो, त्यावरून त्या मुलाचे अवसानच गळते. पण त्या कर्नलची मुलगी त्याला ठेवून घेते, कारण तिला तिच्या पती आणि मुलीसोबत २-३ दिवसांसाठी बाहेरगावी जायचे असते. त्यानंतर जी काही धमाल उडते त्याचे चित्रण म्हणजे हा चित्रपट.

कर्नलला एकूणच आयुष्याबद्दल नैराश्य आले असते आणि त्याने आत्महत्या करायचे असे ठरवलेले असते. पण त्या आधी जवळ असले नसलेले पैसे गोळा करून २-३ दिवस शेवटच्या इच्छा पूर्ण करण्याचा त्याचा बेत असतो. तो मुलगा आणि त्याच्यामधील निर्माण झालेला विश्वास, अविश्वास, ओलावा, आपुलकी, राग, लोभ ह्या सर्व हिंदोळ्यातून हा चित्रपट जात राहतो, आणि शेवटी तो आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतो, आणि त्याला नवी उमेद मिळते.  चित्रपटात एक छोटेसे उपकथानक आहे, जे त्या मुलाच्या कॉलेज-विश्वासी निगडीत आहे. त्यात ही त्या मुलाने दाखवलेला प्रामाणिकपणा, आणि परिस्थिती नसताना मोहापासून दूर राहून, मित्राशी एकनिष्ठ राहण्याचा त्याच्या स्वभावाचे पैलू दाखवले आहेत, जे नक्कीच आश्वासक आहेत. अल् पचिनोने त्या मुलाच्या बाजूने केलेले कॉलेज मधले भाषण भन्नाटच. हा त्याच्या आवाजाचा, आणि वाचिक अभिनयाचा उत्तम नमुना आहे, तसेच अंध व्यक्ती असल्याचा अभिनय देखील तर उत्तमच. या सर्वामुळे अल् पचिनोला अभिनयाचे ऑस्कर पारितोषिक त्यावर्षी मिळाले होते.

१९९२ मधला हा चित्रपट पाहून, काहीतरी चांगले, तेही बऱ्याच दिवसात पाहिल्याचे समाधान मिळाले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s