लेनी रिफेन्शटाल

चित्रपट माध्यम हे देखील एक कला प्रकार म्हणून मला त्याचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. त्याचा इतिहास, त्याचे विविध आयाम, त्याला दिग्दर्शकाचे माध्यम का म्हणतात याची कायमच उत्सुकता राहिली आहे. त्यामुळे मी एक दोन वर्षांपूर्वी चित्रपट रसास्वादाचा अभ्यासक्रम केला होता. मी या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर सात भागांतून लिहिले आहे. ते तुम्ही येथे पाहू शकता. या अभ्यासक्रमात आम्हाला चित्रपट माध्यमाचा इतिहासाची धावती ओळख करून दिली गेली होती. मला नुकतेच या इतिहासासंबंधी दोन गोष्टी समजल्या, त्या का कोणास ठाऊक त्यात आम्हाला थोडक्यात देखील संगितले गेले नव्हते. पहिली गोष्ट म्हणजे लेनी रिफेंशटाल या जर्मन दिग्दर्शिकेबद्दल. तिचे नाव जगातील पहिल्या दहा चित्रपट दिग्दर्शकांमध्ये घेतले जाते. दुसरी गोष्ट जी 1950 च्या दशकातील एका अनोख्या चित्रपटाविषयी. तो चित्रपट म्हणजे भारत आणि त्यावेळचा सोविएत रशिया यांच्यातील एक संयुक्त प्रकल्प होता. त्याचे हिन्दी नाव परदेस. सोविएत रशिया मधून पंधराव्या शतकात भारतात आलेल्या आणि भारतभर फिरून आपल्या अनुभवांवर पुस्तक लिहीलेल्या अवलिया व्यक्तीवर तो चित्रपट होता. त्याचे नाव अफान्सी निकीतीन. ही अनोखी बाब देखील त्या इतिहासातून निसटली होती. तर आजच्या ब्लॉग मध्ये लेनी रिफेंशटाल हिच्या बद्दल.

तर मला लेनी रिफेंशटाल हिच्या बद्दल समजले ते अगदी अचानकपणे. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे वाचनालयात पुस्तके धुंडाळत होतो. तेव्हा संतोष शिंत्रे यांनी लिहिलेले तिच्या वरील पुस्तक हाती लागले. संतोष शिंत्रे यांच्याशी माझा परिचय आहे. त्यांचे पर्यावरणाशी निगडीत काम मला माहिती आहे. इतर काही पुस्तके मी वाचली आहेत(जसे गुलाबी सिर). लेनी रिफेंशटाल बद्दल पुस्तक त्यांनी लिहिले आहे हे काही कधी आमच्या बोलण्यात आले नाही. असो. संतोष शिंत्रे यांनी तिच्यावरील चरित्राच्या पुस्तकांच्या आधारे हे छानसे पुस्तके मराठीत आणले आहे. तसे जुनेच आहे २०१० मधील.

शतायुषी ठरलेली लेनी चित्रपट क्षेत्राच्या व्यतिरिक्त तिच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या त्याची कहाणी समजावून घ्यायला हे पुस्तक आणि इतरही संदर्भ वाचले पाहिजेत. जर्मनी मध्ये १९०२ साली झाला. लहानपणापासूनच ती बंडखोर विचारांची. लहानपणापासून तिला नर्तनकलेची आवड होती, आणि तिने ते शिकून घेतले, आणि व्यावसायिक नर्तन कार्यक्रम करायला सुरुवात केली, आणि ते तिने युरोपभर केले, तेही पहिल्या महायुद्धाच्या आसपास. तिच्या एका अपघाताने Dr Arnold Frank यांचा Mountain of Destiny हा चित्रपट तिच्या पाहण्यात आला. ती भारावून गेली. नंतर तिला त्या चित्रपटात काम केलेल्या गिर्यारोहकाची भेट झाली. जर्मनीतील पर्वतरांगांमध्ये तिने गिर्यारोहण देखील सुरु केले. Dr Arnold Frank यांच्या चित्रपटातून देखील तिला काम करता आले. काही वर्षे अभिनय केल्यावर तिला दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली.

चित्रपट दिग्दर्शनात तर तिने एक वेगळीच उंची गाठली. स्वतःचा असा ठसा उमटवला. आणि तिच्या आयुष्याला देखील एक वेगळेच वळण मिळाले. तिच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या पहिल्याच  व्यावसायिक चित्रपटानंतर(The Blue Light) तिचा संबंध जर्मनीचा हुकुमशाह हिटलरशी ओळख झाली. आणि पुढचे कित्येक वर्षे तिने फक्त माहितीपटांशी निगडीत काम केले. तिला हिटलरची निकटवर्ती म्हणून ओळखले जाऊ लागले, तिच्या वर आरोप देखील झाले. तिने हिटलरच्या सांगण्यावरून काही माहितीपट केले. पहिला होता तो हिटलरच्याच संबंधी. तिचे नाव The Triumphant of the Will. ती हिटलरची आणि त्याच्या पक्षाची भलावण करणारी propaganda film होती. पण ती ज्या पद्धतीने केली, तो चित्रपटकलेतील एक मानदंड बनला. १९३२ मधील जर्मनीतील बर्लिन ऑलिम्पिक खेळाच्या वेळी सुद्धा तिने बनवलेल्या माहितीपटाच्या बाबतीत सुद्धा तेच झाले. ती दोन भागात प्रदर्शित झाली-Olympia: Festival of the People, Olympia: Festival of the Beauty. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ती बऱ्याच वेळेस हिटलरच्या सैन्याबरोबर, हिटलर बरोबर असे. पोलंड माधीत्ल तीस ज्यू नागरिकांची जर्मन सैन्याकडून जेव्हा हत्या झाली तेव्हा ती तेथे होती. या सर्वांमुळे अनेक अफवा, आणि वादविवाद यांना तिला तोंड द्यावे लागले.

तिचा अजून एक गाजलेला चित्रपट म्हणजे हिटलरचा पसंतीस उतरलेला एक संगीत नाट्याचा कार्यक्रम, म्हणजे ओपेरा, ज्यावर बनलेला हा Tiefland. पण ती बनवायला तिला जवळ जवळ २० वर्षे लागली. पण जेव्हा तो प्रदर्शित झाला तेव्हा तो लोकांना खूप आवडला, आणि त्यामुळे वादविवाद देखील बरेच झाले. तिचे त्यामागील कष्ट फळाला लागले. १ मार्च १९४३ साली बर्झालिन मध्ये झालेल्या हवाई बॉम्बहल्ल्यात तिचे घर उध्वस्त झाले. पण लेनीने जिद्दीने काम सुरूच ठेवले होते. तिला हा चित्रपट नेहमीप्रमाणे दर्जेदार करायचा होता. चित्रपटातील एका bull fighting च्या दृश्याच्या चित्रीकरणासाठी ती महायुद्धाच्या धामधुमीत ती स्पेनला गेली आणि चित्रीकरण केले. नाझींची दिग्दर्शिका म्हणून तिला पुरस्कार देखील नाकारण्यात आले.

जसे तिच्या काही चित्रपट पूर्णत्वास जाऊन प्रदर्शित झाले, तसेच तिचे अनेक चित्रपटांचे प्रकल्प अर्धवट राहिले, ते पूर्ण होण्यात काही काही ना अडचणी आल्या. त्यातील एक चित्रपट म्हणजे प्रसिद्ध लेखक हेमिंग्वे याच्या Green Hills of Africa या आफ्रिकेची पार्श्वभूमी असलेल्या कादंबरीवर चित्रपट बनवण्यासाठी आफ्रिकेत गेली आणि तिचा एका वेगळ्याच जगाशी ओळख झाली. आफ्रिकेतील लोकांची संस्कृती कशी पाशात्यांच्या मुले बदलत जाती आहे, अजूनही गुलामगिरीचे अवशेष तिला दिसत होते. हे सगळे तिला एका चित्रपटाद्वारे दाखवायचे होते. तेही राहिले. पण सुदान मधील नुबा जमातीबद्दल तिला समजले. ती त्या निमित्ताने तिने त्यांची छायाचित्रे काढली, त्यानिमित्ताने त्या कलेतही तिने प्राविण्य मिळवले, तिची हि छायाचित्रे, दोन पुस्तक रुपात आली आणि ती खुप प्रसिद्ध झाली. The Last of the Nuba आणि The People of Cow. ही ती पुस्तके.

पुढे १९७२ मध्ये ती जेव्हा केनियाला सुट्टीवर गेली असता तिला अजून एका अद्भुत जगाची ओळख झाली आणि ती त्यात गुरफटली गेली. तिला समुद्राखालील विश्वाची एका snorkeling च्या निमित्ताने ती तेव्हा समुद्राच्या पाण्याखाली गेली होती. हा प्रकार थोडासा scuba diving सारखाच असतो. वेळेस तिचे वय होते सत्तर फक्त. तिला जे त्यावेळी पाण्याखालचे रंगीबेरंगी मासे, वनस्पतील, प्रवाळ यांचे अद्भुत जग दिसले, तेव्हा तिने आणखीन खोल पाण्यात जाण्यासाठी scuba diving शिकून घेतले! तिला छायाचित्रांची कला अवगत होतीच, त्यामुळे तिच्या मनाने परत उचल खाल्ली, आणि तिने under water photography मध्ये उडी घेतली, ती आत्मसात केली. हे काम तिने जवळ जवळ पुढील २० वर्षे केले आणि आणखीन दोन पुस्तके आणली आणि एक लघुपट देखील बनवला ज्याचे नाव होते Underwater Impressions.

असा हा लेनीचा शतकभराचा सर्जनशीलतेचा प्रवासाचा अतिशय धावता आढावा. त्याही किती वाद, वादळे! हिच्या कामाबद्दल आणखीन माहिती करून घ्यायला हवीच. तिच्या वरील हे पुस्तक, तसेच मूळ पुस्तके, तिने बनवलेले चित्रपट पाहून, आणि तसेच तिच्या वरील माहितीपट जिचे नाव आहे The Wonderful, horrible life of Leni Reifenstahl. ती आजही जगातील प्रथम क्रमांकाची स्त्री चित्रपट दिग्दर्शिका म्हणून ओळखली जाते!

 

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s