कट्यार काळजात घुसलीच!

दिवाळीच्या दिवसात ‘कट्यार काळजात घुसली’चे प्रोमो, त्यावर आधारित कार्यक्रम पाहून जवळ जवळ सगळा चित्रपट पहिल्यात जमा होता खरं तर. सुबोध भावे, शंकर महादेवन, सचिन यांचे चित्रपटानिमित्त विचार, भावना ऐकले होते, वाचले होते. नाटकात आणि त्यात काय फरक आहे हेही समजले होते. फार पूर्वी हे नाटक देखील पहिले होते. चित्रपटाचे मार्केटिंग तुफान झाले होते, कधी नव्हे तेवढे लोकं मराठी चित्रपटाबद्दल ऑफिसमध्ये, सोसायटीमध्ये उत्सुकतेने बोलत होते. काही जणांनी तो पहिला देखील होता, आणि त्यांना तो आवडलाही होता. काही जण पहायचाय म्हणत होते. खूप साऱ्या चित्रपटगृहात त्याचे बरेचसे खेळ लावले गेले होते. एकूण खुपच हवा झाली होती.

आणि आज शेवटी एका घरगुती कार्यक्रमानिमित्त घरातील दोन पिढ्यांनी तो आम्ही पाहिला. सर्वाना तो आवडला देखील. आधी कट्यार(इंग्रजीत dagger) म्हणजे काय सांगावे लागले आजच्या पिढीला, पण ते ठिक आहे. मला मात्र काही विशेष भावाला नाही. अपेक्षाभंग वगैरे नाही झाला, कारण काय अपेक्षा ठेवून हा चित्रपट पहायचा हे त्यांनीच आधी सांगितले होते. मुख्य म्हणजे त्यातील गाणी. ती गाणी म्हणजे अगदी ट्रेलर सारखी आहेत. ती गाणीच खरे तर त्या पटकथेचा जीव का प्राण आहे. त्यातच काट-छाट. मृण्मयी देशपांडेला तर विशेष काही कामच नाही. इंग्रजी सब-टायटल्स मुळे थोडा त्रास होतो. ते जाऊ जे, मी काही कथा वगैरे सांगत बसत नाही येथे. त्याची माहिती कुठेही मिळेल. मूळ नाटकातील वसंतराव देशपांडे यांनी गायलेली गाणी सुद्धा उपलब्ध आहेतच.

सुबोध भावे, सचिन सुद्धा गातात, त्यांना गाता गळा आहे. एका गाण्यांच्या सचिनला तर आपण पहिलेच आहे महागुरू म्हणून. ‘कट्यार…’ मधील त्याच्या नकारात्मक भूमिकेचा खूप गाजावाजा झाला होतं. पूर्वी सुबोधने काही नाटकात, जसे की, लेकुरे उदंड झाली, गायला आहे. त्याची जाण त्याला आहे. त्याने बालगंधर्व मध्ये खुद्द बालगंधर्वांची भूमिका केली आहे. या सर्वामुळे त्याला हा चित्रपट झेपला आहे, असे म्हणावे लागेल. जर चित्रपट पाहून, लोकांना शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत काय आहे, किंवा ते शिकणे अथवा जाणकार श्रोता बनण्याच्या दिशेने जर काहींची पावले पडली तर चांगलेच आहे.

मजेची गोष्ट म्हणजे राहुल देशपांडे देखील ह्या नाटकाचे प्रयोग सध्या धडाक्यात करतायेत. असे कधी पूर्वी झाले होते का हे तपासले पाहिजे. एकाच वेळेस नाटकाचे आणि त्यावरील आधारित चित्रपटाचे खेळ होताहेत. ४-५ वर्षापूर्वीच त्यांनी हे नाटक परत रंगभूमीवर आणले होते. काही काळ बंद होते. आता हा चित्रपट आल्यानंतर लोकांना नाटक देखील परत पाहायला मिळावे, चित्रपटाचे ‘मूळ मुद्दल’ काय आहे हे रसिकांना समजावे ह्या उद्देशाने बहुधा त्यांनी ते परत आणले असावे.

नाटकाचे चित्रपट व्हावेत का हा एक मुद्दा या निमित्ताने पुढे आला. माझे तर मत आहे की ते जरूर व्हावेत. पूर्वीही झाले आहेत, पुढेही होतीलच.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s