Lifeboat and Psycho

Lifeboat आणि Psycho! ही दोन्ही आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांची नावे आहेत, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. मी इतक्यातच हा Psycho चित्रपट पाहिल्यांदच पहिला. आणि त्यानंतर काही दिवसातच मी पुण्यात झालेल्या चित्रपट रसास्वाद शिबिरात जाऊन आलो होतो, आणि माझे brain-washing झाले होते! मी खरे तर आल्फ्रेड हिचकॉकचे हे दोनच सिनेमे पहिले आहेत. आल्फ्रेड हिचकॉक हा आपल्याला माहितीच आहे की रहस्य/भय चित्रपट बनवण्यात माहीर होता. त्यातही काहीतरी मानसशास्त्रीय दृष्टीने असतेच असते. हा ब्लॉग म्हणजे काही त्या दोन चित्रपटांची तुलना करणारा नाही, कारण दोघांची जातकुळी वेगळीच आहे. पण दोन्ही बद्दलचे माझे अनुभव कथन आहे.

Lifeboat हा सिनेमा मी खूप पूर्वी अमेरिकेत असताना पहिला होता. १९९५ चे साल. त्यावेळेस अजूनही विडियो कॅसेट आणून लोकं आणून घरी सिनेमे पाहत. त्यावेळेस विडियो कॅसेट भाड्याने देणाऱ्या Blockbuster सारख्या कंपन्या होत्या, आणि जोरात होत्या. शनिवारी, रविवारी असे मित्रांचे कोणाच्या तरी घरी अड्डे जमत, आणि असे सिनेमे पाहण्याचे कार्यक्रम, इतर गोष्टीबरोबर होत असत. त्या १९९५ मधील विकेंडला आम्ही तेच केले. Blockbuster मधून आम्ही Lifeboat हा आणि अजून एक The Last Detail नावाचा सिनेमा त्या रात्री आणला. सुरुवात Lifeboat पाहून केली. तर हा सिनेमा १९४४ मध्ये आलेला, अर्थातच श्वेतधवल चित्रपट. हा पहिल्यानंतर मला तरी असा हा सिनेमा एका नाटकासारखा वाटला होता. कथा काय तर समुद्रात जहाज बुडाल्यामुळे जहाजातील खलाशी/प्रवासी एका आपत्कालीन जीवरक्षक बोटीत जाऊन आपला जीव वाचवतात, पण जेव्हा विविध प्रकारची, विविध स्वभावाची माणसे एका छोट्याश्या बोटीत काही काळ एकत्र व्यतीत करतात, तेव्हा काय काय होते, ह्याचे चित्रण म्हणजे हा सिनेमा. विपरीत परिस्थितीत माणसे एकमेकांशी कसे वागतात, यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण पाहायला मिळते. त्यातच परत दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी. वाचलेल्या माणसांमध्ये एक जर्मन देखील असतो, बाकीचे ब्रिटीश आणि अमेरिकन नागरिक असतात. हा काही हिचकॉकचा टिपिकल भयपट नाही, पण रहस्यपट नक्कीच आहे. तसे हे नाटक म्हणून देखील चालले असते, कारण यात बोटीत अडकलेल्या माणसांमधील संवाद, चर्चा, संशय, भय, ताणतणाव, पदोपदी मृत्यूचे भय या सर्वांचे काही काळात झालेले दर्शन आहे. चित्रपटात संगीत असे नाहीच, फक्त समुद्रातील लाटांचा, वाऱ्याचा आवाज, त्यामुळे एक वेगळा परिणाम होतो.

lifeboat

Lifeboat movie poster, courtesy Internet

जेव्हा इंटरनेट, युट्युब वगैरे गोष्टी आल्यापासून, Blockbuster ही कंपनी नामशेष झाली आहे असे वाटले होते मला. पण अजूनही काही स्टोर्स आहेत असे समजले.

220px-BlockbusterMoncton

Blockbuster store image, courtesy Wikipedia

त्यांची एक स्लोगन असे, Be kind, rewind ती अजूनही मला आठवते. म्हणजे काय तर, सिनेमा पाहून झाल्यानंतर, विडियो कॅसेट परत rewind करून ग्राहकांनी परत द्यावी आणि सौजन्य दाखवावे, म्हणजे नंतर ती घेण्याऱ्या ग्राहकाला ती करावी लागू नये. काहीही असो, पण  Blockbuster मुळे तयार एका जीवन पद्धतीचा लय झाला. Blockbusterच्या स्टोर मध्ये, शुकवारी संध्याकाळी जाऊन आपल्याला हव्या त्या विडियो कॅसेट्स घरी घेऊन येऊन पाहणे ही वेगळी मजा होती. आणि सोमवारी ऑफिसला जाता जाता Blockbusterच्या स्टोर मध्ये विडियो कॅसेट्स परत करण्यासाठी असलेल्या खिडकीत विडियो कॅसेट्स परत देणे, यात वेगळी मजा होती.

आता Psycho या चित्रपटाबद्दल. हा १९६० मधील चित्रपट, भयपट तर आहेच, रहस्य आहे, आणि मनोविकार झालेल्या व्यक्तीचे चित्रण आहे. अमेरिकेतील हमरस्त्यावरील मोटेल(motel) मध्ये एका स्त्रीचा खून होतो. त्यावर हा सिनेमा आहे. का होतो, कोण करतो ह्याचा उलगडा म्हणजे हा सिनेमा आहे. भयपटाचे सारे घटक यात आहे, काही सूचक प्रतिमा वापरल्या आहेत. खून करणाऱ्या व्यक्तीच्या दुभंग व्यक्तिमत्वाचे(schizophrenia) चित्रण येते. हा मनोविकार का त्या व्यक्तीला झाला असावा, याची चर्चा करणारे काही संवाद आहेत. सिनेमाच्या पहिल्या भागात, ती स्त्री पैसे चोरी करून दुसऱ्या गावी मोटारीतून जाते, आणि शेवटी एका मोटेलमध्ये रात्रीच्या मुक्कामासाठी येते. ती स्त्री काही सराईत चोर नाही. त्यामुळे तिचा मोटेलपर्यंतचा प्रवास आल्फ्रेड हिचकॉक ती कश्या भेदरलेल्या मनःस्थितीमध्ये करते हे दाखवतो. पोलीस दिसले की तिची कशी भंबेरी उडते, हे दाखवतो. त्यामुळे त्या स्त्रीची एक प्रकारची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. त्याचा फायदा पुढे त्या स्त्रीचा खून झाल्यावार प्रेक्षकांच्या शंकेला वाव राहतो.

psycho

Psycho movie poster, courtesy Pinterest

मी वर उल्लेख केलेल्या चित्रपट रसास्वाद शिबिराच्या अंतर्गत चित्रपट संकलन कसे होते याबद्दल एक सत्र होते. त्यात Psycho चा उल्लेख झाला. स्त्रीचा खून हा मोटेलमधील बाथरूममध्ये होतो असे दाखवले आहे. त्या २-३ मिनिटांच्या दृश्यासाठी आल्फ्रेड हिचकॉकने म्हणे ९० वेगवेगळे शॉट्स घेतले होते, आणि एडिटिंगच्या वेळेस त्याला हवे ते जोडून अंगावर काटा आणणारा दृश्यपरिणाम त्याने साधला. भयपट म्हणजे ध्वनी आलाच, आणि तोही येथे अतिशय छान वापरला गेला आहे. यात ज्या पद्धतीने मनोविकाराचे स्पष्टीकरण आले आहे, आणि एकूणच जे चित्र प्रेक्षकांसमोर येते, हे कितपत बरोबर आहे, यावर तज्ञांमध्ये मतभेद आहेत. मी मध्ये ह्या ब्लॉगवरच सिनेमा मधील मनोविकारांचे चित्रण यावरील एक मराठी लेख मी इंग्रजीत भाषांतरीत केला होता

आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांचा, त्याचा चित्रपट रचनेच्या, कथन शैलीचा बराच अभ्यास झाला आहे. त्याच्या एका पुस्तकाचा उल्लेख शिबिरात झाला. त्याचे नाव Hitchcock on Hitchcock. आल्फ्रेड हिचकॉकचे अंतरंग जाणून घ्यायचे असेल तर ते पाहिले पाहिजे.

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s