गेली एकवीस वर्षे

पुण्यात मुंबई प्रमाणेच प्रायोगिक नाटकं करणाऱ्या मंडळींची, तसेच ती सादर करण्याऱ्या मंडळांची संख्या बरीच आहे. त्यातील कित्येक बरीच जुनी आहेत, उदाहरणार्थ, प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन हिने तर पन्नास वर्षे नुकतीच पूर्ण केली. नाटक कंपनी नावाची अशीच एक प्रायोगिक नाटकं करणारी संस्था. तीला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नाट्य महोत्सव सुरु आहे. जुने ५ ते ९ दरम्यान. मुंबईत देखील झाला महोत्सव, पण गेल्या आठवड्यात. त्यांचे एक महत्वाचे नाटक म्हणजे ‘गेली एकवीस वर्षे’. त्या नाट्य महोत्सावात हे नाटक सादर केले जात आहेच, पण इतरही नाटके, जशी, दोन शूर, महानिर्वाण, पेशंट, बिनकामाचे संवाद, इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी ही देखील आहेत.

मी ‘गेली एकवीस वर्षे’ या नाटकाचा प्रयोग काही वर्षांपूर्वी पाहिला होता, मला आठवते, २०१० मध्ये त्यांना इटली मध्ये पुरस्कार मिळाल्यानंतर. आज त्याबद्दल लिहायचे आहे. दोन शूर, पेशंट ही नाटके पाहिली नाहीत मी अजून. बिनकामाचे संवाद हे पहिले होते पूर्वी आणि त्याबद्दल येथे लिहिले देखील आहे. सतीश आळेकारांचे महानिर्वाण तसे जुनेच नाटक, तेही खूप आधी पहिले होते. ‘गेली एकवीस वर्षे’ हे नाटक लिहिले आहे धर्मकीर्ती सुमंत याने, दिग्दर्शन अलोक राजवाडे, प्रमुख भूमिका अमेय वाघ. अशी ही दमदार नामावली असलेले हे नाटक. नवीन पिढीचे, नव्या दमाचे, वेगळा विचार करणारे, मांडणारे असे हे मनस्वी कलाकार.

IMG_2412

हे नाटक म्हणजे एकवीस वर्षाच्या तरुणाचा हुंकार आहे. खरे तर त्या पिढीचीच मनोवस्था म्हटली पाहिजे. जन्मल्यापासून एकविसाव्या वर्षापर्यंत काय केले याचा शोध, आत्मशोध यात आहे. थोडीशी निराशा, हतबलता दाखवणारे हे नाटक आहे. अर्थात सगळी परिस्थितीच तशी आहे असे मानण्याचे कारण नाही. नव्या पिढीच्या विचारांना, मनात होत असलेल्या आंदोलनांना वाट करून देणारे, निचरा करणारे हे नाटक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा बोलबाला आहे काही वर्षांपासून. अपेक्षांचे ओझे, जे घरगुती, तसेच सामाजिक देखील असते, त्याचा परिणाम सर्वसामान्य तरुणांवर काय होतो आहे, याची चर्चा आहे. अमेय वाघ प्रमुख भुमिका करतो आहे. नाटकात त्याचा सहज वावर अतिशय परिणामकारक आहे.

ह्या नाटकात तरुण पिढीचा जो प्रतिनिधी दाखवला आहे, तो अधून मधून इतिहासातील घटनांचे संदर्भ देत असतो आणि प्रश्न विचारत असतो. त्यात मग जुलूस सारखी नाटकांचा संदर्भ, मार्क्सवादी आणि इतर विचारांचा संदर्भ, त्यातून होणारी गोंधळाची मानसिकता निर्माण झालेली आहे. त्यातच ह्या सगळ्या बदलेल्या परिस्थितीत स्वतः काय करावे, कुठली विचारधारा अंगीकारावी हा पेच पडलेला आहे. पण हा खरंच प्रश्न पडला आहे का? कारण आजूबाजूला पहिले तर असेही दिसते की नवनवीन पिढी ह्या सर्व बदलांना सामोरे जात, आपले स्थान निर्माण करते आहे. की ह्या नाटकातील तरुण भरकटलेला, अतिसंवेदनशील आहे. म्हणजे असेही म्हणता येईल का समाजाची संवेदनशीलता कमी होती आहे. ह्या सर्व बदलांचा रेटा मुकाट्याने सहन करत आहे असा निष्कर्ष काढायचा?

IMG_2413

लहान चणीचा, पोरसवदा दिसणारा, आखूड चड्डीत अमेय असणारा वाघने हातवारे करत, प्रश्न विचारणारा तरुण मस्त साकारला आहे. नाटकाच्या सुरुवातीला असणारे त्याचे आणि आई बाबा यांच्यातील संवाद हे तर अगदी घराघरात दिसणारेच आहे. भाषाही तशीच तरुणाईची, शिव्या, आणि इतर बिनधास्त संदर्भ आहेतच. हा तरुण तर एकवीस वर्षाचा झाला आहे, हे तर एक निमित्त आहेच लेखजोखा घेण्यास, पण दुसरा अजून एक संदर्भ असा आहे की भारतात आणीबाणीच्या वेळेस असणारे तरुण आज पालक आहेत त्यांना काय वाटते आहे आजकालच्या परिस्थितीबद्दल हे ही आहे. नेपथ्य आणि प्रकाशयोजना छानच, आणि साजेशी आहे, अजिबात विसंगत, बुचकळ्यात टाकणारी वाटत नाही.

तर असा हा तरुण एका रिअलिटी शो मध्ये जातो, आणि मग पुढे काय होते, हे नाटकातच पहिले पाहिजे. ह्या नाटकाचा प्रयोग आजच जून ७ ला पुण्यात आहे. जरूर पाहण्यासारखा आहे. मध्ये केव्हातरी धर्मकीर्ती सुमंतची मुलाखत कुठेतरी पाहिल्याचे आठवते. त्यात त्याने त्याच्या विचारांची, नाटकातून ती मांडण्याची प्रक्रिया याबद्दल अतिशय आश्वासक रीतीने बोलला होता. त्याचा व्हिडियो मिळत नाही दुर्दैवाने. अलोक राजवाडे, धर्मकीर्ती सुमंत या दोघांनी आणि अमेय वाघ आणि इतर कलाकारांनी केलेल्या ह्या प्रामाणिक, समरसून केलेल्या प्रयोगाला दाद द्यायलाच हवी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s