गंगुबाई हनगल

मागील महिन्यातच, जुलैच्या २१ तारखेला प्रसिद्ध गंगुबाई हनगल यांचा स्मृतिदिन झाला(२००९ साली या दिवशी त्यांचे निधन झाले होते). माझ्या सुदैवाने पुढच्याच वर्षी, म्हणजे २०१० मध्ये मला हुबळीला एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने जायला मिळाले. त्यावेळी मी त्यांच्या देशपांडे नगर या भागातील घरी गेलो होतो. तेथे घरातील दर्शनी भागात एक छोटेखानी संग्रहालय केले आहे. त्या सर्वांची आठवण झाली. मी फिल्म्स डिविजनने तयार केलेला त्यांच्यावरचा माहितीपट पहिला. त्या बद्दल थोडेसे आज लिहायचे आहे. उत्तर कर्नाटकातील विजापूर, हुबळी, धारवाड इत्यादी भागातील कलाकरांच्या, ख्यातकीर्त व्यक्तींविषयी, माझा लहानपण या भागात गेल्यामुळे विशेष जवळीक, आस्था आहे. त्या साऱ्याच्या विषयी कन्नडमधील साहित्य मराठी आणण्याचा मी छोटा मोठा प्रयत्न जमेल तसे करत असतो.

Gangubai Hangal Documentary

नुकतेच पंडित जसराज यांचे दुखःद निधन झाले. त्यांचे गाणे मी शेवटचे ऐकले ते गेल्या वर्षीच्या(डिसेंबर 2019) सवाई गंधर्व संगीत महोत्सवात. मंडपातील वातावरण अगदी भारावून गेले होते. खरे तर पंडित जसराज यांना २०१६ मध्येच गंगुबाई हनगल पुरस्कार मिळाला होता. पंडित जसराज यांचे त्यांचे भक्तिपूर्ण गायन, तसेच भजने(हवेली संगीत) लोकप्रिय होती. संगीत क्षेत्रातील जुने जाणते तारे एकेक करून अस्ताला पावत आहेत. अर्थात त्यांचे काबिल शिष्यगण उदय पावत आहेत, उदयास पावले देखील आहेत. हे कालचक्र आहे, त्याला काय करणार! थोडेसे विषयांतर झाले, असो.

फिल्म्स डिविजनचा हा १९८५ मधील गंगुबाई हनगल यांच्यावरचा माहि.तीपट मला भावला. गंगुबाई यांच्या चरित्राशी निगडीत काही पुस्तके देखील उपलब्ध आहेत. माझ्याकडे गंगुबाई यांचे कन्नड मधील आत्मचरित्र(ನನ್ನ ಬದುಕಿನ ಹಾಡು) आहे. संध्या देशपांडे यांचे मराठीत स्वरगंगा गंगबाई हनगल या नावाने आहे, ते मी वाचनालयातून मिळवून वाचले होते. गंगावतरण नावाचे अनुवादित पुस्तक माझ्याकडे आहे, जे कन्नड मध्ये दमयंती नरेगल यांनी लिहिले आहे(सुनंदा मराठे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.) गंगुबाई ह्या उत्तर कर्नाटकातील हुबळी-धारवाड भागातील ग्रामीण भागातून स्वातंत्र्यापूर्वी उदायास आलेल्या तश्या उच्चभ्रू समाजातील नसलेल्या स्त्री गायिका. हा भाग पूर्वी ब्रिटीशांच्या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सी अंतर्गत होता. ह्या वैशिष्ट्यपूर्ण भागात मैसूर कडील संस्कृतीचा, कर्नाटक संगीताचा तसेच मराठी, आणि हिंदुस्थानी संगीताचा मिलाफ झालेला. एकमेकांवरील हा प्रभाव संगीत, नाट्य, तसेच चित्रपट क्षेत्रात देखील दिसतो. संगीत नाटक मंडळ्या आपली संगीत नाटके घेऊन या भागात दौरे करत असत. मी काही वर्षांपूर्वी कन्नड मधून मराठीत अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी या याच भागातील गायक-नटीच्या चरित्रामध्ये याचा आढावा घेतला गेला आहे. अमीरबाई आणि गोहरबाई या दोघी बिळगी भगिनी म्हणून संगीत नाटक, आणि गायन क्षेत्रात त्याच काळात प्रसिद्ध होत्या. स्त्री कलाकारांना बाई या विशेषणाने संबोधले जाई. गंगुबाई यांच्या मातोश्री या देखील गायिका होता, कर्नाटक संगीत गात असत. उपरोल्लिखित माहितीपटातून देखील या भागाचे चित्रीकरण सुंदरपणे केले आहे.

गंगुबाई ह्या किरणा घराण्याच्या गायिका. त्यांचे नाव घेतले कि पंडित भीमसेन जोशींची देखील आठवण येते. दोघांचे गुरु एकच-सवाई गंधर्व (पंडित रामभाऊ कुंदगोळकर). तिघेही हुबळी-धारवाड या उत्तर कर्नाटकाच्या भागातील. किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खान मिरजेत वास्तव्य करत असत(मिरजेच्या वाद्य कारखाना उद्योग परंपरे विषयी मी पूर्वी लिहिले आहे-मिरजेची सतारवाली गल्ली). गंगुबाई आधी सवाई गंधर्व यांच्या कडे शिकायला जाऊ लागल्या, नंतर काही वर्षांनी भीमसेन जोशी तेथे शिकायलाआले(त्याची कथा तर सर्वश्रुत आहे. भीमण्णा उत्तरेत जालंधरला विनातिकीट रेल्वे प्रवास करून, घरातून गाणे शिकण्यासाठी पळून गेले होते. तिकडे गेले असता पंडित. विनायकबुवा जोशी यांनी त्यांना परत आपल्या घरी पाठवून, हुबळी जवळच कुंदगोळ येथे वास्तव्यास असलेल्या सवाई गंधर्व यांच्याकडे पाठवले. त्याचा जन्म देखील तिथलाच). या मुळे गंगुबाई आणि भीमण्णा यांचे बहिण भावाचे नाते जुळले आणि ते टिकले, प्रसिद्ध देखील झाले.

गंगुबाई तर आधी आईकडून कर्नाटक संगीत शिकत होत्या (नाटककार विष्णुदास भावे यांच्या पणती श्यामला भावे ह्यांना उभयगानविदुषी असे म्हणतात, कारण त्या कर्नाटक आणि हिंदुस्थानी या दोन्ही पद्धतीचे गाणे गातात. गंगुबाई यांना जवळ जवळ २५-३० पदव्या, नमाभिधान बहाल करण्यात आली आहे, त्यात अशी पदवी मिळाल्याचे मला तरी माहित नाही). त्यांनतर काही काळाने हिंदुस्तानी गायन शिकायला सुरुवात केली. तसेच एक-दोन ग्रामोफोन रेकॉर्ड्स देखील केल्या होत्या. नंतर त्यांनी आईच्या सांगण्यानुसार सवाई गंधर्व यांच्या कडे कुंदगोळ येथे हनगल ह्या त्यांच्या गावातून रोज गाणे शिकायला येत असत. हा प्रवास रेल्वेने करावा लागत असे(Madras and Southern Maratha Railway). बरोबर तिचे मामा असत. भीमण्णा सवाई गंधर्व यांच्या घरीच राहून गाणे शिकत. गंगुबाई यांना ते त्या काळी शक्य नव्हते. स्त्री असल्यामुळे गुरूगृही न राहता, दररोज ये-जा करत, लोकांच्या हीन नजरा, आणि बोलणे चुकवत गाणे शिकावे लागले.  हि सगळी गोष्ट, मी आधी म्हटल्या प्रमाणे स्वातन्त्र्यापुर्वीच्या काळातील.

गंगुबाई यांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये अपार कष्ट करून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांच्या आईचे आणि तसेच त्यांच्या इतर कुटुंबियांचे देखील त्यात योगदान आहे. गंगुबाई हनगल यांचे गाणे म्हटले कि डोळ्यांसमोर येते ती त्यांची छोटेखानी शरीरयष्टी, गाताना कानावर विशिष्टपणे हात ठेवणे, तसेच त्यांचा तो पहाडी, पुरुषी स्वर, आवाज! चरित्र वाचताना तसेच माहितीपटात त्यांची मुलाखत पाहताना त्यांचा मृदू स्वभाव, त्यांचे आई विषयी असलेले अपार प्रेम(त्या त्यांच्या पहिल्या गुरु, आणि फार लवकर त्यांचे निधन झाले) हे समजते. एक स्त्री म्हणून असलेल्या सर्व सामाजिक बंधनांना त्या काळी तोंड देऊन, वेळप्रसंगी निर्धाराने सामना करत, आपल्या ध्येयाप्रती निष्ठा बाळगून त्यांनी आपले गाणे फुलवले.

आपल्या पुण्यात जसे सवाई गंधर्व संगीत महोत्सव असतो, तसाच सवाई गंधर्वांच्या गावी, कर्नाटकात कुंदगोळ येथे नाडगिर यांच्या वाड्यात (कुंदगोळ हे गाव जमखिंडी संस्थानच्या अंतर्गत होते) देखील तो असतो. गंगुबाई थेथे जात आणि आपली संगीत सेवा सदर करत. या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताचा प्रसार, आवड कशी जोपासली जाते आहे, एकूणच तेथील वातावरणाचे देखील या माहितीपटात छान चित्रीकरण आले आहे.

आकाशवाणी वरून गंगुबाई हनगल यांचे गाणे, का कोणास ठाऊक, विशेष ऐकू येत नाही. गंगुबाई हनगल आणि त्यांच्या सारख्या कलाकार जसे अमीरबाई कर्नाटकी, केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डूकर, हिराबाई बडोदेकर, रहमानव्वा आणि इतर अनेक जणी असतील, ज्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती, प्रतिकूलता, प्रसंगी कौटुंबिक विरोध पत्करून, एका ध्येयनिष्ठेने कला आत्मसात केली त्याला तोड नाही. इतक्यातच शास्त्रीय संगीतावर आधारित एक वेबसेरीज आली आहे Bandish Bandits या नावाची. त्यात थोडीफार याची झलक पाहायला मिळते. तिचा विषय अर्थात वेगळा आहे. नवे आणि जुने यांच्यातील संघर्ष याचे चित्रीकरण त्यात आहे.

प्रसिद्ध गायिका वीणा सहस्रबुद्धे यांच्या वर देखील मी काही वर्षापूर्वी लिहिले होते. ते देखील जरूर वाचा.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१) आणि लगेचच दुसरा भागही सदर केला होता(भाग#२).

आज तिसरा भाग देत आहे. मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#३

लहानग्या गुरुदत्तला त्या सगळ्या मुलांना सोडून जावेसे वाटत नसावे. पण रेल्वेचा प्रवास असेल किंवा त्या घरातून बाहेर पडलो असेल ह्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर तरी उत्साह होता. रेल्वे निघाल्यावर त्याने मुलांना हात हलवून ‘बाय बाय’ केले. काळा सारखी जशी जशी रेल्वे पुढे जात होती, तसे तसे त्या मुलांचे चेहरे धूसर होत गेले. गुरुदत्त थोड्याच वेळात झोपी गेला. दीड दिवसाच्या रेल्वे प्रवासानंतर आम्ही कलकत्त्याला पोहोचलो. गुरुदत्तला मागील कलकत्ता भेटीची आठवण असावी असे वाटले. तो कलकत्त्याला पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या त्यावेळच्या बंगाली मित्रांकडे गेला. यजमानांना देखील छोटीशी नोकरी मिळाली. दीड महिन्यात मला दुसरा मुलगा झाला. गुरुदत्तच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाळाला सोडून एक क्षण देखील जात नसे. त्याने खेळणे देखील सोडून दिले. पाळण्याला झोके देणे, बाळ रडले तर त्याला टाळ्या वाजवून शांत करणे हे त्याचे काम झाले होते. बाळाला पाहून त्याला ते एखादे बाहुले आहे कि काय असे वाटत असावे. बाळाला तीन एक महिने झाल्यावर जवळच एक खोली भाड्याने आम्ही घेतली. जवळच एक मोठेसे मैदान देखील होते. संध्याकाळी तेथे एक जण काही बंगाली मुलांना घेऊन येऊन त्यांना विविध खेळ शिकवत असे. तसेच टागोरांची प्रार्थना-गीत शिकवत असे. माझ्या मावशीचा मुलगा देखील जवळच राहत असे. त्यांची मुले आणि गुरुदत्त हि सर्व मुले त्या मैदानात जात, आणि इतर मुलांसोबत खेळत. तेथे शिकलेली गाणी गुरुदत्त घरी येऊन माझ्यासमोर येऊन म्हणत असे. तो साधारण चार वर्षांचा असावा. त्याला शाळेत घालायचे होते. त्याच्या वडिलांना बंगाली भाषेबद्दल तिरस्कार होता. गुरुदत्तला बंगाली शाळेत पाठवू नये असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळे जवळ असलेल्या एका नगरपालिकेच्या शाळेत त्याचे नाव घातले. त्या शाळेतील शिक्षकांची वागणूक, विद्यार्थ्यांना मारपीट हे सर्व पाहून गुरुदत्त मनातून बिचकला. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर त्याचा चेहरा पडलेला असायचा, ते पाहून माझ्या पोटात कालवाकालव होत असे. गुरुदत्तचा शाळेत जायचा उत्सव काही दिवसातच मावळला.

ह्या दरम्यान माझा दुसरा मुलगा शशिधर आजारपणामुळे, तीन दिवस अस्वस्थ होता, त्यातच तो गेला. गुरुदत्तला अतोनात दुःख झाले. त्याला ज्वर चढला. मी घाबरले. भावाच्या घरी जावे तर येऊ देईना. कलकत्त्याजवळ पद्दपुकुर गावाच्या रस्त्यावर अजून एकजण नातेवाईक राहत असत, त्यांच्या कडे गेलो. तिथे गेल्या वर गुरुदत्तला बरे वाटू लागले. नवीनच सुरु झालेल्या मद्रासी शाळेत त्याला पाठवयला लागले. फक्त पाच मुलांना घेऊन सुरु झालेली ती शाळा राष्ट्रीय पातळी वरील शाळा झाली. वर्षभरात जन्माला आलेला आत्माराम आणि गुरुदत्त त्याच शाळेत शिकले. जीवनातील शांती गेली होती, ती हळू हळू पूर्ववत येऊ लागली. गुरुदत्त त्याच्या भावासोबत दिवसभर राहू लागला. त्याला लहानपणापासूनच लाल रंगाचे आकर्षण. एके दिवशी मी स्वयंपाक संपवून स्टोव्ह बंद करून बाळाजवळ गेले. गुरुदत्त कुठून तरी धावत आला, आणि त्या गरम स्टोव्हला हात लावला. आणि चटका लागून जोरात ओरडला. जवळ जाऊन पाहते तर त्याची बोटं भाजलेली होती. डोळ्यातून पाणी येत होते, पण तोंडातून आवाज नव्हता. त्याची ती सहनशीलता त्याच्या वयपरत्वे अधिकच होती असे आता वाटते.

एप्रिल मे महिन्यात बंगाली लोकांचा ‘पोयला बैशाख’ हा उत्सव असतो, तो आमच्या घराजवळ साजरा होई. त्या ठिकाणी जत्रेसारखे स्वरूप येई. गावागावातून विविध रंगांच्या बाहुल्या विकायला येत, विविध प्रकारची खेळणी देखील येत. आठवडाभर हा उत्सव चाले. तो पाहायला पंचक्रोशी मधून लोकं येत. त्यांच्या रात्रीभर मनोरंजनाचे कार्यक्रम देखील होत असत. नाटक, गाणी, संगीत, नृत्य आदींचे कार्यक्रम आयोजित केले जात. गुरुदत्त देखिल शेजाऱ्यांबरोबर तेथे जात असे. त्याला भाषेचा विशेष अडसर नसे. हिंदी, बंगाली तो चांगली बोलत असे. तमिळ देखील त्याला थोडेसे येत असे. त्याला तेहील प्रत्येक गोष्टीत रुची होती. रात्री जे जे पहिले ते सारे तो मला दुसऱ्यादिवशी कथन करे.

गुरुदत्त सहा वर्षांचा झाला तेव्हा आम्ही सध्या राहत असलेले घर सोडून, जवळच त्याच रस्त्यावरील दुसऱ्या एका घरी राहायला गेलो. दोन खोल्यांचे स्वतंत्र असे ते घर होते. असे घर आम्हाला पहिल्यांदाच मिळाले होते. आमच्या शेजारी आमच्या दूरच्या नात्यातील एकजण राहत होते. मुलांना खेळण्यासाठी अंगण होते. गुरुदत्तने तेथे त्याच्या छोट्या बॅटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. आजूबाजूच्या मुलांना गोळा करून त्याने स्वतःचे एक टोळके तयार केले होते आणि खेळत असे. खेळ नसला कि माझ्याकडून तो पुस्तकातील गोष्टी ऐकत असे, नंतर तो स्वतः वाचत असे. उरलेल्या वेळात तो आत्माराम बरोबर खेळतच असे. आमच्या भागात कोणी एक ख्रिश्चन कुटुंब राहत असे. ते प्रोफेसर होते. ते गुरुदत्त बरोबर भोवरे, गोट्या खेळायचे, त्याला थोडेफार गणित शिकवायचे. एकदा त्यांना सुट्टी असताना, दार्जीलिंगला त्यांच्याबरोबर गुरुदत्तला घेऊन जाईन असे म्हणाले. माझी आणि आणि यजमान नको म्हणाले. त्यांच्या बरोबर गप्पा मारायला गुरुदत्तला आवडे. ते दोघे काय असे बोलत असत, देवालाच माहित.

गुरुदत्त काही बाबतीत खूप आग्रही होता. त्याच्या मना सारखेच झाले पाहिजे. शाळेतील अभ्यासाकडे, लिहिण्या-वाचण्याकडे त्याचे विशेष लक्ष नसे. पण कथा, गोष्टींची पुस्तके खूप वाचे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करे, सांगितलेले ऐकत नसे, त्यामुळे कधी कधी माझ्या कडून त्याला मार बसे.

त्या घरात आम्ही पाच वर्षे राहिलो. लहानपणापासूनच त्याला बंगाली लोकनाट्य पाहायला आवडे. घराजवळ असलेल्या मैदानात अशी लोकनाट्ये रात्रभर होत असत. रामायण, महाभारत, राजा हरिश्चंद्र या सारख्या पौराणिक कथेवर रचलेली नाटके तेथे होत असत. पुरुषच स्त्री पात्रे करत असत. गुरुदत्त त्याच्या मित्रांना घेऊन रात्रभर ती नाटके पाहत असे. दिवसभर भावासमोर पाहून आलेल्या नाटकातील प्रसंग अभिनय करून दाखवत असे. आत्माराम देखील त्याचा तो आवेश पाहून हसत असे. गुरुदत्तचा आवाज विशेष चांगला नव्हता. तरीसुद्धा तो गाणी म्हणण्याचे थांबवत नसे. त्याचे गाणे ऐकून आत्माराम टाळ्या पिटत हसत गोधंळ घालत असे. आमची आर्थिक परिस्थिती तर कायमच ठीक नसे. असलेल्या पैश्यातून थोडे बाजूला ठेऊन गुरुदत्त साठी जुनी पुस्तके आणून देत असू, तेव्हा गुरुदत्त खुश होत असे. ती तो त्याच्या मित्रांना अभिमानाने दाखवत असे. आत्माराम सुद्धा चार वर्षे झाल्यावर त्याला शाळेत दाखल केले. गुरुदत्त आणि तो एकमेकांचे हात धरून शाळेत जात तेव्हा राम-लक्ष्मण यांची जोडी डोळ्यांसमोर येई. त्याच सुमारास आमची मुलगी ललिता हिचा जन्म झाला. गुरुदत्त त्याच्या भावाचा म्हणजे आत्मारामचा सांभाळ करत असे. मी हॉस्पिटल मधून आल्यावर दोघांना किती आनंद झाला! ती दोघे एकमेकांना सोडून राहत नसत. हि मुलगी मात्र ‘रोती सुरत’ होती, कायम रडत असे. प्रकृतीने अतिशय अशक्त देखील होती. गुरुदत्त त्याच्या परीने तिला शांत करत असे.

ह्या दरम्यान माझ्या भावाला बर्मा मध्ये देशात जावे लागले. त्यामुळे त्यांच्या घरी आम्ही राहायला गेलो. तेथे जवळच कालीमातेचे मंदिर होते. नवरात्रीच्या वेळेस तेथे मोठा उत्सव होत असे. दुर्गाष्टमीचा दिवस तर विशेष असे. नाटके, गाणी-बजावणी, नाचगाणी होत असत. गुरुदत्त ते सर्व तहानभूक, झोप विसरून पाहायला जात असे. सकाळी संध्याकाळी पूजेसाठी हजर असे. नमस्कार करत असे, जवळ असलेले पैसे तो तेथील भिक्षुकांना वाटत असे. पैसे नसतील तर जवळ काही खायला असेल तर ते देऊन टाकत असे. घरासमोरील मैदानात मुलं मुलं खेळत असताना काहीतरी भांडण तंटा झाला, मारामारी झाली तरी घरी काही सांगत नसे.

त्या वेळेस गावाकडून कामासाठी आलेल्या एकाला आमच्या घरी कामाला ठेऊन घेतले. दुर्दैवाने तो एका आठवड्यातच आजारी पडला. हि सगळी मुले त्याची सुश्रुषा त्यावेळी करत असत. त्याचे दावा-पाणी, पथ्य वगैरे गुरुदत्त पाहत असे. चौथ्या दिवशी माझा चित्रकार असलेला भाऊ आला. भावाने त्याला पहिले. त्याच्या अंगावर कांजिण्या उठल्या होत्या. मुले त्याच्या जवळ जातात म्हणून तो मला रागावला. त्याची हॉस्पिटल मध्ये रवानगी करायची व्यवस्था त्याने केली. नंतर काही दिवसांनी तो हॉस्पिटल मधून पळून गेला अशी बातमी आली, तर काही लोकं म्हणत कि तो मरण पावला आहे. अजूनही त्याचे काय झाले हे समजले नाही.

१९२४ मध्ये बिहार मध्ये आणि कलकत्त्यात देखील भयंकर भूकंप झाला. बिहार मध्ये हजारो लोकं मृत्यूमुखी पडले. घरं पडल्यामुळे कित्येक लोकं बेघर झाले. कलकत्त्यात देखील भूकंपाचे लहान लहान धक्के आम्हाला जाणवेल. पण विशेष हानी झाली नाही, असे असले तरी गरीब लोकांच्या झोपड्या वगैरे पडल्या, काहींनी प्राण देखील गमावले. मुले मैदानात खेळत असताना तेथे असलेली एक मोठी भिंत पडली होती. नशिबाने कोणाला काही झाले नाही. त्यांच्या कडे जावे तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे उभे राहता, चालता अशक्य झाले होते. काही वेळाने भूकंप थांबल्यावर सगळी मुले आपल्पल्या घरी गेली. रात्री सगळे घाबरले होते, परत भूकंप होतो कि काय, छप्पर पडते कि काय अशी भीती. देवाच्या दयेने तसे काही झाले नाही.

बर्मा देशातून मधून माझा भाऊ परत कलकत्त्याला आला. आम्हाला परत दुसऱ्या घरी जावे लागले. नवीन घर जरा लांब असल्या कारणाने मुलांना शाळेत बसने जावे लागत असे. ह्या घरात खोल्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या, स्वयंपाकघर एकीकडे तर न्हाणीघर दुसरीकडे, आणि झोपण्याची खोली तिसरीकडे. त्यामुळे घरात फेऱ्या मारून दिवसभर मी दमत असे.

ललितेला तीन वर्षे पूर्ण झाली होती. लहानपणापासूनच ती हट्टी. त्यामुळे ती माझ्याकडून सारखा मार खाई. माझी आई भावाकडे त्याला मुलगा झाल्या कारणाने गेली होती. मला तीन तीन मुलांचे करणे, घरातील कामे, यजमानांचे करणे, मुलांच्या खोड्या, मस्ती हे सगळे सांभाळता सांभाळता नाकी नऊ येत होते. गुरुदत्तची त्याच सुमारास शाळेतील वेंकट नावाच्या मुलाशी मैत्री झाली होती. त्यामुळे परत तो घरी वेळेवर घरी येत नसे. शाळेत देखील जात नाही असे कानावर आले होते. इतका हुशार मुलगा कुसंगतीमुळे वाया जाऊ नये अशी मला कायम काळजी वाटत असे. त्यामुळे मला संशय आला. आणखीन एका घटनेने माझा संशय आणखीन बळावला. अनेक वेळेस घरात एके ठिकाणी ठेवलेले पैसे गायब होऊ लागले होते. एके दिवशी ह्याच्या खिशातून दहा रुपये घेताना माझ्या दृष्टीस पडले. त्या दिवशी मी त्याला जेवढे मारले तेवढे कधीही मारले नव्हते. गुरुदत्तचे मन हळवे झाले. त्याला त्याची चूक उमगली, त्याने क्षमा मागितली, आणि पुढे असे करणार नाही असे वचन देखील दिले. वेंकट बरोबरची मैत्री त्या दिवशी पासून तुटली. त्या तसेच तो पुढे कधीही खोटे बोलला नाही, दुसऱ्यांनी खोटे बोलले त्याने खपवून घेतले नाही. गुरुदत्त परत जसा होता तसा झाला.

मला चार महिन्यांचा गर्भ राहून तो पडून गेला. त्यामुळे मी अशक्त झाले होते. न्हाणीघरात गरम पाणी नेत असताना मी पाय घसरून पडले आणि मला मुका मार लागला. तसेच पोटावर गरम पाणी देखील पडले. औषध चालू होते तरी पण मी एकूणच संसाराला वैतागले होते. ह्यातून मी बरी झाले तर ठीक असे वाटत होते. गुरुदत्त वर सगळा भर पडला होता. माझी आई सकाळी येऊन स्वयंपाक करून जात असे. बाकी सगळे गुरुदत्तच करत असे दिवसभर, इतर मुलांना सांभाळायचा देखील. डॉक्टरांनी सहा महिन्यांची सक्तीची विश्रांती सांगितली होती, त्यामुळे परत निरुपायानेअहमदाबादेचा आश्रय घ्यावा लागला. घरी सगळ्या तऱ्हेच्या सोयी होत्या. त्यांना दोन मुले होती. एक मुलगा आणि दुसरी मुलगी, जी आत्मारामच्या वयाची होती. मुलगा ललिताच्या वयाचा होता. गुरुदत्त तेच दहा वर्षांचा होता. त्या वयात मुलांना कुतूहल जास्ती असते. माझ्या सासऱ्यांना विचारून तो त्यांच्या बरोबर कापडाच्या गिरीणीत जात असे. तेथे सुतकताई कसे करतात, त्याला रंग कसा देतात हे सर्व तो पाहत असे. सासरे मोटार गाडी चालवत असताना त्यांच्या शेजारी बसून हजार प्रश्न विचारी. मोटार गाडी चालवताना लक्षपूर्वक पाहत असे.
त्याकाळी कामगारांची युनियन असे काही नव्हती. त्यांची पिळवणूक होत असे. काही चूक झाली की सासरे सोट्याने मारत असत. गुरुदत्तला हे बघवत असे. पण हे असे का असे विचारायचे धैर्य त्याच्या जवळ नव्हते. आम्ही तिथे २-३ महिने राहिलो आणि माझ्या भावाला नकोसे वाटू लागले.

भावाने एकदा विचारले कि मी काही काम का करत नाही ते. त्यावेळी मी वर्तमान पत्रातून, मासिकातून लिहित असे. माझे स्वतःचे, तसेच यजमान देखील लिहून देत ते देखील मी माझ्या नावावर देत असे. त्याने ते बोलून दाखवले. माझ्या मनाला ते लागले. त्यामुळे मी मनाचा हिय्या करून पंधरा दिवसांत हिंदी भाषेत स्वतः चित्रपटाची कथा लिहिली, तिचे नाव ‘जवानी के जुर्म’. मला चित्रपट व्यवसायाबद्दल काही माहिती नव्हते. काही दिवसातच मुंबईला आल्यावर एका ओळखीने रणजीत स्टुडीओ मध्ये गेले आणि चंदुलाल शहा, चतुर्भुज दास यांना भेटले. त्यांना मी माझी चित्रपट कथा दाखवली. त्यांना ती आवडली आणि ती ठेवून घेतली. त्यावेळी मिस गोहर ही अभिनेत्री प्रसिद्ध होती. काही कारणाने चित्रपट सृष्टीत पाउल ठेवणारी मी पहिली असेन. काही वेळी शुटींग पाहायला गेले असता गुरुदत्तला बरोबर घेऊन गेले होते. तो सर्वांना आवडला होता. पुढी त्याच्या जीवन-कार्यासाठी हिच नांदी ठरली. मुंबई मध्ये त्या वेळी असताना श्रीमती हिराबाई बडोदेकर, श्री अब्दुल करीम खान यांच्या संगीत मैफिलीला जाण्याचे सौभाग्य मला आणि गुरुदत्तला मिळाले होते. गुरुदत्त तर तीन तीन तास तल्लीन होऊन तो त्यांचे गाणे ऐकत असे! त्याला कंटाळा येत असे.

त्याच सुमारास मुंबईत प्रसिद्ध नर्तक उदयशंकर यांचा दौरा होता. त्यांच्या कार्यक्रमाचे कोणी एका ओळखीच्या माणसाने दोन प्रवेशपत्र आणून दिले. गुरुदत्तला माझ्या बरोबर यायचे होते, पण त्याला जमले नाही. किती सुंदर कार्यक्रम होता तो! ह्या जन्मात मी काही ते विसरणार नाही. त्यांचे ‘शिव-पार्वती’ हे नृत्य पाहताना साक्षात शिव-पार्वती कैलास येथून अवतरले आहेत कि काय असे वाटले. पुरातन वाद्ये, पौराणिक वेश-भूषा परिधान केलेले वेगवेगळी पात्रे, आणि साऱ्या रंगमंचावर त्यांचा वावर, त्यामुळे डोळे एका ठिकाणी ठहरत नव्हते. तो कार्यक्रम पाहून मी धन्य झाले. मुंबईला आले त्याचे सार्थक झाले असे वाटले. परत घरी आले आणि माझ्या आनंदावर विरजण पडले. गुरुदत्त त्याला घेऊन गेले नाही म्हणून रुसला होता, रडून झाले होते, जेवला देखील नव्हता. त्याची समजूत काढे पर्यंत माझा जीव गेला. पुढचे तीन दिवस त्याच्या मनात रुतून बसले होते. तो मला म्हणे, ‘आई, मी उदयशंकर यांच्या सारखे रंगभूमी वर नक्की येईन. तू पहाच.’ मुलांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देते का? मी हसले होते त्यावेळेस. पण एकदा त्याच्या मानाने घेतले कि तो ते करणारच हे देखील पुर्वानुभावावरून मला माहिती होते.

आम्ही सगळे कलकत्त्याला परत गेलो. मी काहीतरी काम करून पैसे कमावले पाहिजेत असे वाटत होते, तर गुरुदत्तला उदयशंकर यांच्या सारखे व्हायचे होते. माझा चित्रकार भाऊ जाहिरातीचे काम करत असे त्यामुळे त्याची उदयशंकर यांच्याशी चांगलीच ओळख होती. गुरुदत्त माझ्या भावाचे प्रवेशपत्र घेऊन अनेक वेळाला उदयशंकर यांच्या कार्यक्रमाला जाई, त्यांच्या नृत्यसंचातील अनेकांच्या ओळखी त्याने करून घेतल्याचे मला कितीतरी नंतर समजले. मुलांना चित्रपट पाहायला घेऊन जाण्याचा तो काळ नव्हता तरी, तो भावाबरोबर अनेक उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पाहायला जाई. माझ्या पासून तो काही लपवत नसला तरी, तो नृत्य शिकतो आहे हे त्याने गुप्त ठेवले होते. आम्हा सर्वाना आश्चर्यचकित करायची त्यांची इच्छा होती.

मी ‘भोला-मेन्शन’ मध्ये राहायला आले, तेव्हा दोन गुजराती महिलांना इंग्रजी शिकवायला सुरु केले. दहा रुपये देत. पहिल्यांदा मला दहा रुपये मिळाल्यावर मला इतका आनंद झाला काय सांगू! केवढा आत्मविश्वास, धैर्य माझ्या मनात गोळा झाले त्यामुळे. नव्यानेच सुरु झालेले शिवमंगल प्रतिष्ठान च्या हॉस्पिटलच्या नर्सना मी इंग्रजी शिकण्यासाठी मदत करत असे. औषधांची नावे, शस्त्रक्रियेच्या अवजारांची नावे मी त्यांना सांगत असे. श्रीमती सरस्वती पालेकर नावाच्या कोणी श्री रामकृष्ण मठाच्या शिष्या होत्या. ती घरोघरी जाऊन रुग्णांना हॉस्पिटल मध्ये दाखल करत असे. ह्याच हॉस्पिटल मध्ये माझ्या एका मुलाचा जन्म झाला होता. श्रीमती सरस्वती यांना काही जणींना एल सी पी एस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पाठवावे असे वाटले. त्यावेळी मात्रिक झालेल्या लोकांना देखील तो कोर्स करता येई. माझी पण त्यांनी निवड केली. आणि आम्ही पाच जण होतो. सुरुवातीला त्या आम्हाला दहा रुपये शिष्यवृत्ती म्हणून देत असत. सहा महिने मी घरच्यांचा रोष पत्करला. घरातील काम, माझ्या शिकवण्या सांभाळून मी तो वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा केला. डॉक्टर पाल म्हणून कोणी होते ते आम्हाला फिजीओलॉजी, बायोलॉजी शिकवत असत. मी पदवी मिळवून, डॉक्टर होऊन लोकांची सेवा करत, परोपकार करायचे असे शेख मुहम्मदी स्वप्न पाहत होते. असे असले तरी देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आम्हाला मिळणारी शिष्यवृत्ती थांबली. त्याच्या शिवाय मला शिक्षण सुरु ठेवण्यासाठी अर्थसहाय्य नव्हते. त्यातच मला दिवस गेलेले. माझी डॉक्टरकी तेथेच थांबली. माझ्याबरोबरील इतर लोकं होती त्यांनी चारही वर्षे शिकून संपवली.त्यातील एकीने, इंदिरा तिचे नाव, तिने प्रसूतीगृह सुद्धा सुरु केले. तिथेच माझा शेवटला मुलगा जन्माला आला. गुरुदत्त त्या वर्षी शालेय परीक्षेत नापास झाला. शाळेतील अभ्यासक्रमाची पुस्तके तो वाचत नसे. कादंबऱ्या, नाटके, काव्ये, आणून तो वाचत बसे. तो नापास होण्यास मीच कारणीभूत आहे असे माझ्या आईने मला सुनावले. त्या वेळेस मी matric च्या परीक्षेसाठी बाहेरून बसावे असे ठरवले. मी बाळंत होई पर्यंत शिकवण्या करत, तसेच परीक्षेचा अभ्यास करत बसे. बनारस मधील काशी विश्वविद्यालय मध्ये त्या वेळी बाहेरून matric परीक्षेसाठी बसता येत असे. तेथे संगीत हा विषय घेऊन पदवी पर्यंत शिकता येते हे समजले, तेव्हा मी संगीत देखील शिकू लागले. पुरोहित नावाचे एक संगीत शिक्षक होते, त्यांच्या कडे तीन महिने शिकले. ते शिकवताना आत्माराम जवळ असे. त्यांचे तबला वादन तो लक्षपूर्वक ऐकत असे. तो कधी कधी गुरुजी नसायचे तेव्हा साथ देत असे. मला परीक्षेला बसायला बनारस येथे जायचे होते, पण ह्यांनी मनाई केली, त्यामुळे ते प्रकरण तेथेच मिटले.

१९३४ मध्ये मला अजून एक मुलगा झाला. त्यावेळेस कलकत्त्यात blackout चा सराव करत असत. युरोपात युद्ध सुरु होते. आपल देश ब्रिटीशांच्या हातात होता, त्यामुळे आपल्याला युद्धाची झळ लागेल असे लोकं म्हणत. गुरुदत्त त्यावर्षी शाळेत परीक्षेत पास झाला. तरीसुद्धा माझे कुटुंबीय म्हणत, ‘त्याला सगळ्यात रुची असते. पण तो कुठल्याच विषयात पुढे जाणार नाही. ह्या मुलाला पोट भरण्यासाठी काही विद्या शिकणार नाही. दुसरेच प्रयोजन नसलेले उद्योग करणार हा’ आणि निरुत्साही करत. कोणी काही म्हटले तरी माझा गुरुदत्तवरील विश्वास काही कमी झाला नाही. तो सुद्धा माझा विश्वास कमी होणार नाही असे वागत होता. त्याला एकाएकी अंगावर कांजिण्या उठल्या आणि तीन महिने तो त्यातून बरा झाला नाही. शाळेत जाऊ शकला नाही, पण शाळेतील मित्रांकडून अभ्यास समजावून घेऊन तो परीक्षा उत्तीर्ण झाला.

मला माझ्या एका बंगाली मैत्रिणीकडून समजले कि कलकत्ता विश्वविद्यालय देखील बाहेरून matric परीक्षेसाठी परवानगी देते. ह्या मैत्रिणीने मला अनेक प्रकारे सहाय्य केले होते. १९४१ मध्ये मी परीक्षेला बसले, आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मनात राहिलेली माझी कित्येक वर्षांची आकांक्षा आज पूर्ण झाली होती.

१९४१ मध्ये गुरुदत्त देखील matric परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचे वय त्यावेळेस पंधरा वर्षांचे होते. परीक्षा संपल्यावर टायपिंगच्या क्लासला जावे असे मी सुचवले. त्याने ते मनावर घेतले नाही. ह्याच दरम्यान त्याने रंगभूमीवर अनेक नृत्य सदर करून पदकं देखील मिळविली होती. तो करत असलेल्या नृत्यांपैकी स्नेक-चार्मर हे नृत्य खूप मनमोहक असे. त्याच्या बरोबर एक शिख मुलगी देखील नाचत असे. तिचे नाव अमरजित. ती मुलगी वारंवार घरी येऊ लागली. मला हे पटत नव्हते. तेवढ्यात त्याच मुलीने, आई-वडिलांच्या धाकाने, नृत्य थांबवले.

गुरुदत्तच्या मनाला दुःख झाले असणार. त्याच सुमारास त्याला महिना चाळीस रुपयांची नोकरी लागली. पहिला पगार त्याने घरातील सर्वाना भेटवस्तू आणून खर्च केला. त्याच्या गुरुजीना भगवत गीता आणून दिली. पुढच्या पगारात त्याने दहा रुपयात एक सायकल घेतली. ती नवीन सायकल अधून मधून स्वच्छ करण्यात तो वेळ घालवू लागला, बहिणीला त्यावर बसवून फिरवून आणत असे. त्या वेळेला हिटलरने झेकोस्लोव्हेकिया वर विजय मिळवला होता. त्यामुळे सगळीकडे ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ असे बोर्ड लागले होते. त्याच सुमारास माझा धाकटा मुलगा झाला होता, त्याला गुरुदत्तने त्यामुळे विजय हे नाव दिले. काही दिवसात दुसऱ्या महायुद्धामुळे परिस्थिती गंभीर झाली. बर्मा देशावर जपानी सैन्याने बॉम्ब टाकले. कलकत्त्यातील जनता घाबरून घर, गाव सोडून जात होती. सगळे गोंधळून गेले होते. असेही कानावर येत होते कि शत्रू पिण्याचे पाणी देखील दुषित करू शकतात. मारवाडी लोकं त्यांचे गाठोडे(पैसा-अडका) बांधून घेऊन गावी जात होते. आम्ही कुठेही जायचे नाही असे ठरवले होते. पण मुले सगळी लहानही होती. त्यांना घेऊन ह्या धामधुमीत कसे इथे राहायचे? शेवटी कामबंगडी येथे जायचे ठरवले. तेथे माझे रामदास नावाचे एक दीर राहत होते. त्यांचा तेथे एक आश्रम होता. माझी त्यांच्यावर श्रद्धा होती. माझ्या एका मुलाला आत्माराम हे नाव त्यांनीच दिले. आमचे सहा जणांचे कुटुंब होते, दानधर्मावर चालणाऱ्या त्या आश्रमात आम्ही गेलो होतो. त्यावेळी आमची परिस्थिती देखील ठीक नव्हती. मी सौदामिनी मेहता नावाच्या एका समाज-सेविकेच्या शाळेत महिना तीस रुपयावर नोकरी करत होते. ती सोडली आणि देवावर भरवसा ठेवून आम्ही कलकत्ता सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुदत्तने मात्र कलकत्ता सोडून न जाण्यावर हट्ट धरून बसला होता. माझ्या यजमानांचे कार्यालय मुंबईला जाणार अशी आवई उठली होती. त्या दोघांना तिथेच कलकत्त्याला सोडून, बाकीचे आम्ही निघालो. केवढा गोंधळ त्यावेळेस! रेल्वेत ही मुंग्यांसारखी गर्दी. अशा स्थितीमध्ये मी दोन रात्री आणि एक दिवस रेल्वेने प्रवास करून मद्रासला पोहोचेपर्यंत जिवंत राहू कि नाही असे आम्हाला वाटत होते. एका पायावर उभी राहून हटयोग्याप्रमाणे तपश्चर्या करून प्रवास केला. मद्रासला पोहोचल्यावर मग काय करायचे? सगळीकडे खंदक खोदले गेले होते. ब्रिटीश सैनिक ट्रक मधून ये जा करत होते. खांद्यांवर बंदुका ठेऊन बुटांचा आवाज करत फिरणाऱ्या ब्रिटीश सैनिकांना पाहून धडकी भरत होती. अश्या ठिकाणी येऊन मला रात्रीचा मुक्काम करावा लागला. Air Raid च्या चेतवण्या ऐकून छाती दडपून जायची. कामबंगडी येथेच राहिलो असतो तर बरे झाले असते का एक मनात विचार, तर कलकत्त्यात गुरुदत्त आणि यजमान जसे राहत आहेत हा दुसरीकडे विचार मनात येत होता.

माझ्या यजमानांचे बर्माशेल कंपनीचे कार्यालय मुंबईला हलवले गेले, त्यामुळे ते मुंबईस आले. गुरुदत्तला उदयशंकर यांच्या अल्मोडा केंद्राकडून नृत्य शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तो अल्मोडा येथे निघून गेला. काही दिवसांत अशी बातमी आली कि आम्ही राहत असलेल्या इमारती वर बॉम्ब पडून ते बेचिराख झाले. त्यावेळी माझा चित्रकार भाऊ कलकत्त्यामध्येच राहत असे.

आश्रमात आमचे झालेले स्वागत मी कधीही विसरणार नाही. मुंबईमधील अनेक श्रीमंत दानशूर व्यक्ती आश्रमाला पैसे दान देत असत. आम्ही गरीब होतो, पैसे नसत जवळ. असे असले तरी माझ्या कडे येत असलेल्या पैश्यांपैकी काही मी आश्रमात माताजी(कृष्णाबाई) यांना देत असे. रामदास यांच्या पत्रांचे भाषांतर करत असे, आश्रमातील मुलीना शिकवत असे, आणि इतर काही कामे मी आश्रमात करत असे. रामदास यांना लहान मुले आवडत असत. माझ्या सात महिन्यांच्या विजयला ते खेळवत. असे असले तरी आश्रमातील बाकीचे लोकं आमच्याकडे हीन दृष्टीने बघत असत. आश्रमात परमार्थसाधनेपेक्षा भौतिक विचार, लौकिक साधना अधिक चाले. एकमेकांकडे संशयाने पाहणे, नीट न वागवणे, गरीब-श्रीमंत असा भेदभाव करणे हे सर्व तेथे होत असे.

गुरुदत्तची पत्रे माझ्यापर्यंत पोहोचायला सात दिवस लागत. तो आठवड्यातून तीन पत्रे लिहित असे. ती देखील सविस्तरपणे. अल्मोडा येथील उदयशंकर यांच्या केंद्रात होत असणाऱ्या घडामोडी तो विस्ताराने कळवत असे. तो तेथे आनंदात आहे असे लिहित असे. तो तेथे सर्वात वयाने लहान होता, त्यामुळे सर्वजण त्याची काळजी घेत, असे त्याने लिहिले होते. उदयशंकर तर त्याला मुलासारखे वागवत असे त्याने लिहिले होते. केंद्रातील शिक्षक नावाजलेले कलाकार होते असेही त्याने लिहिले होते. कथकलीसाठी गुरु नम्बुद्रीपाद होते, तसेच मणिपुरी आणि भरतनाट्यम साठी देखील त्याकाळचे नावाजलेले कलाकार शिकवत होते. विविध वाद्य-वादन शिकवण्यासाठी अल्लाउद्दिन खान, अली अकबर, रविशंकर, अबनी भट्टाचार्य, श्री शांतीवर्धन या सारखे प्रसिद्ध कलाकार होते. श्री विष्णूदास शिराळी हे विविध प्रकारची जुने मृदंग वाजवायला शिकवत असत. उदयशंकर नाट्यशास्त्रातील त्यांना उपयोगी पडणारे भाग, आपला अनुभव जोडून ते शिकवत असत. ह्या सर्वाचा गुरुदत्तच्या मनावर चांगला परिणाम झाला असावा. तेह्तील शिस्त कडक होती, प्रत्येकाने आपला अभ्यास वेळच्या वेळेस करणे भाग होते, आपण आपले नाटकातील अभिनय सराव करणे, रंगभूषा, वेशभूषा करणे आवश्यक होते, तसेच रंगभूमी वरील प्रत्येक काम सगळ्यांनी करायचे असा नियम होता. त्यामुळे अल्मोडा हे सिद्धी प्राप्त कार्यासाठी प्रसिद्ध झाले होते. गुरुदत्त देखील आपल्या गुरूची एकाग्रतेने सेवा करत असे पत्रातून लिहिले होते. मनातील सर्व शंका तो विचारात असे. तो माझ्या जवळ नसला तरी, हे सर्व वाचून माझ्या मनात काही चिंता नव्हती. आम्हाला सोडून तिथे राहायचे म्हणजे त्याला सुरुवातीला कंटाळा आला असेल. त्याला नाच शिकायला पाठवल्याबद्दल सर्व जण मला दोष देत असत. कधी कधी मला सुद्धा ते सर्व ऐकून त्याच्या भविष्याबद्दल चिंता वाटत असे, नाही असे नाही. पण मनातून एक विश्वास देखील होता; शेवटी देवच्या मनात काय असेल ते होईल.

आश्रमातील माताजी यांच्या कडे बाहेरून आलेल्या काही मंडळीनी माझ्या बद्दल चुगल्या करायला सुरुवात केली, ‘हिला नवऱ्याकडे नांदायला जायचे नाही. मुलांना बरोबर घेऊन स्वतंत्र जीवन तिला जगायचे आहे, नोकरी करायची तिला खुमखुमी आहे.’ असे काहीबाही. जेणेकरून मी आश्रम सोडून जावे. एके दिवशी तीन वर्षांच्या देविदासला त्यांनी, काही मस्ती केली, खोड्या केल्या म्हणून, त्याला उन्हात एक तासभर उभे केले. ते सगळे असह्य होऊन मी तडकाफडकी आश्रम सोडून मुंबईला जावे; तिथे राहणे जमले नाही तर गांधीजींच्या वर्धा येथील आश्रमात जावे असा विचार करून, निघाले.

१९४२ च्या ९ ऑगस्ट रोजी आम्ही मंगळुरूला पोहोचलो; पण तसेच तेथून बसने निघालोही; कारण माझ्या आईला मी तिच्याकडे गेल्याचे आवडले नव्हते. मी आणि माझी चार मुले सगळे धैर्य एकवटून मुंबईला निघालो. रस्त्यात आम्हाला ९ ऑगस्टच्या चाले जाव (Do or Die) चळवळीच्या मोर्चा ठिकठिकाणी दिसला. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांना कैद केले गेले होते. त्यामुळे सगळीकडे हरताळ सुरु होता. आमचा प्रवास त्यामुळे अडखळतच सुरु होता. पुण्याला आलो तेव्हा आमची गाडी चुकली होती, त्यामुळे एक रात्र तेथे एका नातेवाईकांकडे काढावी लागली. मुंबईला पोहोचली तेव्हा शहरात युद्धामुळे अनेक लोकं घरदार सोडून गेले होते. मुंबईत ऑस्ट्रेलियाचे सैनिक नागरिकांना धमकावत, त्रास देत फिरत असत. आम्ही माटुंगा येथे माझ्या वाहिनीच्या मुलाकडे मुक्काम केला.

(क्रमशः)

P C Sorcar: Magical Life, Part#1

ह्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी २०२० मध्ये एका कन्नड मासिकात जादुगार पी सी सरकार यांच्या चरित्रात्मक पुस्तकाच्या परिचयाचा एक लेख आला होता. त्याचे मराठीत अनुवाद करण्याचे मनात होते बऱ्याच दिवसापासून, आज योग आला आहे. तो आज मी तो अनुवाद ह्या ब्लॉगरुपात देतो आहे(मूळ लेख मोठा आहे, त्यामुळे काही भागात देणार आहे). पण थोडेसे त्याआधी माझे असे थोडेसे प्रास्ताविक!

जादू पाहायला कोणाला आवडत नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ती थोडीफार माहिती देखील असते, जसे पत्त्यांची जादू, एखादी हातचलाखी! भारतात इतर अनेक कलांप्रमाणे जादूची कला, जादूविद्या ह्याला देखील मोठी परंपरा आहे, इतिहास आहे. ह्या कलेचा कोणी इतिहास लिहिला आहे कि नाही ते माहित नाही. शोधले पाहिजे. पण एक मात्र आहे, कि याचे मूळ अथर्ववेदात सापडतात. तिथे तिला यातूविद्या असे संबोधले आहे. भारतीय गुढविद्या सुद्धा प्रसिद्ध आहे(black magic), मोहिनी विद्या, वशीकरण वगैरे याचेच प्रकार आहेत. मी Indian rope-trick नावाची दोरीची जादू असा प्रकार आहे या बद्दल कुठेतरी वाचले आहे.

आपल्या सर्वांप्रमाणे मी देखील अगदी थियेटर मध्ये जाऊन तीन तीन तासांचे जादूचे खेळ पहिले आहेत. मला वाटते कि २००३ मध्ये के लाल ज्युनिअर(K Lal Junior)यांचा टिळक स्मारक मंदिरात प्रयोग होता तो मी पाहिला होता. तसेच नंतर कधीतरी एका लहानग्या जादुगार मुलीचा जादुगार आंचलचा प्रयोग पाहिल्याचे आठवते आहे. छोटा जादुगार नावाचा जादुगार कुटुंबावर आधारित धमाल 3D चित्रपट देखील पहिला होता. गेल्या काही वर्षांत खरेतर जादुगाराचे प्रयोग पुण्यात झाल्याचे आठवत नाही. भारतात जादूविद्येचे अनेक प्रकार आहेत. तंत्र मंत्र असेल, मोहिनी विद्या असेल, किंवा पुराणांत आणि इतर मिथक कथांमध्ये जादूचा उपयोग केल्याचे भरमसाट उल्लेख आणि उदाहरणे आहेत. आजकाल असे दिसते कि विविध कार्यक्रमात(जसे कि वाढदिवस), एखादा स्थानिक थोडीफार हातचलाखी, नजरबंदी, जादू माहित असलेला कलाकार काही मिनिटांचा प्रयोग करतात, पण मला ते रुचत नाही. जादूचे प्रयोग अनुभवण्याची लज्जत ते रंगमंचावर पाहण्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून mentalist नावाचा अजून जादूचा एक प्रकार प्रसिद्ध झाला आहे, तो प्रामुख्याने दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमामुळे. लहानपणी Mandrake The Magician नावाची एक कॉमिक मालिका इंग्रजी वर्तमानपत्रातून येत असे, ती देखील दिसलेली नाही बऱ्याच वर्षांत. बऱ्याच वेळेस जादूचे काही प्रयोग धोकादायक अंगाचा थरकाप उडवणारी असतात. गेल्या वर्षी एक दुर्दैवी घटना वाचाल्याचे आठवते आहे. कोलकात्याजवळ कोणी एक जादुगार(चंचल लाहिरी) हुगळी नदीत एक प्रयोग करत असता, बुडून मरण पावला.

माझ्या तरी जादूगारांचे चरित्रांचे किंवा इतर पुस्तके विशेष दृष्टी पडली नाहीत. पुण्याचे जादुगार रघुवीर भोपळे यांनी लिहिलेली एक-दोन पुस्तके अपवाद आहेत. पण तीही मिळत नाहीत. त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. एक आहे चरित्र, ज्याचे नाव आहे प्रवासी जादुगार, आणि दुसरे मी पाहिलेला रशिया. त्यांची इतक्यातच म्हणजे २० ऑगस्टला स्मृतिदिन होता. असो. बंगालचे जादूकलेत, जादूविद्येत मोठे नाव आहे. पी. सी. सरकार तेथीलच. आधुनिक भारतीय जादू कलेचे प्रणेते असे त्यांना संबोधतात. जादूगार तसेच सर्कस ह्यात भारतीयांनी खूप नाव कमावले आहे. सर्कस वर मी पूर्वी येथे तीन भागांत लिहिले आहे. दोन्ही व्यवसाय म्हणून तसे कठीण, मोठा लवाजमा बाळगायचा, कलाकार, प्राणी आणि इतर सामग्री घेऊन ठिकठिकाणी प्रवास करायचा आणि कला सादर करायचे, तसे सोपे काम नाही. असो. तर ह्या पी. सी. सरकार यांचे चरित्र इंग्रजीत आले आहे ज्याचे नाव आहे PC Sorcar The Maharaja of Magic आणि ते लिहिले आहे त्यांच्या मुलाने म्हणजे PC Sorcar Jr यांनी. त्यांनी स्वतःचे देखील आत्मचरित्र My Life My Magic या नावाने लिहिले आहे.

जादुई जीवन
भारताने न विसरण्याजोग्या कलाकाराचे पी सी सरकार यांचे जीवन

मूळ कन्नड: श्रीहरी
मराठी अनुवाद: प्रशांत कुलकर्णी

१९४०-५० च्या दशकात भारत संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याच्या काळ हा फक्त राजकीय स्वातंत्र्य इतकाच मर्यादित नव्हता. सांस्कृतिकरित्या स्वातंत्र्य देखील मिळवण्याचा तो काळ होता. बंगालमधील प्रोतुल चंद्र सरकार त्यावेळी तारुण्यात होते. त्यांच्या हातात ‘मंत्रदंड’ होते. सांस्कृतिक वेगळेपण अभिव्यक्त करण्यास जादूच्या कालेसारखे माध्यम त्यांनी निवडले. आजच्या जादुगारांना देखील अनुकरणीय अश्या प्रतिभावंत जादूगाराच्या जीवनाचे हे कथन आहे.

१९५६ च्या एप्रिल १० ची तारीख…
लंडनच्या डेली मिरर या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात बातमी छापलेली होती- Girl Cut in Half, Shock on TV. ह्या बातमीच्या खाली भरजरी पोशाख आणि फेटा बांधलेल्या युवराजासारख्या दिसणारी एक व्यक्ती, समोर मेजावर असलेल्या सुंदर तरुणीचे दोन भाग केले असे दिसणारे छायाचित्र छापलेले होते! त्या बातमीत दाखवलेले दृश्य लंडनवासी काही पहिल्यांदा पाहत नव्हते. कारण आदल्या दिवशीच, म्हणजे, एप्रिल ९ ला रात्री, बीबीसी दूरचित्रवाणी वरील Panorama या कार्यक्रमात त्यांनी ते पाहिले होते. चित्रातील तो युवराज, तरुणीला करवतीने दोन भागांत कापताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते! प्रेक्षकांनी ते पाहून तोंडात बोटे घातली होती. पण तो कार्यक्रम तेथेच संपला. त्या मुलीचे पुढे काय झाले हे सांगितले नाही. घाबरलेल्या, चिडलेल्या लोकांनी बीबीसीला पुढील तीन-चार तास दूरध्वनी करून हैराण केले होते. काहीजण तर मिळेल त्या वाहनाने बीबीसी कार्यालयासमोर जमा झाले. त्या मुलीचे पुढे काय झाले हि गोष्ट talk of the town झाली होती. ती सगळी गरम गरम चर्चा आणि शंकेचे शमन मिररच्या बातमीने केले होते. बातमीत त्यांनी ज्या मुलीला कापले गेले होते, त्या मुलीचे, दीप्ती डे, हिचे हसरे छायाचित्र छापले होते. मी जिवंत आहे, प्रकृती देखील छान आहे, आणि मला काही झाले नाही असे तिचे निवेदन देखील आले होते.

तेवढ्यावरच हे प्रकरण थांबले नव्हते. एप्रिल ९ च्या संध्याकाळी बीबीसी एक पंधरा मिनिटांचा कार्यक्रम प्रसारित केला होता. भारतातून आलेल्या जादुगार पी. सी. सरकार यांची हातचलाखीचे प्रयोग दाखवणार आहेत असे संयोजकांनी सांगितले होते. सरकार यांनी त्या कार्यक्रमात युवराजच्या सारखा पोशाख परिधान केला होता. चमचम करणारा निळा अंगरखा, तसेच लांब शाल त्यांनी ओढली होती. त्यांना मिळालेल्या पंधरा मिनिटात सरकार यांनी अनेक प्रयोग करून आश्चर्याने प्रेक्षकांच्या भुवया उंचावयास भाग पडले होते. मोकळ्या पट्ट्यातून कबुतर प्रगट करणे, हातरुमालातून ससा बाहेर काढणे, पत्त्यांच्या हातचलाखीचे प्रयोग हे सर्व त्यांनी केले. आणि कार्यक्रमाच्या शेवटी, त्यांनी मुलीला मधोमध कापण्याची जादू त्यांनी सादर केली होती. त्यानंतर परत मंत्र म्हणून मुलीला जोडून जिवंत करण्याचा भाग बीबीसीने दाखवलाच नाही, कार्यक्रम अर्ध्यावरच थांबवला आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्या काळी देखील TRP वाढवण्याचे खूळ होते कि काय माहित नाही! त्या मुलीचे काय झाले हा प्रश्न त्या सर्व प्रेक्षांकाना साहजिकच सतावत होता. बीबीसी च्या अधिकाऱ्यांना लोकांची समजून काढता काढता नाकी नाऊ आले होते. आपल्याला मिळालेल्या पंधरा मिनिटांचा प्रभावी वापर करून लंडन मध्ये घराघरात आपले नाव पोहाचावलेले जादुगार म्हणजे पी. सी. सरकार!
(क्रमशः)

Building Innovation Culture

I am big fan of innovation, at workplace and in general. I have always challenged people on that front. Earlier this year, I also conducted Hackathon in my organization to promote innovation culture. I have been involved in running and arranging meetups(CloudStack, VMUG) which spark the ideas, exposes problems yet to be solved. I thought of sharing my learning in this blog. I have written on this topic earlier also(see here: Innovation: Visible and Invisible). You may check my earlier blogs as well.

One can innovate and bring changes very easily. It is not that you need team locked in a room for days together for creating innovations. Most importantly, innovation need not be a game of chance. If you keep your eyes, and ears wide open, usually, you would find opportunities to innovate. Innovations, of course, can be internal or external. Internal ones are usually towards processes, collaboration, automation, or any idea which can streamline experiences internally and help teams do more, and effectively. External ones are usually related to your customers, value you are bringing, problems which you are solving for them, and more importantly how.

Innovation Culture: Image Courtesy-Internet

The ongoing COVID-19 pandemic has proven yet again that necessity is mother of innovation, invention, progress. As one can, in last 5-6 months, world has seen paradigm shifts in almost every domain, new innovative ways of tacking old problems in some cases, and in others, solving new problems.

There is not much option to innovate in this ever changing world. So, it is important to pay attention to what is changing in your problem domain, your customers. Once you understand, then you are in better position to solve by innovating your solutions for them. Approaches such as design thinking can help here. It is everyone’s responsibility to consciously take efforts to ask questions and find out what is changing. They can be around assumptions made, dependencies which are there or need not be there, what pain points are seen on the way,

As design thinking approaches suggests, to supplement and validate your observations of customers/users, surveys can be helpful, or even interviews in formal or even in informal setting can be useful. These, are, of course, methodical or formal ways.

Another innovation strategy is to look out for leaders in your problem domain, understand what they have done and find out what other alternatives, better ways it can be done. This principle can be applied in organizations also, to learn from innovations and improvements from other teams/departments.

Ideation is fundamental to innovation progress. Many factors such as need vs want, value, feasibility, usefulness, prototyping, proof of concepts etc. Innovation attempts many times can be disasters, can ultimately result in failure in this fast moving market. Failure needs to be celebrated, as it is stepping stone towards success. Embracing failures is essential ingredient of building innovation culture.

What has been your experience with innovation? Feel free to share.

अर्धसत्यचे शुटींग

अर्धसत्य हा हिंदी चित्रपट कोणाला माहित नसेल? भारतीय चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेला हा चित्रपट मराठी साहित्यिक श्री दा पानवलकर यांच्या सूर्य या मुळ कथेवर आधारित होता. या पानवलकरांचा स्मृती दिन(१९ ऑगस्ट) इतक्यातच झाला. या चित्रपटाचे चित्रीकरण जेव्हा सुरु झाले तेव्हापासून पानवलकर चित्रीकरणस्थळी हजर होते आणि त्यांनी दैनंदिनी ठेवली. ती पुस्तक रूपाने मौज प्रकाशनने १९८५ मध्ये प्रकाशित केले. ते पुस्तक मला आपसूकच काही महिन्यांपूर्वी हाती लागले. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण अथपासून ते इतीपर्यंत तपशीलवार नोंदणारे असे पुस्तक मराठीत तरी मला अजूनतरी सापडले नाही. त्याचा परिचय या स्मृतिदिनानिमित्त करून देण्यासाठी हा ब्लॉग.

दुर्दैवाची गोष्ट अशी कि हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या आधीच म्हणजे १९ ऑगस्ट १९८५ ला पानवलकरांचे निधन झाले. पानवलकर हे कथाकार म्हणून प्रसिद्ध होते. माझ्या कडे साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेला त्यांच्या मोजक्या काही कथांचा संग्रह आहे. त्यांच्या सूर्य ह्या मुळ कथेवर विजय तेंडूलकर यांनी अर्धसत्यची पटकथा लिहिली. अर्थात त्यांनी कथेचा विस्तार त्याकाळची सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा संदर्भ घेऊन त्यांनी केला आहे. दिग्दर्शक होते गोविंद निहलानी. प्रास्ताविकेत नमूद केल्या प्रमाणे विजय तेंडुलकरांना पोलीस जीवनावर एक नाटक लिहायचे बऱ्याच दिवसापासून मनात होते. पानवलकरांची सूर्य हि कथा वाचल्यापासून त्यांनी ती आधारभूत ठेऊन अर्धसत्य कथेची पटकथा लिहिली.

चित्रपटाचे चित्रीकरण एखाद्या त्रयस्थाला काही तास देखील पाहणे कंटाळवाणे असते. त्याची मला थोडीफार कल्पना आहे, कारण माझ्या एका मित्राच्या लघुपटाचे शुटींग माझ्या घराच्या आसपास सुरु असताना मी हजर होतो तसेच चित्रपट रसास्वाद शिबीरात देखील त्याबद्दल थोडेफार ऐकले होते. पानवलकर देखील या बद्दल अगदी तत्व्ज्ञासारखे लिहितात. ‘…गेला सबंध आठवडाभर रात्रंदिवस शुटींग पाहून डोळ्यांना मरगळ आलेली. प्रखर दिव्यांचे प्रकाश तोंडावर घेत मी उभाउभी सारा प्रकार न्याहाळत होतो. एकेका दृश्याचे चार चार टेक्स. त्या आधी दृश्याच्या तालमी-एक, दोन, तीन. नेहमी कुणाचं कुठेतरी चुकायचे. यात कलावंत, तंत्रज्ञ, आणि स्वतः दिग्दर्शक. सगळा कंटाळवाणा प्रकार. खरा तर शुटींग बघणाऱ्यांना हा कंटाळा नकोसा होतो. मी हा सगळा कंटाळा सहन करतो, करावासा वाटतोय, कारण माझ्या कथेवऋण विस्तारलेला चित्रपट तयार होतो आहे. माझ्या साक्षीने गोविंद मला एकदा म्हणाला होता, ‘आप शुटींग देखते देखते ठक जायेंगे चार दिनके बाद’….मी मात्र थकलो नाही. कारण माझी कथा मला दिसणार आहे. शुटींग मधला कंटाळा हा अटळ भाग आहे. ह्या कंटाळ्यातही आपण त्रयस्थ नजरेने कानाने पाहत-ऐकत असतो. कंटाळा हा जर सातवा रिपू मनाला तर जगण्याला, अस्तित्वाला अर्थ देतो. मी मनावर घेतलं. सर्व चित्रपटच शुटींग कंटाळ्यासरशी पाहायचं. नुसत पाहन हेही एक कामच. ह्या पाहण्यातही खराखुरा अनुभव असतो हे मला जाणवू लागल. खरा तर ह्या शुटींग मध्ये मीच एक ह्या कंटाळ्याचा मित्र आहे. हिच माझी भूमिका. एक कलावंत महाला म्हणाला सुद्धा, “आम्हाला ह्या कंटाळ्याचे पैसे मिळतात, सेटवरील कामाचे नाहीत”…’

साधारण दीडशे पानाच्या या पुस्तकात अनेक छायाचित्रे देखील आहेत. मुखपृष्ठावरील छायाचित्र देखील वेधक आहे. २ डिसेंबर १९८२ ते २५ फेब्रुवारी १९८३ या जवळ तीन महिन्याच्या कालावधीत मुंबईत, तसेच बाहेरही अनेक ठिकाणी चित्रीकरण झाले. त्यातील प्रत्येक दिवसाची, प्रत्येक शॉट माहिती आहे. चित्रपट हे दिग्दर्शकाचे मध्यम आहे. त्यामुळे पानवलकरांचे मुख्य लक्ष्य होते दिग्दर्शक गोविंद निहलानी. पानवलकर आपल्या ललित कथन शैलीत निहलानींच्या कामाचे, त्यांच्या लकबींचे वर्णन ठिकठिकाणी करतात. उदाहरणार्थ, ते पण १२९ वर लिहितात, ‘…गोविंद विचारात असला म्हणजे व्हू-फायंडरची साखळी हातांच्या तळव्यांवर नाचवून गोळा करतो, वर उचलतो, पुन्हा तळव्यावर गोळा करतो. बारीक नजरेने सेटवरच्या वस्तू न्याहाळतो आणि आपल्या ऑरीफ्लेक्स कामेरयाची जागा निश्चित करतो’. दिग्दर्शक कसा काम करतो याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. ते म्हणतात, ‘…या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगाची दृश्यचित्रे गोविंदने आधीच तयार करून ठेवलेली होती, असं गोविंदने सांगितलं. प्रत्येक दिग्दर्षांकाने अशी दृश्यचित्रे तयार करावीत. पण प्रत्येकाकडून तसा केला जात नाही. प्रत्येक शॉटची सप्रमाण, सुबद्ध मांडणी अशा दृश्यचित्रांच्या सहायाने करता येते. असाही त्याचा अनुभव आहे. हे दिग्दर्शकाच्या क्रिएशनचे महत्वाचे अंग आहे असं गोविंद मानतो.’

पानवलकरांची चित्रपट क्षेत्रातील आणि या चित्रपटाशी निगडीत असेलेले अनेक कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशी ओळख होते, बातचीत होते. त्याचे देखील त्यांनी रसभरीत वर्णन केले आहे. कथा लेखकाच्या दृष्टीने चित्रपट कसा घडत जातो, त्यात पटकथाकाराने, तसेच दिग्दर्शकाने कसे, आणि का बदल केले आहे याची देखील चर्चा त्यांनी केली आहे आणि ती मला महत्वाची वाटते.

चित्रीकरण करताना continuity sheets तयार करावी लागतात, जेणेकरून संकलनाच्या वेळेला संगती लागते. पानवलकर त्याबद्दल आपले निरीक्षण असे नोंदवतात-‘…प्रभातला पहिल्या शॉटपासून शेवटच्या शॉटपर्यंत हेच काम करताना मी पाहतो आहे. continuity sheet म्हणजे फिल्म कंपनीची नाव शीर्षकभागी. त्याखाली कॉलम्स. सीन नंबर, शॉट नंबर, टेक नंबर. त्या त्या टेक प्रमाणे शॉट मधल्या पात्रांच थोडक्यात वर्ण. संवाद असल्यास सुरुवातीचा आणि शेवटचा संवाद थोडक्यात. शॉट सुरु झाल्याची व संपल्याची वेळ. शॉटला खर्ची पडलेल्या फिल्मचे फुटेज….’

चित्रपटातील नायक अनंत(ओम पुरी) याच्या बालपणीचे काही प्रसंग वाईच्या आसपासच्या परिसरात, कृष्णेच्या काठावर झाले, त्याचे देखील त्यांनी रसभरीत वर्णन केले आहे. हा परिसर गेली तीन-चार दशके चित्रीकरणासाठी तेथील निसर्गरम्य वातारणामुळे प्रसिद्ध आहे. मी तेथे काही वर्षांपूर्वी गेलो होती(वाईच्या परिसरात).

हे पुस्तक वाचून मी परत अर्धसत्य चित्रपट पहिला. माझ्याकडे त्याची सीडी आहे. कथे कडून चित्रपटाकडे प्रवास परत जाणतेपणे पाहताना मजा आली.

Internet in India: 25 years

Today(Aug 15) it is India’s Independence Day. And Internet in India is 25 years old now! Can anyone believe it? We tend to assume that it has been there all the time. It was launched by Government of India via organization called VSNL(Videsh Sanchar Nigam Limited) 25 years back on the eve of Independence Day, Aug 15, 1995. And nobody noticed it that time. It was not a big news at all. Now I wonder why it was not! I was in the USA that time, and did not know about it until I came back in 1998. The first thing I did was to visit VSNL office in Pune(at a remote village called Dighi) and get VSNL connection. I got my email ID too. It was so intuitive- prashant@giaspn01.vsnl.net.in! (Warning: Don’t send email to this email address, as it is now defunct!). VSNL is, of course, now called Tata Communications Ltd.

india1

The service was called GIAS(Gateway Internet Access Service). I also was provided a manual providing information on how to dial-in(yes, I am sure many of us remember that screeching noise of dialing through that 33kbps modem!), how to setup modem, how to login. I cannot seem to locate in my library, but I found online version still available here. The service essentially log in you to their Unix box. Mail client in Unix called Pine was used to check emails. Text based browser Lynx was used for browsing. And don’t even bring the topic of speed. It was in bytes and kilobytes. It is fun to go down the memory lane now.

I wonder how many know that Internet services in a different form was available in India even before this was launched. Many software companies such as CMC, Wipro, TCS, Patni Computer Systems, Mastek, Infosys etc were already operating for quite some time in India. Many universities and other research and scientific institutions were using connections to Internet in some form. The ERNET(Education Research Network), the universities network over TCP/IP was operating as many might know. Let me tell you what I know and what I had used whatever I remember.

I was working for startup back then. Silicon Valley startup wanted to start Pune operations in 1994. Myself and couple of other engineers started. Back then, before era of BSNL and VSNL, there was DoT (Department of Telecommunication) who would provide telephone connections. DoT also had a data service called INET over landline modem for businesses. This was X.25 service(packet switched data network) connecting to MCI then. I still remembering making trips to DoT office in Pune in camp area meeting staff there to troubleshoot connectivity problems.

Our requirement was to transfer code, binaries we were working on that time regularly to out teams in Silicon Valley. We used INET for that. We would dial-in into DoT number to get access to X.25 Packet Assembler-Disassembler (PAD) which would actually transfer files. The speed obviously quite low, and many times we would be in office all night to send our release to team on the other side. The connections also would drop many times. It was required to monitor, and send the remaining files in parts. The resultant files would be assembled back using uuencode/uudecode tools. For emails, we would use MCIMail service. I also remember connecting to Compuserve too that time, was one of the pioneering Internet Service Provider(ISP) in the USA. It was quite popular back then, with many BBS(Board Bulletin Service) kind features.

Wow! Those were days, early days of some of us experiencing the Internet revolution in front of eyes, which has occupied every part of life these days. It is amazing to see where we are in 2020, twenty five years later, and also where we are going! Today, India dedicated high speed optical fiber link to mainland India for islands Andman and Nicobar, and Lakshadweep which takes Internet even further in India.

Anyways, here is a first part of blog series, I had started to talk about computers then and now. You may find it relevant and interesting.

माझा पुत्र गुरुदत्त: भाग#२

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याची क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर जमेल तसे करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू आत्माराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध केला होता (माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१).

आज दुसरा भाग देत आहे. मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#२

१९३६ मध्ये सिद्धनाथ पंत नावाचे एक हिंदी भाषेचे शिक्षक बंगळूरूस आले. ते घरोघरी जाऊन हिंदी भाषेचा प्रसाराचे काम करत. मला लिहा-वाचायचे वेड होतेच. मी, तसेचआणखीन काही जण मिळून त्यांच्याकडून हिंदी शिकू लागलो. पंत हिंदी शिकवण्याचे काही पैसे घेत नसत. हे असे मोफत शिक्षण नको असे म्हणत, माझ्या यजमानांनी आक्षेप घेतला. त्यांचा संशयी स्वभाव मला माहित होता. असे असले तरी काही काही बाबतीत मी त्यांचे ऐकत नसे. हिंदी प्रवेश परीक्षेत मी अखिल कर्नाटकातून पहिली आले. त्यावर्षी महात्मा गांधी यांच्या हस्ते  मद्रास मध्ये  पारितोषिक  वितरण होणार होते. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमासाठी म्हणून असलेल्या मंडप छान सजवले गेले होते. किती  तरी लोकं आले होते. हे असे सगळे वातावरण पाहून मला खूप आनंद झाला होता. ते मद्रास शहरातील पहिला हिंदी पारितोषिक वितरण समारंभ असल्या कारणाने कॉंग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आले होते. त्या समारंभात मला गांधीजींच्या हस्ते पारितोषिक मिळाले त्यामुळे माझ्या मनात त्यांच्या प्रती श्रद्धा, भक्ती, आणि देशासाठी काही तरी करण्याच्या माझ्या मनात येऊ लागले.

एक दोन महिन्यातच गांधीजी यांचे स्वास्थ्य बिघडल्याने हवा पालटासाठी बंगळूरूस आगमन झाले (माझे यजमान १९२० च्या असहकार चळवळीत गेले  होते). मी आणि गुरुदत्त त्यावेळेस फक्त खादीचे कपडे परिधान करत असू. मी चरखा देखील चालवत असे. मी गुरुदत्तला घेऊन गांधीजींच्या सायंकालीन प्रार्थनेला जात असे. त्यावेळेस कस्तुरबा, राजगोपालाचारी यांची मुलगी लक्ष्मी(हिच्याबरोबर माझा बरीच वर्षे पत्र-व्यवहार सुरु होता. तिचा देवदास गांधी यांच्या बरोबर विवाह झाला आणि आमची पत्र-मैत्री कमी कमी होत गेली). महादेव देसाई, मणीबेन पटेल, मदनमोहन मालवीय यासारख्या महनीय व्यक्तींशी माझी ओळख झाली होती. प्रार्थनेच्या वेळेस विविध लोकांची भजने होत. मी त्या वेळेस कन्नड दासपदं, श्री अप्पय्या यांची कन्नड गीतं गात असे. सर्वाना ती आवडत असत. अप्पय्या यांच्या गीतांत संस्कृत शब्द बरेच असत आणि अद्वैत तत्वज्ञानपर असत, त्यामुळे पंडितजी(मालवीय) मला जवळ बोलावून ती गाणी म्हणायला लावत. माझा देखील त्यामुळे संकोच मावळत असे आणि मुक्तकंठाने न भिता मी गात असे. या  सर्वांचा  गुरुदत्तच्या बालमनावर नक्कीच काहीतरी परिणाम झाला असणार. एकाग्र चित्ताने तो माझे गाणे, अगदी डोळे मिटून ऐकत असे, त्यामुळे सगळे त्याचे कौतुक करत असत. कोवळ्या मनावर होणारे असे संस्कार पुढे आयुष्यात उपयोगी पडतात. मला गांधीजींच्या आश्रमात जावेसे वाटू लागले. प्रार्थना संपल्यावर आम्ही गांधीजींबरोबर आश्रमात जात असू. पूज्य ‘बा’ त्यांच्या माथ्याला तेल लावीत. मणीबेन त्यांच्या पायाला तेल चोळत. गांधीजी लहानग्या गुरुदत्तला जवळ बोलावून त्याच्याशी बोलत. त्याच्या हातात खडीसाखरेचा खडा ठेवत, डोक्यावर हात ठेवत त्याला आशीर्वाद देत असत. एखाद्या वेळेस गुरुदत्त जर बरोबर नसला तर, त्याची ते विचारपूस करत असत. मी घाबरत घाबरत त्यांच्या कडे आश्रमात प्रवेश करण्यासंबंधी विषय काढला. माझ्या कडे पहिले आणि हसले, आणि म्हणाले होईल होईल, असे म्हणत पुढे काही बोलले नाही. मी पुढे नंतर विचारले नाही.

आमच्या गुरुदत्तचा दुसरा वाढदिवस आम्ही अतिशय जोरात साजरा केला. त्याने त्याचा प्रिय असा लाल शर्ट घालून अंगावर दागिने देखील परिधान करून, आमच्या घरमालकांच्या पाया पडायला त्यांच्या कडे गेला. त्यांनी त्याला बसवून त्याला ओवाळले म्हणे. तेथून आमच्या घरी येताना झाकून ठेवलेल्या छोट्या विहिरीजवळ तो पडला आणि तो जोरात मला हाक मारू लागला. ते ऐकून मी बाहेर पळत आले. त्याच्या कपाळाला लागले होते, रक्त वाहत होते. त्याला उचलून पटकन डॉक्टरकडे घेऊन गेले आणि उपचार करवून आणले. पण हे सर्व असे झाल्यामुळे माझ्या मनाला चुटपूट लागली. रात्री त्याला अंगात ताप देखील चढला. माझा एका वृद्ध वैद्यावर विश्वास होता. पूर्वी मी जेव्हा खूप आजारी होते, तेव्हा त्यांनीच मला औषध देऊन बरे केले होते. त्यांनाच बोलावले. नाडी पाहून त्यांनी औषध दिले. पण आठवडा होऊन गेला पण गुरुदत्तला विशेष बरे वाटत नव्हते. रात्री तो बडबडत उठे, घाबरून ओरडत उठत असे. दहा दिवसांत त्याची प्रकृती खालावली.

माझ्या मामेभाऊ डॉक्टर होता. तो गुरुदत्तवर अतिशय प्रेम करत असे. माझ्या यजमानांच्या मनात त्याच्या बद्दल का कोणास ठाऊक पण रोष होता. त्याला बोलावणे पाठवायला मागे पुढे पाहू लागले. एके दिवशी तर गुरुदत्तचे हात पाय गार पडले, आखडून सुद्धा गेले. त्याच्या डोळे देखील आत गेले. आईने रडायला सुरुवात केली. मी कोणाला काही न सांगता मामेभावाकडे गेले, त्याला सगळी परिस्थिती सांगितली. सगळे ऐकून, तो म्हणाला, ‘अश्या स्थितीत मी जवाबदारी घेणार नाही’. मी त्याच्या हाता-पाया पाडून म्हटले कि एकदा त्याला बघून तरी जा. त्याने थोडा विचार केला, आणि कसे काय पण त्याचे मन बदलले आणि तो माझ्याबरोबर यायला तयार झाला. घरी आल्यावर गुरुदत्तला नीट तपासले. गरम पाण्याची बाटली जवळ ठेवायला सांगितली आणि माझ्या समाधानासाठी म्हणून करड्या रंगाच्या गोळ्या त्याला दिल्या, आणि त्याला वारंवार गरम पाणी पाजत राहा असे सांगितले, आणि म्हणाला, ‘वासंती, तुझे नशिब चांगले असेल तर हा ‘गुंटी'(गुरुदत्त) ह्यातून बचावेल, रात्रभर ह्याच्यावर नजर ठेव. सकाळी परत येऊन पाहतो’. नंतर तो निघून गेला.

आम्ही घरातल्यानी मिळून गुरुदत्तवर रात्रभर नजर ठेवली. मला तर गुरुदत्तचे ते मोठे  झालेले डोळे पाहायला धीरच होत नव्हता. मी देवासमोर रात्रभर बसले होते. शेवटी पहाटे कधीतरी डोळे आत घेऊन बोलला, ‘आई, मला पाणी दे’. मी धडपडून उठले. पण मला एवढा आनंद झाला नाही. त्याच सुमारास, गल्लीतून कोणीतरी गाणे म्हणण्याचा आवाज येत होता:

जागी सर्वसुखी असा कोण आहे|
विचारी मना, तुही शोधूनी पाहे|

हा श्लोक अगदी टाळ वाजवत तो म्हणत चालल्याचे ऐकू येत होते.

हा श्लोक, तो आवाज ऐकून मला माझ्या बालपणीच्या वडिलांबरोबर जो काही अल्पस्वल्प राहता आहेल त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचा स्नेह, विशुद्ध प्रेम, ममता हि माझी अंगरक्षक आहेत अशी माझी भावना आहे. त्यांच्या आठवणी म्हणून त्यांनी मला दोन ग्रंथ पाठवले होती- परमार्थ साधन आणि मनाचे श्लोक हि ती पुस्तके, जी मला खूप आवडतात. जेव्हा काही संकट आले कि मी ह्या दोन ग्रंथांची आठवण काढते.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले, त्यांनी गुरुदत्तला तपासून, आता ठीक आहे, पण त्याचे यकृत बिघडले आहे असे सांगितले. आयुर्वेद औषधे ह्या कारणीभूत असावीत असे त्यांना वाटले. अजून एक महिनाभर वेगळे उपचार करायला हवेत असेही म्हणाले.

गुरुदत्त वाचला होता. पण मला गांधीजीच्या भेटीसाठी आजारपणामुळे जमले नाही. मी त्यांना माझ्या तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत एक पत्र लिहिले. त्याचे त्यांनी उत्तर मला पाठवले:

“प्रिय वासंती,

आश्रमात तुला येत आले नाही म्हणून वाईट वाटू नको. परमात्म्यावर श्रद्धा, भक्ती ठेवून मुलाला सांभाळ. त्याचे मानसिक, शारीरिक उन्नती करण्याचे कर्तव्य तुझे आहे. पती आणि मातेची सेवा करत राहा. जेवढे शक्य होईल तेवढी देशसेवा कर.

इति,

मोहन करमचंद गांधी
१०-१०-१९२६”

हे अमुल्य पत्र मी अतिशय जपून ठेवले होते. १९५२ मध्ये ते का कसे पण हरवले. जगप्रसिद्ध अश्या गांधीजीनी माझ्या सारख्या सामान्य स्त्रीला पत्र लिहिले होते हे सांगितले कि कोणी विश्वास ठेवणार नाही. पुरावा म्हणून जे पत्र होते, ते हातातून हरवून गेले आणि माझे तोंड बंद झाले. मी तो विचारच सोडून दिला. असो. पुढे काही दिवसातच गांधीजी बंगळूरूहून परत गेले.

गुरुदत्तला बरे वाटू लागल्यावर मी आणि आणि माझी आई, तसेच अर्थात गुरुदत्तला घेऊन कलकत्त्याला आले. माझ्या यजमानांनी बंगळूरूमधील नोकरी सोडून मंगळूरूला गेले. गुरुदत्तला सोडून जाताना त्यांना खूप दुःख झाला. मी त्यावेळी जे बंगळूरू सोडून गेले, ते परत बंगळूरूला आलेच नाही.

कलकत्त्यास माझा भाऊ, माझी वाहिनी, आणि माझा अजून एक चित्रकार भाऊ असे सर्व होते, त्यांनी आमचे छान आगतस्वागत केले. सगळ्या कुटुंबात गुरुदत्त एकटाच लहान मुलगा होता. त्यामुळे सगळ्यांना अतिशय प्रिय होता. त्याचे मस्ती करणे, बोबडे बोलणे सगळ्यांना खूप भावत असे.

माझे भाऊ धार्मिक होते, सोवळे वगैरे नेसून ते पूजा करत. गुरुदत्त त्यांच्या जवळ बसून त्यांची पूजा करणे, सर्व विधी निरखत असे. सारखे प्रश्न विचारून त्यांना हैराण करत असे. कधी कधी सोवळ्यात असलेल्या त्यांना शिवत असे. तरी ते त्याच्यावर कधी रागवत नसत. हसत हसत ते पूजा करत आणि संपल्यानंतर त्याच्या हातावर तीर्थप्रसाद ठेवत. घराच्या अंगणात एक कुत्र्याचे पिल्लू आणि एक मांजर होते. त्यांना खायला प्यायला द्यायचे, आणि त्यांच्यात काहीतरी कारणाने भांडण लाऊन ते पाहत बसायचे हा गुरुदत्तचा आवडता उद्योग. त्याचे मित्र त्याच्या पेक्षा वयाने मोठेच होते. त्यांच्याकडून भोवरा फिरवायला शिकला. आपल्या तळहातावर भोवरा फिरवून तो आम्हाला दाखवत असे. गोट्या खेळण्यात तर त्याने कौशल्य मिळवले होते.

माझा भाऊ वेळ मिळेल तसे, आम्हाला कलकत्यातील प्रसिद्ध ठिकाणे दाखवायला घोडागाडी मधून नेत असे. एकदा तेथील मदन नाट्यगृहात मिस कज्जन(कज्जनबाई) हिचे नाटक लागले होते. ते पाहायला आम्ही सगळे गेलो होतो. माझ्या शेजारी दोन तरुण मुले बसली होती. गुरुदत्त बरोबर ते बोलू लागले. मध्यंतरात ते गुरुदत्तला बाहेर घेऊन गेले. नाटक परत सुरु झाले तरी ते आले नाही. माझी भीतीने गाळण उडाली. माझा भाऊ माझ्यावर डाफरला. आधीच मी घाबरट, त्यातच भावाने रागावले होते. माझी नजर नाटकाच्या रंगमंचाकडे न लागता नाट्यगृहाच्या दरवाजाकडे लागली होती. आतल्या आत मी देवाचा धावा करत होते. नंतर कितीतरी वेळाने ती मुले आली आणि गुरुदत्तला माझ्या हवाली केले आणि माझा जीव भांड्यात पडला. पाहते तर काय, गुरुदत्तच्या हातात चॉकलेट आणि बिस्कीट, आणि गुरुदत्तच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

आम्ही कलकत्याला येऊन आता जवळपास एक महिना होऊन गेला होता. माझ्या यजमानांकडून परत येण्याबद्दल निरोप आला होता. एवढे दिवस कुठलीही चिंता नव्हती, नातेवाईकांकडे अगदी आरामात राहत होते. पुढे त्यांची तार देखील आली. मला एकटीला पाठवायला माझा भाऊ तयार होत नव्हता. तीन दिवस, एक रात्र असा प्रवास होता तो. आईने माझ्याबरोबर यायला नकार दिला, मीही जास्ती मागे लागले नाही. कारण माझे यजमान आणि माझी आई यांचे संबंध सुरळीत नव्हते. कायम काहीबाही कुरबुरी असत, त्या दोघांत मी सापडायचे.

शेवटी नात्यातल्या एका बरोबर मी आणि गुरुदत्त परत निघालो. त्या वर्षी मद्रास मध्ये काँग्रेसचे अधिवेशन होते. माझ्या मावशीच्या मुलगा , त्याची बायको, आणि तीन मुलांसह हैदाराबादेहून तेथे आले होते असे मी ऐकले होते. त्यांना मी शोधले आणि त्यांच्या कडे गेले. चार दिवस तिथे राहिले. गुरुदत्तला त्यांच्या तीन मुलांची सोबत मिळाली. काँग्रेस पक्षाच्या अनेक धुरिणांना मी तिथे जवळून पाहिले. पण महात्मा गांधींना मात्र लांबून पाहण्यात समाधान मानावे लागले. त्यांच्याशी बोलण्याचे तर शक्यच नव्हते. अजून काही दिवस तिथे राहावे असे मला वाटत होते. पण यजमान देखील घरी बोलावत होते. पती कसाही असला तरी, तोंड बंड करून त्याच्या आज्ञेत राहण्याचा तो काळ होता. त्यांच्याशी आपणहून बोलण्याचे, मनातील सांगायचे माझ्यात तरी धैर्य नव्हते.

मी कासरगोड येथे पोहचल्यावर मला माझ्या वाहिनीकडून ह्यांची नोकरी गेल्याचे समजले. मला धक्काच बसला. आता मी कोठे जावे, काय करावे? संध्याकाळी हे बंगळूरूहून कासरगोडला आले. नवीन नोकरी मिळेपर्यंत वाहिनीकडे राहावे असे ठरले, आणि ते काही दिवस राहून मग मंगळुरूला गेले. त्यावेळी तेथे राष्ट्रबंधू नावाचे साप्ताहिक तेथून निघत असे. कंडूगोडलु शंकर भट्ट हे त्याचे संपादक होते. त्यात प्रुफरीडर म्हणून काम मिळाले. माझ्या दिरांच्या मुलाच्या घरी बिऱ्हाड केले. नंतर राष्ट्रबंधू मध्ये मी लिहूपण लागले. पूर्वी बंगळूरूमध्ये असताना सरस्वती मासिकात(सं. डी. कल्याणम्मा) माझी एक कथा वरदक्षिणा आली होती. त्यामुळे राष्ट्रबंधू  मध्ये मला लिहायला मिळाले. राष्ट्रबंधू मध्ये मी अधून मधून लिहित राहिले. नंतर इकडे तिकडे प्रवास करावा लागला त्यामुळे हे लिहिणे थांबले. माझ्या नणंदेच्या मुलाकडे चार महिने राहायला जागा मिळाली. त्यांची पत्नी आजारी असल्या कारणाने माहेरी गेली होती. त्यांचे घर हे ‘शंकर विठ्ठल मोटार कंपनी’ समोरच होते. माझ्या दिराचा नातू प्रभाकर गुरुदत्तपेक्षा मोठा. तरीसुद्धा तो गुरुदत्त बरोबर कधी कधी खेळत असे. त्याला येणारी इंग्रजी नर्सरी ऱ्हायीम्स तो गुरुदत्तला शिकवत असे; गोष्टीपण सांगत असे. गुरुदत्त त्याच्या मनासारखे करत असे. त्याच्या पुस्तकातील चित्रे तो पाहत असे, प्रश्न विचारत असे. काहीतरी भांडण निघाले तर प्रभाकर गुरुदत्तला मारायला मागेपुढे पाहत नसे.

आमच्या घरा समोर असलेल्या मोटार कंपनीत गुरुदत्त ये जा करत असे. तेथील लोकांबरोबर त्याची ओळख वाढली. दिवसभर तेथे तो असे. मोटार दुरुस्तीचे काम तो मन लावून पाहत असे. त्यांना काम करता करता मध्येच काही तरी हवे असेल तर तो ते आणून देत असत. कधी कधी तो त्यांच्याबरोबर मोटार गाडीतून बाहेरही जात असे. सगळ्यांना गुरुदत्त हवा असे. तो कुठेही असला तरी संध्याकाळी सातच्या घरी हवा असे मी त्याला बजावत असे. तो ही तसा परत येत असे किंवा कोणी तरी त्याला परत आणून सोडत असे. घरी आल्यावर तो हातपाय धुवून, कपडे बदलून, देवासमोर नमस्कार करून, मी शिकवलेले स्तोत्र म्हणत असे. तो नुकताच लिहायला वाचायला शिकला होता. बंगळूरूला येई पर्यंत माझी आईच त्याला हवे नको ते पाहत असे. इथे आल्यावर मी ते पाहत असे. सुरुवातीला मला थोडा वेळ लागला, पण मी पण  त्याचे नीट करू लागले, त्यानेही सांभाळून घेतले.

माझ्या दिराचा मुलगा एल ओ सी एस कॉलेज मध्ये इंग्रजी भाषेचा प्राध्यापक होता. त्याला शास्त्रीय संगीतात रुची होती. मला देखील संगीतात रुची होती. पण मी शास्त्रीय संगीत असे काही शिकले नव्हते. तो शिकला होता. मी त्यांच्या कडून बरेच काही शिकले. प्रसिद्ध आंग्ल लेखकांचा त्याने मला परिचय करून दिला, माझ्यात साहित्याची रूची निर्माण केली. या सर्वांमुळे आमच्यात आपुलकी निर्माण झाली, पण ते माझ्या यजमानांना सहन होत नव्हते. तरीपण ते चार महिने कसे गेले हे समजले नाही. परत घर बदलताना, नको नको वाट होते. ते सोडून गेल्यावर आम्हाला जेलसमोर एक घर मिळाले. गुरुदत्तला तेथे कोणी सवंगडी नव्हते.  शेजारचे  कुटुंब प्रेमळ होते. 
त्यांच्या कडे जाऊन मीच त्यांची ओळख करून घेतली. ते सोन्या, चांदीचे दागिने करत असताना तो पाहता बसे, मध्ये मध्ये त्यांना प्रश्न विचारत असे, संधी मिळेल तशी ते करतील तसे करायचा तो प्रयत्न करत असे. हे सर्व त्याच्या जवळ असलेले अपार कुतूहल होते म्हणून तो करत असे. एकदा शेजारच्या घरात एक वृद्ध स्त्री मरण पावली होती. तेथे जाऊ नको असे कितीही सांगितले तरी तो माझा डोळा चुकवून तेथे गेला, सगळे विधी पहिले. मला भीतीच वाटली होती. पण त्याला त्याबद्दल विशेष असे काही वाटले नाही. घरी आल्यावर माझ्यासमोर ते सर्व विधी साभिनय करून दाखवायला लागला. माझे जीवन आधीच एकाकी होते, जीवनातील एकूणच रस निघून गेला होता. त्यात हे असे त्याचे मृत्यूविषयी असे वागणे बोलणे ऐकणे नको वाटत होते. तो ते सर्व विसरावे म्हणून त्याला मी दूरवर फिरायला घेऊन जाऊन लागले. तेथे त्याची वेगळीच तऱ्हा. रस्त्यावरील प्रत्येक गोष्टीबद्दल विचारत असे, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे माझ्या जीवावर येत असे. मला जेवढी माहिती असेल तेवढे मी सांगत असे, पण त्याचे समाधान होत नसे. त्यावर आणखीन प्रश्न विचारात असे, आणि मग मी त्याला रागावणे थांबत असे. त्या प्रश्नोत्तरात बाल बुद्धीचा गुरुदत्त विजयी होत असे. त्या जेलजवळील रस्त्यावर पोलीस चोरांना पकडून घेऊन येत असत, त्यांची मारझोड करत असत, तेव्हा आरडाओरडा होता असे. गुरुदत्त हे सर्व होताना पाहत नसे, डोळ्यांवर हात ठेऊन डोळे बंद करून घेई, कान बंद करून घेई, आणि म्हणे ‘किती दुष्ट आहेत हे पोलीस!, आणि रडत असे. बऱ्याचदा पहाटे पहाटे कैद्याची फाशीची शिक्षा बजावली जात असे, तेव्हा त्या येणाऱ्या किंकाळ्या आम्हाला ऐकू येत असत, आणि त्या आम्हाला असह्य होत असत. बिचारा गुरुदत्त ते ऐकून अस्वस्थ होत असे. ह्याच घरात आम्ही असताना त्याचा एक वाढदिवस साजरा झाला.

माझे वडील मला कधीतरी पत्र पाठवत. पत्रात ते लिहित, ‘माझी तब्येत सध्या ठीक नसते. पण तू घाबरू नकोस. देव आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. गुरुदत्तची नीट काळजी घे. त्याच्यत सद्गुण येतील असे पहा, त्याला प्रोत्साहन दे. चुकीच्या मार्गावर त्याला जाऊ देऊ नकोस. तुमची परिस्थिती काय आहे, हे मला माहित आहे. तुम्हाला सर्वाना इथूनच आशीर्वाद देतो’ काही दिवसातच ते हृदयरोगाने गेल्याचे समजले. शेवटच्या क्षणी त्यांच्या जवळ त्यांची पत्नी(माझी आई)आणि मुले यांपैकी कोणी नव्हते. जे जे हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले असे कळले. ही बातमी ऐकून मला अतीव दुःख झाले. माझा जन्म बर्मा मध्ये झाला होता. तीन वर्षात माझ्या भावाचा जन्म झाला होता. त्यांमुळे माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले होते. मला माझी आई आवडत नसे, सदा सर्वदा रागावलेली असे, काही तरी काढून ती भांडत असे, माझ्या वडिलांनी केले माझे लाड तिला रुचत नसत. माझे वडील अतिशय समजूतदार आणि प्रेमळ होते. बहुतेक देवाला हे सर्व आवडले नसावे, मी सहा वर्षांची होते तेव्हा ते मला सोडून मुंबईला निघून गेले. तीन वर्षे मला ते भेटले नाहीत. मी त्यांना समजू शकले नाही. त्यांच्या मध्ये देवासारखे  मन होते. त्यामुळे हे असे अचानकपणे ते गेल्याचे समजल्यामुळे मला किती यातना झाल्या असतील, विचार करा! आणि त्यांचे वय देखील खूप नव्हते, फक्त त्रेप्पन.

गुरुदत्तच्या मनात त्याच्या आजोबांची आठवणी कश्या असतील? सहा महिन्यांचा असताना त्याने त्यांना पाहिले होते. मी त्याला नेहमी त्यांच्या बद्दल सांगत असे. मी सांगितलेले तरी त्याला आठवत असणार. आजकाल गुरुदत्तला गोष्टी ऐकायचा नाद लागला होता. इसापनीतीच्या कथा, मंजी मंगेशराय यांची ‘इलीगळ थकथई’ अश्या गोष्टी शोधून आणून मी त्याला सांगत असे. त्याला गोष्ट पूर्ण ऐकल्याशिवाय झोप येत नसे. माझी सहनशक्ती कधी कधी संपत असे, तेव्हा तो माझ्या हातचा मार खात असे. अभ्यास करतना देखील, नीट समजावून सांगितले तर लक्ष देऊन ऐके, पण मी जर रागवत, चिडत, मारत शिकवले तर तो देखील हट्टी होई. जेवण खाण सोडून एका कोपऱ्यात जाऊन रुसून बसे. त्यावेळी चेहरा पाहून माझे मन विरघळत असे.

ह्यांची नोकरी परत एकदा गेली. मी सहा महिन्यांची गर्भार होते. आता कसे होणार? शेवटी मी माझ्या अहमदाबाद येथे असलेल्या माझ्या भावाला पत्र लिहिले. त्यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. माझ्या मावशीने माझ्या भावाला दत्तक घेतले होते. तिच्या नवऱ्याला वेडाचे झटके येत असत. तिलाही बरे नसायचे. घरातील समान एकाकडे ठेऊन आम्ही अहमदाबादला जायला निघालो. आम्ही तीन जण होतो. बसने धारवाडला आलो. माझ्या मामाची मुलगी तेथे राहत असे. ती तशी श्रीमंत होती, तिचे पतींचे नाव देखील होते. माझे दिवस भरत आले होते. घरात नोकर-चाकर होते, मुले होती. त्यांनी आमचे चांगले स्वागत केले. त्यावेळी हुबळी मध्ये असलेल्या श्री सिद्धारूढ स्वामी यांच्या दर्शनाला बरेच लोकं येत असत. मी आणि गुरुदत्त देखील गेलो. स्वामीजी काही बोलत नसत, मौन असे. डोके हलवून, हुंकार देऊन ते संवाद साधत असत. गुरुदत्तला त्यांच्या पाया पडायला लावले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवाला, आणि त्याला उठवले, आणि त्याला पाहून हसले. तिथे जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. ते सहसा तसे करत नसत. त्यांच्या दर्शनाने मला समाधान वाटले.

आम्ही धारवाड मध्ये एक आठवडा राहिलो. नंतर आम्ही मुंबईला निघालो. माझ्या आत्याने मुंबईत खार येथे घर बांधले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो, आमचे चांगले स्वागत झाले तिथे. त्यांच्या मोठ्या मुलाचे माझ्या मोठ्या बहिणीबरोबर लग्न होणार होते, पण ती अकाली गेल्या मुळे ते झाले नाही. त्यांच्यात तसे खूप प्रेम जुळले होते. दुर्दैवाने एका महिन्यात ती, अजून एक थोरला भाऊ आणि दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ हे सर्व विषमज्वारामुळे अकाली निधन पावले. मला त्याने ग्रासले होते. हि घटना १९१६ सालची. मला मुंबईतील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. तीन महिन्यानंतर माझे अवयव, मेंदू चालू लागले, आणि मी कशीबशी त्यातून बचावले.

खार येथे गेल्यावर मला पाहून माझ्या दिरांना आनंद झाला. त्यांना माझ्या वारलेल्या बहिणीची, सुंदरीची, आठवण झाली. त्यांच्याकडे एक आठवडा राहून आम्ही सर्व अहमदाबादला गेलो. तिकडच्या घरातील वातावरण जरा त्रासाचे होते. माझे काका रात्री -अपरात्री ओरडायचे, भावाला मारायचे. सगळ्यांची झोपमोड होत असे. असेच पाच महिने कसे गेले समजले नाही. माझ्या यजमानांना हवी तशी नोकरी मिळाली नाही. गुरुदत्त संध्याकाळ झाली कि घाबराघुबरा होऊन इकडे जाऊ तिकडे जाऊ असे म्हणत असे. बाजूच्या खोलीत वैद्यकशास्त्र शिकणारी काही विद्यार्थी भाड्याने राहत असत. गुरुदत्तला त्यांचा आणि त्यांना गुरुदत्तचा लळा लागला होता. त्यांचे कॉलेज नसे तेव्हा ते त्याला घेऊन जात, आणि पतंग घेऊन देत, गोट्या, भोवरे देखील देत, फिरायला देखील घेऊन जात. तो बाहेर राहण्याविषयी माझी ना नव्हती, कारण घरातील विपरीत परिस्थिती. ती त्याच्या वर कशी परिणाम करेल हे सांगता येत नव्हते. तेवढ्यात माझ्या भावाने आम्हाला तेथून जायला बजावले. मी आठ महिन्यांची गर्भार होते. आता कुठे जायचे? हातात पैसा-अडका नव्हता. कपडेलत्ते देखील विशेष नव्हते. थोरले मंडळी जवळ कोणी नव्हती. शेवटी कलकत्त्याला जावे असा आम्ही विचार केला. शेजारच्या खोलीतील ती मुले गुरुदत्त बरोबर रेल्वे स्थानकावर देखील निरोप द्यायला आली होती. त्याच्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या, पुरीभाजी, बिस्किटे आणून दिली. तसेच माझ्या हातावर पंचवीस रुपये ठेवले आणि म्हणाले, ‘हे तुमच्या जवळ असु द्या प्रवासात लागतील. जमेल तेव्हा परत करा नंतर’. त्यांनी केलेली ती मदत आणि गुरुदत्त प्रती दाखवलेले प्रेम मला अजूनही स्मरणात आहे.

(क्रमशः)

विजयदुर्ग

इतक्यातच एक-दोनदा वर्तमानपत्रातून वाचले कि कोकणातील एक सागरी किल्ला ज्याचे नाव विजयदुर्ग आहे त्याच्या बुरुजाच्या भिंती कोसळ्या आहेत. विजयदुर्गची तटबंदी अभेद्य मानली जाते, इतकी ती मजबूत आहे. मी खरेतर या वर्षाच्या सुरुवातीलाच विजयदुर्ग आणि जवळच्या परिसराची भटकंती करून आलो होतो. सगळे काही आलबेल होते. हि बातमी वाचून मन थोडेसे खट्टू झाले, आणि वाटले कि आपल्या त्या भटकंतीविषयी लिहावे. तसेच काही दिवसातच(ऑगस्ट १८) जागतिक हेलिअम दिन(World Helium Day) आहे. तेही कारण हा ब्लॉग लिहायचे.

आधी हेलिअम काय भानगड आहे ते सांगतो. हेलिअम हा ऑक्सिजन नायट्रोजन सारखे वायूरूप मुलतत्व आहे. आणि गमतीची गोष्ट अशी कि १८ ऑगस्ट १८९८ रोजी सूर्याच्या वातावरणात या वायूचा शोध  एका लॉकियर नावाच्या ब्रिटीश शास्त्रज्ञाला या किल्ल्यावर खग्रास सूर्यग्रहण पाहताना लागला असे मानले जाते. किल्ल्यावर  त्या शास्त्रज्ञाच्या नवे एक कट्टा आहे, त्यावर माहितीचा फलक देखील आहे. २००९ पासून किल्ल्यावर जागतिक हेलिअम दिन(World Helium Day) साजरा करण्यात येऊ लागला. विजयदुर्गावर या निमित्त दरवर्षी कार्यक्रम होतात. या वर्षी, कोरोना संसर्गामुळे माहिती नाही काय करणार आहेत. मी थोडा शोध घेतल्यावर समजले कि हेलियम शोधाची सगळी गोष्ट तशी गुंतागुंतीची आहे. तुम्ही हा  माधव गोखले यांनी लिहिलेल्या लेखाचा दुवा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. असो.

मी फेब्रुवारी २०२० मध्ये(म्हणजे कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याच्या काही दिवसच आधी!) कोल्हापुरास जाणे झाले. शनिवार रविवार हाताशी होता आणि विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्वर असा पर्यटनाचा बेत ठरला. कोल्हापूरहून सकाळी सकाळीच निघालो. अणुस्करा घाट पार करत राजापूरला पोहोचलो. राजापूर जवळील उन्हाळे गावातील गरम पाण्याचे झरे पाहून देवगड बंदर आणि नंतर समुद्रकिनारी पोहोचलो. तेथे थोडावेळ थांबून, जवळील टेकडीवरील पवनउर्जा प्रकल्प पाहायला गेलो, वरून दिसत असलेलेल समुद्राचे आणि आसपासचे अप्रतिम दृश्य डोळ्यात जवळच असलेल्या प्रसिद्ध अश्या कुणकेश्वर या समुद्रकिनारी असलेल्या शिवमंदिराला भेट दिली. तेथे असलेल्या समुद्रकिनारी संध्याकाळ घालवून रात्र त्याच गावात मुक्काम केला(शिवसागर होम-स्टे). देवगड समुद्रकिनाऱ्यावरून दिसणाऱ्या देवगड किल्ल्याला टांग मारली. तसेही त्या सागर किनारी असलेल्या दुर्गावर विशेष काही पाहण्यासारखे नाही असे ऐकून होतो. देवगड बंदराला संरक्षण देण्यासाठी हा दुर्ग बांधला गेला होता. देवगड म्हटले आठवते ते देवगडचे जगप्रसिद्ध मोठाले हापूस आंबे. शिवसागर होम-स्टेच्या मालकांशी रात्री बोलताना देवगड हापूस आंब्याचा पिकाबद्दल, एकूणच त्या व्यवसायाबद्दल मनोरंजक माहिती मिळाली.

देवगड पवनउर्जा प्रकल्प

देवगड पवनउर्जा प्रकल्प

थोडेसे कुणकेश्वर मंदिराबद्दल. हे प्राचीन शिवमंदिर कोकण काशी आहे असे म्हणतात. पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनारी उंचवट्या असेलेले हे मंदिर रम्य दिसते. आम्ही तेथे गेलो तेव्हा दिवस मवाळू लागला होता. समुद्रात लाटांशी खेळताना मंदिर खुणावत होते. महाशिवरात्रीचा सण काही दिवसांवर आला होता, त्यामुळे मंदिराची रंगरंगोटीचे काम चालू होते. हा सर्व भाग अतिशय निसर्गरम्य आहे. मला आठवते त्याप्रमाणे श्वास या मराठी चित्रपटात हे मंदिर आणि हा परिसर मी पहिला होता. सगळीकडे जांभ्या दगड, त्यात कोरलेल्या पायऱ्या, पटांगण, रस्ते दिसतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी विजयदुर्गाकडे कूच केले. सर्वात आधी विजयदुर्गला फेरा मारणाऱ्या बोटीतून फिरून आलो, दुर्गाचे बाहेरून दर्शन घेतले. त्याला जिब्राल्टर ऑफ ईस्ट(Gibraltar of East) का म्हणतात हे लक्षात येते. आणि हा तसा बराच जुना किल्ला आहे. भोजराजा शिलाहार याच्या काळात बाराव्या शतकात बांधला गेला असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात मुळ छोट्याश्या किल्ल्याचे रुपांतर तिहेरी तटबंदी बांधून एक अभेद्य किल्ल्यात केले. पुढे मराठ्यांच्या आरमारात ह्या किल्ल्याला अजूनही महत्व आले. वाघोटन नदीच्या मुखाजवळ हा किल्ला आहे. बोटीतून फिरून आल्यावर आम्ही आधी पोटपूजा केली आणि स्थानिक वाटाड्या किल्ला पाहायला मार्गदर्शक म्हणून घेतला.

वाटाड्यासोबत किल्ला पाहायला चांगले दोन तास लागले. आत मध्ये अनेक वस्तू अजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. तटबंदीवरून देखील फिरता आले. आणि  त्या तटबंदीवर २७ मजबूत बुरुज आहेत. किल्ल्याच्या प्रवेशदारातून आत गेल्यावर पुढे पोलीस चौकी आहे. कुठल्यातरी सदरेची चौकी झाली असणार. सरकारी विश्रामगृह आहे. पाण्याचा हौद, घोड्यांच्या पागा, दारुगोळा, धनधान्य साठवणुकीची कोठारे, अजूनही शाबूत असलेल्या तोफा या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहे. वाटाड्याने आम्हाला एके ठिकाणी, बहुधा एका बुरुजाच्या आतल्या भागातून खाली समुद्र किनारी भल्या थोरल्या पायऱ्या उतरायला लावून नेले. गलबत, बोटी त्या ठिकाणी लागत असणार. किल्ल्यावर बरीच झाडीझुडपी आहेत. बोरीची झाडे देखील आहेत. आम्ही गेलो तेव्हा ती बोरांनी लगडलेली होती. आणि आम्ही अधाश्यासारखे त्या आंबटगोड बोरांवर येथेच्छ ताव मारला!

विजयदुर्गबद्दल आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे किल्ल्याजवळ असलेली खाडीच्या पाण्यात न दिसणारी        “मानवनिर्मित भिंत” ज्या मुळे किल्ल्यावर हल्ला करणारी गलबते, जहाजे त्यावर आदळून बुडत असत. वाटाड्याने त्या भिंतीबद्दल अतिशय सुरसपणे आम्हाला सांगितले आणि ती भिंत त्याकाळी कशी बांधली गेली असेल, दुर्गबांधणीचे आपले तंत्र कसे पुढारलेले होते ह्याची कथा सांगितली. माझा मित्र आणि पुरातत्वशास्त्रज्ञ सचिन जोशी याने केलेल्या संशोधनांती असे लक्षात आणून दिले कि हि मानवनिर्मित भिंत नाही तर एक पाण्याखाली निसर्गनिर्मित खडकाळ उंचवटे आहेत. त्याचा संशोधनपर लेख या दुव्यावर पाहता येईल.

किल्ला पाहून आम्ही परतीच्या म्हणजे पुण्याच्या वाटेला लागलो, पण तितक्यात लक्षात आले कि जवळच एक जुने मंदिर आहे, रामेश्वर मंदिर असे त्याचे नाव. मुख्य रस्त्यावर आत मध्ये जांभ्या दगड पसरलेल्या भागावर प्रवेशद्वार आहे. आत गेले कि दगडात खोदलेल्या १००-१५० पायऱ्या दिसतात आणि खाली आत मध्ये मंदिर दृष्टीस पडते. मंदिर कौलारू आहे, फरसबंदी दगडी बांधकाम, दगडी उंच अश्या दीपमाळा असलेले मंदिर छान आहे.

रामेश्वर मंदिर

रामेश्वर मंदिर

आम्ही दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून पुण्यास परत कोल्हापूर मार्गे निघालो.  मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदीकारण सुरु आहे. सगळीकडे लाल माती, रस्त्याचे काम, ठीकठिकाणी बाह्यवळणे या मुळे जीव थोडा हैराण झाला. पण  किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, आणि येथील खाद्य-संस्कृतीने नटलेल्या कोकणाच्या या भागात खरेतर सवडीने चार पाच दिवस काढून आले पाहिजे.

माझा पुत्र गुरुदत्त: भाग#१

मी पूर्वी ह्या ब्लॉग मध्ये नोंदवल्याप्रमाणे गतकाळातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक अभिनेता गुरुदत्तच्या त्याच्या आईने, वासंती पदुकोण, यांनी लिहिलेले कन्नड भाषेतील चरित्राचा मी मराठीत अनुवाद केला आहे. त्याचे क्रमशः प्रसिद्धी या ब्लॉग वर प्रत्येक महिन्यात करतो आहे. एप्रिल महिन्यात गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना प्रसिद्ध केली होती, तर जुलै महिन्यात त्यांचे बंधू अत्म्नाराम यांनी लिहिलेला परिचय प्रसिद्ध केली होती. आज चरित्राचा पहिला भाग. मूळ कन्नड पुस्तकात प्रकरणे किंवा भाग नाहीत, पण मी ते ब्लॉगच्या सोयीकरता केले आहेत, ह्याची नोंद घ्यावी.

माझा पुत्र गुरुदत्त- वासंती पदुकोण: भाग#१

आता हयात नसलेल्या माझा पुत्र गुरुदत्त याच्या अविस्मरणीय स्मृतीप्रित्यर्थ-वासंती पदुकोण

गुरुदत्तचा जन्म

त्यावेळी आमचा विवाह होऊन अडीच वर्ष झाली होती. ह्यांना हवी तशी नोकरी अजून मिळालेली नव्हती. शेवटी पानम्बुर(Panambur, मंगळुरू जवळ समुद्रकिनारी असलेले गाव) येथे एका शाळेत मुख्याध्यापकाची नोकरी त्यांना पत्करायला लागली. त्यांनी ती पत्कारलीही. हे गाव मंगळुरूच्या उत्तरेला समुद्रकिनारी, उडपीकडे जाताना लागते. अतिशय छोटेसे खेडेगाव. आठ-दहा उंबरठे असलेले. अश्या ठिकाणी एक शाळा होती. आजूबाजूच्या खेड्यातून शाळेत मुले येत असत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्याची संख्या शंभरच्या आसपास होती. त्या काळात शिक्षकांना बराच मान असे. हि शाळा त्या गावातील ग्राम-पंचायतीतर्फे चालवली जाई.

आम्ही सर्व एका गौड-सरस्वत ब्राम्हणाच्या घरातील एका भागात भाड्याने राहत होतो. त्या गावी आठवडा बाजार भरत असे. आमच्या घराचे मालक वेगवेगळ्या प्रकारची मिठाई तयार करून ती त्या बाजारात विकत असत. त्यांच्या त्यात चांगला फायदा होत असे. कुठल्यातरी महामारी रोगामुळे यांचा एक डोळा निकामी झाला होता. त्यांना एकुलता एक मुलगा होता. तो त्या शाळेत शिक्षक होता. त्या म्हाताऱ्याच्या मुलीचा मृत्यू झाला होता त्यामुळे मुलीची दोन्ही मुले त्याच्या जवळ राहत होती. ती दोन्ही मुले, आजी-आजोबा असे राहत होते. मुलाची पत्नी आणि आणखीन एक तान्ही नात देखील घरात होती. पत्नी शेतात जाऊन गावात कापून आणत असे. शेतावर काम करण्यासाठी कुळ लावले होते. मालकिणीचा माझ्यावर का कोणास ठाऊक स्नेह होता. घरी काहीही खायला केले कि मला ते आणून दिल्याशिवाय तिला चैन पडत नसे. ते मिठाई करत असताना जवळ थांबून मी ते न्याहाळत असे.

खेड्यातील ते जीवन मला आवडू लागले होते. त्यावेळेस माझे वय फक्त पंधरा वर्षांचे होते. तेथे माझ्या वयाचीच एक घरकाम करणारी मोलकरीण होती, आणि ती कायम माझ्याकडे पाहत असे. एके दिवशी तिला बरे नसल्यामुळे, मला जवळच असलेल्या विहिरीमधून पाणी आणायला लागले. ती विहीर घरापासून साधारण २०-२५ पावले दूर होती. येताना शाळेतील काही उनाड मुलांनी मला दगड मारले. त्यापासून मी स्वतःला वाचवून मी घरी आले आणि रडू लागले. भीतीमुळे माझ्या शरीराचा थरकाप होत होता. तोंडातून शब्द बाहेर येत नव्हता. माझे यजमान घरी आल्यावर घर-मालकिणीने त्यांना सविस्तर घटना सांगितली.  ह्यांचा आधीच रागीट स्वभाव. दुसऱ्या दिवशी शाळेत त्या उनाड मुलांना चांगलीच अद्दल घडविली. त्या मुलांत एक मुलगा शाळेच्या व्यवस्थापकीय कमिटीच्या सदस्याचा मुलगा होता. त्यामुळे हे प्रकरण चिघळले. सभा बोलाविली गेली, ह्यांना शाळेतून काढून टाकूयात असा ठराव झाला. पण शाळेतील मुलांचा यांच्यावर लोभ जडला होता, विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांनी हेच शिक्षक हवे असा हट्ट केल्यावर हे प्रकरण निवळले.

त्या वर्षी शाळेतील वार्षिक समारंभात अनेक कार्यक्रम झाले. छोट्या छोट्या नाटिका, गाणी, वाद-विवाद स्पर्धा अश्या गोष्टी झाल्या. त्या वर्षी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यासाठी माझ्या मागे लकडा लावला. मंचावर मी गेल्यावर माझे हात पाय लटपटत होते. मी मला दिलेले काम कसेतरी संपवून घरी आले.

माझ्या यजमानांना मलेरिया झाला होता. शाळेतील एक शिक्षक वच्चप्पा हे वैद्य होते. ते स्वतः औषध देत असत आणि त्यांच्या हाताला गुण देखील येई. हे देखील पटकन बरे झाले. पण वैद्यच म्हणाले कि, तुमची ग्रहदशा ठीक दिसत नाही. एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन या, असा सल्ला दिला. ह्यांचा मात्र ज्योतिषावर विश्वास नव्हता. पण सगळ्यांच्या आग्रहामुळे एका नामवंत ज्योतिषाला बोलावले. त्यांनी आमच्या दोघांच्या कुंडल्या, आमचे हात पाहून काहीबाही बोलले. माझ्या हात पाहायला घेतल्यावर तर माझ्या अंगावर काटे आले. ज्योतिषी म्हणाले, ‘मुली, तू भाग्यवंत आहेस. एका वर्षाच्या आत तुला एक मुलगा होईल. तो तुझ्या घराला सुख, ऐश्वर्य, संतोष मिळवून देईल, नाव कमावेल, तो खूप कीर्ती कमावेल, पण…’ ते थांबले आणि माझ्याकडे पाहू लागले. मला संकोच वाटू लागला. मुले होण्याच्या आधीच मुलांच्या विषयी कोणी विचार करतं का? ज्योतिषी पुढे काही न बोलता निघून गेले. माझ्या मनात मात्र त्यांनी सांगितलेली गोष्ट राहिली आणि वाईटसाईट विचार येऊ लागले.

पानम्बुर येथे त्यावेळेस, मी आधी सांगितल्या प्रमाणे आठवडा बाजार भरत असे. आजूबाजूच्या खेडेगावांतून, पंचक्रोशीतून लोकं त्यावेळेस येत. भाजीपाला, फळे, बांगड्या, अश्या वस्तू ती लोकं खरेदी करत. मला बांगड्यांचा नाद होता. आमच्या घरकाम करणाऱ्या बाईंबरोबर बाजारात आम्ही जात असू. बाजारात येणाऱ्या विविध प्रकारच्या लोकांना पाहून, त्यांचे बोलणे, त्यांची वागणूक मला एक प्रकारचा संतोष होत असे. आमच्या शेतातूनच आम्हाला ताजी भाजी मिळत असल्यामुळे , मी बाजारातून भाजी वगैरे काही विकत घेत नसे. नुसताच फेरफटका मारत असे. आमच्या घरमालकिणीबरोबर गप्पा मारणे, त्याच्या नातवाला खेळवणे मला आवडत असे. बऱ्याचदा, हे मला त्याबद्दल रागे भरत असत.

एके दिवशी मी त्या मुलाला झोपाळ्यावर झुलवत होते, तेव्हा घरमालकीण चारा भरलेल्या घमेले तसेच बरोबर असलेले गाढव एका बाजूला सरकवून, ती जमिनीवर लोळू लागली. तिचे डोळे लाल झाले होते. दृष्टीत क्रूरता होती, आणि आजूबाजूला कोणीतरी असावे असे ती पहात होती. तिचे शरीर थरथर कापत होते. तोंडातून काहीतरी अस्पष्ट असे बोलत होती. ते पाहून माझ्या अंगाला घाम आला. घाबऱ्या आवाजात तिने सुनेला हाक मारली. घरात ती धावत आली. त्यांना असे होते हे माहित असावे. विड्याच्या पानावर रुपयाचे नाणे ठेवून हात जोडून उभी राहिली. आणि म्हणाली, ‘आई, आमची चूक पोटात घे, ह्या वेळी तुमचे आणि वडिलांचे श्राद्ध करू शकलो नाही. येत्या तिथीला नक्कीच ते करू. तुम्ही निश्चिंतपाने परत जा.’ आणि साष्टांग नमस्कार घातला. म्हातारीच्या अंगातील देवी निघून गेली असावी, तिचा श्वासोच्छवास परत सुरळीत झाला. तिचे शरीर घामाने लडबडले होते. डोळे मिटलेले होते. सारा दिवस ती झोपून होती. दुसऱ्या दिवशी तिला त्या बद्दल विचारले असता, तिला काही माहिती नव्हते, लक्षात नव्हते.

कधी कधी आमच्या घराशेजारी असलेल्या मैदानात बैयलाट(कर्नाटकातील लोकनाट्य) कार्यक्रम होत असत. घरातील खिडकीतून सर्व काही पाहता येई. पाय दुखे पर्यंत आम्ही तिथे उभे राहून कार्यक्रम पाहत असू. त्यातील ती गाणी, संवाद, नृत्य, वेशभूषा हे सर्व मला एका अद्भुत लोकात घेऊन जात असे.

उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली होती पण काही कारणाने ह्यांनी शाळेच्या नोकरीचा राजीनामा दिला. जास्तीच्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी बंगळूरूस जाणार होते. मी देखील त्यांच्या बरोबर निघाले. पानम्बुर सोडून जाताना मन दुखिःकष्टी झाले. ते गाव, तेथील लोकं, तेथील वातावरण हे मला आवडू लागले होते. आमच्या घरमालकांचे देखील डोळे भरून आले होते. माझ्या सासऱ्यांनी घराच्या दोन्ही बाजूला नारळाची रोपे लावली. ती रोपे दाखवत ते म्हणाले, ‘मुली वासंती, ह्या कल्पवृक्षासमान तू मोठी हो, आणि सर्वाना मदत कर, तुमचे जीवन देखील समृद्ध होऊ दे, परोपकार करत सफल होऊ दे, सार्थक होऊ दे.’ असा त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्यांचे वय त्यावेळेस बहात्तर होते. त्यांचे ते प्रेमाचे शब्द, दया, आशीर्वाद माझ्या मनात घर केले आणि मी धन्य झाले. ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांना जाऊन आता पंचेचाळीस वर्षे झाली. ती नारळाची झाडे आता मोठी झाली असतील, बहरली असतील.

माझ्या सासऱ्यांना दहा मुलगे होते, आणि तीन मुली होत्या. त्याकाळी समाजात जेवढी जास्त मुले तेवढा जास्त मान असे. आयुष्य अतिशय साधे सरळ होते. मुले म्हणजे ऐश्वर्य असे समजण्याचा तो काळ होता. माझे यजमान सर्वात धाकटे असल्यामुळे सर्वांचे लाडके होते. त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची आई निर्वतल्यामुळे वडिलांनी अतिशय प्रेमाने, लाडाने वाढवले होते. सासूबाई गेल्यानंतर पिता आणि पुत्राला इतर मुलांचा आधार घ्यावा लागला. ह्यांचे कॉलेज शिक्षण होई पर्यंत मोठ्या भावाकडे त्यांना राहावे लागले. माझे सासरे मला त्यांच्या जीवनातील अनुभव सांगत असत, नवरा बायको यांच्या मधील छोटी मोठी भांडणे कुरबुरी आपापसात मिटवावी हे चांगले असे सांगत. माझी तर त्यांनी खूप काळजी घेतली. दुर्दैवाने आम्ही गाव सोडल्यावर त्यांना आमच्या बरोबर राहणे जमले नाही.

१९१४ मध्ये हे बंगळूरूस गेल्यावर मला माझ्या मावशीच्या मुलीकडे(मंगळुरू) चार महिने निरुपाय म्हणून राहावे लागले. माझी थोरली बहिण तशी चांगली होती, पण तिच्या मनासारखे झाले नाही तर ती चिडायची, तोंडाला येईल तसे बोलत असे. मी एक वर्षे स्वतंत्र राहिले होते, त्यामुळे मला तिचे हे टोचून बोलणे लागायचे. मावशीचा मोठा मुलगा मात्र माझ्या बाजूने होता. तो माझ्याहून वयाने चार वर्षे मोठा होता. तो चांगला कलाकार होता. शाळेत त्याने नाटके लिहून पारितोषिके मिळविली होती. आमची जवळीक झाली होती. त्याला रवींद्रनाथ टागोर आवडत, त्यांचा तो भक्तच होता. त्यांच्या कवितांची पुस्तके शाळेच्या वाचनालयातून आणून मलाही तो वाचायला देत असे. कधी कधी मला त्या कविता वाचूनही दाखवत असे. त्यामुळे मला टागोरांच्या कवितांचा, त्यांच्याबद्दल एकूणच चांगला परिचय झाला. मलाही पुढे पुढे त्यांचे साहित्य वाचायचे वेड लागले. त्यावेळी वयात आलेल्या मुली एकट्या दुकट्या कुठे जात नसत. घरातील मोठी मंडळी देखील असे एकट्याला जाऊ देत नसत. माझा भाऊ मला कद्रीगुड्डा(कद्री टेकडी), फळनीर भागात(दोन्ही ठिकाणे हि मंगळुरू मध्ये आहेत), तसेच मैदानात संध्याकाळी घेऊन जात असे. आम्ही दोघे त्यावेळेस भविष्याबद्दल, कलेबद्दल, साहित्याबद्दल, बोलत आमचा वेळ घालवत असू. माझ्या बहिणीला हे रुचत नसे. माझ्या मावशीचे पती हे जरी जुन्या काळातील जुन्या विचारांचे होते तरी, असे प्रतिबंध घालत नसत. त्या दोघांचे वाद होत असत. शब्दाला शब्द वाढत असे. पण त्यांचे कोणी ऐकत नसे. ते पूर्वी रंगभूमीवर नाटकातून काम करत असत. पण ते तसे कंगाल झाले होते. यामुळे त्यांना कसतात दिवस काढावे कागले होते. त्यामुळे देखील त्यांना मुले किमत देत नसत.

मी त्यांना नेहमी काहीबाही मदत करत असे, त्यांनी छोटी मोठी कामे करत असे, त्यांना पान लावून देत असे. ह्यामुळे असेल किंवा आणखीन कशामुळे असेल, त्यांची माझ्यावर खूप प्रीती जडली होती. माझ्या मनात देखील त्यांच्या प्रती आदरयुक्त प्रेम होते. ते म्हणत, ‘ हे बघ वासंती, तुमचे घर बांधून झाले कि, मी तुमच्याकडे राहायला येईन’. दुर्दैवाने, मी बेंगळूरूला गेल्यावर काही दिवसातच त्यांचे निधन झाले.

आम्ही बेंगळूरूला दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहू लागलो. मी अल्पशिक्षित असल्यामुळे असेल किंवा शहरात राहत असल्यामुळे असेल, माझ्या सासरची मंडळी तशी तुच्छतेने वागवत, पहात. त्यामुळे मी तेथील कॉन्व्हेंट शाळेत माझे नाव घातले. तेथे नन्स भरतकाम शिकवत, ते शिकायला मी नाव नोंदवले. त्यांचे इंग्रजी मला विशेष कळत नव्हते. ते मला कन्नड मध्ये जसे जमेल तसे बोलून शिकवत असत. हे दोन महिने चालले. त्यानंतर मला नकोसे झाले. त्याचे कारण मला दिवस गेले होते, आणि मला थोडा त्रास सुरु झाला होता. मला त्या ज्योतीष्याचे भविष्य कथन आठवले. त्यामुळे मी मला जे माहिती होते त्याप्रमाणे धार्मिक पुस्तके वाचायला सुरुवात केली. तसेच रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांची चरित्र वाचत असे. गर्भवती स्त्रीचे आचार विचार तिच्या गर्भावर परिणाम करतात असे मी कुठे तरी वाचल्याचे माहित होते. मला जी मुले होतील त्यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबातील मुलांप्रमाणे मान, प्रसिद्धी मिळाली पाहिजे असे मला वाटत असे. ती माझी अशा आता या वयात पूर्ण झाल्याचे पाहून मला अतीव संतोष होतो(माझी मुले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे).

६ जुलै १९३५ मध्ये माझा थोरला मुलगा जन्माला आला. ज्या हॉस्पिटल मध्ये तो जन्माला ते बरेच लांब होते. त्यादिवशी सकाळी मला माझे यजमान आणि माझ्या आईने मला हॉस्पिटल मध्ये सोडून निघून गेले. ते धर्मार्थ हॉस्पिटल असल्यामुळे त्यांना तेथे राहता येत नव्हते. मी लहानच होते, विशेष काही व्यवहार ज्ञान नव्हते. मी आत जाऊन हेड नर्सच्या खुर्चीवर जाऊनबसले. ते पाहिल्यावर मला ती तोंडाला येईल ते बोलली. आधीच अशक्त झाले होते, त्यातच पोटातून कळा येत होत्या. हे देखील निघून गेले होते. त्यातच ह्या नर्सचे रागावणे वेगळे. मला रडू कोसळले. पण तिथे रडता येईना, तशीच बसले. अकरा वाजता मला लेबर-रूम मध्ये घेऊन गेले. मध्यान्ही बारा वाजता मुलगा जन्माला आला. एक-दोन तासाने नर्स आली, आणि माझ्याजवळ आली आणि गाठोडे ठेवत म्हणाली, हे तुझे मुल, आणि निघून गेली. काचेच्या बाहुलीसारखे दिसणारे ते तान्हे मुल पाहून, माझ्याच्या पोटचा गोळा आहे, हा विचार आला आणि मला आश्चर्य वाटले. त्याच्या कपाळाचे हळुवार चुंबन घेतले आणि माझ्या पोटदुखी पळून गेली. मला अत्यानंद झाला होता. आईचे आणि मुलाचे काय मायापाश असतात त्या देवालाच माहित.

त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये जन्मलेले हा एकच एक मुलगा. बाकी सगळ्या मुलीच जन्मल्या होत्या. हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या सर्व मुलांना गळ्यात एक दोरा बांधून त्यावर पुठ्यावर एक क्रमांक लिहिलेला असे. मला ते सर्व माहिती नव्हते. नर्सने पाहिलेले सहाव्या क्रमांकाचे मुल माझ्या जवळ आणून ठेवले. पण माझ्या मुलाचा क्रमांक नववा होता. दुध पाजवताना लक्षात आले कि मुलगी आहे ते. नर्सला समज तर देण्यात आली, त्या उपर ती बातमी डॉक्टर पर्यंत देखील पोहोचली आणि त्याचे विपरीत परिणाम झाले.

जनरल वॉर्ड वेगवेगळे रुग्ण तसेच बाळंतीणी देखील होत्या. माझ्या डाव्या बाजूला वयस्कर अशी ख्रिश्चन स्त्री होती. ती खूप चांगली होती. तिनेच मला शिकवले. संध्याकाळी माझी आई आणि यजमान एकत्र आले. मला मुलगा झाल्याचे ऐकून माझ्या आईला खूपच आनंद झाला. ह्यांना पण कुलदीपक मिळाला असेल असे वाटून आनंद झाला असावा असे वाटले. मुलगा रडू लागला कि ती ख्रिश्चन स्त्री येऊन त्याला शांत करत असे. मला ते जमत नसे. तान्हा मुलगा, रंग गोरा, मान तशी काळसर, डोळे मोठे आणि आकर्षक होते. हॉस्पिटल मध्ये मी दहा दिवस होते. अकराव्या दिवशी आईबरोबर मुलाला घेऊन घरी आले. माझी आई जेव्हा त्या तान्ह्या मुलाला आंघोळ घाली, ते पाहताना मला अचंबा वाटे. एवढ्या लहान तान्ह्या मुलाला इतक्या जवळून मी पहिल्याचा पहिलाच प्रसंग होता. छोट्या छोट्या हात पायांना तेल लावून कोमात पाण्याने आंघोळ घालणे मला दिव्य वाटायचे. बाराव्या दिवशी नातेवाईकानां आमंत्रण देऊन मुलाचे बारसे केले. आमच्या कुटुंबात मुलगा होण्याचा पहिलाच प्रसंग असल्यामुळे माझ्या भावाने कलकत्याहून दोन नावे सुचवून पाठवली होती. पहिले वसंतकुमार आणि दुसरे गुरुदत्त. मुलाचा गुरुवारी जन्म झालेला, आणि तो दिवस श्री मध्वचार्यांची जयंती होती. ही दोन्ही ठेवली, पण त्याला आम्ही सगळे ‘गोंटा'(म्हणजे सुंदर) असे हाक मारत असू. तो जरा कमी वजनाचा होता कि काय, पण कायम रडत असे(त्यातच बंगळूरू मध्ये कायम पाउस पडे, आणि त्यामुळे थंडी देखील बरीच असे). वारंवार सर्दी, खोकला होत असे. मलाही तसा मुलांचे पालन-पोषण करण्याचा अनुभव नव्हताच. त्याला उचलून घेतल्यावर तो हातातून खाली पडेल कि काय त्याची सारखी भीती वाटत असे. सुरुवातीला तर त्याचे शी-शू साफ करणे सुद्धा किळसवाणे वाटे, पण नंतर त्याची सवय झाली.

तो आता दीड महिन्याचा होता आला होता, पाळण्याजवळ कोणी आले कि चेहऱ्यावर हसू उमटे. तिसऱ्या महिन्यात त्याचा माथा भरून आला होता. मुलाला उचलून त्याला खेळवण्यात माझा जीव रमत होता. आम्ही राहता असलेल्या घराची मालकीणबाई हि लिंगायत समाजाची होती. तिला कोणीतरी सांगितले की आम्ही मच्छी-ब्राम्हण, मासे खाणारे आहोत असे चुगली केली. त्यामुळे आम्ही घर सोडून जावे या करिता तिने नाना तऱ्हेने आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी आम्ही ते घर सोडून चामराजपेटे भागात पाचव्या रस्त्यावर एक घर भाड्याने घेऊन राहू लागलो. घरमालकाचे तीम्मी नावाच्या घरकाम करणाऱ्या महिलेबरोबर संबंध होते. घरमालकीण छान सुंदर होती, तीन मुलांची आई होती. ते हे कसे सहन करील? ती माझ्याजवळ रोज आपले दुःख सांगत असे. घर सोडून जाते असे म्हणे. पण ती कुठे जाणार? तिला आई वडील, भाऊ बहिण असे जवळचे कोणी नव्हते. ह्या अश्या वातावरणात आम्ही तेथे आठ महिने राहिलो.

एके दिवशी माझे वडील त्यांच्या भाच्याकडे आले हे मला समजले. आम्ही दोघे त्यांना घरी आणायला म्हणून गेलो. आमच्या बरोबर ते आले, पण ते काहीसे अस्वस्थ होते. आल्या आल्या त्यांनी सहा महिन्यांचा असलेला गुरुदत्तला उचलून घेतले, आणि त्याचे पापे घेतले. गुरुदत्तने हसत डोळे मोठे करत हात पाय झाडत त्यांना मिठी मारली. माझ्या वडिलांना मी कित्येक वर्षांनी भेटले होते, मलाही आनंद झाला. माझ्या आईला तिचे यजमान अलाल्याचे रुचले नव्हते. कायम कपाळावर आठ्या ठेवून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत असे. माझे वडील सहनशील होते, त्यांनी आईला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती एक शब्द बोलली नाही. आमच्या घरी आलेल्या माझ्या आई वडिलांचे हे संबंध पाहूनही, आईच्या भीतीने, आम्हाला सर्व काही मुकाट्याने पाहत राहण्याशिवाय काही करता आले नाही. माझी आई कलकत्त्यावरून बंगळूरूस आल्यानंतर आमच्या घरातील सारा कारभार तिच्याच हातात आला होता. अधिकार जगवण्याच्या बाबतीत माझ्या आईचा हात कोणी पकडू शकणार नाही. मलाही एकट्याने बाळाला सांभाळण्याचे धैर्य होत नव्हते. आई देखील जाता येता ‘मी परत जातेच कशी’, असा धाक भरत असे. माझे वडील मात्र दिवसभर छोट्या गुरुदत्तला खेळवत असत. त्याची देखील आजोबांबरोबर जास्त सलगी होती. मी बोलावले तरी माझ्याकडे विशेष येत नसे. ते काही दिवस अजून आमच्याकडे राहिले असते कि कोण जाणे. याच वेळेस एक घटना घडली. वडील एकदा माझ्या कडे आले आणि म्हणाले, ‘सहा साधू आले आहेत, त्यांना जेवायला घालतेस काय?’ मी हो म्हणाले. पण माझी आई म्हणाली, ‘माझ्याकडून होणार नाही. काय करायचे ते करा’. माझे वडील त्याच दिवशी निघून गेले. मी कितीही समजावले तरी काही ऐकले नाही. शेवटी गुरुदत्तला त्यांच्या मांडीवर ठेवत, रडवेल्या चेहऱ्याने विनंती केली. पण त्यांचा मनाला अतीव दुःख झाले होते, त्यामुळे ते निर्धाराने निघून गेले. तीच आमची पहिली आणि शेवटची भेट. गुरुदत्तला सारखी त्यांची आठवण येत होती, काही दिवस. झोपेत देखील तो त्यांची आठवण काढत असे.

माझ्या आजी-आजोबाना माझे वडील एकुलते एक होते. ते देखील कित्येक नवसाने ते झाले होते. घरात सगळेजण त्यांच्यावर लाड करत असत. त्यांचे मन विशेष करून मोडत नसत. त्यामुळे कि काय त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा हट्टीपणा आला होता, शीघ्रकोपी देखील होते. त्यांचे पंधराव्या वर्षी लग्न लावून टाकले. आईचे वय अकरा होते त्यावेळेस. तिने लहानपणीच आपल्या वडिलांना गमावले होते. तिचेहि तसेच, ती देखील हट्टी होती. तिच्या मनात येईल ते झाले पाहिजे. कोणापुढेही ती मान झुकवत नसे. लग्न होऊन सासरी आल्यावर तिने सगळ्यांशी जुळवून घेता आले नाही. सासू-सून यांच्यात वादविवाद होत असत. पती-पत्नी मध्ये देखील विशेष काही प्रेम नव्हते. तिला एक मुलगा झाल्यावर परिस्थिती बरी झाली होती.

माझे आजोबा शांत स्वभावाचे, प्रेमळ होते. सर्वांशी मिळून मिसळून वागत आणि सगळ्यांना त्यांच्याविषयी आदर वाटे. माझे वडील त्यांच्या वडिलांचे प्रतीरुपच होते. आईकडून हटवादी स्वभाव घेतला असावा. माझ्या आज्जीच्या एक बंधू आमच्या सारस्वत समाजाचे गुरु होते. पांडुरंगाश्रम पासून सर्वांचा आदर प्राप्त केलेले, व्रतनिष्ठ जीवन जगात आलेले होते. माझ्या आजीला ह्याचा खूप अभिमान होता.

माझे आजोबा निर्वतल्यावर घर मोडून पडले. आजी तिच्या मुलीच्या घरी निघून गेली. माझे वडील हुशार होते, इंजिनियरिंग शिकल्यामुले त्यांना चांगली नोकरी मिळू शकत होती. पण त्यांच्या सरळ सध्या स्वभावामुळे ते कुठेच विशेष टिकले नाही. उद्योग धंद्यात देखील ते गेले. पण त्यात एका गौड सारस्वत असलेल्या व्यक्तीकडून फसवणूक झाली. त्यावेळी आईचे दागिने गहाण ठेवून कसे बसे त्यातून निभावले. माझे वडील जेवढे उदार होते, तेवढीच माझी आई कंजूष होती. त्यांच्यात कायम झगडे होत असत, त्यामुळे आम्हा मुलांना आमच्या नातेवाईकांकडे राहावे लागले. एकूणच कष्टातच वाढलो आम्ही.

गुरुदत्त जवळ जवळ सहा महिने रांगत होता. किती मस्ती करायचा. सदा सर्वकाळ त्याच्या मागे कोणीतरी राहायला लागायचेच. सातव्या महिन्यात स्वतःहून बसायला शिकला. त्यावेळेस त्याचे पहिले छायाचित्र मी काढले. गुरुदत्तला शेजारचे घेऊन जायचे आणि खेळवायचे. त्याच्या बाल-लीला नंतर माला सांगायचे. त्याला दृष्ट लागू नये म्हणून माझी आई दररोज त्याची दृष्ट काढून टाकायची. दहाव्या महिन्यात तो चालायला शिकला. सुरुवातीला सुरुवातीला तो कसा काय उभा राहणार असे वाटत होते. सारखा पडायचा, परत उभा राहायचा! सगळे कसे मनमोहक असायचे. कृष्णाच्या बाल-लीला मी माझ्या गुरुदत्त मध्ये पाहत होते. त्याच्या पहिल्या वाढदिवशी आम्ही काही मित्रांना, स्नेह्यांना, नातेवाईकांना आमंत्रण दिले. गुरुदत्त प्रत्येक वस्तू कडे बोट दाखवून हे काय, हे काय असे विचारात फिरला होता. मोठी लोकं त्याच्या प्रश्नांना कधी उत्तरे देत तर कधी निरुत्तर होत. संध्याकाळी त्याला ओवाळत असताना निरांजानावर हात ठेवल्यामुळे हात भाजून घेतला होता. ह्यामुळे मला घरातील थोरल्यांकडून बोलणी खावी लागली होती.

आम्ही राहत असलेले ते घर आमच्या घरमालकाने विकल्यामुळे आम्हाला ते घर सोडावे लागले. तेथूनच जवळच असलेल्या दुसऱ्या रस्त्यावरील एका घरात आम्ही आलो. घरमालक तसे श्रीमंतच होते, पण चांगले देखील होते. ते गुरुदत्तला जे सकाळी घेऊन जायचे, ते पार संध्याकाळीच परत घेऊन येत. त्यांना मुलगा नव्हता. तिन्ही मुलीच झाल्या होत्या. ते गुरुदत्तबरोबर कन्नड भाषेमध्येच बोलत, त्यामुळे कोंकणी भाषेपेक्षा त्याला कन्नडच चांगले यायला लागले. सकाळी सकाळी गवळी गाय घेऊन घरी येत असे, आणि समोर दुध काढून देत असे, ते पाहायला गुरुदत्त तेथे जाऊन उभा राहत असे. घरात मग तो एखादे भांडे घेऊन, गवळ्यासारखे खाली बसून, दुध काढण्याचा अभिनय करत असे, आणि दुधाचे भांडे आणून देत असे. त्याचा हा असा खेळ चाले. आमचे चार खोल्यांचे घर होते. पण ती सर्व रेल्वे डब्यासारखी एका सरळ रेषेत होती. गुरुदत्तच्या खोड्या वाढल्या कि त्याला एका लांब दोऱ्याला बांधून सोडत असे. त्याच्या खोड्या काही थांबत नसत. लगाम असलेल्या घोड्या सारखे त्याचे उद्या मारणे असे, बांधून ठेवलेल्या माकडासारखे त्याचे किंकाळणे असे. बांधून ठेवले असले तरी, त्याला आवरणे कठीण व्हायचे. अंगणात येणाऱ्या पक्ष्यांना मी दाणे टाकत असे, ते त्याने पहिले. झाले, त्याचे सुरु, माझ्या मागे लकडा लावला, मी देखील दाणे टाकतो असा. दिले नाही तर भोकाट पसरे. शेवटी तोच जिंकत असे. गल्लीच कोणी डोंबारी आला, तो क्षणार्धात तो बाहेर उभा असे. डोंबारी खेळ संपवून परत जाई पर्यंत तो तेथेच एकाग्रतेने पाहत थांबे. आतून कितीही हाका मारल्या तरी त्याचे लक्ष नसे.

बंगळूरूमध्ये हरिदास मंडळींची भक्तीपदे गात घरोघरी भिक्षा मागायला कित्येक लोकं येत असत. त्यांना देखील बोलावून ती गाणी, पदे ऐकत असे. हे सर्व पाहून आम्हाला वाटे कि त्याची बुद्धी इतर मुलांपेक्षा जास्त आहे.

(क्रमशः)

मीआणि कन्नड चित्रपट

मी ह्या ब्लॉग वर कन्नड नाटकांविषयी आणि इतर कर्नाटकाशी/कन्नड भाषेशी निगडीत अनेक विषयांवर लिहिले आहे. पण कन्नड चित्रपटांच्या माझ्या अनुभवांविषयी लिहिले नव्हते. कन्नड चित्रपटसृष्टीला Sandalwood असे म्हणतात आणि तिला देखील मोठा इतिहास आणि परंपरा आहे. मी प्रामुख्याने मराठी किंवा इंग्रजी मध्येच लिहितो, कारण मला तसे जमते असे वाटते, कन्नड मध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता लिहिले नाही. माझ्या मराठी वाचकांना, रसिकांना मराठीची भाषा भगिनी असलेल्या कन्नड भाषेच्या, संस्कृती विश्वाबद्दल माहिती करून देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न मी ह्या माझ्या ब्लॉग्स मधून, अनुवाद प्रकल्पांतून करत असतो. असो.

तेरा चौदा वर्षांपूर्वी एप्रिल २००७ महिन्यात बंगळूरूला गेलो असता कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार(१९२९-२००६) याची पहिली पुण्यतिथी शहरातील रस्त्यांवर चौका चौकात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात होती ते मला दिसले. राजकुमारचे कन्नड भाषा प्रेम प्रसिद्ध होते तेहि कारण असेल(कन्नड भाषेला राज्यात प्रथम दर्जा मिळायला हा या साठी झालेल्या गोकाक चळवळीत १९८० च्या दशकात त्यांनी सक्रीय भाग घेतलेला होता). कुख्यात दरोडेखोर वीरप्पन याने राजकुमार ह्यांनाच पळवून नेऊन ओलीस ठेवले होते कित्येक दिवस. त्यादिवशी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्याचीच गाणी, त्याचेच चित्रपट दाखवले जात होते, ते मी दिवसभर पहिले. आणि मी  खरे तर त्या दिवसापासून कन्नड चित्रपटांकडे शोधक नजरेने पाहू लागलो. हा राजकुमार खरे तर एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे, लिहीन नंतर कधीतरी.

फार वर्षांपूर्वी जेव्हा सरकारी दूरदर्शन हि एकच दूरचित्रवाणी वाहिनी भारतात होती तेव्हा रविवारी दुपारी (आणि रात्री देखील) देखील प्रादेशिक चित्रपट दाखवत असत. तेव्हा एक कन्नड चित्रपट पाहिल्याचे आठवते, त्याचे नाव काडीना बेन्की(Forest Fire). गिरीश कार्नाड त्यात होते. अतिशय प्रक्षोभक शृंगारिक चित्रपट होता, पण मानसिक समस्येवर(Oedipus Syndrome) आधारित होता. चित्रपट रंगीत होता(१९८७), पण आमच्याकडे कृष्ण धवल संच होता त्यामुळे कृष्ण धवल रुपात तो पहिला होता. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी कर्नाटकात विजापूर जवळ निंबाळ येथे जात असू. अधून मधून विजापुरास देखील जाणे होई. तेथे त्यावेळी(१९८०-९०)दोन-तीन चित्रपटगृहे होती, पण मी कधी तेथे लागणारे कन्नड चित्रपट पाहण्यास आम्हाला कोणी नेल्याचे, किंवा स्वतःहून गेल्याचे आठवत नाही. अमीर चित्रपटगृहे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील १९०४-५० मधील प्रसिद्ध गायक-नटी अमीरबाई कर्नाटकी हिने उभारले होते.

बंगळूरूहून पुण्याला परत आल्यानंतर मी राजकुमारचे बरेचसे चित्रपट मागवून पाहण्याचा सपाटा लावला(त्यात अनेक ऐतिहासिक, पौराणिक, आणि सामजिक, प्रेमकथा अशी सर्व प्रकारचे चित्रपट आहेत) आणि त्याच्या अभिनयाच्या आणि मुख्य म्हणजे याच्या आवाजावर(त्यांच्या बहुतेक चित्रपटात तेच गाणी गात असत), गाण्यांवर फिदा झालो, मला नवीनच काही तरी गवसल्यासारखे झाले होते. त्याचा गन्धद गुडी(ಗಂಧದ ಗುಡಿ) नावाचा प्रसिद्ध सिनेमा पहिला, त्यावरून हिंदीमध्ये धर्मेंद्रचा कर्तव्य हा सिनेमा आला होता. हे चित्रपट पाहिल्यामुळे  माझी  कन्नड भाषा देखील त्यामुळे(आणि माझ्या इतर समांतर उद्योगांमुळे जसे कन्नड नाटकं आणि साहित्य यात मुशाफिरी) सुधारत चालली, बरेचसे उमगत गेले. त्यातच असे माझ्या ऐकण्यात आले कि आमच्या कुटुंबातील  नात्यातील एक जण कन्नड चित्रपट क्षेत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांचे नाव सुनीलकुमार देसाई. त्यांची एक दोनदा ओझरती भेट झाली होती, पण तो पर्यंत  सुनीलकुमार देसाई यांचे कर्तृत्व माझ्या खिजगणतीतही नव्हते!  त्यांचे चित्रपट अतिशय वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे देखील चित्रपट पाहण्याचा उद्योग सुरु केला जसे बेळदिंगळा बाळे(ಬೆಳದಿಂಗಳ ಬಾಲೆ).

पुढे पुढे मी काहीना काही कारणाने बंगळूरूला प्रत्येक वर्षी जाऊ लागलो आणि कन्नड नाटकांचा, पुस्तकांचा माहोल अनुभवू लागलो, प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन कन्नड चित्रपट नाही पाहिले, कारण गेल्या १०-१५ वर्षांपासून कन्नड चित्रपटांचा दर्जा तसा खूपच घसरला आहे. पण बंगळूरूमध्ये तरी ठिकठिकाणी नवीन कन्नड चित्रपटांचे मोठाले पोस्टर्स लागलेले दिसतात, हिंदीचे क्वचितच. कन्नड चित्रपटांना चित्रपटगृह न मिळण्याचा प्रश्न आपल्याकडील मराठी चित्रपटांच्या बाबतीत जसे होते, तसे तेथे होत नाही. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता गणेश याचा २००६ मधील सुपरहिट चित्रपट(जो त्याचा पदार्पणातील चित्रपट) मुन्गारे मळे(ಮುಂಗಾರು ಮಳೆ) हा देखील मी पहिला नव्हता काल परवा पर्यंत. एकच चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहिल्याचे आठवते तो म्हणजे अभिनेता उपेंद्र आणि सुदीप यांचा मुकुंद मुरारी हा चित्रपट जो २०१६ मध्ये आला होता आणि तो अक्षय कुमारचा हिंदी चित्रपट OMG-Oh My God यावर आधारित होता. त्यामुळे थोडी उत्सुकता होती कि कन्नड मध्ये कसा केला असेल त्याची.

मला सुरुवातीला नवीन, हल्लीच्या कन्नड चित्रपटांत विशेष रस नव्हताच. समांतर चित्रपट, आणि १९७०/८० मधील राजकुमार, विष्णूवर्धन, अनंत नाग, शंकर नाग यांचे चित्रपट पाहण्यात रस होता आणि मी जमेल तसे मी ते पाहिले देखील.शंकर नाग याचा एक चित्रपट ऑटो राजा, ज्यात त्याने एका रिक्षावाल्याचे काम केले आहे, तेव्हा पासून बंगळूरू मधील सगळ्या रिक्षांच्या मागे त्याचे छायाचित्र लागले होते. त्याचाच Accident नावाचा, अमली पदार्थ प्रश्नाच्या विषयी असलेला, चित्रपट, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला, तो पाहिला. गिरीश कर्नाड दिग्दर्शित कान्नुरू हेग्गाडीथी(ಕಾನೂರು ಹೆಗ್ಗಡಿತಿ), भारत स्टोर्स, बी जयश्री यांचा बनदा नेरेळू(ಬನದ ನೆರೆಳು, वृक्षांची सावली), दाटू(ದಾಟು), बेट्टद जीव(ಬೆಟ್ಟದ ಜೀವ), मौनी, प्रकाश राज अभिनित नागमंडला, कूर्मावतार, नायी नेरेळू(ನಾಯಿ ನೆರೆಳು), पुट्टण्णा कंगल दिग्दर्शित रंगनायकी, शरपंजर(ಶರಪಂಜರ) असे छान छान  चित्रपट पांहिले. समांतर चित्रपटांच्या काळाचा अनुभव घेण्याची माझी सुरुवात दिग्दर्शक पी एन श्रीनिवास यांच्या स्पंदन पासून सुरुवात झाली जो १९७८ मध्ये आला होता. त्यानंतर गिरीश कासारवल्ली आणि गिरीश कर्नाड यांचे कित्येक चित्रपट पाहता आले. गमतीची गोष्ट हे दोघे हि पुण्यातील FTII शी संबंधित आहेत. कासारवल्ली हे तेथे शिकले आहेत, तर कार्नाड तिथे संचालक म्हणून काही वर्षे काम केले आहे. पुण्यात गिरीश कर्नाड यांचा सोनाली कुलकर्णी अभिनित चेलुवी हा सिनेमा पहिला तसेच चिदंबर रहस्य आणि ओंदानुवंदू कालदल्ली (ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ) हे देखील पाहिले. पण काही नावाजलेले समांतर सिनेमे पहायचे राहिले आहेत, जसे घटश्राद्ध, संस्कार, काडू(अर्थ-अरण्य), गुलाबी टॉकीज इत्यादी तसेच इतरही जुने नवे अजून बरेच चित्रपट पाहायचे आहेत!

गेल्या काही वर्षात जरा वेगळे कन्नड चित्रपट येत आहेत असे दिसते आहे, आणि मला वाटते हे भारतातील प्रत्येक  प्रादेशिक भाषेत, तसेच हिंदीत देखील होत आहे. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये मी असे नवीन, वेगळे काही पाहून चित्रपट घेतले. जसे कि मालगुडी डेज, प्रसिद्ध कन्नड लेखिका वैदेही यांच्या तीन कथांवर आधारित कुंदापूर कन्नड बोली असलेला अम्माची येम्बा नेनेपू(ಅಮ್ಮಚಿಯೆಂಬ ನೆನಪು), सुमन नगरकरचा बब्रु, जो संपूर्णपणे अमेरिकेत तयार केला गेलेला पहिला कन्नड चित्रपट आहे,  गीता ज्याला १९८० च्या गोकाक चळवळीची (कन्नड भाषेच्या अग्रक्रमासाठी) पार्श्वभूमी असलेला सिनेमा, कथा संगमा(सात कथांचा मिळून एक चित्रपट), India Vs England जो family funded cinema आहे, आणि बराचसा भाग इंग्लंड मध्ये चित्रित केला गेला आहे. असे विविध प्रयोग इतर देमार चित्रपटांच्या भाऊगर्दीत होत असताना दिसत आहेत.

२०१८ मध्ये आलेला सर्वात प्रसिद्ध चित्रपट KGF पाहायचा राहिला आहे. हा कर्नाटकातील  कोलार गोल्ड फिल्ड्स(१९९२ च्या सुमारास मी तेथे गेलो होतो) जेथे सोन्याच्या खाणी आहेत, त्यावर आधारित आहे. हा पाहायचा विचार आहे इतक्यातच. जुन्या नव्या कन्नड चित्रपटांचा हा प्रवास माझ्या जीवनात निरंतर असणार आहेच. मी पुण्यातच असल्यामुळे मराठी विश्वात सहज मुशाफिरी होत असते(त्याबद्दल तर मी उदंड लिहीतच असतो कायम), पण कन्नड विश्वातील मुशाफिरी जरा मुश्कील आहे, पण ती मी करत असतो जसे जमेल तसे.हा सर्व खटाटोप आपापल्या जाणीवा आणखीन समृद्ध करण्यासाठीच असतो, नाही का? नुकताच चित्रपट रसास्वादाचा अभ्यास केल्यावर एकूणच चित्रपट कलेबद्दल, इतिहासाबद्दल, भारतातील विविध भाषांतील(फक्त मराठी, कन्नड, हिंदी नाही इतरही भाषेतील जसे बंगाली, मल्याळम) चित्रपटांबद्दल उत्सुकता निमण झाली आहे. असो.

जाता जाता, एक गमतीची गोष्ट. आज काल चित्रपटांसाठी crowd-sourced funding माध्यमातून पैसा उभा करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. चांगला आहे तो, पण कधी कधी फसवणूक होऊ शकते. भारतीय तत्वज्ञानातील/दर्शनातील एक परंपरा ज्याला द्वैत वेदांत असे म्हणतात त्याचे प्रवर्तक म्हणजे कर्नाटकात जन्म झालेले तेराव्या शतकातील मध्वाचार्य हे होत. त्यांच्यावर एक कन्नड चित्रपट करायचा असे सांगत आमच्या कन्नड संघातील एक जण पैसे घेवून गेला, आणि ७-८ वर्षे झाली, काही पत्ता नाही, कि काही प्रगती नाही!

असो, शेवटी एक आवाहन. मी कन्नड नाटकांबद्दल काही ब्लॉग्स लिहिले आहेत, ते तुम्ही येथे जरूर पहा आणि अभिप्राय कळवा.