सिनेमामय आठवडा, भाग#४

आजचा दिवस शिबिराचा चौथा दिवस. सकाळी सकाळी NFAIच्या गेट वर धडकलो. तर तेथील सुरक्षा रक्षकांनी अडवले आणि ओळखपत्र विचारायला सुरुवात केली. माझ्या आधी २-३ जण देखील तेथे थांबले होते. मी मनात म्हटले हे त्यांनी रोजच केले पाहिजे होते, आजच काय असे झाले? नंतर कोणीतरी म्हणाले की काल भोजनाच्या वेळेला जास्ती लोकं होते असे त्यांना आढळले! कमाल झाली. असो. आम्हा शिबिरार्थींचा एक WhatsApp ग्रुप सुरु केला आहे असे समजले, आणि मला लगेच त्यात समाविष्ट करण्यात आले. काही वेळातच १५-२० पोस्ट्स आल्या.

आजच्या वेळापत्रकात थोडा बदल झाला. लघुपट प्रदर्शन दुसऱ्या सत्रात होते, त्या ऐवजी पुढील दिवसाचे एक व्याख्यान अलीकडे होते. पहिले व्याख्यान उज्वल निरगुडकर यांचे होते. त्यांच्या बद्दल मी कधी ऐकले नव्हते. चित्रपट क्षेत्राशी निगडीत, पण पडद्याच्या मागची ही व्यक्ती. अफाट काम करून ठेवले आहे त्यांनी आणि अफलातून व्यक्ती आहे असे समजले. ऑस्करच्या  परीक्षक समिती मध्ये त्यांची वर्णी लागली आहे. असे ते पहिले भारतीय चित्रपट-तंत्रज्ञ आहेत. पेशाने केमिकल इंजिनियर असलेले निरगुडकर, गेली ३५ वर्षाहून अधिक काळ भारतीय चित्रपट उद्योगाशी निगडीत आहेत. आधी त्यांनी मुंबईच्या Filmcenter Laboratory मध्ये film processing(post-production) चे काम केले. सध्या ते भारत सरकारच्या National Film Heritage Mission साठी सल्लागार म्हणून काम करत आहेत. त्यांनी नवी दिल्ली मधील Siri Fort Auditorium जे भारत सरकारचे अतिशय प्रगत असे चित्रपटगृह जे बांधले, त्यात त्यांनी तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले होते.

त्यांचे चित्रपट क्षेत्रातील तंत्रज्ञान या विषयी होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात सिनेमाच्या फिल्मचे तंत्रज्ञान कसे विकसित होत गेले, तसेच आवाजाचे तंत्रज्ञान कसे कसे बदलत गेले ह्याचा धावता आढावा घेतला. गेली काही वर्षे चित्रपट उद्योगाने digital technology चा अवलंब केला आहे. चित्रीकरण असो, ध्वनीमुद्रण असो, चित्रपटांचे प्रक्षेपण  या सगळ्यात digital technology वापरले जात आहे. चित्रपटात फिल्मचे तंत्रज्ञान कसे बदलत गेले, त्यात ध्वनिमुद्रण कसे केले गेले, IMAX चे फिल्म तंत्रज्ञान कसे आहे. Sound engineering मध्ये Dolby म्हणजे काय, Eastman color, Cinemascope म्हणजे काय हे त्यांनी समजावून सांगितले. आणि मला ज्याची शंका येत होती, ते तेच शेवटी बोलले. चित्रपट हे आता क्लाउडवर ठेवले जाणार आणि तेथून ते चित्रपटगृहात थेट दाखवण्याची सोय होणार. आता हे मी थोडेसे जणू शकलो कारण मी क्लाउड तंत्रज्ञान(cloud technology) क्षेत्रात काम करतो आहे. मी याही पुढे जाऊन म्हणेन की चित्रपट निर्मितीच्या जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर झालासुद्धा असावा. कारण यामुळे collaboration, sharing, वाढते, जगभरातील कोणाहीबरोबर काम करता येते, खर्च कमी येतो, इत्यादी. पण त्यांनी आणखीन दोन गोष्टी सांगून मलाही धक्का दिला. एक म्हणजे काही जण फिल्म तंत्रज्ञान परत घेऊन येत आहेत, कारण डिजीटल पेक्षा जास्त चांगले माध्यम आहे आणि त्याचे अधिक जतन करणे ही जास्ती शक्य आहे. दुसरे म्हणजे चित्रपट साठवण्यासाठी प्रयोगशाळेत तयार केलेल्या डीएनएच्या रेणूंचा वापर. म्हणजे नवीन storage technology अशी आली आहे जिथे DNA molecules वापरून नजीकच्या भविष्यात data store करू शकू ह्याच्या शक्यतेबद्दल मी वाचले होते नुकतेच, पण ते इतक्या लवकर चित्रपट क्षेत्रापर्यंत पोहोचेल हे लक्षात नव्हते आले. आजकाल सगळे digital cinema package(DCP) चित्रपट ह्या format मध्ये साठवले, वितरित केले जातात.

नंतरचे व्याख्यान होते अनुपम बर्वे या तरुण चित्रपट संकलकाचे(film editor). चित्रपट रसास्वाद शिबिराचा पहिल्या वर्षीच्या(म्हणजे २००६) शिबिराचा हा विद्यार्थी होता. त्याने एडिटिंग बद्दल एक छान वाक्य सांगितले, ते म्हणजे, Editing is juxtaposition of seemingly unrelated images. त्याने एडिटिंग मधील पाच प्रचलित प्रकार जे आहेत, त्याबद्दल देखील तो वेगवेगळी footages आणि rushes दाखवून बोलला. हे प्रकार रशियन दिग्दर्शक Vsevolod Pudovkin ने सांगितली-Leitmotif(एखाद्या गोष्टीची, वस्तूची, कल्पनेची दृश्यात्मक वारंवारता), Simultaneity(एकाच काळात दोन वेगवेगळया ठिकाणच्या घटना), Symbolism(प्रतीकात्मकता), Parallelism(चित्रपटातील काळ किंवा जागा मागे पुढे करणे), Contrast(म्हणजे विरोधाभास). आजकाल digital technology मुळे एडिटिंग तसे एका प्रकारे सोपे झाले आहे कारण, त्यात बरीच sequences (जी आधी चित्रित करून ठेवली असतात), उपलब्ध असतात वापरायला. त्याने उदाहरणे देताना बऱ्याच नवीन सिनेमांची दिली, जसे Midnight in Paris, Vantage Point, Secret in their Eyes, City of God वगैरे. त्याने रशियन फिल्ममेकर्सनी editing theory(montage) मध्ये दिलेल्या योगदानाबद्दल देखील, उदा. Kuleshov Effect, बद्दल बोलला. हा इतिहास नीट अभ्यासायला हवा इतपर्यंत मला तरी आणून सोडले.

भोजनानंतरची दोन सत्रे प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांची पार्श्वसंगीत या विषयावर होती. ती जरा रटाळ होती, आणि नाही म्हटले तरी थोडा अपेक्षाभंग झाला, कारण राहुल रानडे तसे चांगले काम करणारे म्हणून ख्याती आहे. चित्रपटातील संगीत, पार्श्वसंगीत, त्याचे रसग्रहण कसे करावे, हे त्यांनी सांगितलेच नाही. चांगले पार्श्वसंगीत, आणि वाईट यातील फरक सोदाहरण स्पष्ट करता आला असता, म्हणजे सर्वसामान्य रसिकांना थोडे मार्गदर्शन झाले असते. पण त्यांनी बद्दल foley artists जे सांगितले, दाखवले ते मस्त होते. Jack Foley नावाच्या अमेरिकन व्यक्तीने दृश्यांमध्ये sound effects निर्माण करण्याचे तंत्र विकसित केले. असे विविध sound effects देणाऱ्या लोकांना foley artists असे म्हणतात.

आजचा दिवस संपला तो दोन सिनेमे दाखवल्या नंतर. पहिला होता No Man’s Land. आणि दुसरा होता कूर्मावतार हा कन्नड सिनेमा. हा मी पूर्वी पहिला होता. मी मनात म्हटले त्या ऐवजी घटश्राद्ध किंवा गुलाबी टॉकीज का नाही लावला. No Man’s Land हा सिनेमा बोस्निया युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे, black comedy प्रकारतील सिनेमा आहे, युद्धभूमीवरील जवळजवळ वास्तववादी चित्रण आहे. मस्त वाटले, हा वेगळा चित्रपट पाहून. त्यानंतरचा कूर्मावतार पाहायला थांबलो नाही. घरी परतत असताना मनातल्या मनात दिवसभराची उजळणी करत होतो. चित्रपट बनवणे ही जशी कला आहेच, तसेच त्यात किती किचकट पणा, वेळखाऊ गोष्टी असतात, किती तंत्रज्ञान त्यात सामावले असते, याची थोडी अधिक जाण आज आली. चित्रपट पाहताना आपण जो अनुभव घेत असतो, त्यामागे ह्या सगळ्या गोष्टी असतात हे आपल्याला सर्वसाधारणपणे माहितीच नसते.

हा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील चौथा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s