गावाकडची ऑस्ट्रेलिया

आजकाल ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या सारख्या देशात राहायला, तसेच फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्या देशांची आपल्याला क्रिकेट मुळे तसेच दूरचित्रवाणी वरील वेगवेगळ्या वाहिन्यामुळे थोडीफार तोंड ओळख तर असतेच. प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर ह्यांना देखील १९६०च्या आसपास ऑस्ट्रेलियाचा शैक्षिणक दौरा करण्याची संधी चालून आली. बनगरवाडी, माणदेशी माणसे अशी व्यक्ती चित्रणे, सत्तांतर, आणि इतर काही पुस्तके प्राणी जगतावर, तसेच शिकारीवर त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते आकाशवाणीवर देखील काम करत असत. तेथूनच त्यांना ऑस्ट्रेलियामधील ग्रामीण भागातील आकाशवाणीचे कसे काम चालते ह्यासाठी कॉमनवेल्थ तर्फे अभ्यास दौऱ्यावर त्यांची निवड झाली. त्या प्रवासाचे वर्णन त्यांनी पांढरी मेंढरे हिरवी कुरणे ह्यात केले आहे.

20160502_052516

Cover page of the book

त्यांच्या ३ महिन्यांच्या वास्तव्यात, त्यांना ऑस्ट्रेलिया मधील शहरी तसेच ग्रामीण जगताची चांगलीच ओळख झाली. त्याबद्दल, तसेच त्या देशातील आणि तसेच त्या अभ्यास दौऱ्यावर इतर आशियाई देशातून आलेल्या प्रतिनिधींची व्यक्तीचित्रणे देखील त्यांनी अगदी त्याच्या खुमासदार शैलीत रेखाटली आहेत. त्यांच्या रांगड्या, रंगेल तसेच रसरशीत जीवनानुभव घेण्याची त्यांच्या वृत्तीचे दर्शन त्यात होते. ऑस्ट्रेलिया देशाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की त्यांची म्हणून अशी भाषा, विशिष्ट शब्द(Australian slang), रांगडा, दिलदार स्वभाव. त्याबद्दल देखील समजते. मी सहज कुतूहल म्हणून गुगल नकाशावरती त्यांनी भेट दिलेली ठिकाणे पाहत होतो. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागातील विक्टोरिया, न्यू साउथ वेल्स, तसेच क्वीन्सलँड या प्रांतात दक्षिण उत्तर असा प्रवास करून, त्यांनी  मेलबोर्न, कॅनबेरा, सिडनी, Tamworth, ब्रिस्बेन, केन्स, ग्रीन आयलंड,  Rockhompton,  Longreach या ठिकाणांना भेटी दिल्या. ठिकठिकाणच्या आकाशवाणी केंद्रांना, तसेच शेतांवर गेले, कुरणं पहिली. एकूणच लोकसंख्या कमी, तर शेतीवाडी, तसेच कुरणं अफाट, तेथील मेंढपाळ पाळणाऱ्या मेंढरांची संख्या सुद्धा कित्येक हजारांवर.

मुंबईहून ते BOACच्या कॉमेट विमानाने मेलबोर्नला गेले. BOAC म्हणजे British Overseas Airways Corporation-आताच्या Britsh Airwaysचे पूर्वीचे नाव. मेलबोर्न आणि सिडनी या शहरातील अनुभव त्यांनी मोठ्या रंगेल तऱ्हेने रंगवलेले आहेत. मेलबोर्नमध्ये त्यांचे राहण्याचे ठिकाण समुद्रकिनारी होते. तेथील आणि आसपास असलेल्या वातावरणाचे त्यांनी बहारदार वर्णन केले आहे. तेथे त्यांनी Royal Melbourne Show हे कृषीविषयक प्रदर्शन पाहिले. तेथे त्यांनी Australian Broadcasting Commissionने कसे लाल फितीविना काम केले याचा याचा अनुभव आला. माझे एक नातेवाईक ऑस्ट्रेलियाला गेले असता त्यांची मुलाखत तसेच त्यांचा विडंबन काव्याचा कार्यक्रम Sydney FM radio वर झाला होता, त्याची आठवण झाली. मेलबोर्नहून त्यांनी पाच दिवस मोटार प्रवास करून कॅनबेराला गेले. वाटेत डूकी, बेनेला, ऑलबरी, वॉंगा वॉंगा अशा गावातून जाताना आलेले अनुभव, ग्रामीण भागातील जीवनाचे त्यांना आलेले दर्शन त्यांनी वर्णन केले आहे. विस्तीर्ण अश्या हिरव्या कुरणातून चरत असलेली मेरिनो(Merino) मेंढरं त्यांना दिसली. ऑलबरी मध्ये तिथल्या महापौरांनी १९३४ मध्ये गावातल्या रेसकोर्सवर सगळ्या गावकऱ्यांनी मिळून संकटग्रस्त विमान कसे उतरवले, ह्याची माहिती देखील कळते. कॅनबेरा ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. तेथे त्यांनी संसदभवन आतून पहिले. कॅनबेराहून सिडनीला गेले. तेथे त्यांनी रंगेल जीवनाच्या अनुभव घेतला, तेथील बारमध्ये, तसेच स्ट्रीपटीज शो बघितला, त्याचे त्यांनी रसभरीत वर्णन केले आहे. समुद्रकिनारी जाऊन समुद्रस्नानाचा पहिल्यांदाच अनुभव घेतला.

सिडनीहून ते Tamworth येथे ऑस्ट्रेलियातील घरघुती जीवनाचा अनुभव घेण्यासाठी कीथ नावाच्या रेडियो निवेदकाच्या घरी राहायला गेले. त्याचे घर एका विस्तीर्ण शेतात होते. त्याचे तसेच त्याच्या बरोबर १५-२० मिनिटांच्या सकाळच्या कार्यक्रमासाठी Tamworth Radio Center वर त्याच्या बरोबर जाऊन त्याचा अनुभव घेतला. Tamworth वरून ब्रिस्बेन, आणि तेथून केन्स येथे गेले. तेथे त्यांना एक पंजाबी शेतकरी भेटला, जो १०० वर्षापूर्वी आलेल्या पंजाबी शेतकऱ्याचा वंशज होता. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला, त्यावेळी व्हाईट ऑस्ट्रेलिया असा कायदा होता, हे समजते, जो अर्थातच आता नाही.केन्समध्ये त्यांना तेथील वैशिष्ट्यपूर्ण असे grass trees अथवा black tree पाहायला मिळाली. केन्स मधील Atherton Tablelands देखील पाहायला मिळाले. नंतर समुद्रात असलेल्या ग्रीन आयलंड या प्रवाळबेटावर आणि तेथील प्रसिद्ध प्रवाळ(coral reefs) पाहायला गेले. तेथून ते Longreach येथे कांगारूंची शिकार करायला गेले. त्याचे देखील रसाळ वर्णन त्यांनी केले आहे. शिकार, आणि त्याचे वर्णन यात त्यांचा हातखंडा होताच. पण या वेळेला त्यांना कांगारूची शिकार मात्र काही करता नाही आली.

या प्रवासवर्णनाचा शेवट नाट्यपूर्ण आहे. Longreach मध्ये एकाच्या शेतात त्याची मेंढरं पाहायला गेले असता, त्याच्या घरी बाळ जन्माला नुकतेच येते. घरधनी त्याला नाव ठेवण्यास सांगतो, तेव्हा, ते महाभारतातील भीम असे ठेव असे सांगतात, जे त्याला आवडते. पण नंतर वाचकांना आव्हान करतात की ते जर यदाकदाचित तेथे गेले तर, त्याला असे सांगा की भीम नावाचा आणखी एक मोठा माणूस भारतात गेला आहे हे त्याला सांगा. अर्थातच येथे बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ आहे.

तर असे हे प्रवास वर्णन. त्यांनी ऑस्ट्रेलियातील भाषेचे नमुने त्यांनी ठिकठिकाणी पेरले आहेत. जसे की necking, bloke, bar च्या ऐवजी blood house,  bottler, wily-wily म्हणजे धुळीचे वादळ, sheep station, मोटारीतील पेट्रोलला juice, grog म्हणजे मद्य तसेच बिअरच्या मोठ्या पेगला schooner, असे शब्द वाचनात मजा आणतात. त्या देशातील लोकांचे वर्गीकरण old, ordinary, new Australians असे केले जाते हेही समजते. पुस्तकात काही छायाचित्रे जर असती तर आणखी मजा असती. ऑस्ट्रेलियातील ग्रामीण जीवनाचे वर्णन वाचून मला स्वतःला मी थोडेफार तसे काही अमेरिकेत अनुभवल्याचे पुन:प्रत्यय आला. २-३ वर्षांपूर्वी मी गावाकडची अमेरिका हे पुस्तक वाचले होते, त्याची देखील आठवण झाली. ह्या ब्लॉगचे शीर्षक मी मध्ये वाचलेल्या ‘गावाकडची अमेरिका’ह्यावरून घेतले आहे. त्या पुस्तकाबद्दलदेखील मी येथे लिहिले आहे. जरूर पहा आणि तुमची प्रतिक्रिया कळवा. मी अजून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे गेलेलो नाही, पण जेव्हा जाईन तेव्हा ते देश या पद्धतीने अनुभवायला मला नक्कीच आवडेल.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s