पिंपरी चिंचवडची शिशिर व्याख्यानमाला

पुणे शहराच्या जवळच पिंपरी चिंचवड हे जुळे शहर १९६०च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रामुळे उदयास आले. आणि एक बहुभाषिक, बहुराज्यिक, शहरी, ग्रामीण संस्कृती दिसण्यास सुरुवात झाली. एकदा का पोटाचा प्रश्न सुटला की इतर गोष्टी सुचतात. कला, क्रीडा, संगीत, नाटक, विचार प्रबोधन इत्यादि गोष्टीना चालना मिळू लागते. रोटरी क्लब हा पूर्वीपासूनच पिंपरी चिंचवड भागात उद्योजकांच्या सहभागाने समाज सेवाचे व्रत निभावत होता. १९९८ मध्ये रोटरी क्लबच्या काही सदस्यांनी पुण्यात जी  १५० वर्षाहून जुनी वसंत व्याख्यानमाला सुरु आहे त्या धर्तीवर एक व्याख्यानमाला सुरु करावी असा प्रस्ताव आला. डॉ. अच्युत कलन्त्रे, जयप्रकाश रांका, मनोहर दिक्षित(जे आमचे शेजारी होते) इत्यादींनी त्यात पुढाकार घेतला. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प जानेवारी १९९८ मध्ये गुंफले गेले. तेव्हापासून ती गेली वीस वर्षे सुरु आहे, जानेवारीत विसावे सत्र सादर झाले. शिशिर ऋतूमध्ये(जानेवारीत) होत असल्यामुळे ही झाली शिशिर व्याख्यानमाला.

मी या व्याख्यानमालेचा अगदी पहिल्या वर्षापासूनचा श्रोता/प्रेक्षक म्हणून साक्षीदार आहे. या निमित्ताने या ओद्योगिक शहरात वैचारिक वृत्तीची जोपासना सुरु झाली. विविध पुढारी, राजकारणी, लेखक, विचारवंत, कलाकार यांचे पाय पाय लागले. संवाद सुरु झाला, आणि एक पोकळी भरून काढण्यास मदत झाली. चार दिवस वेगवेगळया व्याख्यानांच्या निमित्ताने प्रबोधन, आणि शेवटल्या दिवशी मनोरंजन असे व्याख्यानमालेचे ढोबळ स्वरूप असते. आजकाल मनोरंजनासाठी, प्रबोधनासाठी, शिक्षणासाठी असलेल्या अनेक माध्यमांच्या कल्लोळामध्ये, थेट वक्ता आणि श्रोता या मध्ये होणारा संवाद नक्कीच प्रभावी असतो.

अगदी पहिल्या वर्षापासूनच विषयांची विविधता कायम ठेवण्यात आली. सामाजिक, राजकीय, कला, चालू घडामोडी असोत, विविध विषयांवर प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करून बोलायला लावले आहे. मागील वर्षी, २०१६ साली, स्मार्ट सिटीची चर्चा होती, त्यावेळेस परिसंवाद होता. द. मा. मिरासदार यांचे कथाकथन, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे लतादीदी यांच्या विषयीचे मनोगत, संगीतकार यशवंत देव यांची ‘देवगाणी’, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची शोधयात्रा, अनिल अवचट यांचे मुक्तांगणचे अनुभवकथन असे एक ना अनेक कार्यक्रम या व्याख्यानमालेच्या निमित्ताने झाले, आणि पिंपरी-चिंचवडवासियांना समृद्ध करून गेली आहे.

20170313_064624

शिशिर व्याख्यानमाला पिंपरी चिंचवड रोटरी क्लब

ह्या वर्षीची व्याख्यानमाला देखील अशीच भरगच्च कार्यक्रमाने झाली. उदघाटन विश्वंभर चौधरी यांच्या राष्ट्रवाद-काल आणि आज याविषयावरील व्याख्यानाने झाले. इतरही बरेच कार्यक्रम होते जसे नोटबंदी वर यमाजी मालकर, नर्मदा परिक्रमा यावर जगन्नाथ कुंटे बोलायला होते. मी शेवटच्या दिवशी गेलो होतो. त्या दिवशी प्रसिद्ध कवी संदीप खरे(आयुष्यावर बोलू काही फेम) यांच्या नवीन/जुन्या कवितांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचे नाव होते इर्शाद. कार्यक्रमात त्याच्या बरोबर वैभव जोशी हा कवी देखील होता. त्याची उत्सुकता होती. कविता वाचनाचे कार्यक्रम विशेष होत नाहीत. खूप पूर्वी पु ल देशपांडे, वसंत बापट, बा. भ. बोरकर कविता वाचनाचे कार्यक्रम करत असत असे मी वाचले आहे. त्यातील काही कार्यक्रमांचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पहिलेले आठवते. विसुभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगलय काव्यात हाही प्रसिद्ध कवितांवरचा कार्यक्रम खूप पूर्वी पहिला होता. अतिशय अनौपचारिक पद्धतीने सादर केलें गेलेला हा कार्यक्रम काही विशेष रंगला नाही.

irshad

एकमेकांच्या तसेच प्रेक्षकांच्या(प्रामुख्याने मधूनच उठून निधून जाणाऱ्या) फिरक्या घेत हा कार्यक्रम झाला. प्रामुख्याने प्रेमविषयक कविताच सादर केल्या गेल्या. संदीप खरेचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम पूर्वी व्याख्यानमालेत २००५ साली झाला होता.

असो. तर ह्या वर्षीची शिशिर व्याख्यानमाला, विसावे पुष्प, अशा तऱ्हेने संपन्न झाले. प्रत्येक वर्षी खरे पहिले तर, समारोप, ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या गायनाने होते, पण ह्या वर्षी ते झाले नाही, का कोणास ठाऊक. इतकी वर्षे अशा व्याख्यानमालेचे संयोजन करणे ही सोपी गोष्ट नाही. मनोहर दिक्षित अधून मधून भेटत असतात, आणि त्यांच्याशी बोलताना व्याख्यानमाला आयोजित करण्यामागचे अथक प्रयत्न समजून येतात. ही व्याख्यानमाला आता पिंपरी चिंचवड भागाचा मनाचा तुरा बनली आहे. दिवाळी पहाट, आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यापासून प्रेरणा घेवून पुढे आले आहेत, एक सांस्कृतिक चळवळ सुरु झाली. सुदैवाने या व्याख्यानमालेचे दस्तावेजीकरण झाले आहे. त्यांच्या संकेतस्थळावर पूर्वीच्या कार्यक्रमांच्या रेकॉर्डींग रसिक पाहू शकतात. पिंपरी-चिंचवड भागात इतरही काही कलाविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम कित्येक वर्षांपासून होत आहेत(उदा. रविंद्र घांगुर्डे आयोजित करत असलेल्या संगीत सभा) त्याबद्दल नंतर कधीतरी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s