कार्टी काळजात घुसली

कट्यार नंतर आता कार्टी! हे आहे मी पाहिलेल्या नाटकाचे नाव. ते आहे प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान यांचे, म्हणजे प्रमुख भूमिका त्यांची आहे. प्रसिद्ग नाटककार वसंत सबनीस यांनी हे नाटक लिहिले आहे. खरे तर हे नाटक बरेच जुने आहे. पूर्वीच्या प्रयोगातून मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस हे दोघे काम करत असत. ‘प्रशांत दामले’ या संस्थेने ते पुनर्जीवित केले आहे.

मी बऱ्याच दिवसातून व्यावसायिक नाटक पहिले. प्रशांत दामलेचे म्हणजे धमाल विनोदी. त्यात त्याची भूमिका एक संगीत दिग्दर्शक असलेल्या पित्याची. म्हणजे त्याला गायला भरपूर वाव. एकूण नक्कीच त्याला अनुरूप अशी भूमिका होती. पण दुर्दैवाने एकच गाणे त्यात आहे. अजून एखादे तरी असायला हरकत नव्हती. त्याच्या विनोदी अभिनयाची शैलीमध्ये तोच-तोचपणा यायला लागला आहे असे वाटत राहते. तो या नाटकात कितीवेळा दोन्ही हात/बगला वर करून बोलला आहे, तसेच, सारखे कपाळावरील केसावरून हात फिरवणे हा प्रकारसुद्धा, जरा कमी झाला असला तर बरे झाले असते. पण एकूण दोघे अगदी सफाईदारपणे रंगमंचावर वावरले आहेत आणि दोघांचे ट्युनिंग चांगले जमले आहे.  सब टीव्ही वर त्याची प्रमुख भूमिका असलेली ‘चंद्रकांत चिपळूणकर सिढी बंबवाला’ ही मालिका काही महिन्यापूर्वी आली होती. पण काही एपिसोडनंतर त्याने गाशा गुंडाळला. मला खूप अशा होत्या त्याकडून मालिकेकडून आणि प्रशांत दामलेकडून. त्याची पहिली हिंदी मालिका आणि त्याने अगदी ठरवून, म्हणजे, नाटकं वगैरे बंद करून, ती मालिका स्वीकारली होती. सब वरील तारक मेहता प्रमाणे ती गाजेल असे वाटले होते मला, पण, मला देखील तारक मेहता मधील दिलीप जोशी आणि प्रशांत दामले या दोघात दिलीप जोशी(जेठालाल) इतक्या वर्षानंतर फ्रेश वाटत राहिला.

जुने नाटक असले तरी काळानुसार काही बदल करावेच लागतात. व्यक्तींची नावे, मोबाईल फोन वगैरे त्यात आलेच. ते तर झालेच आहे. नाट्यगृह तर अगदी हाउसफुल होते, आणि ते अपेक्षितच होते, कारण प्रशांत दामले. तेजश्री प्रधान हिच्या भोवती ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे तसेच तिच्या शशांक केतकर याच्याबरोबरचा घटस्फोट याचे वलय आहेच. हे नाटक टिपिकल १९७०-८० च्या दशकात आलेली वसंत कानेटकर, वसंत सबनीस, शिरवाडकर, आणि इतर नाटकारांची जशी कौटुंबिक, हलकी-फुलकी, नर्म-विनोदी अशी नाटके होती, तसेच हे देखील आहे. ह्या नाटकाचे १०० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. एकूण प्रयोग ठाक-ठिकच वाटला.  अर्थात ‘कट्यार काळजात घुसली‘ नंतर ‘कार्टी काळजात घुसली’ पहिले, दोघात ‘काळजात घुसली’ शिवाय काहीही सारखेपणा नाही, हे स्पष्ट करतो! आणि ‘काळजात घुसली’ याचे संदर्भ आणि अर्थ अतिशय वेगळे आहेत हे काही वेगळे सांगायला नको.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s