Charlie Chaplin

The Little Fellow

मी सहसा रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांकडून, पुस्तकं विकत घेत नाही. कारण उघड आहे. बहुतेक वेळेला ती पुस्तके नकली(pirated) ही असतात. पण मी ती पुस्तकं जरूर पाहतो, चाळतो. न जाणो एखादे वेगळेच पुस्तक हाती लागावे. परवा असेच झाले. एका पुस्तकवाल्याकडे रस्त्यावर ठेवलेली पुस्तके पाहत होतो. एका पुस्तकावर माझी नजर रोखली गेली. उचलून घेतले तर ते चार्ली चॅप्लीनचे चरित्र. पुस्तक जुने होते, १९५२ मधील. त्याचे नाव होते The Little Fellow, लेखक आहेत Peter Cotes, Thelma Niklaus. मी मराठीतील चार्ली चॅप्लीनचे चरित्र हसरे दुःख(भा. द. खेर यांचे) हे पूर्वी वाचले होते. अजून कुठली चरित्रे मी पाहिली/वाचली नव्हती. उत्सुकतेने मी ते चाळले आणि तत्काळ विकत घेतले(फक्त शंभर रुपये). त्या पुस्तकाबद्दल येथे थोडेसे.

अचानक एक दिवस मला दूरचित्रवाणीवर चॅप्लीन नावाचा सिनेमा(docu-drama) हे पुस्तक वाचताना पाहायला मिळाला. हा सिनेमा त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक घटनांवर, प्रसंगांवर आधारित आहे. Richard Attenborough चा हा सिनेमा चार्ली चॅप्लीनच्या My Autobiography ह्या पुस्तकावर, आणि Chaplin: His life and art ह्या David Robinson च्या पुस्तकावर आधारित आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक वाचतोय, आणि मध्येच हा सिनेमा पाहायला मिळतोय हा दुर्मिळ योग जमून आला. आपल्या सर्वांप्रमाणे मीही चार्ली चॅप्लीनचे सिनेमे कित्येक वर्षांपासून परत परत पाहतो. आजकाल युट्यूबमुळे चांगली सोय झाली आहे. चित्रपटाच्या इतिहासातील सुरुवातीच्या दिवसात त्याने निर्माण केलेले, काम केलेले हे सिनेमे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हसवता हसवता डोळ्यातून पाणी आणणारे, जीवनातील विदारक सत्य मांडण्याचे त्याचे कसब हे वेगळेच होते. पण त्याचे स्वतःचे आयुष्य, त्याचा जीवनपट वाचला तर तो माणूस म्हणून कसा होता, कसा घडला हे समजते.

चार्ली चॅप्लीन ह्या विषयावर साहजिकच कित्येक पुस्तकं आहेत(ह्या पुस्तकात देखील परिशिष्टात यादी आहे). The Little Fellow ह्या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य असे आहे की प्रसिद्ध लेखक W. Somerset Maugham याने लिहिलेला लेख(A Writer’s Notebook पुस्तकातील) प्रस्तावना म्हणून यात दिले गेले आहे. चार्ली चॅप्लीन गरिबीच्या दिवसांच्या बाबत असलेला एकूण दृष्टीकोनाबद्द्ल Somerset Maugham लिहितो: One night I walked with him in Los Angeles and presently our steps took us into poorest quarter of the city. There were sordid tenement houses, shabby, gaudy shops in which are sold various goods that the poor by from day to day. His face lit up and buoyant tone into his voice as he exclaimed, ‘Say, this is the real life, isn’t it? All the rest is just sham’. इंग्लंड मधील अत्यंत गलीच्छ वस्तीतील गरीबीतील दिवस, आईचा मानसिक आजार, वडिलांचा अकाली मृत्यू ह्या सर्व गोष्टी त्याच्यावर एकामागून एक आघात करत गेल्या. याबद्दल या पुस्तकात देखील आले आहे.

हे पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. पहिला भाग त्याचे आयुष्य आणि दुसरे त्याच्या चित्रपटाविषयी लेख असलेले आहे. पुस्तकात बरीच छायाचित्रे तर आहेतच. आणखीन एक वैशिष्ट्य असे की त्याने लिहिलेल्या काही लेखांचे संकलन देखील दिले आहे. त्यातील एक लेख आहे तो त्याच्या चित्रपटातील वेशभूषेवर. त्याची ती मिशी, त्याचा ती ढगळ विजार याबद्दल त्याने लिहिले आहे. अजून एक लेख आहे तो त्याचे तोंडी असलेले The Great Dictator या सिनेमातील ते प्रसिद्ध भाषण(तो त्याचा पहिला बोलपट होता). पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या पहिल्या लेखात Background to Genius मध्ये, पहिलेच वाक्य चार्ली चॅप्लीन आणि चित्रपट यांचे नाते सांगणारे आहे. १८८९ साली त्याचा जन्म झाला, आणि त्याच वर्षी प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसनने kinetoscope नावाचे यंत्र, ज्याला, ज्याला motion picture camera चा पूर्वज म्हणतात, त्याचा शोध लावला(त्या आधी magic lantern होते). साधारण शंभर वर्षांपूर्वी चार्ली चॅप्लीन याची चित्रपट कारकीर्द सुरु झाली. त्याच सुमारास अमेरिकेत हॉलीवूड मध्ये चित्रपट उद्योग सुरु झाला होता. इंग्लंड वरून अमेरिकेत तो चित्रपटातून काम करण्यास धडकला. आणि बाकीचा सर्वांना माहिती असलेला इतिहास आहे.

चार्ली चॅप्लीन आणि वादविवाद हे सुद्धा समीकरण होतेच, त्याबद्दल ही पुस्तकात आले आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या, अनेक विवाह झाले, मोडले, हे तर आहेच. पण इतर गोष्टी देखील आहेतच. जसे की जेव्हा १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात जेव्हा अमेरिकेने भाग घेतला, तेव्हा, सैन्यात भरती होण्याची लाट आली होती. असा प्रवाद पसरला होता की चार्ली चॅप्लीनने सैन्यात जाण्यापासून टाळले. पण वस्तुस्थिती तशी नव्हती असे ह्या पुस्तकात नमूद केले आहे, तर त्याची निवड सैन्यात झाली नाही. दुसरे म्हणजे १९५२ मध्ये त्याच्यावर कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य आहे असा आरोप झाला आणि त्याला अमेरिकेच्या बाहेर काढले गेले. आणि तो परत अमेरिकेत कधीच गेला नाही. अमेरिका आणि कम्युनिस्ट पक्ष  आणि हॉलीवूड चित्रपट व्यवसायातील लोकांचे त्या पक्षाशी असलेले संबंध या विषयावर मी पूर्वी एक सिनेमा पहिला होता आणि त्यावर लिहिले देखील होते.

जरी हे पुस्तक  त्याचे जीवन आणि आणि कार्य अश्या दोन विभागात असले तरी, विशेष असा फरक नाहीच कारण थोड्या फरकाने त्याचे त्याचे कार्य हेच त्याचे जीवन आहे हे होय. दुसऱ्या भागातील एक लेख/प्रकरण ज्याचे नाव आहे Chaplin at Work, त्यात त्याने चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल असे लिहिले आहे, ‘His contribution to film is immeasurable. Of the pioneers in America, he was the first true creator in the new medium; and the only one to apply , from the beginning, film technique to film craft….With him, the silent film reached its peak’. मला वाटते हेच जाणून घेण्यासाठी, त्याचे आयुष्य जाणून घेण्यासाठी, हे पुस्तक वाचले पाहिजे.

Advertisements

The Amish Experience

I had been to Philadelphia in the USA few months back for work. Whenever I travel, I always look for something different, offbeat experiences. My hotel in Philadelphia had a stand housing various travel, tourism and local attractions related handouts, in the reception area. I collected bunch of them soon after I checked in there. One particular handout caught my attention. The handout was about visiting the area few miles from Philadelphia which has been inhabited by community referred as Amish community. My long standing wish visiting their area was now in my hands. I had a sight Amish people and their settlements long time back when I was traveling via I-95 from Buffalo to Cleveland, but did not have time to stop and explore. I decided to book a tour on the upcoming weekend and booked it with a organization called The Amish Experience, who have been running this for over 50 years now.

What is so different about Amish people? Like many communities in the USA, Amish community immigrated from Europe in the 18th century. This community follows Protestant Christianity, and prefer to maintain lifestyle by opposing modern technologies, continue to depend on agriculture.  They are not aborigines like local native American Indians who also follow similar life, but are not Christians.  They continue to speak German and follow close community practices to maintain purity. You can find more information on the Internet, example here on Wiki. Due to these reasons they have become point of attraction.

The tour was to start from a town called Lancaster near Philadelphia. It was February. That early Saturday chilly morning, I took Amtrak train to it, from famous and historic train station of Philadelphia which is famously called 30th Street Station. Lancaster is also historic town, which I explored after I returned from Amish tour. After reaching Lancaster station, I took a cab to reach to tour operator’s office.

 

They operate tours in Amish area which is n the heart of Lancaster’s Amish Country, surrounded by Amish farms between two towns called Bird-in-Hand and Intercourse. Very weird named towns, indeed!

The drive from the station was through Lancaster county, which was mostly Amish farmlands on the both sides of the road. After reaching the office, we were taken to a nearby heritage site which had model of typical Amish home, and a farm which also had a horse stable, buggy and cow shed. We were accompanied by tour guide for a tour of two-floored house. We got a glimpse of their clothes, various traditional artifacts inside the house, typical games which Amish kids play, walk-through their kitchen. Amish don’t use electricity, instead they use methane gas powered equipment. They don’t motor cars, but instead would use horses and horse-carts called buggy. This heritage site also had a typical school classroom run by Amish community only where German is first language which is taught to the kids.

 

The second leg our tour was actual tour of Amish area, their farmland. This also was a guided tour with multiple stop-overs at various places. We got a closer glimpse of farms-lands, diary farms, schools, various children and adults in their typical attire, and also people traveling through buggy. We also visited a gift shop which housed many items created by Amish men and women right from their quilts, diary products such as cheese etc. We also walked through dairy farms, where we saw cows being fed, milking facility etc. Also got a close look at methane gas chamber.

The third and last leg our tour was a show which traced dilemma faced by Amish young fraternity. The show is titled ‘Jacob’s Choice’, which tells the story of young boy named Jacob in Amish family. It is a multi–media show with special effects. This show is held in a special F/X theater which is housed inside their office. This 40 minute compelling story is told through the everyday lives of the Fishers, an Old Order Amish family of today. It is story of three Amish family generations. The viewers see young Jacob’s struggle in choosing the Amish church, or leaving behind family and community for the allure of the modern world.

 

The viewers also experience the horrendous religious persecution of Amish forefathers and take part in the perilous voyage to America. This is spectacularly portrayed by specials effects consisting of wind, rain, smoke, fire, ghostly and other Disney-like effects that thrill the senses. Jacob’s challenges with faith, tradition, and loved ones in a fast-changing world is a story that touches the viewers. The theater had a magic lantern also and looks like there magic lantern shows conducted. This is was a pleasant surprise to me as I had watched similar show in Pune about which I had written in this blog.

On the way back to Philadelphia, since my Amtrak train was rather late in the evening, I got opportunity to walk over historical downtown of Lancaster town. This town played important role during American Civil War. The Lancaster railway station is also historic. In fact, the station has special gallery of artifacts, photographs depicting this history.

 

Anyways, this travel back into lives of people called Amish leaves one wondering that even these kinds of things are in ultra-modern country like USA.

शांबरीक खरोलिका

कालच मी मूकपटाबद्दल थोडेसे लिहिले होते. विजय पाडळकर यांचे ‘सिनेमाचे दिवस-पुन्हा’ हे पुस्तक वाचताना मी काही वर्षापूर्वी(बहुधा २००९ मध्ये) पुण्यातल्या मध्ये शांबरीक खरोलिका ह्या कार्यक्रमाला National Film Archives of India(NFAI) मध्ये गेलो होतो त्याची आठवण झाली. त्याबद्दल थोडेसे.

शांबरीक खरोलिका म्हणजे काय, तर इंग्लिश मध्ये magic lantern. हे magic lantern यंत्र चित्रपट तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या बरेच आधी हलत्या चित्रांच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध होते. इंग्लंड आणि फ्रान्स मध्ये कार्यक्रम होत असत. या बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे आणि त्या यंत्राचा इतिहासही खुपच मनोरंजक आहे.

मुंबईतील पटवर्धन आणि पितळे ह्या गृहस्थांनी हे यंत्र १८८५ मध्ये मिळवले होते आणि ते त्यात भारतीयांच्या रुची नुसार काचेच्या स्लाईड्स वर पौराणिक प्रसंगावर आधारित कार्यक्रम ते करत असत. अशी त्यांनी हजारो स्लाईड्स बनवली होती. त्या यंत्राला शांबरीक खरोलिका असे भारतीय नावही त्यानीच दिले. दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ तयार करण्याच्या आधीची ही सगळी गोष्ट. पटवर्धन कुटुंबियांनी तो वारसा इतकी वर्षे जपून ठेवला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्मचरित्रात या खेळाबद्दल बद्दल विस्तृत उल्लेख आहे. ह्या विचित्र नावाबद्दल त्यांनी असे लिहून ठेवले आहे: “‘शांबरिक खरोलिका’ या विचित्र नावाबद्दल एकदा आम्ही खुद्द त्या पटवर्धनालाच विचारले. तो होता अस्सल नाकीं बोलणारा कोकण्या. त्याने खुलासा केला की, अहो, शांबरिक म्हणजे ‘मॅजिक’ आणि खरोलिका म्हणजे लॅण्टर्न. ‘मॅजि म्हणजे आपला शंबरासूर, त्यावरून ‘शांबरिक’ असा शब्द आम्ही बनवला. ‘लॅण्टर्न’ला मराठीत आपण दिवा दीप म्हणतो. पण हे शब्द फारजण वापरतात, म्हणून अमरकोशातून आम्ही ‘खरोलिका’ काढली.”

NFAI मधील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे होते की त्या दिवशी पटवर्धन कुटुंबियांनी शांबरीक खरोलिकाचा कार्यक्रम त्यांनी प्रात्यक्षिक म्हणून केला. आणि ते यंत्र आणि त्या स्लाईड्स NFAI ला त्यांच्या संग्रहालयाला भेट म्हणून दिला.

ह्याचेच काहीसे वेगळे रूप काही वर्षापूर्वी पर्यंत गावागावात हलत्या चित्रांच्या खेळ दाखवणारी मंडळी करत असताना दिसत असत. अर्थात त्यात गाजलेल्या चित्रपटांच्या फिल्म्सच्या स्लाईड्स वापरून ती दाखवत असत. त्याला एकाच वेळी तीन चार जणांनी पाहण्याची सोय असे. त्याला bioscope box म्हणतात. तोही वारसा खरे पहिले तर जपून ठेवावा असाच आहे.