अमळनेरची शंभर वर्षीय भारतीय तत्वज्ञान संस्था

आपण सर्वानी Indian Institute of Technology(IIT), Indian Institute of Management(IIM) बद्दल ऐकले असते, आपल्याला चांगलीच माहिती असते. पण आपण कधी Indian Institute of Philosophy(IIP), म्हणजेच भारतीय तत्वज्ञान संस्था याबद्दल ऐकले आहे का, आणि ती जळगाव जवळ अमळनेर ह्या गावी आहे ह्याची माहिती आहे का? मला नक्कीच खात्री आहे, की खुपच कमी लोकांना त्याबद्दल माहिती असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल ही तत्वज्ञान क्षेत्रातील भारतातील सर्वात जुनी अशी संस्था आहे आणि ह्याला ह्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होताहेत. साधारण १०-१२ वर्षांपासून, म्हणजे २००४ पासून,  मला तत्वज्ञान क्षेत्रात रस निर्माण झाला, ह्याचे प्रमुख कारण म्हणजे मी त्यावेळेस भारतविद्या(Indology) शिकत होतो, तेव्हा आम्हाला भारतीय तत्वज्ञानाशी संबधित काही विषय होते. त्यानंतरही मी काहीबाही वाचून तत्वज्ञानाच इतिहास, वेगवेगळे वाद, प्रवाद, भारतीय दर्शन आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान यांची तुलना इत्यादी विषय समजावून घेऊ लागलो. तसेच पुणे विद्यापिठाचा तत्वज्ञान विभाग, आणि यांच्या तर्फे आयोजित केली गेलेली संमेलने, कार्यशाळा, इत्यादीतून भाग घेवून वेगवेगळे विषय समजावून घेऊ लागलो. २००६ मध्ये पुणे विद्यापिठाच्या तत्वज्ञान विभागाने परमर्श ह्या त्यांच्या त्रैमासिकाचे जुने अंक विकायला काढले असे समजले. ते मी घेतले, तेव्हाच मला अमळनेर मधील ह्या संस्थेबद्दल समजले.

IIP

अमळनेरची भारतीय तत्वज्ञान संस्था श्रीमंत प्रतापशेठ यांनी १९१६  मध्ये स्थापन केली. तीला अर्थात ह्या वर्षी १०० वर्षे होत आहेत. मध्ये काही वर्षे त्याचे नाव प्रताप तत्वज्ञान केंद्र असे होते. सध्या त्याचे नाव Pratap P. G. Research Center of Philosophy असे आहे. त्यांच्या वेबसाईटवरून त्याचा इतिहास समजतो तो साधारण असा: श्रीमंत प्रतापशेठ ज्यांनी १९१६ मध्ये ही संस्था सुरु केलेली, ते उद्योगपती तर होतेच, पण तत्वज्ञान विषयात त्यांना रस होता, आणि तळमळ देखील होती. संस्थेची कारकीर्द मोठी आणि उज्वल आहे. संस्था सुरु झाल्यानंतर काही वर्षातच तिचे नाव सर्वदूर पसरले आणि ५० वर्षात त्या क्षेत्रात संशोधन करणारी आणि शिक्षण देणारी  संस्था असा तिचा नावलौकिक झाला. संस्थेने आतापर्यंत भारतीय तत्वज्ञान विषयावरील तसेच East-West Philosophyच्या तुलनात्मक अभ्यासावरील देखील पुस्तके प्रकाशित केली आहेत. शंभर वर्षाच्या काळात ज्या काही भारतीय विचारधारा, तसेच नामवंत विचारवंत होवून गेले, त्यातील जवळजवळ सर्वजण ह्या संस्थेशी संलग्न होते. मलकानी, रासबिहारी दास, के. सि. भट्टाचार्य, भारतन् कुमाराप्पा, डी. डी. वाडेकर, टी. आर. व्हि. मूर्ती, दयाकृष्ण, डी. वाय. देशपांडे, थोर समाजसुधारक साने गुरुजी असे सर्वजण येथेच होते.  तत्वज्ञानच्या क्षेत्रातील पसिद्ध, अग्रगण्य अशी त्रैमासिके ‘Philosophical Quarterly’ आणि  ‘तत्वज्ञान मंदिर’ ही इथूनच निघत. १९९३ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने तिचे पालकत्व घेतले.

२००६ मध्ये मला संस्थेबद्दल समजल्यानंतर, अमळनेरला आणि ह्या संस्थेला भेट द्यायची मनीषा बाळगली आहे, पण अजूनतरी काही जमले नाहीये. गेल्या वर्षी माझी अमळनेर मधीलच इंग्रजीचे प्रोफेसर असलेले ज्योती राणे यांची ओळख झाली. त्यांनी मला मलकानी यांनी १९९४५ मध्ये लिहिलेले श्रीमंत प्रतापशेठ यांचे चरित्र मला मिळवून दिले. मलकानी हे तर संस्थेचे प्रमुख म्हणून कित्येक वर्षे कार्यरत होते. त्यांनी ह्या पुस्तकात, संस्थेची देखील माहिती आणि सुरवातीचे दिवस याबद्दल लिहिले आहे. त्यांच्या बद्दल आणि संस्थेबद्दल त्यांनी अगदी प्रांजळपणे आणि कोणताही आडपडदा न ठेवता लिहिले आहे. श्रीमंत प्रतापशेठ आणि त्यांचे गुरु सावळाराम यांच्या पुढाकाराने संस्था सुरु झाली. समाजातून त्यावेळी देखील अशा संस्थेची गरज काय, असा विरोध देखील त्यांना सहन करावा लागला. पण ह्या दोघांच्या ठाम जिद्दीमुळे संस्था चालत राहिली आणि नावारूपाला येवू लागली.

१९८६ मध्ये, Indian Council for Philosophy Research(ICPR) ने IIPच्या Philosophy Quarterly त्रैमासिकाची लेख-लेखक सूची तयार केली. ज्यात १९१९ पासून १९६६ पर्यंतच्या लेखांची माहिती आहे. १९७३ मध्ये पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाने प्रकाशनात खंड पडलेल्या या मासिकाची सूत्रे हातात घेवून ते पुनर्जीवित केले आणि तिचे नामकरण Philosophy Quarterly असे केले. तेव्हापासून प्रकाशित झालेल्या लेखांची सूची विद्यापीठाने १९९९ मध्ये प्रकाशित केली, निमित्त होते, ते या त्रैमासिकाची २४ वर्ष पूर्ण होणे, तसेच विद्यापीठाची ५० वर्षे झाली होती. १९७९ मध्ये विद्यापीठाने काही वर्षे बंद पडलेले तत्वज्ञान मंदिर हे त्रैमासिक देखील, त्याची  IIPकडून सूत्रे घेवून ते पुनर्जीवित केले. तिचे नामकरण परामर्श असे केले. २००५ मध्ये, त्यांनी परामर्शची लेख-लेखक सूची, २५व्या वर्षपूर्तीनिमित्ताने, तयार केली. त्यात त्यांनी तत्वज्ञान मंदिर त्रैमासिकाचे १९१९-१९५२ पर्यंतची सूची दिली. ही त्रैमासिके भारतातील, महाराष्ट्रातील उच्चविद्याविभूषित, विद्वान, पंडित, संशोधक, तत्वज्ञानप्रेमी व अभ्यासक या सर्वांच्या अंतरंगाचे दर्शन घडवणारी महत्वाची नियतकालिके आहेत. माझ्या दृष्टीने तरी ह्या १०० वर्षे झालेल्या संस्थेचे हे महत्वाचे कार्य म्हणता येईल.

अमळनेरला जाऊन संस्थेला भेट ह्या वर्षी तरी द्यावयास हवी. ह्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होताहेत, त्या मुळे नक्कीच तेथे बरेच कार्यक्रम असतील. सर्वानी मिळून भारताच्या ह्या ऐतिहासिक वारशाचे जतन करावयास हवे.

(This blog is a loose translation of my original English blog on the same topic)

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s