अनुवाद कार्यशाळा अनुभव

गेल्या काही वर्षांपासून भारतीय भाषांतील तसेच परदेशी भाषांतून मराठीत ललित साहित्यकृती अनुवादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचाच अर्थ अनुवादित साहित्याला मागणी आहे. आणि तसे अनुवाद करण्यासाठीही बरेच जण पुढे येत आहेत. तसे पहिले तर अनुवाद करणे काही नवीन नाही. संस्कृत साहित्याचे मराठीत, इंग्रजीत तसेच इतर भाषांत अनुवाद, रुपांतर, आणि इतर रूपांमध्ये होतच आहे. कित्येक क्लासिक साहित्यकृतींचे, जी युरोपियन, रशियन भाषांतून इंग्रजीत अनुवादित केली जात आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून, खाजगीकारण, उदारीकरण, जागतिकीकरण(खाउजा) यामुळे भारताकडे परकीय संस्था बाजारपेठ म्हणून पाहू लागल्या, तसे तसे, त्यांच्या उत्पादनाच्याशी निगडीत मजकुराचे मराठी तसेच इतर भारतीय भाषांत अनुवाद करण्याचे प्रमाण वाढले आहे, सॉफ्टवेअर क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, जाहिरात क्षेत्रात अनुवाद करण्याचे प्रमाण वाढले आहे. मी देखील काही वर्षांपासून कन्नड भाषांतून मराठी काही निवडक साहित्य कलाकृतींचे/लेखांचे, स्वान्त-सुखाय, विषयाची आवड म्हणून, हौसेकरिता, अनुवाद करतोय. एक पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. त्याबद्दलचे अनुभव मी एका अनुवादाची कहाणी यात लिहले आहे. इतर अनुवाद(translation) विषयक लेख माझ्या ब्लॉग वर येथे पाहू शकता.

ललित साहित्याच्या अनुवादाला वाढती मागणी लक्षात घेवून, अनुवादाची गुणवत्ता वाढण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र साहित्य परिषद(मसाप) आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यात एका अर्ध-दिवसीय अनुवाद कार्यशाळेचे आयोजन केले गेले. उमा कुलकर्णी, भारती पांडे, रविंद्र गुर्जर इत्यादी सारखे ज्येष्ठ, अनुभवी अनुवादक-साहित्यिक मार्गदर्शन करणार होते, म्हणून मी त्याला हजर होतो.  अनुवादाशी संबंधित कार्यशाळा, आणि काही छोटे-मोठे अभ्यासक्रम देखील आहेत. मी अजून पर्यंत तश्या अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा यांना उपस्थित राहिलो नव्हतो हेही एक कारण होते.

ही कार्यशाळा पुण्यातील नुकतेच शतक पार केले अश्या प्रसिद्ध स. प. महाविद्यालयात, तेही तेथील तितकेच प्रसिद्ध ज्ञानेश्वर सभागृहात होते. मसापचे मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात नोंदवले की ह्या सभागृहात हा कार्यक्रम होतो आहे, हे औतिच्यपूर्ण आहे, कारण ज्ञानेश्वर हे आद्य अनुवादकच होते, कारण त्यांनी भगवद्गीतेचा संस्कृत मधून प्राकृत/मराठी मध्ये भावानुवादच केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, तसेच अनुवादक, दामोदर खडसे होते. त्यांनी त्यांच्या भाषणात अनुवादासंबंधी बरेच मुद्दे मांडले. भाषेवरील प्रभुत्व, दोन्ही भाषा ज्या ठिकाणी बोलल्या जातात त्या जागेची भौगोलीक, संस्कृती पार्श्वभूमी माहिती असेल तर संदर्भांचे भाषांतर सहज आणि पटेल असे होईल.  त्यांनीच एकूणच अनुवादकाकडे प्रगल्भता हवी यावर जोर दिला. त्यांनी इंग्रजीमध्ये फ्रेंच भाषेतून कित्येक शब्द आले आहेत याची माहिती दिली. वेगवेगळे शब्दकोश, संगणकाची मर्यादित मदत आवश्यक आहे. संगणकाद्वारे केलेले भाषांतर(computer assisted translation-CAT) अजून खुपच प्राथमिक स्थितीला आहे. असे संगणकीय भाषांतर आणि शब्दकोश शब्दासाठी पर्याय देतात, पण योग्य तो पर्याय वापरण्याचा विवेक अनुवादकाकडेच असतो, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेचे ढोबळ स्वरूप असे होते की तीन वक्त्यांची भाषणे, त्यानंतर प्रश्नोत्तरे, आणि शेवटी चर्चा, ही अनुवादाची वाटचाल: आव्हाने आणि समस्या यावर होता.

त्यानुसार पहिल्या वक्त्या म्हणून उमा कुलकर्णी यांनी त्यांचे अनुवाद-क्षेत्रातील अनुभव कथन केले. त्यांचे कन्नड कथा आणि कादंबऱ्या मराठी आणण्याचे काम प्रसिद्धच आहे. त्यांनी प्रामुख्याने देशी भाषांतील अनुवादासंबंधी मुद्दे मांडले. सुरुवातच त्यांनी नवख्या अनुवादकांना अनुवादासंबंधित करार जो प्रकाशक आणि मूळ लेखक, यांच्यात असतो त्याबद्दल आणि इतर तत्सम बाबतीत मार्गदर्शन केले. त्यांनी कन्नड आणि मराठी भाषेतील अनुवादाचे गमतीदार प्रसंग, अनुभव नमूद केले. भाषिक, प्रांतिक भेद कसा आहे, आणि कसा सारखा आहे याचे त्यांनी स्पष्टीकरण केले.

प्रसिद्ध अनुवादिका भारती पांडे यांचे त्यानंतर श्रोत्यांशी संभाषण झाले. त्यांनी मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तकांचे भाषांतर, तसेच स्वतंत्र साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी अनुवादाला दुय्यम स्थान अजूनही आहे याची खंत प्रकट केली. अनुवादकाला मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहावे लागते. स्वतःचे विचार, नैतिक मूल्ये अनुवाद करताना आड येवू देऊ नयेत. अनुवाद आणि रुपांतर यात फरक कसा ते त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. त्यांनी Pearl Buck च्या The Good Earth या कादंबरीचे भाषांतर न करता, भारतीयीकरण केले, रुपांतरीत केले. त्यांनी त्यांच्या इतर पुस्तकांचे जसे की अरुण शौरी यांच्या इंग्रजी भाषेतील, आणि क्लिष्ट विषयावरील पुस्तकाचे, तसेच ओशो रजनीश यांच्या एका पुस्तकाच्या अनुवादाचे अनुभव वाटले.

शेवटी कित्येक प्रसिद्ध इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवादक म्हणून अनेक वर्षे काम करत असलेले रविंद्र गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. Godfather, Papillon, Second Lady, Sicilian वगैरे कादंबऱ्या त्यांनी मराठी आणल्या आणि त्या तुफान गाजल्या. ४०-५० वर्षांपूर्वी अनुवाद करताना काय काय अडचणी येत असत, त्यातून कसे निभावले याची कहाणी त्यांनी सांगितली.

त्यानंतर कार्यक्रमाचा शेवटच्या भागात एक चर्चासत्र आयोजित केले होते. रविंद्र गुजर यांनी समन्वयक/संवादक म्हणून भूमिका बजावली. संस्कृती प्रकाशनच्या तसेच मसापचा पदाधिकारी सुनिताराजे पवार यांनी प्रकाशकाची, पांडुरंग कुलकर्णी यांनी वाचकाची, आणि विजय पाध्ये यांनी ललित साहित्यकृतीव्यतिरिक्त भाषांतर क्षेत्रातील व्यावसायिक या नात्याने आपापली भूमिका मांडली. सुनिताराजे एकूणच प्रकाशकाच्या दृष्टीने अनुवादाचे क्षेत्र कसे विस्तारात चालले आहे, मागणी किती आहे या बद्दल सांगितले. त्याचबरोबर त्याचे महत्व, काम करण्याच्या पद्धती, काही कायदेशीर बाबी यावर प्रकाश टाकला. पांडुरंग कुलकर्णी यांनी अनुवादित साहित्य वाचनाचे त्यांचे अनुभव आणि प्रवास कथन केले. तर विजय पाध्ये यांनी त्यांचे तांत्रिक दस्तावेजांचे भाषांतर, त्याचे क्षेत्र यावर प्रकाश टाकला. त्यांचा याच विषयावर एक लेख मी पूर्वी ‘भाषांतरमीमांसा’ या पुस्तकात वाचला होता. त्यातील मुद्देच त्यांनी परत मांडले. त्या क्षेत्रातील काम करण्याची पद्धत कशी आहे, कोणती पथ्ये पाळावीत, तसेच मानधनाच्या मुद्द्यावर देखील प्रकाश टाकला. मी वर म्हटल्याप्रमाणे, हे क्षेत्र आणि त्यातील संधी वाढतच आहेत. शब्दाला शब्द आणि त्याला पैसे असा कारभार असतो. मी संगणक क्षेत्रात असल्यामुळे आणि आमच्या software productचे भाषांतराचे काम करवून घेण्याची जबाबदारी मी निभावल्यामुळे मला ते काय सांगताहेत हे समजत होते(त्या अनुभवाबद्दल लिहायचे आहे कधीतरी, पाहुयात)

साधारण १०० च्या आसपास अनुवादोछुच्क, अनुवादोत्सुक कार्यशाळेला हजर होते. ही कार्यशाळा मला विशेष भावली नाही. मसापने ही कार्यशाळा आयोजित केल्यामुळे अपेक्षा अशी होती की फक्त ललित साहित्यकृतीच्या अनुवादाचा विचार केला जाईल. तांत्रिक भाषांतर क्षेत्रांचा यात समावेश करण्याची गरज नव्हती. ते क्षेत्र आणि त्यातील गोष्टी ह्या इतर संस्था हाताळतायेत, आणि ते अगदी व्यावसायिक पद्धतीने काम चालू आहे. ललित साहित्यकृतीच्या अनुवादाचे क्षेत्र ही एक मुळात कला आहे, पण त्याला काही तंत्र, पथ्य देखील देखील आहे. ललित साहित्यकृतीच्या अनुवादाच्या क्षेत्रात गुणवत्ता वाढली पाहिजे, त्यावर जास्त लक्ष केंद्रित करावयास हवे होते. काही प्रात्यक्षिकांचा देखील समावेश करायला हवा होता. असो, हा पहिलाच प्रयत्न होता. पुढील कार्यशाळा ह्या सर्व गोष्टींचा विचार करेल अशी अशा आहे.

Advertisements

International Translation Day

Just couple of days ago, I learnt about observance of International Translation Day on Sep 30. And this is being observed for more than 50 years. I just thought, I write about it on the eve of this day. I, being active translator with one book under my belt, I feel I am qualified to write about it to some extent!

In India, we live in a multi-lingual society. Most of us know at least 3 languages-Hindi, English and local language. Ability to deal with multiple languages is termed as polyglot. I am also multi-lingual, with Kannada as my mother tongue, but having studied Marathi, English and Hindi during school days. I love languages. I made attempts to learn Urdu, Sanskrit, and long time back, German, too. I have not finished learning them yet. Also, being software professional, I had to deal with programming languages too! We learnt intricacies of translating or even interpreting, code written high-level programming languages to machine readable language. I still remember one our teachers in graduation period, stated that each one of the students will invent his/her own programming language. Unfortunately, his statement did not turn true, so far, at least! Every year or two, I come across some new programming language..now, I have stopped learning them.

Because of multi-lingual society in India, translation is in our DNA. This is true in Europe too. Most of European literature came to be known to rest of the world through their translations in English. During pre-Independence era in India, leaders such as Sane Guruji recognized the need of translation and formed an organization called Antar Bharati(आंतर भारती). Many Indologist translated Sanskrit texts which are part of Indian heritage to English and other European languages, due to which world became aware of India’s rich culture. Magazines such as Kelyane Bhashantar(केल्याने भाषांतर) have been working since last few years to bring foreign language literature to Marathi.

We also see that many experts, writers have commented on what is translation, what it is not, and process of translation itself. This forms body of knowledge related to translation activity, and even can be termed as philosophy of translation. Some experts like Dr Mangesh Nadkarni say,’ Translation is difficult art, and I don’t think there is one universally accepted measure by which all translations can be judged. Some are valued greatly because they are creations themselves-transcreations as they are called. I don’t mind what are called “literal” translations, closer to nuances of the original language than to those of the language in which the work is translated. The former sometimes sounds arty’. And some have termed translators as noble coolies. I also had come across essay of Jewish thinker Walter Benjamin titled ‘The task of translator’. This is worth reading. I also found this blog discussing the essay.

Couple of years back, Pune University started post-graduate course MA in translation. There have been already many institutes focused on translation, specifically professional and technical translation. We also have seen advancements in machine translation by Google which are employing computer assisted translation techniques. Some universities, such as University of Hyderabad, are also working on developing machine translation models for Indian languages based on Sanskrit grammar.

Translation of software is another beast altogether where concepts such as localization(L10N) and globalization(G18N) are employed. I have managed such projects in the past, and have interacted with translators all over the world, and also have used translator specific tools also. But this is topic of another blog.

Translation(or even interpretation), whether of books, or software, is now a big industry. And it is needing professionally qualified and competent translators. I am still learning the tricks of trade. Looking forward to your comments on this day dedicated to translation and translator’s community. Let me end this blog with a funny comment on translation, I don’t remember who made that. Translation is like a woman-if it is beautiful, it is not faithful, if it is faithful it is not beautiful.

काय वाट्टेल ते होईल!

पू. ल. देशपांडे यांनी, त्यांच्या स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त, काही इंग्रजी पुस्तकांचा देखील अनुवाद केला आहे. हेमिंग्वेचे एका कोळीयाने, मनोहर माळगावकर यांचे कान्होजी आंग्रे, ती फुलराणी, तीन पैशांचा तमाशा ही नाटके देखील अनुवादित आहेत. ‘काय वाट्टेल ते होईल!’ या त्यांच्या अनुवादित पुस्तकाचा मला काही दिवसापूर्वी अचानकच शोध लागला आणि मी घेतले. त्या पुस्तकाबद्दल लिहिण्याचा हा प्रपंच.  त्यांचे हे पुस्तक तसे दुर्लक्षितच म्हणावे लागले.

जॉर्ज आणि हेलेन पापश्विली(George and Helen Papashvily) यांचे १९४० मध्ये प्रकाशित झालेले ‘Anything can happen’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. भूतपूर्व सोविएत रशिया(USSR) मधील जॉर्जिया या प्रांतातून जगभर फिरून अमेरिकेत गेलेल्या जॉर्जी नावाच्या माणसाच्या सफरीची ही कहाणी आहे. हे पुस्तक जवळ जवळ लेखकाचे आत्म-वृत्तांत असल्यासारखेच वाटते. जॉर्ज पापश्विली हा देखील मुळचा जॉर्जिया प्रांताचाच. पहिल्या महायुद्धात इराण पर्यंत गेला होता. त्यानंतर इस्तंबुलला राहून पुढे अमेरिकेत गेला. तेथे त्याने अनेक व्यवसाय केले, यंत्र विशारद झाला, आणि पुढे शिल्पकलेत त्याने प्राविण्य मिळवले. त्याच्या कलेची अमेरिकेत खूप प्रशंसा झाली. त्याची पत्नी हेलेन हीचा जन्म कॅलिफोर्नियाचा.

पुस्तक छोटेखानी आहे-अवघ्या १८० पानांचे, परचुरे प्रकाशनाने प्रकाशित केलेले. अमेरिकेत जहाजाने ३७ दिवसांचा प्रवास करून, पाय ठेवल्यापासून जॉर्जीचा सुरु झालेला प्रवास, कॅलिफोर्नियापर्यंत धडकून, तो अगदी त्याचा हेलेनशी विवाह होऊन परत पूर्वेकडे व्हर्जिनियामध्ये स्थिरावण्यापर्यंतचा प्रवास, यात विविध रेखाटण्यात आला आहे. जॉर्जी हा साधा, इमानी मनुष्य आहे. या दुनियेतले छक्के-पंजे त्याला सहसा समजत नाही. त्याचे चित्र थोडेफार भोळसर रंगवलेले आहे. पुस्तकातले प्रमुख पात्र जॉर्जी हा जसा साधा आणि इमानी आहे, तसाच हळवा, माणुसकी असलेल्या, आपल्या मातृभूमीच्या प्रती/मातृभाषेच्या प्रेम असलेल्या मनुष्य आहे. त्याचे प्रत्यंतर वारंवार येत राहते. पू. ल. देशपांडे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, त्याच्या स्वभाव-विशेषामुलेच त्यांना हे पुस्तक मराठी आणावेसे वाटले. त्याच्या ह्या निवेदन किती सत्य आहे आपल्याला लगेच उमजते, कारण त्यांचे सर्व लिखाणच अश्या प्रकारच्या व्यक्तीच्या रेखाटनानी भरलेले आहे.

अमेरिकेतील पूर्व किनाऱ्यावरून त्याचा पश्चिमेकडे झालेला प्रवास, वाटेत भेटली माणसे, आलेले अनुभव, पोटासाठी त्याने केलेले उद्योग, आणि ठिकठिकाणी त्याला भेटलेले जगभरातले लोक, तसेच त्याच्या देशातून/प्रांतातून आलेले लोक यांना भेटल्यानंतरचा त्याला होणार हळवा आनंद, याचे सारे रम्य चित्रण यात आले आहे. हे सर्व चित्रण १९३०-३५ च्या आसपासच्या अमेरिकेचे असावे. मी स्वतः अमेरिकेत २० वर्षापूर्वी गेलो होतो, तेथे राहिलो, भरपूर प्रवास केला. त्याचे स्वजन भेटल्यानंतरचा होणारा आनंद जसा चितारला आहे, त्याच्याशी मला समरस होता आले, कारण मीही त्याच अनुभवातून गेलो होतो. अमेरिकेत सध्या coast-to-coast प्रवास करणे खुपच सोपे झाले आहे. पण १९३०-३५ च्या सुमारास तशी परिस्थिती नव्हती. त्याचेही दर्शन यातून होते.

कॅलिफोर्नियात गेल्यानंतर तो हॉलीवूड मध्ये छोटी-मोठी कामे-पडद्यावरील आणि पडद्यामागील दोन्ही, करायला लागतो. एका प्रकरणात त्याचे तपशीलवार वर्णन आले आहे. ते वाचून तर मला अमेरिकेत १९५०-६० च्या दशकात प्रसिद्ध असलेल्या Lucy I Love You नावाच्या टीव्ही सिरिअल मधील एका एपिसोडची आठवण झाली. यात लुसी आणि तिचा मेक्सिकन नवरा, त्यांचे मित्र, हे सर्व पूर्वेकडून कॅलीफोर्निआत जाऊन हॉलीवूड मध्ये काम करण्याची हौस कशी भागवतात आणि त्यांची  कशी तारांबळ उडते याचे बहारदार चित्रण आले होते. दुसऱ्या एका प्रकरणात, त्याचे ‘शुभ मंगल’ होते त्याचे वर्णन आले आहे. ते सुद्धा मजेशीर आहे. जॉर्जीअन माणसांची स्वभाव वैशिष्टे यांचे दर्शन होते.

पुलनी वापरलेल्या भाषांतराची शैली मात्र मजेशीर आहे आणि ती त्यांनी जाणून बुजुनच तशी ठेवली आहे हे उघडच आहे. जॉर्जीचा साधेपणा, भोळसरपणा दर्शवण्यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी बाळबोध आणि हास्यास्पद शब्द रचना वापरली आहे. त्यामुळे, माझा तरी बऱ्याच ठिकाणी पुस्तक वाचताना रसभंग झाला. लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकासारखे हे पुस्तक आहे असे वाटत राहिले. मुळात ते तसे नाही. मूळ इंग्रजी पुस्तक नंतर मी इंटरनेट वरून मिळवून वाचले. काही शब्द पहा: फर्स्टक्लासच्या एवजी फस्सक्लास, युअर ऑनेस्टी च्या एवजी युअर ऑनेष्टी, कस्टम अधिकारी एवजी कष्टमसाहेब, मूळ पुस्तकात काही ठिकाणी लेखकाने जॉर्जीअन व्यक्ती जेव्हा इंग्रजी बोलते तेव्हा त्याचा उच्चार थोडा वेगळा असतो, ते दाखवण्यासाठी काही इंग्रजी शब्दांची मुद्दामहून वेगळे वापरले आहेत. पण ते मराठी आणताना, त्यांनी वापरलेल्या मार्ग थोडा फसल्यासारखा वाटतो. काही ठिकाणी सरळ सरळ भाषांतर हे वादातीत ठरावेत असे दिसते. उदा. पनीर शब्द. हे त्यांनी इंग्रजी पदार्थ cheese याला वापरले असावे. मूळ इंग्रजी पुस्तकात जॉर्जीअन भाषा, खाद्य पदार्थ यांचे संदर्भ बरेच आहेत. त्यातील काही भाषांतरात उतरले आहेत, त्यामुळे थोडीफार कल्पना येते, पण काहीसा अपुरा, अधुरा राहिल्यासारखा वाटत राहतो.

सुभाष अवचटांची रेखाचित्रे आणि मुखपृष्ठ उत्तम झाली आहेत आणि अनुरूपपणे पुस्तकात वापरली गेली आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने इंटरनेट वर माहिती शोधताना आणखी संदर्भ मिळाले. जसे की अमेरिकेत मूळ लेखकाच्या नावाचे एक स्मारक आहे, तसेच जॉर्जिया आणि अमेरिका यामधील संबंध यावर असलेला एक ब्लॉग सापडला. ते संदर्भ आणखी अभ्यासायला आणि मूळ इंग्रजी पुस्तक विकत घेवून परत वाचायला मला नक्कीच आवडेल.