थोर गणिती रामानुजन

जानेवारीत मी अमेरिकेत बोस्टन याठिकाणी कामानानिमित्त गेलो होतो. कुठेही गेलो की स्थानिक गोष्टी जाणून घेण्यासाठी तेथील वर्तमान पत्रे वाचण्याची मला सवय. माझ्या राहण्याच्या ठिकाणी हॉटेलमध्ये लॉबीत Community Advocate नावाचे दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे एक पत्रक होते. त्यात मला एक लेख आढळला जो त्या भागातील Donald Manzoli नावाच्या एका व्यक्तीवर होता. आयुष्यात अनेक टक्के टोणपे खाल्लेला, पण गणितावरील प्रेम जागृत असलेल्या नावाच्या व्यक्तीवर तो होता. त्याने म्हणे थोर भारतीय गणिती रामानुजनच्या काही गणिती सूत्रांवर काम करून प्रतिष्ठित Rocky Mountain Journal of Mathematics मध्ये प्रसिद्ध केले होते. मी ते वाचून चकित झालो. एक तर त्या व्यक्तीच्या जिद्दीबद्दल, गणित विषयावरील प्रेमावर. त्याहून अधिक चकित झालो ते आपल्या रामानुजनची अजूनही असलेली कीर्ती.

गेल्यावर्षी केव्हातरी पुण्यातील एका रस्त्यावर एके ठिकाणी जुन्या पुस्तकांच्या ढिगात मी पुस्तकं शोधत होतो. ब्रिटीश राजवटीच्या काळात दक्षिण भारतातील अल्पायुषी ठरलेल्या श्रीनिवास रामानुजन नावाच्या गणितज्ञाची कहाणी सांगणारे पुस्तक हाती लागले होते. पुस्तकाचे नाव ‘श्रीनिवास रामानुजन-एका गणितज्ञाची घडण’, लेखक प्रा. द. भ. वाघ, १९८७ साली, म्हणजे, रामानुजनच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रकाशित झाले होते. रामानुजन बद्दल मला थोडेफार जुजबी माहिती होतीच. शाळेत गणित या विषयात, आपल्यापैकी कित्येकांसारखेच, माझी विशेष काही गती अशी कधीच नव्हती. पण पुढे शिक्षण संगणकक्षेत्रात तसेच व्यवसाय देखील त्यातच असल्यामुळे गणिती ज्ञान आवशक होते, संगणकक्षेत्रातील त्याचा उपयोग, तसेच गणिताची एकूणच महती जाणत असल्यामुळे ते पुस्तक मी उचलले, पण वाचण्याचा काही योग आला नाही. हा ब्लॉग लिहिण्याच्या निमित्ताने ते वाचले. प्राचीन भारताची गणित विषयातील प्रगती सर्वज्ञात आहे. आर्यभट्ट, वराहमिहीर आणि इतर प्राचीन गणितज्ञ यांच्यासारखी प्रतिभा असलेला रामानुजन, वैयक्तिक आयुष्यात दारिद्र्य, सामाजिक परिस्थिती, आजारपण यांना तोंड देत देत आपले गणितातील काम करत राहिले.

E722715B-3E56-4081-9D7F-A934A06C5219

तसे पहिले तर रामानुजनवर इतक्यातच एक सिनेमा आणि एक नाटक देखील आले आहे. सिनेमाचे नाव आहे The Man Who Knew Infinity आणि नाटकाचे नाव आहे Death of a Mathematician. चित्रपट काही अजून पाहता आला नाही, पण नाटक मी पहिले होते. दोन्ही अर्थातच त्याच्या आयुष्यावर आहे. जेवढे गणितातील त्याचे कार्य प्रसिद्ध आहे, तेवढेच त्याचे व्यक्तिमत्व, त्याचे आयुष्य रोचक आहे, नाट्य आहे, जे इतके दिवस सर्वसामान्यांना अपरिचित होते. ते या दोन कलाकृतींमुळे पुढे आले आहे. मूळ इंग्रजीत श्रीनिवास शारंगपाणी यांनी लिहिलेले हे नाटक हिंदीत स्वतंत्र थिएटर या नावाच्या नाटक मंडळीने गेल्यावर्षी नोव्हेंबर हिंदी नाट्यमहोत्सवात सादर केले होते. रामानुजन यांच्या व्यक्तीमत्वात असलेला साधेपणा, खरेतर भोळेपणाकडे झुकणारा स्वभाव, त्यांची नमक्कलदेवी वर असलेली अपार भक्ति, घरचे दारिद्र्य, धार्मिक वातावरण, यांचे दर्शन नाटकात येते. त्यांची पत्नी आणि आई यांच्यात असलेले घरगुती भांडण, वादविवाद यामुळे निर्माण झालेले ताणतणाव, भावनिक आंदोलने यांचे चित्रण येते. याची परिणीती म्हणून, वयाचा तेहतीसाव्या वर्षी झालेला अतिसारामुळे झालेले निधन हे सर्व चटका लावून जाते. The Man Who Knew Infinity हा चित्रपट त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. तोही पाहिला पाहिजे.

रामानुजानने विद्यापीठीय शिक्षण घेतले नव्हते, कुणाकडून मार्गदर्शन विशेष असे मिळाले नव्हते, ग्रंथालयाची देखील मदत झाली नव्हती. अल्पायुषी रामानुजन हे गणितात एवढे अचाट काम केले की लंडनच्या Royal Society तसेच केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप त्याला मिळाली, त्याच्या सर्व गणिती सूत्रांचा, प्रमेयांचा, शोधांचा संग्रह केम्ब्रिज विद्यापीठाने प्रसिद्ध केला, हे सर्व अद्वितीय आहे. रामानुजनचा जन्म दिवस, म्हणजे डिसेंबर २२, हा भारतात, राष्ट्रीय गणित दिवस(National Mathematics Day) म्हणून साजरा केला जातो, याचा मला थांगपत्ताच नव्हता. अजून दोन वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये, रामानुजनच्या अकाली मृत्यूला १०० वर्षे होतील. या निमित्ताने नक्कीच जगभर, विशेषतः केम्ब्रिज विद्यापीठात कार्यक्रम होतील. तामिळनाडू मध्ये त्याच्या नावाची एक गणित संशोधन संस्था देखील आहे, जिचे नाव आहे Ramanujan Mathematical Society.

जाताजाता एक सांगितले पाहिजे, अमेरिका हा देश जसा वरून भोगवादी आहे, तसाच तितकाच ज्ञानाधिष्ठित आहे, यांचे पदोपदी दर्शन आपल्या घडू शकते, अर्थात आपण जर ते पाहायचे ठरवले तर! अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. त्याच बोस्टन प्रवासात मला भेटलेल्या एका कॅबचालकाबद्द्ल, ज्याने Media Ecology या विषयात प्राविण्य मिळवले आहे, याबद्दल मी पूर्वी लिहिले होते.

 

Advertisements

World of Vintage Cycles

Today(June 3) is a World Bicycle Day. There is flurry of activity in the city consisting of cycling tours, awareness programs. I love cycling, I do own a bicycle, which I make it a point that I ride once a day for some time at least.  One of my neighbors recently started shop for selling high end bicycles meant for recreational purposes primarily. I happened to go to his shop other day. During the discussion with, I remembered of a unique exhibition of its kind I had attended few years back. I wanted to share that here.

The use of cycles for recreational purposes has increased in last 5 years or so in Pune at least. There was a time when Pune was called as city of cycles. There were so many cycles, and people used them as primary mode of transport. In the last 3-4 decades that tradition is lost and was replaced by motor cycles and cars. Sighting this need, I guess many cycle shops selling high-end cycles meant for recreational purposes.

The way we keep seeing many vintage cars shows, I had not come across any vitage bicycles show as such in the past. It was hosted in Pune around Diwali time in the year of 2011 by Vikram Pendse, under auspices of Diamond Vintage Cycles. There were about 75 vintage cycles, some of them dated back to 1924 or so. Bicycles, tricycles, single wheel cycles, uneven shaped cycles, double seat cycles(yes, those ones famous in Hindi movies back in 1980s) were all there. It was quite amusing to see how bicycles of bygone were shaped. Children’s cycles, hopping cycles, cycle lamps, rings-bells. As a child, I remember I used to rent out bicycles from bicycle renting shops, 30-35 years back. Now the same facility is once again available, but you don’t a bicycle renting shop any more. One can do using ones mobiles, and rent them from the designated areas.

It seems Vikram Pendse has started a museum too, details about it can be found over here.

Let me end this blog on a different note. I read other day an interesting news item. Cycles these are new golf these days it seems, especially in the world of venture capital investments for startups. Entrepreneurs and venture capitalists are finding better to talk about investments and pitching of an startup idea over cycling, instead of golf sessions. Interesting, isn’t it?

भीमथडी जत्रा

भीमथडी जत्रा: एक फोटो ब्लॉग

थंडीचे दिवस सुरु झाले म्हणजे हुरडा, शेकोटी यांची आठवण येते. पाय(की आपल्या गाड्या!) हळूहळू शहराबाहेर पडतात. वाढत्या शहरीकरणामुळे समाज कृषी-संस्कृती, ग्राम-संस्कृती पासून तुटत जात आहे. शहरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात गावातील आपले एक गाव असते, तेथील शेती, आणि इतर गोष्टी यांच्याशी आपले नाते असते. माझे गावाकडील आजोळ आणि त्याच्या आठवणी मी पूर्वी लिहिल्या आहेत. पण जी मुलं, लोकं पूर्णपणे शहरात वाढलेले असतात त्यांना ग्रामीण संस्कृतीची काही कल्पना नसते. आजकाल सुरु झालेली कृषी पर्यटक केंद्रं(मागील वर्षी मी अश्याच एका कृषी पर्यटन केंद्राला गेलो होतो), आणि भीमथडी जत्रा, पवनाथाडी जत्रा सारखे उपक्रम ग्रामीण जीवनाची थोडी फार झलक देतात. विविध ग्रामीण उत्पादने खाद्यपदार्थ तेथे मिळतात. ह्या वर्षी सेंद्रीय शेती आणि उत्पादने यासाठी वेगळा विभाग होता. पण अजून बरेच काही करायला वाव आहे. ही जत्रा म्हणजे फक्त विविध विक्रेत्यांसाठी सोय एवढेच न मानता, इतर गोष्टी देखील करता येतील. उदाहरणार्थ, बारा बलुतेदार आणि त्यांचे कामाची माहिती, ग्रामीण कला, महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागातील वैशिष्ट्ये यांचे प्रदर्शन, आदिवासी जीवन इत्यादी.

गेल्या आठवड्यातच मी पुण्यात भरलेल्या भीमथडी जत्रेला हजेरी लावून आलो. त्याबद्दल हा फोटो ब्लॉग.

 

Pune’s Fire-brigade Museum

City of Pune keeps surprising me, even though I am living in the city, for my whole life, well most of it. May be because it is very difficult to track what all is going on in the city, as city is growing bounds and leaps. Some years time back, I learnt about a Joshi’s train models museum(which I had visited long time back), and also more recently cricket museum, both private ones. Other day, I happened to know that there is a fire-brigade museum in the city, and I happened to visit it, when I was in that part of the city few weeks back. We all see them and hear their bells ringing, more often than not, on the road, going to some place for rescue. I, myself have been walking or zooming past a fire-brigade station in Aundh area near Bremen Chowk, in Pune. But never bothered to peep inside and find out what goes in there. Another famous place where I have seen fire fighter van stationed in in busy locales of Dagadusheth Ganpati temple in the heart of the city.

 

I remember my first hand encounter with fire brigade. It so happened that, a tiny kitten somehow ended up in the duct located at the backyard of my house, few years back, on a sunny evening of the winter. I tried to help her out of it, but in vain. Someone suggested to call the fire-brigade. In few minutes, they came in their big red van. My neighbors were wondering as to what happened. Those men in dark blue uniform, they came in with their props and rescued that kitten. And they went off, after a quick chat over tea.

So, that day of July 2017, when I walked in into this museum located near off near Nal Stop, Karve Road, I was wondering what is that they have there. It was Sunday evening. The car parking was almost empty. Right near the car parking, the old, vintage model of fire-brigade van is showcased. This was manufactured by Rolls Royce, was commissioned into service in 1956. This was deployed during the Pune’s infamous 1961 floods caused due to Panshet dam disaster. There were paintings around the parking wall. The shed where this vintage van was housed, had many textual displays outlining history, some of the famous rescue operations in the history and other facts. The entire area is strikingly colored in red, with graffiti on the walls. I also noticed water and mist tender van parked in the parking lot, which was mini-version of regular fire fighter van.

 

This place is fire brigade’s station which has this museum in the campus. It was usual calm and quite in side the fire brigade station. Have you watched Charlie Chaplin’s The Fireman, produced almost 100 years ago? When I entered the place, it reminded me of it. Anyways, now, fire fighters were relaxed, some of them were watching television, others were chatting. They seemed to get surprised by our entry there. When I mentioned that I wanted to visit the museum, I was welcomed warmly and one of them accompanied. I was taken upstairs area where the main exhibits are on the display. I could not escape the thermal ware clad life-size model at the doors, which is these days used by firemen during extreme situations.

 

The guide started talking as we went upstairs. He said, this museum was recently opened, in March 2017. We reached the the exhibit area upstairs which has many antique fire fighting tools, equipment, right from water hose pipes, nozzles, helmets, search lights, display of various types of rope knots used(I remembered my school days seeing these knots, as I was in scout troupe where we were taught these), thermal imaging cameras(to look for trapped people due to smoke caused), diamond chain saw etc. Many of the equipment, tools used by fire fighters have evolved over the years as technology has advanced. The fire fighters’ suit it self has undergone transformation over the years. It seems this is the only kind of museum in India, for fire brigades.

Pune Municipal Corporation portal has a page for Fire Brigade, do check it out here, the page for museum badly needs revamp. Anyways, stayed tuned on this blog. Next one will be another offbeat, rather unknown place in Pune.

 

Beggars at Traffic Signals: What to do?

We all keep noticing beggars in the cities we live in. We certainly see them often times at various traffic signals across city roads. Poverty is general is a problem in India since time innumerable. Many elections have been won by politicians promising eradication of poverty. But poverty seems to be staying. Of course, not every poor person is beggar. But beggars are certainly poor. By street side and even in trains, beggars are very common. Also common are beggars at the traffic signals on the city roads. They live on the footpath, under the shade of a tree or something. I see them all the time.

Like many, I go to work to Kharadi EON IT Park everyday and I see them at at least at 3-4 signals on the way. The moment traffic stops at these signals, beggars pop up from no where and they engulf you before you even realize. You see women, women with kids with them, kids themselves extending their arms helplessly, elderly men, many times disabled. And the sight is not pretty at all. At times, you feel pity about them, and some other times your hands automatically reach out to your pockets for them. You also see many times transgenders as well walking around at traffic signals and their typical actions, they ask for money. If you pay them, you get good wishes, else you don’t! I have seen many beggars displaying their displeasure if they are denied their rightful(!) donation by spitting, by saying something, or even at times thumping on the bonnet of the car. In earlier days, beggars would be happy with coin changes, but it seems they don’t accept anything below Rs 10/- note. Not sure if these beggars have forgotten that beggars cannot be choosers! These street-side families employing their young children in begging activities, is in fact, illegal and against human rights. But who cares about rights when you are not sure of what you are going to have for dinner for 10-12 members in the family? Even the traffic police at the these signals ignore them-understandably so they see them every day and all day. Sometimes, you wonder if this has become their business. We know that this concept made very famous by actor Annu Kapur in Hindi movie Gardish couple of decades ago. Depicting beggars in movies, cartoons, is also very common.

You wonder, at times, if you are not busy on a call while driving, or don’t want to divert your attention from jokes that radio jockey(RJ) on radio in your car is cracking, as to how they beggars land in to situation where they forced to get to streets for their daily bread, and most of the times their entire family? We keep hearing farmers committing suicides, many times, when their life is ruined by drought or other reasons. The ones who don’t, you wonder if they get into such terminal situation. I being associated with mental health awareness since last many years, I also know that many of these beggars are suffering from various mental health issues. I know one NGO who works for such street-side people who are severely suffering from such problems, who are abandoned, who are lying on the footpath, surviving somehow with petty sums they get from the passers-by. I have written about that organization here in the past. I also know one of my friends running a education session for children on the street side. We also have seen photos of many organization distribute warm clothing etc to these people during winter seasons. This and donating them petty sums are are temporary solutions. You will find them there again at the same place at the same time. The real question is how to solve this forever?

I don’t have answer. We, as society need to think about it. Our Prime Minister has started monthly radio program called Man Ki Baat(मन की बात). May be putting this problem across him and drawing some attention would help. Organization can help in rehabilitating these people who can be still employable, provided their mental health is fine. I being in information technology field, I can think of a brainstorming hackathon for solving this problem, may be of help. Can this be made part of smart city agenda, by the way? We need to think on how to make them part of the society by having them employable and earn their own bread.

Many of us who entertain foreign visitors, and who go by these streets, we  are ashamed of beggars’ sight when we walk or drive on those roads. I also have seen many times, in the foreign countries, homeless people, standing by traffic signals, with board/placard seeking help. The difference is only in the style, and intensity of the problem. But the problems are everywhere. There is a saying in English which says, a country can be understood by people at traffic signals.

Anyways, what do you think? How to change this?

Ninasam Culture Course-Part#2

गेल्या ऑक्टोबर(म्हणजे २०१६) मध्ये कर्नाटकातील सागर जिल्ह्यातील हेग्गोडू येथे निनासम नावाच्या प्रसिद्ध संस्थेत मी संस्कृती शिबिरात भाग घ्यायला गेलो होतो. त्याबद्दल मी पूर्वी एक भाग ह्या ब्लॉगवर लिहिला आहे. आज दुसरा भाग सादर करत आहे. निनासम संस्कृती शिबीराचा(Ninasam Culture Course) भाग म्हणून दररोज(म्हणजे पाचही दिवशी) संध्याकाळी एक नाटक असे. एके दिवशी नाटकाबरोबर भक्ति संगीताचा कार्यक्रम देखील होता. हे सर्व कार्यक्रम शिवराम कारंथ नाट्यगृहात होत असत. शिवाय ते आम्हा शिबिरार्थींना, तसेच इतर नागरिकांना देखील खुले होते. ह्याशिवाय, मुख्य शिबिराचा भाग म्हणून दोन नाटकांचे प्रयोग देखील होते. हे प्रयोग मुख्य सभागृहात(जे खरे पहिले तर Intimate Theater आहे) झाले. ही सर्व नाटकं कन्नड भाषेत होती. ह्या ब्लॉग मध्ये त्या नाटकांबद्दल लिहायचे आहे

ऑक्टोबर ८ च्या संध्याकाळी कालंदुगेय कथे(ಕಾಲಂದುಗೆಯ ಕಥೆ, अर्थ पैंजणीची कथा) या नावाचे शिलाप्पदिकारम (Silappadikaramतमिळ भाषेतील प्राचीन महाकाव्यावर आधारित निनासमच्या नाट्य-मंडळीचे (Ninasam Tirugata) नाटक होते. एका स्त्रीच्या पायातील पैंजण हा नाटकाचा विषय, म्हणजेच नायक(कोवल) आणि नायिका(कण्णगी) यांच्यामधील प्रेमात या पैंजणाची भूमिका म्हणजे हे नाटक. प्रसिद्ध कन्नड कवी आणि नाटककार एच. एस. शिवप्रकाश यांनी हे नाटक रचले आहे. वेगवेगळया गाण्यांनी, कर्नाटकातील हरिदास यांची पदे यांनी युक्त असे हे तीन एक तासांचे संगीत नाटक आहे. 

ऑक्टोबर ९ च्या संध्याकाळी अत्त दरी इत्त पुली(ಅತ್ತ ದರಿ ಇತ್ತ ಪುಲಿ, इकडे आड तिकडे विहीर या अर्थाने) हे हेसनाम तोम्बा यांनी दिग्दर्शित केलेले नाटक होते. हेसनाम तोम्बा(Heisnam Tomba) हे प्रसिद्ध मणिपूर नाट्यकर्मी हेसनाम कन्हयालाल(Heisnam Kanhailal) यांचे चिरंजीव. योगायोग असा की हेसनाम कान्हयालाल यांचे एक-दोन दिवसांपूर्वीच(ऑक्टोबर ६) निधन झाले होते. हे नाटक म्हणजे मणिपूर(किंवा एकूणच ईशान्य भारतात) मध्ये भारतीय सेनेद्वारे केल्या गेलेल्या तथाकथित अत्याचारावर भाष्य करते. भारतीय सैन्याला त्या भागात विशेषाधिकार(AFSPA) दिले गेले आहेत, त्याचा गैरवापर होत आहे आहे अश्या बातम्या येत असतात. पण सामान्य जनतेला काय भोगावे लागते आहे, हे नाटकातून अतिशय प्रभावीपणे दाखवले आहे.

CC16_Poster

ऑक्टोबर १० च्या संध्याकाळी मालती माधव हे अतिशय हलके फुलके संगीत नाटक होते. भवभूतीच्या याच नावाच्या संस्कृत नाटकाचे कन्नड रुपांतर म्हणजे हे नाटक. याचे वैशिष्ट्य म्हणजे असे की हेग्गोडू गावातील अनेकजण यात भूमिका करत होते. नाटक संपल्यानंतर त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, या आणि आसपासच्या गावातील निनासमच्या नाट्यचळवळ बद्दल बरेच काही सांगून गेले.

ऑक्टोबर ११ च्या संध्याकाळी सुरुवातीला बिन्दुमालिनी या दक्षिण भारतातील गायिकेची भक्ति संगीत मैफिल झाली. त्यांचे कबीर, आणि सुफी संगीत आणि इतर भक्ति संगीतात त्यांनी श्रोत्यांना न्हावून टाकले. त्या नंतर अक्षयाम्बर ह्या नाटकाचा प्रयोग, बंगळूरूच्या ड्रामानॉन(Dramanon) या संस्थेद्वारे सादर केला गेला. हा मला अतिशय भावाला. कर्नाटकातील यक्षगान कला-परंपरा, त्यातील कलाकारांची मनस्थिती, आणि आजचा युवक यातील संघर्ष यात सादर केला गेला.

ऑक्टोबर १२ च्या संध्याकाळी शेक्सपियर मनेगे बंदा(ಶೇಕ್ಸಪಿಯರ ಮನೆಗೆ ಬಂದಾ, अर्थ शेक्सपियर येती घरा) ह्या नाटकाचा प्रयोग होता. हे नाटक म्हणजे शेक्सपियर वरील नाटककाराचे असलेले प्रेम/आदर दर्शवायचा एक प्रयत्न. एका दृष्टीने पहिले तर ती एक प्रकारची जिवंत डॉक्युमेंटरीच म्हणावी लागेल. त्याच्या वेगवेगळया नाटकांची चर्चा, त्यातील प्रसंग आणि पात्रे याचे सादरीकरण, असे एकमेकात गुंफून एक संगीतमय कार्यक्रम होता तो. शेक्सपियरचा एकूण प्रभाव आणि त्याच्यावरील प्रेमच म्हणजे हे नाटक. गेल्यावर्षी त्याची ४००वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावर मी एक ब्लॉग लिहिला होता.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, या दररोज संध्याकाळच्या नाटकांच्या मेजवानीव्यतिरिक्त मुख्य कार्यक्रमांतर्गत देखील दोन आगळे वेगळे नाट्य-प्रयोग पाहायला मिळाले. त्यातील एक होता मुंबईच्या सुनील शानबाग यांच्या तमाशा थिएटर प्रस्तुत Blank Page हे नाटक. हे नाटक म्हणजे विविध भाषांतील कवितांचे नाट्यीकरण होते. मराठी, काश्मिरी, हिंदी कविता त्यात होत्या. नामदेव ढसाळ यांची एक कविता देखील होती. आणि दुसरे नाटक होते ओदिरी(ಓದಿರಿ) हे बहुचर्चित, आणि वादग्रस्त नाटक जे मुस्लीम धर्मातील काही सुधारणा याविषयी भाष्य करते. आणि वाद जो निर्माण झाला आहे तो मुहम्मद पैगंबर याचे या नाटकात केले गेलेले प्रतीमाकरण यामुळे.

एकुणात निनासम हे नाट्यक्षेत्रात काम करत असल्यामुळे, असा नाटकांचा उत्सव हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मनसोक्त नाटकं पाहण्याचा, त्यांचा आस्वाद घेण्याचा येथे योग आला आणि धमाल आली.

पिंपरी चिंचवडची शिशिर व्याख्यानमाला

पुणे शहराच्या जवळच पिंपरी चिंचवड हे जुळे शहर १९६०च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रामुळे उदयास आले. आणि एक बहुभाषिक, बहुराज्यिक, शहरी, ग्रामीण संस्कृती दिसण्यास सुरुवात झाली. एकदा का पोटाचा प्रश्न सुटला की इतर गोष्टी सुचतात. कला, क्रीडा, संगीत, नाटक, विचार प्रबोधन इत्यादि गोष्टीना चालना मिळू लागते. रोटरी क्लब हा पूर्वीपासूनच पिंपरी चिंचवड भागात उद्योजकांच्या सहभागाने समाज सेवाचे व्रत निभावत होता. १९९८ मध्ये रोटरी क्लबच्या काही सदस्यांनी पुण्यात जी  १५० वर्षाहून जुनी वसंत व्याख्यानमाला सुरु आहे त्या धर्तीवर एक व्याख्यानमाला सुरु करावी असा प्रस्ताव आला. डॉ. अच्युत कलन्त्रे, जयप्रकाश रांका, मनोहर दिक्षित(जे आमचे शेजारी होते) इत्यादींनी त्यात पुढाकार घेतला. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प जानेवारी १९९८ मध्ये गुंफले गेले. तेव्हापासून ती गेली वीस वर्षे सुरु आहे, जानेवारीत विसावे सत्र सादर झाले. शिशिर ऋतूमध्ये(जानेवारीत) होत असल्यामुळे ही झाली शिशिर व्याख्यानमाला.

मी या व्याख्यानमालेचा अगदी पहिल्या वर्षापासूनचा श्रोता/प्रेक्षक म्हणून साक्षीदार आहे. या निमित्ताने या ओद्योगिक शहरात वैचारिक वृत्तीची जोपासना सुरु झाली. विविध पुढारी, राजकारणी, लेखक, विचारवंत, कलाकार यांचे पाय पाय लागले. संवाद सुरु झाला, आणि एक पोकळी भरून काढण्यास मदत झाली. चार दिवस वेगवेगळया व्याख्यानांच्या निमित्ताने प्रबोधन, आणि शेवटल्या दिवशी मनोरंजन असे व्याख्यानमालेचे ढोबळ स्वरूप असते. आजकाल मनोरंजनासाठी, प्रबोधनासाठी, शिक्षणासाठी असलेल्या अनेक माध्यमांच्या कल्लोळामध्ये, थेट वक्ता आणि श्रोता या मध्ये होणारा संवाद नक्कीच प्रभावी असतो.

अगदी पहिल्या वर्षापासूनच विषयांची विविधता कायम ठेवण्यात आली. सामाजिक, राजकीय, कला, चालू घडामोडी असोत, विविध विषयांवर प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करून बोलायला लावले आहे. मागील वर्षी, २०१६ साली, स्मार्ट सिटीची चर्चा होती, त्यावेळेस परिसंवाद होता. द. मा. मिरासदार यांचे कथाकथन, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे लतादीदी यांच्या विषयीचे मनोगत, संगीतकार यशवंत देव यांची ‘देवगाणी’, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची शोधयात्रा, अनिल अवचट यांचे मुक्तांगणचे अनुभवकथन असे एक ना अनेक कार्यक्रम या व्याख्यानमालेच्या निमित्ताने झाले, आणि पिंपरी-चिंचवडवासियांना समृद्ध करून गेली आहे.

20170313_064624

शिशिर व्याख्यानमाला पिंपरी चिंचवड रोटरी क्लब

ह्या वर्षीची व्याख्यानमाला देखील अशीच भरगच्च कार्यक्रमाने झाली. उदघाटन विश्वंभर चौधरी यांच्या राष्ट्रवाद-काल आणि आज याविषयावरील व्याख्यानाने झाले. इतरही बरेच कार्यक्रम होते जसे नोटबंदी वर यमाजी मालकर, नर्मदा परिक्रमा यावर जगन्नाथ कुंटे बोलायला होते. मी शेवटच्या दिवशी गेलो होतो. त्या दिवशी प्रसिद्ध कवी संदीप खरे(आयुष्यावर बोलू काही फेम) यांच्या नवीन/जुन्या कवितांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचे नाव होते इर्शाद. कार्यक्रमात त्याच्या बरोबर वैभव जोशी हा कवी देखील होता. त्याची उत्सुकता होती. कविता वाचनाचे कार्यक्रम विशेष होत नाहीत. खूप पूर्वी पु ल देशपांडे, वसंत बापट, बा. भ. बोरकर कविता वाचनाचे कार्यक्रम करत असत असे मी वाचले आहे. त्यातील काही कार्यक्रमांचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पहिलेले आठवते. विसुभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगलय काव्यात हाही प्रसिद्ध कवितांवरचा कार्यक्रम खूप पूर्वी पहिला होता. अतिशय अनौपचारिक पद्धतीने सादर केलें गेलेला हा कार्यक्रम काही विशेष रंगला नाही.

irshad

एकमेकांच्या तसेच प्रेक्षकांच्या(प्रामुख्याने मधूनच उठून निधून जाणाऱ्या) फिरक्या घेत हा कार्यक्रम झाला. प्रामुख्याने प्रेमविषयक कविताच सादर केल्या गेल्या. संदीप खरेचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम पूर्वी व्याख्यानमालेत २००५ साली झाला होता.

असो. तर ह्या वर्षीची शिशिर व्याख्यानमाला, विसावे पुष्प, अशा तऱ्हेने संपन्न झाले. प्रत्येक वर्षी खरे पहिले तर, समारोप, ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या गायनाने होते, पण ह्या वर्षी ते झाले नाही, का कोणास ठाऊक. इतकी वर्षे अशा व्याख्यानमालेचे संयोजन करणे ही सोपी गोष्ट नाही. मनोहर दिक्षित अधून मधून भेटत असतात, आणि त्यांच्याशी बोलताना व्याख्यानमाला आयोजित करण्यामागचे अथक प्रयत्न समजून येतात. ही व्याख्यानमाला आता पिंपरी चिंचवड भागाचा मनाचा तुरा बनली आहे. दिवाळी पहाट, आणि इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यापासून प्रेरणा घेवून पुढे आले आहेत, एक सांस्कृतिक चळवळ सुरु झाली. सुदैवाने या व्याख्यानमालेचे दस्तावेजीकरण झाले आहे. त्यांच्या संकेतस्थळावर पूर्वीच्या कार्यक्रमांच्या रेकॉर्डींग रसिक पाहू शकतात. पिंपरी-चिंचवड भागात इतरही काही कलाविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम कित्येक वर्षांपासून होत आहेत(उदा. रविंद्र घांगुर्डे आयोजित करत असलेल्या संगीत सभा) त्याबद्दल नंतर कधीतरी.