मीआणि कन्नड चित्रपट

मी ह्या ब्लॉग वर कन्नड नाटकांविषयी आणि इतर कर्नाटकाशी/कन्नड भाषेशी निगडीत अनेक विषयांवर लिहिले आहे. पण कन्नड चित्रपटांच्या माझ्या अनुभवांविषयी लिहिले नव्हते. कन्नड चित्रपटसृष्टीला Sandalwood असे म्हणतात आणि तिला देखील मोठा इतिहास आणि परंपरा आहे. मी प्रामुख्याने मराठी किंवा इंग्रजी मध्येच लिहितो, कारण मला तसे जमते असे वाटते, कन्नड मध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता लिहिले नाही. माझ्या मराठी वाचकांना, रसिकांना मराठीची भाषा भगिनी असलेल्या कन्नड भाषेच्या, संस्कृती विश्वाबद्दल माहिती करून देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न मी ह्या माझ्या ब्लॉग्स मधून, अनुवाद प्रकल्पांतून करत असतो. असो.

तेरा चौदा वर्षांपूर्वी एप्रिल २००७ महिन्यात बंगळूरूला गेलो असता कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार(१९२९-२००६) याची पहिली पुण्यतिथी शहरातील रस्त्यांवर चौका चौकात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात होती ते मला दिसले. राजकुमारचे कन्नड भाषा प्रेम प्रसिद्ध होते तेहि कारण असेल(कन्नड भाषेला राज्यात प्रथम दर्जा मिळायला हा या साठी झालेल्या गोकाक चळवळीत १९८० च्या दशकात त्यांनी सक्रीय भाग घेतलेला होता). कुख्यात दरोडेखोर वीरप्पन याने राजकुमार ह्यांनाच पळवून नेऊन ओलीस ठेवले होते कित्येक दिवस. त्यादिवशी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्याचीच गाणी, त्याचेच चित्रपट दाखवले जात होते, ते मी दिवसभर पहिले. आणि मी  खरे तर त्या दिवसापासून कन्नड चित्रपटांकडे शोधक नजरेने पाहू लागलो. हा राजकुमार खरे तर एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे, लिहीन नंतर कधीतरी.

फार वर्षांपूर्वी जेव्हा सरकारी दूरदर्शन हि एकच दूरचित्रवाणी वाहिनी भारतात होती तेव्हा रविवारी दुपारी (आणि रात्री देखील) देखील प्रादेशिक चित्रपट दाखवत असत. तेव्हा एक कन्नड चित्रपट पाहिल्याचे आठवते, त्याचे नाव काडीना बेन्की(Forest Fire). गिरीश कार्नाड त्यात होते. अतिशय प्रक्षोभक शृंगारिक चित्रपट होता, पण मानसिक समस्येवर(Oedipus Syndrome) आधारित होता. चित्रपट रंगीत होता(१९८७), पण आमच्याकडे कृष्ण धवल संच होता त्यामुळे कृष्ण धवल रुपात तो पहिला होता. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी कर्नाटकात विजापूर जवळ निंबाळ येथे जात असू. अधून मधून विजापुरास देखील जाणे होई. तेथे त्यावेळी(१९८०-९०)दोन-तीन चित्रपटगृहे होती, पण मी कधी तेथे लागणारे कन्नड चित्रपट पाहण्यास आम्हाला कोणी नेल्याचे, किंवा स्वतःहून गेल्याचे आठवत नाही. अमीर चित्रपटगृहे हे हिंदी चित्रपटसृष्टीतील १९०४-५० मधील प्रसिद्ध गायक-नटी अमीरबाई कर्नाटकी हिने उभारले होते.

बंगळूरूहून पुण्याला परत आल्यानंतर मी राजकुमारचे बरेचसे चित्रपट मागवून पाहण्याचा सपाटा लावला(त्यात अनेक ऐतिहासिक, पौराणिक, आणि सामजिक, प्रेमकथा अशी सर्व प्रकारचे चित्रपट आहेत) आणि त्याच्या अभिनयाच्या आणि मुख्य म्हणजे याच्या आवाजावर(त्यांच्या बहुतेक चित्रपटात तेच गाणी गात असत), गाण्यांवर फिदा झालो, मला नवीनच काही तरी गवसल्यासारखे झाले होते. त्याचा गन्धद गुडी(ಗಂಧದ ಗುಡಿ) नावाचा प्रसिद्ध सिनेमा पहिला, त्यावरून हिंदीमध्ये धर्मेंद्रचा कर्तव्य हा सिनेमा आला होता. हे चित्रपट पाहिल्यामुळे  माझी  कन्नड भाषा देखील त्यामुळे(आणि माझ्या इतर समांतर उद्योगांमुळे जसे कन्नड नाटकं आणि साहित्य यात मुशाफिरी) सुधारत चालली, बरेचसे उमगत गेले. त्यातच असे माझ्या ऐकण्यात आले कि आमच्या कुटुंबातील  नात्यातील एक जण कन्नड चित्रपट क्षेत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांचे नाव सुनीलकुमार देसाई. त्यांची एक दोनदा ओझरती भेट झाली होती, पण तो पर्यंत  सुनीलकुमार देसाई यांचे कर्तृत्व माझ्या खिजगणतीतही नव्हते!  त्यांचे चित्रपट अतिशय वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचे देखील चित्रपट पाहण्याचा उद्योग सुरु केला जसे बेळदिंगळा बाळे(ಬೆಳದಿಂಗಳ ಬಾಲೆ).

पुढे पुढे मी काहीना काही कारणाने बंगळूरूला प्रत्येक वर्षी जाऊ लागलो आणि कन्नड नाटकांचा, पुस्तकांचा माहोल अनुभवू लागलो, प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन कन्नड चित्रपट नाही पाहिले, कारण गेल्या १०-१५ वर्षांपासून कन्नड चित्रपटांचा दर्जा तसा खूपच घसरला आहे. पण बंगळूरूमध्ये तरी ठिकठिकाणी नवीन कन्नड चित्रपटांचे मोठाले पोस्टर्स लागलेले दिसतात, हिंदीचे क्वचितच. कन्नड चित्रपटांना चित्रपटगृह न मिळण्याचा प्रश्न आपल्याकडील मराठी चित्रपटांच्या बाबतीत जसे होते, तसे तेथे होत नाही. सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता गणेश याचा २००६ मधील सुपरहिट चित्रपट(जो त्याचा पदार्पणातील चित्रपट) मुन्गारे मळे(ಮುಂಗಾರು ಮಳೆ) हा देखील मी पहिला नव्हता काल परवा पर्यंत. एकच चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहिल्याचे आठवते तो म्हणजे अभिनेता उपेंद्र आणि सुदीप यांचा मुकुंद मुरारी हा चित्रपट जो २०१६ मध्ये आला होता आणि तो अक्षय कुमारचा हिंदी चित्रपट OMG-Oh My God यावर आधारित होता. त्यामुळे थोडी उत्सुकता होती कि कन्नड मध्ये कसा केला असेल त्याची.

मला सुरुवातीला नवीन, हल्लीच्या कन्नड चित्रपटांत विशेष रस नव्हताच. समांतर चित्रपट, आणि १९७०/८० मधील राजकुमार, विष्णूवर्धन, अनंत नाग, शंकर नाग यांचे चित्रपट पाहण्यात रस होता आणि मी जमेल तसे मी ते पाहिले देखील.शंकर नाग याचा एक चित्रपट ऑटो राजा, ज्यात त्याने एका रिक्षावाल्याचे काम केले आहे, तेव्हा पासून बंगळूरू मधील सगळ्या रिक्षांच्या मागे त्याचे छायाचित्र लागले होते. त्याचाच Accident नावाचा, अमली पदार्थ प्रश्नाच्या विषयी असलेला, चित्रपट, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला, तो पाहिला. गिरीश कर्नाड दिग्दर्शित कान्नुरू हेग्गाडीथी(ಕಾನೂರು ಹೆಗ್ಗಡಿತಿ), भारत स्टोर्स, बी जयश्री यांचा बनदा नेरेळू(ಬನದ ನೆರೆಳು, वृक्षांची सावली), दाटू(ದಾಟು), बेट्टद जीव(ಬೆಟ್ಟದ ಜೀವ), मौनी, प्रकाश राज अभिनित नागमंडला, कूर्मावतार, नायी नेरेळू(ನಾಯಿ ನೆರೆಳು), पुट्टण्णा कंगल दिग्दर्शित रंगनायकी, शरपंजर(ಶರಪಂಜರ) असे छान छान  चित्रपट पांहिले. समांतर चित्रपटांच्या काळाचा अनुभव घेण्याची माझी सुरुवात दिग्दर्शक पी एन श्रीनिवास यांच्या स्पंदन पासून सुरुवात झाली जो १९७८ मध्ये आला होता. त्यानंतर गिरीश कासारवल्ली आणि गिरीश कर्नाड यांचे कित्येक चित्रपट पाहता आले. गमतीची गोष्ट हे दोघे हि पुण्यातील FTII शी संबंधित आहेत. कासारवल्ली हे तेथे शिकले आहेत, तर कार्नाड तिथे संचालक म्हणून काही वर्षे काम केले आहे. पुण्यात गिरीश कर्नाड यांचा सोनाली कुलकर्णी अभिनित चेलुवी हा सिनेमा पहिला तसेच चिदंबर रहस्य आणि ओंदानुवंदू कालदल्ली (ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ) हे देखील पाहिले. पण काही नावाजलेले समांतर सिनेमे पहायचे राहिले आहेत, जसे घटश्राद्ध, संस्कार, काडू(अर्थ-अरण्य), गुलाबी टॉकीज इत्यादी तसेच इतरही जुने नवे अजून बरेच चित्रपट पाहायचे आहेत!

गेल्या काही वर्षात जरा वेगळे कन्नड चित्रपट येत आहेत असे दिसते आहे, आणि मला वाटते हे भारतातील प्रत्येक  प्रादेशिक भाषेत, तसेच हिंदीत देखील होत आहे. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये मी असे नवीन, वेगळे काही पाहून चित्रपट घेतले. जसे कि मालगुडी डेज, प्रसिद्ध कन्नड लेखिका वैदेही यांच्या तीन कथांवर आधारित कुंदापूर कन्नड बोली असलेला अम्माची येम्बा नेनेपू(ಅಮ್ಮಚಿಯೆಂಬ ನೆನಪು), सुमन नगरकरचा बब्रु, जो संपूर्णपणे अमेरिकेत तयार केला गेलेला पहिला कन्नड चित्रपट आहे,  गीता ज्याला १९८० च्या गोकाक चळवळीची (कन्नड भाषेच्या अग्रक्रमासाठी) पार्श्वभूमी असलेला सिनेमा, कथा संगमा(सात कथांचा मिळून एक चित्रपट), India Vs England जो family funded cinema आहे, आणि बराचसा भाग इंग्लंड मध्ये चित्रित केला गेला आहे. असे विविध प्रयोग इतर देमार चित्रपटांच्या भाऊगर्दीत होत असताना दिसत आहेत.

२०१८ मध्ये आलेला सर्वात प्रसिद्ध चित्रपट KGF पाहायचा राहिला आहे. हा कर्नाटकातील  कोलार गोल्ड फिल्ड्स(१९९२ च्या सुमारास मी तेथे गेलो होतो) जेथे सोन्याच्या खाणी आहेत, त्यावर आधारित आहे. हा पाहायचा विचार आहे इतक्यातच. जुन्या नव्या कन्नड चित्रपटांचा हा प्रवास माझ्या जीवनात निरंतर असणार आहेच. मी पुण्यातच असल्यामुळे मराठी विश्वात सहज मुशाफिरी होत असते(त्याबद्दल तर मी उदंड लिहीतच असतो कायम), पण कन्नड विश्वातील मुशाफिरी जरा मुश्कील आहे, पण ती मी करत असतो जसे जमेल तसे.हा सर्व खटाटोप आपापल्या जाणीवा आणखीन समृद्ध करण्यासाठीच असतो, नाही का? नुकताच चित्रपट रसास्वादाचा अभ्यास केल्यावर एकूणच चित्रपट कलेबद्दल, इतिहासाबद्दल, भारतातील विविध भाषांतील(फक्त मराठी, कन्नड, हिंदी नाही इतरही भाषेतील जसे बंगाली, मल्याळम) चित्रपटांबद्दल उत्सुकता निमण झाली आहे. असो.

जाता जाता, एक गमतीची गोष्ट. आज काल चित्रपटांसाठी crowd-sourced funding माध्यमातून पैसा उभा करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. चांगला आहे तो, पण कधी कधी फसवणूक होऊ शकते. भारतीय तत्वज्ञानातील/दर्शनातील एक परंपरा ज्याला द्वैत वेदांत असे म्हणतात त्याचे प्रवर्तक म्हणजे कर्नाटकात जन्म झालेले तेराव्या शतकातील मध्वाचार्य हे होत. त्यांच्यावर एक कन्नड चित्रपट करायचा असे सांगत आमच्या कन्नड संघातील एक जण पैसे घेवून गेला, आणि ७-८ वर्षे झाली, काही पत्ता नाही, कि काही प्रगती नाही!

असो, शेवटी एक आवाहन. मी कन्नड नाटकांबद्दल काही ब्लॉग्स लिहिले आहेत, ते तुम्ही येथे जरूर पहा आणि अभिप्राय कळवा.

Babru: A Road-trip Film

मला कन्नड समजत असल्यामुळे मी कन्नड भाषेतील साहित्य, नाटके, चित्रपट यांचा जमेल तसा आस्वाद घेत असतो.  बरेच अनुवाद देखील केले आहेत. परवा एका कन्नड दूरचित्रवाहिनीवर सुमन नगरकर या कन्नड अभिनेत्रीची मुलाखत पाहत होतो. तीने कन्नड चित्रपट सृष्टीत काही वर्षे काम केल्यानंतर अमेरिकेत स्थलांतर केले. जवळ जवळ पंधरा वर्षांनी तिने कन्नड चित्रपट सृष्टीत परत येऊन चित्रपट निर्मिती आणि अभिनय दोन्ही गोष्टी बब्रु या चित्रपटाद्वारे केल्या. हे खरे तर मराठीतील अभिनेत्री अश्विनी भावे हिच्या सारखे झाले. तिने देखील मराठी चित्रपट सृष्टीत काही वर्षे काम करून अमेरीकेला गेली आणि काही वर्षांनी परत येऊन कदाचित हा चित्रपटाद्वारे comeback केला.

मी सुमन नगरकरचा बब्रु(ಬಬ್ರೂ) हा अनेक वैशिष्ट्ये असलेला कन्नड चित्रपट Amazon Prime वर नुकताच पहिला(डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता). खरे तर हा बहुभाषिक चित्रपटच म्हणायला पाहिजे. कन्नड शिवाय, मेक्सिकन(Spanish), इंग्रजी देखील आहेत. आणि हो, हा चित्रपट कथानक  संपूर्णपणे अमेरिकेत घडते. हि एक road-trip film आहे हेही वैशिष्ट, तसेच कन्नड चित्रपट सृष्टीतील(आणि एकुणातच पहिला भारतीय माझ्या माहिती प्रमाणे असावा) पहिला चित्रपट जो अमेरिकेतील कन्नड हौशी मंडळीनी तन मन घन देऊन अमेरिकेतच तयार केला आहे. पण तो काही crowd sourcing funding मधून तयार झाली नाही, तर friends & families funding मधून झाली आहे. Crowd sourcing funding मधून तयार झालेला पहिला कन्नड चित्रपट म्हणजे Lucia. आणि असा पहिला मराठी चित्रपट कुठला? माहित नाही!

तर काय आहे बब्रु  चित्रपटात? कथा सुरु होते अमेरिकेतील San Diego या मेक्सिकोच्या सीमेलगत असलेल्या शहरात. एक मुलगा(माही हिरेमठ) University of California San Diego येथे शिकत असतो. त्याला कॅनडामधील Vancouver येथे जाऊन मैत्रिणीकडे लग्नाची मागणी करावायस जायचे असते. त्यासाठी त्याने भाड्याची एक मोटार आरक्षित केलेली असते. नेमकी तीच मोटार एका मध्यमवयीन महिलेने(सुमन नगरकर) देखील त्याच शहरात जाण्यासाठी आरक्षित केलेली असते. बर त्यात दोघेही दोघेही कन्नडिग, कर्नाटकातील निघतात, त्यामुळे कन्नड मध्ये संवाद सुरु होतो आणि दोघे एकत्र प्रवास करायला लागतात. आणि आता हळू हळू गंमत सुरु होते.

बब्रु Babru ಬಬ್ರೂ

बब्रु Babru ಬಬ್ರೂ पोस्टर. Image courtesy Internet

खरेतर San Diego ते Vancouver हा सुमारे १४०० मैलांचा प्रवास प्रवास अमेरीकेच्या पश्चिम किनाऱ्याने I-5 या दक्षिणोत्तर पसरलेल्या हमरस्त्याने होतो. मी या रस्त्यावरून Bay Area च्या वर आणि खाली अगदी San Diego पर्यंत प्रवास केला आहे. मस्त रस्ता आहे, निसर्ग फार सुंदर रीतीने अनुभवता येतो. मी खरे तर सीमापार मेक्सिको मध्ये Tijuana येथेही पर्यटनासाठी गेलो होतो. मेक्सिको सीमा आणि अमली पदार्थ तसेच मानवी तस्करी हे एक समीकरणच आहे त्यामुळे या भागात कडक सुरक्षा असते.

आणि नेमका हाच अमली पदार्थ तस्करीचा धागा कथानकात पुढे येतो आणि चित्रपटाचा नूर एकदम पालटतो. एका Spanish(मेक्सिको देशाची भाषा) बोलणाऱ्या व्यक्तीला ते आपल्या गाडीत त्याला मदत करण्यासाठी घेतात. पण पुढे असे समजते कि तो एक पोलीस आहे. मोटारीत मागे अमली पदार्थ  आहेत असे तो त्या दोघांना सांगतो आणि दाखवतोही. म्हणजे त्यांच्या नकळत हा चोरटा व्यवहार सुरु असतो. आता या पुढे काय होते ते मी सांगत नाही, ते तुम्ही चित्रपट पाहून जाणून घेतले पाहिजे. चित्रपटातील गाडी म्हणजे Volkswagen Beetle ही पिटुकली गाडी आहे जिचे नाव बब्रु(BABRU) आहे. चित्रपटाच्या पोस्टर वर या गाडीचे पिवळे चित्र आहे, जे त्याच्या नावाच्या कन्नड अक्षरांच्या ಬಬ್ರೂ सुलेखनाची करामत अशी कि ते चित्र Beetle गाडीसारखेच दिसते.  चित्रपटातीची कथा, तिचा वेग, अमेरिकेतील चित्रीकरण, अभिनय या सर्वांमुळे तो मला नक्कीच आवडला.

तर असा हा वेगळ्या धाटणीचा कन्नड  चित्रपट खरे तर इतर भाषिकांनी देखील पाहायला काहीच अडचण नाही. इंग्रजी सब टायटल्स आहेत. जाता जाता अजून एक. सुमन नगरकर या अभिनेत्रीला पहिली संधी सुनील कुमार देसाई  दिग्दर्शित कल्याण मंडप या चित्रपटात मिळाली. सुनील कुमार देसाई  हे कन्नड चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ते माझ्या चुलत आजोबांचे नातू(maternal side), आणि माझ्या आजोळचे, म्हणजे निंबाळ(विजापूर जिल्ह्यातील) चे आहेत. आहे कि नाही गंमतीची गोष्ट?

 

A Beautiful Mind

मी मानसिक आरोग्य क्षेत्राशी गेली १०-१२ वर्षे निगडीत आहे. सध्याच्या सक्तीच्या बंदीमुळे(लॉकडाऊन) समाजात मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत, त्याबद्दल आपण ऐकतो, वाचतो आहोत. अनेक तज्ञमंडळी या बद्दल विविध माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. घर बसल्या  समुपदेशनाच्या सुविधा देखील आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात(मार्च-एप्रिल) डॉ. आनंद नाडकर्णी यांची दैनिक सकाळ मध्ये मानसिक आरोग्याचे विविध पैलू सांगणारी लेखमाला येत असे. ती खूप भावली, त्यात तितिक्षा या संस्कृत शब्दाचा उल्लेख होता, त्याचा अर्थ तग धरून राहण्याची क्षमता (सहनशीलता नव्हे तर सहनसिद्धता). त्यांचीच एक मनाविषयी(Mind Feast) एक कार्यशाळा झाली होती गेल्यावर्षी, ती येथे मी पहिली. भारतीय(पौर्वात्य) परंपरेत आणि पाश्चात्य परंपरेत, विज्ञानात मनाबद्दल काय संगीतले आहे  याचा त्यात त्यांनी वेध घेतला आहे.

आमच्या Schizophrenia Awareness Association(SAA) संस्थेतर्फे विविध समुपदेशनाचे कार्यक्रम स्वमदत गटांमधून होतात. त्यावेळी मानसिक आजार असूनही आपापल्या क्षेत्रात विविध क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांनी कसे काम केले आहे याची उदाहरणे  देत असतो. त्यातील प्रमुख उदाहरण म्हणजे नोबेल पारितोषिक विजेता प्रज्ञावंत अमेरिकी गणिती असलेला जॉन नॅश याचे. त्याचे चरित्र A Beautiful Mind या नावाने प्रसिद्ध आहे. ते मी पूर्वी कधीतरी वाचायला घेतले होते, पण समयाभावी पूर्ण झाले नव्हते. सध्या मिळालेल्या वेळेत ते पूर्ण केले. तसेच त्याच नावाचा चित्रपट देखील नुकताच पाहिला.

आधी पुस्तकाबद्दल. जॉन नॅशचे चरित्र Sylvia Nasar हिने अतिशय संशोधन पूर्वक आणि अभ्यासपूर्ण रीतीने लिहिले आहे. १९९८ मध्ये ते प्रकाशित झाले. त्यावर आधारित चित्रपट २००१ मध्ये आला, आणि जॉन नॅशचे २०१५ मध्ये अपघाती निधन झाले. पुस्तक (आणि चित्रपट) त्याला १९९४ मध्ये नोबेल (सहमानकरी) मिळाल्याच्या नंतर थांबते. पुस्तकाला जवळ जवळ २००-२५० पानांची पुरवणी आहे ज्यात लेखिकेने प्रकरण क्रमानुसार विस्तृत नोंदी, संदर्भ दिल्या आहेत. ते पाहून अचंबित व्हायला झाले मला. त्याच्या गणिती संधोधन कारकिर्दी विषयी, तसेच त्याच्या मानसिक आजाराबद्दल(schizophrenia) तपशील  तर आहेच, पण १९५०, ६० च्या दशकात अमेरिकेत आणि त्यावेळच्या सोविएत रशिया यांच्यातील संबंध(cold war hysteria) कसे होते हेही तपशीलवार येते.

अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील Princeton विद्यापीठात तो शिकला. बोस्टन मध्ये कॅम्ब्रिज येथील MIT विद्यापीठात काम केले. जॉन नाशला game theory विषयातील संशोधनाबद्दल नोबेल  मिळाले. हा विषय  संगणक शास्त्र पदवी शिकताना आम्हाला होता. अनेक क्षेत्रात ह्या विषयाचा उपयोग होतो. संरक्षण क्षेत्रात, व्यापारात, अर्थशास्त्रात, अश्या अनेक ठिकाणी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत या विषयाची मुलतत्वे उपयोगात आणली जातात. या विषयाची सविस्तर माहिती, इतिहास या पुस्तकात येतो.

आधी त्याच्या आजाराबद्दल आणि त्याने, त्याच्या कुटुंबाने कसा सामना केला आणि तो कसा त्याच्या विषयात काम करत राहिला हे पुस्तकात आले हे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा मानसिक आजार झालेल्या व्यक्ती सोबत असतो तेव्हा काय आणि कसे तोंड द्यायचे हे समजत नाही. त्याच्या पत्नीने, Alicia ने त्याची आयुष्यभर साथ दिली. १९५७ मध्ये त्यांचे लग्न झाले, मुलगा झाला. १९६३ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला, पण ती त्याच्या बरोबर १९७० पासून राहू लागली, त्यांची देखभाल करू लागली. त्यांनी परत खूप नंतर २००१ मध्ये विवाह केला. जॉन नॅश क्षेत्रातील सहकारी यांचे सुद्धा सहकार्य, सहानुभूती, समजूतदारपणा त्याच्या आजाराला तोंड देताना उपयोगी पडला.

विद्यापिठात शिकत असताना जॉन नॅश त्याच्या विचित्र वागण्या बद्दल प्रसिद्ध होताच. त्यातच त्याचा समलैंगिक संबंधाकडे ओढा होता. अतिशय संशयी, स्वतःच्याच दुनियेत रमणारा, आजूबाजूच्या परिस्थितीचे कधी कधी भान नसणारा असा होता. विचार, भावना आणि कृती यांचा मेळ नसलेले असे त्याचे व्यक्तिमत्व लोकांना वाटत होते. १९५९ च्या आसपास, वयाच्या तिशीत, त्याला paranoid schizophrenia झाल्याचे निदान झाले. त्याला भास होत असत. अमेरिकेत आणि त्यावेळच्या सोविएत रशिया यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे अमेरिकेत conspiracy theory चे पेव फुटले होते. रशियन हेर आपल्या मागे आहेत असे भास त्याला होत असत. तो त्यावेळी अमेरिकी लष्कारासाठी गुप्त संदेश शोधण्याचे काम एका संस्थे मध्ये(Rand Corporation in Santa Monica near Los Angeles) करत असे. त्याच्यावर  उपचार करण्यासाठी अनेक वेळेला मानसोपचार रुग्णालयात दाखल केले गेले. नऊ-दहा वर्षे उपचार, औषधे, विविध थेरेपी अश्या सगळ्या चक्रातून पुढे मात्र आजाराबद्दल उमज आल्यावर घराच्या घरीच कुटुंबीयांच्या, सहकाऱ्यांच्या मदतीने आजाराची लक्षणे आटोक्यात आली. हे सगळे मांडताना लेखिकेने अमेरिकेतील त्यावेळी  मानसोपचार क्षेत्रातील स्थिती कशी होती हे देखील सविस्तर मांडले आहे. मानसिक आजार, त्यातही schizophrenia बद्दलही तिने अभ्यासपूर्ण विचार पुस्तकात मांडले आहेत.

आता चित्रपटाबद्दल थोडेसे. ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असलेला अभिनेता रसेल क्रो(Russel Crowe) याने जॉन नॅशची भूमिका केली आहे. चित्रपट पुस्तकापासून बरीच फारकत घेतो, काही काल्पनिक गोष्टी cinematic liberty च्या नावाखाली येतात. बऱ्याच गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत. असे असले तरी चित्रपट म्हणून परिणामकारक आहे. Princeton University परिसर, तो सर्व काळ छान चित्रीत केला गेला आहे. जॉन नॅशला नोबेल प्रदान करण्याचा समारंभ दाखवून चित्रपट संपतो. त्याने मुळात न केलेले भाषण चित्रपटात दाखवले आहे. त्या उभायान्तांचा उतारवयातील make-up देखील छान जमला आहे.  रसेल क्रो याला अभिनयाचे ऑस्कर देखील मिळाले आहे. ज्या MIT मध्ये जॉन नॅशने काम केलेले, त्या MIT च्या संकेत स्थळावर या चित्रपटावर चांगलीच तिखट प्रतिक्रिया दिली आहे, ती जरूर वाचा.असे असले तरी चित्रपटाचा पुस्तकाच्या विक्रीवर चांगलाच परिणाम झालेला दिसतो. चित्रपट आल्यानंतर पुस्तकाच्या जी आवृत्ती निघाली त्याच्या मुखपृष्ठावर रसेल क्रोचे चित्र आहे, आणि चित्रपटाचा  उल्लेखही आहे. माझ्याकडे देखील तीच आवृत्ती आहे.

अश्या चरित्रात्मक पुस्तकांमुळे आणि चित्रपटांमुळे समाजात मानसिक आजाराविषयी असलेले गैरसमज,कलंक(stigma) दूर व्हायला नक्कीच मदत होते. मी पूर्वी मानसिक आजार आणि चित्रपटांतील त्याचे चित्रण या विषयी एक ब्लॉग लिहिला होता. तो देखील जरूर पहा. Stephan Hawking या अशाच आणखी एका दुर्धर आजाराने ग्रस्त अशा संशोधकाच्या जीवनावरचा The Theory of Everything हा चित्रपट पाहायचा आहे केव्हातरी.

 

 

 

बाकीबाब

परवा जुलै ८ रोजी, मराठी कवी बा भ बोरकर(टोपणनाव बाकीबाब) यांचा स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्त परत त्यांच्या आठवणी, कविता यांचा जागर झाला. मला गेल्यावर्षी त्यांचे १९८२ मधले ललित लेखांचा संग्रह असलेले एक पुस्तक(चांदण्याचे कवडसे) रस्त्यावर जुन्या पुस्तकाच्या गठ्ठ्यात सापडले होते. त्यावेळी मी तसा थोडासा चकितच झालो होतो. बोरकर मला फक्त कवी म्हणून माहिती होते. त्यांनी गद्य लेखन केले आहे हे माझ्या गावी देखील नव्हते.  मला जाणवले कि बोरकरांबद्द्ल पूर्वी इतके ऐकूनही मी त्यांचे काही वाचले नव्हते. घेतलेले पुस्तक परत वाचले पण त्यांच्या इतर साहित्याची ओळख करून घ्यायला सवड झाली नव्हती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आकाशवाणी वर व्यंकटेश माडगुळकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी सांगितले होते कि ते महात्मा गांधी यांच्यावर महाकाव्य(महात्मायन) रचत आहेत, पण ते पूर्ण करण्याच्या आत त्यांचे निधन झाले. शोध घेता घेता असे समजले कि त्यांनी कथा, कादंबरी, अनुवाद, चरित्र, ललित असेही भरघोस विपुल लिहिले आहे. पोर्तुगीज, कोकणी भाषेतही लिहिले आहे.

बोरकर गोव्याचे, गोमंतकातील हे माहित होते. पण बोरकर पुण्यात १४ वर्षे राहिले हे माहिती नव्हते. त्यांना सारखी गोव्याची ओढ वाटत असे. जी ए कुलकर्णी यांच्या बाबतीत तेच झाले होते. त्यांना सारखी बेळगाव/धारवाडची आठवण येत असे आणि पुणे आवडत नसे.

त्यांच्या कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम पु ल देशपांडे आणि सुनिता देशपांडे करत असत, दूरदर्शनवर पूर्वी कधीतरी पाहिल्याचे आठवत होते. आजच दूरदर्शनवर पु ल देशपांडे आणि बाकीबाब यांचा सहभाग असलेला प्रतिभा आणि प्रतिमा हा जुना कार्यक्रम देखील अनायासे तासभर पाहता आला. त्यात बाकीबाब म्हणतात कि त्यांची कविता हि त्यांचा आत्माविष्कार आणि आत्माविस्तार असते, ते किती खरे आहे हे कार्यक्रम पाहताना आणि त्यांचे मराठी, कोंकणी काव्यगायन ऐकताना वाटत होते.

त्यांच्या निसर्ग आणि प्रेम विषयाच्या कविता यावरून त्यांना आनंदयात्री असे देखील संबोधले जाई. त्यांच्या काही कविता खूप प्रसिद्ध आहेत, जसे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती,  ​ओवीबद्ध असलेली माझ्या गोव्याच्या भूमीत  ही कविता, जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग , झिणि झिणी वाजे बीन सख्या रे अनुदिन चीज नविन, जीवन त्यांना कळले हो, अनंता तुला कोण पाहू शके?  इत्यादी. ही सर्व गीते आपण कायम ऐकत असतो कुठे ना कुठे!

बाकीबाब यांची जन्मशताब्दी २००९ मध्ये झाली. त्या निमित्त त्यांच्या आणि त्यांच्या योगदानावरील वाड्मयाची तपशीलवार सूची तयार करण्यात आली, ती ‘कविवर्य बा भ बोरकर जन्मशतसांवत्सरिक’ या नावाने प्रसिद्ध झाली. ती येथे आहे, रसिकांनी ती जरूर पहावी. त्यात एका पुस्तकाची नोंद  होती, ज्याचे नाव पोएट बोरकर असे होते,आणि ते प्रसिद्ध समीक्षक व दि कुलकर्णी यांनी लिहिले होते. ते ईबुक स्वरूपात मला मिळाले. त्यात त्यांनी केलेल्या बोरकरांच्या कवितांचे निरुपण, प्रेरणा याचे विवेचन भावते. त्यांच्या भक्तीपर असलेल्या कवितांविषयी त्यांनी लिहिले आहे. परवा असे वाचनात आले कि त्यांच्या पत्रांचा एक संग्रह बाकी संचित या नावाने गोवा मराठी अकादमीने नुकताच प्रकाशित केला आहे. त्यातून बोरकर यांच्याबद्दल आणखीन दुर्मिळ माहिती समोर येईल.

आता चांदण्याचे कवडसे या माझ्याकडे असलेल्या ललितलेखांच्या संग्रहाबद्दल. त्यातील सुशेगाद हा लेख मला खूप आवडला. गोव्यावर पोर्तुगीज संस्कृतीचा ठसा उमटला आहे. सुशेगाद  या मूळ पोर्तुगीज शब्दाच्या अर्थाच्या आज कोण कोणत्या छटा प्रचलित आहेत ते सांगितले आहे. एक प्रमुख अर्थछटा आहे तो संथ प्रकृती, संथपणा दर्शवणारी, जी गोव्याच्या जीवनात आहे! अजून एका लेखात ते गृहस्थाश्रामाबाबत सांगताना तीन सूत्रे आपल्या हाती देतात. Sense of priorities(अग्रक्रम), sense of proportion(प्रमाण) आणि sense of propriety(औचित्य) अशी ती तीन सूत्रे! त्यांच्या पुस्तकांच्या आणि वाचनाच्या हव्यासाबद्दल दोन लेख आहेत. हायकू या मुळ जपानी काव्यप्रकाराबद्दल एक लेख आहे. स्वप्नांबद्दल लिहिताना पौगंडावस्थेत असताना त्यांना पडलेल्या एका शृंगारिक/कामुक स्वप्नाबद्दल आणि झालेल्या स्खलनाबद्दल  मनमोकळेपणाने लिहितात. आणि त्यांच्या आवडत्या विषयावर म्हणजे निसर्गावर, त्याच्या विविध रूपावर, तन्मयतेने तीन-चार लेख आहेत. ह्या ललितलेखांच्या संग्रहाव्यतिरिक्त कागदी होड्या, पावलापुरता प्रकाश, घुमटावरचे पारवे हे त्यांचे इतर ललितलेख संग्रह देखील आहेत.

बोरकरांचे रवींद्रनाथ टागोरांच्यावर अतिशय प्रेम होते. त्यांच्यावर देखील त्यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. गोवा मुक्ती संग्रामात देखील त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. पोर्तुगीज राजवटी मध्ये ते लहानाचे मोठे झाले असल्यामुळे त्यांच्यावर युरोपियन संस्कृतीचे, संगीताच, सौंदर्य विषयक विचारांचे, तत्वज्ञानाचे संस्कार झाले होते.

मी कवितेच्या प्रांतात शिरलो नाही अजून, थोडा लांबच राहिलो आहे. पण या निमित्ताने का होईना कवितेच्या आस्वादाची रुची लागली तर चांगलेच आहे. कविता ऐकायला मजा येते. आवडते पण जाणून बुजून कविता वाचूयात असे क्वचित घडले आहे. दिवाळी अंकांतील कवितेची पाने मी क्वचित पाहतो. कविता वाचणे म्हणजे शास्त्रीय राग संगीत ऐकण्यासारखे किंवा अमूर्त चित्रांचा आस्वाद घेण्यासारखे थोडा अमूर्त कारभार आहे असे मला वाटते. शास्त्रीय राग संगीत ऐकण्याच्या, कानसेन होण्याच्या मार्गावर चालतो आहे, बाकीच्या दोन गोष्टींकडे वळायचे आहे अजून. काही वर्षांपूर्वी प्रा. विसुभाऊ बापट यांचा कुटुंब रंगलय काव्यात हा कवितांचा कार्यक्रम पाहिल्याचे आठवते. कवितेला वाहिलेल्या काव्यरत्नावली(१८८७ ते १९३५) द्वैमासिकाच्या वाटचालीवर एक संशोधनपर पुस्तक नुकतेच हाती लागले आहे. कविता-रती या नावाच्या अजून एका कवितेला वाहिलेले द्वैमासिकाबद्दल मला नुकतेच समजले आहे. हे द्वैमासिक १९८५ मध्ये बोरकरांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे स्वकीय पुरुषोत्तम पाटील यांनी सुरु केले होते. ह्या दोन्ही उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आधुनिक कवितेच्या परंपरेचा इतिहास समोर येतो. नुकतेच सुरेश भटांच्या जयंती निमित्त त्यांची मुलाखत, त्यांच्या कविता, आणि मराठी गझला ऐकल्या होत्या, जाणून घेता आले होते. त्याबद्दल देखील लिहायचे आहे नंतर केव्हातरी.

असो, तात्पुरते तरी बोरकरांच्या इतर साहित्यकृतींचा शोध घ्यायचा आहे. पाहूयात कसे जमते ते. बोरकरांच्या पोर्तुगीज भाषेतील लेखनाबद्दल मराठीत कोणी जाणकारांनी लिहिले आहे का ते माहित नाही, नसेल तर लिहिले पाहिजे. असो, पण त्यांना बाकीबाब हे टोपणनाव कसे मिळाले हे अजून कुठे सापडले नाही!

माझा पुत्र गुरुदत्त: संपादकीय आणि परिचय

आज(९ जुलै) प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांची जयंती. १९२५ मध्ये आजच त्यांचा जन्म कर्नाटकात बंगळूरू येथे झाला. अजून पाच वर्षांनी जन्मशताब्दी! गुरुदत्तच्या आईने, म्हणजे वासंती पदुकोण ह्यांनी गुरुदत्तचे चरित्र, त्याच्या अकाली मृत्युनंतर कन्नड भाषेत लिहिले होते. मी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे. लॉकडाऊन मुळे ते कधी प्रकाशित होईल माहित नाही. एकेक प्रकरण मी या  ब्लॉग वर टाकत जाईन. गेल्या महिन्यातच मी त्या पुस्तकाची गिरीश कार्नाड यांनी लिहिलेली प्रस्तावना ब्लॉगरुपात, मराठीत येथे प्रसिद्ध केली होती. आज त्याच्या जयंती निमित्त पुस्तकाचे संपादक असलेले मनोहर ग्रंथमालेचे प्रथितयश संपादक जोशी यांचे संपादकीय आणि गुरुदत्त यांचे सुपुत्र आत्माराम यांनी परिचयात्मक लिहिले शब्द देखील येथे देत आहे. तुमचा अभिप्राय जरूर कळवा.

संपादकीय

“नडेदु बंदा दारी”(मी चाललेली वाट) च्या वेळेस (१९५६-५७) मुंबईला गेलो असता कन्नड कलाकारांचे व्यक्तीचित्रण प्रकाशित करावयाच्या उद्देशाने अनेकांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्री ना देसाई आणि श्री व्ही के मूर्ती यांच्या बरोबर बोलताना दिग्दर्शक गुरुदत्त बद्दल लिहिले गेले पाहिजे असे समोर आले. त्यावेळी श्रीमती वासंती पदुकोण यांची मुलाखत घेतली. श्रीमती ललिता आझमी(गुरुदत्तच्या भगिनी, प्रसिद्ध चित्रकार) यांनी काही छायाचित्रे देखील पाठवली होती, पण ती त्या पुस्तकात देता आली नाही. नंतरही आमचा पत्र-व्यवहार सुरु होता. त्या दरम्यान गुरुदत्त यांचे आकस्मिक निधन झाले. मग शेवटी वासंतीबाईनी मुलाचे चरित्र लिहून पाठवले. प्रकाशित होण्यास विलंब झाला. गेल्या ऑक्टोबर मध्ये(गुरुदत्त यांचा ऑक्टोबर मध्ये निधन झाले होते) प्रकाशित करायचे ठरले होते. सर्व काही होण्यासाठी वेळ यावी लागते. वासंतीबाई अतिशय संयमाने वाट पाहत राहिल्या, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

गुरुदत्त यांचे बंधू श्री आत्माराम यांनी त्यांच्या विषयी चार शब्द लिहून आपली स्नेह प्रगट केला आहे. त्यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.

श्री गिरीश कार्नाड यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून देण्याचे कबूल केले होते, पण त्यांना लगेच वेळ झाला नाही. शेवटी त्यांनी कशीतरी फुरसत काढून प्रस्तावना लिहून दिली. हि त्यांची प्रस्तावना ह्या पुस्तकासाठी तिलक लावल्यासारखे शुभ झाले आहे. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

श्री आर्य यांचे मुखपृष्ठ तयार करून दिल्याबद्दल, भारत प्रिंटींग प्रेस यांचे ते छापून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ह्या पुस्तकाच्या दरम्यान अनेकांचे सहाय्य झाले आहे, त्या सर्वांचे देखील मनःपूर्वक धन्यवाद.

-संपादक

परिचय

माझ्या आईचे सामर्थ्य आठवले कि मला कायमच कौतुक वाटते. एक तर, ती शाळेत गेली नाही; गेली असेल तर एक-दोन इयत्ता शिकली असेल. बाराव्या वर्षी तिचा विवाह झाला. चौदा मुलांना जन्म दिला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे तिने शिक्षिकेचे काम सुरु केले. शिकवता शिकवता ती देखील शिकली. परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन दाखवले. हिंदी भाषा विशारद झाली. कलकत्ता विश्व विद्यालयातून  matrick केले-१९४१ मध्ये; ते देखील तिच्या मुलासोबत, गुरुदत्त बरोबर! त्यावेळी गुरुदत्तचे वय सोळा वर्षांचे होते. १९४३ मध्ये रुईया कॉलेज मधून टीचिंग डिप्लोमा तिने केला. शाळेत शिक्षिकेचे काम करत, कमावत, पाच मुलांचे पालन पोषण केले. वेळ मिळाला तसा थोडेफार समाजकार्य देखील केले. तिला सात भाषा येत-बंगाली, मराठी, हिंदी, तेलगु, तमिळ, इंग्लिश, कन्नड. त्यात वर कोकणी देखील तिला येत असे. विमल मित्र, जरासंध(चारू चंद्र भट्टाचार्य), आणि बानी रे यांच्या पुस्तकांचे भाषांतर केले. हे सर्व बंगाली भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार.

आता तिचे वय सदुसष्ट आहे, पण तिचा उत्साह चकित करणारा आहे. पुस्तके वाचते, सिनेमा, नाटकं पाहते; संगीत मैफिलींना जाते, न कंटाळता ती ऐकते. ती नेहमी काही ना काही करत असते. बंगाली, मराठी, हिंदी, कन्नड, इंग्लिश, पुस्तके ती वाचत असते, आवडले असेल तर त्यावर चित्रपट करता येईल असे ती मला सांगत राहते. परवा परवा आमच्या घरी असताना, करायला काही नसल्यामुळे, गुरुदत्त बद्दलच्या आठवणी का लिहून काढू नये असे मी तिला सुचवले. तिने लगेच काम हाती घेतले, लिहायला सुरुवात देखील केली. ते पाहून मला अतिशय आनंद झाला.

गुरुदत्त हा सर्वात मोठा मुलगा, त्यावर तिचे प्रेम देखील अनोखे. त्याच्या जीवनाबद्दल, आमच्या कुटुंबाबद्दल, स्वतःबद्दल निःसंकोचपणे, उघडपणे, वस्तुनिष्ठ भाषा शैलीत, निर्हेतुक भावनेने आपली प्रतिक्रिया स्मृती-रूप-चित्र स्वरूपात रेखाटले आहे. गुरुदत्तवर प्रेम करणाऱ्यांसाठी त्याच्याबद्दल आणखीन आपुलकी वाटायला लावणारे असे हे लेखन आहे. गुरुदत्त आता इतिहासजमा होऊन दंतकथा बनून राहिला आहे. त्याच्यावर इतक्यातच दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माझ्या आईचे त्याच्यावरील हे तिसरे पुस्तक, पण तितकेच वेगळे असणार आहे.

माझे गतदिवस आणि बालपण आठवल्यावर मी देखील बैठक मारून हे सर्व लिहून काढावे असे वाटू लागते. ते सर्व मी केव्हातरी लिहीनच. पण १९४० मध्ये निर्वतलेले माझ्या वडिलांच्या बद्दल येथे दोन शब्द सांगितले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कुसूर केली असे समजेन. माझ्या वडिलांना व्यवहार ज्ञान असे जवळ जवळ नव्हतेच. जीवनभर ते कारकून म्हणून जगले. असे असले तरी त्यांच्या जवळ आश्चर्यकारक अशी लेखन-शक्ती होती. त्यांनी कविता केल्या, इंग्रजीत लेख लिहित, गुरुदत्त त्याच्या वडिलांचा आदर्श, तसेच आईची कलेची आवड आपल्यात असावे यासाठी धडपडत असे. गुरुदत्तने तयार केलेले सिनेमे तो गेल्यावरही अजूनही आहेत, नंतरही राहतील. तो जनमानसातदेखील राहील. त्यामुळे, वाचकहो, माझ्या आईने लिहिलेले हे तिच्या आवडत्या मुलाचे स्मृती-रूप-लेखन या पुस्तकात वाचा, आणि त्याचे व्यक्तित्व त्याने तयार केलेल्या चित्रपटातून पहा.

आत्माराम

तीन चित्रकार, तीन पुस्तके, तीन चित्रपट

ह्या लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडील पुस्तकांची आवारावर करताना चित्रकला आणि चित्रकार यांच्या वरील मी गोळा केलेली काही पुस्तके पुढ्यात आली. आणि थोडीशी उसंत असल्यामुळे, चित्रकारांची चरित्रे, त्यावरील पुस्तके वाचावीत आणि चित्रपट पाहावेत अशी मनाने उचल खाल्ली. त्याबद्दल आज लिहायचे आहे. तसे पाहिले तर भारतीय चित्रकला आणि पाश्चिमात्य चित्रकला ह्यांचा तुलनात्मक अभ्यास, तसेच अमूर्त चित्रकला(abstract painting) हे विषय आधीपासून डोक्यात आहेत, पण त्याबद्दल नंतर कधीतरी. पूर्वी कधीतरी अनंत सामंत यांच्या चित्रकार, चित्रकला हा विषय घेऊन लिहिलेल्या एका कादंबरीबद्दल लिहिले होते(ऑक्टोबर एंड).

एके दिवशी सहज म्हणून माधवी देसाई यांचे कांचनगंगा हे पुस्तक, कधी तरी आणून ठेवले होते, ते वाचायला हाती  घेतले. त्यात एकोणिसाव्या शतकातील मुंबईतील तीन मैत्रिणींची कथा आहे गायिका अंजनी मालपेकर, चित्रकारांसाठी मॉडेल म्हणून काम करणाऱ्या सुरंगा मुळगावकर आणि नाटककार हेमा पेडणेकर. सगळ्या मुळच्या गोव्याच्या. त्यातील सुरंगाबद्दल उत्सुकता वाटली. ती चित्रकार राजा रवि वर्मा (१८४८-१९०६) याच्यासाठी मॉडेल म्हणून काम करत असे असा उल्लेख आला. मी वाचलेल्या रणजीत देसाई यांच्या राजा रवि वर्मा ह्या कादंबरी-वजा चरित्रात सुगंधा असा उल्लेख आला होता. ते पुस्तक परत कपाटातून काढले आणि वाचले. सुगंधा हि अर्थात नाव बदलेली सुरंगा होती हे समजले. राजा रवि वर्मा याच्या जीवनावर बेतेलेला रंग रसिया हा २००८ मधील चित्रपट देखील पहिला. एकोणिसावे शतक आणि न्यूड मॉडेल, पुराणातील प्रसंग रेखाटणे, राजा रवि वर्माचे काळापुढे असणे हे सर्व अतिशय रोमांचित करणारे वाटले. राजा रवि वर्माचे भारतीय चित्रकलेच्या इतिहासात मोठे स्थान आहे. भारतात आधुनिक चित्रकला त्यांच्या पासून सुरु झाली असे म्हणतात. त्या आधी अर्थात कित्येक शतके चित्रकला होतीच, नाही असे नाही. पण त्यांनी  तैलरंगात वास्तववादी चित्रे काढली. त्यांच्या काळात अजून जे जे  कला महाविद्यालय मुंबई मध्ये सुरु झाले नव्हते. नंतर चित्रकलेतील विविध आधुनिक प्रवाह येत गेले. कला महाविद्यालय झाल्यानंतर विद्यार्थ्यांना न्यूड मॉडेल पाहून रेखाटने करायला शिकवले सुरु झाले(नुकताच मराठी मध्ये ह्या विषयावर न्यूड हा चित्रपट येऊन गेला होता). इतर अनेक शैली, अनेक विचारप्रवाह देखील सुरु झाले.

Raja Ravi Varma

Raja Ravi Varma

मग मी मोर्चा वळवला तो माझ्याकडे असलेल्या दोन पाश्चात्य चित्रकारांच्या चरित्रात्मक पुस्तकांकडे. प्रसिद्ध चित्रकार विन्सेंट व्हॉन गॉगचे (१८५३-१८९०) चरित्र लस्ट फॉर लाइफ परत कपाटातून बाहेर काढले, पूर्वी केव्हातरी वाचायला घेतले होते, पंधरा-वीस पाने वाचून झाली होती. दुसरा पाश्चिमात्य चित्रकार ज्याचे चरित्र माझ्याकडे होते तो म्हणजे लोत्रेक(१८६३-१९०१). त्याच्या चरित्राच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे जयंत गुणे यांनी केलेले स्वैर रुपांतर होते. मुळ लेखक पिएर ल मूर. ते देखील वाचले. दोघांवर चित्रपट निघाले होते. ते देखील शोधले आणि पाहिले. ह्या दोघांच्या जोडीला तिसरा चित्रकार पॉल गोगँची  (जयंत गुणे यांचाच पॉल गोगँची वरील मौज २०१४ च्या दिवाळी अंकात आलेला लेख मी वाचला होता). हे तिघे पॅरिसमधीलच समकालीन, आणि एकमेकांना भेटलेले, मित्र असलेले. पण पॉल गोगँची बद्दल नतंर केव्हातरी. लोत्रेक मातृप्रेमी, तर व्हॉन गॉग बंधूप्रेमी. दोघेही अल्पायुषी पण वादळी आयुष्य जगलेले. दोघेही चांगल्या घरातील, पण आयुष्यभर दारिद्र्यात जगले, तळागाळातील लोकांबरोबर राहिले. अर्थात त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांत दिसते.

असो. आधी लोत्रेक बद्दल आणि जयंत गुणे यांनी केलेय पुस्तकाच्या अनुवादाबद्दल. लोत्रेकचा जन्म फ्रान्स मधील राजघराण्यातला, एकोणिसाव्या शतकातील. लहानपणी कसल्याश्या आजारामुळे दुर्दैवाने त्याच्या कंबरेखालचा भागाची वाढ खुंटते, थांबते. आई वडिलांचा, त्यातही वडिलांचा भ्रमनिरास होतो. आई त्याची अशी अवस्था पाहून मनातल्या मनात दुःखीकष्टी असते. त्यातच त्याला चित्र काढण्याचा नाद लागतो, आणि आयुष्यात चित्रकार बनायचे असे स्वप्न बाळगतो. पॅरिसला जातो, तेथून जवळच असलेल्या मोंमात्र येथे समाजातील निम्न स्तरातील लोकांत मिसळतो, वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली, स्त्रिया, मोलमजुरी करणाऱ्या लोकांची, नाईट क्लब, हॉटेल्स मधील दिसणाऱ्या दृश्यांची चित्रे काढत राहतो. आयुष्यात एखाद्या स्त्रीशी लग्न करून संसार थाटायचे स्वप्न मात्र साकार होत नाही, त्याच्या बेढब शरीरयष्टीमुळे त्याच्या जवळहि कोणी येत नसत. तो एकाकी, व्यसनाधीन, मनातून खचलेला होता. त्याच्या चित्रांना प्रसिद्धी मिळत होती, नाही असे नाही, त्याचे नाव देखील होत होते. पण ह्या इतर गोष्टींचा परिणाम होऊन तो वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी निर्वतला. लस्ट फॉर लाइफ या पुस्तकात एक प्रसंग आहे.  एकदा पॉल गोगँ आणि विन्सेंट व्हॉन गॉग पॅरिस  मध्ये बोलत असता लोत्रेकचा विषय निघाला. पॉल गोगँ म्हणतो, ‘….He is a damn fine painter, but he is crazy. He thinks that if he sleeps with five thousand women, he will vindicate himself for not being a whole man. Every morning he wakes up with gnawing inferiority because he has no legs; every night he drowns that  inferiority  in liquor and woman’s body. But it is back with him next morning. If he weren’t crazy, he would be one of our best painters….”.

Moulin Rouge (मुलॉं रूज)  नावाचा त्याच्या जीवनावर एक चित्रपट आहे (YouTube वर आहे). मुलॉं रूज नावाचे पॅरिस मध्ये एक प्रसिद्ध night-club आहे, आणि तो तिथे नेहमी जात असे. त्याच नावाचे त्याचे एक चित्र देखील आहे. म्हणून त्याचेच नाव चित्रपटाला आहे. दहा एक वर्षांपूर्वी युरोप सफरीच्या दरम्यान पॅरिसला धावती भेट होती, तेव्हा Paradis Latin नावाच्या एका night-club मध्ये देखील गेलो होतो. पॅरिस हे कला संस्कृती साठी प्रसिद्ध आहे, परत एकदा सवडीने तेथे जाऊन आले पाहिजे. पॅरिस मध्ये तर त्यावेळी अनेक चित्रकार राहत होते, ते एकमेकांना भेटत, चर्चा करत, मदतही करत, वादविवाद, हेवे-दावे होत. एकूण कलेला पोषक असे वातावरण होते असे दिसते या दोन्ही पुस्तकांतून. आता काय परिस्थिती आहे कोणास ठाऊक.

आता विन्सेंट व्हॉन गॉग बद्दल. जगभरात अतिशय प्रसिद्ध चित्रकार. लस्ट फॉर लाइफ हे त्याच्या आयुष्यावरील पुस्तक वाचनीय आहे. त्याचे जीवन आणि त्याची चित्रकला दोन्ही एकमेकांत मिसळले होते. बऱ्याच जणांना आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे खूप उशिरा समजते किंवा समजत देखील नाही. व्हॉन गॉगला देखील त्याला चित्रकार व्हायचे आहे हे खूप उशिरा उमगते. घरची परिस्थिती अतिशय चांगली होती, चित्रे आणि शिल्पं विकण्याचा व्यवसाय होता. दोन-तीन असफल प्रेमप्रकरणे, पैश्यांची कायम चणचण. त्याचा भाऊ थिओ (art dealer) याच्या जीवावर तो, त्याने प्रत्येक महिन्याला पाठवलेल्या पैश्यांवर जगत होता. दोघांचे एकमेकांवर अतिशय स्नेह होता, आणि त्या दोघांत खूप मोठा पत्रव्यवहार आहे. विन्सेंटला त्याच्याकडे उपजत कला नाही आणि त्याच्या चित्रांना काहीही तंत्र नाही असे कायम आयुष्यभर ऐकावे लागले. त्याने असे असूनसुद्धा आपल्या मनाचे ऐकत, त्याला जशी चित्रे काढायची होती तशीच त्याने ती काढली. तो हायात असे पर्यंत उभ्या आयुष्यात एकच चित्र विकले गेले. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चित्रांना अमाप प्रसिद्धी लाभली. व्हॉन गॉगने वयाच्या ३७व्या वर्षी गोळी मारून घेऊन आत्महत्या केली.

त्याच्यावर असलेले तीन चित्रपट माझ्या पाहण्यात आले. तसे बरेच आहेत. पहिला Loving Vincent, दुसरा Vincent and Theo, आणि तिसरा Lust for Life जो त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. Loving Vincent हा painted animation चित्रपट आहे, २०१७ मधील, Amazon Prime वर आहे. आणि हा चित्रपट त्याच्या शेवटच्या काही  दिवसांमधील घटनांवर आधारित आहे, आणि खूपच वेगळा चित्रपट आहे.  Vincent and Theo आहे त्याच्या आणि भावाच्या संबंधावर आधारित आहे, १९९० मधील, YouTube वर आहे. शेवटचा आहे १९५६ मधील, Kirk Douglas ची प्रमुख भूमिका असलेला. अजून एक विशेष म्हणजे, त्याच्या आयुष्यातील विविध स्थळांची, गावांना भेट देऊन त्याचे जीवन समजावून घेण्यासाठी एक guided tour आहे. त्याची माहिती येथे आहे, आणि त्याच्यावर एक लेख येथे आहे. Kenneth Wilkie याने व्हॉन गॉग वर बरेच संशोधन केले आहे. त्याची माहिती व्यंकटेश माडगुळकर यांनी लेखकाचं गाव लेखकाचं घर या पुस्तकात दिली आहे. कधीतरी हा प्रवास करायचे मनात आहे, पाहूयात.

अशी ही तिघा चित्रकारांची विलक्षण आयुष्यं, चांगल्या घरातून असूनही, चित्रकलेसाठी त्यांनी आयुष्य वेचले. साधारण एकाच काळात, पण एक स्वातंत्र्यपूर्व भारतात, तर दुसरे युरोप मध्ये कार्यरत असलेले. त्यामुळे त्या काळात दोन्ही ठिकाणी कलेची एकूणच परिस्थिती कशी होती याची कल्पना येते. तसे मी काही चित्रे,  किंवा चित्रप्रदर्शने खूप अशी पहिली नाहीत. खूप पूर्वी औंध (सातारा जिल्हा, यमाई देवी) मधील पंतप्रतिनिधी यांचा चित्र संग्रह(भवानी म्युझियम) पहिला आहे, अमेरिकेत Philadelphia Museum of Art, Barnes Foundation येथे असलेला चित्र संग्रह पाहिला आहे. त्या सर्वांबद्दल बद्दल परत कधीतरी. या तिन्ही चित्रकारांची चित्रे मी पाहिली आहेत कि नाही ते माहित नाही; पाहिली असली तरी किती कळली हे अलविदा! पण त्यांची चरित्रे वाचून, पाहून हे सर्व मांडावेसे वाटले, इतकेच. भारतातील चित्रकारांच्या चरित्रात्मक/आत्मचरित्रात्मक पुस्तके तशी बरीच आहेत, पण चित्रपट नाहीत. प्रसिद्ध चित्रकार गायतोंडे, किंवा मकबूल फिदा हुसैन यांच्या जीवनावर चित्रपट यायला हरकत नाही.

 

स्मरण आचार्य अत्र्यांचे

आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे हे दोघेही मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, आणि तेही विनोदी. पण तसे दोघेही अनेक क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहिलेले. या दोघांचे नाव माहित नसलेला मराठी माणूस विरळा, अर्थात आत्ताच्या पिढीचे काही सांगता येत नाही! १२ जून हा पु ल देशपांडे यांचा स्मृतीदिन, तर आचार्य अत्रे यांचा १३ जूनला असतो. काय विचित्र योगायोग आहे नाही! पु ल देशपांडे यांचे निधन होऊन वीस वर्षे झाली ह्या वर्षी(२०२०), तर आचार्य अत्रे यांचे निधनाला दोन वर्षांपूर्वी(२०१८) पन्नास वर्षे झाली. सर्वसामान्य मराठी वाचकांप्रमाणे, रसिकांप्रमाणे, मी दोघांचेहि थोडेबहुत साहित्य वाचले आहे, आणि इतर क्षेत्रातील त्या दोघांचे कर्तृत्व थोड्याफार प्रमाणात माहित आहे. मी पु ल देशपांडे यांच्या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल थोडेसे लिहिले आहे या आधी(काय वाट्टेल ते होईल). आचार्य अत्रे यांच्या बद्दल काहीच लिहिले नव्हते. कालच त्यांचा स्मृतीदिन साजरा झाला, त्यामुळे हा लेखन-प्रपंच.

आचार्य अत्रे

आचार्य अत्रे यांचे अर्कचित्र(निवडक ठणठणपाळ या पुस्तकातून साभार)

अर्थात आचार्य अत्रे यांना मी पुस्तकांतूनच अधिक अनुभवले आहे, कारण त्यांच्या निधनाच्या वेळी मी जेमतेम एक वर्षांचा होतो! सुदैवाने पु ल देशपांडे यांना प्रत्यक्ष पाहता आले होते. साधारण १२-१५ वर्षांपूर्वी मी आचार्य अत्रे यांच्या स्मृतीदिनानिमित पुण्यातील बाबुराव कानडे यांच्या आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती विविध वक्ते देत होते. बाबुराव कानडे आचार्य अत्रे यांचे शिष्य. आचार्य अत्रे यांच्या प्रेमापोटी त्यांनी हे प्रतिष्ठान आणि त्याच बरोबर विनोद विद्यापीठ देखील उभारले आहे. पु ल देशपांडे देखील आचार्य अत्र्यांना गुरु मानायचे.

माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्या कवडी चुंबक या नाटकातील एक उतारा आमच्या नववी किंवा दहावीच्या मराठीच्या पुस्तकात होता. पण माझ्या वाचनप्रवासात अत्रे थोडे उशिरा आले असे म्हणावे लागेल. अत्र्यांचे आत्मचरित्र कऱ्हेचे पाणी (याचे पाचही खंड) हे मला वाटते मी गंभीरपणे वाचलेली त्यांची पहिली साहित्यकृती. त्यांची तोंडओळख हि शाळेतील पाठ्य पुस्तकांतून झालेली होतीच. त्यांच्या मुलीने म्हणजे शिरीष पै यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांतून देखील त्यांच्या बद्दल आणखीन समजते. एकूणच अफाट व्यक्तिमत्व होते त्यांचे. त्यांच्या वकृत्वाचे, हजरजबाबीपणाचे, तसेच फटकळपणाचे किस्से अजूनही चर्चिले जातात. आचार्य अत्रे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान फार मोठे आहे. मराठी चित्रपटाला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो त्यांच्या श्यामची आई या चित्रपटाला(आणि योगायोग पहा, परवाच ११ जून साने गुरुजींचा स्मृतिदिन होता). प्रसिद्ध नाटके मोरूची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी आणि इतरही बरीच अशी त्यांच्या नावावर आहेत.

गेल्यावर्षी असेच पाथारीवरील जुन्या पुस्तकांच्या ढिगात आचार्य अत्रे यांचे केशवकुमार या टोपण नावाने प्रसिद्ध झालेल्या विडंबन काव्याचा संग्रह झेंडूची फुले हे पुस्तक अवचित हाती लागले. विडंबन काव्याची परंपरा खंडित झाली आहे असे दिसते आहे(माझे नागपूरकडील एक नातेवाईक प्रा. सुरेश खेडकर हे विडंबन काव्य करतात आणि ती सादर देखील करतात. त्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे एप्रिल फुले असे आहे). त्यांचे समाधीवरील अश्रू हे मला भावलेले पुस्तक. त्यांनी अनेक मान्यवर व्यक्तींच्या मृत्युनंतर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखांचा संग्रह आहे. मुलांसाठी लिहिलेले नवयुग वाचनमाला हि पुस्तके देखील अतिशय लोकप्रिय होती. माझ्याकडे असलेले अजून वेगळे पुस्तक जे आचार्य अत्रे यांनी लिहिले नाही, पण ते त्यांच्या विषयी आहे. त्याचे शीर्षक आहे आदेश विरुद्ध अत्रे, पु भा भावे यांचे. आदेश हे नागपूर वरून प्रसिद्ध होत असलेले पु भा भावे संपादित मराठी साप्ताहिक. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या नवयुग मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अशिष्ट अशी टीका केली होती. आदेश मधून पु भा भावे यांनी त्याच प्रकारे त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यावरून आदेश आणि अत्रे यांच्यात न्यायालयीन तंटा झाला. त्याचा पु भा भावे यांनी या पुस्तकात वृत्तांत दिला आहे. पुस्तकाची प्रथमावृत्ती आहे १९४४ मधील आहे. ते सर्व वाचणे मनोरंजक आहे; अत्र्यांच्या आणि समोरच्या पक्षाच्या विचारांचे त्यातून दर्शन होते. आचार्य अत्रे यांनी असे अनेक वाद-विवाद ओढवून घेतले आहेत. जसे अत्रे-ना सी फडके वाद, अत्रे-बाळासाहेब ठाकरे वाद!

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या विनोद गाथा या पुस्तकात विनोदाचे थोडेफार तात्विक विवेचन केले आहे. ते नक्कीच उदबोधक आहे. त्यात ते म्हणतात कि समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निघाली, त्यात विनोदाचे रत्न कसे सापडले नाही याचे राहूनराहून आश्चर्य वाटते. आचार्य अत्रे यांचा आवडता आणि अतिशय प्रसिद्ध शब्द म्हणजे गेल्या ‘दहा हजार वर्षांत..’! हे अतिशयोक्ती स्वरूपाचा विनोदाचे उदाहरण आहे. या निमित्त एक किस्सा सांगितला जातो. पु ल देशपांडे यांच्या विषयी बोलताना ते म्हणतात, ‘पु ल देशपांड्यासारखा विनोदी लेखक येत्या दहा हजार वर्षांत होणार नाही’. कुणीतरी बोलले कि, ‘आचार्य, तुम्ही फार अतिशयोक्ती करता बुवा’. यावर आचार्य अत्रे उत्तरले, ‘अरे, यात अतिशयोक्ती कसली? मला अतिशयोक्तीच करायची असती तर मी म्हणालो असतो की पु ल देशपांड्यासारखा विनोदी लेखक येत्या दहा हजार वर्षांत होईल! असे हे अत्रे!

१९५-६० च्या काळात लोणावळा खंडाळा हे अनेक प्रसिद्ध लोकांचे आवडते ठिकाण होते असे दिसते. प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्तच्या चरित्रात त्याच्या लोणावळा खंडाळा येथील घराचा उल्लेख आहे. आचार्य अत्रे यांचे देखील ते आवडते ठिकाण होते, त्याबद्दल, त्यांच्या खाद्य रसिकते बद्दल, तेथील विविध मैफिलीबद्दल त्यांनी चवीने लिहिले आहे. काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रातून वाचले होते कि त्यांचे तेथील घर राजमाची दर्शन हे डॉ बावडेकर यांच्या मालकीचे आहे आणि त्यांनी त्याची चांगली देखभाल केली आहे. हि चांगली बातमी आहे. साहित्यिकांची घरे हि पुढच्या पिढीसाठी प्रेरक असतात. त्याबद्दल मी पूर्वी लिहिले होते(लेखकाचं गाव लेखकाचं घर).

पु ल देशपांडे नवीन पिढीला माहित आहे असे म्हणता येईल, पण तसे आचार्य अत्रे यांच्या बाबतीत नाही म्हणता येणार. नव्या पिढीला आचार्य अत्रे नावाच्या झंझावाताची थोडीफार कल्पना यावी याकरिता त्यांच्या नावाचे संकेतस्थळ(website) सुरु करायला हवे किंवा एखादा माहितीपट/चरित्रपट करायला हवा(असेल तर मला कल्पना नाही). जसे पु ल देशपांडे आणि गदिमा यांची संकेतस्थळे आहेत त्याच धर्तीवर. त्यामुळे रसिकांच्या मनात नक्कीच त्यांच्या स्मृती कायम राहतील आणि प्रेरणा देत राहील. आजचे प्रसिद्ध व्हिडियो समाज माध्यम Youtube वर चारी अत्रे यांच्या बद्दल बरेच साहित्य आहे.  दरवर्षी त्यांच्या जन्मगावी(सासवड) येथे त्यांच्या जयंतीच्या(१३ ऑगस्ट) निमित्ताने आचार्य अत्रे साहित्य संमेलन आयोजित केले जाते, ती नक्कीच स्पृहणीय गोष्ट आहे.

ता. क. आज(सप्टेंबर ८, २०२०) कळले कि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन झाले. त्यांनी लिहिलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर आधारित हुतात्मा हि कादंबरी खूप गाजली होती. त्यावर आधारित वेब मालिका देखील आली होती गेल्यावर्षी. त्याचे भाग मी पाहतो आहे, त्यात आचार्य अत्र्यांची भूमिका अभिनेता आनंद इंगळे यांनी चांगली आठवली आहे. ती मालिका जरूर पाहा.

Road Trip: Las Vegas to Grand Canyon

Other day, I read the news that car rental company Hertz in the USA announced its bankruptcy. It was another unfortunate victim of current pandemic. Hertz was one of the early pioneers of renting cars in the USA. Ability to rent cars was one of the driving factors towards explosion of culture of road trips in that country.

Road trips are in vogue these days in India too. Backpacking, solo trips, road trips are quite common. And what triggered this? The answer is roads. Yes, modern, multi-lane, paved roads, which India started building, all over the country. The first one was, of course, Pune Mumbai Expressway opened in year 2000. These modern highways, expressways, run east to west, north to south. Flyovers, underpasses, entries, exits, tolls, multi-lane highways are making these road trips possible. And yes, the car rental, self-driving cars business is also booming in India too.

When I was in the USA more than two decades back, I enjoyed this culture of road trips quite often. The reason again was roads. Nothing speaks America like roads. America characterized itself with westward expansion in its early years, first with trails used by horses and wagons, and later with railways(they call them as railroads). When motorcars arrived on the scene early twentieth century, America embraced it as fun machine. This followed up with nation wide interstate highway system, around 1930s. Even numbered highways go east to west, and odd numbered ones go north to south. As decades passed, highways grew leaps and bounds, and whole new culture of living on the roads, road trips came up. The highways and culture of driving, road trips are symbol of America’s individuality, freedom.

Today, I am going to talk about one such road trip I took with few friends during my time in the USA two decades back. This was from Las Vegas to Grand Canyon National Park. Of course, over the years, I have taken many road trips such as San Jose to San Diego via Los Angeles over Interstate 5, or many road trips taken on highway 101 in Bay Area, or on Pacific Coastal Highway 1, or on the east side, Jersey City to Washington DC via Interstate 95. I am still dreaming of coast to coast road trip some day(the oldest interstate highway connecting both the coasts is Interstate 80, I have driven on it in parts on both sides though).  Many more can be listed here. I will write on them on this blog sometime.

It was summer of 1996, long weekend of July 4-the Independence Day of the USA. Four of us, all working in software companies, decided to go on a road trip. Three of us were in Bay Area, and the fourth was in Chicago, who joined us in San Jose a day earlier. We all flew, with South West Airlines, to Las Vegas first, to experience the life on The Strip. I certainly recalled the fun we had on The Strip that night, when I recently watched Hindi movie Simran starring Kangana Ranaut, who played a character that blows money gambling in Las Vegas. Of course, we did not blow off the money there, but had a taste of the culture Las Vegas has to offer, which has earned itself entertainment capital of the world in the deserts of Nevada. Google says, “Las Vegas means The Meadows. It was an oasis in the middle of the desert, drew the railroad because trains need water, and a small sleepy town sprang up. It remained a small sleepy town until gangster Bugsy Siegel moved in to take advantage of Nevada’s gambling laws.”

Next day we rented a car from Hertz(or was it from Enterprise? Don’t recall now), and started driving to a town called Flagstaff in Arizona, near Grand Canyon. There were no mobiles, no Google Maps back then. Anyone planning for a road trip, had to collect bunch of maps from American Association of Automobiles(AAA, or triple A as it was called fondly). There were pretty detailed ones, and helped a lot to navigate the roads, areas in the city. It was certainly an adventure to explore unknown places by taking a road trip entirely depending on these maps. Now it is as easy as setting your destination on Google Maps or any other navigation system of your choice(such as Garmin or Tom Tom), and you are off. You know every detail, distance, time, where you are etc. Not sure if it is so much fun now.

We took US-93 South and later I-40 E interstate highway and with driving of about 6 hours, we reached town of Flagstaff in Arizona, by late afternoon. Next day, we watched IMAX movie(first time in the life) titled Grand Canyon: Hidden Secrets. Later, we took a tour of west rim of Grand Canyons. We also took a small airplane ride over the Grand Canyons. What an amazing vista it provided! The whole place is geological wonder. The names of various peaks, buttes are quite interesting. They are named after many Indian mythological deities such as Bramha, Rama, Vishnu. They have been named that way due to the resemblance to their images, I guess. The Colorado river flowing through the canyons deep below is seen all the time. The layered, red colored rock structures which have been formed over million of years, is treat to eyes.

On the way back to Las Vegas again, it was a great ride. We stopped at Hoover Dam near Boulder City, on the way. It is one of the tallest dams in the USA. Once we reached Las Vegas again, dropped the rented car, and stayed overnight in Las Vegas for another fun night. Next morning, we returned back to home in Bay Area.

So this was our road trip by car. But road trips by motorcycles are also popular and even more revealing, it seems. I have not done any, but I have seen gangs of riders on Harley Davidson bikes many times. In India too, motorcycles road trips are also quite common. Many of you may be knowing, the book Zen and the Art of Motorcycle Maintenance is about such motorcycle road trip. I have read the Marathi translation(which is also abridged), need to grab the original English version. There is another category of road trips known as RV trips. RV is a Recreational Vehicle, which can run own their own or can be towed by a car. They are equipped with kitchen, bed, bathroom etc. I have not experienced that either yet. There are special parking areas for RVs all over the USA, called RV Parks.

Anyways, next time, I will write about a road trip taken in South India, visiting another rock marvel called Hampi. Stay Tuned!

 

 

साखर खाल्लेला माणूस

साखर खाल्लेला माणूस हे नाटक प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांचे आहे, त्यावर मी आधी इंग्रजीत(का कोणास ठाऊक!) लिहिले होते. जुलै २०१७ मध्ये पाहिले होते आणि त्याच वेळी लिहिले होते. मराठीत देखील लिहायला सुरुवात केली होती, पण अर्धवट राहिले होते, कच्चा खर्डा तसाच पडला होता. परवा नजरेस पडला. तो पूर्ण करून आज इथे देतो आहे.

नाटकांबद्दल मी माझ्या ब्लॉग वर नेहमीच लिहीत आलो आहे. आज परत योग आला आहे, तेही पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर मध्ये पाहिलेल्या नाटकाबद्दल. कित्येक दिवसांनी मी बालगंधर्व मध्ये नाटक पहिले. पूर्वी मी तेथे खुपदा नाटकं पहायचो. नुकतेच बालगंधर्व रंगमंदिर सुरु होऊन गेल्याला ५० वर्षे झाली(सुवर्ण महोत्सवी वर्ष). त्यानिमित्ताने त्याचे नुतनीकरण केले गेल्याचे मी ऐकले होते. तेही पाहायचे राहिले होतेच. तर मी पहिले ते नाटक म्हणजे सध्या गाजत असलेले साखर खाल्लेला माणूस. प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक. दोघेही माझे आवडते कलाकार. शुभांगी गोखले यांची नाटके मी पूर्वी पाहिलेली नाहीत. पण प्रशांत दामलेची तर मी कित्येक नाटके पहिले आहेत. प्रशांत दामलेची रेकॉर्ड असलेली एकाच दिवशी पाच नाटकांचे पाठोपाठ प्रयोग या बालगंधर्व मध्येच होते, त्यावेळेस त्याचे चार दिवस प्रेमाचे हे नाटक पाहिले होते.

साखर खाल्लेला माणूस हे त्याचे नवे नाटक येऊनही बरेच दिवस झाले. आता तर ते नाटक लंडन वारी देखील करून आले आहे. आपण सगळे जण लहानपणी एक कविता वाचली असते ज्याची सुरुवात “ Johnny, Johnny..Yes, Papa, eating sugar? No, Papa!”. मला माहित आहे की, ब्लॉगचे शीर्षक “साखर खाल्लेला माणूस” असे आहे, मुलगा नाही. असो. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मला बर्‍याच काळाने नाटक पहायची संधी मिळाली. पूर्वी मी तिथे नेहमीच नाटकं बघायचो. हे थिएटर आपले 50 वे वर्ष साजरे करीत आहे. खुद्द बालगंधर्वांनीच नाट्यगृहाची पायाभरणी केली होती. गेल्या महिन्यात 5 दिवसाचा उत्सव आयोजित केला होता, ज्याला मी भेट देऊ शकलो नव्हतो.

तर ह्या नाटकात प्रसिद्ध नाट्य कलाकार प्रशांत दामले आणि शुभांगी गोखले यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. दोघेही माझे आवडते अभिनेते आहेत. मी पूर्वी शुभांगी गोखलेचे कुठले नाटक पाहिलेले आठवत नव्हते; तिने स्टेजवर फारसे काम केलेले नाही (पण तिने काम केलेले श्रीयुत गंगाधर टिपरे किंवा अग्निहोत्र ह्या मालिका मला आवडायच्या आणि तिचे काम देखील). यापूर्वी मी प्रशांत दामलेची बरीच नाटके बर्‍याचदा पाहिले आहेत. मी काही वर्षांपूर्वी एकाच दिवशी पाच नाटकांतून त्याला लिम्कामध्ये विक्रमी कामगिरी करताना देखील पाहिले आहे. त्याची स्वतःची वेबसाइट आहे आणि खरं तर मी त्या वेबसाइटवरच या नाटकासाठी तिकिटे बुक केली आहेत. हे नाटक गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. खरं तर, नुकतीच नुकतीच ती लंडनमध्येही गेली होती. या नाटकाची जाहिरात शुगर कोटेड ब्लॅक कॉमेडी म्हणून केली जाते. हे नाटक शुगर कोटेड तसेच ब्लॅक कॉमेडी देखील नाही. त्यामध्ये प्रशांत दामले असतील तेव्हा हा विनोद नक्कीच कसा आहे हा विनोद नाही. पण मधुमेहाच्या रोगाने ग्रस्त अशा मध्यमवयीन व्यक्तीवर एक विनोदी भाष्य आहे.

मला अशाच थीमवर खूप काळापूर्वी नाटक (वाजे पाउल आपले) पाहिल्याचे आठवले. त्या नाटकात मध्यमवयीन व्यक्तीला हृदयरोग होण्याचे आणि त्याच्याशी कसा सामना करायचा हे दाखवले गेले होते. मला वाटते की हे पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रामाटिक असोसिएशन नावाच्या मंडळाने आयोजित केले होते आणि मुख्य कलाकार दिलीप वेंगुर्लेकर होते. विख्यात मराठी लेखक विश्राम बेडेकर यांनी हे लिहिलेले (Norman Barasch and Caroll Moore यांचे इंग्रजी नाटक Send Me No Flowers वर बेतलेले होते). साखर खाल्लेला माणूस  हे उच्च मध्यमवर्गीय कुटूंबातील नाटक आहे, जिथे एका खाजगी विमा कंपनीत वरिष्ठ कार्यकारी असलेला मध्यमवयीन पतीला, एक दिवस मधुमेह झाल्याचे समजते. मग त्याची नेहमीच काळजी घेणारी पत्नी आणि कुटुंबातील इतर लोक थोडे जास्तीच संवेदनशील होतात आणि टोकाच्या प्रतिक्रिया देत त्याचे जगणे हैराण करतात. हे नाटक प्रेक्षकांना हास्याच्या सागरात डुबक्या मारून आणते,  याचे कारण अनेक प्रेक्षक देखील स्वतःच्या जीवनात ह्याच परिस्थितीतून जात असतात.

प्रशांत दामले त्याच्या अभिनयामुळे प्रसंगानुरूप विनोद निर्माण करण्यात, अचूक टायमिंग, आणि सहकलाकारांबरोबर असलेले tuning या मुले बहार आणतो. या नाटकातील पात्र साकारताना या सर्व गोष्टी करण्याची त्याला पूर्ण संधी आहे. त्याची सहकलाकार शुभांगी गोखलेही त्याची उत्तम साथ करतात. हे एक वेगवान नाटक आहे, प्रेक्षकांना श्वास  उसंत देखील देत नाही. या जोडप्याच्या मुलीचे प्रेम प्रकरण या नाटकाची आणखी एक बाजू आहे. वडीलांचे मुलीशी असलेले नात्याचेही छान सादरीकरण केले आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये तयार झालेल्या विनोदामुळे आणि कलाकारांमधील ऊर्जेमुळे प्रेक्षक खुर्चीवर अडकून राहतात. प्रशांतला गाण्याची आवड आहे, त्याने या नाटकातही गायले आहे. एक छोटीशी चूक मला लक्षात आली ती म्हणजे तो संवादाच्या वेळी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)चे ‘जिदंगीके साथ, जिंदगीके बाद’ ह्या घोषवाक्याचा संदर्भ येतो. हे घोषवाक्य एलआयसीचे आहे, कुठल्या खाजगी विमा कंपनीचे नाही.

आम्ही थिएटर जवळ जंगली महाराज रस्त्याच्या नुकत्याच नूतनीकरण केलेल्या भागात(smart city प्रकल्पाच्या अंतर्गत) चक्कर मारली. दिवसभर पाऊस पडत होता. या नवीन ओल्या रस्त्याने संध्याकाळी चालताना मस्त वाटत होते. रस्त्याचा नूतनीकरण केलेला विभाग बर्‍याच मोठा आहे. आशा आहे की हे असेच राहील. असो, नाटकाकडे परत येतो . मी प्रशांतच्या दुसर्‍या नाटकाबद्दल ब्लॉग लिहिला आहे (कार्टी काळजात घुसली). जरूर पहा आणि प्रतिक्रिया कळवा!

Amazon Spheres

It was last year during May/June, I was in the USA, particularly, in Seattle. I did not imagine the situation would turn around, a year later, so dramatically. First, the pandemic itself, which is anyway worldwide, but the USA quite surprisingly got badly hit. And the second, the protests, unrest due to George Floyd’s tragic death by the hands of the police. This event has created unprecedented turmoil in the country right now. Sitting at home and going down the memory lane brought the time I had spent in Seattle last year and also brought the memories of visit to African American history museum in Philadelphia.

View of Seattle Downtown

View of Seattle Downtown

The other day I happened to tune into CNN and stumbled upon a show on Amazon. It was called The Age of Amazon. I remained on that channel till the show was over. It was breathtaking experience to watch Amazon’s progress and where it is headed, and many other aspects including protests, HQ2 etc. All that reminded me about my last year’s trip to Seattle, as mentioned above.  Few days later after I returned, it was Amazon’s 25th anniversary on July 5. And I said wow to myself. I was in Seattle, around this remarkable day. Later, I also got my hands on an old book by on Amazon’s journey, in a local used books exhibition. It also outlines Jeff Bezos’, now famous, story and gives early account of his success(it was published in year 2000, just 5 years after Amazon was founded). The book is titled Amazon.com: Get Big Fast by Robert Spector.

Amazon Spheres

Amazon Spheres, Seattle, May 2019

During my stay in Seattle, I happened to visit Amazon Spheres. It is also known as Seattle Spheres. This is unique structure right in the downtown Seattle, where you find cluster of Amazon’s offices. This three-dome structure, surrounded by Amazon’s buildings, is quite amazing. It is having huge glass panels from outside. I got to get inside tour that day. It seems it was lucky day for me. The Amazon Spheres houses world’s one of the biggest flowers. But this flower is also has quite foul, lousy smell. And it is aptly called corpse flower, as it smells like rotten dead body. The day when I was inside Amazon Spheres, it had bloomed. It seems that it blooms only every seven years!

The Amazon website maintains a page dedicated for this flower. It also has live streaming of the flower, and has time lapse of the blooming of the flower. It’s scientific name is Amorphophallus titanum. The page can be seen here. Fortunately, Amazon was allowing photography inside, so was able to take some snaps.

The Amazon Spheres which is multi-level building, has cafeterias, work spaces-both closed and open. But it contains plants from all over the world. It almost as if Amazon tried to create a greenhouse forest. The name of the company anyways derived from Amazon forests, which unfortunately, got burnt out last year in massive wild-fire, as we all know.

There is a Amazon Go shop as well right near this building. I also happened to step inside to get an experience of shopping without actually paying at the counter. It was certainly nice experience, of course, it is right now limited only to food items. It was around noon time, when I got inside the shop. It seemed to me that many Amazon employees or may be employees of nearby companies came down there for a quick bite, lunch or coffee. I also visited the Amazon Bookstore as well located in University Village area, near University of Washington.

It was indeed amazing to see by your own eyes, how technology can change the world. The city(Seattle) which was known as Boeing city earlier, and then later Microsoft city, now is known as Amazon city. Truly inspiring! Anyways, my other two blogs on last year’s Seattle visit can be found here: General Magic, Boeing Visit.

BTW, before concluding, let me share the news I read about Amazon today, in the context of racism incidents, that they are banning use of facial recognition technology by police in the USA for next one year. This comes as part of their effort to combat systemic racism. A welcome step, I would say.