माझा पुत्र गुरुदत्त: भाग#२

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१).

आज दुसरा भाग देत आहे. मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#२

१९३६ मध्ये सिद्धनाथ पंत नावाचे एक हिंदी भाषेचे शिक्षक बंगळूरूस आले. ते घरोघरी जाऊन हिंदी भाषेचा प्रसाराचे काम करत. मला लिहा-वाचायचे वेड होतेच. मी, तसेचआणखीन काही जण मिळून त्यांच्याकडून हिंदी शिकू लागलो. पंत हिंदी शिकवण्याचे काही पैसे घेत नसत. हे असे मोफत शिक्षण नको असे म्हणत, माझ्या यजमानांनी आक्षेप घेतला. त्यांचा संशयी स्वभाव मला माहित होता. असे असले तरी काही काही बाबतीत मी त्यांचे ऐकत नसे. हिंदी प्रवेश परीक्षेत मी अखिल कर्नाटकातून पहिली आले. त्यावर्षी महात्मा गांधी यांच्या हस्ते  मद्रास मध्ये  पारितोषिक  वितरण होणार होते. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमासाठी म्हणून असलेल्या मंडप छान सजवले गेले होते. किती  तरी लोकं आले होते. हे असे सगळे वातावरण पाहून मला खूप आनंद झाला होता. ते मद्रास शहरातील पहिला हिंदी पारितोषिक वितरण समारंभ असल्या कारणाने कॉंग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आले होते. त्या समारंभात मला गांधीजींच्या हस्ते पारितोषिक मिळाले त्यामुळे माझ्या मनात त्यांच्या प्रती श्रद्धा, भक्ती, आणि देशासाठी काही तरी करण्याच्या माझ्या मनात येऊ लागले.

एक दोन महिन्यातच गांधीजी यांचे स्वास्थ्य बिघडल्याने हवा पालटासाठी बंगळूरूस आगमन झाले (माझे यजमान १९२० च्या असहकार चळवळीत गेले  होते). मी आणि गुरुदत्त त्यावेळेस फक्त खादीचे कपडे परिधान करत असू. मी चरखा देखील चालवत असे. मी गुरुदत्तला घेऊन गांधीजींच्या सायंकालीन प्रार्थनेला जात असे. त्यावेळेस कस्तुरबा, राजगोपालाचारी यांची मुलगी लक्ष्मी(हिच्याबरोबर माझा बरीच वर्षे पत्र-व्यवहार सुरु होता. तिचा देवदास गांधी यांच्या बरोबर विवाह झाला आणि आमची पत्र-मैत्री कमी कमी होत गेली). महादेव देसाई, मणीबेन पटेल, मदनमोहन मालवीय यासारख्या महनीय व्यक्तींशी माझी ओळख झाली होती. प्रार्थनेच्या वेळेस विविध लोकांची भजने होत. मी त्या वेळेस कन्नड दासपदं, श्री अप्पय्या यांची कन्नड गीतं गात असे. सर्वाना ती आवडत असत. अप्पय्या यांच्या गीतांत संस्कृत शब्द बरेच असत आणि अद्वैत तत्वज्ञानपर असत, त्यामुळे पंडितजी(मालवीय) मला जवळ बोलावून ती गाणी म्हणायला लावत. माझा देखील त्यामुळे संकोच मावळत असे आणि मुक्तकंठाने न भिता मी गात असे. या  सर्वांचा  गुरुदत्तच्या बालमनावर नक्कीच काहीतरी परिणाम झाला असणार. एकाग्र चित्ताने तो माझे गाणे, अगदी डोळे मिटून ऐकत असे, त्यामुळे सगळे त्याचे कौतुक करत असत. कोवळ्या मनावर होणारे असे संस्कार पुढे आयुष्यात उपयोगी पडतात. मला गांधीजींच्या आश्रमात जावेसे वाटू लागले. प्रार्थना संपल्यावर आम्ही गांधीजींबरोबर आश्रमात जात असू. पूज्य ‘बा’ त्यांच्या माथ्याला तेल लावीत. मणीबेन त्यांच्या पायाला तेल चोळत. गांधीजी लहानग्या गुरुदत्तला जवळ बोलावून त्याच्याशी बोलत. त्याच्या हातात खडीसाखरेचा खडा ठेवत, डोक्यावर हात ठेवत त्याला आशीर्वाद देत असत. एखाद्या वेळेस गुरुदत्त जर बरोबर नसला तर, त्याची ते विचारपूस करत असत. मी घाबरत घाबरत त्यांच्या कडे आश्रमात प्रवेश करण्यासंबंधी विषय काढला. माझ्या कडे पहिले आणि हसले, आणि म्हणाले होईल होईल, असे म्हणत पुढे काही बोलले नाही. मी पुढे नंतर विचारले नाही.

आमच्या गुरुदत्तचा दुसरा वाढदिवस आम्ही अतिशय जोरात साजरा केला. त्याने त्याचा प्रिय असा लाल शर्ट घालून अंगावर दागिने देखील परिधान करून, आमच्या घरमालकांच्या पाया पडायला त्यांच्या कडे गेला. त्यांनी त्याला बसवून त्याला ओवाळले म्हणे. तेथून आमच्या घरी येताना झाकून ठेवलेल्या छोट्या विहिरीजवळ तो पडला आणि तो जोरात मला हाक मारू लागला. ते ऐकून मी बाहेर पळत आले. त्याच्या कपाळाला लागले होते, रक्त वाहत होते. त्याला उचलून पटकन डॉक्टरकडे घेऊन गेले आणि उपचार करवून आणले. पण हे सर्व असे झाल्यामुळे माझ्या मनाला चुटपूट लागली. रात्री त्याला अंगात ताप देखील चढला. माझा एका वृद्ध वैद्यावर विश्वास होता. पूर्वी मी जेव्हा खूप आजारी होते, तेव्हा त्यांनीच मला औषध देऊन बरे केले होते. त्यांनाच बोलावले. नाडी पाहून त्यांनी औषध दिले. पण आठवडा होऊन गेला पण गुरुदत्तला विशेष बरे वाटत नव्हते. रात्री तो बडबडत उठे, घाबरून ओरडत उठत असे. दहा दिवसांत त्याची प्रकृती खालावली.

माझ्या मामेभाऊ डॉक्टर होता. तो गुरुदत्तवर अतिशय प्रेम करत असे. माझ्या यजमानांच्या मनात त्याच्या बद्दल का कोणास ठाऊक पण रोष होता. त्याला बोलावणे पाठवायला मागे पुढे पाहू लागले. एके दिवशी तर गुरुदत्तचे हात पाय गार पडले, आखडून सुद्धा गेले. त्याच्या डोळे देखील आत गेले. आईने रडायला सुरुवात केली. मी कोणाला काही न सांगता मामेभावाकडे गेले, त्याला सगळी परिस्थिती सांगितली. सगळे ऐकून, तो म्हणाला, ‘अश्या स्थितीत मी जवाबदारी घेणार नाही’. मी त्याच्या हाता-पाया पाडून म्हटले कि एकदा त्याला बघून तरी जा. त्याने थोडा विचार केला, आणि कसे काय पण त्याचे मन बदलले आणि तो माझ्याबरोबर यायला तयार झाला. घरी आल्यावर गुरुदत्तला नीट तपासले. गरम पाण्याची बाटली जवळ ठेवायला सांगितली आणि माझ्या समाधानासाठी म्हणून करड्या रंगाच्या गोळ्या त्याला दिल्या, आणि त्याला वारंवार गरम पाणी पाजत राहा असे सांगितले, आणि म्हणाला, ‘वासंती, तुझे नशिब चांगले असेल तर हा ‘गुंटी'(गुरुदत्त) ह्यातून बचावेल, रात्रभर ह्याच्यावर नजर ठेव. सकाळी परत येऊन पाहतो’. नंतर तो निघून गेला.

आम्ही घरातल्यानी मिळून गुरुदत्तवर रात्रभर नजर ठेवली. मला तर गुरुदत्तचे ते मोठे  झालेले डोळे पाहायला धीरच होत नव्हता. मी देवासमोर रात्रभर बसले होते. शेवटी पहाटे कधीतरी डोळे आत घेऊन बोलला, ‘आई, मला पाणी दे’. मी धडपडून उठले. पण मला एवढा आनंद झाला नाही. त्याच सुमारास, गल्लीतून कोणीतरी गाणे म्हणण्याचा आवाज येत होता:

जागी सर्वसुखी असा कोण आहे|
विचारी मना, तुही शोधूनी पाहे|

हा श्लोक अगदी टाळ वाजवत तो म्हणत चालल्याचे ऐकू येत होते.

हा श्लोक, तो आवाज ऐकून मला माझ्या बालपणीच्या वडिलांबरोबर जो काही अल्पस्वल्प राहता आहेल त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचा स्नेह, विशुद्ध प्रेम, ममता हि माझी अंगरक्षक आहेत अशी माझी भावना आहे. त्यांच्या आठवणी म्हणून त्यांनी मला दोन ग्रंथ पाठवले होती- परमार्थ साधन आणि मनाचे श्लोक हि ती पुस्तके, जी मला खूप आवडतात. जेव्हा काही संकट आले कि मी ह्या दोन ग्रंथांची आठवण काढते.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले, त्यांनी गुरुदत्तला तपासून, आता ठीक आहे, पण त्याचे यकृत बिघडले आहे असे सांगितले. आयुर्वेद औषधे ह्या कारणीभूत असावीत असे त्यांना वाटले. अजून एक महिनाभर वेगळे उपचार करायला हवेत असेही म्हणाले.

गुरुदत्त वाचला होता. पण मला गांधीजीच्या भेटीसाठी आजारपणामुळे जमले नाही. मी त्यांना माझ्या तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत एक पत्र लिहिले. त्याचे त्यांनी उत्तर मला पाठवले:

“प्रिय वासंती,

आश्रमात तुला येत आले नाही म्हणून वाईट वाटू नको. परमात्म्यावर श्रद्धा, भक्ती ठेवून मुलाला सांभाळ. त्याचे मानसिक, शारीरिक उन्नती करण्याचे कर्तव्य तुझे आहे. पती आणि मातेची सेवा करत राहा. जेवढे शक्य होईल तेवढी देशसेवा कर.

इति,

मोहन करमचंद गांधी
१०-१०-१९२६”

हे अमुल्य पत्र मी अतिशय जपून ठेवले होते. १९५२ मध्ये ते का कसे पण हरवले. जगप्रसिद्ध अश्या गांधीजीनी माझ्या सारख्या सामान्य स्त्रीला पत्र लिहिले होते हे सांगितले कि कोणी विश्वास ठेवणार नाही. पुरावा म्हणून जे पत्र होते, ते हातातून हरवून गेले आणि माझे तोंड बंद झाले. मी तो विचारच सोडून दिला. असो. पुढे काही दिवसातच गांधीजी बंगळूरूहून परत गेले.

गुरुदत्तला बरे वाटू लागल्यावर मी आणि आणि माझी आई, तसेच अर्थात गुरुदत्तला घेऊन कलकत्त्याला आले. माझ्या यजमानांनी बंगळूरूमधील नोकरी सोडून मंगळूरूला गेले. गुरुदत्तला सोडून जाताना त्यांना खूप दुःख झाला. मी त्यावेळी जे बंगळूरू सोडून गेले, ते परत बंगळूरूला आलेच नाही.

कलकत्त्यास माझा भाऊ, माझी वाहिनी, आणि माझा अजून एक चित्रकार भाऊ असे सर्व होते, त्यांनी आमचे छान आगतस्वागत केले. सगळ्या कुटुंबात गुरुदत्त एकटाच लहान मुलगा होता. त्यामुळे सगळ्यांना अतिशय प्रिय होता. त्याचे मस्ती करणे, बोबडे बोलणे सगळ्यांना खूप भावत असे.

माझे भाऊ धार्मिक होते, सोवळे वगैरे नेसून ते पूजा करत. गुरुदत्त त्यांच्या जवळ बसून त्यांची पूजा करणे, सर्व विधी निरखत असे. सारखे प्रश्न विचारून त्यांना हैराण करत असे. कधी कधी सोवळ्यात असलेल्या त्यांना शिवत असे. तरी ते त्याच्यावर कधी रागवत नसत. हसत हसत ते पूजा करत आणि संपल्यानंतर त्याच्या हातावर तीर्थप्रसाद ठेवत. घराच्या अंगणात एक कुत्र्याचे पिल्लू आणि एक मांजर होते. त्यांना खायला प्यायला द्यायचे, आणि त्यांच्यात काहीतरी कारणाने भांडण लाऊन ते पाहत बसायचे हा गुरुदत्तचा आवडता उद्योग. त्याचे मित्र त्याच्या पेक्षा वयाने मोठेच होते. त्यांच्याकडून भोवरा फिरवायला शिकला. आपल्या तळहातावर भोवरा फिरवून तो आम्हाला दाखवत असे. गोट्या खेळण्यात तर त्याने कौशल्य मिळवले होते.

माझा भाऊ वेळ मिळेल तसे, आम्हाला कलकत्यातील प्रसिद्ध ठिकाणे दाखवायला घोडागाडी मधून नेत असे. एकदा तेथील मदन नाट्यगृहात मिस कज्जन(कज्जनबाई) हिचे नाटक लागले होते. ते पाहायला आम्ही सगळे गेलो होतो. माझ्या शेजारी दोन तरुण मुले बसली होती. गुरुदत्त बरोबर ते बोलू लागले. मध्यंतरात ते गुरुदत्तला बाहेर घेऊन गेले. नाटक परत सुरु झाले तरी ते आले नाही. माझी भीतीने गाळण उडाली. माझा भाऊ माझ्यावर डाफरला. आधीच मी घाबरट, त्यातच भावाने रागावले होते. माझी नजर नाटकाच्या रंगमंचाकडे न लागता नाट्यगृहाच्या दरवाजाकडे लागली होती. आतल्या आत मी देवाचा धावा करत होते. नंतर कितीतरी वेळाने ती मुले आली आणि गुरुदत्तला माझ्या हवाली केले आणि माझा जीव भांड्यात पडला. पाहते तर काय, गुरुदत्तच्या हातात चॉकलेट आणि बिस्कीट, आणि गुरुदत्तच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

आम्ही कलकत्याला येऊन आता जवळपास एक महिना होऊन गेला होता. माझ्या यजमानांकडून परत येण्याबद्दल निरोप आला होता. एवढे दिवस कुठलीही चिंता नव्हती, नातेवाईकांकडे अगदी आरामात राहत होते. पुढे त्यांची तार देखील आली. मला एकटीला पाठवायला माझा भाऊ तयार होत नव्हता. तीन दिवस, एक रात्र असा प्रवास होता तो. आईने माझ्याबरोबर यायला नकार दिला, मीही जास्ती मागे लागले नाही. कारण माझे यजमान आणि माझी आई यांचे संबंध सुरळीत नव्हते. कायम काहीबाही कुरबुरी असत, त्या दोघांत मी सापडायचे.

शेवटी नात्यातल्या एका बरोबर मी आणि गुरुदत्त परत निघालो. त्या वर्षी मद्रास मध्ये काँग्रेसचे अधिवेशन होते. माझ्या मावशीच्या मुलगा , त्याची बायको, आणि तीन मुलांसह हैदाराबादेहून तेथे आले होते असे मी ऐकले होते. त्यांना मी शोधले आणि त्यांच्या कडे गेले. चार दिवस तिथे राहिले. गुरुदत्तला त्यांच्या तीन मुलांची सोबत मिळाली. काँग्रेस पक्षाच्या अनेक धुरिणांना मी तिथे जवळून पाहिले. पण महात्मा गांधींना मात्र लांबून पाहण्यात समाधान मानावे लागले. त्यांच्याशी बोलण्याचे तर शक्यच नव्हते. अजून काही दिवस तिथे राहावे असे मला वाटत होते. पण यजमान देखील घरी बोलावत होते. पती कसाही असला तरी, तोंड बंड करून त्याच्या आज्ञेत राहण्याचा तो काळ होता. त्यांच्याशी आपणहून बोलण्याचे, मनातील सांगायचे माझ्यात तरी धैर्य नव्हते.

मी कासरगोड येथे पोहचल्यावर मला माझ्या वाहिनीकडून ह्यांची नोकरी गेल्याचे समजले. मला धक्काच बसला. आता मी कोठे जावे, काय करावे? संध्याकाळी हे बंगळूरूहून कासरगोडला आले. नवीन नोकरी मिळेपर्यंत वाहिनीकडे राहावे असे ठरले, आणि ते काही दिवस राहून मग मंगळुरूला गेले. त्यावेळी तेथे राष्ट्रबंधू नावाचे साप्ताहिक तेथून निघत असे. कंडूगोडलु शंकर भट्ट हे त्याचे संपादक होते. त्यात प्रुफरीडर म्हणून काम मिळाले. माझ्या दिरांच्या मुलाच्या घरी बिऱ्हाड केले. नंतर राष्ट्रबंधू मध्ये मी लिहूपण लागले. पूर्वी बंगळूरूमध्ये असताना सरस्वती मासिकात(सं. डी. कल्याणम्मा) माझी एक कथा वरदक्षिणा आली होती. त्यामुळे राष्ट्रबंधू  मध्ये मला लिहायला मिळाले. राष्ट्रबंधू मध्ये मी अधून मधून लिहित राहिले. नंतर इकडे तिकडे प्रवास करावा लागला त्यामुळे हे लिहिणे थांबले. माझ्या नणंदेच्या मुलाकडे चार महिने राहायला जागा मिळाली. त्यांची पत्नी आजारी असल्या कारणाने माहेरी गेली होती. त्यांचे घर हे ‘शंकर विठ्ठल मोटार कंपनी’ समोरच होते. माझ्या दिराचा नातू प्रभाकर गुरुदत्तपेक्षा मोठा. तरीसुद्धा तो गुरुदत्त बरोबर कधी कधी खेळत असे. त्याला येणारी इंग्रजी नर्सरी ऱ्हायीम्स तो गुरुदत्तला शिकवत असे; गोष्टीपण सांगत असे. गुरुदत्त त्याच्या मनासारखे करत असे. त्याच्या पुस्तकातील चित्रे तो पाहत असे, प्रश्न विचारत असे. काहीतरी भांडण निघाले तर प्रभाकर गुरुदत्तला मारायला मागेपुढे पाहत नसे.

आमच्या घरा समोर असलेल्या मोटार कंपनीत गुरुदत्त ये जा करत असे. तेथील लोकांबरोबर त्याची ओळख वाढली. दिवसभर तेथे तो असे. मोटार दुरुस्तीचे काम तो मन लावून पाहत असे. त्यांना काम करता करता मध्येच काही तरी हवे असेल तर तो ते आणून देत असत. कधी कधी तो त्यांच्याबरोबर मोटार गाडीतून बाहेरही जात असे. सगळ्यांना गुरुदत्त हवा असे. तो कुठेही असला तरी संध्याकाळी सातच्या घरी हवा असे मी त्याला बजावत असे. तो ही तसा परत येत असे किंवा कोणी तरी त्याला परत आणून सोडत असे. घरी आल्यावर तो हातपाय धुवून, कपडे बदलून, देवासमोर नमस्कार करून, मी शिकवलेले स्तोत्र म्हणत असे. तो नुकताच लिहायला वाचायला शिकला होता. बंगळूरूला येई पर्यंत माझी आईच त्याला हवे नको ते पाहत असे. इथे आल्यावर मी ते पाहत असे. सुरुवातीला मला थोडा वेळ लागला, पण मी पण  त्याचे नीट करू लागले, त्यानेही सांभाळून घेतले.

माझ्या दिराचा मुलगा एल ओ सी एस कॉलेज मध्ये इंग्रजी भाषेचा प्राध्यापक होता. त्याला शास्त्रीय संगीतात रुची होती. मला देखील संगीतात रुची होती. पण मी शास्त्रीय संगीत असे काही शिकले नव्हते. तो शिकला होता. मी त्यांच्या कडून बरेच काही शिकले. प्रसिद्ध आंग्ल लेखकांचा त्याने मला परिचय करून दिला, माझ्यात साहित्याची रूची निर्माण केली. या सर्वांमुळे आमच्यात आपुलकी निर्माण झाली, पण ते माझ्या यजमानांना सहन होत नव्हते. तरीपण ते चार महिने कसे गेले हे समजले नाही. परत घर बदलताना, नको नको वाट होते. ते सोडून गेल्यावर आम्हाला जेलसमोर एक घर मिळाले. गुरुदत्तला तेथे कोणी सवंगडी नव्हते.  शेजारचे  कुटुंब प्रेमळ होते. 
त्यांच्या कडे जाऊन मीच त्यांची ओळख करून घेतली. ते सोन्या, चांदीचे दागिने करत असताना तो पाहता बसे, मध्ये मध्ये त्यांना प्रश्न विचारत असे, संधी मिळेल तशी ते करतील तसे करायचा तो प्रयत्न करत असे. हे सर्व त्याच्या जवळ असलेले अपार कुतूहल होते म्हणून तो करत असे. एकदा शेजारच्या घरात एक वृद्ध स्त्री मरण पावली होती. तेथे जाऊ नको असे कितीही सांगितले तरी तो माझा डोळा चुकवून तेथे गेला, सगळे विधी पहिले. मला भीतीच वाटली होती. पण त्याला त्याबद्दल विशेष असे काही वाटले नाही. घरी आल्यावर माझ्यासमोर ते सर्व विधी साभिनय करून दाखवायला लागला. माझे जीवन आधीच एकाकी होते, जीवनातील एकूणच रस निघून गेला होता. त्यात हे असे त्याचे मृत्यूविषयी असे वागणे बोलणे ऐकणे नको वाटत होते. तो ते सर्व विसरावे म्हणून त्याला मी दूरवर फिरायला घेऊन जाऊन लागले. तेथे त्याची वेगळीच तऱ्हा. रस्त्यावरील प्रत्येक गोष्टीबद्दल विचारत असे, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे माझ्या जीवावर येत असे. मला जेवढी माहिती असेल तेवढे मी सांगत असे, पण त्याचे समाधान होत नसे. त्यावर आणखीन प्रश्न विचारात असे, आणि मग मी त्याला रागावणे थांबत असे. त्या प्रश्नोत्तरात बाल बुद्धीचा गुरुदत्त विजयी होत असे. त्या जेलजवळील रस्त्यावर पोलीस चोरांना पकडून घेऊन येत असत, त्यांची मारझोड करत असत, तेव्हा आरडाओरडा होता असे. गुरुदत्त हे सर्व होताना पाहत नसे, डोळ्यांवर हात ठेऊन डोळे बंद करून घेई, कान बंद करून घेई, आणि म्हणे ‘किती दुष्ट आहेत हे पोलीस!, आणि रडत असे. बऱ्याचदा पहाटे पहाटे कैद्याची फाशीची शिक्षा बजावली जात असे, तेव्हा त्या येणाऱ्या किंकाळ्या आम्हाला ऐकू येत असत, आणि त्या आम्हाला असह्य होत असत. बिचारा गुरुदत्त ते ऐकून अस्वस्थ होत असे. ह्याच घरात आम्ही असताना त्याचा एक वाढदिवस साजरा झाला.

माझे वडील मला कधीतरी पत्र पाठवत. पत्रात ते लिहित, ‘माझी तब्येत सध्या ठीक नसते. पण तू घाबरू नकोस. देव आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. गुरुदत्तची नीट काळजी घे. त्याच्यत सद्गुण येतील असे पहा, त्याला प्रोत्साहन दे. चुकीच्या मार्गावर त्याला जाऊ देऊ नकोस. तुमची परिस्थिती काय आहे, हे मला माहित आहे. तुम्हाला सर्वाना इथूनच आशीर्वाद देतो’ काही दिवसातच ते हृदयरोगाने गेल्याचे समजले. शेवटच्या क्षणी त्यांच्या जवळ त्यांची पत्नी(माझी आई)आणि मुले यांपैकी कोणी नव्हते. जे जे हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले असे कळले. ही बातमी ऐकून मला अतीव दुःख झाले. माझा जन्म बर्मा मध्ये झाला होता. तीन वर्षात माझ्या भावाचा जन्म झाला होता. त्यांमुळे माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले होते. मला माझी आई आवडत नसे, सदा सर्वदा रागावलेली असे, काही तरी काढून ती भांडत असे, माझ्या वडिलांनी केले माझे लाड तिला रुचत नसत. माझे वडील अतिशय समजूतदार आणि प्रेमळ होते. बहुतेक देवाला हे सर्व आवडले नसावे, मी सहा वर्षांची होते तेव्हा ते मला सोडून मुंबईला निघून गेले. तीन वर्षे मला ते भेटले नाहीत. मी त्यांना समजू शकले नाही. त्यांच्या मध्ये देवासारखे  मन होते. त्यामुळे हे असे अचानकपणे ते गेल्याचे समजल्यामुळे मला किती यातना झाल्या असतील, विचार करा! आणि त्यांचे वय देखील खूप नव्हते, फक्त त्रेप्पन.

गुरुदत्तच्या मनात त्याच्या आजोबांची आठवणी कश्या असतील? सहा महिन्यांचा असताना त्याने त्यांना पाहिले होते. मी त्याला नेहमी त्यांच्या बद्दल सांगत असे. मी सांगितलेले तरी त्याला आठवत असणार. आजकाल गुरुदत्तला गोष्टी ऐकायचा नाद लागला होता. इसापनीतीच्या कथा, मंजी मंगेशराय यांची ‘इलीगळ थकथई’ अश्या गोष्टी शोधून आणून मी त्याला सांगत असे. त्याला गोष्ट पूर्ण ऐकल्याशिवाय झोप येत नसे. माझी सहनशक्ती कधी कधी संपत असे, तेव्हा तो माझ्या हातचा मार खात असे. अभ्यास करतना देखील, नीट समजावून सांगितले तर लक्ष देऊन ऐके, पण मी जर रागवत, चिडत, मारत शिकवले तर तो देखील हट्टी होई. जेवण खाण सोडून एका कोपऱ्यात जाऊन रुसून बसे. त्यावेळी चेहरा पाहून माझे मन विरघळत असे.

ह्यांची नोकरी परत एकदा गेली. मी सहा महिन्यांची गर्भार होते. आता कसे होणार? शेवटी मी माझ्या अहमदाबाद येथे असलेल्या माझ्या भावाला पत्र लिहिले. त्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. माझ्या मावशीने माझ्या भावाला दत्तक घेतले होते. तिच्या नवऱ्याला वेडाचे झटके येत असत. तिलाही बरे नसायचे. घरातील समान एकाकडे ठेऊन आम्ही अहमदाबादला जायला निघालो. आम्ही तीन जण होतो. बसने धारवाडला आलो. माझ्या मामाची मुलगी तेथे राहत असे. ती तशी श्रीमंत होती, तिचे पतींचे नाव देखील होते. माझे दिवस भरत आले होते. घरात नोकर-चाकर होते, मुले होती. त्यांनी आमचे चांगले स्वागत केले. त्यावेळी हुबळी मध्ये असलेल्या श्री सिद्धारूढ स्वामी यांच्या दर्शनाला बरेच लोकं येत असत. मी आणि गुरुदत्त देखील गेलो. स्वामीजी काही बोलत नसत, मौन असे. डोके हलवून, हुंकार देऊन ते संवाद साधत असत. गुरुदत्तला त्यांच्या पाया पडायला लावले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवाला, आणि त्याला उठवले, आणि त्याला पाहून हसले. तिथे जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. ते सहसा तसे करत नसत. त्यांच्या दर्शनाने मला समाधान वाटले.

आम्ही धारवाड मध्ये एक आठवडा राहिलो. नंतर आम्ही मुंबईला निघालो. माझ्या आत्याने मुंबईत खार येथे घर बांधले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो, आमचे चांगले स्वागत झाले तिथे. त्यांच्या मोठ्या मुलाचे माझ्या मोठ्या बहिणीबरोबर लग्न होणार होते, पण ती अकाली गेल्या मुळे ते झाले नाही. त्यांच्यात तसे खूप प्रेम जुळले होते. दुर्दैवाने एका महिन्यात ती, अजून एक थोरला भाऊ आणि दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ हे सर्व विषमज्वारामुळे अकाली निधन पावले. मला त्याने ग्रासले होते. हि घटना १९१६ सालची. मला मुंबईतील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. तीन महिन्यानंतर माझे अवयव, मेंदू चालू लागले, आणि मी कशीबशी त्यातून बचावले.

खार येथे गेल्यावर मला पाहून माझ्या दिरांना आनंद झाला. त्यांना माझ्या वारलेल्या बहिणीची, सुंदरीची, आठवण झाली. त्यांच्याकडे एक आठवडा राहून आम्ही सर्व अहमदाबादला गेलो. तिकडच्या घरातील वातावरण जरा त्रासाचे होते. माझे काका रात्री -अपरात्री ओरडायचे, भावाला मारायचे. सगळ्यांची झोपमोड होत असे. असेच पाच महिने कसे गेले समजले नाही. माझ्या यजमानांना हवी तशी नोकरी मिळाली नाही. गुरुदत्त संध्याकाळ झाली कि घाबराघुबरा होऊन इकडे जाऊ तिकडे जाऊ असे म्हणत असे. बाजूच्या खोलीत वैद्यकशास्त्र शिकणारी काही विद्यार्थी भाड्याने राहत असत. गुरुदत्तला त्यांचा आणि त्यांना गुरुदत्तचा लळा लागला होता. त्यांचे कॉलेज नसे तेव्हा ते त्याला घेऊन जात, आणि पतंग घेऊन देत, गोट्या, भोवरे देखील देत, फिरायला देखील घेऊन जात. तो बाहेर राहण्याविषयी माझी ना नव्हती, कारण घरातील विपरीत परिस्थिती. ती त्याच्या वर कशी परिणाम करेल हे सांगता येत नव्हते. तेवढ्यात माझ्या भावाने आम्हाला तेथून जायला बजावले. मी आठ महिन्यांची गर्भार होते. आता कुठे जायचे? हातात पैसा-अडका नव्हता. कपडेलत्ते देखील विशेष नव्हते. थोरले मंडळी जवळ कोणी नव्हती. शेवटी कलकत्त्याला जावे असा आम्ही विचार केला. शेजारच्या खोलीतील ती मुले गुरुदत्त बरोबर रेल्वे स्थानकावर देखील निरोप द्यायला आली होती. त्याच्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या, पुरीभाजी, बिस्किटे आणून दिली. तसेच माझ्या हातावर पंचवीस रुपये ठेवले आणि म्हणाले, ‘हे तुमच्या जवळ असु द्या प्रवासात लागतील. जमेल तेव्हा परत करा नंतर’. त्यांनी केलेली ती मदत आणि गुरुदत्त प्रती दाखवलेले प्रेम मला अजूनही स्मरणात आहे.

(क्रमशः)

माझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय

आज(९ जुलै) प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांची जयंती. १९२५ मध्ये आजच त्यांचा जन्म कर्नाटकात बंगळूरू येथे झाला. अजून पाच वर्षांनी जन्मशताब्दी! गुरुदत्तच्या आईने, म्हणजे वासंती पदुकोण ह्यांनी गुरुदत्तचे चरित्र, त्याच्या अकाली मृत्युनंतर कन्नड भाषेत लिहिले होते. मी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे. लॉकडाऊन मुळे ते कधी प्रकाशित होईल माहित नाही. एकेक प्रकरण मी या  ब्लॉग वर टाकत जाईन. गेल्या महिन्यातच मी त्या पुस्तकाची गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना ब्लॉगरुपात, मराठीत येथे प्रसिद्ध केली होती. आज त्याच्या जयंती निमित्त पुस्तकाचे संपादक असलेले मनोहर ग्रंथमालेचे प्रथितयश संपादक जोशी यांचे संपादकीय आणि गुरुदत्त यांचे सुपुत्र आत्माराम यांनी परिचयात्मक लिहिले शब्द देखील येथे देत आहे. तुमचा अभिप्राय जरूर कळवा.

संपादकीय

“नडेदु बंदा दारी”(मी चाललेली वाट) च्या वेळेस (१९५६-५७) मुंबईला गेलो असता कन्नड कलाकारांचे व्यक्तीचित्रण प्रकाशित करावयाच्या उद्देशाने अनेकांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्री ना देसाई आणि श्री व्ही के मूर्ती यांच्या बरोबर बोलताना दिग्दर्शक गुरुदत्त बद्दल लिहिले गेले पाहिजे असे समोर आले. त्यावेळी श्रीमती वासंती पदुकोण यांची मुलाखत घेतली. श्रीमती ललिता आझमी(गुरुदत्तच्या भगिनी, प्रसिद्ध चित्रकार) यांनी काही छायाचित्रे देखील पाठवली होती, पण ती त्या पुस्तकात देता आली नाही. नंतरही आमचा पत्र-व्यवहार सुरु होता. त्या दरम्यान गुरुदत्त यांचे आकस्मिक निधन झाले. मग शेवटी वासंतीबाईनी मुलाचे चरित्र लिहून पाठवले. प्रकाशित होण्यास विलंब झाला. गेल्या ऑक्टोबर मध्ये(गुरुदत्त यांचा ऑक्टोबर मध्ये निधन झाले होते) प्रकाशित करायचे ठरले होते. सर्व काही होण्यासाठी वेळ यावी लागते. वासंतीबाई अतिशय संयमाने वाट पाहत राहिल्या, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

गुरुदत्त यांचे बंधू श्री आत्माराम यांनी त्यांच्या विषयी चार शब्द लिहून आपली स्नेह प्रगट केला आहे. त्यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

श्री गिरीश कार्नाड यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून देण्याचे कबूल केले होते, पण त्यांना लगेच वेळ झाला नाही. शेवटी त्यांनी कशीतरी फुरसत काढून प्रस्तावना लिहून दिली. हि त्यांची प्रस्तावना ह्या पुस्तकासाठी तिलक लावल्यासारखे शुभ झाले आहे. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

श्री आर्य यांचे मुखपृष्ठ तयार करून दिल्याबद्दल, भारत प्रिंटींग प्रेस यांचे ते छापून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ह्या पुस्तकाच्या दरम्यान अनेकांचे सहाय्य झाले आहे, त्या सर्वांचे देखील मनःपूर्वक धन्यवाद.

-संपादक

परिचय

माझ्या आईचे सामर्थ्य आठवले कि मला कायमच कौतुक वाटते. एक तर, ती शाळेत गेली नाही; गेली असेल तर एक-दोन इयत्ता शिकली असेल. बाराव्या वर्षी तिचा विवाह झाला. चौदा मुलांना जन्म दिला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे तिने शिक्षिकेचे काम सुरु केले. शिकवता शिकवता ती देखील शिकली. परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन दाखवले. हिंदी भाषा विशारद झाली. कलकत्ता विश्व विद्यालयातून  matrick केले-१९४१ मध्ये; ते देखील तिच्या मुलासोबत, गुरुदत्त बरोबर! त्यावेळी गुरुदत्तचे वय सोळा वर्षांचे होते. १९४३ मध्ये रुईया कॉलेज मधून टीचिंग डिप्लोमा तिने केला. शाळेत शिक्षिकेचे काम करत, कमावत, पाच मुलांचे पालन पोषण केले. वेळ मिळाला तसा थोडेफार समाजकार्य देखील केले. तिला सात भाषा येत-बंगाली, मराठी, हिंदी, तेलगु, तमिळ, इंग्लिश, कन्नड. त्यात वर कोकणी देखील तिला येत असे. विमल मित्र, जरासंध(चारू चंद्र भट्टाचार्य), आणि बानी रे यांच्या पुस्तकांचे भाषांतर केले. हे सर्व बंगाली भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार.

आता तिचे वय सदुसष्ट आहे, पण तिचा उत्साह चकित करणारा आहे. पुस्तके वाचते, सिनेमा, नाटकं पाहते; संगीत मैफिलींना जाते, न कंटाळता ती ऐकते. ती नेहमी काही ना काही करत असते. बंगाली, मराठी, हिंदी, कन्नड, इंग्लिश, पुस्तके ती वाचत असते, आवडले असेल तर त्यावर चित्रपट करता येईल असे ती मला सांगत राहते. परवा परवा आमच्या घरी असताना, करायला काही नसल्यामुळे, गुरुदत्त बद्दलच्या आठवणी का लिहून काढू नये असे मी तिला सुचवले. तिने लगेच काम हाती घेतले, लिहायला सुरुवात देखील केली. ते पाहून मला अतिशय आनंद झाला.

गुरुदत्त हा सर्वात मोठा मुलगा, त्यावर तिचे प्रेम देखील अनोखे. त्याच्या जीवनाबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल, स्वतःबद्दल निःसंकोचपणे, उघडपणे, वस्तुनिष्ठ भाषा शैलीत, निर्हेतुक भावनेने आपली प्रतिक्रिया स्मृती-रूप-चित्र स्वरूपात रेखाटले आहे. गुरुदत्तवर प्रेम करणाऱ्यांसाठी त्याच्याबद्दल आणखीन आपुलकी वाटायला लावणारे असे हे लेखन आहे. गुरुदत्त आता इतिहासजमा होऊन दंतकथा बनून राहिला आहे. त्याच्यावर इतक्यातच दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माझ्या आईचे त्याच्यावरील हे तिसरे पुस्तक, पण तितकेच वेगळे असणार आहे.

माझे गतदिवस आणि बालपण आठवल्यावर मी देखील बैठक मारून हे सर्व लिहून काढावे असे वाटू लागते. ते सर्व मी केव्हातरी लिहीनच. पण १९४० मध्ये निर्वतलेले माझ्या वडिलांच्या बद्दल येथे दोन शब्द सांगितले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कुसूर केली असे समजेन. माझ्या वडिलांना व्यवहार ज्ञान असे जवळ जवळ नव्हतेच. जीवनभर ते कारकून म्हणून जगले. असे असले तरी त्यांच्या जवळ आश्चर्यकारक अशी लेखन-शक्ती होती. त्यांनी कविता केल्या, इंग्रजीत लेख लिहित, गुरुदत्त त्याच्या वडिलांचा आदर्श, तसेच आईची कलेची आवड आपल्यात असावे यासाठी धडपडत असे. गुरुदत्तने तयार केलेले सिनेमे तो गेल्यावरही अजूनही आहेत, नंतरही राहतील. तो जनमानसातदेखील राहील. त्यामुळे, वाचकहो, माझ्या आईने लिहिलेले हे तिच्या आवडत्या मुलाचे स्मृती-रूप-लेखन या पुस्तकात वाचा, आणि त्याचे व्यक्तित्व त्याने तयार केलेल्या चित्रपटातून पहा.

आत्माराम

राजबाग

आज २ जून. हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक, एक कलंदर व्यक्तिमत्व असलेल्या राज कपूर यांचा स्मृतीदिन. १९८८ मध्ये त्यांचे निधन झाले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात अर्थात त्याची मोठी बातमी आली. त्यासोबत त्यांचे वृद्धापकाळातील एक भावचित्र देखील आले होते. ते पाहून मी देखील एक पेन्सिल स्केच केले होते. ते चित्र Times of India च्या Education Times नावाच्या पुरवणीत प्रसिद्ध झाले होते.पाकिस्तानात पेशावर येथे फाळणीपूर्व भारतात जन्मलेल्या, आणि मुंबईत आपल्या वडिलांसोबत, म्हणजे पृथ्वीराज कपूर यांच्या सोबत आलेल्या राज कपूरने मुंबईत चित्रपटांचा आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवला, हे सर्वश्रुत आहेच. 

राज कपूर

राज कपूर

राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद या त्रिमूर्तीने एक काळ गाजवला होता. राज कपूरचे चित्रपट तर बरेच पाहिले आहेत. ज्या वेळी दूरचित्रवाणी कृष्ण धवल होता, तेव्हापासून, त्याचे चित्रपट रविवारी बऱ्याचदा दूरदर्शनवर दाखवत असत. ते आम्ही पाहत असू. चित्रपट गृहात जाऊन देखील १९८८-८९ च्या सुमारास त्याचा बरसात (जो त्यांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट) हा चित्रपट पाहिल्याचे आठवते आहे. त्याचे चित्रपट आणि त्यातील गाणी त्यावेळी रशियात देखील बरीच लोकप्रिय होती असे वाचले होते (चित्रपटातील संगीत असेल किंवा चित्रपटातून एकूणच  साम्यवादाशी मिळतीजुळती विचारसरणी दाखवणे असेल, किंवा भारत-रशिया संबध त्यावेळी एका वेगळ्या पातळीवर असेल, अशी अनेक करणे असतील). राज कपूरचा अनेक चित्रपटात चार्ली चाप्लीन सारखा अभिनय, एकूणच वावर असे. त्यांना शोमन देखील म्हणत असत.

ह्या वर्षी, म्हणजे २०२० मध्ये, जानेवारी महिन्यात पुण्याजवळ राजबाग येथे जाऊन आलो. त्याबद्दल कित्येक दिवसांपासून ऐकून होतो. लोणी काळभोर जवळ मुळा मुठा नदीच्या किनारी राजबाग हे राज कपूरचे फार्म हाउस पन्नास वर्षांपूर्वी घेतलेली आणि वसवलेली जागा. आता ते विश्वनाथ कराड यांच्या शैक्षणिक संस्थेने विकत घेऊन तेथे संगीत शिक्षणासाठी गुरुकुल उभे केले आहे. तेथे राज कपूर मेमोरिअल (भारतीय चित्रपटांचे सुवर्णयुग) सप्तऋषी आश्रम, विश्वशांती कला अकादमी असे सगळे त्यांनी उभारले आहे. राज कपूरच्या मृत्यूपत्रात राजबागची जागा महाराष्ट्रातील एखाद्या शैक्षणिक संस्थेस द्यावी असा निर्देश होता. दगडी बांधकाम असलेले राज कपूरचे निवासस्थान अजूनही आहे तसेच आहे. अर्थातच आत जाऊन देत नाहीत. एका कोपऱ्यात असलेली खोली म्हणे बॉबी चित्रपटातील ‘हम तुम एक कामेरे में बंद हो’ हे प्रसिद्ध गाणे चित्रित केले गेल होते अशी माहिती आम्हाला दिली गेली.  त्या परिसरात राज कपूरचे एक अनोखे संग्रहालय त्यांनी उभारले आहे.  मुळा मुठा नदी पात्रात बंधारा टाकला आहे आणि पाण्याचा फुगवटा तयार करण्यात आला आहे. ते सर्व दिसते छान, पण पाणी मात्र प्रदूषित दिसत होते. राजबागच्या आवारात एक दाक्षिणात्य शैलीतील मंदीर देखील आहे.

राज कपूरचे आणि सहकाऱ्यांचे, कुटुंबातील अनेक जुनी छायाचित्रे तेथील एका दालनात पाहायला मिळतात. बालपणातील, पत्नी सोबतची, अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळी काढलेली छायाचित्रे आहेत. एक छायाचित्र असे आहे कि राज कपूर राजबागेतील शेतात काम करत असतानाचे आहे. अजून एका भल्या मोठ्या दालनात राज कपूर यांच्या चित्रपटातील अनेक अजरामर प्रसंगांना मूर्त रूप दिले गेलेले पाहायला मिळते. बरसात, मेरा नाम जोकर, राम तेरी गंगा मैली, सत्यम शिवम सुंदरम, अनाडी, श्री ४२०, आग, संगम, जिस देश में गंगा बहती है, बॉबी वगैरे चित्रपटातील प्रसंग आपल्यासमोर साकारले गेलेले दिसतात.  तसेच इतर प्रसिद्ध चित्रपटातील प्रसंग, मराठी चित्रपटातील अभिनेत्यांची भावचित्रे देखील मांडली आहेत.

नुकतीच  अशी बातमी आली होती कि मुंबईतील चेंबूर येथील त्याच्या आर के स्टुडियो आगीत भस्मसात झाला. अनेक जुन्या आठवणी, कागदपत्रे, छायाचित्रे, त्याच्या चित्रपटांतील भित्तीचित्रे नष्ट झाली. पुण्यातील राजबाग मधील त्यांच्या स्मृती दालनामुळे काही वाचली असेच म्हणावे लागेल.

R K Films and Studio

R K Films and Studio. Image courtesy Internet

आणखीन एक गमतीशीर गोष्ट वाचनात आली होती कि आर के स्टुडियोचे प्रसिद्ध मानचिन्ह(लोगो) हा बाळसाहेब ठाकरे यांनी तयार केला होता. असो, पण राज कपूर सारख्या अष्टपैलू कलावंताच्या स्मृती जागवायला पुण्याजवळील राजबाग येथे एकदा जायला नक्कीच हरकत नाही.

 

Digging out the past

I always have been very curious about history as a subject. In 2004, I came to know of a course in Indology in Pune accidentally, which I eventually took up. I plan to share my experience with that course later. During M A Indogloy course, I happened to visit few archaeological sites. This blog is sharing of that experience. This course is famous for its field trips. Since the course is about studying India’s past, and while evidences of that are scattered all over, it is natural that the course has focus on field trips. The course also had earned a nickname Hindology(हिंडॉलॉजी, कारण सारखे हिंडणे फिरणे सुरु असते). The course had a subject on archaeology. We managed to be part of couple of excavations underway by Deccan College at couple of sites, and experience them first hand. I wanted to share that experience on this blog.

Our first outing to archaeological site was to a place Jorwe near Sangamner on Pune Nashik highway, to understand center of Jorwe culture which is part of chalcolithic age. The archaeological excavation was done long time back by famous Dr H D Sankaliya in 1950. The excavation activities are no more right now, but we were able to go around the village, different mounds where excavation was carried out, as we got a guided tour with help of our teachers. We were told that red colored pottery, coarse pottery, circular houses, were found. Evidences of clay hearths were also found. It was like traveling back in time relating what we learnt and read in the classrooms about this site.

Few months later, we went to Bhon near Shegaon, where archaeological excavation was on by Dr Deotare from Deccan College. We stayed there for 3 days. Dr Rajguru, famous geo-archaeologist also visited the site, and he was with us for a day. We were fortunate to hear him talk about the significance of the site from geology perspective. The site is on the banks of river Purna is at least 2300 years old site. The team had discovered Buddhist stupa which was constructed in bricks, dating back more than 2000 years. At this site, we took part in trenching, scraping activities. We also played part in pottery pieces classification at the pottery yard, where we saw painted grey ware(PGW), northern black polished ware(NBPW), black red ware pottery. The terracotta ring wells were also found and excavated there. After whole day’s labor, in the evening we all would gather to record our findings, classify, categories and tag them appropriately. We spent 3 days at the site and was very different experience working on the field with fellow archaeologist and learning from them a lot.

Our third visit to archaeological  site was to a place called Inamgaon near Pune. The excavation work here at this site, was carried out way back in 1970. The excavation work went on for 14 seasons, which lasted till 1980. This site is important from the its connection with Jorwe culture. The interesting thing there was evidences found about practice of burring dead persons, that too inside the houses. Also more than 200 megalithic burial circles were found there. This was a one day trip for us. We got opportunity to go around the excavation site, look around the mounds. We also could spot various stone artifacts still scattered around.

Following year, we went to Junnar excavation site where archaeological excavation was on by Dr Vasant Shinde and Srikanth Jadhav from Deccan College. There were evidences of large brick structures which were used as graininess during the Satavahana period. We were at the site for half day, were able to interact with Dr Shinde and Jadhav about the significance of the site. Junnar also has regional office of Archaeological Survey of India which we visited, and that is these were camping during the excavation. Junnar has largest concentration of rock cut caves which are Buddhist caves, as well as Jain caves.

These above mentioned experiences were related to visits to archaeological excavation sites. Besides, that during the course, we had plenty of opportunities to visit and study many ancient and historical landmarks such as Bhimbetka caves in Madhya Pradesh. I will write more about them later. You want to look at other blogs of mine on Indology. Stay tuned till then!

 

शेक्सपिअरचे गारुड

मी गेल्या आठवड्यात बंगळूरूला गेलो होतो. पुण्याच्या विमानतळावर द विकचा(The Week) अंक कुलुपबंद कपाटात दिसला आणि त्यावर शेक्सपिअर विराजमान होता. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. प्रसिद्ध कवी आणि नाटककार शेक्सपिअरची ४००वी पुण्यतिथी ह्या वर्षी २३ एप्रिल साजरी होत आहे. तो अंक त्यावर असणार. ह्या शतकातील ही मोठी घटना आहे असे म्हणायला हरकत नाही. २६ एप्रिल १९६४ ह्या च्या चौथ्या जन्मशताब्दी वर्षी सुद्धा अश्याच मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली असणार.  शेक्सपिअरबद्दल मी काही लिहावे एवढा माझा वकूब नाही. पण मी एक नाटकवेडा रसिक आहे, तसेच पुस्तकवेडाही  आहे. मला शेक्सपिअरचे आकर्षण आहे आणि जमेल तसा मी त्याच्याबद्दल समजावून घेत असतो. त्याच्या ४००व्या पुण्यतिथीनिमित्त थोडेफार मला भावलेला समजलेला, त्याच्याबद्दल वाचलेले, ऐकलेले येथे लिहावे म्हणून हा प्रपंच. हे सर्व स्मरण रंजन आहे, त्याच्या गारुडाचे.

इंग्रजी साहित्य घेवून बी.ए/एम्. ए करणाऱ्या मंडळीना शेक्सपिअर, त्याची नाटके अभ्यासाला असतात. जशी संस्कृत मध्ये बी.ए/एम्. ए करणाऱ्या मंडळीना कालिदास असतो तसे. कालिदास भारताचा शेक्सपिअर. मी तर संगणक शास्त्र क्षेत्रातील. मला वाटते अकरावी बारावी मध्ये इंग्रजी विषयात त्याच्या नाटकातील एखादा प्रवेश असावा. त्याच्या नाटकातील काही प्रसिद्ध वाक्ये आपल्याला माहिती असतात. जसे To be or not to be is the question, What’s in a name वगैरे. साधारण २००१ च्या सुमारास जेव्हा माझे नाटक वेड पूर्ण भरात होते तेव्हाच, मला विनय हर्डीकर यांचा ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’ हा कार्यक्रम मला पाहायला मिळाला. आजच मी वाचले की ते हा कार्यक्रम आता, पुण्याबाहेर देखील घेवून जाणार आहेत. गेली पंधरा वर्षे ते हा कार्यक्रम करत आहेत. मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्राच्या निमित्ताने, आणि एकूणच संगीत नाटक, त्याचा इतिहास, ह्या विषयावरील वाचनामुळे असे समजले की मराठीतील नाटकांच्या सुरुवातीच्या काळात शेक्सपिअरचा प्रभाव होता. उदा. सं. झुंझारराव हे प्रसिद्ध नाटक.

त्याची प्रसिद्ध नाटके रोमिओ जुलिएट, ऑथेल्लो, मर्चंट ऑफ व्हेनिस अशी आपल्याला महिती असतात. प्रामुख्याने राज घराण्यावरील नाटके त्याने लिहिली. त्याने शोकांतिका, विनोदी, तसेच रहस्यमय नाटके देखील हाताळली. मानवी स्वभावाचे चिरंतर पैलू जसे राग, लोभ, मत्सर, प्रेम, सूड ही सगळी त्याने मांडली. तो स्वतः अभिनेता देखील होता. त्याची नाटक कंपनी होती, त्याचे नाट्यगृह होते(Globe Theater). या सर्वामुळे तो सार्वकालिक, तसेच सर्वाना आपलासा वाटणारा ठरला. शेक्सपिअरच्या नाटकामध्ये सर्वसामान्य रसिकाला दिसणारा मुद्दा म्हणजे त्यातील इंग्रजी, जे व्हिक्टोरियन काळातील आहे, ते बरेचसे बोजड वाटते. तसेच नाटकातील मोठ-मोठाली स्वगते हे आणखीन एक वैशिष्ट्य. कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात(आणि इतक्यात आलेल्या सिनेमात देखील), हे आपण पहिले असते. त्यातील प्रसिद्ध नट, अशाप्रकारच्या नाटकातील भूमिका करून मोठा नट झालेला असतो, आणि त्याच्या उतरत्या काळात त्याला हे सर्व आठवत असते, आणि तो ते मोठ-मोठाले संवाद, स्वगते म्हणतो. २००१ च्या आसपासच मला किंग लियर ह्या नाटकाच्या मराठी अनुवादाचे पुस्तके मिळाले. हे लिहिले आहे विंदा करंदीकर यांनी. त्यात त्यांची भली-मोठी विवेचक प्रस्तावना आहे. गोविंद तळवलकर हे देखील असेच शेक्सपिअर अभ्यासक आहेत.

शेक्सपिअरचा अभ्यास, आणि त्याच्यावरील पुस्तके हा देखील एक वेगळाच विषय आहे. त्याच्यावर म्हणे एक लाखावर पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. अनेक अंगाने त्याचा अभ्यास करण्यात आला आहे. वोल्टेअर(Voltaire)चे गमतीदार विधान कुठेतरी मी वाचले होते. तो म्हणतो कि शेक्सपिअर हा थोडीफार कल्पना शक्ती असलेला, प्यायलेला हिस्त्रक पशुसारखा आहे ज्याची नाटके लंडन आणि कॅनडा मध्ये थोडीफार चालतात (Shakespeare is a drunken savage with some imagination whose plays please only in London and Canada).  मराठीमध्ये शेक्सपिअरवर एक पुस्तक मराठी नाट्य परिषदेने प्रसिद्ध केले आहे. तो केला १९६५ मध्ये, चौथ्या जन्मशताब्दी वर्षी. त्यातही अनेक अभ्यासकांनी शेक्सपिअरची अनेक अंगानी ओळख करून दिली आहे. ते मला गेल्यावर्षी मिळाले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी देखील १९७९ मध्ये शेक्सपिअर परिचय ग्रंथ असे पुस्तक प्रकाशित केले होते. The Tales from Shakespeare by Charles and Mary Lamb हे पुस्तक त्याच्या नाटकात आलेल्या कथेसंदर्भात अभ्यासासाठी छोटेखानी पुस्तक आहे. त्यात शेक्सपिअरच्या एकूण माहीत असलेल्या ३८ नाटकांपैकी २० नाटकांच्या कथेसंदर्भात लिहिले आहे. हे पुस्तक मला जी ए कुलकर्णी यांच्या पत्रातून नमूद केल्याचे दिसले आणि ते मी २-३ वर्षापूर्वी घेतले. मी वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या नाटकात मानवी स्वभावाचे पैलू दिसत राहतात. काही अभ्यासकांनी त्याच्या नाटकांचा(प्रामुख्याने किंग लिअर) अभ्यास मानसशास्त्र आणि मानसोपचारशास्त्राच्या अंगाने देखील केला आहे. मी ह्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला ते आणखी समजावून घेण्याची उत्सुकता आहे.

जगभरात त्याची ४००वी पुण्यतिथी जोरात साजरी होणार. लंडनमध्ये, तसेच त्याच्या जन्मगावी म्हणजे Stratford जे एव्हान नदीच्या किनारी आहे(Stratford upon Avon), जेथे त्याचे घर आहे, तेथे तर कार्यक्रमांची लयलूट आहे आणि ती वर्षभर असणार. ब्रिटीशांनी ते घर अजून जपून ठेवले आहे. आपण बऱ्याच प्रवासवर्णनात त्याबद्दल वाचले असते. मलाही तेथे जायचे आहे एकदा, पण तात्पुरते तरी मी माझ्या इंग्लंड मधील मित्रांना त्याबद्दल विचारणार आहे! ते असो, पण इंटरनेटवर देखील बरीच माहिती आहे. इच्छुकांनी येथे आणखी माहिती मिळवता येयील. BBCच्या संकेतस्थळावर देखील Shakespeare Lives असा ऑनलाईन महोत्सव कार्यक्रम सहा महिने चालणार आहे. इतरही बऱ्याच संकेतस्थळांवर माहिती मिळू शकेल. पुण्यात देखील बरेच कार्यक्रम असणार. त्यातील एक आहे विनय हर्डीकर यांचा ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’, एस. एम् जोशी सभागृहात, संध्याकाळी ६.३० वाजता. तो जरूर आपण सर्वानी पाहावा, आणि शेक्सपिअरचे गारुड अनुभवा.

आणखीन एक जाता जाता. एप्रिल २३ हा देखील स्पेन मधील प्रसिद्ध कादंबरीकार सर्वांतेस याची देखील ४००वी पुण्यतिथी आहे. तो त्याच्या डॉन क्विक्झोट ह्या महाकादंबरीबद्दल प्रसिद्ध आहे. ती मी अजून अर्थात वाचली नाही, कधी तरी वाचायची म्हणून घेवून ठेवली आहे. पण जी. ए. कुलकर्णी यांच्या काही कथा त्यातील मूळ धाग्यावर आधारलेली आहेत. त्यांच्या पत्रलेखनात देखील त्याच्याबद्दल बऱ्याचदा उल्लेख येतो. स्पेनमध्ये त्याची पुण्यतिथी साजरी केली जात आहे.

माझे आकाशवाणी ऐकणे

आजकाल कायम अशी तक्रार ऐकू येते की माध्यमांच्या रेट्यामध्ये कोण बरे आकाशवाणी(अहो, असे काय करता, आपला रेडियो की!) ऐकते. त्याचे अजून एक नाव आहे-नभोवाणी. तर ह्या सोशल नेटवर्क, WhatsApp, हजारो दूरचित्रवाणी channelsच्या जमान्यात आकाशवाणीकडे लोक कसे वळतील बरे. आपल्यापैकी बरेचसे लोक प्रवास करताना, गेल्या काही वर्षात आलेली, FM channels ऐकत असतील नसतील, तेवढेच त्यांचे आकाशवाणी ऐकणे होते. मी गेली कित्येक वर्षे आकाशवाणी ऐकतो आहे. त्याबद्दल थोडेसे लिहावे म्हणून आज बसलो आहे. मला नक्की माहिती आहे आपल्यापैकी बरेच जण अजूनही ऐकत असतील, किंवा पूर्वी कधीतरी ऐकत होतात. अधून मधून आपण WhatsApp वर आकाशवाणीची धून असलेला मेसेज फिरत असतो, लोकांच्या मनात अजून ती आहे, नाही तर लोक असे स्मरणरंजनात रमले नसते.

नुकतीच पुणे आकाशवाणीला(All India Radio-AIR)  ७५ वर्षे झाली. मला आठवते त्याप्रमाणे आमच्याकडे रेडियो आला तो १९८६च्या आसपास. त्या आधी मी आमच्या चाळीत शेजाऱ्यांकडे अधूनमधून बातम्या, विविधभारती वरील मधुमालती हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम जाता येता ऐकत असे.  मी प्रामुख्याने पुणे आकाशवाणी ऐकतो आहे. सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती वरील सकाळी शास्त्रीय संगीत विषयाला वाहलेला हा आणि जुन्या हिंदी गाण्यांचा भुले बिसरे गीत हा कित्येक वर्षे सुरु असलेला कार्यक्रम ऐकत असे आणि आजही अधून मधून का होईना ऐकत असतो. कुठल्याही विषयाचे बंधन नाही, अतिशय आशयपूर्ण, माहितीपूर्ण असे विविध कार्यक्रम प्रत्येक आकाशवाणीवर वर्षी येत असतात. मराठी साहित्याशी निगडीत असलेले पुस्तक वाचनाचे कार्यक्रम, ज्यात कोसला, वंशवृक्ष सारख्या कादंबऱ्यांची तसेच प्रकाश संत यांच्या पुस्तकांवर आधारित शारदा संगीत आणि त्यातील लंपन ह्या मुलाची ओळख झाली. बऱ्याच वेळेला आकाशवाणीच्या खजिन्यातून निवडक कार्यक्रम पुन:प्रसारित करतात, त्यातही गेल्या पिढीतील कलाकार, व्यक्ती यांची ओळख होत राहते. दुपारचे कार्यक्रम अर्थातच जास्त ऐकले जात नाहीत, पण संध्याकाळचे, विशेषत: रात्रीचे कार्यक्रम जसे नभोनाट्य, आलाप सारखे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, हे देखील दर्जेदार असतात. विविधभारतीवरील रात्रीचा छायागीत हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील कित्येक वर्ष चालू आहे. विविधभारती वरील महक सारखे हिंदी गाण्यांचे रसग्रहण करणारे मंगेश वाघमारे यांसारख्या निवेदाकांचे कार्यक्रम एक वेगळीचं अनुभूती देऊन जातात. भारताची, तसेच महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे कार्यक्रम जसे संकृत भाषेवरील गीर्वाण भारती, संगीत नाटकांच्या  इतिहासावरील कार्यक्रम, असे वैविध्य असते. सामाजिक बांधिलकी जपणारे, आणि त्या निमित्त वेगवेगळया व्यक्ती, संस्था यांचा परिचय करून देणारे कार्यक्रम देखील अतिशय उद्भोधक असतात. अश्याच एका कार्यक्रमात मला Schizophrenia Awareness Association या संस्थेची ओळख झाली आणि माझे त्यांच्याशी अनुबंध जुळले. ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला १९६०च्या दशकात सादर केलेला गीतरामायण हा कार्यक्रम तर दंतकथा होवून बसला आहे. आजकाल प्रायोजित कार्यक्रमांचा देखील आकाशवाणीवर भडीमार असतो, त्यातही काही चांगले प्रायोजित कार्यक्रम आहेत, जसे, सध्या चालू असलेला डीएसके गप्पा. अश्या ह्या पुणे आकाशवाणीचा ब्लॉग देखील आहे.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत वास्तव्य असताना, अमेरिकेतील रेडियो संस्कृती अनुभवायला मिळाली. अमेरिकेतील लोक त्यांच्या दिवसातील बराचसा काळ वाहन चालवण्यात घालवत असल्यामुळे, रेडियो मुख्यत: तेथे ऐकला जातो. प्रत्येक शहरात असलेली वेगवेगळी स्टेशन्स, ही रेडियो संस्कृती किती जोमात आहे हे दर्शवते. घरातही छोटासा रेडियो असतो, त्यात अलार्मची सोय असते. प्रत्येक घरात, हॉटेल्स मध्ये तो असतोच असतो. इंग्रजी गाण्यांचे इतके विविध प्रकार आहेत(उदा. rock, jazz, pop, country. परवा पुण्यात jazz संगीतावर एक कार्यक्रम होता, त्याबद्दल येथे लिहिले आहे) ज्यामुळे, तेथील रेडियो स्टेशन्सदेखील अश्या संगीत प्रकारांना वाहून गेलेली असतात. तेही मी त्यावेळेस खूप अनुभवले, आणि जेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते नक्की अनुभवतो. तेथील रेडियोचा इतिहास देखील मोठा आणि मजेशीर आहे, त्याबद्दल कधीतरी, पण, एक गमतीची गोष्ट सांगतो-तेथील रेडियो स्टेशन्सची नावे  K या अक्षराने सुरु होतात, तर पूर्वेकडील भागातील रेडियो स्टेशन्सची नावे  W या अक्षराने सुरु होतात. उदा. KBAY, KQED etc. त्याबद्दल येथे माहिती आहे. कॉलेजमध्ये असताना पुण्यात मला कधी कधी BBC radio सुद्धा ऐकू येई.

मी जेव्हा कर्नाटकात जातो, तेव्हा तेथील आकाशवाणी केंद्रे जरूर ऐकतो-जसे धारवाड, बंगळूरू. काही वर्षांपूर्वी योगायोगाने मला बंगळूरू मध्ये आकाशवाणीवर, कन्नड भाषेतील क्रिकेट समालोचन ऐकल्याला मिळाले. पुणे आकाशवाणीवर मराठीमधून मी ते ऐकले होते. आजकाल ते ऐकायला, त्याची मजा चाखायला, नाही मिळत. हिंदी मध्ये असते, पण त्याची इतकी मजा नाही येत. काही वर्षांपासून सुरु झालेल्या दूरचित्रवाणीच्या डीटूएच(direct to home, DTH) सोयीमुळे, आकाशवाणीचे काही प्रमुख केंद्रे दूरचित्रवाणीवर ऐकण्याची सोय झाली आहे. नुकतेच प्रसारभारतीने एक mobile app उपलब्ध करून दिले आहे, त्याच्यावर देखील काही केंद्रे ऐकायला मिळतात. प्रसारभारतीच्या वेबसाईटवर जुन्या कार्यक्रमांचा खजिना देखील आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला मन की बात थेट जनसंवादाचा कार्यक्रम देखील आकाशवाणीवरच आहे, त्याचे कारणच मुळी आहे की  आकाशवाणी भारतात कानाकोपऱ्यात, सर्वदूर पोहचली आहे.

आपल्याकडे खासगी FM channel सुरु होवून देखील आता एक तप उलटले. प्रसारभारतीने देखील बरीचशी आकाशवाणी केंद्रे केली आहेत. पण अजून कित्येक राहिली आहेत-उदा. पुणे आकाशवाणीचे केंद्र. ते केल्यास श्रोत्यांच्या संख्येत आणखी वाढ होईल. प्रत्येक मोठ्या शहरात आता खासगी तसेच आकाशवाणीची मिळून ३-४ FM channel आहेत. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. जाता जाता, आणखी एक, काही दिवसांपूर्वी मी देखील असाच ऑफिसला जाताना एका private FM channel वर कार्यक्रम ऐकताना घडलेला किश्यावर, आणि तेथे असलेल्या radio jockey नावाच्या जमातीवर(!), एक ब्लॉग लिहिला होता. तो जरूर वाचा आणि मला ह्या ब्लॉग बद्दल आपला अभिप्राय कळवा.

The Revenant: Story of courage

Last week I happened to catch the new movie The Revenant. This movie has won Oscar awards announced in February this year. I had not read the story line before choosing to go the movie. The word revenant means someone who is believed to be resurrected, walking out of dead. I somehow felt that the movie might be around spirits, ghosts etc, there are many movies of that genre like The Conjuring and many others.

The movie turned out to be about conflicts between early settlers and native American in the northern American region. Contacts with native American has been depicted in many movies, especially wild west movies. During my visit to the USA in 2012, I was staying in Orange County area near Los Angeles. I happened to visit Big Bear Lake area, which was inhabited by native Americans and also grizzly bears in the past. It has native American museum and various stores selling native Indian artifacts. The history is that western settlers have exploited native American, deprived them off their land, their rights. Of course, US government has tried to preserve their culture, settlements, and areas by notifying them.

Anyway, so, this movie also happens to be the story of survival of the protagonist, and story of literally walking out death like situations. The famous Hollywood actor, hero of mega movie Titanic, Leonardo DiCaprio, is that protagonist in this movie. The story line is very simple. He is shown as the leader of a group involved procuring, buying pelts(fur of animals like bear) from native Americans. During one of such expeditions, they are attacked and their survival game starts. Over and above, DiCaprio gets fatally injured in a grizzly bear attack. The other group members leave him strangled and on his own in the forest, in the cold, freezing weather. DiCaprio battles all the odds for life and finally reaches the home, to find revenge with the person who made him strangle.

Majority of the film is filled with raw and bloody situations and scenes, which is absolutely near real. The large and huge grizzly bear attack and how he fights that, is thrilling to watch, and audience is left spellbound. The others scenes such as catching and eating fish raw, taking shelter in a dead horse’s belly to counter cold, treating the wound in a raw manner are very raw and leave some very uncomfortable. We have seen Sylvester Stallone stitching his wound in a movie titled Rambo(first blood), in the past, so this is not new! The cinematography, locations is amazing. It has won Oscar for cinematography also. The movie is based on the novel of the same name and inspired by real events in the history, as mentioned in the wiki page here.

Not sure why Leonardo DiCaprio got best actor award for this movie though. I did not find any display of his acting abilities in this movie, as it is mainly about adventure, courage, never say die attitude, survival in nature etc. Hence there were hardly any opportunities for acting display(for any one in the movie). Nonetheless, he is fine actor. It was heartening to see that during his speech, he brought issue of climate change to the fore, and in the context of the movie which also about man’s relationship with nature.

I would like to end this blog by a note on relation between bears and native Indians. I am no expert of native American culture and history, but I recently read a Marathi book on bears and their place in native American mythology. The classic Marathi book by famous archaeologist Durga Bhagwat titled Aswal(अस्वल means bear) is one of the first such books. The one I read recently is specifically on folk tales of bears in native Americans (नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा). This is by Dr Arun Prabhune. This has few sections on grizzly bear. It was interesting to read that and related back to the grizzly bear attack incident in the movie. I will write more about these books later though. Stay tuned!

अण्णा भाऊ साठे आणि रशिया

कित्येक वर्षापासून असलेली भारत रशिया मैत्री ही जरी काही राजकीय हेतुमुळे निर्माण झालेली एकेकाळची गरज होती. तसेच भारतातील साम्यवादी, कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक त्यावेळच्या सोविएत रशियाकडे आकृष्ट झालेले दिसतात. रशियात झालेली १९१७ मधील क्रांती, कामगारांचे आलेले राज्य, ह्या सर्व गोष्टी भारतातील पुढाऱ्यांना रशियाकडे खेचित होत्या. लेनिनने साकार केलेले मार्क्सचे तत्वज्ञान कसे असेल, तेथील नवीन संस्कृती कशी असेल हे पाहण्यास अनुभवण्यास बरीच मंडळी त्या दृष्टीने रशिया प्रवास करीत. महाराष्ट्रातील अण्णा भाऊ साठे जे प्रसिद्ध साहित्यिक, क्रांतिकार, हे ही कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली आले होते आणि त्यांनी त्या चळवळीत भाग घेतला होता, हा इतिहास आहेच. त्यांनी तर दुसऱ्या महायुद्धात सोविएत जनतेने केलेल्या पराक्रमामुळे भारावून जाऊन स्टालिनग्राडचा पोवाडा लिहिला होता. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्या रशियन भाषेतदेखील अनुवादित झाल्या होत्या. अण्णा भाऊ साठे यांनीही रशियाचा प्रवास केला होता. त्यावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तक देखील लिहिले होते(नाव-माझा रशियाचा प्रवास). मी काही दिवसांपूर्वी अनंत काणेकर यांच्या रशिया प्रवासावरील पुस्तकावर येथे लिहिले होते.

अण्णा भाऊ साठे १९४८ मध्ये सोविएत रशियाला जायचे तसे ठरले होते, पण काही कारणाने ते नाही गेले. पुढे १९६१ मध्ये इंडो-सोविएत कल्चरल सोसायटीतर्फे ते तिकडे गेले. भारतभरातून निवडलेल्या लोकांचे एक शिष्टमंडळ तेथे गेले, त्यात ते होते. तेथे ते महिनाभर होते. त्या पुस्तकात त्यांनी नमूद केलेले अनुभव याविषयी जरा लिहावे म्हणून हा ब्लॉग-उद्योग.

ते दिल्लीहून पालम विमानतळावरून ‘चितोड की रानी’ नावाच्या विमानाने उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे पोचले. त्यावेळी विमानांना नावे असत? आहे की नाही गमतीशीर माहिती? पुढे तेथून मॉस्कोला दुसऱ्या विमानाने गेले. मॉस्कोवरून लेनिनग्राडला रेल्वेने गेले. त्यांनी त्या रेल्वे प्रवासाबद्दल असे लिहिले आहे-‘एका कंपार्टमेंट मध्ये दोन पलंग, स्वच्छ गाद्या, उशा, चादरी, नळ, कंगवा, साबण, पावडर, रेडियो म्हणजे सारंच! शिवाय प्रवाश्यांची देखभाल करायला एक बाई होती….मला तो प्रवास कसासाच वाटला. मला बोरीबंदर स्टेशनची आठवण झाली. ती गर्दी, तो कोलाहल, ती धावपळ…’ आणखीन एक गम्मत त्यांना दिसली. एक तरुण स्त्री गादीत खिडकीत बसली होती, तिच्या तान्ह्यासाठी एक छोटासा पाळणा होता. त्या बद्दल ते लिहितात-‘…कारण हाच बालनागरिक मोठेपणी आपल्या मातृभूमीसाठी शंभरदा मरणार याबद्दल सोविएत संघराज्याला खात्री होती’. काही वेळात म्हणे डब्यात रेल्वेचा एक गडी वेगवेगळया दारूच्या बाटल्या घेवून आला आणि रशियन भाषेत त्याबद्दल सांगू लागला, आणि काय हवे आहे ते विचारू लागला. असे जर भारततल्या रेल्वेत असते तर काय झाले असते असा विचार करून, आणि हसून त्यांनी त्याला वाटेला लावला!

लेनिनग्राड मध्ये त्यांना प्रोफेसर ततियाना म्हणून कोणी भेटल्या, ज्यांनी रशियन-मराठी शब्दकोश केला होता. आचार्य अत्रे यांनी साठेंकडे त्यांच्यासाठी एक पत्र दिले होते, जी त्यांनी त्या बाईना दिली. लेनिनग्राड मध्ये त्यांनी विंडसर राजवाडा, त्यातील लेनिनची खोली पहिली, १९४२ मध्ये युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचे स्मारक पहिले. लेनिनग्राड मध्ये त्यांनी एक सिनेमा पहिला, ज्याचे वर्णन त्यांनी असे केले आहे, की तो 3-D सिनेमा असावा असे मला वाटते.

त्यांनी मॉस्को पाहिल्याचे जे वर्णन केले आहे त्या प्रकरणाचे शीर्षक आहे ‘लाल ताऱ्याखाली. मॉस्को मध्ये प्रसिद्ध रशियन लेखक गॉर्की याच्या नावाच्या राजमार्गावरून ते फिरले, त्याचे वर्णन येते. मॉस्को मध्ये मध्ये त्यांनी ठिकठिकाणी सिगरेटची राख टाकण्यास सोय आहे असे त्यांचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे, त्यावरून रशियन लोकात सिगरेटचे व्यसन किती होते/आहे ह्यास पुष्टी मिळते. रशियात कलाकारांना किती मान आहे ह्याचे त्यांना पदोपदी दर्शन झाले. काम आणि कला या दोघांवर रशियन जनता सारखेच प्रेम करते. त्यांनी बोल्शोविक नाट्यगृहात दगडाचे फुल नावाचा ओपेरा पहिला.

त्यानंतर ते अझरबैजानची राजधानी बाकू येथे गेले. स्टालिनग्राडवरून एक दिवसाचा विमान प्रवास करून जावे लागले. ते लिहितात, बाकू हे रशियातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे-मॉस्को, लेनिनग्राड, खार्कोव, आणि बाकू. त्यांनी पहिले की बाकू मध्ये संपन्नता आहे. अझरबैजानची हे मुस्लीम घटक संघराष्ट्र आहे, असे असून सुद्धा खनिज तेलाच्या समृद्धीमुळे, आणि तेथील लोकांच्या अपार कष्टामुळे, संपन्नता आहे, असे त्यांना आढळले. बाकूपासून जवळच एके ठिकाणी त्यांनी सामुदायिक शेती पहिली. रशियात त्यांना जीवनात कुठेही विसंगती आढळली नाही. खेडी, शहर यात काही फरक दिसला नाही. बऱ्याच ठिकाणी यंत्रांचा वापर दिसला, जसे की दोन रुबल्स टाकले की शरबत देणारे यंत्र त्यांनी त्यावेळी पहिले.

त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ते ताश्कंद येथे गेले, जी उझबेकीस्तानची राजधानी आहे.उझबेकीस्तान हे बरेचसे वाळवंटी प्रदेश आहे, तरी सुद्धा ऑक्टोबर क्रांती नंतर, त्यांनी झपाट्याने प्रगती केली. ताश्कंद मध्ये त्यांनी दिलाराम नावाचे एक नाटक पहिले असल्याचे लिहिले आहे. त्यानंतर  ते दिल्लीस परतले.

अण्णा भाऊ साठे स्वतः कामगार वर्गातून आलेले, समाजवादी चळवळ जवळून पाहिलेले, त्यांना साहजिकच त्यावेळचा क्रांतीनंतरचा रशिया त्यांना मनोहारी वाटला, त्या पासून त्यांनी नक्कीच प्रेरणा घेतली असणार. पुस्तकात ते एके ठिकाणी म्हणतात, ‘मॉस्को पहावे संध्याकाळी, लेनिनग्राड पहावे दिवसा, स्टालिनग्राडचा मर्दपणा युद्धात, तर बाकूचे सौंदर्य रात्री’. हे सर्व अनुभवायला तेथे जायलाच हवे! तर एकूण मला हे पुस्तक वाचनाताना खुपच मजा आली, काही दिवसापूर्वीच अनंत कणेकरांचे धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे त्यांच्या १९३६ च्या आसपास केलेल्या रशिया प्रवासाचे वर्णन वाचले होते. साठे जवळ जवळ ३० वर्षानंतर तेथे गेले. त्यांना दिसलेली रशियाची प्रगती आणखीनच झालेली एकूण वर्णनावरून दिसते.

 

 

 

गांधारी

हा ब्लॉग महाभारतातील गांधारी बद्दल नाही, तर मी नुकात्याच वाचलेल्या ना धों महानोर यांच्या छोट्याश्या कादंबरीबद्दल आहे. काही दिवसापूर्वी असाच एका पुस्तक प्रदर्शनात गेलो असता हे पुस्तक माझ्या हाती लागले. ना धों महानोर आणि कादंबरी हे वाचून जरा चमकलो. त्यांनी कादंबरी देखील लिहिली आहे हे माहीत नव्हते. ते कवी आहेत, आणि त्यांच्या शेतीजीवनावरील तसेच निसर्ग कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचे काही ग्रामीण आणि स्त्री जीवनावरील कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

ही १९७३ मधील कादंबरीला मराठवाड्यातील, जो पूर्वी निजाम राजवटीखाली होता, एका गावाचा संदर्भ आहे. ह्या गावाचे नाव आहे गांधारी. कादंबरीला गांधारी असे शीर्षक का दिले याची उत्सुकता होती मला. सुरवातीलाच हे एक खेडे आहे असा त्रोटक संदर्भ येतो. इंटरनेटवर थोडी शोध शोध केल्यानंतर आपल्याला कळते की गांधारी नावाचे अंबड तालुक्यात, जालना जिल्ह्यात एक गाव आहे. त्याच नावाची नदी देखील आहे. तर ही कादंबरी त्या गावाची कहाणी आहे. आधी म्हटल्याप्रमाणे कादंबरी आहे १९७३ मधील, पण काळ चितारला आहे १९४८ मधील आणि त्यानंतरचा काळ. भारत स्वतंत्र झाला, तसेच लगेच हैदराबादच्या निजाम राजवटीचा बिमोड करून तो भाग भारतात आला. त्या सुमारास गांधारी या खेड्यात काय उलथ पालथ होते याची ही कथा. आणि पहिल्याच परिच्छेदात मला तरी वाटते कादंबरीचा सारांश येतो. ते लिहितात:

“गांधारी. छोटीशी नगरी. महाभारतातील राणी गांधारीसारख्याच नशिबाची. राजयोगी. दुर्दैवी. निजामी फाशातून सुटताना नेमकं गांधारीचंच नशीब दगडाचं. निजामीतून सुटताना शेवटच्या दंगली लढ्यात कित्येक लढले. मुक्तीसेनेने जीवाचे रान केले. प्राण कुरवंडी झाले. स्वातंत्र्य मिळाले. फारच थोडी गावे दुर्दैवी. गांधारी सारखी. ज्यांच्या सगळ्या इभ्रती टांगल्या गेल्या. अगदी सगळ्यांनी पराकाष्ठा करूनही निजामीतील भोग, नंतरच्या काळात आलेल्या महाभागांनी घातलेले भोग. तिच्याच साम्राज्यातला विलास आणखी दुर्विलास डोळे असून पाहता येत नाही.””

Gandhari Na Dho Mahanor

मराठवाडा मुक्ती संग्राम सुरु झाल्या नंतर, निजामाने त्याच्या राज्यातील प्रजेवर अतोनात अत्याचार करण्यास सुरुवात केली. हे गाव देखील त्यातून सुटले नाही. त्यातून ते निभावून जाते. बरेच गावकरी त्यांची शेतीवाडी, गाव सोडून दुसरी पोटापाण्यासाठी जातात. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते हळूहळू परतात. आणि गावाच्या राजकारणात, समाजकारणात एक एक बदल होत जातात. त्याचा आलेख कादंबरीत येतो. काही दिवसात ग्रामपंचायत निवडणूक होते, कोणीतरी कोणालातरी हरवून सरपंच होतो. सोसायट्या स्थापन होतात, गैरकारभार सुरु होतो. सरकारी अधिकारी, आणि त्यांची खाबुगिरी सुरु होते, सामान्य जनतेची पिळवणूक होते. एकूणच समाजाला कीड लागते. गावातला भागवत नावाच्या सरळमार्गी शेतकरी कसा गावाला वळण लावण्याचा प्रयत्न करतो त्याचे चित्रण येते. कादंबरीत साहजिकच निजामी राजवटीमुळे प्रभावित झालेली उर्दू मिश्रित मराठी, हिंदी दिसते.

‘सुरुवातीचा मजकूर’ नामक प्रस्तावनेत त्यांनी कादंबरीच्या लेखनाचा प्रवास सांगताना म्हटले की त्यांना भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी हे सांगितले आहे, आणि कारण असे लिहिले आहे की त्या कादंबरीशिवाय कोणीही रूपं आणि बांधणी मोडण्याचा प्रयत्न केला नाही. पण ह्या कादंबरीत तर तसे काही विशेष त्याबाबतीत वेगळेपण नजरेस येत नाही. भागवत ही व्यक्तिरेखा म्हणजे स्वतः महानोरच असावेत असा कयास करता येतो. कारण त्याचे शेतीवरील प्रेम, सदानकदा शेतावर असणे, थोड्या वेगळ्या विचारांचा ही भागवत नावाची व्यक्तिरेखा आहे. कादंबरी एक आख्खे प्रकरण तमाशा, संगीत बारी, त्यातील एक नृत्यांगना, आणि भागवताच्या मित्राचे तिच्यावर आणि तिचे त्याच्यावर निर्माण झालेले प्रेम याबद्दल आहे. महानोर हे अजिंठ्याजवळचे पळसखेड गावचे. त्यांना अगदी लहानपणीच संगीत बारी, तमाशा जीवन जवळून पाहायला मिळाले आहे असे त्यांनी कुठेतरी नमूद करून ठेवले आहे. त्याच्या आणि ह्या प्रकरणाचा संबंध त्यामुळे जोडता येतो. कादंबरी मध्येच थांबली असे मला वाटून गेले, प्रमुख व्यक्तिरेखांचे पुढचे आयुष्य, जीवनक्रम असे जाते, गावात आणखीन काय बदल होत जातात, हे अजून चितारला आले असते. निशिकांत ठकार यांनी केलेल्या या पुस्तकाचे हिंदी भाषांतर खुपच प्रसिद्ध झाले आहे असे समजले-एका लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.  पण मराठीतले हे मूळ पुस्तक तितकेसे प्रसिद्ध झालेले दिसत नाहीत.

गो नी दांडेकर: आशक मस्त फकीर

प्रसिद्ध साहित्यिक गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे, त्यानिमित्ताने पुणे आकाशवाणीत एक कार्यक्रम झाला आणि माझ्या काही आठवणींना उजाळा मिळाला.

गो नी दांडेकर हे खरे तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. गड-किल्ले, इतिहास हा तर त्यांचा आवडीचा विषय होताच. त्यांनी केलेली भटकंती, आणि त्यावर त्यांनी लिहून ठेवलेले आजही आम्हा भटक्या लोकांना उपयुक्त आहे. त्यांनी थोडी थोडकी नव्हे तर ९७ पुस्तके लिहिली. त्यांची काही पुस्तके मी वाचली आहेत, आणि ती अतिशय खिळवून ठेवणारी होती. उदाहरणार्थ, पवनाकाठचा धोंडी, पडघवली, माचीवरला बुधा, कोणा एकाची भ्रमणगाथा, स्मरणगाथा, रानभुली, महाराष्ट्र दर्शन, तसेच किल्ल्यांवरील त्यांची कित्येक पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत. उदा. दुर्गभ्रमणगाथा, दहा दिवस दहा दुर्ग इत्यादी.  दुर्ग-साहित्य हा प्रकार त्यांनीच सुरु केला असे म्हटले जाते. महाराष्ट्र दर्शन हे पुस्तक तर मला वाटते महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाबद्दलचे अत्र्यांच्या गावगाडा नंतरचे महत्वाचे पुस्तक आहे.

20160224_051633

त्यांना अनेक छंद होते. नाणी गोळा करणे, इतिहासातील पुराणवस्तू गोळा करणे, छायाचित्रण, अत्तरे गोळा करणे इत्यादी. मध्ये केव्हातरी पुणे आकाशवाणीवर उष:प्रभा पागे यांनी घेतलेली त्यांची एक जुनी मुलाखत प्रसारित झाली होती. त्यातही ते त्यांच्या छंदांविषयी भरभरून बोलले होते. त्यांनी गोळा केलेल्या ह्या सर्व वस्तूंचे संग्रहालय आहे का काय ते शोधायाला पाहिजे. गड-किल्ले पाहणे, आणि ते इतरांना दाखवणे, त्या बद्दल बोलणे हे तर त्यांना खूप आवडे.

गेल्या वर्षी मी जेव्हा सिमला मनाली भागात गेलो होतो, तेव्हा, भाक्रा नांगल धरण आणि  तो परिसर वाटेत लागला, तेव्हा त्यांच्या त्या विषयावरील आम्ही भगीरथाचे पुत्र कादंबरीची आठवण झाली. पवन मावळातील तुंग तिकोना परिसरात फिरताना हटकून पवना नदीकाठच्या त्या धोंड्याची आठवण होते. वीणा देव आणि विजय देव हे त्यांच्या काही पुस्तकांचे अभिवाचन करतात. त्याच्या त्यांनी ध्वनीमुद्रिका देखील बनवल्या आहेत. त्याही ऐकायला मजा येते. कर्नाळ्याच्या परिसरात गेले की त्यांच्या जैत रे जैत पुस्तकाची आणि चित्रपटाची आठवण येतेच. त्या त्या भागातातील त्या त्या व्यक्तीरेखा त्यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच कादंबऱ्यांचे नाट्यरुपांतर देखील झाले आहे आणि ती नाटके देखील बरीच प्रसिद्ध झाली आहेत.

वीणा देव यांच्या स्मरणे गोनीदांची या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, ते पुण्यातून तळेगाव येथे राहायला आले. त्यावेळी गांधीवधाच्या धामधुमीनंतर त्यांनी तो निर्णय घेतला. त्यावेळचे तळेगाव, अतिशय निसर्गरम्यच असणार. मी जेव्हा २०-२५ वर्षापूर्वी तेथे जायचो, तेव्हाच ते ठिकाण छान वाटे.  तळेगाव येथून मावळातील किल्ले आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळ असल्यामुळे, त्यांच्या दुर्गभ्रमंतीच्या छंदाला अगदी ते सोयीचे होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने, तळेगावात त्यांचे एखादे स्मारक व्हायला हवे. काही वर्षापासून गोनीदांच्या स्मरणार्थ दुर्ग साहित्य संमेलन भरते आहे, ते नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यांचा नावाची वेबसाईट आहे, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर त्यांच्या काही कार्यक्रमांचे footage देखील आहे, ते सुद्धा उपलब्ध व्हयला हवे. कार्यक्रमात त्यांनी गाडगे महाराज यांच्या हुबेहूब आवाजात केलेल्या कीर्तनाचे दुर्मिळ रेकॉर्डिंग ऐकवले गेले.

पुणे आकाशवाणी मध्ये काल झालेल्या कार्यक्रमाचे शीर्षक होते, गो नी दांडेकर-आशक मस्त फकीर. ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसेच होते असेच म्हणावे लागेल.