The Reader

नुकतेच मावळलेले २०१७ हे वर्ष म्हणजे रशियातील क्रांती होऊन १०० वर्षे झाल्याचे तसेच दुसऱ्या जागतिक युद्धाला ७५ वर्षे झालेले वर्ष. या दोन्ही किती महत्वाच्या, जग बदलून टाकणाऱ्या घटना आहेत. काही दिवसांपूर्वी मी Sergei Eisenstein या प्रसिद्ध फिल्ममेकरने बनवलेला ऑक्टोबर हा सिनेमा पहिला, जो रशियातील राज्यक्रांती वर आधारित आहे. मी भाग घेतलेल्या चित्रपट रसास्वाद शिबिरात याबद्दल तसेच ह्या फिल्ममेकर बद्दल बरेच काही बोलले गेले होते. त्याबद्दल लिहायचे आहे केव्हातरी. आजच्या ह्या ब्लॉग मध्ये दुसरे जागतिक युद्धाशी निगडीत तितकीच महत्वाच्या घटनेबाबत लिहायचे आहे. ती म्हणजे ज्यु लोकांवर झालेल्या अत्याचार. मी याच विषयाशी संबंधित एक सिनेमा पहिला, तसेच एक बरेच प्रसिद्ध असलेले पुस्तक देखील वाचले. तसे पहिले ते दुसरे महायुद्ध, हिटलर, ज्यु लोकांवरील अत्याचार या विषयावर बरीच पुस्तके(holocaust literature), सिनेमे निघाले आहेत, अजूनही निघताहेत.

मी पाहिलेला सिनेमाचे नाव The Reader, आणि पुस्तकाचे नाव Man’s Search for Meaning. दोन्ही नावांवरून विषयाची कल्पना अजिबात आहे, आणि तीच मजा आहे. The Reader हा सिनेमा कथा सांगतो ती एका लिहिता वाचता न येणाऱ्या, अशिक्षित अश्या स्त्रीची(हाना तिचे नाव). सुप्रसिद्ध चित्रपट Titanic मधील अभिनेत्री केट विन्सलेट हीने ही भूमिका केली आहे. हा चित्रपट आहे  दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील, जर्मनीतील. ही सामान्य स्त्री, ट्राम मध्ये कंडक्टर म्हणून काम करत असते. एकटी, अलिप्त अशी राहणारी हाना, गावातील एका तरुण ओळखीचा असतो आणि त्याला माहीत असते की हानाला लिहिता वाचता येत नाही ते. पण हानाला त्या गोष्टीचा न्यूनगंड असतो. पुढे आपला अशिक्षितपणा उघड होऊ नये या कारणास्तव, ती, जर्मनीने ज्यु लोकांवर अत्याचार करण्यासाठी तयार केलेल्या कारागृहात(Auschwitz Concentration Camp) सुरक्षा रक्षकाची नोकरी करू लागते. आणि चित्रपट वेगळीच दिशा धरतो.

जर्मनीचा ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभव झाल्यानंतर मित्र देशांनी पराभूत जर्मनी देशाची जडणघडण कशी होईल, holocaust मध्ये सहभागी असणाऱ्यांचे काय करायचे याबद्दल घडामोडी सुरु झाल्या. ज्यु अत्याचाराशी संबधित व्यक्तींवर खटले भरून त्यांना शिक्षा देण्याची कारवाई सुरु होते. तिच्या ओळखीचा तरुण, जो पुढे Heidelberg Law School मध्ये कायद्याचे शिक्षण घेत असतो. त्यावेळेस त्याला एक court trial बघायला मिळते, ज्यात ३०० ज्यु स्त्रियांच्या जळून मृत्युमुखी पडल्याला काही स्त्रियांवर आरोप ठेवलेला असतो, त्याची सुनावणी असते. त्यावेळचे काही प्रसंग महायुद्धानंतरच्या जर्मन समाजाच्या आजी, माजी पिढीच्या, त्यावेळी झालेल्या अत्याचाराच्या विषयी असलेला मनोभाव दर्शवते. ह्या सुनावणीत एक तरुण ज्यु मुलगी ही प्रमुख साक्षीदार असते. ती आणि तिची आई हे ह्या अत्याचारामधून बचावलेले असतात, आणि त्याबद्दल तिने लिहून ठेवलेले असते. सुनावणीच्या वेळेस हाना असे सांगते, कॅम्पमधील सुरक्षा रक्षक कोठल्याही दहा कैद्यांना निवडून त्यांना मृत्युमुखी दिले जायचे, आणि असे करण्याचे कारण कॅम्प मधील अपुरी जागा. हाना दुर्बल व्यक्तींना निवडून, त्यांच्याकडून ती पुस्तके वाचवून घेत असे. तिच्या विरुद्ध आणखी एक आरोप असा असतो. मित्र देशांकडून युद्धात चुकून एका चर्चवर बॉम्ब पडून, लागलेल्या आगीत, आत असलेल्या, वर नमूद केल्या प्रमाणे, ३०० व्यक्ती रात्रीच्या वेळेस, बाहेर पडण्यासाठी दरवाजे न उघडल्याने, मृत्युमुखी पडतात. आरोप असा असतो की एक सुरक्षा रक्षक म्हणून हाना त्यांना बाहेर जाऊन देऊन वाचवू शकली असती. दरवाजे न उघडण्यासंबधित आदेशावर तिची सही असते असा पुरावा असतो. ती त्याचा इन्कार करते, पण स्वतःची नमुना सही देण्यासी नकार देते(इथे परत ती आपला अशिक्षितपणा ती लपवते). तिच्या ओळखीच्या तरुणाला हे कोर्टात हानाबद्दल आणि तिच्यावरील आरोपांबद्दल   समजते आणि त्याला धक्का बसतो.

ह्या नाझी अत्याचारामधून बचावलेल्या त्या तरुण ज्यु मुलीची साक्ष निर्णायक ठरून हानाला जन्मठेपेची शिक्षा जाहीर केली जाते. त्यावेळेस ही खटल्याचा वेळेस ती आपला अशिक्षितपणा जाहीर न होऊ देता, आपला बचाव न करता, ती शिक्षा स्वीकारते. हा तरुण हानाला ती तुरुंगात असताना वाचायला शिकण्यासाठी मदत करतो, ती तसे शिकते देखील. पुढे कित्येक वर्षे तुरुंगात राहून, पुस्तके वाचल्यामुळे की काय, तीला आपल्या कृत्याची जाणीव होते, आणि त्यामुळेच की काय हाना आत्महत्या करते. लिहिता वाचता येत नसल्यामुळे हानाची होणारी मनाची घालमेल, न्यूनगंड इत्यादी गोष्टी ह्या भूमिकेत केट विन्स्लेट हिने हे सर्व छान अभिनित केले आहेत. हा सिनेमा अर्थात नाझी अत्याचाराच्या प्रत्यक्ष अनुभव कथनाचे चित्रण करत नाही अथवा त्यावर आधारित नाही. तो त्याचा विषय नाही, पण तो काळ, त्याची पार्श्वभूमी नक्कीच, त्यातून गेलेल्या, संबंधित व्यक्तींच्या मनात खोलवर काय होते आहे याचे चित्रण नक्कीच. त्याकाळातील एका महिलेच्या मानसिकतेचे, मनाचे, आपल्या अशिक्षित असणाबाद्द्लचे न्यूनगंड, त्यामुळे होणारी मानसिक आंदोलने, वर्तवणूक समस्या दर्शवणारा हा चित्रपट आहे. ह्या सर्वातून बचावलेल्या, अमेरिकेत रहात असलेल्या, आणि त्या अनुभवांवर पुस्तक लिहिणाऱ्या महिलेबद्दल देखील आपल्याला समजते. असे असले तरी आपल्याला दुसरे महायुद्ध, १९४५ च्या आसपासचे जर्मनी, तेथील concentration camps, युद्धानंतरची court trials ह्याचे चित्रण दिसते. हा असा गुंतागुंतीचा चित्रपट बऱ्याच अश्या मोठा कालपटावर घडतो. Flashback सारखी विविध तंत्रे वापरली गेली आहेत. मी अमेरिकेत भेट दिलेल्या आणि पाहिलेल्या ज्यु लोकांच्या इतिहासाबद्दलचे एक संग्रहालयाबद्दल पूर्वी लिहिले होते.

Man’s Search for Meaning हे पुस्तक तर प्रत्यक्ष ह्या अत्याचारांच्या अनुभवातून गेलेल्या एका व्यक्तीचे अनुभव कथन आहे. तेही वर उल्लेख केलेल्या Auschwitz Concentration Camp चे अनुभव. त्यातच लेखक मानसोपचार तज्ञ आहेत. आणि त्यामुळे हे पुस्तक अत्याचारांच्या अनुभवाहून बरेच अधिक आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s