विजयदुर्ग

इतक्यातच एक-दोनदा वर्तमानपत्रातून वाचले कि कोकणातील एक सागरी किल्ला ज्याचे नाव विजयदुर्ग आहे त्याच्या बुरुजाच्या भिंती कोसळ्या आहेत. विजयदुर्गची तटबंदी अभेद्य मानली जाते, इतकी ती मजबूत आहे. मी खरेतर या वर्षाच्या सुरुवातीलाच विजयदुर्ग आणि जवळच्या परिसराची भटकंती करून आलो होतो. सगळे काही आलबेल होते. हि बातमी वाचून मन थोडेसे खट्टू झाले, आणि वाटले कि आपल्या त्या भटकंतीविषयी लिहावे. तसेच काही दिवसातच(ऑगस्ट १८) जागतिक हेलिअम दिन(World Helium Day) आहे. तेही कारण हा ब्लॉग लिहायचे.

आधी हेलिअम काय भानगड आहे ते सांगतो. हेलिअम हा ऑक्सिजन नायट्रोजन सारखे वायूरूप मुलतत्व आहे. आणि गमतीची गोष्ट अशी कि १८ ऑगस्ट १८९८ रोजी सूर्याच्या वातावरणात या वायूचा शोध  एका लॉकियर नावाच्या ब्रिटीश शास्त्रज्ञाला या किल्ल्यावर खग्रास सूर्यग्रहण पाहताना लागला असे मानले जाते. किल्ल्यावर  त्या शास्त्रज्ञाच्या नवे एक कट्टा आहे, त्यावर माहितीचा फलक देखील आहे. २००९ पासून किल्ल्यावर जागतिक हेलिअम दिन(World Helium Day) साजरा करण्यात येऊ लागला. विजयदुर्गावर या निमित्त दरवर्षी कार्यक्रम होतात. या वर्षी, कोरोना संसर्गामुळे माहिती नाही काय करणार आहेत. मी थोडा शोध घेतल्यावर समजले कि हेलियम शोधाची सगळी गोष्ट तशी गुंतागुंतीची आहे. तुम्ही हा  माधव गोखले यांनी लिहिलेल्या लेखाचा दुवा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. असो.

मी फेब्रुवारी २०२० मध्ये(म्हणजे कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याच्या काही दिवसच आधी!) कोल्हापुरास जाणे झाले. शनिवार रविवार हाताशी होता आणि विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्वर असा पर्यटनाचा बेत ठरला. कोल्हापूरहून सकाळी सकाळीच निघालो. अणुस्करा घाट पार करत राजापूरला पोहोचलो. राजापूर जवळील उन्हाळे गावातील गरम पाण्याचे झरे पाहून देवगड बंदर आणि नंतर समुद्रकिनारी पोहोचलो. तेथे थोडावेळ थांबून, जवळील टेकडीवरील पवनउर्जा प्रकल्प पाहायला गेलो, वरून दिसत असलेलेल समुद्राचे आणि आसपासचे अप्रतिम दृश्य डोळ्यात जवळच असलेल्या प्रसिद्ध अश्या कुणकेश्वर या समुद्रकिनारी असलेल्या शिवमंदिराला भेट दिली. तेथे असलेल्या समुद्रकिनारी संध्याकाळ घालवून रात्र त्याच गावात मुक्काम केला(शिवसागर होम-स्टे). देवगड समुद्रकिनाऱ्यावरून दिसणाऱ्या देवगड किल्ल्याला टांग मारली. तसेही त्या सागर किनारी असलेल्या दुर्गावर विशेष काही पाहण्यासारखे नाही असे ऐकून होतो. देवगड बंदराला संरक्षण देण्यासाठी हा दुर्ग बांधला गेला होता. देवगड म्हटले आठवते ते देवगडचे जगप्रसिद्ध मोठाले हापूस आंबे. शिवसागर होम-स्टेच्या मालकांशी रात्री बोलताना देवगड हापूस आंब्याचा पिकाबद्दल, एकूणच त्या व्यवसायाबद्दल मनोरंजक माहिती मिळाली.

देवगड पवनउर्जा प्रकल्प

देवगड पवनउर्जा प्रकल्प

थोडेसे कुणकेश्वर मंदिराबद्दल. हे प्राचीन शिवमंदिर कोकण काशी आहे असे म्हणतात. पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनारी उंचवट्या असेलेले हे मंदिर रम्य दिसते. आम्ही तेथे गेलो तेव्हा दिवस मवाळू लागला होता. समुद्रात लाटांशी खेळताना मंदिर खुणावत होते. महाशिवरात्रीचा सण काही दिवसांवर आला होता, त्यामुळे मंदिराची रंगरंगोटीचे काम चालू होते. हा सर्व भाग अतिशय निसर्गरम्य आहे. मला आठवते त्याप्रमाणे श्वास या मराठी चित्रपटात हे मंदिर आणि हा परिसर मी पहिला होता. सगळीकडे जांभ्या दगड, त्यात कोरलेल्या पायऱ्या, पटांगण, रस्ते दिसतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी विजयदुर्गाकडे कूच केले. सर्वात आधी विजयदुर्गला फेरा मारणाऱ्या बोटीतून फिरून आलो, दुर्गाचे बाहेरून दर्शन घेतले. त्याला जिब्राल्टर ऑफ ईस्ट(Gibraltar of East) का म्हणतात हे लक्षात येते. आणि हा तसा बराच जुना किल्ला आहे. भोजराजा शिलाहार याच्या काळात बाराव्या शतकात बांधला गेला असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात मुळ छोट्याश्या किल्ल्याचे रुपांतर तिहेरी तटबंदी बांधून एक अभेद्य किल्ल्यात केले. पुढे मराठ्यांच्या आरमारात ह्या किल्ल्याला अजूनही महत्व आले. वाघोटन नदीच्या मुखाजवळ हा किल्ला आहे. बोटीतून फिरून आल्यावर आम्ही आधी पोटपूजा केली आणि स्थानिक वाटाड्या किल्ला पाहायला मार्गदर्शक म्हणून घेतला.

वाटाड्यासोबत किल्ला पाहायला चांगले दोन तास लागले. आत मध्ये अनेक वस्तू अजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. तटबंदीवरून देखील फिरता आले. आणि  त्या तटबंदीवर २७ मजबूत बुरुज आहेत. किल्ल्याच्या प्रवेशदारातून आत गेल्यावर पुढे पोलीस चौकी आहे. कुठल्यातरी सदरेची चौकी झाली असणार. सरकारी विश्रामगृह आहे. पाण्याचा हौद, घोड्यांच्या पागा, दारुगोळा, धनधान्य साठवणुकीची कोठारे, अजूनही शाबूत असलेल्या तोफा या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहे. वाटाड्याने आम्हाला एके ठिकाणी, बहुधा एका बुरुजाच्या आतल्या भागातून खाली समुद्र किनारी भल्या थोरल्या पायऱ्या उतरायला लावून नेले. गलबत, बोटी त्या ठिकाणी लागत असणार. किल्ल्यावर बरीच झाडीझुडपी आहेत. बोरीची झाडे देखील आहेत. आम्ही गेलो तेव्हा ती बोरांनी लगडलेली होती. आणि आम्ही अधाश्यासारखे त्या आंबटगोड बोरांवर येथेच्छ ताव मारला!

विजयदुर्गबद्दल आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे किल्ल्याजवळ असलेली खाडीच्या पाण्यात न दिसणारी        “मानवनिर्मित भिंत” ज्या मुळे किल्ल्यावर हल्ला करणारी गलबते, जहाजे त्यावर आदळून बुडत असत. वाटाड्याने त्या भिंतीबद्दल अतिशय सुरसपणे आम्हाला सांगितले आणि ती भिंत त्याकाळी कशी बांधली गेली असेल, दुर्गबांधणीचे आपले तंत्र कसे पुढारलेले होते ह्याची कथा सांगितली. माझा मित्र आणि पुरातत्वशास्त्रज्ञ सचिन जोशी याने केलेल्या संशोधनांती असे लक्षात आणून दिले कि हि मानवनिर्मित भिंत नाही तर एक पाण्याखाली निसर्गनिर्मित खडकाळ उंचवटे आहेत. त्याचा संशोधनपर लेख या दुव्यावर पाहता येईल.

किल्ला पाहून आम्ही परतीच्या म्हणजे पुण्याच्या वाटेला लागलो, पण तितक्यात लक्षात आले कि जवळच एक जुने मंदिर आहे, रामेश्वर मंदिर असे त्याचे नाव. मुख्य रस्त्यावर आत मध्ये जांभ्या दगड पसरलेल्या भागावर प्रवेशद्वार आहे. आत गेले कि दगडात खोदलेल्या १००-१५० पायऱ्या दिसतात आणि खाली आत मध्ये मंदिर दृष्टीस पडते. मंदिर कौलारू आहे, फरसबंदी दगडी बांधकाम, दगडी उंच अश्या दीपमाळा असलेले मंदिर छान आहे.

रामेश्वर मंदिर

रामेश्वर मंदिर

आम्ही दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून पुण्यास परत कोल्हापूर मार्गे निघालो.  मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदीकारण सुरु आहे. सगळीकडे लाल माती, रस्त्याचे काम, ठीकठिकाणी बाह्यवळणे या मुळे जीव थोडा हैराण झाला. पण  किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, आणि येथील खाद्य-संस्कृतीने नटलेल्या कोकणाच्या या भागात खरेतर सवडीने चार पाच दिवस काढून आले पाहिजे.

नाग तिब्बा, भाग#२

हिमालयातील नाग तिब्बा पदभ्रमणाच्या संदर्भातील पाहिला ब्लॉग मी कालच लिहिला होता. आज दुसरा आणि शेवटचा भाग.

रात्रभर पाउस पडतच होता. तंबूत एका कोपऱ्यात पाणी शिरले होते. तंबू ठीकठाक केल्यावर पाणी आत येणे बंद झाले. पण गारठा प्रचंड वाढला होता. शून्याच्या खालीच तापमान होते. सकाळी सहा वाजता जाग आली. बाहेर येऊन पाहतो काय, पाऊस उघडला होता. तंबूवर बर्फाचा हलकासा थर साचला होता. तंबूसमोरील पटांगणात देखील एक दोन जागी गवतावर बर्फ साचला होता. नक्कीच वरती डोंगरात नवीन बर्फवृष्टी झाली असणार. थोड्याच वेळात सूर्य उजाडला. आकाश निरभ्र निळेभोर होते. हिमालयातील लहरी हवेचा आम्हाला चांगलाच अनुभव आला होता. वातावरण एकूण उल्हासित करणारे होते. आदल्या दिवशीचा थकवा गायब झाला होता. चहा वगैरे पिऊन आजच्या नाग तिब्बा शिखर चढाई साठी तयार झालो. बर्फात चालण्यासाठी सोपे व्हावे म्हणून बुटांवर लावण्यात येणारी साखळी आम्हाला देण्यात आली. वाटेत खाण्यासाठी म्हणून थोडेफार खायला, प्यायला घेतले.

आम्ही चालायला सुरुवात केली. सुरुवातीलाच खडी चढण होती. आणखी वर गेल्यावर अजून एक कॅम्प साईट दिसली. तीला पार करून गेलो तर समोर चांगलाच बर्फ पडलेला दिसला. दोन-दिवसांचा बर्फ होता कारण तो तसा कठीण होता. आणखीन पुढे गेलो तेव्हा नाग मंदिराचा परिसर दिसू लागला. नाग मंदिर झाडीत लपले होते. परत येताना मंदिराला भेट द्यावी असा विचार करून तसेच पुढे चढत राहिलो. पायांवर साखळ्या चढवल्या. चांगलेच बर्फ साचले होते. पाय एक एक फुट बर्फात रुतत होते. आजूबाजूला असलेल्या झाडांवर देखील बर्फ दिसत होते. सगळीकडे बर्फच बर्फ. डोंगराला वळसा घालून जाताना खाली दरीत पाहिले तर तेथेही बर्फच! जंगल देखील घनदाट होते. इतक्यात एक मस्त केसाळ कुत्रा नजरेस पडला. तो आमच्या बरोबर वर येत होता. आम्हीही त्याला सोबतीला घेतले. वाटेत ठिकठिकाणी जुनी, मोडलेली झाडे, त्यांच्या फांद्या, त्यावरील बर्फ दिसत होती. झाडीतून चालताना अंगावर झाडावरील बर्फ पडत होते. चांगलाच सूर्यप्रकाश पसरला होता.

थोड्यावेळात शिखराचे दर्शन होऊ लागले. एक उंच काठी, भगवा झेंडा तेथे दिसत होता. एव्हाना आम्हाला बर्फात चालायची सवय झाली होती. मजा येत होती, पण दमसासाचा कस लागत होता. चढ उतार, मध्ये येणाऱ्या टेकड्यांना वळसा, झाडाझुडुपातून कधी तर, कधी अफाट पसरलेल्या मऊ लुसलुशीत बर्फाच्या मैदानातून पायपीट करत मजल दरमजल करत बऱ्याच वेळाने शिखरावर पोहचलो, नाग तिब्बा सर झाले होते! दशदिशांचा परिसर ३६० कोनातून पाहता येत होता. सगळीकडे बर्फच बर्फ, बर्फाच्छीद शिखरे, लांबवर झाडी असा सगळा नजारा होता. पण हवा एकदम ढगाळ झाली. कोणास ठाऊक कुठूनसे ढग आले आणि सगळे दिसेनासे झाले. शिखरावर जेमतेम १०-१५ लोकांसाठी उभे राहण्यापुरती जागा होती. आम्ही ९९१५ फुटांवर होतो. एवढ्या उंचीवर मी काही पहिल्यांदा गेलो नव्हतो. पूर्वी सिमला मनालीला गेलो असता रोहतांग पासला गेलो होतो, जो १३ हजार फुटांवर आहे, पण चालत, चढत नाही तर गाडीने. एवरेस्ट ह्याच्या तीनपट उंच. कसा असेल कल्पनाच करवत नव्हती. नाग तिब्बा शिखरावर एक भगवा ध्वजस्तंभ होता. स्वर्गरोहिणी, सुमेरू पर्वत, नंदा देवी ही शिखरे येथून दिसतात, पण या ढगांमुळे सगळे झाकून गेले. काय करणार! शिखरावर जास्ती वेळ थांबता येणार नव्हते. हवा बदलत होती. पावसाचा धोका होता. आम्ही निराश मनाने खाली उतरायला सुरुवात केली.

खाली उतारावरून बर्फात सुरुवातीला अवघड वाटले, पण नंतर सवय झाली, आणि झपझप खाली उतरू लागलो. दोन्ही बुटांवर असलेल्या साखळ्या एकमेकात अडकून पडायला होत होते. एके ठिकाणी तर चक्क पडलो, धडपडलो. एका बुटावरील साखळी तुटली देखील त्यात. पण मला काही विशेष झाले नाही नशिब! आमच्याबरोबरचा निम्मा चमू मागेच दूर राहिला होता. नाग मंदिराचा फाटा आला होता. आम्ही खाली डावीकडे उतरून मंदिराकडे गेलो. मंदिरावर देखील बर्फ साचले होते. समोर पाण्याचा कुंड होता. नाग देवतेचे दर्शन घेतले. थोडावेळ टेकलो आणि निघालो. दुपारच्या जेवणाची वेळ केव्हाच टळून गेली होती. बऱ्याच वेळानंतर परत आम्ही खाली आमच्या तळावर विजयी मुद्रेने पोहचलो. जेवण आमची वाट पाहतच होते. पटांगणात जेवणाचे टेबल मांडले होते. मस्त राजमा भातावर ताव मारला आणि बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. गप्पा काय तर ट्रेक्सच्याच! प्रत्येकाने पूर्वी कोणतेना कोणते तरी हिमालयातील ट्रेक केले होते, त्या आठवणी, अनुभव, दुसरा विषयच नाही. आमच्या ट्रेक लीडरने, सार्थकने Desert Solitude नावाचे Edward Abbey यांचे पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले, अमेरिकेतील वाळवंटी भागातील च्या रेंजरचे अनुभवांचे ते पुस्तके होते. Cambriaने The Meadow हे Adrian Levy/Cathy Scott-Clark यांचे गिर्यारोहकांचे काश्मीरमध्ये झालेल्या अपहरणाच्या संदर्भातील पुस्तक आणले होते. त्याबद्दल गप्पा झाल्या.

हळू हळू अंधार पडू लागला, गारठा देखील वाढला. शेकोटी पेटवली गेली. आणि मग काय चहा आणि परत गप्पा, त्या शेकोटीभोवती बसून. रात्रीचे आभाळ निरभ्र आणि चांदण्यांनी भरलेले बऱ्याच दिवसांनी पहिले. मी काही वर्षांपूर्वी आकाशनिरीक्षणासाठी म्हणून रात्रभर बाहेर Star Party साठी गेलो होतो त्याची आठवण झाली.

तिसरा दिवस हा परत पंतवाडीत खाली उतरून जाण्याचा दिवस होता. सकाळी लवकरच उतराई सुरु झाली. हवामान चांगले होते. मजल दरमजल करत अडत अडखळत कसेबसे पंतवाडीत दुपारच्या जेवणाच्या सुमारास पोहचलो. तेथे जेवून डेहराडूनच्या दिशेने प्रयाण केले. सगळे थकले होते. मस्त झोप काढून डेहराडूनच्या आसपास आलो, तर मस्त गारांचा पाऊस सुरु झाला. डेहराडूनला संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहचलो तर पावसामुळे चांगलेच गारठले होते. दुसऱ्या दिवशी डेहराडून मध्ये फिरण्याचा मानस होता. त्याबद्दल मी येथे लिहिले आहे, जरूर वाचा आणि प्रतिक्रिया कळवा!

 

 

नाग तिब्बा, भाग#१

मला गड किल्ले, डोंगर भटकण्याची चटक लागून कित्येक वर्षे झाली. सह्याद्री डोंगर रांगांमध्ये भरपूर भटकलो देखील आहे. कित्येक शिखरे, कित्येक किल्ले पादाक्रांत केली आहेत. पर्वतराज हिमालय खूप आधी पासून खुणावत होताच. परंतु हिमालयातील भटकंती, ट्रेकिंग हे जमत नव्हते. प्रमुख कारण म्हणजे वेळ. सह्याद्री भटकणे तसे वेळेच्या दृष्टीने सोयीचे आहे. एखादा शनिवार रविवार, किंवा सुट्टीचा इतर दिवस मिळाला की झाले. पण हिमालय पार उत्तरेला. तेथे पोचायलाच दोन दिवस प्रवास. ह्या वर्षी मनाचा निर्धार करून वेळ काढला आणि हिमालयातील एक तसा छोटासा ट्रेक करून आलो. तो हा नाग तिब्बा ट्रेक. खरे तर मी मागच्या वर्षी हम्ता पास, चंद्रताल नावाच्या किंचित मोठ्या ट्रेकसाठी नाव नोंदवले होते, पण काही कारणामुळे जमलेच नाही.

आपल्याला माहिती असते की हिमालयातील सर्वोच्च शिखर म्हणजे माऊंट एवरेस्ट. त्याची उंची ८५०० मीटर, म्हणजे २९ हजार फुट. मी दोन-तीन वर्षांपूर्वी माऊंट एवरेस्ट मोहिमेवरील एक चित्रपट पाहिला होता. त्याबद्दल येथे लिहिले आहे. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर ६५०० फुटापर्यंत आहे. म्हणजे जवळ जवळ तिप्पट उंची. ३५०० मीटर उंचीवर हवा विरळ होते, झाडे झुडपे कमी होतात, नुसते बर्फच बर्फ असते. हिमालय पूर्व पश्चिम असा पसरलेला आहे ज्याची लांबी २४०० किलोमीटर आहे. भारतातील हिमालयाचे सर्वसाधारण तीन भाग पडतात. एक म्हणजे पायथ्याचा भाग, ज्याला शिवालिक डोंगर रांगा(१००० ते ३५०० मीटर) असेही म्हणतात, त्याच्या वरच्या भागाला मध्य हिमालय(३५०० ते ६५०० मीटर), आणि त्याही वरील भागाला उच्च हिमालय(६५०० मीटर आणि त्याही वरती). नाग तिब्बा ३०२५ मीटर उंचीवर आहे. तिब्बा म्हणजे स्थानिक भाषेत शिखर. हिमालयातील भटकंतीसाठी अनेक संस्था आहेत. त्यातील एक Bikat Adventures, ज्याची मी निवड केली होती. बरेच जण आपले आपणही  जातात, स्थानिक लोकांची मदत घेतात आणि ट्रेक्स करतात. बऱ्याच वर्षांपासून माझ्या अनेक मित्रांकडून हिमालयातील भटकंतीचे अनुभव ऐकतो आहे. त्यांनी केलेली शारीरिक तयारी, इतर साधनांची जमवाजमव वगैरे या बद्दलही ऐकून होतो. साधारणपणे जून जुलै मध्ये हे ट्रेक्स जातात. मी मुद्दामच मार्चची निवड केली होती, मला ती वेळ सोयीची होती, आणि ह्या छोट्या ट्रेकवर मार्चमध्ये बर्फ असण्याची दाट शक्यता होती.

हा ट्रेक डेहराडून येथून सुरु होणार होता. उत्तराखंडातील डेहराडून गढवाल विभागात येते. आम्ही आदल्या दिवशी पुणे, दिल्ली करत रात्री डेहराडूनला पोहचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी डेहराडूनच्या ISBT येथे ट्रेक मधील इतर जण आणि बिकटचे लोकं भेटणार होते. आमचा छोटासा गट होता. आमच्या सारखेच २-३ जण पहिल्यांदाच हिमालयात ट्रेक करण्यासाठी आले होते. ट्रेक तसा छोटासा असल्यामुळे आणि चालण्याची सवय असल्यामुळे विशेष काही तयारी करावी लागली नव्हती. थंडीसाठीचे कपडे, हातमोजे, ट्रेकिंगसाठीचे पायातील जोडे हे सर्व बिकटकडून भाड्याने घेतले होते. सर्व जण जमल्यावर डेहराडून पासून मसुरीच्या पलीकडे पंतवाडी ह्या गावात आम्ही गेलो, साधारण दोन-अडीच तासांचा प्रवास करत, मसुरी दर्शन(Kempty Falls वगैरे) करत तेथे पोहोचलो. गावात दुरवर जिकडे पहावे तर उंच उंच डोंगरच दिसत होते. हवेत मस्त गारठा होता, आकाशातून सूर्य गायब झाला होता. पाऊस पडेल असे लोकं म्हणत होते. तेथे बऱ्याच ट्रेकर्सचा जणू काही मेळावा भरला होता असे वातावरण तेथे होते. थोड्याच वेळात आमचे ट्रेक लीडर्स देखील भेटले. एकाचे नाव सार्थक मदन आणि दुसरी होती Cambria Sawyer, जी अमेरिकन मुलगी होती, बिकटसाठी काम करणारी. आमचे अतिरिक्त समान खेचारांवर लादून तेथील स्थानिक मदतनीस आणणार होते.

पंतवाडी(काही जण पंतवारी असेही म्हणतात) गावातून आमची पायपीट सुरु झाली. मुख्य रस्त्यातून आत चढणीला लागली. गावातील घरे, झोपड्या, कमान वगैरे पार करून दगड धोंड्यातून, चांगल्या रुळलेल्या वाटेवरून आम्ही चालत होतो. आजूबाजूला हिरवाई होती. तेथील डोंगरउतारावरील वैशिष्ट्यपूर्ण शेती ज्याला step farming असे म्हणतात ती देखील बरीच दिसत होती. नाग तिब्बा शिखराच्या वाटेवर प्रसिद्ध नाग मंदिर येते जे जागृत स्थान आहे. त्यामुळे भाविक तिथपर्यंत कायम ये जा करत असतात. साधारण दोन एक तास पायपीट केल्यावर क्षुधाशांतीसाठी थांबा घेतला. बरोबर दिले गेलेले जेवण त्या डोंगरवाटेत झाडाखाली बसून खाण्यात मस्त मजा आली. थंडी चांगलीच बोचत होती, पण चालल्या मुळे थोडाफार घामही येत होता. सहट्रेकर्सची एव्हाना ओळख झाली होती. ट्रेक लीडर सार्थक हा कसलेला ट्रेकर होता. तो ट्रेकसाठी नवी ठिकाणे शोधण्याच्या कार्यासाठी असलेल्या गटात तो बिकटमध्ये काम करत होता. बाकीचे ट्रेक लीडर्स एका प्रशिक्षणात गुंतले असल्यामुळे तो ह्या आमच्या ट्रेकवर आला होता. बोलघेवडी Cambria Sawyer ही देखील ट्रेकर आहे, पण तिचे बिकट मध्ये काम विविध लेख आणि इतर साहित्य निर्मिती करणे हे होते. त्यामुळे गप्पागोष्टी करत वाटचाल सुरु होती. हळू हळू दम लागत होता. पुढे वनखात्याचा फलक दिसला. जंगल दाट झालेले दिसत होते, दऱ्या खोरे, लांबवर डोंगर शिखरावर साचलेले बर्फ दिसत होते. फलकाच्या अलीकडे असलेल्या पठारावर बरेच तंबू लावलेले दिसत होते. चहाची सोय देखील होती. तेथे थोडे थांबून चहा घेतला. अजूनही दीड दोन तासांचा पल्ला होता.

08295EEA-8E56-4A33-AE29-3FAE4B42C6D4

शेवटी पाचाच्या सुमारास आम्ही बेस कॅम्पला पोहचलो. ती जागा तसे पाहिले तर छोटेसे पठारच होते. आमच्यासाठी म्हणून असलेले तंबू आधीच लावून ठेवले गेले होते. थोडे लांबवर आमच्या सोबत आलेल्या पोर्टर लोकांसाठी आणि स्वयंपाकासाठी एक थोडा मोठा तंबू होता. तसेच शौचासाठी एक-दोन तंबू बेस कॅम्पच्या एका बाजूला लावले होते. आम्ही जाऊन स्थिरस्थावर होईस्तोवर एकदम आकाशात ढग जमून आले, आणि जणू काही आमच्या स्वागतासाठी म्हणून पाऊस बरसायला लागला. आधीच थंडी, त्यात हा पाऊस. एकदम जबरदस्त गाराठायला झाले. बऱ्यापैकी अंधारलेलेही होऊन गेले. काही वेळातच चहा आणि सोबत गरमागरम भजी देखील आली. आमच्या निवासी तंबूच्या एका बाजूला एक मोठासा तंबू होता. ते जेवणासाठी, एकत्र बसण्यासाठी म्हणून होता. तेथे छोटेखानी टेबल, स्टुल अशी सगळी व्यवस्था होती. आम्ही सगळे चहा आणि भजीसाठी तेथे जमलो.

7D3CB7D3-DB0B-4474-8F87-1B81CF038659

तंबूत शिरून थोडे आवरले. तंबूच्या आत बाहेर करणे हे थोडे कसरतीचे काम असते. काही वेळाने रात्रीचे जेवण झाले. दुसऱ्या दिवसाच्या कार्याक्रमाची माहिती ट्रेक लीडरने सांगितली. पाऊस पडतच होता. सगळीकडे अंधार गुडूप होता. झोपण्याशिवाय दुसरे काही करण्यासारखे नव्हते, त्यामुळे sleeping bag मध्ये शिरून निद्राधीन झालो.

 

Fire flies at Koyna Forest

Months of April and May are peak seasons for traveling, tourism in the country. Many of us venture out during these months. I also love to travel, trek, explore wilderness, uncharted country side. I even had booked my first every Himalaya trek(Hampta Pass) next month, but then I had to cancel it for some reason. A guilt feeling was setting in. The weather is also not forgiving in these months, especially, in May. It has been very bad this year, as they say.  Last week one of my colleagues in the office, asked me whether I was interested in joining him for a weekend trip to Koyna forest, for the fire flies show. I instantly agreed.

I had been to Koyna forest in the past, in fact three times, once during the trek of Vasota fort, second time during my trek to fort Bhairavgad, and lastly when I visited, now world famous Kaas Plateau of wild flowers. It is pretty big wild life sanctuary, is part Sahyadri Tiger Reserve. But this trip was going to be a visit to a southern part of the forest, where I had not gone so far. I also had witnessed fire flies show few years back in Chorla Ghat on the way to Goa. Off late, tourism board is promoting this unique experience of mother nature, which takes place especially during month of May. My colleague is part of organization called Pune Hiking Enthusiasts(PHE). When I got hooked on trekking two decades back, I used to keep track of various formal, informal organizations, clubs engaged into trekking, wildlife outings. Very soon, I had listed down about 80 odd such organizations. As my trekking activities reduced I stopped tracking these. Since last few years, the focus is not on pure trekking, or even wildlife, but it is more on adventure. White water rafting, rappelling, off beat hikes(such as gorges, valleys), camping(especially in the tents), even heritage tours, got added to the list. And because of my trekking engagements, I got to know of many experts in the fields of history, wildlife, etc, such as Sachin Joshi.

Last weekend, with PHE, I finally ventured out and went to Koyna forest. This forest is about 200 kilometers towards south of Pune, at the heart of which a dam on the river Koyna is located, along with hydroelectric plant. The large expanse of backwater flows through the forest. We started off from Pune Saturday morning, via towns of Satara, Umbraj, Patan. By the time we reached the forest, it was lunch time. We headed off straight to waterfall located inside the forest, called Ozarde waterfall near village of Navaja.

You must be wondering, visiting waterfall, in the summer season is crazy idea, as most of them run dry. But I was in a pleasant surprise. A small hike, that too most of it through rocks of waterfall way, was very different. Weather was not all that forgiving, though it was inside the forest, it was still warm and humid. But as we reached the bottom cliff(semi-circular) of height of 200 meters, the place was cool, and very different one. The water was still falling from the top, but of course, a minor stream was showing the existence of that though.

As the evening was setting in, we were looking for the fire flies show, which was star attraction. We got down from falls, and headed towards a place where fire flies can be sighted. This sight was near a Chaitraban Farms(near village Helwak), where we stopped for our evening tea. We also had a guided tour of the farm. This farm specializes in vertical farming, using green house, hydroponic system. They grow orchids, and other flowers. It was education for me to understand how hydroponic system works. By the time we came back from the tour, Sun had set, it was getting dark. The moon started showing up in the skies. We started off for a night trail in the adjacent forest. We started sighting glowing fire flies on trees on both sides of the trail. We walked for about 90 minutes, spellbound with the views and wonder of nature. Though there was quite a moon light, it was still delightful. Of course, photographers among us were slightly disappointed, as clicking flocks of fire flies was getting challenging. The onset of monsoon is a mating season for fire flies, which make them active with glowing light. And when this happens to thousands of flies, it is a sight similar to lit up Christmas Tree.

We headed towards our camp site for the night’s stay, which was near village Humbarli. The food was waiting for us. Once the dinner was done, tents were setup. It was amazing experience being in the tent in the middle of forest, with a moon in the skies. From the back of the camp site, the stream of backwater was visible, in the gorges nearby.

Koyna Wildlife Sancturay

Tents at the camp site

Next day a morning trail to the top of the mountains was planned, which was part of the core zone of the sanctuary. With due permissions, we hiked to it through deep forest. It had rained last night in that area. The colorful foliage under our feet as we walked as damp and wet. It was much cooler a well. We were accompanied by sanctuary guides who talked to us about flora and fauna of this evergreen forest. The peak provided wonderful vistas of Sahyadris, which it is famous for. The fort of Janagli Jaygad was visible, one could also spot hydro-electric generation plant deep in the valley. The dam, and the electricity generation plant is an engineering marvel, as it uses something called lake tapping technology. This dam is always in news due to active earthquakes happening in this area.

We also visited site of worship called Ram Baan, which happens to be a huge rock, that has cracks on it. These cracks got developed, as it is believed, by Lord Rama’s arrows. This place is worshiped by local devotees. The final surprise of the trip was still ahead. We visited the banks of Koyna river for a dip. It was much needed. The water was shallow at the place where we ventured inside, though it had quite a force and water was flowing. We enjoyed to our hearts’ content in that cold, refreshing waters of Koyna river, to head back to Pune, mesmerizing two days with nature.

Last year, in the rainy season, I had been to similar offbeat destination called Ahupe, for a wild vegetables festival. Read about it here(Ahupe Part#1, Ahupe Part#2). Do drop in your comments.

My trekking journey#9

In this blog, which is part of the series related to my trekking journey over the years, I am going to detail out my expeditions in the year of 2006. Please refer below links for blogs on earlier trekking years.

1998, 1999, 2000, 2001, 2002, 2003, 2004, 2005

The year began with a visit to fort Kenjalgad via Ambavade village. This is fort is also not far off from Pune. I also visited Jagannath Mandir and heritage hanging bridge.

After a long break until summer, I visited to fort hill of Bramahagiri during Nashik visit. The rock facade of this fort is very impressive. Monkey menace on the this fort is well known so one needs to be careful. Due to the steps, the access to this fort is not very difficult.

In the month of July during rains, I participated in a mega-trek, covering 6 forts in the Dhule region. We started with land fort of Malegaon. Then visited Laling, Songir, Kankarala, Galana and finally Dhudhna. Most of these forts are not huge and also don’t have much of height.

In August, again amidst heavy rains, visited Narayangad fort which is near Rajgurunagar on the way to Nashik from Pune. This area is rich and famous for vineyards and wineries(such as Sula, Chateau Indage). We also braved overflowing bridges to visit Vaphgaon Gadhi(fortress) in the rains. This place became famous due to the shooting of Marathi movie Pak Pakak Pak(पक पकाक पक) starring Nana Patekar. During this month, I also made a trip to fort of Drongiri near Uran in Mumbai region.

In September, we made trip to Akluj fort which is land fort. This is situated on the banks of river Nira. This is in good condition, but it also has turned out to be picnic spot.

 

In the winter season, during my visit to Mumbai for vacation, visited fort Ghodbandar in Thane district. Also visited few of the seven forts of Mumbai islands such as Mahim, Sewri, Worli. All these forts are in pretty bad condition, due to lack of conservation efforts. The winter had still few forts in store for us. We ended up going to Sudhagad and Sarasgad, later to Sagargad.

And finally, during our trip to Ratnagiri and Ganpatipule, visited forts of Ratnagiri, Jaygad and Purnagad which are coastal forts. We visited Thibaw Palace which is British time palace where king Thibaw of Burma was withheld by the British rulers(I wrote a blog on the history of his exile recently).

Ratnagiri

Theeba Palace

During this time, I had got hold of book by M S Narawane titled The Maritime and Coastal Forts of India. In fact, I had got opportunity to attend a lecture by him on fort architecture, and was lucky enough to visit them in Pune at their home.

 

Pedgaon

My trekking journey#8

In this blog, which is part of the series of blogs, related to my trekking journey over the years, I am going to detail out my trekking expeditions in the year of 2005. Please refer below links for blogs on my earlier trekking years.

1998, 1999, 2000, 2001, 2002, 2003, 2004

I did not get much of trekking done till summer this year, due to my engagements with Indology course related site visits, especially to Bhon archaeological site. In April, we went to fort called Daulatmangal, popularly known as Bhuleshwar which has an ancient temple of Lord Shiva.

Daulatmangal fort

Pushkarni on Bhuleshwar

Later in the summer, we went for a trek to Jungali Jaygad and Gunwantgad. Jungali Jaygad was long trek, especially through thick forests. We also visited Ramghal which is located near town called Helwak. This is one of the places where famous 16th century saint Ramdas Swami used to meditate. It also has a nice waterfall.

The month of July, in monsoon, saw me going again to Sinhagad. This time with my business colleagues traveling from USA. A visit to this fort is mandatory whenever anyone visits us from foreign country. I also went to a little unknown place called Kanifnathgad near Pune. This is unusual and little unknown as it has a shrine of Nath sect saint Kanifnath. This in on the way to Saswad via Kondhava and Bopdev Ghat.

20160831_170208

Sinhagad

In the month of August, during Independence Day weekend, we went to Ahmednagar where we visited famous land fort of Ahmednagar. This has its own significance due to the fact that many freedom fighters including Jawaharlal Nehru were jailed here during freedom struggle. Nehru also wrote his volumes of his famed work Discovery of India. I also happened to visit unusual museum dedicated to battlefield tanks about which I have written over here.

Later in the month of September, land fort of Bahadurgad near town of Pedgaon in Daund region, which is on the banks of river Bhima.

In the winter, we had traveled to Jabalpur on the way to Kanha National Park. I will write about it separately though. But I happened to take time to make a flying visit to fort called Madan Mahal which is in the city of Jabalpur. During the end of year, I did a solo visit to fort of Pandavgad, which is massive fort near town of Wai. This is clearly visible from the highway. I noticed one old Parsee person has been living on this fort quite a few years all alone, may be with help of some villagers at the base. There seems to be interesting history of Parsee community in this area. You may refer to this blog for some account of that. This site tells us that that person is no more, and his name was Sher Wadia.

My trekking journey#7

In this series related to my trekking journey over years, I am going to detail out my expeditions in the year of 2004. Please refer below links for blogs on earlier trekking years.

1998, 1999, 2000, 2001, 2002, 2003

The year of 2004 happened to be another blockbuster year for me in terms of trekking. In the moth of January, we headed towards coastal Maharashtra(Kokan) to visit forts of Sumargad and Mahipatgad. We had to battle humid coastal weather, also lack of proper trails on the way to the top on both these forts. I went for another minor self-exploration to fort of Rohida near Pune, which is happens to be significant in the history of Shivaji, as this was one of the forts he conquered.

The month of February, we saw ourselves again heading towards coastal Maharashtra(Konkan) to visit forts of Alibaug(also called Colaba fort), Revdanda and Korlai, both sea side land forts. We were accompanied by Sachin Joshi, archaeologist, who had interest in exploring nearby Chaul area based on the certain evidences he had with him. In the summer month of April, visited fort of Rajmachi, and later trailed to ancient Buddhist cave of Kondane.

In the month of monsoon, went to hills of Neelkantheshwar near Pune. My seventy three year old father also hiked with us. Later in the month, we hiked the fort of Peb(alias Vikatgad) near popular hill station Matheran. One can get other side of Matheran from Peb, also views of other forts such as Prabalgad can be seen from the top. In September, we visited forts of Ramdarane, Thal, Sarjekot and Hirakot as well. Sachin Joshi, wanted to take GPS coordinates for the Ramdarane fort, for mapping purposes. Sachin is using cutting edge technologies to contribute towards fort conservation. Towards end of September, we went on trekking expedition covering five forts in one go, all of them in the Nashik/Dang region. We visited Hatgad, Achala, Ahivantgad, Taula and finally Kanhergad. Hatgad happens to be near to popular hill station called Saputara on the boundary of Gujarat and Maharashtra.

The year ended with a trip towards north of Mumbai to forts of Tandulvadi and Jivdhani near Virar. Jivadhani, of course, is more famous because of temple which has become a pilgrimage place.

Prasannagad

My trekking journey#6

In this series related to my trekking journey over years, I am going to detail out my expeditions in the year of 2003. Please refer below links for blogs on earlier trekking years.

1998, 1999, 2000, 2001, 2002

At the beginning of the year itself, I got opportunity to venture outside of Sahyadris. I went for a business trip to Delhi, and my wish to visit land forts in and around Delhi came true. I happened to visit Red Fort and also Purana Qila, Tughlaqabad Fort. All of these forts been capital of Delhi at different times. In fact, it is said that Delhi had ancient seven capital areas or cities, of which Purana Qila and Tughlaqabad are part of it. Red Fort Lutyen’s New Delhi are more modern capital areas of Delhi.

I happened to visit Delhi recently, about which I have written elaborately hereespecially about landmark of Lutyen’s architecture Rashtrapati Bhavan.

In month of March that year, I joined Yuvashakti group from Pune for a trek to Ratangad. There are more than 3-4 forts named as Ratangad in Sahyadri mountains. This is near Bhandardara near Pune. The Amruteshwar temple at the base is also very beautiful.

In the month of April, visited fort of Tung which stands tall, now by backwaters of Pavana dam. This fort has been immortalized by Go Ni Dandekar’s novel Pavanakathcha Dhondi(पवनाकाठचा धोंडी). I also have in my collection the audio book of this novel, which I listen to many times. I also happened to trace the trails on the hills in and around Pune. This has been long dream of mine. I started from Chaturshringi Temple hill and trailed all the way to Chandani Chowk via Vetal hill. i have written about hills of Pune in another blog.

After some break on trekking for few months, my next trekking opportunity came in the rains, in month of September, when I visited fort of Kamalgad near, historic and heritage laden town of Wai about which I have written here. As the country reaches end of monsoon, the top of the hills and forts turn in to literally valley of flowers. And Kamalgad was no exception. One can get a majestic view of Dhom dam from the top of the fort.

The winter season is best for trekking, and I did not miss, with four treks in the space of October, November and December months of the winter. First, during my vacation to Mumbai, we trekked to fort of Malanggad(or Haji Malang).

Haji Malang

Fort Malanggad

The fort vista from far is majestic due to its several cliffs. But the fort top is not so pretty sight due to constant rush of crowd due to pilgrimage place. Later in the winter, I made a yet another trip to twin forts of Lohagad and Visapur, which is so near to Pune on the way to Mumbai. Next month, visited fort called Chawand or Prasannagad near town of Junnar in Pune district. This is famous for its array of water storage tanks on the fort which are still in good condition. One can get a view Manikdoh dam backwaters from the top of the fort. We also were able to visit nearby Kukadeshwar temple, which is ancient temple built in stone.

Later I also visited highest peak in Maharashtra which is Kalasubai, again near fort Ratangad which I had visited earlier this year. My year ended with visit to Daman and Silvasa, erstwhile Portuguese colony, like Goa, towards north of Mumbai.

This was my Christmas vacation. During that trip, visited land forts by the creek of Daman Ganga river in the Arabian seas, called Nani and Moti Daman forts(literally means small and big Daman), which were built by Portuguese. There used to be a bridge over the creek between these forts which happened to be on the both banks of the creek, collapsed few months before our visit.

 

तळजाई टेकडीवरील जंगल

पुण्यातील टेकड्या

पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचे नाते खूप जवळचे  आहे. आपण पुणेकर याबाबतीत नक्कीच सुदैवी आहोत की पुण्याच्या चारही बाजूने टेकड्या आहेत, पुणे आणि आसपासच्या भागातून ३-४ नद्या वाहतात. खरे पहिले तर ह्या टेकड्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेच्या आजूबाजूच आहेत. अर्थात बंगळूरूसारखे तलावांचे जाळे पुण्याला नाही. मी सह्याद्रीत भटकणारा माणूस, पुण्यातील टेकड्यांवर आपल्यासारखाच मी देखील जात असतो अधून मधून. आणि ह्या टेकड्यांची परिस्थिती सध्या तितकीशी चांगली नाही. त्याबद्दल लिहावे म्हणून हा ब्लॉग.

मला वाटते मी जर सर्वप्रथम कोठल्या पुण्यातील टेकडीवर  गेलो असेन तर ती, नाही पर्वती नाही, तर ती आहे दुर्गादेवी टेकडी. हो, पर्वती नाही, कारण बऱ्याच पुणेकरांची पहिली आणि आवडती टेकडी म्हणजे पर्वती. दुर्गादेवी टेकडी ही निगडी भागातील ही टेकडी. मला वाटते मी दहावीत असताना, आमच्या शाळेतर्फे तेथे वनीकरणाचा कार्यक्रम होता. तेव्हा सर्वप्रथम गेलो होतो. आणि तेथे अजूनही नियमितपणे जात असतो, तिचे हिरवेगार रूप पाहून प्रत्येक वेळेला आम्ही मुलांनी लावलेली झाडे आठवतात. टेकडीवरून बऱ्याचदा मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील जा-ये करण्याऱ्या गाड्या दिसतात. दुर्गादेवीची मंदिर तेथे आहे, तसेच पायथ्याला एक मनोरंजन केंद्र-अप्पू-घर आहे.

पर्वतीवर तर कित्येक वेळेला गेलो आहे. त्याबद्दल विशेष काही नाही. ती अशी टेकडी आहे जी आपल्याला पुण्यातून फिरताना कायम दिसत राहते. पेशवेकालीन मंदिर आहे, संग्रहालय आहे. पावसाळ्यात हिरवीगार, तर उन्हाळ्यात काळी ठिक्कर दिसते. बाहेरगावावरून पुण्यात आलेल्या पाहुण्यांना पर्वती पाहायची असते, इतकी तिची महती पसरली आहे. पण पर्वतीच्या बाजूला असलेली झोपडपट्टी तेथे नको असावी असे वाटत राहते.

तळजाई आणि वाघजाई ही टेकड्यांची जोडगोळी विस्तीर्ण, हिरवी वनराई असलेली आहे. काही वर्षापूर्वी वनविभागाने पर्वती पाचगाव वनउद्यान तेथे विकासीत केले आहे, त्यामुळे तेथे फिरायला छान वाटते. तेथे भरपूर मोर देखील आहेत. एक-दोन वर्षात पुणे महापालिकेने तेथे रस्ते, आणि इतर चांगली कामे केली आहेत.कोथरूड परिसरात असलेली वेताळ टेकडी(वेताळबाबा मंदिरामुळे नाव), तेथे असलेल्या पायवाटांमुळे सकाळी फिरणाऱ्या लोकात प्रसिद्ध आहे. तेथे जुनी सध्या वापरात नसलेली खाण देखील आहे, तिचा उपयोग प्रस्तरारोहणाच्या तंत्राचा सराव करण्यासाठी बरेच जण करतात.चतु:शृंगी टेकडी सुद्धा बरीच प्रसिद्ध आहे, ती देवीच्या मंदिरामुळे. तेथे रोपवे होणार आहे असे ऐकतो आहे. काही वर्षांपूर्वी चतु:शृंगी ते चांदणी चौक असा पिटुकला ट्रेक केला होता. तो हनुमान टेकडी, वेताळ टेकडी असे करत करत चांदणी चौकात जातो. पावसाळ्यात अथवा दिवाळीत करण्यासारखा छानसा ट्रेक आहे. वेताळ टेकडीवर Automotive Research Association of India(ARAI) चे मोठेसे कार्यालय आहे. हनुमान टेकडी तर फर्गुसन कॉलेजच्या मागेच आहे. तेथेही बरीच लोकं जात असतात. मी एकदा मुद्दाम तेथे गेलो होतो, तेव्हा काही लोकं पाण्याच्या बाटल्या घेवून आले होते आणि रोपांना, झाडांना पाणी टाकत होते. ते पाहून नक्कीच बरे वाटले. पुण्यात बऱ्याच संस्था आहेत ज्या टेकड्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास हातभार लावत असतात.

कात्रजपरिसरातल्या टेकड्या तर पुण्याची शान आहेत. कात्रजचा घाट, तेथील तळे, कात्रज ते सिंहगड हा ट्रेक मस्तच. महामार्गाने साताऱ्याच्या दिशेने जर पुण्यात येवू लागलो तर, कात्रज घाटातून पुण्याच्या असा काही नजरा दिसतो की त्याला तोड नाही. प्रत्येक वेळेला पुण्यातील concrete jungle वाढवलेले दिसते.  पुण्यात बाणेर भागातील टेकडी देखील विस्तीर्ण आहे, त्याच्या मागे असलेली पाषणची टेकडी, बिबवेबाडी भागात गुलटेकडी आहे, पण ती गुल झालेली आहे की काय कळत नाही, मी तरी अजून तेथे गेलो नाही. पण त्याच भागात आणखी एक टेकडी आहे, त्याच्यावर समारंभासाठी असणारे पार्टी हॉल आहे, तेथे गेलो होतो एकदा. पुण्यात अजून काही अश्या टेकड्या आहेत ज्या तितक्याशा माहीत नसलेल्या आहेत. हिंजवडीभागातील म्हातोबा टेकडी, येरवडा भागातील तारकेश्वर टेकडी, तसेच दिघी परिसरातील दोन टेकड्यांची जोडी. मी काही वर्षापूर्वी म्हातोबा टेकडीवर गेलो होतो. तेथे म्हातोबाची जत्रा आणि उत्सव जोरदार साजरा होतो. येरवड्यातील तारकेश्वर टेकडीवर देखील गेलो होतो, तेथेतर काही वर्षापर्यंत वाहतूक विभागाचे मोटार चालक चाचणी केंद्र होते. हडपसर भागात तुफान झोपडपट्टी असलेली राम टेकडी आहे, तेथे तर मी जाण्याचा धीरच करू शकलो नाहीये. खडकीभागातील रेंज हिल्स(Range Hills) ह्याला तसे का नाव पडले ते समजत नाही, कारण तेथे कुठलीही  टेकडीच नाही. वर म्हटल्याप्रमाणे, निगडी भागातील दुर्गादेवी टेकडीचा पलीकडे, देहूचा जवळ, भंडारा डोंगर आहे, तशी ती टेकडीच आहे. भंडारा डोंगर तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. बाणेर भागातील बाणेर टेकडी, आणि तेथून पुढे पाषाणच्या दिशेने जाणारी टेकड्यांची रांग देखील आता ऐन मध्यवर्ती भागात आली आहे. पाषाण टेकडी वर पाषाण-सुस रस्त्यावरून देखील चढता येते. मी ह्या दोन्ही टेकड्यांवर नेहमी जात असतो.

तर अश्या ह्या पुण्यातल्या आणि आसपासच्या टेकड्या, पुण्याची शान असलेल्या. पावसाळ्यात तर त्यांचा नजरा आणखी खुलतो. विविध प्रकारची पक्षी, प्राणी सृष्टी, वनस्पतीसृष्टी(bio-diversity) तेथे नांदते आहे. पण ह्या टेकड्यांना गेल्या काही वर्षात दृष्ट लागली आहे. टेकड्यांवर प्रचंड प्रमाणात मानवी हस्तक्षेप, तसेच त्याच्या आसपास, अंगाखांद्यावरून बांधकामे होवून, दगडासाठी त्या बेफामपणे फोडून, त्यांचे लचके तोडले जात आहेत. ह्या टेकड्या म्हणजे पुण्याची प्राणवायूचे कारखाने आहेत. टेकड्यांना टेकड्याच राहु देत, तेथे जर मानवी हस्तक्षेप प्रमाणाबाहेर गेला तर अनर्थ होईल. नुकताच, म्हणजे, फेब्रुवारीमध्ये आपण World Heritage Week साजरा केला. ह्या टेकड्या पुण्याची वारसा स्थळेच आहेत, त्यांचे जतन केलेच पाहिजे. माझ्या घराच्या बागेत कांचनाचे झाड आहे, त्याच्या बिया मी गोळा केल्या आहेत, गेल्या १-२ वर्षामध्ये, त्या मी येत्या पावसाळ्यात ह्या टेकड्यांवर जाऊन विखुरणार आहे. तेवढाच छोटासा खारीचा वाटा. पुण्यातील ग्रीनहिल्स(GreeHills) या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संथेने पुण्यातील टेकड्यांच्या संवर्धनावर एक documentary बनवली आहे, ते येथे देऊन हा प्रपंच आता थांबवतो.

गो नी दांडेकर: आशक मस्त फकीर

प्रसिद्ध साहित्यिक गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे, त्यानिमित्ताने पुणे आकाशवाणीत एक कार्यक्रम झाला आणि माझ्या काही आठवणींना उजाळा मिळाला.

गो नी दांडेकर हे खरे तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. गड-किल्ले, इतिहास हा तर त्यांचा आवडीचा विषय होताच. त्यांनी केलेली भटकंती, आणि त्यावर त्यांनी लिहून ठेवलेले आजही आम्हा भटक्या लोकांना उपयुक्त आहे. त्यांनी थोडी थोडकी नव्हे तर ९७ पुस्तके लिहिली. त्यांची काही पुस्तके मी वाचली आहेत, आणि ती अतिशय खिळवून ठेवणारी होती. उदाहरणार्थ, पवनाकाठचा धोंडी, पडघवली, माचीवरला बुधा, कोणा एकाची भ्रमणगाथा, स्मरणगाथा, रानभुली, महाराष्ट्र दर्शन, तसेच किल्ल्यांवरील त्यांची कित्येक पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत. उदा. दुर्गभ्रमणगाथा, दहा दिवस दहा दुर्ग इत्यादी.  दुर्ग-साहित्य हा प्रकार त्यांनीच सुरु केला असे म्हटले जाते. महाराष्ट्र दर्शन हे पुस्तक तर मला वाटते महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाबद्दलचे अत्र्यांच्या गावगाडा नंतरचे महत्वाचे पुस्तक आहे.

20160224_051633

त्यांना अनेक छंद होते. नाणी गोळा करणे, इतिहासातील पुराणवस्तू गोळा करणे, छायाचित्रण, अत्तरे गोळा करणे इत्यादी. मध्ये केव्हातरी पुणे आकाशवाणीवर उष:प्रभा पागे यांनी घेतलेली त्यांची एक जुनी मुलाखत प्रसारित झाली होती. त्यातही ते त्यांच्या छंदांविषयी भरभरून बोलले होते. त्यांनी गोळा केलेल्या ह्या सर्व वस्तूंचे संग्रहालय आहे का काय ते शोधायाला पाहिजे. गड-किल्ले पाहणे, आणि ते इतरांना दाखवणे, त्या बद्दल बोलणे हे तर त्यांना खूप आवडे.

गेल्या वर्षी मी जेव्हा सिमला मनाली भागात गेलो होतो, तेव्हा, भाक्रा नांगल धरण आणि  तो परिसर वाटेत लागला, तेव्हा त्यांच्या त्या विषयावरील आम्ही भगीरथाचे पुत्र कादंबरीची आठवण झाली. पवन मावळातील तुंग तिकोना परिसरात फिरताना हटकून पवना नदीकाठच्या त्या धोंड्याची आठवण होते. वीणा देव आणि विजय देव हे त्यांच्या काही पुस्तकांचे अभिवाचन करतात. त्याच्या त्यांनी ध्वनीमुद्रिका देखील बनवल्या आहेत. त्याही ऐकायला मजा येते. कर्नाळ्याच्या परिसरात गेले की त्यांच्या जैत रे जैत पुस्तकाची आणि चित्रपटाची आठवण येतेच. त्या त्या भागातातील त्या त्या व्यक्तीरेखा त्यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांचे नाट्यरुपांतर देखील झाले आहे आणि ती नाटके देखील बरीच प्रसिद्ध झाली आहेत.

वीणा देव यांच्या स्मरणे गोनीदांची या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, ते पुण्यातून तळेगाव येथे राहायला आले. त्यावेळी गांधीवधाच्या धामधुमीनंतर त्यांनी तो निर्णय घेतला. त्यावेळचे तळेगाव, अतिशय निसर्गरम्यच असणार. मी जेव्हा २०-२५ वर्षापूर्वी तेथे जायचो, तेव्हाच ते ठिकाण छान वाटे.  तळेगाव येथून मावळातील किल्ले आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळ असल्यामुळे, त्यांच्या दुर्गभ्रमंतीच्या छंदाला अगदी ते सोयीचे होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने, तळेगावात त्यांचे एखादे स्मारक व्हायला हवे. काही वर्षापासून गोनीदांच्या स्मरणार्थ दुर्ग साहित्य संमेलन भरते आहे, ते नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यांचा नावाची वेबसाईट आहे, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर त्यांच्या काही कार्यक्रमांचे footage देखील आहे, ते सुद्धा उपलब्ध व्हयला हवे. कार्यक्रमात त्यांनी गाडगे महाराज यांच्या हुबेहूब आवाजात केलेल्या कीर्तनाचे दुर्मिळ रेकॉर्डिंग ऐकवले गेले.

पुणे आकाशवाणी मध्ये काल झालेल्या कार्यक्रमाचे शीर्षक होते, गो नी दांडेकर-आशक मस्त फकीर. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसेच होते असेच म्हणावे लागेल.