अमेरिकेतील ज्यू लोकांचा इतिहास

परवा जर्मनी मधील ज्यू लोकं आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराशी(holocaust) निगडीत एक The Reader नावाचा सुंदर चित्रपट पाहिला(ह्या विषयावर खरे तर बरेच चांगले चित्रपट आहेत-Schindler’s List, The Boy in the Striped Pyjamas, वगैरे) . एका प्रसिद्ध जर्मन कादंबरीवर तो बेतला होता. त्या चित्रपटाला अनेक पदर आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी लिहिणार आहे. चित्रपटाच्या शेवटी एक ज्यू स्त्री, जी अत्याचारांमधून बचावली असते, आणि अमेरिकेत वास्तव्य करीत असते, तीला मिळालेले धन ती अमेरिकेतील शाळेला देऊन टाकते, असा प्रसंग आहे. अमेरिकेत ज्यू लोकं कित्येक वर्षांपासून येत आहेत, आणि तेथेच मिसळून जात आहेत. अर्थात ज्यू लोकांचे मूळ म्हणजे इस्राईल. तेथेच त्यांना राहणे मुश्कील होत गेल्याने, कित्येक दशकांपासून तो समाज जगभरात, प्रामुख्याने अमेरिकेत, युरोपात विखुरले गेले. जर्मनीत अर्थात त्यांच्यावर हिटलरने अंगावर काटा आणणारे अत्याचार केले. अशा ज्यू लोकांचा अमेरिकेतील इतिहास सांगणारे मी संग्रहालय पहिले होते त्याची या चित्रपटातील प्रसंगामुळे आठवण झाली.

मी पाहिलेले हे संग्रहालय, ज्याचे नाव आहे National Museum of American Jewish History, ते  फिलाडेल्फिया या शहरात Independence Mall भागात आहे. आता हा भाग म्हणजे अगदी भन्नाट आहे, येथे अमेरिका देशाचा जन्म झाला. त्याबद्दल कधीतरी परत. अमेरिकेतील ज्यू लोकांचा इतिहास सांगणारे, हे चांगले भले मोठे संग्रहालय आहे-चार मजले आहेत. मी बराच वेळ घेत हे संग्रहालय पहिले. अमेरिकेत बरेच प्रथितयश लोक ज्यू वंशीय आहेत. आपल्या महाराष्ट्रात अलिबाग येथे बेने इस्राईली नावाचे लोक आहेत, ते मुळचे ज्यू आहेत, त्याबद्दल माहिती होते, तसेच पुण्यात देखील ज्यू लोकांचे लाल देवल नावाचे synagogue आहे. तर अमेरिकेतील ज्यू लोकांचा अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, तसेच पुढील प्रगतीत खूप मोठा वाटा आहे त्याचा इतिहास, तसेच अमेरिकेच्या काही वादग्रस्त राजकीय निर्णयांचा(ज्यू समाजाप्रती, इस्राईल देश असेल, holocaust असेल) इतिहास येथे पाहता येतो. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळेस, holocaust चा दरम्यान, अमेरिकी सरकारने immigration policy सैल सोडली असती तर कित्येक ज्यू लोकांचे प्राण वाचले असते, ही सल अजूनही त्या समाजात आहे. त्याबद्दल एका दालनात सविस्तर, सचित्र माहिती आहे. ज्यू संस्कृती, धर्म, भाषा, पारंपरिक जीवन, त्या समाजातील आजचे प्रश्न, संस्कृती टिकून ठेवण्याचे आव्हान इत्यादी विषय देखील पाहता येतात. ज्यू लोकांनी सतराव्या शतकात अमेरिकेत पाऊल ठेवल्या पासून, ते आज पर्यंत, हा समाज कसा टिकला, वाढला, त्यांनी वेगवेगळया क्षेत्रात कशी प्रगती साधली याचे सविस्तर चित्रण दिसते.

प्रत्येक मजल्यावर कित्येक जुनी छायाचित्रे, विविध जुन्या पुराण्या वस्तू ,मांडून ठेवल्या आहेत. ह्यातील बऱ्याच वस्तू ज्यू लोकांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातून ह्या संस्थेला दिल्या आहेत, हे विशेष. एकूणच अमेरिकेत राहून ज्यू लोकांनी आपली अस्मिता जागरूकपणे जपून ठेवली आहे असे दिसते(पारशी लोकांप्रमाणे ज्यू लोकं सुद्धा त्यांच्या समाजातच विवाह करण्याचे पसंत करतात). अमेरिकेतील निवडक प्रथितयश ज्यू लोकांची माहिती(उदा. अल्बर्ट आईनस्टाईन) सुद्धा एका दालनात दिसते. एकूणच ह्या अत्याधुनिक, multi-media, आणि भव्य अश्या संग्रहालयातून फेरफटका मारताना ज्यू समाजाच्या इतिहासात डोकावून आल्यासारखे वाटून गेले. संग्रहालयाच्या दारातच Religious Liberty नावाचे एक शिल्पसमूह आहे, जे संग्रहालयात जाणाऱ्याला ज्यू लोकांनी अस्मितेसाठी, स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढयाचीच आठवण करून देते.

माझे एक-दोन ज्यू मित्र आहेत. इस्राईल मध्ये ते पूर्वी होते, आता अमेरिकेत राहत आहेत. अर्थात ते आताच्या पिढीचे आहेत. इस्राईल मध्ये Palestine बरोबर सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर ते अमेरिकेत आलेले आहेत. त्यांच्या बरोबर एकदा ह्या सर्व विषयाबद्दल बोलून जाणून घ्यावेसे वाटू लागले आहे. तसे पहिले ज्यू आणि holocaust चा इतिहास सांगणारे आणखी एक संग्रहालय अमेरिकेत आहे. या पार्श्वभूमीवर ते पाहायला हवे. भारतीय लोकं देखील आता अमेरिकेत जाऊन १०० वर्षे होऊन गेली. भारतीयांनी अमेरिकेत केलेल्या भरीव कामगिरीचे एक संग्रहालय अमेरिकेत करायला हरकत नाही. अमेरिकेतील आफ्रिकन वंशाचे लोकही त्याहून अधिक काळापासून आहेत. त्यांचे देखील एक संग्रहालय फिलाडेल्फिया मध्ये आहे, ते मी पाहिले होते. त्या बद्दल नंतर काधीतरी.

Advertisements

The Franklin Institute

I have written various travelogues on this blogs in the past. I love to travel and explore, and off late, also write about it. Sometimes when we travel to places, when we study the history, we find that some personalities leaving profound impact on country or state or city, we are visiting. Benjamin Franklin was one such personality who had an immense impact on the USA in general and cities like Philadelphia specific. I have written about impact he has on the city of Philadelphia, which I had witnessed during my visit. Today I want to write more about one such place I visited called The Franklin Institute in Philadelphia itself, founded to honor Benjamin Franklin himself, in 1824.

20170218_150533

That day, when I reached the place(which is in Parkway Museum District of the city), it was afternoon as I had visited another interesting place nearby. The imposing Latin architecture style of the building and particularly facade is captivating. This institute is focused on subject of science. It also has many museums and Tuttleman IMAX theater. I was particularly interested in a show at that theater along with a specialty museum themed around dinosaurs. As I got in and found myself inside a dome in the front court, where one can see full size marble structure of Benjamin Franklin himself. I straightaway went to the 3D IMAX show which was titled Flying Monsters as it was a perfect precursor for museum show following next Jurassic World Exhibit. The film had a voice of David Attenborough. and it was about flying creatures that predates dinosaurs on the earth. The Jurassic World Exhibit, which is a mobile exhibition, came to the institute in November 2016. When I visited it in February 2017, it was still around.

Jurassic World Exhibition is certainly a very unique with moving moving and life size models of various types of dinosaurs on the display, with light and sound effect. After that, I visited few more exhibits and gift shop, book store, before the institute shut down. One was around train engines, another was aviation technology. The train engine exhibition is titled The Train Factory. Incidentally, Philadelphia has been part of early train history in the USA. The place where I was put up, was a near a famous area called Reading Terminal, which itself was a train terminus. The exhibit includes a famous steam engine locomotive called Baldwin 60000, which you can walk inside and look around a piece of metal. The air show is again similar, tracing the history right from Wright Brothers early attempts to some modern air-crafts. It also had a simulation console to give visitors a first hand experience of how pilots are trained.

There were many more exhibits, I visited one around brain and another one around heart. The one on heart, basically was a supersized, giant colorful model of heart, making you walk through various veins, and explaining how pumping takes place inside of a heart. The one around brain was interesting, due its nature of fuzzy decision making based on illusions and sensory systems made of neural network.

All in all, the institute experience was good. There is so much packed here, even one day won’t be enough.

 

फिलाडेल्फिया मधील ऐतिहासिक तुरुंग

गेल्या वेळच्या माझ्या फिलाडेल्फिया भेटी दरम्यान बरेच काही पाहायला मिळाले. त्याबद्दल जसे जमत जाईल तसे लिहतो आहे. या आधीचे फिलाडेल्फिया बद्दलचे काही ब्लॉग तुम्ही इथे पाहू शकता. आंज ह्या ब्लॉग मध्ये Eastern State Penitentiary ह्या ऐतिहासिक तुरुंगाच्या भेटीबद्दल लिहिणार आहे.

मला ऐतिहासिक स्थळांना भेटी द्यायला आवडते. भले ते तुरुंग का असेना! भारतातील अंदमान मधील ऐतिहासिक तुरुंग ज्यात वीर सावरकर यांना ब्रिटीशांनी बंदी केले होते, ते तर जाज्वल्य असे ठिकाण आहे. तेथे अजून जायचे आहेच(पण लक्षद्वीपला गेलो आहे). पण फार पूर्वी मी जेव्हा अमेरिकेत होतो, तेव्हा तेथील San Francisco जवळील समुद्रातील Alcatraz या बेटावरील एक तुरुंग पाहायला गेलो होतो. परवाच मी The Green Mile ह्या सुंदर चित्रपटाबद्दल लिहिले होते, ज्यात Tennessee State Prison(Nashville) या ऐतिहासिक तुरुंगातील चित्रीकरण आहे. तर एके शनिवारी सकाळी सकाळी मी या फिलाडेल्फिया मधील तुरुंगाला भेट द्यायचे ठरवले. तसे ते ठिकाण माझ्या हॉटेल पासून खूप लांब नव्हते, म्हणून मी चालतच निघालो. नाहीतरी मला चालत चालत जायला आवडतेच. आणि फिलाडेल्फिया चालत चालत फिरायला अगदी मस्त आहे. ह्या तुरुंगाचे नाव आहे Eastern State Penitentiary. फेब्रुवारीचा महिना होता. अजून तशी थंडी होतीच. पण उन होते, मोकळे निळे आकाश होते, त्यामुळे अतिशय छान वाटत होते. रस्त्यावरून गर्दी अशी नव्हतीच. Vine Street वरून चालत, आतील गल्ली बोळातून इकडे तिकडे पाहत आरमात निघालो होतो. तुरुंगाच्या जवळ जसा गेलो, तसे ती भुईकोट किल्ल्यासारखी इमारत पाहून गुढरम्य परिसरात आल्यासारखे वाटून गेले.

 

हे तुरुंग अमेरिकेतील सर्वात जुने तुरुंग आहे असे त्यांच्या माहितीपत्रकावर लिहिले होते(१८२९ मध्ये सुरु झाले. ही देखील बेंजामिन फ्रँकलिनचीच कल्पना). अर्थात हा तुरुंग आता वापरात नाही. मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर १४ डॉलर देऊन तिकीट काढले. मी audio tour घेतली, आणि जवळ जवळ पुढील तास-दीड तास मी आत भटकत होतो. हे तुरुंग जुने असल्यामुळे बराच भाग नष्ट झाला होता, आणि जे काही शिल्लक होते, तेही संवर्धन करून जपून ठेवले जात होते. तुरुंगाच्या उंच दगडी भिंती, बुरुजे अजून बरीच शिल्लक आहेत. सायकलीच्या चाकांना जसे आरे असतात तश्या प्रकारची सात आरे आत मध्ये आहेत, ज्यातून कैद्यांना राहण्यासाठी कक्ष(cell blocks) खाली आणि वर असे दोन मजल्यांवर आहेत. Penitentiary हा शब्द खुपच अर्थपूर्ण आहे. गुन्हेगारांना शिक्षा न देता त्यांना प्रायश्चित्त करण्याची अशी ही जागा म्हणजे Penitentiary. ह्या audio tour मध्ये प्रत्येकाला एक MP3 player आणि headset दिला गेला होता. तुरुंगातील १०-१२ ठिकाणी audio tour जाता आले आणि तेथील इतिहास आणि माहिती मिळत गेली.

या तुरुंगातून त्याकाळचे अमेरिकेतील बरेच कुप्रसिद्ध गुन्हेगार बंदिस्त होते. Al Capone नावाचा Slick Willie Sutton नावाचा बॅंक लुटारू येथे तुरुंगवास भोगत होते. ह्या tour च्या दरम्यान आम्हाला एखाद-दुसऱ्या cell मध्ये सुद्धा जावू दिले गेले. त्यामुळे त्यावेळेस तेथील वातावरण कसे होते, याची कल्पना करता येते.

 

आत मध्ये त्यांनी बरीच प्रदर्शने, चित्रे, इतिहास सांगणारी माहिती पत्रके, छायाचित्रे ठिकठिकाणी लावली आहेत. त्यातील मला आवडले ते म्हणजे Prisons Today हे प्रदर्शन. आज घडीला अमेरिकेत तुरुंग व्यवस्था कशी आहे हे सांगणारी, आकडेवारी असलेले, प्रदर्शन आहे. तसेच अजून दुसरे प्रदर्शन आहे ज्याचे नाव आहे The Big Graph. हे मुख्य पटांगणात, उघड्यावर आहे. हे प्रदर्शन म्हणजे वेगवेगळया देशांत किती लोकं तुरुंगवास भोगत आहे यावर आहे आणि त्याचा इतिहास देखील आहे. तुरुंगात बरीच art installations देखील आहेत.

अश्या ऐतिहासिक आणि वेगळ्या ठिकाणच्या भेटी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. सर्व तुरुंग पाहून झाल्यावर तेथून निघालो आणि माझा मोर्चा The Franklin Institute कडे वळवला. पायी पायी रपेट करत मजेत येत असता Wood Street/N 20th Street च्या कोपऱ्यात Book Corner हे पुस्तकाचे दुकान दिसले. छोटेखानीच होते. बाहेर जुनी पुस्तके ठेवली होती, त्यातील बरीचशी एका डॉलर पेक्षा कमी किमतीची होती. तेथे काही वेळ काढून एक-दोन पुस्तके(E M Foster’s The Room with View, Where Angles Fear to Tread) विकत घेतली. तेथून जवळच The Franklin Institute ची भव्य इमारत आहे, तेथे गेलो. त्याबद्दल नंतर कधीतरी.

 

 

बेंजामिन फ्रँकलिनमय फिलाडेल्फिया

मार्च २०१७ महिन्याचा ललित मासिकाच्या अंकात गोविंदराव तळवलकर यांचा एक लेख आला आहे, त्याचे नाव आहे एका वाद्याचा गहिरा इतिहास. तो लेख Anglican Music नावाच्या एका पुस्तकाची माहिती देणारा आहे. ते वाद्य म्हणजे Glass Armonica आहे, त्या वाद्यात बेंजामिन फ्रँकलिन याने बरीच सुधारणा केली असा उल्लेख आहे. मला नवल वाटले. मी नुकतीच फिलाडेल्फिया शहराला भेट दिली होती. तेथील संग्रहालयात हे वाद्य मी पाहिल्याचे आठवते मला. हा बेंजामिन फ्रँकलिन नावाचा माणूस महा-उपद्व्यापी. फिलाडेल्फिया शहरात ठिकठिकाणी त्याच्या संबंधित स्थळे आहेत. अवघे शहरच बेंजामिन फ्रँकलिनमय आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मी हा ब्लॉग लिहायला सुरु केला काही दिवसांपूर्वी. दोनच दिवसांपूर्वी बातमी आली की गोविदराव तळवलकर यांचे निधन झाले, आणि एका (संपादकीय)युगाचा अस्त झाला. त्यांची बरीच पुस्तके(प्रामुख्याने लेख संग्रह) मी वाचली आहेत. त्याबद्दल लिहावसे वाटत होते. आता त्यांच्या निधनाच्या निमित्ताने लिहीन केव्हातरी. तूर्त बेंजामिन फ्रँकलिन.

आधी थोडक्यात बेंजामिन फ्रँकलिन हा कोण आहे हे सांगतो आणि मग मूळ विषयाकडे येतो. १७०६ मध्ये बोस्टन मध्ये जन्म झाला आणि, वयाच्या १७व्या वर्षी तो फिलाडेल्फिया मध्ये आला. त्याने अनेकोनेक उद्योग केले. तो वेगवेगळे शोध लावणारा शास्त्रज्ञ होता, छपाई-तंत्रज्ञ, लेखक, संगीत जाणणारा, बुद्धिबळ खेळणारा, राजकारणी, मुत्सद्दी, व्यावसायिक, पोस्ट-मास्टर, अमेरिकेच्या स्वातंत्र्य-चळवळीत सक्रीय सहभाग त्याने घेतला होता(Declaration of Independence मसुदा बनवणाऱ्या समिती मध्ये तो होता), पेनसिल्व्हेनिया राज्याचा तो अध्यक्ष देखील बनला. त्याने अनेक संस्था स्थापन केल्या-अग्नीशामक दल, तत्वज्ञान मंडळ(American Philosophy Society, जे मी गेलो तेव्हा बंद होते), हॉस्पिटल, महाविद्यालये इत्यादी. त्याला Founding Father of America पैकी एक मानले जाते. अमेरिकेच्या जनमानसावर खूप मोठा परिणाम केला.

बेंजामिन फ्रँकलिन आणि फिलाडेल्फिया हे समीकरण खूप खोलवर आहे. माझ्या ह्या वेळच्या आणि गेल्यावेळच्या(२०१४) मधील फिलाडेल्फियाभेटी दरम्यान पाहिलेल्या वास्तू, संग्रहालये आणि इतर स्थळे, या पैकी कित्येक येनकेन प्रकारे त्याच्याशीच निगडीत आहेत. त्याचे पुतळे तर ठिकठिकाणी दिसत राहतात. रस्त्यापासून सुरुवात करूयात. Benjamin Franklin Parkway नावाचा महामार्ग आहे(Interstate 676) जो पूर्वेकडे न्यूजर्सी राज्यात डेलावेअर नदी वरील Benjamin Franklin Bridge वरून जातो. ह्या पुलाजवळच त्याच्या नावाचा Franklin Square नावाचा चौक आहे, जो फिलाडेल्फिया शहरातील William Penn ने स्थापन केलेल्या काही चौकांपैकी एक आहे.

The Franklin Institute आणि Franklin Museum तर पर्यटकांसाठी प्रसिद्धच आहेत. The Franklin Institute मध्ये त्याचे राष्ट्रीय स्मारक आहे. दर्शनी भागातच त्याचा पूर्णाकृती असा संगमरवरी भव्य पुतळा आहे. The Franklin Institute हे प्रामुख्याने science museum आहे. जे त्याच्या संशोधन वृत्तीलाच समर्पित आहे. याशिवाय तेथे Tuttleman IMAX 3-D theater आहे(तेथे मी Flying Monsters 3D with David Attenborough हा चित्रपट पहिला). तेथे नव्यानेच Jurassic World हे नवीन प्रदर्शन सुरु झाले आहे, ज्याला अर्थातच लोकांची अलोट गर्दी होते आहे. The Train Factory नावाचे रेल्वे इंजिनाचे प्रदर्शन मस्त आहे. १९३३ मधील Baldwin Engine तेथे आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत अनेक वस्तू Independence Mall या भागात आहेत. त्यातील एक Independence Hall जेथे Declaration of Independence मसुद्यावर बेंजामिन फ्रँकलिन इतरांबरोबर सही केली. याच भागात Franklin Museum हे अमेरिकेच्या National Park System अंतर्गत National History Landmark आहे. मधील संग्रहालय आहे. त्याचे जीवन, तो कसा होता, त्याने लावलेल्या वेगवेगळया संशोधनाचे प्रात्यक्षिक, आणि अनेक interactive आणि multi-media वापरून हे संग्रहालय अतिशय छान आहे. एक गमतीचे प्रकरण सांगतो. बेंजामिन फ्रँकलिन ह्याला सांध्यांचा त्रास, gout, ज्याला म्हणतात, तो होता. त्याबद्दल एक exhibit तेथे होते. त्याचे खाण्या-पिण्यावर निर्बंध नव्हते, आणि त्याला हा त्रास त्यामुळेच झाला होता, हे त्याला माहिती होते. स्व-निर्बंधांवर त्याने(virtue of temperance) बरेच म्हणून ठेवले आहे, आणि हा त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभास होता. त्याने ह्यावर एक गोष्टच लिहिली, तिचे नाव आहे Madame Gout.

ह्या संग्रहालयाच्या आवारातच Franklin Court नावाचे प्रदर्शन आहे. हा सगळा भाग त्याच्या राहण्याचे ठिकाण होते. तळघरात त्याच्या वस्तू, त्याचा इमारतीच्या शिल्लक राहिलेले अवशेष, glass harmonica इत्यादी आहेत.

फिलाडेल्फिया शहरात बऱ्याच उंच इमारती आहेत. त्यातील एकावर, One Liberty Place Observation Deck, पर्यटकांना शहर वरून पाहता यावे याची सोय केली आहे. इमारतीच्या ५५व्या मजलावर जावे लागते. तेथे देखील Franklin Museum याचा निळ्या रंगातील geometric head(भूमितीय मस्तक) आहे.  अजूनही बऱ्याच वास्तू त्याच्याशी निगडीत आहेत, ज्या मी पाहिलेल्या नाहीत, जसे की पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, अग्निशामक दल, Franklin Fields, Post Office, इत्यादी. त्यांचे वास्तव्य फिलाडेल्फियामधील मार्केट स्ट्रीट(जो जुना आणि प्रमुख रस्ता आहे) येथे होते, त्यांचे निधन देखील फिलाडेल्फियामधेच १७९० मध्ये झाले. तर असे हे बेंजामिन फ्रँकलिनमय फिलाडेल्फिया शहर. हे सर्व पहिल्या नंतर, त्याच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हावेसे वाटते.

Sistas the Musical:An off-Broadway Show

I visited Philadelphia last month(February). I braved to pay visit to New York amidst chilly(and to certain extent rainy) weather one of the weekends. This was my second visit to New York. You can never have enough of New York-the true megalopolis which it is. New York is a 2 hour drive away from Philadelphia. I took a bus this time(instead of Amtrak)-MegaBus operated bus. I had booked a roof-top bus tour of New York downtown before hand which ended early in the afternoon.

After the usual roof-top bus tour, I set loose to loiter around Broadway, Times Square, Central Park etc. Initially, I was not planning to watch any Broadway or even Off-Broadway show, due to limited time, though it has been my dream for long. For example, I do want to watch The Phantom of the Opera or War Horse, on one of Broadway theaters. In the Times Square, I was walking past a TKTS Ticket Booth. My attention was caught by electronic board showing list of various plays going on that evening. TKTS Ticket Booth has become popular as they offer same day discounts to many shows. I noticed 4.30 pm show of Sistas the Musical, an off-Broadway show. I quickly bought the ticket for it, as it was not too expensive and also was ending in time for my return journey back to Philadelphia.

Off-Broadway theaters are smaller than those located in Broadway district in New York city. They are also host typically less expensive productions. Sistas the Musical was such a play. It was to take place on St Luke’s Theater on 308 W 46th Street, off Broadway Street, near Times Square. It was still drizzling, and was chilly, cloudy. The Times Square was lit all over. There were so many people moving helter-skelter. Even at TKTS Ticket Booth people were queued up to get hold of show of the evening of their interest. Everyone wanted to make most of their time that evening in New York no matter what.

I started walking down towards St Luke’s Church. The theater was in the basement of the church. It was another 10-15 minutes for the play to start. I took some photographs. I also saw counter having merchandise related to the play. I was expecting a playbill, but they did not have one-not sure why. But I got hold of card about the play. It said it was in its fifth year. The stage was open and setting was simple. An elderly lady came and sat besides me inside. She had some all the way from Connecticut. We chatted generally about the play, wondered how the play would be. Looks like hers was also first experience of an off-Broadway show. Soon the play started and we were immersed into saga which unfolded in front of us.

The play was about Black American and society at large. But it was also about love or shall we call it as infatuation. It was all women play, talking about women issues, their struggles, triumphs. It is musical show, hence almost everyone in the play sings. Many popular songs were used in the play. The play is also a down the memory lane” in a way as old grandma dies in a family, and family members discover old memories through various artifacts which has. This in turn tells history of black women, through 1930s. Their website covers various details history they referred to and also songs they selected for the show.

20170212_160515

Myself at the show

They play ended at around 6 pm on high note. It left mesmerizing feeling about universality of aspects related to family bond, position of women in society. I started walking towards MegaBus bus-stop far off from the theater. It was indeed a long walk, but was easy as I kept thinking about the experience I had gone just through, and also time I had spent in New York since morning. Philadelphia has similar theater culture, about which I have written here.

फिलाडेल्फिया मधील नाटकांचा रस्ता

मी गेल्या महिन्यात कार्यालयीन कामानिमित्त अमेरिकेतील पूर्व भागात असेलल्या ऐतिहासिक अशा फिलाडेल्फिया(Philadelphia) शहरी काही दिवस गेलो होतो. पूर्वीही एकदा २०१४ मध्ये गेलो होतो. त्यावेळच्या अनुभवांबद्दल लिहायचे राहून गेले आहे, एक नाममात्र अपवाद सोडून, आईस हॉकीचा सामना, ज्याबद्दल येथे लिहिले आहे. ह्या वेळेसही मला फिलाडेल्फियामध्ये भटकंती करायला बऱ्यापैकी सवड मिळाली. त्याबद्दल सविस्तर लिहीनच नंतर, पण येथे मी अनुभवलेल्या नाट्यसंस्कृती बद्दल लिहिणार आहे.

फिलाडेल्फियामधील ब्रॉड स्ट्रीट(Broad Street) नावाच्या रस्त्यावर, आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्यांवर अनेक नाट्यगृहे आहेत. त्यातील बरीचशी १००-२०० वर्षे जुनी आहेत. तसा हा सर्व भागच ऐतिहासिक आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेस, तसेच स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळी ह्या शहरात बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत आणि त्याची साक्ष देणारी अनेक इमारती, स्थळे, आता संग्रहालयांच्या रुपाने ठिकठिकाणी आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर मी फिलाडेल्फिया शहरात पोहोचलो. एक-दोन दिवसांपूर्वीच बर्फवृष्टी होवून गेली होती(snow-fall ला बर्फवृष्टी हा शब्द कसातरी वाटतो, पण इलाज नाही). दुसऱ्या दिवशी शनिवार होता, सुटीचा वार होता, त्यामुळे मी हॉटेलबाहेर येवून ह्या रस्त्यांवरून भटकायला म्हणून बाहेर पडलो. हवा अतिशय थंड, बोचरी. कोवळे उन मधेच येई, परत गायब होई. हातात (म्हणजे खिश्यात असलेल्या हातात!) मोबाईलवर नकाशा होताच, तसेच हॉटेल मध्ये फिलाडेल्फिया शहराच्या पर्यटनस्थळांची माहिती देणारी पुस्तिका होतीच. ब्रॉड स्ट्रीट आणि त्याला आडवे छेदून जाणारे वॉलनट स्ट्रीट, चेस्टनट स्ट्रीट, मार्केट स्ट्रीट, आणि बरेच असे रस्ते होते. हे सगळे रस्ते पूर्वेकडे डेलावेअर नदीला जाऊन भिडतात. मी उभा आडवा तो भाग पालथा घातला. वाटेत फॉरेस्ट थिएटर, पर्ल थिएटर, विल्मा थिएटर, Academy of Music, Merriam Theater आणि इतर बरीच नाट्यगृहे होती. Merriam Theater मध्ये Shen Yun सारखा चीनच्या राजघराण्यावर आधारित प्रसिद्ध संगीत-नृत्य असलेल्या भव्यदिव्य असा कार्यक्रम होता.

तर अश्या ह्या भागात, त्यातील सर्वात जुने असे वॉलनट स्ट्रीट थिएटर नावाचे वॉलनट रस्त्यावर असलेले नाट्यगृह हे अमेरिकेतील सर्वात जुने, आणि चालू स्थितीतील नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह अमेरिकेतील National Historic Landmark Building आहे. माझे फिलाडेल्फिया मधील वास्तव्य याच रस्त्यावर होते आणि ते अगदी हाकेच्या अंतरावर होते. अतिशय उत्सुकतेने मी तेथे गेलो. द गिफ्ट नावाचे नाटक काही दिवसातच तेथे येणार होते. त्याचा हिवाळा संपल्यानंतरचा पहिला प्रयोग होणार होता. त्याचे तिकीट ३० डॉलर देऊन मी काढले. नाट्यगृह काही भव्यदिव्य नव्हते. येवू घातलेल्या नाटकांचे पोस्टर्स लावले गेले होते. बाहेर एक छोटासा फलक लावला होता, त्यावे हे नाट्यगृह सर्वात जुने असल्याचे नमूद केले होते. नाट्यगृहाच्या दाराशी रस्त्यावर पूर्वी झालेल्या नाटकांची नावे असलेल्या विटा होत्या, ज्यात Wizard of Oz सारख्या नाटकाचे नाव होते.

द गिफ्ट नाटकाचा प्रयोग मी भारतात परतण्याच्या दोन दिवस आधी होता. माझी उत्सुकता ताणली गेली होती. नाटक मंगळवारी संध्याकाळी होते. परत मी थंडीत कुडकुडत चालत तेथे गेलो. तेथे गेल्यावर समजले की त्या इमारतीत तीन रंगमंच आहेत. एक मोठे आहे ज्याला ते Main Stage असे म्हणतात. दुसरे जे तिसऱ्या मजल्यावर होते, ते स्टुडीओ रंगमंच होते(Independence Studio on 3). अजून एक रंगमंच पाचव्या मजल्यावर होते. Main Stage वर प्रसिद्ध नाटके, संगीत नाटके, संगीताचे कार्यक्रम इत्यादी होतात. ५००-६०० प्रेक्षक बसतील एवढी मोठी जागा होती. स्टुडीओ रंगमंचाची प्रेक्षक क्षमता साधारण १०० होती. द गिफ्ट नाटक तेथे होते. तिकिटावर आसन संख्या नव्हती. तेथे गेल्यावर नाटकाची माहिती देणारी पुस्तिका देण्यात आली ज्याला ते playbill म्हणतात. हा प्रकार मला आवडला. नाट्यगृहाच्या दारात काही कर्मचारी उभे होते. त्यांच्याशी मी गप्पा सुरु केल्या. ओघात असे समजले की  वॉलनट स्ट्रीट थिएटर मध्ये नाट्यप्रशिक्षण वर्ग देखील चालतात. इंग्रजी एल आकारात आसनव्यवस्था होती. नाटकाचे नेपथ्य सुरेख होते. अगदी आपल्याकडे जसे प्रायोगिक रंगभूमीवर सारखी नाटके होतात, किंवा intimate theater सारखा सगळा माहौल होता.

20170221_203400

The Gift नाटकात दोनच पात्रे होती. नाटकाचे लेखन Will Stutts यांनी केले आहे. आणि दोनच पात्रे निभावली आहेत Warren Kelley आणि Susan Riley Stevens या दोघांनी. आणि हे दोघेही रंगभूमीवरील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कलाकार आहेत. वॉरेन यांनी To Kill Mocking a Bird सारख्या नाटकातून कामे केली आहेत, तर सुसान यांनी A Streetcar Named Desire मधून काम केले आहे. हे नाटक म्हणजे दोन लेखक मित्रांमधील संवाद आहे, जो घडतो १९५९ मध्ये आलाबामा मधील घराच्या पोर्चमध्ये. इंग्रजी साहित्यात Truman Capote and Harper Lee दोघेही गतकाळातील प्रसिद्ध लेखक आहेत, आणि एकमेकांचे स्नेहीदेखील होते. Harper Lee यांच्या To Kill a Mocking Bird यांच्या प्रसिद्ध कादंबरी लेखनामध्ये Truman Capote यांचा वाटा असावा असा जो प्रवाद आहे, ह्यावर हे नाटक आधारित आहे. साधारण ९० मिनिटे लांबी असलेले हे नाटक मस्त वाटले, संवाद, सहज अभिनय, एकमेकातील द्वंद ह्यामुळे ते खिळवून ठेवते.

न्यूयॉर्क मधील ब्रॉडवे रस्ता नाटकांसाठी तसेच संगीत नाटक(Opera) कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. तेथेही गेलो होतो. मला Broadway वर जमले नाही, पण Off-Broadway वर एक नाटक पाहायला जमले. त्याबद्दल देखील मी लिहिले आहे(Sistas the Musical). मराठीतील प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांनी लोकसत्ता मध्ये न्यूयॉर्क मधील ब्रॉडवे वर पाहिलेल्या नाटकांवरती एक लेखमाला काही वर्षांपूर्वी लिहिली होती, त्याचे पुस्तकही झाले होते, त्याची सतत आठवण होत होती.

Ice hockey in Philadelphia

In the USA, the idea of professional leagues in sports is quite old, unlike in India, where we are seeing since few years leagues getting formed in cricket, kabaddi, hockey etc. In the USA, there professional sports leagues for football, hockey, baseball.  During my trip to USA last year, I happened to watch ice hockey live. Watching sports live has been growing in India for other sports also. Cricket has always got big audiences watching live at the stadiums. I also happened to watch IPL match live in 2012 at Sahara Stadium near Pune, but about it sometime later. I also had got opportunity watch tennis match at Commonwealth Youth Games back in 2008, again in Pune.

I am not a big fan or follower of game of hockey, not certainly ice hockey. My business colleague had gotten tickets for this particular event on a Thursday night. The ice hockey league is managed by National Hockey League, and they only play ice hockey, unlike in India where we play only hockey on soil or artificial turfs. The game was between Philadelphia Flyers and Colorado Avalanche. In the evening, after the work, we took SEPTA underground train and alighted at AT&T Station. The match was in Wells Fargo Arena which at stones’ throw distance from the station.

It was cold night of early February. We joined to herd of people walking towards arena from the station. It was orange color all over, as local team’s jersey was of that color. My colleague was also sporting it for the whole day and was warming up for the game in the evening. As we approached the arena, my excitement reached the peak. After entering the arena past security checks, we went towards our seats straight-away. It was pre-match time. The arena had at the center of the court(called hockey rink) TV monitors hanging.

20140206_195251.

It ran commercials, and after some time the both teams progress and teams were declared. Local team Philadelphia Flyers got a huge cheer the moment they announced their team roster. While all this was going on the support staff was leveling the ice on the court.

20140206_195338

They players started their dry-runs, practice sessions, which were also hugely cheered by the crowd. The game of regular hockey, like football is itself very fast, you can imagine how fast ice hockey can be. This is one of the league matches. The Colorado Avalanche had been on winning streak, had won the last encounter with Philadelphia Flyers, I was told. So it was clear that Philadelphia Flyers would get huge cheer from locals on their home venue. The crowd was easily in the range of 20 thousand.

I did not have any affiliation with any of the teams, neither did I know of any players nor of their past records. But, my colleague, being Philadelphia resident, was fan of Philadelphia Flyers, of which he kept talking. I did not know any rules of ice hockey either…but one thing was sure that one needs to make goals on opponent’s goal posts to win. So it was not too hard after minutes to understand what was going on generally.

As the match began, I being in Philadelphia that time, with my colleague besides me, I chose to support Philadelphia Flyers and keenly started watching their moves. Ice hockey matches have 3 halves(they call periods). We watched 2 periods straight. After the second period, we went down to the food court and grabbed our meals and got back in time to witness the second half. The local team was doing good on that day, and they eventually won it by 3 goals to 1.

20140206_202155

As I said the speed of the game was electrifying. The players had great fineness and control with which they skated after the ball.

By the time, I reached back to hotel it was well past 10 pm again by SEPTA subway. I knew I had gone through very different kind of experience watching this match live. Next on list to watch is tennis at Wimbledon!