आधुनिक कला आणि सामाजिक परिवर्तन

आज गिरीश कार्नाड यांचा पहिला स्मृतीदिन. गेल्या वर्षी(म्हणजे २०१९ मध्ये) १० जूनला त्यांचे निधन झाले. पाच-सहा वर्षांपूर्वी माझी त्यांचासोबत ईमेल वर बातचीत झाली होती. निमित्त होते ते त्यांच्या एका कन्नड पुस्तकाचे मी करत असलेल्या भाषांतराचे. आगोम्मे ईगोम्मे असे त्याचे कन्नड नाव. भाषांतर तसे अजूनही संपलेले नाही. ह्या वर्षी होईल असे वाटले होते, पण झाले नाही, त्यातच लॉकडाऊनचे देखील निमित्त झाले.

त्या पुस्तकातील मी पूर्वी काही भाषांतरित लेख ह्याच ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते. पहिला ब्लॉग एका कथेचे भाषांतर होते(सर्व काही संपल्यावर). दुसरे होते ते नाटक कलेच्या मुळाबद्दलच्या एका पौराणिक कथेचे(Origin of theatrical arts). तसेच त्यांनी गुरुदत्तच्या चरित्राच्या पुस्तकाला  लिहिलेल्या प्रस्तावनेचे देखील मी नुकतेच भाषांतर केले होते(गुरुदत्त कोण?). आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचाच पुस्तकातील एक वैचारिक लेख भाषांतरित स्वरूपात येथे देत आहेत. गिरीश कार्नाड प्रसिद्ध होते म्हणजे त्यांचे स्पष्ट आणि परखड विचार. ते भाषणे देखील भरपूर करत, त्यांना विविध ठिकाणी व्याख्यानाला बोलावणे येत असे. पुण्यात एकदा मी त्यांचे संगीताबद्दल विचार, शुभा मुदगल यांनी आयोजित केलेल्या बाजा गाजा या संगीत महोत्सवामध्ये, ते देखील इंग्रजीत.

हा लेख देखील म्हणजे त्यांचे एक भाषण आहे. ते देखील मुळ इंग्रजीत होते. त्यांचे कन्नडमधील भाषांतर त्यांच्या उपरोल्लिखित पुस्तकात त्यांनी प्रसिद्ध केला होता(आधुनिक कले मत्तू सामाजिक परिवर्तने असे त्या लेखाचे कन्नड शीर्षक). भाषणाचे निमित्त होते नेदरलँड्मधील एक कार्यक्रम. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित तेथील Royal Tropical Institute ने India’s Culture in Motion हा कार्यक्रम आयोजित केला होता, १९९८ मध्ये. त्यावेळी त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण म्हणजे हा लेख होय. मुळ लेख बराच मोठा आहे. सोयीसाठी मी दोन भागांत ब्लॉग रुपात प्रसिद्ध करणार आहे. खाली दिलेले भाषांतर पहिला भाग आहे. पुढचा भाग नंतर प्रसिद्ध करणार आहे.

Girish Karnad

Girish Karnad. Photo from back-cover of his Kannada book Agomme Igomme

जाता जाता, गिरीश कार्नाड यांच्या चरित्राचे परिचय करून देणारा ब्लॉग(नोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#१) मी लिहिला होता. तसेच त्यांनी रचलेल्या तलेदंड नाटकाच्या प्रयोगाबद्दल देखील मी लिहिले होते(बसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड). ते देखील जरूर वाचा आणि ह्या श्रेष्ठ आणि बहुरंगी अश्या व्यक्तिमत्वाच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करूयात!

आधुनिक कला आणि सामाजिक परिवर्तन

भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने हे संमेलन आयोजित केले गेले आहे. याचा प्रमुख उद्देश असा आहे की, भारतात गेल्या अर्ध-शतकात, समाजात कलेच्या क्षेत्रात झालेलं वेग-वेगळे बदल आणि त्यांचा मागोवा, आणि त्यांचे विश्लेषण करणे हा आहे. सांस्कृतिक क्षेत्रात तरी स्वातंत्र्य-पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ असे निश्चित असे कालखंड आहेत असे म्हणता येते. स्वातंत्र्योत्तर काळात क्रियाशील असलेल्या शक्ती ह्या स्वातंत्र्य-पूर्व काळातील वसाहतवादी युगात उगम पावून वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे ह्या शक्तींचा परिचय करून घेताना, त्यामागील प्रक्रिया देखील जाणून घेणे अगत्याचे आहे.

माझ्या विवेचनाच्या आरंभी मला ब्रिटीश काळातील दोन आयमाकडे आपले लक्ष वेधायचे आहे. पहिला आयाम म्हणजे, शिक्षण आणि राज्यकारभारात/व्यवहारात झालेले इंग्रजी भाषेचे आगमन हे होय. १९३३ मध्ये, लॉर्ड मॅकॉलेने लिहिलेल्या टिप्पणी असे म्हणते, ‘येथील मुळनिवासी जनतेला इंग्रजी साहित्य, तसेच विज्ञान समजण्यासाठी इंग्रजी भाषा शिक्षणाचे माध्यम होणे गरजेचे आहे, तसेच, सर्व पौर्वात्य शिक्षणासाठी देण्यात येणारी सरकारी मदत थांबवण्यात येत आहे’. या धोरणामुळे आमच्या सुशिक्षित समाजाची विचार प्रक्रियाच शासकीय भाषेनुसार नियंत्रित झाली. स्वतः भारतीयांत आपल्या जीवनाच्या विविध अंगांचा, पाश्च्यात परिकल्पनाचा झालेल्या परिचयामुळे, साम्राज्यवादाच्या चौकटीत ठेवून विवेचन करण्याची सुरु झाली. याचा परिणाम असा झाला की भारतीय बुद्धीजीवी समाजात स्वतःकडे पाहण्याची पद्धतीच बदलून गेली.

त्याच बरोबर, आमच्या समाजात एक नवी मूल्यव्यवस्था निर्माण झाली. आमच्या दैनदिन जीवनात देखील, काय बरोबर, किवा काय चुकीचे आहे, हे पाश्च्यात तर्क-पद्धतीनुसार ठरवू लागलो.

दुसरा आयाम असा की, मद्रास, कलकत्ता, मुंबई या सारखी नगरे निर्माण झाली आणि त्यांची वाढ झाली/होऊ लागली. अशा शहरीकरणामुळे, एका नवीनच मानसिकता समाजात वाढीस लागली. ब्रिटिशांच्या आधी सुद्धा, भारतात शहरे होती, नाही असे नाही; पण त्यांची मनोभूमिका वेगळी होती. त्या काळी समुद्र-किनारी असलेल्या राज्यांच्या व्यतिरिक्त, भारतातील बहुतेक शहरे ही समुद्र किनाऱ्यापासून लांब, अंतर्गत भूभागावर वसली गेली होती. ब्रिटीश संस्कृती ही ह्याच्या अगदी विरुद्ध अशी समुद्रगामी अशी होती. त्यांचा सर्व व्यापार हा सागरावर अवलंबून होता. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी समुद्रकिनारी शहरे वसविली. त्यामुळे भारतात त्यांनी ज्या तीन ठिकाणी नवीन शहरे निर्माण केली, त्यांना त्यांचा स्वतःचा असा पूर्वेईतिहास काही नव्हता. ह्या शहरात त्यांनी थाटलेल्या कारखान्याच्या आसपास, आणि ब्रिटीशांनी दिलेल्या सवलतीमुळे, एतद्देशीय भारतीय व्यापारी आकर्षित होवून ह्या शहरात येवू लागले. त्यामुळे हळूहळू ब्रिटीश साम्राज्य आपले पाय रोवू लागले. साहेबाच्या प्रती निष्ठा, कौतुक वाढीस लागले, त्याच्या सारखेच दिसावे ही भावना देखील वाढीस लागली. तसेच एका तऱ्हेचा Bourgeois समाजच निर्माण झाला, जो ब्रिटीश व्यापाराचा केंद्रबिंदू झाला.

पुरातन अथवा मूळच्या भारतीय नगरांत आणि वसाहतवादी अर्थव्यवस्थेतून नवीनच उदयास आलेल्या ह्या तीन शहरात मध्ये सुरुवातीपासूनच एक सांस्कृतिक भेद होता. भारतातील मुळच्या नगरात जरी लोक राहत असले तरी, त्या नगरांच्या आसपास असलेल्या गावामधून राहत असलेला समाज, याची जीवन मूल्ये ही साधारण एकच असत. देव, धर्म, जाती, कुटुंबव्यवस्था, सामाजिक संबंध वैगरे गोष्टी, त्या दोन्ही समजातील लोकाच्या आचरणात विशेष भेद नसे.

याविरुद्ध, ब्रिटीश वसाहतवादी काळातील ह्या नवीन नगरात ‘शहरी’ आणि ‘ग्रामीण’ असा भेद तीव्र होत गेला, असे दिसते. मुक्त अर्थव्यवस्थेवर आधारित व्यापार, वैयक्तिक कर्तृत्व शक्तीला मिळालेला वाव, तसेच सामाजिक जीवनात, धर्म-जाती-मत यांचे झालेले निराकरण, अशी ही सर्व ह्या नवीन शहरी संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. एकूणच आधुनिक आणि पाश्चिमात्य नागरी जीवन हे लक्ष्य होते.

यामुळे, ग्रामीण भागातील लोक, ह्या दृष्टीने मागे राहू लागले, त्यांच्या मध्ये अज्ञान वाढीस लागले. शहरातील जीवन हे पुढारलेले आहे, अशी भावना वाढीस लागली, या सर्वामुळे, शहरे आणि ग्रामीण भाग यातील अंतर आणखीन वाढू लागले. ब्रिटीशांनी, शहरी भागात शाळा, महाविद्यालये, आधुनिक हॉस्पिटल इत्यादी सुविधामुळे, ह्या भावनेला आणखी चालना मिळाली.

इथे एका गोष्टीचा उल्लेख करावयास हवा. हा शहरी समाज कितीही पुढारलेला होऊ लागला, पाश्चिमात्यांचे अनुकरण करू लागला असला तरी, घरात त्याचा प्रवेश झाला नाही. कुटुंबात, जाती-मत-कुलाचार, संप्रदाय, याथाप्रकार चालूच राहिले. यामुळे, शहरी जीवनात एक प्रकारचे द्वंद आणि दांभिकता निर्माण झाली(ह्या विषयावर विचारवंत आशिष नंदी यांनी लेखन केले आहे).

नाट्य आणि संस्कृती

पाश्चिमात्यांचे अनुकरण हा शहरी समाजाच्या जीवनाच्या शैलीचा भाग झाला, हे जरी खरे असले तरी, सांस्कृतिक अनुकरण सार्वजनिक क्षेत्रात सोपे असते. घरातील व्यवहार त्याने दुषित होत नाहीत. ह्या नवीन मध्यमवर्गाने, हा सांस्कृतिक बदल, कोठे आणला असेल तर तो रंगभूमी वर.

असे दिसून येते की, येथील मनोरंजनाचे स्वरूपच ब्रिटिशांच्या रंगभूमीच्या दोन आयामांमुळे बदलून गेले. पहिला बदल झाला तो शहरी/नागरी रंगभूमीवर असलेला procemium arch. सांप्रदायिक भारतीय रंगभूमीवर, प्रेक्षक आणि रंगभूमी ह्या दोघात कायम देवाणघेवाण, संवाद असे. तो यामुळे तुटला. नवीन प्रकाश्योजानेद्वारे, आता रंगभूमीवरील नटांवर/कलाकारांवर तो केंद्रित झाला, आणि प्रेक्षागृहात अंधार ठेवण्याची प्रथा सुरु झाली. रंगभूमीवरचे नाट्य आत्ता जणूकाही लांबवर एका कक्षात घडत असलेले स्वप्नवत भासू लागले(अपवाद अर्थात, गाण्याला अथवा सांगितला मिळणारा वन्समोअर, किंवा हास्य-विनोदाला मिळणारी प्रेक्षकांची प्रतिक्रिया)

दुसरा महत्वाचा बदल घडून आला, तो नाटकासाठी असलेली तिकीट-विक्रीच्या व्यवस्थेमुळे. नाटकामुळे मनोरंजन करून घ्यायचे असेल तर, त्यासाठी उचित दाम मोजला पाहिजे अशी वृत्ती वाढू लागली. या आधी, राजे-राजवाडे, समाजातील धनिक व्यक्ती, देवस्थान वगैरे ही मंडळी, नाटकाच्या प्रयोगाचा खर्च उचलत असत, ज्या मुळे प्रेक्षकांना काही दाम द्यावा लागत नसे.

ब्रिटिश रंगभूमी आणि त्यांची इंग्लिश शिक्षण पद्धती या दोन उपक्रमामध्ये एक सिद्धांत अंतर्भूत होता. तो म्हणजे, शेक्सपियरच्या नाटकात ब्रिटीश समाजाचे यथार्थ चित्रण आले आहे, यावर असलेला दृढ विश्वास, हा होय आणि त्याच्या नाटकात चितारलेला ब्रिटीश समाज हा जगातील इतर समाजापेक्षा श्रेष्ठ आहे, असा मुद्दा उपस्थित केला जाई. भारतातील बुद्धीजीवी समाजात, ह्या एका नाटकाने टाकलेला प्रभाव हा अभूतपूर्व असा होता. ब्रिटिशांचे अनुकरण करणे आणि आपण त्यांच्या पेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही, मागे नाही, ही त्या बुद्धीजीवी समाजाची त्या वेळी गरज बनली होती.

आपल्याकडे तत्व-ज्ञान, पुराण, महाकाव्य, ही सर्व असल्यामुळे, ब्रिटिशांची बरोबरी स्थापन करण्यास मदत झाली. ब्रिटीशांनी अकस्मातपणे नाटकाकडे मोर्चा वळवला. शेक्सपियरच्या तोडीस तोड भारतीय नाटककार उभा करणे आवश्यक झाले. सर विलियम जोन्स याने शाकुन्तालाचे भाषांतर केले होते आणि त्यांची प्रशंसा केली होती. जर्मन महाकवी गटे याने तर शाकुंतल नाटकाला डोक्यावर घेतले होते. भारतात कालिदासाला जरी श्रेष्ठ नाटककार म्हणून मान्यता मिळाले असले तरी, तो राष्ट्रीय अस्मितेचा भाग तो पर्यंत तरी बनला नव्हता. आता त्याला शेक्सपियर ऑफ इंडिया असे नामाभिधान त्याला बहाल करण्यात आले.

शेक्सपियरच्या उदाहरणावरून त्यावेळचे भारतीय बुद्धिजीवी समाज किती ढवळून निघाला हे जर पाहायचे असेल तर १९व्या शतकात आलेल्या भाषांतरांची संख्या पहिली तर लक्षात येईल. शेक्सपियरच्या नाटकाची नव्हे, तर कालीदासाच्या नाटकांची! १९व्या शतकात उत्तरार्धातील केवळ २० वर्षात, ‘शाकुंतल’ ची चार मराठी भाषांतरे, तर २ कन्नड भाषांतरे आली होती.

अण्णासाहेब किर्लोस्कर(ज. १८४३) हे मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक. त्यांनी रंगभूमी वर आणलेले पहिले नाटक हे ‘शाकुंतल’ हेच होते. त्यांनी अश्या संस्कृत कृती वर आधारित नाटके आणून नाटक कंपन्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली, हे खरे आहे. पण त्यांनी असेही म्हटले आहे की मला ‘इंग्लिश’ पद्धतीची रसनिर्मिती करायची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

ब्रिटीश सरकार सारख्या विदेशी राज्यकर्त्यांचा विरोध करायला हवा असे मानणाऱ्या राजकीय विचारवंतामध्ये ही शेक्सपियर मुळे कशी संदिग्धता निर्माण झाली होती, त्याचे मराठी नाटककार कृष्णाजी खाडिलकर हे उत्तम उदाहरण आहेत. त्यांचे एक नाटक ‘कीचकवध यांच्या नाटकात, सैरंध्री आपल्या आप्तजनांना गमावते, त्या वेलची तिची दर्शवलेली विपन्नावस्था ही सरळ सरळ त्या काळातील भारतमातेच्या अवस्थेशी मिळते जुळते असे आहे. त्या नाटकात सैरंध्रीचा पाणउतारा करणारा, तिच्या वर हात टाकणारा कीचक, हा त्यावेळी भारताचा प्रमुख लॉर्ड कर्झन आहे हे ही स्पष्ट होते.ब्रिटीशांनी ह्या नाटकावर, राजकीय हिंसेला खतपाणी मिळेल ह्या विचाराने, बंदी आणली. त्याच खाडीलकारांचे दुसरे नाटक ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ ह्यात नायकाचे पात्र ह्याम्लेटवर तसेच खलनायकाचे पात्र हे इयागोवर आधारित होते.

खाडीलकरांचे समकालीन नाटककार राम गणेश गडकरी ह्यांनी तर ‘शेक्सपियरच्या पुढ्यात मी अपूर्ण आहे. त्याची ३६ नाटके आणि माझी फक्त १८च नाटके आहेत’ असे जाहीर केले. किर्लोस्कर, खाडीलकर, गडकरी, ह्यासारख्या उच्चवर्णीय व्यक्तींनी, मराठी समजात चाललेल्या ब्रिटीश विरोधी चळवळीबद्दल असणाऱ्या भावनांना वाट करून दिली, तसेच खतपाणी देखील घातले.

१९व्या शतकाच्या मध्यात ब्राम्हण तसेच इतर उच्चवर्णीय समाजात नाटकाच्या प्रती तिरस्काराची भावना होती. देवळातील उत्सवाशी निगडीत अथवा धार्मिक उद्देशाने केल्या जाणाऱ्या अशा उपक्रमाव्यतिरिक्त नाटक निषिद्ध होते. तसे केल्यास जातीभ्रष्ट होण्याची भीती त्यात असे. धार्मिक कारणाव्यतिरिक्त, मनोरंजासाठी म्हणून कथा सांगणे, नृत्य, संगीत तसेच जादूचे खेळ हे सर्व इतर जातीच्या समाजात प्रचलित होते. (इथे एखादे उदाहरण पुरेसे आहे. रायचूरचे अपराळ तम्मण्णा १९०० मध्ये ‘श्री कृष्णपारिजात’ नाटक लिहून रंगभूमीवर आणले. ते लोकप्रिय झाले. तसे असले तरी त्यावेळच्या माध्व ब्राम्हण समजाचा रोष ओढवून घेतला. नाटकावर बहिष्कार टाकण्यात आला. तेव्हा तम्मण्णा यांच्या बंधूनी ते नाटक मठाधिपतींच्या समोर सादर करून आणि त्यांना हे नाटक धर्मप्रसाराचे काम करते आहे असे पटवून दिले, आणि बहिष्कार काढून टाकण्याची विनंती केली. आणि याउपर धर्मकार्य केल्यावाद्दल तम्मण्णाला शाबासकी देण्यात आली.)

हिंदू-मुस्लीम समाजामध्ये त्यावेळी नाटककलेच्या प्रती असलेला पूर्वग्रह एका बाजूला, तर ब्रिटीश समाजात नाटकाचे स्थान अत्यंत महत्वाचे होते. ब्रिटीश भारतात पाय ठेवल्यापासून, त्यांनी ब्रिटन मधून नाटक कंपन्या भारतात येत राहिल्या. त्यांच्या विलासी नाटक प्रयोगांना भरपूर उत्तेजन मिळे. त्यातील स्त्री भूमिका ‘मेमसाहेब’ करत असत. ह्यावरून नाटककलेला असलेली प्रतिष्ठा दिसून येते.

मुंबईतला पारसी समाज ब्रिटिशांचे अनुकरण करण्यात पुढे होता. त्यांनी १८५० मध्ये मुंबईमध्ये पारसी नाटक मंडळ स्थापन केली. १८५३ मध्ये लखनौचे नवाब वाजीद अली शाह हे एका फ्रेंच सांगितीकेवरून प्रभवित होवून ‘इंदर सभा’ हे संगीत नाटक लिहून घेतले. ते त्याचे प्रयोग करीत आणि स्वतः त्यात नृत्य करीत असत. त्यावेळेस देशभर त्याचे शंभराहून अधिक प्रयोग झाले.

१८८० च्या सुमारास महाराष्ट्रात ब्राम्हण आणि इतर उच्चवर्गीय समाजातील लोक, तसेच बंगाल मधील ब्रिटीशांनी पोसलेले जमीनदार यांनी नाटकाचे आधीचे संकेत मोडून स्वतःची अशी व्यावसायिक नाटके रंगभूमीवर आणली. किर्लोस्कर आदी मंडळीना मिळालेल्या यशामुळे नाटक कंपन्यांची एक समृद्ध अशी परंपराच सुरु झाली, जी पुढील ७५ वर्षे टिकून राहिली. procemium arch, सुमधुर नाट्यसंगीत, आणि ह्या नाटक कंपन्यांची असलेली एक विशिष्ट अशी आर्थिक व्यवहार पद्धती ह्या सर्व गोष्टी ह्या नवीन रंगभूमीची वैशिष्ट्ये होती. पौराणिक-ऐतिहासिक नाटके सुद्धा ब्राह्मण्य शैलीमध्ये सादर केली जायची, ज्याचे उदात्तीकरण होण्यास हे नाटकासारखे नवीन माध्यम पूरकच ठरले. त्याच वेळेला लोकसंगीतातून स्फूर्ती घेवून सादर केले जाणारे लोकनाट्य तसेच ग्रामीण नाट्य प्रकार हे कनिष्ठ दर्जाचे आहेत असा समज दृढ होत गेला. शतकानुशतके आपली लोकनाट्य परंपरा जीवित ठेवणाऱ्या ह्या कलाकारांना नुकत्याच उदयास आलेल्या व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश मिळाला नाही.(ह्या बाबतीत पारसी रंगभूमीने त्यांचे स्वागत करून अधिक उदारपणा दाखवला)

आमच्या संस्कृतीच्या व्याख्येमध्ये एक नवीन, मुलभूत बदल होवू घातला होता; जो देशातील वेगवेगळया भागात, वेगवेगळ्या कलाप्रकारात; वेगवेगळया रीतीने, जरी दिसायला सुरुवात झाली असली तरी, त्याचे मूळ स्वरूप आणि परिणाम एकच होता असे दिसते. उच्चवर्गातील समाजाने आतापर्यंत ज्या परंपरागत व्यवसायांना आपल्या पासून दूर ठेवले होते, त्याच गोष्टी आता ‘संस्कृती’, ‘कला’, ‘दोन हजार वर्षांची परंपरा” ह्यासारखी लेबलं लावून स्वीकारार्ह होत गेल्या.

आमच्याकडे अनादी काळापासून काही कलाप्रकार कनिष्ठ वर्गातील समाजाने आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून जपून ठेवले, त्याचे संवर्धन केले. ह्या समाजाला, वर्गाला, शहरातील नाट्य चळवळीबाहेर जाणून बुजून ठेवण्यात आले. ह्या नवीन नाटक कंपन्या शहरी संस्कृतीच्या गौरवाचा, अभिमानाचा विषय ठरू लागला. नाट्यकलेने स्वतःची जात बदलली असे म्हणावे लागेल.

(क्रमशः)

बसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड

मी जुलै महिन्यात बेंगळुरूला गेलो होतो. नाटकांची एकूणच आवड आणि त्यात कन्नड समजत असल्यामुळे, एखादे तरी बसवण्णा नाटक पाहण्याचा योग जुळवून आणतोच. त्यातच बेंगळुरू मधील प्रसिद्ध रंगशंकरा हे नाट्यगृह माझ्या वास्तव्याच्या जवळच आहे. ह्या वेळेस १९८९ मध्ये गिरीश कार्नाड यांनी लिहिलेले तलेदंड(कन्नड मध्ये ತಲೆದಂಡ) ह्या नाटकाचा प्रयोग पाहिला. कर्नाटकातील प्रसिद्ध समाजसुधारक, लिंगायत समाजाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर (उर्फ बसवण्णा) यांच्या जीवनातील विशिष्ट घटनांवर आधारित हे नाटक. असे म्हणतात की कलाकाराची महानता ही त्याच्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांना कलेच्या माध्यमातून प्रतिसाद देणे, व्यक्त होणे यात आहे. ह्या नाटकाला जवळ जवळ तीस वर्षे झाली. नाटकाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कार्नाड म्हणतात की ने नाटक म्हणजे त्यावेळी चालू असलेल्या अयोध्या मंदिर विषय, मंडल आयोग जो आरक्षणाविषयी होता, चळवळीच्या निमित्ताने निर्माण झालेली राजकीय, सामाजिक परिस्थिती वर भाष्य आहे असे सूचित केले आहे.

Taledand

तलेदंड नाटकाच्या पुस्तकचे मुखपृष्ठ

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाची भलावण, आणि इतर राजकारण हे सर्व ताजेच होते. तसेच काही वर्षांपूर्वी उमा कुलकर्णी यांनी केलेला मराठी अनुवाद वाचला होता. त्यामुळे जेव्हा ह्या नाटकाचा प्रयोग होत आहे हे समजले तेव्हा त्याबद्दल उत्सुकता आणखीनच वाढली. धावपळ करून, सवड काढून त्या शनिवारच्या दुपारी मी रंगशंकरा मध्ये धडकलो. अर्धगोलाकार रोमन कोलोसियम सारखी अतंर्गत रचना असेलेल रंगशंकराचे नाट्यगृह तुडुंब भरले होते. नाटकाबद्दल लिहिण्याआधी बसवण्णा यांच्या बद्दल थोडेसे.

बसवण्णा यांचा जन्म आजच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बसवनबागेवाडी(त्यावेळी नुसते बागेवाडी) येथे बाराव्या शतकात ब्राम्हण कुटुंबात झाला. त्याभागात कलचुरी घराण्याचा राजा बिज्जल हा राज्य करीत होता. त्याच्या पदरी बसवण्णा मंत्री होते. शैवपंथाचे अनुयायी असलेल्या बसवण्णा यांनी अनेक सामाजिक सुधारणांना हात घातला. सामाजिक समानता, जातीय एकात्मता, स्त्री-पुरुष समानता यांसारखे काळापुढचे विचार त्यांनी आपल्या कन्नड कवनांमधून(ज्याला वचन साहित्य) असे म्हणतात. मूर्तीपुजाविरोध, कर्मकांड विरोध, संस्कृत भाषेऐवजी कन्नड भाषेचा पुरस्कार त्यांनी केला. लिंगायत समाजाची स्थापना केली, हजारो अनुयायी मिळवले. त्यांनी कर्नाटकात बिजापूरजवळ कुडलसंगम येथे समाधी घेतली. कुडलसंगम हे ठिकाण कृष्णा आणि मलप्रभा या नदीच्या संगमावर वसले आहे. जवळच आलमट्टी धरण आहे. मी दोन्ही ठिकाणी गेलो होतो खूप पूर्वी. असो. पुढील काळात त्यांचे विचार, वचन साहित्य त्यांच्या नंतर इतर वचनकारांनी वाढवले. आज लिंगायत समाज हा कर्नाटकात(प्रामुख्याने उत्तर कर्नाटक भागात), महाराष्ट्रात मोठ्या संख्येने पसरला आहे. कन्नड वचन साहित्याला कर्नाटकात दास साहित्याप्रमाणे मोठे स्थान आहे, परंपरा आहे, संस्कृतीचा भाग आहे.

तलेदंड या कन्नड शब्दाचे विवेचन करताना कार्नाड लिहितात, ‘तलेदंड याचा शब्दशः अर्थ शिरच्छेदाने मृत्यू (तले-शीर, दंड-शिक्षा). मध्ययुगीन कर्नाटकात एखाद्या प्रतिज्ञापूर्ती नंतर किंवा प्रायश्चित्त या सारख्या कारणांसाठी आपले मस्तक उतरवून देण्याची पद्धत सर्वसामन्यांमध्ये रूढ होती. बसवण्णा आपल्या वचनांमध्ये हा शब्द वारंवार वापरतात. काही अमंगल प्रसंगी किंवा दोष निर्देशाच्या प्रसंगी ‘माझे शीर पडू दे’ किंवा  ‘मी माझे मस्तक अर्पण करतो’ अशा अर्थाने तो शब्द वापरला आहे’. बाराव्या शतकातील राजा बिज्ज्ल, आणि बसवण्णा यांची प्रमुख पात्रे असलेली नाटकात कार्नाड यांनी जाती-व्यवस्थेच्या विरोधी भाष्य केले आहे, मानवताधर्माचा पुरस्कार केला आहे. असे करताना ते इतिहासातील तपशील किती त्यांनी तसाच ठेवला आहे, काही छोटे मोठे बदल केले आहेत, नाटकाच्या उद्देश्यानुसार, किंवा नाटक आटोपशीर ठेवण्याच्या दृष्टीने, हे पहिले पाहिजे. पण ते विशेष महत्वाचे नाही.

 

हे तीन अंकी नाटक आहे. हा कन्नड प्रयोग बेंगलुरूच्या रंगसीरी ह्या हौशी नाट्यसंस्थेने केला होता. संदीप पै हे नाट्यदिग्दर्शक आहेत. त्या दिवशी ते नाट्यगृहात खाली ऑनलाइन राखलेली तिकीटे देण्याच्या ठिकाणी थांबले होते, प्रेक्षकांचे स्वागत करत होते. आत गेलो तेव्हा रंगमंचावर मागील बाजूस, पण मध्येच छोटासा गायक, गायिका तसेच वाद्यवृंद विराजमान झाला होता. बाकी सारा अंधार, पण त्यांच्यावर अंधुकसा स्पॉट होता. त्यांनी हळुवार आवाजात वचन गायन सुरु केले. सहसा रंगमंचासमोर असलेल्या बेचक्यात वाद्यवृंद असतो. ऐतिहासिक असे नाटक असल्यामुळे पात्रे अनेक. राजा बिज्जल, त्याची पत्नी, त्यांचा मुलगा ज्याने बसवण्णाची धास्ती घेतली आहे, खुद्द बसवण्णा, त्याचे अनेक अनुयायी, आणि बरेच जण. राजा बिज्ज्ल आणि बसवण्णा यांचे संबंध सौहार्दपूर्ण असतात. पण बसवण्णा यांनी आपल्या कारभारात जातीयता न मानता केलेला व्यवहार अनेकांना रुचत नाही. पुढे पुढे तर बसवण्णा यांचे, त्यांच्या विचारांचे प्रस्थ वाढते, अनुयायी वाढतात. त्यातच मग एका ब्राम्हण मुलाचे आणि खालच्या जातीच्या चांभार मुलीचे लग्न करून देण्याच्या प्रस्तावाला बसवण्णा मान्यता देतात, स्वतः हजेरी लावतात. आणि हा रोष शिगेला पोहोचतो, त्यांचे अनुयायी, आणि इतर यांच्यात हिंसा होते, आणि होत्याचे नव्हते होऊन बसते. सनातनी मंडळींचा प्रकोप होतो, रक्तपात होतो. बसवण्णा यांच्या मनाला अतोनात क्लेश होतो. आणि तेथेच नाटक संपते.

प्रयोग अतिशय रंगतो. बसवण्णा यांची भूमिका निभावलेल्या कलाकाराचे अतिशय छान काम झाले आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवरचे नाटक असूनही नेपथ्य अतिशय आटोपशीर आहे, वेशभूषा ही साजेशी आहे. मध्ये मध्ये वचन साहित्यातील वेचे मांडली जातात, त्याने नेमका परिणाम साधतो.

गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले होते, त्याबद्दल मी पूर्वी लिहिले होते. अतिशय प्रगल्भ, अनुभव संपन्न आयुष्य जगलेल्या कार्नाड यांचे खेळता खेळता आयुष्य जरूर वाचा!

नोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#२

प्रसिद्ध नाटककार गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्राचा परिचय करून देणारा पहिला ब्लॉग आपण येथे पाहिला असेलच. आता हा त्याचा दुसरा हप्ता. मराठी अनुवाद असलेल्या या पुस्तकाचे शीर्षक ‘खेळता खेळता आयुष्य’ असे आहे, ज्याचा पटकन बोध होत नाही. शेवटी अनुवादाबद्दल थोडे मांडणार आहे. आता गिरीश कर्नाड इंग्लंड वरून उच्चशिक्षण संपवून, भारतात नोकरी मिळवून परत आले आहेत. यापुढील आयुष्याचे जे तत्कालीन मद्रास येथून कथन ते आता करतात.

त्यांची मद्रास मध्ये Oxford University Press(OUP) मध्ये नोकरी सुरु आहे. मद्रास मधील त्यांचे आयुष्य देखील समृद्ध करणारे असे होते, नाटक, संगीत, चित्रपट, स्त्रिया, मद्यपान, विविध मित्र, सहकारी यांचे अनुभव, इत्यादी इत्यादी! मद्रासचे School of Arts, जे पुढे चोळामंडल नावाच्या कलेसाठी वसवलेल्या भागाचे देखील वर्णन आले आहे. तसेच मद्रास प्लेयर्स(Madras Players) ह्या हौशी नाट्य संस्थेविषयीचे त्यांचे अनुभव देखील वाचनीय आहेत. माझ्या चेन्नईच्या दोन वर्षांपूर्वीच्या भेटीत या दोन्ही ठिकाणांना भेटी दिल्या नाहीत, कारण मला माहितीच नव्हते. अजून एक वैशिष्ट्य, मला माहीत असलेले, जे संगीत क्षेत्राशी निगडीत आहे, ती म्हणजे Madras Music Season. हे सर्व पुढील चेन्नई भेटीदरम्यान पाहायला हवे. मद्रास मध्ये एका उच्च वर्गातील विवाहित महिलेशी आलेले लैंगिक संबंध यांचे वर्णन चकित करणारे आहे. उमा कुलकर्णी यांनी एक-दोन ठिकाणी इंग्लिश documentary film ला मराठी साक्षी-चित्र असा पर्याय वापरला आहे. मी तरी हे पहिल्यांदाच पाहतो आहे. माहितीपट असा सुपरिचित शब्द आहे की याला मराठीत. OUPचा सात वर्षांचा करार संपता संपता त्यांना दोन महिन्यासाठी लंडनला जायला मिळाले. त्यावेल तेथे त्यांनी Thomas Mann याच्या The Transposed Heads लघुकथेवरून हयवदन हे भारतीय नाट्यसृष्टीला कलाटणी देणारे नाटक कसे लिहिले याची कहाणी सांगतात.

Girish Karnad autobiography

मद्रास मध्ये OUPचे काम करत असताना असताना प्रसिद्ध कन्नड लेखक यु. आर. अनंतमूर्ती यांची कादंबरी संस्कार यावर सिनेमा कसा केला, यांचे सविस्तर वर्णन ‘शृंगेरी:संस्कार’ नावाच्या एका स्वतंत्र प्रकराणातून केले आहे. चित्रीकरण शृंगेरी, आगुम्बे या निसर्गरम्य परिसरात झाले आहे. मी तेथे गेलो आहे, खुपच छान परिसर आहे. कन्नड माध्व संप्रदाय(जो माझा देखील आहे!) यातील प्रथा, कडक सोवळे, कर्मकांड या सगळ्यावर हा सिनेमा टीका-टिप्पणी करतो. पण हा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही. भैरप्पा यांच्या प्रसिद्ध वंशवृक्ष कादंबरीवर त्याच नावाच्या सिनेमाची कथा, जिचे चित्रीकरण मैसूर मध्ये झाले, त्या सर्वांची कथा ‘जुने मैसूर:नवे प्रयोग’ यात येते. हा चित्रपट त्यांनी प्रसिद्ध कन्नड रंगकर्मी बी. व्ही. कारंत यांच्या बरोबर केला. हाही सिनेमा मी पाहिला नाही अजून, पण कादंबरीचे मराठीतील नभोवाणी रुपांतर ऐकले आहे. त्याच सुमारास आणखीन एका चित्रपट काडू ह्याचे देखील काम सुरु कसे झाले यांचे विवरण येते. हे सर्व वाचून त्यांच्यातील फिल्ममेकर, अभिनेता कसा फुलत गेला हे समजते. मी गेल्या वर्षी चित्रपट रसास्वाद शिबीराला गेलो होतो, त्यावेळेस चित्रपट निर्मिती, प्रक्रिया याबद्दल जे सांगितले होते, त्याची थोडीफार प्रचीती या वर्णनातून आली. या दोन तीन कन्नड चित्रपटांमुळे त्यावेळेस कन्नड चित्रपटसृष्टीत वेगळी लाट आली यांचे श्रेय त्यांना जाते.

पुस्तकाच्या शेवटी पुण्यात FTII चे संचालक म्हणून झालेले त्यांचे आगमन, त्याविषयी ते लिहितात. पुण्यात ते दोन वर्षे राहिले. FTII चा अनुभव, परिसर, प्रभात स्टुडिओची असलेला इतिहास इत्यादी बद्दल ते आत्मीयतेने लिहितात, ते वाचून छान वाटते. मी नुकतेच FTII चा अनुभव घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात FTII मध्ये घडलेल्या घडामोडी, जसे की तेथील संप, शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलणे, प्रभात स्टुडिओचे संस्थापक दामले यांचा पुतळा दर्शनी भागात आणणे, भारतीय चित्रपटसृष्टी आणि FTII यांत नसलेला संबंध, हे सर्व त्यांच्या अभिरुचीची, दूरदृष्टीची साक्ष देतात. तेथेच त्यांच्या आणि हेमा मालिनी प्रेम प्रेकरणाबद्दल मोकळेपणाने माहिती देतात. दोन वर्षानंतर तेथून लगेच मंथन या हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी राजीनामा देऊन राजकोटला निघून जातात. आणि सर्वात शेवटी त्यांच्या वयाच्या चाळीशीत त्यांच्या विवाह होतो त्याची ते माहिती देतात.

तर असा गिरीश कार्नाड यांच्या आत्मचरित्राचा संक्षिप्त परिचय. आता चांगले आत्मचरित्र कशाला म्हणायचे हा प्रश्नच आहे. लेखकाने अगदी प्रामाणिकपणे सर्व गोष्टी नमूद केले आहे याला पुरावा काय? तसेच सर्वच्या सर्व गोष्टी मांडल्याच पाहिजेत का? त्यांच्या आत्मचरित्रात प्रांजळपणा आहे हे नक्की. त्यातून शिकण्यासारखे, वाचक म्हणून समृद्ध करणाऱ्या गोष्टी देखील भरपूर आहे. पण हाच प्रांजळपणा बऱ्याचदा वादविवादाचे, चिखलफेकीचे कारण बनते. या पुस्तकातील बरेच प्रसंग, उल्लेख हे अश्या वादासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, होती. पण त्यांच्या आत्मचरित्राबाबत असे अजून तरी झालेले दिसत नाही.

थोडेसे अनुवादाबद्दल, जो नक्कीच वाचनीय आहे, बहुधा मूळ पुस्तकातील, कथानातील ओघवतेपण टिकून आहे. पण बऱ्याच ठिकाणी शब्दयोजने मुळे रसभंग होतो. अय्यो हा शब्द पक्का कर्नाटकी आहे, तो मराठीत का वापरावा? प्रचोदन, सांद्र अनुभव, साक्षी-चित्र, खेळता खेळता आयुष्य हे असे शब्दप्रयोग थोडा त्रास देतात. मी कन्नड जाणतो, कर्नाटकाची संस्कृती, भूभाग जाणतो, म्हणून मी तेथील बऱ्याच गोष्टी ज्या पुस्तकात आल्या आहेत त्या समजू-उमजू शकलो, पण इतर भाषिकांना तो भाग कितपत भावेल याची मला शंका आहे. कन्नड मधून मराठी भाषांतर करण्याचा मला देखील छोटासा अनुभव आहे, उमा कुलकर्णी यांनी अर्थात कितीतरी पुस्तके केली आहेत. पण हे भाषांतर प्रकरण अवघडच असते हे मात्र नक्की. पुस्तकात छायाचित्रे आहेत, पण ती छोटी छोटी का आहेत हे समजले नाही. मुखपृष्ठावर त्यांचे एक छायाचित्र आहे, जे आगोम्मे ईगोम्मे या आधी उल्लेख केलेल्या त्यांच्याच कन्नड पुस्तकाच्या मलपृष्ठावर आहे. ते रूहशाद गार्दा यांनी काढले आहे असे त्यात नमूद केले आहे. पण ते काय आहे हे कुठेच सांगितले आहे. मला वाटते ते हयवदन नाटकाच्या संदर्भातील दोन मस्तकं ही जी संकल्पना आहे, ती त्यांनी त्यातून दर्शविली आहे. गिरीश कार्नाड यांच्या कामाची यादी पुस्तकाच्या शेवटी सूची रूपात दिली आहे, ती एकदम उपयुक्त आहे.

असो. गिरीश कार्नाड किती वैविध्यपूर्ण, समृद्ध आयुष्य जगले आहे, असेच म्हणावे लागेल. आपण त्यांना आजही अधून मधून हिंदी चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका करताना पाहत असतोच. त्यांच्या आयुष्याचा पुढील भागाचे आत्मचरित्र लवकर यावे हीच सदिच्छा!

 

 

 

नोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#१

सुप्रसिद्ध कन्नड कवी द. रा. बेंद्रे यांच्या एका कवितेच्या ओळी ह्या ब्लॉगचे शीर्षक. प्रसिद्ध नाटककार गिरीश कार्नाड यांच्या कन्नड आत्मचरित्राचे शीर्षक ‘आडाडाता आयुष्य’. त्याचे मराठी भाषांतर उमा कुलकर्णी यांनी केलेले मी नुकतेच वाचले. काही वर्षांपूर्वी(२०१३ मध्ये) मराठी भाषांतराच्या प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम पुण्यात झाला होता. स्वतः गिरीश कार्नाड आले होते. गिरीश कार्नाड यांच्या काही कन्नड चित्रपटांचा महोत्सव देखील करण्यात आले होते. मला आठवते चेलुवी हा सोनाली कुलकर्णीचा पहिला चित्रपट, कनक पुरंदर ही डॉक्युमेंटरी देखील दाखवले गेले होते. त्यावेळी झालेल्या भाषणांमध्ये आत्मचरित्रात नमूद केलेले त्यांचे काही बोल्ड अनुभव हा चर्चेचा, उत्सुकतेचा विषय ठरला होता. त्यांचे आडनाव कर्नाड नसून कार्नाड आहे त्यावेळी सगळ्यांना समजले. मी त्यावेळी इतरांप्रमाणे पुस्तक विकत घ्यायला काही विशेष उत्सुक नव्हतो. मी स्वतः गिरीश कार्नाड यांच्या एका आगोम्मे ईगोम्मे या दुसऱ्या एका पुस्तकाचे भाषांतर करण्याच्या कामात गुंतलो होतो, जे अजून पूर्ण झालले नाही. त्यांच्या बरोबर संपर्क देखील झाला होता त्याविषयी, परवानगीही दिली होती. ते पुस्तक म्हणजे त्यांच्या प्रामुख्याने वैचारिक लेखांचे संकलन आहे. गिरीश कर्नाड जरी नाटककर म्हणून सुपरिचित असले तरी, ते वैचारिक लेखन करणारे, विचार आणि मत प्रदर्शन करणारे म्हणून माहिती आहेत. त्याचा मी अनुभव एकदा-दोनदा घेतला होता. पुण्यात पूर्वी २०११ मध्ये शुभा मुदगल यांच्या बाजा गाजा या संगीत कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून आले होते आणि त्यांनी संगीत विषयावर भाषण केले होते. त्यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर त्यांच्या वैचारीकतेची आणखीनच प्रचीती येते.

या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या ४३-४५ वर्षापर्यंतचा लेखाजोखा मांडला आहे. तसे पाहिले तर अजून अर्धे अधिक त्यांचे आयुष्य अजून आत्मचरित्र स्वरूपात यायचे आहे. पण त्यांची एकूण जडणघडण कशी झाली हे वाचकांना बऱ्यापैकी समजू शकते. इन मीन १०-११ प्रकरणातून, साधारण ३०० पानांच्या या चरित्रात सुरुवातीला अर्थातच त्यांनी स्वतःच्या जन्माची कथा, आई वडील यांच्या बद्दल सांगितले आहेत. त्यांच्या आई बद्दल वाचून तर धक्काच बसतो, काळाच्या पुढचे आचार-विचार. गिरीश कर्नाड हे कर्नाटकातील, कन्नड मधून बोलणारे, लिहिणारे असले तरी त्यांचे त्यांचे कुटुंब हे कर्नाटकाच्या कोकण भागातील(करावळी) भागातील गौड सारस्वत ब्राम्हण. तेथे मराठीचा, कोकणीचा अंमल. पण कर्नाटकात वास्तव्य म्हणून कन्नड संस्कार झाले. या समाजाच्या इतिहासाबद्द्ल, आजची स्थिती, वैशिष्ट्ये याबदल देखील ठिकठिकाणी त्यांनी माहिती दिली आहे, ती मनोरंजक आहे.

Girish Karnad autobiography

शिरसी मधील त्यांचे बालपण यांचे पुढे वर्णन येते. शिरसी म्हणजे कर्नाटकातील घाटमाथ्यावरील प्रदेश, घनदाट जंगल, निसर्ग यांनी वेढलेला. मी पाहिलेला आहे तो प्रदेश. तेथील वास्तव्यात आजूबाजूला असलेला ख्रिश्चन समाजाचे संस्कार झाले त्यांच्यावर झाले. घरात नाटकाचे प्रेम आधीपासूनच. १९४५-४८ मध्ये शिरसीमध्ये येणाऱ्या नाटक मंडळीतर्फे लागणारी त्यांना बरीच नाटके पाहायला मिळाली. या सगळ्या संस्कारांची परिणीती ययाती मधील पौराणिक पात्रे उभी करताना झाली असे त्यांनी नमूद केले आहे. १९५२ मध्ये त्यांचे कुटुंब शिरसीहून धारवाडला आले. ‘धारवाड: एक्कावन्न घरं’ या नावाच्या प्रकरणातून त्यांनी ह्या कोकणी लोकांची धारवाडच्या वेशीबाहेर टेकडीच्या आसपास कशी घरे होती, आणि तेथील वातावरण कसे होते हे सांगितले आहे. पुढील आणखी एका प्रकरणात धारवाडचे वास्तव्य, कॉलेज जीवन यांचे विवरण येते.त्यावेळी धारवाड आणि इतर जिल्हे जसे की विजापूर, बेळगाव, कारवार हे मुंबई कर्नाटक म्हणून ओळखले जायचे आणि ते मुंबई प्रांताचा भाग होते. ह्या उत्तर कर्नाटकातील भागाचा मैसूर कर्नाटकाशी संस्कृतीच्या दृष्टीने विशेष संबंध नसे. हे सर्व माझ्या अमीरबाई कर्नाटकी ह्या पुस्तकात देखील आले आहे. वरदराज हुईलगोळ(कन्नड मधील प्रसिद्ध नाटककार नारायण हुईलगोळ यांचे पुत्र), वि. कृ. गोकाक, आद्य रंगचार्य श्रीरंग, बेंद्रे इत्यादी महान लेखक, कवी, नाटककार यांची ओळख, परिचय कर्नाटक कॉलेज मध्ये झाला. गोकाक यांच्या कडून इंग्रजी साहित्य शिकायला मिळाले. धारवाड मधील प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था जी. बी. जोशी यांची मनोहर ग्रंथमाला, तेथे जमणारी साहित्यिकांची टोळकी या सगळ्यांचा त्यांना अनुभव मिळाला.

पुढील प्रकरणात गिरीश कर्नाड आपले मुंबईचे दिवस कसे होते याबद्दल लिहितात. मुंबई विद्यापीठातून शिकत असताना, माहीमला सारस्वत मंडळींच्या कंपूत राहतानाचे अनुभव ते मांडतात. मुंबई विद्यापीठाच्या आसपासचा परिसर ज्यात पुस्तकाची दुकाने, प्रदर्शने, नाटकं, सिनेमे, हॉटेल्स, त्यातच इराणी हॉटेल्सचे वातावरण,  या सर्वांमुळे विविध अनुभव घेत ते मोठे होत गेले. भारतीय नाटकांच्या दृष्टीने तो संकामणाचा काळ होता. पुढे त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्डला गेले, त्याची कथा येते. तेथे जायच्या आधी, आणि एम् ए संपायच्या आधीच, त्यांनी ययाती हे प्रसिद्ध नाटक कन्नड मध्ये कसे लिहिले याची कथा देखील मनोरंजक आहे.

१९६० मध्ये ते इंग्लंडला उच्चशिक्षणासाठी जहाजाने गेले. तोही तीन आठवडे प्रवासाचा अनुभव आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. विश्राम बेडेकर यांची रणांगण ही कादंबरी, अनंत काणेकर यांनी सोव्हिएत रशिया आणि इंग्लंड केलेला जहाज प्रवास, जो धुक्यातून लाल ताऱ्याकडे या पुस्तकात आला आहे. कार्नाड यांनी केलेले जहाजावरील अनुभवांचे वर्णन या दोनही पुस्तकांच्या धर्तीचे आहे. भारत सोडून गेल्यावर एकदम संस्कृती, आचार, विचार, स्त्री-पुरुष संबंध यातील आलेला मोकळे-ढाकाळेपणा या सर्वांचा अनुभव, त्यांनी कसा दोन्ही हातांनी स्वीकारला हे समजते. ऑक्सफर्डमध्ये त्यांनी तीन वर्षे काढली. मी लंडनला गेलो आहे, पण ऑक्सफर्डला काही गेलेलो नाही. त्यामुळे हे त्यांचे सविस्तर केलेले वर्णन मस्त भावते. निसर्ग, हॉस्टेलचे वातावरण, पाश्चात्य संगीत, May Morning, Magdalen College या जुन्या कॉलेजच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी तेथे Philosophy, Politics, Economics मध्ये बी. ए. केले. ब्रिटीश विद्यापिठीय संस्कृती, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज ही जवळच असलेल्या दोनही जुन्या विद्यापीठातून असलेला एकच अभ्यासक्रम(ऑक्सब्रिज), तेथील विद्यार्थ्यांमध्ये असलेली वर्गव्यवस्था यांचे वर्णन आले आहे. आजकाल मुलं(साधारण गेल्या ३०-३५ वर्षांपासून) अमेरिकेत पुढे शिकायला जातात, पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या मागे पुढे त्यावेळेस इंग्लंड(६०-७० वर्षांपूर्वी) हे प्रमुख आकर्षण होते.

तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात, तेथे ते बरेच फिरले. ब्रिटनच्या गावातील असलेले पब्स, जो तेथील संस्कृतीचा भाग आहे ह्याची ओळख त्यांनी विस्ताराने करून दिली आहे. त्यांचे मित्र, मैत्रिणी, प्रेम-प्रकरणे, लिव्ह-इन संबंध इत्यादी बद्दल मोकळेपणाने लिहिले आहे. पुढे ते Oxford Union ह्या संस्थेचे देखील अध्यक्ष झाले. हा अनुभव त्यांना कसा समृद्ध करून गेला, त्यांची वैचारिक जडणघडण कशी झाली हे समजते. ऑक्सफर्ड मध्ये असताना लिहिलेल्या त्यांच्या तुघलक या नाटकाच्या लिखाणाची कथा सुद्धा त्यांनी सांगितली आहे. मी ययातीचे मराठी नाट्यरुपांतर पहिले, तर तुघलकचे हिंदी नाट्यरुपांतर पहिले आहे. इंग्लंड वास्तव्य संपवून १९६४ मध्ये भारतात परतले ते त्यावेळच्या मद्रासमध्ये Oxford University Press(OUP) मध्ये संपादकाची नोकरी मिळवून.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गिरीश कार्नाड म्हणजे एक अफाट व्यक्तिमत्व, आणि यांच्या भोवती जे वलय आहे, त्यामुळे हे पुस्तक हातातून सोडवत नाही, इतके ते खिळवून ठेवते आपल्याला. यापुढील भागाचा परिचय मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये करून दिला आहे.

 

सर्व काही संपल्यावर

मी गिरीश कार्नाड यांच्या आगोम्मे ईगोम्मे (Agomme Igomme) या कन्नड पुस्तकाचे मराठी मध्ये भाषांतर करतो आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. याच पुस्तकातील एका लेखाचे भाषांतर मी माझ्या एका ब्लॉग मध्ये पूर्वी केले होते. तो लेख होता नाटकाच्या उगमा संदभातील (Origin of Theatrical Arts) एका पौराणिक कथेच्या निमित्ताने. आज मी येथे या ब्लॉग वर त्यांची एक कथा जी या पुस्तकात आहे तिचे मराठी भाषांतर ब्लॉगच्या स्वरूपात आपल्यापुढे ठेवतो आहे. आशा आहे ते आपल्याला आवडेल.

१९७० मधील ही कथा आहे. प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार शिवराम कारंत यांच्या कादंबरीवर चित्रपट तयार करण्याच्या प्रक्रियेच्या निमित्ताने हि कथा गिरीश कर्नाड यांनी लिहिली आहे. हि कादंबरी मराठीत देखील आली आहे. केशवराव महागावकर यांनी याचा ‘मिटल्यानंतर’ या नावाने अनुवाद केला आहे. याची माहिती मला दया पवार यांच्या पासंग या पुस्तकातील लेखातून मिळाली. ते या कादंबरीबद्दल लेखात म्हणतात, ‘१७७ पानांच्या या कादंबरीत ६० वर्षांच्या म्हाताऱ्याचा आयुष्याच्या तो मेल्यानंतर रहस्यकथेसारखा लेखकाने शोध घेतला आहे….एखादं महाकाव्य उलगडत जावं आणि मनुष्य स्वभावाचे, सामाजिक परिस्थितीचे आणि विकृतीचे, समर्पणाचे विश्वदर्शन व्हावे असे वाचकाला होते. ‘ कादंबरीला मुंबईची पार्श्वभूमी आहे. 

‘अळीद मेले'(अर्थ: सर्व काही संपल्यावर)

माझ्याकडे पाहत असलेल्या रिझवीच्या डोळ्यात मला मिश्कील भाव जाणवले. रिझवीच्या ते लक्षात आले असावे. त्याच्या त्या स्मित हस्यामागील कारण मी विचारेन की काय असे वाटून, बहुधा त्याने आपली नजर दुसरीकडे फिरवली आणि दिग्दर्शनाच्या कामात मग्न झाला. काही वेळानंतर त्याने त्याचे ते मिश्कील भाव ‘स्वीच ऑफ’ करून गंभीरपणे तो म्हणाला, ‘डायलॉग रेडी आहेत का रे? उर्दू फार कठीण वाटत असेल तर मला सांगा’

ही रिझवीची पद्धत होती: एखादी महत्वाची बातमी सांगायची असल्यास, त्याचे ते अर्थपूर्ण आणि सूचक मौन, ‘मला…’, अशी उद्वेग्पूर्ण दीर्घ पूर्वपीठिका असे. त्यानंतर शब्दाच्या अथवा वाक्यांच्या मध्ये श्वास न घेता, भडभडा बोलून टाकायचा. शिवराम कारंत यांच्याकडून पहिले पत्र आल्यादिवशी तर त्याचा हा सर्व अवतार एक डोकेदुखीच झाली होती. आता, आज त्याचा उत्साह पाहून त्या मागचे काय कारण असावे हे जाणून घेण्यास थोडी वाट पहावी लागणार हे मी ताडले होते.

‘लंच ब्रेक’ मध्ये आम्ही सर्व जेवताना त्याने घरून आणलेला मटण दो प्याजा माझ्या आणि भूषणच्या ताटात वाढला आणि म्हणाला, ‘हे घ्या, गिरीश, माझ्या बायकोने केले आहे. “अळीद मेले” ला फायनान्स मिळाले आहे. आता काम सुरु. डब्यात काही ठेवायचं नाही हं, नाही तर ही आकाश-पाताळ एक करते. भूषण, तुम्ही हे संपवून टाका’ असे तो सगळे एका दमात बोलून गेला.त्याच्या ह्या तोऱ्याला बळी न पडता त्याचे मी अभिनंदन केले.

‘अभिनंदन! मार्व्हलस!’ रिझवी खुश झाला.

‘के. पी. प्रोडक्शनने होकार दिला आहे. म्हणजे आता शूटिंगची तयारी करायला पाहिजे. गम्मत अशी आहे की ह्या वेळेस कारांताकडूनही पत्र आले आहे. हे शेड्यूल संपल्यानंतर, शाली-ते कुठे आहे? शा-‘

‘शालीग्राम’

‘हो. तेच. शालीग्रामला जाऊन यावे लागेल. त्यांनी मला बोलावले नाहीये, मीच त्यांना म्हणालो होतो की मी येवून भेटेन असे.’

‘रिझवीजी, कारंत हे सहजगत्या तृप्त होणारे गृहस्थ नाहीत. तुम्ही म्हणाल त्यावर ते माना डोलावतील, होकार भरतील असे समजून घेऊ नका. मीच स्क्रिप्ट लिहितो असेसुद्धा म्हणतील.’

‘असे का वाटते? त्यांच्याकडून तीन पत्रे आली आहेत आतापर्यंत. त्यांनी त्यात काहीही अटी घातलेल्या नाहीत’, असे वाद जिंकल्याच्या अविर्भावात रिझवी बोलून गेला. ‘त्यांना भेटल्यावर त्यांचे चित्रीकरण कसे करायचे ह्याची आयडिया येईल म्हणून चाललो आहे झाले’ असे बोलून त्याने स्मित केले.

‘मला त्यांच्या बद्दल माहित आहे. तुम्ही काळजी करून नका’, तो पुढे म्हणाला.

रिझवीची कारांतांच्या प्रती किती भक्ती होती हे सांगायचे म्हणजे-‘काय कादंबरी आहे ती जनाब! आतूनच यायला हवे!’ माझ्याकडे सहेतुक नजरेने पाहत म्हणाला.

रिझवीचा मोठा भाऊ(जो आता संवाद लेखकही आहे) हा प्रसिद्ध अनुवादक आहे. त्याने कुठल्यातरी प्रकाशनासाठी ‘अळीद मेले’ कादंबरी उर्दू भाषेत भाषांतरित केली होती. रिझवीला ती वाचून वेड लागले होते.

‘गिरीश, खरे सांगायचे म्हणजे ह्या कादंबरीचा चित्रपट होईल. किती अद्भूत कथा आहे ही! असे असूनही हिंदी मध्ये कोणी वितरक त्याला हात लावील तर शपथ. सगळे हरामी लेकाचे! त्यामुळे आत्ता ही टेलीफिल्म करायला घेतली’ असे नाटकी हावभाव करून बोलला.

मी रिझवीला भेटलो ते १९९० मध्ये. तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. त्या दिवशीच टोयोटा रामरथातून सोमनाथ वरून अयोध्येला जाण्याऱ्या एल. के. अडवाणी यांना बिहार मध्ये लालू प्रसाद याने त्यांना अडवले होते.

रिझवी माझ्याकडे आलेला ते एका detective मालिकेत काम करण्याबद्दल विचारायला.पाच मिनिटात मी होकार दिला. त्यामुळे मला वाटले तो आता निघेल. पण कसले काय. इकडच्या तिकडच्या गोष्टी करत राहिला. लालू प्रसादांच्या विषयी म्हणाला, ‘मुस्लीम आणि बहुजन समाजाने एकत्र झाल्याशिवाय तरणोपाय नाही. नाहीतर हे हिंदू लोक मुस्लिमांना खाऊन टाकतील. त्याच्या कुटुंबियांनी पाकिस्तानात जावू असे सुचवल्यावर, त्यांना त्याने ‘तेथे जाऊन काय लाथा खायच्या आहेत?’ असे सांगून कसे समजावले या वर एक छोटेखानी व्याख्यानच दिले. त्याच प्रवाहात एका कन्नड कादंबरीबद्दल बोलायला त्याने सुरुवात केली. मला त्याचे उर्दू भाषांतरीत नाव माहित नव्हते. त्याला मूळ कन्नड कादंबरीचे नाव माहित नव्हते. पण थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले की तो ‘अळीद मेले’ या कारांतांच्या कादंबरीबद्दल बोलत होता. त्याच्या बद्दलचे माझे कुतूहल वाढत गेले.

कारांतांच्या घरचा पत्ता काय आहे? ते होकार देतील का? त्यांना किती रॉयल्टी द्यावी लागेल? ‘चित्रपटात कारांतांची भूमिका तुम्ही करावयास हवी. यशवंतरायच्या भूमिकेसाठी अनंत नाग’ असे त्याने घोषित केले, आणि वर प्रामाणिकपणे असे मान्य केले की detective मालिका हे निमित्त होते, ‘अळीद मेले’वरील चित्रपटासंबंधी चर्चा करणे हा मूळ हेतू होता.तिथल्या तिथे माझा कडून अनंत नाग यांना फोन करवून त्यांच्याकडूनही होकार मिळवला.

ह्या सगळ्या भानगडीत, मध्ये मध्ये शिवराम कारंत होकार देतील की नाही हा प्रश्न डोके वर कधीत होता. ज्याने कर्नाटकात कधी पाय ठेवलेला नाही, ज्याला कन्नड साहित्य, साहित्यिकाबद्दल काही माहित नाही आणि उत्तर प्रदेशातील कुठल्यातरी कोपर्‍यात असलेल्या एका खेड्यातून मुंबईला आलेल्या आणि तिसऱ्या दर्ज्याचे गल्लाभरू हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या ह्या रिझवीला चर्चा करण्यास आणि भेटण्यात कारंत होकार देतील असे मला वाटत नव्हते.

पण रिझवीच्या पत्रातून त्याची व्यक्त झालेली भक्ती आणि निर्धार पाहून, त्यांनी होकार भरला असावा. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. एक दिवस ‘तुम्ही ह्या कादंबरीवर एखादी कलात्मक चित्रपट बनवाल नाही? तसे झाले तर मी काही तरी करून फायनान्स उभा करेन’. त्या प्रश्नाला उत्तरादाखल मी म्हणालो, ‘माझा मित्र बि. व्ही. कारंत याने ‘चोमन गुडी’ हा चित्रपट बनवला आहे यावर’.

‘ओहो, पहिला आहे मी तो’

रिझवी सगळे कन्नड कलात्मक चित्रपट पाहत असे. त्यांच्यावर टिप्पण्या तयार करत असे. त्यात त्याला रुची होती म्हणून नव्हे तर, ‘अळीद मेले’ चित्रपटासाठी काही कल्पना सुचतील का ते तो शोधात होता. ‘घटश्राद्ध’ पहिल्याच्या दिवशी तर उत्साहात त्याने फोन केला.

‘गिरीश,ब्राह्मणात विधवा स्त्रियांचे मुंडण करतात. आपल्या चित्रपटातही असण्याऱ्या दोन विधवांचे डोके मुंडण करायला हवे.’

‘जाऊ दे, ते अवघड आहे. आपला हिंदी प्रेक्षकाना ते रुचणार नाही’, मी म्हणालो.

तो उत्तरला, ‘त्या ‘घटश्राद्ध’ मध्ये विधवा मुलीचे केस कापलेले होते की, अशी authenticity हवी’

माझ्या उत्तरात त्याला रस नव्हता. ‘कोण सिनिअर हिंदी अभिनेत्री असे केस कापून घेईल’ असे म्हणून फोन ठेवून टाकला.

ब्राम्हण विधवा कशी असावी हा प्रश्न रिझवीच्या दृष्टीने फक्त अभिनेत्री कोण असावी एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. तो त्याच्या टेलीफिल्मचा आत्मा होता, कारण कादंबरीच्या मध्यावर पोहचल्यावर रिझवी परत परत त्याच विषयाकडे येत असे.

‘काय प्रसंग आहे तो! कारंत त्या गावी येतात. त्यांच्या मित्राच्या म्हणजे यशवंतराय यांच्या मानलेल्या आईला पहिले. त्या वृद्धेच्या इच्छेखातर मंदिराचा जीर्णोद्धार करतात. त्याचा परिणाम असा होतो की एकमेकांच्या वारी असलेल्या त्या एकाच गावातल्या दोन वृद्ध स्त्रिया परत एकत्र येतात! लाजवाब!’ रिझवीचा स्वर गदगदित होता.

हे मी अर्ध्या डझन वेळा आधी ऐकले होते. वैतागून मी म्हणलो, ‘रिझवीजी, तुम्ही कादंबरीचा पूर्वार्धच फक्त सांगता आहात. अजून बरेच कथानक आहे, बरीच पात्र पुढे इत. कारंत यशवंतरायच्या पत्नी, मुलांना सुद्धा भेटतात. त्याच्या बद्दल तुम्ही काही बोलतच नाही की!-‘

रिझवी माझ्याकडे एकदा कटाक्ष टाकून, आणि डोके खाजवून, ‘अब्दुल-‘ अशी हाक मारतो. Production Manager आल्यावर त्याला बरेच काहीबाही बोलतो. मी, भूषण तेथे आहेत हे तो विसरून गेलेला असतो. त्यानंतर भूषणकडे वळून, ‘तुम्हाला ती कथा माहीत आहे का? यशवंत राय नावाची व्यक्ती एकट्यानेच जीवन जगून, आप्त मित्र नसलेल्या जागी, मरून जातो. कारांताना अस्थी विसर्जन करण्याची विनंती करतो. ते काही त्याचे मित्र नव्हते. असे असून सुद्धा ते यशवंतरायच्या कुटुंबियांचा शोध घेतात. गावी आल्यावर यशवंत राय च्या मानलेल्या आईचे, पार्वत्म्मा-‘

अचानक बोलणे थांबवून, त्याने त्याच्या पिशवीतून स्क्रिप्टचा कागद बाहेर काढला आणि भूषण समोर ठेवला.

‘ग्राफ पाहिलात का. सुरुवातीला यशवंत राय मरण पावला आहे. एकाकी, बेवारस. त्या विधवेच्या खातर, कारांतांच्या नशिबी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे आले, इतर पत्रे आहेत, कुठेतरी adjust करू. पण चित्रपटाचा केंद्रबिंदू तो आहे, भूषण. मंदिराचा जीर्णोद्धार. मनुष्याच्या spiritual जागृतीचा सिम्बॉल.’

नंतर माझ्याकडे पाहून तो म्हणाला, ‘आपल्या फिल्मचा शेवटचा सीन. Imagine करा. त्या मोडक्या तोडक्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. दोन वृद्ध स्त्रिया एकमेकांना बिलगून अश्रू ढाळीत आहेत. तुम्ही-म्हणजे कारंत-गाव सोडून जात आहात, आणि सहज मागे वळून पाहत आहा. तुमचा मित्र यशवंत राय हा नास्तिक आहे. तुम्ही सुद्धा नास्तिकच. मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुमचे जीवन कृतार्थ झाले! तुमच्या डोळ्यातही अश्रू. मित्राच्या प्रती कृतकृत्य झाल्याची भावना. काय वाटते भूषणजी? कसा आहे क्लायम्याक्स?’

‘तुम्हाला माझा खरेच माझा अभिप्राय हवा असेल तर सांगतो’, भूषण कुठल्याही नटाने दिले असते ते उत्तर देतो. ‘तुम्ही ह्या वेळेला पुढच्या भागाचे पैसे देणार असेल तर ठिक आहे. यशवंत रायाच्या भूमिकेसाठी मीच योग्य आहे!’

रिझवी जोरात हसला. तोच signal समजून सहनिर्देशकही आला आणि म्हणाला, ‘लायटिंग रेडी आहे’. रिझवीने ती स्क्रिप्ट पिशवीत कोंबत, ‘पहिला शॉट तुमचा, भूषणजी’ असे म्हणत, त्या सहनिर्देशकाकडे न पाहता निघून गेला.

‘खूप बोलतो हा’, असे मान हलवत म्हणाला, ‘मी याच्या चित्रपटात काम करण्याचे कारण म्हणजे त्याच्या बायकोने बनवलेले नॉन-व्हेज जेवण!’ आणि, मेकअप रूम कडे निघून गेला.

पुढे पंधरा दिवसातच रिझवीचा मृत्यू झाला.

मी सिंगापुरात चित्रीकरणासाठी गेलो होतो. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणाला, ‘चित्रीकरण काश्मीर मध्ये व्हायला हवे होते. पण काय करणार, काश्मीर मध्ये अतिरेकी. काशिमीर गुंडांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या मुळे स्वित्झर्लंड, सिंगापूरला जावे लागते. या देशाला सध्या, त्या अतिक्रेकीना नीट धडा शिकवणारे सरकार हवे आहे’ असे म्हणून, ह्या अतिरेक्यांमुळे त्याच्या चित्रपटाला झाल पोहचत आहे असे सुचवून पुढे म्हणाला, ‘आपल्या स्टार्सनादेखील तेच हवे आहे! स्वित्झर्लंड, सिंगापूर! इंडस्ट्री ची चिंता कोणाला आहे?’

परत आलो तेव्हा अयोध्या प्रकरण झाले होते. राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनंतनागला फोन केला, त्याने वेगळीच माहिती दिली.

‘रिझवी बेंगळुरूमध्ये येऊन मला भेटून गेला होता. अडवान्स पैसेही दिले. न थांबता बोलत होता. त्याच रात्री शिवराम कारंत यांना भेटण्यास उडुपीची बस पकडून गेला. मुलकी जवळ अपघात झाला, आणि डोक्यावर ट्रंक पडून त्याचा मृत्यू झाला असे कळले. अख्ख्या बसमध्ये तो फक्त मरण पावला म्हणे. त्याचा प्रेत तीन दिवस तेथेच पडले होते!’

मी त्या दिवशी संध्याकाळी रिझवीच्या घरी गेलो. बंद्र्यापासून पालीहिल ला जाताना कोपऱ्यावरील एका गल्लीत त्याचे जुनेसे घर होते. रिझवी १९६० च्या सुमारास मुंबईला आला तेव्हा त्याने ते घर भाड्याने घेतले होते. आता त्या घराची किमत गगनाला भिडली आहे. घरमालकाने घर खाली करण्यासाठी तगदा लावला होता. बदल्यात प्रशस्त सदनिका देतो असे म्हणत होता, पण रिझवी त्याला दाद देत नव्हता.

‘घर म्हजे घर पाहिजे. सदनिका नाही’, असे म्हणत वाद घालत असे.

रिझवीची पत्नी बाहेर येवून सोफ्यावर एका कोपऱ्यात बसली. काहीच बोलली नाही. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. त्यांची मुलगी कोठेतरी बाहेर गेली असावी. मुलगा याकुब हसन, वय २०-२२ असेल. त्याने एक तांब्या भरून पाणी आणून माझ्यासमोर ठेवले आणि त्याने माहिती दिली.

अपघातात रिझवी मरण पावला. त्याच्या पाकिटातील पत्ता वाचून मुलकीच्या पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा त्याचा भाऊ, ज्याने ‘अळीद मेले’चा अनुवाद केला होता, उडपीला निघाला. तितक्यात तेथे काही मुस्लिमांना ही गोष्ट कळली, की कोणी मुस्लीम व्यक्ती मरण पावली आहे. त्यांनी दफन करण्यासाठी मृतदेह मागितला. पण त्यांचा भाऊ येईपर्यंत पोलिसांना काही करता येत नव्हते. त्यामुळे मृतदेह तीन दिवस तसाच बेवारस पडला होता. मुलकी गावापर्यंत जाऊनही त्यांच्या भाऊ कारंत यांना न भेटता परत आला.

याकुब सावकाश बोलत होता. त्याच्या बोलण्यात बापासारखी घिसाडघाई नव्हती.त्याचे चेहरा आई सारखा होता-गोल चेहरा आणि पसरट तोंड. त्याचे बसणेदेखील रिझवी सारखे नव्हते.

‘अंकल, तुमची मला एक मदत हवी होती’, तो म्हणाला. ‘या फिल्मसाठी त्यांनी फायनान्स घेतला होता, एक लाख अडवान्स घेवून, तो खर्च केला आहे. आता आपण ती फिल्म पूर्ण करूयात’

रिझवी असे स्पष्ट, संक्षिप्त बोलला नसता. त्याची काहीही लक्षणे मुळात नव्हती. कशामुळे तरी मन विषण्ण झाले.

‘बजेट किती असेल याचा काही करार झाला होता का?’, मी विचारले.

‘दाखवतो’, असे म्हणत तो उठून आत गेला.

त्यानंतर रिझवीची पत्नी बोलू लागली.

‘मुलीचे वय झाले आहे, लग्न केले पाहिजे. त्यासाठी मी त्यांच्या मागे लागले होते. पण हा कन्नड चित्रपट झाला तर त्यातून लग्नाचा खर्च भागेल असे म्हणत. तीस वर्षापासून ह्या industry मध्ये काम करून काय मिळवले? कसे तरी घर चालले, भागले. मुलीच्या लग्नासाठी हवे तेवढे पैसे बाजूला राहिलेच नाहीत. हा सिनेमा झाल्यावर हाती बरेच पैसे राहतील असे म्हणत होते’ आणि बोलायचे थांबली. काही वेळाने उद्वेगाने, ‘असे त्यांचे बोलणे एकूण एकूण मी निराश होत असे. आता तर तेच निघून गेले’ म्हणाली.

भाभीजी माझ्याकडून जेवढे होईल तेवढे करेन’, असे म्हणालो.

याकुब फाईल घेवून आला. त्यातील हिशोब पाहून मी स्तंभित झालो. दोन तासाची टेलिफिल्म सोळा मिमी निगेटिव्ह वापरून चित्रीकरण करायचे होते. ते अकरा लाखात होईल असे रिझवीने मान्य केले होते. कोठे तरी काही तरी चुकले असावे असे मला वाटत होते, म्हणून मी तो हिशोब पुन्हा पुन्हा तपासून पाहत होतो. काहीच हाती लागले नाही. उलट दोन गाणी ही त्यात होतील असे रिझवीने कबुल केल्याचे समजले.

‘याकुब, के. पी. प्रोडक्शन यांच्याबरोबर एकदा बोलायला हवे’

‘मी त्यांचा नंबर देतो. मी ही यायला हवे का?’ मला त्यातले काही कळत नाही. पप्पा कधी मला शुटींग जवळ फिरकूही देत नसत’, याकुब उत्तरला.

‘आता शिक’, मी म्हणालो.

रिझवीची पत्नी मान करून मुलाकडे पाहू लागली. मी विचारले, ‘तुम्हाला काही हरकत नाही ना?’

ती म्हणाली, ‘रुकसानाचे लग्न व्हायचे आहे ना, अजून एकदा प्रयत्न करायला हरकत नाही’

‘अंकल, कादंबरी लेखकालाही कळवायला हवे नं’

‘ते मी पाहून घेतो’, मी म्हणालो.

त्याच दिवशी शिवराम कारंत यांना फोन केला. ‘मला काही हरकत नाही. मी आधीच अनुमती दिली आहे. रिझवीच्या कुटुंबियांनी हे काम पुढे नेल्यास आणि दुसऱ्या कोणी दिग्दर्शकाने केल्यास काही हरकत नाही’, ते म्हणाले.

त्यानंतर के. पी. प्रोडक्शन यांच्या बरोबर भेटण्याची वेळ ठरवली.

जीवन चक्र फिरण्यास सुरुवात झाली होती. यशवंत रायासारखाच रिझवी, आपल्या आप्त-मित्रांपासून दूर ऐकतात मरण पावला होता. त्याच्या विधवेच्या मनोरथ पूर्ण व्हावयाचे होते. वास्तवातही मी शिवराम कारंत यांचे कादंबरीतील भूमिका वठवत होतो.

रौप्य, सुवर्ण महोत्सव साजरे केल्याचे फोटो, चांदीचा, सोन्याचा गिलावा दिलेल्या ट्रॉफीज, त्याच्या मागे लपलेले प्लास्टिक ट्रॉफी असे सर्व मांडून ठेवेले होते. अर्धनग्न नायक-नायिकांच्या पोस्टरच्या मधोमध ओमकाराचे चिन्ह, त्रिशूल आणि ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा दिसत होती. हे याकुबच्या लक्षात आले की नाही कळले नाही.

‘बजेट वाढवायचा प्रश्नच नाही. इम्पोसिबल!’ के. पी. प्रोडक्शनचे कैलाश प्रसादने आपली असमर्थता नमूद करून दोन्ही हात पसरले.

‘अकरा लाखात फिल्म होणार नव्हती तर त्याने मान्यच का केले?’

दीनपणे याकुब माझ्याकडे पाहत होता.

‘मला माहीत नाही’, असे मी म्हणालो खरा, पण मला काय कारण असावे हे समजून चुकले होते.

ह्या धूर्त आणि व्यवहारात पक्का असलेल्या कैलाशने रिझवीच्या असहायतेचा फायदा घेतला होता. रिझवीला ही टेलिफिल्म काहीही करून करायची होती. त्यामुळे मुलीचे लग्नही त्याने पुढे ढकलेले होते. लग्नाचा खर्च निघेल असे पत्नीला खोटे सांगितले होते. रिझवीचा उत्साह पाहून, तो कुठल्याही बजेटला तयार होईल हे कैलाश प्रसादने ताडले होते. रिझवीने, याउपर ३-४ लाखाचे कर्ज घेतले होते-वैयक्तिक कर्ज. याचा अर्थ मुलीचे लग्न आणखी लांबणीवर पडणार होते.

मी उठलो.

‘अकरा लाखात फिल्म होवू शकत नाही. क्षमा करा. आम्ही येतो. चल याकुब’.

‘असे असेल तर मी दिलेल्या अडवान्स चे काय?’

‘ते रिझवीने स्वतः खर्च केले नाहीत. फिल्मसाठी काम करणाऱ्याना दिले आहेत. मलाही दिले आहेत. विचार करून सांगा, नाही तर ते पैसे गेले समजा. अठरा लाखात मी करून देतो’

मी सोळा म्हणार होतो. लग्नासाठी २ लाख त्यात वाढवले. पण हे इथेच संपणार नाही हे माहीत होते.

याकुब दिग्मूढ झाला होता. कैलाश प्रसादने केलेल्या अन्यायामुळे विव्हळत झाला होता. मी स्क्रिप्ट आणि बजेटची फाईल त्याच्या हातात सोपवून म्हणालो, ‘तो खादिम जर हो म्हणाला तर ठीक. नाहीतर बहिणीच्या लग्नासाठी दुसरीकडून व्यवस्था कर. अकरा लाखात फिल्म करण्याच्या भानगडीत पडू नकोस.’

मी रिक्षा पकडून घरी निघालो. रिझवीच्या मूर्खपणाची मला कल्पना होती. नाहीतर, असा अव्यावाहीरिक उद्योगात पडलेल्या व्यक्तीला काय म्हणावे? अडमुठा? वेडा? कन्नड मध्ये त्याला समर्पक असा शब्द दिसत नाही. अरबी भाषेत-मजनू!एका कादंबरीच्या ६० पानामुळे भ्रांत झालेला मनुष्य.

६ डिसेंबर. अयोध्या येथे बाबरी मशीद पाडली गेली.

दुसऱ्याच दिवशी भूषणचा फोन आला. ‘बरे झाले, त्यांना तसाच धडा शिकावयाला हवा होता. त्याशिवाय त्यांना समजणार नाही’ असे म्हणाला.

माझे कुटुंबीय, आप्त-मित्र सर्व जण त्याच प्रमाणे मन डोलवत होते. माझा परिसर हिंसेमुळे

साधारण एक आठवड्यानंतर.

चहा पीत असताना याकुब रिझवीचा फोन आला.

‘अंकल, तुम्ही अजून अर्धा तास घरी आहात का?’

‘आहे ना, आज दुपारी शुटींग शिफ्ट…’

‘तसे असेल तर आत्ताच येतो…अर्ध्या तासात’

याकुबने फोन ठेवला. विसाव्या मिनिटाला दारावरची घंटी वाजली. दारात काही क्षणासाठी रिझवीच उभा आहे असे वाटले.

‘ये ये, बस’, असे म्हणत असतानाच एक प्रश्न सतावत होता. मागच्या वेळेला मला याकुब आणि त्याच्या वडिलांमध्ये काही साम्य दिसले नव्हते. आज मला रिझवीची का बरे आठवण आली असावी.

‘काय विशेष?’, मी विचारले.

‘थांबा जरा, अंकल. आधी तोंड गोड करा. नंतर बोलू!’ असे बोलून पिशवीतून मिठाईचा बॉक्स काढला. हसत माझ्या कडे पाहत होता. मी ते हास्य ओळखले. रिझवीचा ट्रेडमार्क होता तो!

‘मिठाई कशासाठी?’

‘आईने तुमच्या साठी पाठवली आहे. ही हैदराबादी स्पेशल मिठाई आहे. शाही तुकडा. तुम्ही तो खाल्यानंतर बोलायचे असे तिने मला सांगितले आहे.’

शाही तुकडा गोड होता. मी विचारले, ‘काय बहिणीचे लग्न ठरले की काय?’

‘नाही, पण आता ते ठरेल हे नक्की’

‘म्हणजे?’

‘अंकल, के. पी. प्रोडक्शनने “अळीद मेले” साठी सतरा लाख देण्याचे कबुल केले आहे. कालच संध्याकाळी फोन आलेला’

एका मागोमाग शब्द आले. मी काही बोललो नाही.

‘लवकरात लवकर सुरु करा असे ते म्हणाले’

‘याकुब, ते आता शक्य नाही’

बापासारखेच मुलानेही मी काय म्हणतोय याकडे लक्ष न देता पुढे म्हणाला, ‘तुमची कमिटमेंट आहे हे मी त्यांना सांगून टाकले आहे’

‘याकुब, मी ही फिल्म करत नाही आहे’

ह्या वेळेला त्याच्यापर्यंत माझे म्हणणे गेले. तो ते ऐकून हडबडला. इतका वेळ उभा असलेला, मटकन खुर्ची वर अर्धवट हसत बसला.

‘का अंकल? तुम्ही आधी हो म्हणाला होता ना. ते सतरा म्हणतात, पण जर अठराच हवे असतील तर…’

त्याचा आवाज खाली आला होता. उत्कर्षाच्या उंबरठ्यावर उभे राहून, भविष्याविषयी ऐकून ऐकून दमलेल्या त्याच्या आई सारखा त्याचा आवाज झाला होता.

ह्याला काय सांगावे बरे. मी विचारात पडलो.

‘हे पहा, तुझ्या वडिलांना ही कथा अतिशय आवडली होती म्हणून. चित्रपटाच्या शेवटी मंदिराचा जीर्णोद्धार आहे म्हणून.ते त्याच्या दृष्टीने मानवीयतेचे प्रतिक वाटले म्हणून. आता ‘मंदिर बांधा’, मंदिरचा पुनरुद्धार करा’ ह्या घोषणेचा अर्थच बदलला आहे.

‘म्हणजे?’

याकुब समजून घेण्याचा प्रयत्न करत होता की दुसरयाच विचारात गढलेला होता हे समजले नाही.

‘बाबरी मशीद पडून तेथे आता मंदिर बांधायचे आहे असे चालले आहे, तुला माहीत नाही का ते?’

‘ते कोणाला माहीत नाही, अंकल, त्याच्याशी ह्याचा आणि तुमचा काय संबंध?’

मी उठून खिडकीपाशी गेलो आणि बाहेर पाहू लागलो. असे करायला नको असे वाटून गेले. टेलीव्हिजनवर प्रत्येक मालिकेत घरातील ज्येष्ठ व्यक्ती असेच उठून खिडकीतून बाहेर पाहू लागते.

‘संबंध आहे, सगळीकडे तो येतो. अयोध्ये मधील विध्वन्सानातरची निर्माणाची कल्पना भ्रष्ट होते आहे. त्या विध्वंसात एक अनाथ शव तसेच पडले आहे-हिंदू संस्कृतीचे’, मी आरंभिले.

मेलोड्रामाटिक न होता, माझे म्हणणे पूर्ण करावे म्हणून, मी पुढे बोलू लागलो, ‘माझ्याकडून तर ही फिल्म शक्य नाही’.

याकुब माझ्याकडे पाहतच राहिला.

मी रिझवी सारखा बोलू लागलो, विचार करू लागलो की काय असा मला भास झाला. मुख्य विषय सोडून वेगळेच, पाल्हाळ लावतोय की काय असे वाटू लागले. बाबरी मशीद विध्वंसासारखी घटना काहीही परिणाम न करता विलग राहू शकत नाही. ती आपली संस्कृती कलुषित केल्याशिवाय राहत नाही. ३० वर्षापूर्वी लिहिली गेलेली कन्नड साहित्यकृतीही त्यातून बचावू शकत नाही-इत्यादी.

‘अंकल’, याकुब बोलू लागला, पण थोडा थांबला. ‘मी हे सांगणार नव्हतो, पण सांगतो आता. ही फिल्म झाली तर माझ्या बहिणीचे लग्न होईल. तुम्ही हा चित्रपट डायरेक्ट करण्यास होकार दिला यामुळे, मी सांगू नये, पण, माझे सर्व कुटुंब तुमचे किती आभारी आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे’

काही क्षण मी थांबून, बोलून गेलो, ‘आता तुम्ही पाहून घ्या’

ह्याला मी कसे समजावू. उद्या हा चित्रपट टेलीव्हिजन आल्यावर सर्वाना हेच वाटणार की मी कन्नड मधील ह्या कादंबरीचा उपयोग ह्या अशा लज्जास्पद घटनेच्या समर्थनासाठी करतोय. त्यांना कुठे समजणार आहे की रिझवी साठी, ह्याच्या बहिणीच्या लग्नासाठी हा खटाटोप केला आहे ते.

‘बाबरी मशीदच फक्त पुसून गेली नाही, याकुब. त्याबरोबर, तुझ्या वडिलांचे स्वप्नही विखुरले गेले’, असे सांगायचे होते, पण न सांगताच सांगून मी बाहेर पाहू लागलो.

बराच वेळ शांतता होती. कोणीच बोलले नाही.

‘तुमची मर्जी’, असे म्हणत याकुब उठला. ‘तुम्हाला भीडेस पाडणे मी करणे बरोबर नाही’

मी किती वेळा तेच तेच सांगू? अथवा न सांगताच जे सांगायचे आहे ते किती वेळा सांगू?

‘ठिक आहे, येतो मी आता’, असे म्हणत तो दरवाज्याकडे गेला.

मेजावर मिठाईचा बॉक्स होता, त्याच्या बाजूला फिल्मची स्क्रिप्ट होती.

‘याकुब, ते घेवून जा’, मेजाकडे बोट दाखवत मी म्हणालो.

‘ते आईने तुमच्यासाठीच स्पेशल पाठवले होते’

मी हडबडून म्हणालो, ‘मिठाई नाही, स्क्रिप्ट’

याकुब माझ्याकडे पाहू लागला. क्षणासाठी त्याच्या डोळ्यात मला आनंद दिसला.

‘राहू दे, त्याचा काय उपयोग आता आम्हाला? येतो मी’, असे म्हणत निघून गेला.

[पूर्व-प्रकाशित: कन्नड प्रभा दिवाळी अंक १९९७]

Origin of theatrical arts

The 96th edition of Akhil Bhartiya Marathi Natyasammelan(अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन) was held in Thane near Mumbai last month. Last year, it was at Belgavi in Karnataka, where it took place after 58 years. I thought of sharing an article on origins of theatrical arts as found in Natyashastra. This article is part of Kannada book Agomme Igomme which I am translating, authored by famous playwright Girish Karnad. Hope you find this interesting. I had shared another interesting article(translated) on state of Marathi theater on the occasion of last year’s Marathi Theater Day.

नाट्य-उत्पत्ती, नाट्य धर्म

भरताच्या नाट्यशास्त्राच्या पहिल्या अध्यायात नाट्यकलेच्या जन्मासंबंधी अशी कथा येते:

पूर्वीच्या काळी, कृतयुग संपून त्रेतायुग सुरु झाल्यानंतर, समाज हा चंगळवादी होवू लागला, इर्षा, क्रोध कामवासना वाढीस लागली, आणि एकूणच अराजक पसरू लागले, आणि त्यामुळे सुखात देखील लोक दुखी राहू लागले.

हे जाणल्यावर, देव-देवतानी इंद्राला हाताशी धरून ब्रम्ह्देवाकडे गेले. त्यांना परिस्थिती समजावून अशी विनंती केली, ह्या समस्येवर उतारा म्हणून समाजाला एक मनोरंजनाचे साधन देण्याची विनंती केली. हे साधन दृश्य आणि श्राव्य स्वरूपात हवे, तसेच समाजातील सर्व थरातील लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल असे पाचवा वेद निर्माण करावे असे त्यांनी ब्रम्हाजवळ त्यांनी आपले म्हणणे मांडले. त्यांचे म्हणण्यानुसार ब्रम्हदेवाने चारही वेदामधून काही विशिष्ट भाग संकलित करून त्यांना हवा होता तसा पाचवा वेद निर्माण केला.

ब्रम्हदेवाने इंद्राला देवतांना हे नाट्यवेद सोपव असे सांगितल्यावर, त्याने देवतांची योग्यता नसल्याचे सांगून, फक्त ऋषि-मुनी(मनुष्य) हे घेवून त्याचा उपयोग करू शकतील अशी खोटी घातली. त्याप्रमाणे, हा नाट्यवेद पृथ्वीवर भरत मुनीकडे सोपवला गेला. भरत मुनीने त्याच्या शंभर पुत्रांना हा वेद शिकवला, त्याचे तंत्र शिकवले. नाट्यशास्त्रातील लास्य प्रकटित करण्यास स्त्री हवी असल्याने, ब्रम्हदेवाने अप्सरा निर्माण करून दिल्या. नारद हे पहिले वाहिले संगीतकार म्हणून भरत मुनिपाशी आले. विविध देवतांनी सुद्धा आपले आशीर्वाद त्यांना दिले. अशा प्रकारे त्या सगळ्यांनी मिळून इंद्राच्या विजयोत्सवाच्या निमित्ताने एका नाटक बसवले, ज्याचा विषयच मुळी इंद्राच्या नेतृत्वाखाली असुरांवर सुरांनी मिळवलेला विजय असा होता. ते नाटक गडबड-गोंधळ-अंगांग-विच्छेद यांनी पुरेपूर भरलेले होते. हे सर्व पाहून, ब्रम्हदेव संतुष्ट झाले. त्यांनी देवता-गण, भरत मुनी आणि त्याच्या चमूला आशीर्वाद दिले.

प्रेक्षकात बसलेले दैत्य-गण मात्र, देवतांनी नाटकात असुरावर मात केकेल्याचे दृश्य पाहून क्षुब्ध झाले. हे असले नाटक थांबवले पाहिजे असा निश्चय केला. नाटकाच्या संवादफेकी मध्ये, एकूणच प्रयोगात त्यांनी आपल्या मायावी शक्तीने अडथळे आणून ते थांबवले. असुरांचे हे वर्तन पाहून इंद्र क्रोधित झाला. त्याने असुरांवर त्याच्या ध्वजदंडाच्या साह्याने प्रहार करून, त्यांचा जर्जर केले, आणि परत प्रयोग सुरु झाला. पण हे असे परत परत होवू लागले, प्रयोगात विघ्न येत राहिले. हे सर्व पाहून ब्रम्हदेवाने विश्वाकार्म्याला सांगून एक नाट्यगृह बांधून घेतले. पण त्याच्याही विशेष उपयोग झाला नाही.

शेवटी ब्रम्हदेवाने असुरांची भेट घेतली. त्यांना नाट्य-कर्माचे निज-स्वरूप समजावून सांगितले: ‘तुम्ही कोपित होण्याची अथवा दुखी होण्याची आवश्यकता नाही. नाटकात तुमच्यात आणि देवतांमध्ये भेदाभेद नाही. त्यात त्रिलोकात असलेल्या सर्व अवस्थांचे, भावभावनांचे चित्रण आहे, काही ठिकाणी धर्म, क्रीडा, अर्थ, शांती, तर काही ठिकाणी युद्ध, काम, संहार, असे सर्व काही नाटकाच्या सामग्रीचा भाग आहे. नाटकातून आदर्श गुणांचे-जसे इंद्रियनिग्रह, धैर्य, उत्साह, यांचे दर्शन होते’

या ठिकाणी हा अध्याय संपतो. नाटकाचे पुढचे प्रयोग यशस्वी झाले की नाही, हे ‘नाट्यशास्त्र’ सांगत नाही.

नाट्यशास्त्राचे अभ्यासकांच्या मते, ह्या अध्यायात दैत्य-गणाचे वर्तन चुकले आहे असे गृहीत धरले आहे. त्यांना नाटकाचे स्वरूपच कळाले नाही. त्यामुळे त्यांनी नाटकात वारंवार विघ्न आणला, असा मुद्दा मांडतात. असाच अर्थ असेल तर, नाटकाच्या प्रयोजानाचे सार ब्रह्मदेवाचे विचार सांगून जातात असे म्हणावे लागेल.

माझ्या मते ह्या अभ्यासकांना कथेचे आकलन नीटसे झाले आहे असे दिसत नाही.

मला आकलन झालेला काही अंश असा आहे की, दैत्य-गण, इंद्राप्रमाणे, दैहिक हिंसाचार करत नसून, त्यांनी केवळ, नटांचे संवाद, हालचाल, तसेच त्यांची स्मृतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. असे जर असेल, तर माझ्या मते दैत्याना, अभिनय कलेचे सूक्ष्मतम ज्ञान झाले होते.

त्याही पेक्षा महत्वाची बाब अशी की, ‘नाट्यशास्त्र’ हा आदीग्रंथ आहे. नाट्यकलेच्या विविध अंगाचा परिचय व्हावा ह्या दृष्टीने ते रचले गेले. त्यात रंगवलेले नाटक, हे मानवाच्या इतिहासातील पहिले नाटक आणि त्याचा पहिला प्रयोग आहे. त्यात ब्रम्हदेव, इंद्र, इतर देवता-गण, भरतमुनी, त्यांचे नाट्य-कलाकार, अप्सरा, थोर संगीतकार-नारद, या सर्वांचा सहभाग होता. असे होते तर, त्या प्रयोगास, ‘न भूतो न भाविषति’ असे यश मिळावयास हवे होते. पण तसे न होतं, प्रयोग, अर्ध्यावरच थांबला, आणि ही गोष्ट ‘नाट्यशास्त्र’ प्रामाणिकपणे मान्य करते.

असा ह्या गोष्टीचा मतितार्थ, रंगभूमीचा अनुभव नसलेले, तसेच नाटकाशी फक्त पुस्तकरुपातच संपर्क असलेल्या अभ्यासकांना, उमजलेला दिसत नाही. अथवा, असा अर्थ समजलेला असूनही, तो मान्य करण्यास संकोच वाटत असावा. कारण, संस्कृत काव्यमिमांसेच्या उत्तर-काळात लोकप्रिय असलेला अभिनवगुप्त या सारख्या पंडित, तो स्पष्टपणे सांगत नाहीत.

ब्रम्हदेवाला सुद्धा ह्या कथेचे फक्त बाह्यरूप दर्शवत असलेला अर्थ मान्य झाला नसता.

ह्या कथेचा मला समजलेला अर्थ असा आहे:

एखाद्या नाट्य-प्रयोगासाठी कितीही श्रम घेतले तरीही, कितीही श्रद्धापूर्वक तयारी केली असली तरी, तो प्रयोग यशस्वी होईलच असे सांगणे अशक्य आहे. प्रयोगाच्या प्रत्येक क्षणी, तो अयशस्वी होण्याची शक्यता असते. हेच नाट्य-क्रियेचे मर्म आहे.

एखादा नाट्य-प्रयोग रंगभूमीवर कमीत कमी एक व्यक्ती(नट) असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीने दुसऱ्या कुठल्यातरी व्यक्तीचे पात्र रंगवायला हवे आहे. हे जे सर्व घडते आहे, ते पाहण्यास तिसरी व्यक्ती(प्रेक्षक) तेथे असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टीच अनिश्चिततेने भरल्येल्या आहेत. त्या मुळे नाट्य-गृह असून सुद्धा देवतांना नाटकात येणारे विघ्न टाळता आले नाही. विघ्न उत्पन्न होतो तो दैत्यामध्ये, नट-प्रेक्षक संबंधामध्ये. असा विघ्न येताच, सहोदरही दैत्य बनतो.

आज जगात आपल्याला आढळणाऱ्या, वेग-वेगळ्या नाट्य-क्रिया, आपल्या इतिहासात पुढे मागे नव्हत्या. रेडियो, फिल्म, टेलीव्हिजन, ध्वनी-मुद्रण, विडियो, तसेच प्रत्येक दिवशी येणारे नवीन माध्यम, यामुळे आपल्या आजू-बाजूला सगळी कडे नाट्य-क्रिया आज दिसत आहे. ही सर्व माध्यमे, आज आपले मनोरंजन नक्कीच करत असतील, पण, यातील कोठल्याही प्रकारातील प्रेक्षक नाट्य-क्रियेवर प्रभाव पडू शकत नाही, त्यात बदल घडवू शकत नाही. प्रेक्षकांनी कितीही आवाज केला, कोलाहल केला, तरीसुद्धा त्या माध्यमातील नाट्य हे, प्रेक्षकांना टाळून, पुढे जात राहते. नाटकात तसे होत नाही. त्यात प्रेक्षकाचा सहभाग अत्यावश्यक असतो. नाट्य-उत्पती संबंधी ही कथा हेच सत्य सांगते.

नाटक सुरु असताना नाटककार, दिग्दर्शक, नट आणि प्रेक्षक या सर्वात एक प्रकारची हुरहुर निर्माण होते. कारण त्यातील अस्थिरता-प्रत्येक क्षणाला बदलत जाणारी परिस्थिती ही त्याप्रेक्षा स्फोटक असू शकते.

या मुळेच, कितीही काळजी घेतली, तरी रंगभूमी आपली अनिश्चितता दाखवून देते. तसेच आपण कितीही नाटकाच्या भविष्याबद्दल बोललो तरी, ति एक जिवंत कला असल्यामुळे, तिचे समाजात स्थान हे राहणार आहे, नी मात्र निर्विवाद आहे.

[मार्च १७ हा युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्थान तर्फे प्रत्येक वर्षी ‘आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा केला जातो. २००२ मध्ये साजऱ्या झालेल्या हा दिनानिमित्त त्यांनी मला संदेश देण्यास पाचारण केले. त्या निमित्त हे लिखाण केले होते]

Satyashodhak-a play in Marathi, Kannada

As mentioned few times on this blog, I have general interest in Marathi and Kannada languages interchange across all fields including literature, theater, in particular. Fortunately, I can understand both these languages and appreciate rich history of togetherness, interchange across different fields. In the field of literature, translation of books from both languages to other language has been happening for quite some time and many of them are hugely popular on both sides. Example, Kannada author Bhayrappa’s books in Marathi. I am also happy that I have contributed my own bit by translating Kannada book on Amirbai Karnataki in Marathi. The exchange can be seen in theater field also. Girish Karnad’s plays in particular are popular in Marathi. The interchange and exchange in the field of theater is happening since early days of theatrical tradition in both languages.

I was able to witness unique show this weekend-show of a Marathi play Satyashodhak on Mahatma Jyotiba Phule’s life, directed by Atul Pethe, translated in Kannada, which had come to Pune. The uniqueness is because, I had watched Marathi version also in the past. And also because, Kannada version of Marathi play has not taken place in Pune in the past, as far as my knowledge goes. More about that play below.

satyashodhak kannada

Satyashodhak in Kannada

Atul Pethe is different theater artist, with his own thoughts and uniqueness in approach. The Marathi version of the play involved workers of Pune Municipal Corporation(PMC) taking lead roles in the play. He worked with them on their acting skills, and getting them to perform to his satisfaction. The play itself is about 19th century social reformer couple Mahatma Jyotiba Phule and his wife Savaitrbai Phule. Motivated by Dalit issues addressed in the play, it was translated in Kannada also(in fact, should get translated in many other languages).There is a tradition of such plays in Kannada, particularly, by Chandrashekhar Kambar, and even by Girish Karnad with his play Hari Jannar. The Kannada version(translated by D S Chougule) was presented by M Ganesh’s Janmandata troupe from Heggodu, with artists from all over Karnataka. Both Marathi and Kannada versions were powerful, impacting the audience, laying out life and work of Phule couple. The style used to portray is Jalsa style-more specifically Satyashodhaki Jalsa. Before the play began, M Ganesh spoke in Kannada about his feelings about this play and immediately translated for audiences in Marathi. Atul Pethe also announced that Marathi translation of Kannada play written by D S Chougule titled Vakhari Dhus(वखारी धूस) will be played in Pune soon.

You don’t get much opportunities of watching Kannada plays(and movies as well) in Pune. Kannada Sangh(which is celebrating, BTW, 50 years this year), has been organizing them once in a while. I had witnessed few such plays and programs in the past. One of them was Amol Palekar organized Rang Sangeet Mahotsav which traced music drama tradition of Karnataka, was able to witness great Kannada artists such Gubbi Veeranna and B Jayashri. The other was celebrating Girish Karnad’s creations, specifically, his Kannada movies where I got to watch beautiful movie Cheluvi and couple of his lesser known documentary films.

This exchange of artists, shows across both languages should happen more often. This is the only way to strengthen the bond. My next play to be watched is Girish Karnad’s Kannada play-Benda Kaalu’s(ಬೆಂದ ಕಾಳು) Marathi translation Une Pure Ek Shahar(उणे पुरे एक शहर). I had watched the show of original Kannada version in Pune itself sometime back.