सर्कस सर्कस, भाग#२

सर्कस सर्कस या ब्लॉग मधील हा दुसरा भाग. पहिला भाग येथे वाचता येईल, ज्यात सर्कशीशी निगडीत दोन दोन पुस्तकांचा परिचय करून दिला. ह्या भागात तिसरे पुस्तक, जे दामू धोत्रे यांचे, त्यांच्या सर्कशीतील जीवनाबद्दल आहे, त्याचा परिचय करून घेऊयात.

त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे ‘वाघ सिंह माझे सखे सोबती’ जे त्यांचे आत्मचरित्र आहे(१९७० च्या आसपास प्रकाशित झाले आहे). एकूण ३८ प्रकरणे, आणि चार परिशिष्टे, आणि छायाचित्रे यांनी हे पुस्तक नटले आहे. The Great Royal Circus चे नारायणराव वालावलकर यांची प्रस्तावना आहे, तर शब्दांकन केले आहे भानू शिरधनकर यांनी. दामू धोत्रे हे पुण्याचेच. त्यांच्या मामाच्या सर्कशीत(शेलार सर्कस) त्यांनी लहानपणीच काम सुरु केले. त्यांनी सर्कस वगैरे सुरु केली नाही तर, ते प्रमुख्याने सर्कशीतील प्राण्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या कडून कामे करून घेणे(ring master) हेच आपले उद्दिष्ट ठेवले आणि शेवट पर्यंत ते तेच करत राहिले. त्यामुळे त्यांना भारतातील आणि इतर देशातील विविध सर्कस कंपन्यातून काम करता आले आणि त्यातच त्यांनी नाव, प्रसिद्धी मिळविली. त्यामुळे त्यांचे चरित्र वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

dhotre

हिंस्त्र प्राण्यांना शिकवणे आणि काम करवून घेणे म्हणजे जीवावरचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आलेले असणारच. ते तर पुस्तकात भरपूर आहेत. त्याशिवाय ही त्यांनी अनेक साहसी प्रयोग जिद्दीने केले त्याची माहिती आहे. ‘माझे राक्षसी सायकल उड्डाण’ या सातव्या प्रकरणात ते नावाचा Jack Carson कसरतपटू मोटार उड्डाणाचे प्रयोग सर्काशीतून करत असे, त्यावरून त्यांनी सायकल उड्डाण करण्याची प्रेरणा घेतली आणि करून दाखवले, याबद्दल सांगतात. वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी बऱ्याच सर्कशीत काम केले, त्यामुळे त्या त्या सर्कस कंपनीतील आठवणीचा ठेवाच ते आपल्यासमोर उघडा करतात. साहसी खेळ आणि हिंस्त्र पशुबरोबर काम करता येण्यामुळे त्यांचा जाहिरात आणि चित्रपट क्षेत्राशी देखील संपर्क आला. सर्वात जास्त वेळ काम केलेल्या जगप्रसिद्ध Ringling Circus, आणि Izako Circus यांच्या सोबत आलेले विविध अनुभव ते सांगतात. Izako Circus तर्फे ते १९३३ पासून काम करत आशिया खंडात बऱ्याच ठिकाणी गेले. युरोपमध्ये त्याकाळातील प्रसिद्ध पशुशिक्षक Alfred Court यांना ते भेटले, त्यांच्या बरोबर काम केले. आणि त्याच सुमारास युद्धामुळे परिस्थिती बिघडल्यामुळे ते  Alfred Court यांच्या बरोबर Ringling Circus तर्फे अमेरिकेत Florida मधील Sarasota येथे गेले(जे Ringling Circus चे winter head-quarters होते). तेथे त्यांनी ख्रिस्ती मिशनरी यांच्या हिंदू धर्मविरोधी भाषण ऐकले, आणि त्याचा त्यांनी समाचार कसा घेतला ह्याची रंजक कथा येते. १९४२च्या सुमारास जेव्हा अमेरिका महायुद्धात उतरली तेव्हा, अमेरिकी सैन्यात त्यांना दाखल करून घेतले गेले, आणि नंतर अमेरिकी नागरिकत्व दिले गेले जे त्यांनी पत्कारले. सैन्यातील ३ वर्षे, वर्णद्वेष, आणि अमेरिकेत, तसेच क्युबात सर्कशीबरोबर केलेल्या कामाचे विविध  अनुभव ते नमूद करतात. १० वर्षानंतर, ते फ्रान्सचा Cirque Amar नावाच्या सर्कस मध्ये काम करण्यासाठी अमेरिका सोडून जातात. Ringling Circus च्या सर्कसमधील प्राण्यांचे डॉक्टर हेन्डरसन यांनी Circus Doctor नावाचे पुस्तक लिहिले होते(Richard Taplinger यांचे शब्दांकन), त्यात त्यांनी दामू धोत्रे यांचावर देखील लिहिले होते. मग पुढे त्यांनीच Wild Animal Man हे पुस्तक दामू धोत्रे यांच्याशी चर्चा करून पुस्तक लिहले जे Little Brown and Company(Boston) ने प्रकशित केले. दामू धोत्रे मग १९५३ मध्ये स्वदेशी भारतात परत येतात, पुण्यात येऊन राहू लागतात आणि परत भारतीय नागरिकत्व स्वीकारतात. पुस्तकातील चारही परिशिष्टे माहितीपूर्ण आहेत. त्यांना येत असलेली जगभरातील पत्रे(fan mail), तसेच सर्कशीचा मुक्काम हलतो तेव्हा काय काय होते याबद्दल, पुण्यातील त्यांच्या घराची/संग्रहालयाची(सर्कस व्हिला) ची माहिती येते.

इतकी वर्षे पुण्यात राहून देखील पुण्यात असलेले त्यांचे घर आणि संग्रहालय असलेले सर्कस व्हिला(Circus Villa) हे स्थळ माहितच नव्हती. हा इतका जगप्रसिद्ध असलेला animal trainer आम्हाला माहितीच नव्हता. आता तेथे लवकरच भेट द्यायला हवी. काही वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर एक वेबसाईट(damoodhotre.com) सुरु केली ती चांगली आहे. मात्र या पुस्तकाबद्दल आणि  Wild Animal Man या पुसत्काबद्दल बद्दल वेबसाईटवर का माहिती दिली नाही हे मात्र समजले नाही.

तर अशी ही सर्कसची अचंबित करणारी दुनिया, या पुस्तकांद्वारे समजते. मी सहज इंटरनेट वर भारतीय सर्कशीसंबधी काय माहिती आहे हे पाहायला गेलो तर एक दोन गोष्टी समजल्या. एक तर Circus And Side-shows नावाची एक वेब-साईट आहे, जी मला तरी सर्कशीसंबधी सबकुछ अशा स्वरूपाची वाटली. दुसरी माहिती  अशी मिळाली की केरळ मध्ये सर्कशीसंबधी प्रशिक्षण देणारी संस्था आहे, पण ती बंद होते आहे असे एक वृत्त आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील तरी अनेक सर्कशी डबघाईला आलेल्या आहेत असे दिसते. वन्य प्राण्यांचा सर्कशीमध्ये होण्याऱ्या वापरावर कायद्याने बंदी आली आहे. एकूण खर्च वाढतो आहे. त्यांना अनेक आर्थिक आणि इतर अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.

भारतात सर्कस व्यवसाय हा १३० वर्षाहून अधिक जुना आहे, पण बदलत्या काळात आणि नव्या जमान्याच्या रेट्यात ही सर्कस नावाची गोष्ट आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते. तो तंबू, तो विदुषक, ते विविध करामती करणारे विविध प्राणी, तो रिंग-मास्टर, अचाट आणि साहसी कसरती करणारे कसरत-पटू आता काळाच्या पडद्याआड जात आहे किंवा इतरत्र सामावले जात आहेत. अमेरिकेत ऐतिहासिक फिलाडेल्फिया शहरात(ज्याबद्दल मी पूर्वी देखील येथे लिहिले आहे) मध्ये अमेरिकन सर्कशीचा जन्म झाला. तेथे त्याच्या स्मृती, इतिहास विविध रूपात जतन केल्या जात आहेत. तसेच अमेरिकेतच बाराबू नावाच्या गावात सर्कसचे एक संग्रहालय आहे-Circus World Baraboo तसेच फ्लोरिडा राज्यात ही असे संग्रहालय आहे(Ringling). रशियामध्ये आणि इंग्लंड मध्ये देखील आहेत अशी संग्रहालये. आपल्याकडे हे कधी होणार?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s