Leavenworth and Reindeer Farm

जानेवारीचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत. ह्या वेळची सिएटल भेट आता संपत आली आहे. एकच वीकेंड राहिला आहे. अजून बरेच काही भटकायचे राहिले आहे. पोर्टलंड बघण्याचे राहिले आहे (पोर्टलंड खाली दक्षिणेकडे ओरेगॉन राज्यात आहे, जमले तर ओशो रजनीश यांच्या तेथील कधीकाळी असणाऱ्या आश्रमाच्या भागात जाऊन यायचे होते. Netflix वर त्यांच्या विषयी एक माहितीपट आहे.) हा वीकेंड हवामानाच्या दृष्टीने चांगला असणार होता. सूर्यप्रकाश असणार होता. सिएटल पासून अडीच तीन तासांच्या अंतरावर असणारे लेव्हनवर्थ (Leavenworth) नावाचे डोंगरांच्या कुशीत वसलेले गाव आहे, ते ह्या वीकेंडला जाऊन पाहून यावे म्हणून तेथे गेलो. त्याबद्दल आज लिहितो आहे.

अमेरिकेत डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे कडाक्याच्या थंडीचे असतात. थंडीचा मौसम असतो. देशात जवळ जवळ सगळी कडे बर्फ पडतो. सिएटल मध्ये बर्फ थोडेफार पडते. लेव्हनवर्थ हे गाव सिएटल पासून ईशान्येला १५० मैल लांब आहे. चोहोबाजूने डोंगर. ह्या थंडीच्या मौसमात तेथे देखील भरपूर बर्फ पडतो. ह्या वेळेस इतका पडला कि स्थानिक सरकारला अमेरिकेच्या सैन्याला पाचारण करावे लागले बर्फ हटवायला, एवढा सात आठ फुट बर्फ पडला होता आणि सगळ्या गावात साचला होता. सगळे चलनवलन थांबले होते.

आम्ही गेलो तेव्हा मस्त सूर्य आकाशात तळपत होता. डोंगरावर आणि शहरात ठिकठिकाणी बर्फ तर होताच. त्यामुळे थंडी देखील होती. लेव्हनवर्थला जाण्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ते शहर हे जर्मनीतील एखाद्या गावाप्रमाणे आहे (Bavarian). मी दहा एक वर्षांपूर्वी युरोप भटकंतीच्या वेळी जर्मनीत गेलो होतो. अमेरिकेतील शहरे तशी एकसारखी दिसतात, एकाच छापासारखी. कुठे जा तश्याच प्रकारची दुकाने, घरे, रस्ते, वगैरे. विविधता अशी चटकन दिसत नाही. त्यामुळे तो एक उत्सुकतेचा भाग होता. तसे अमेरिकेत , प्रामुख्याने मोठ्या शहरात, दुसऱ्या कुठल्या तरी देशांतून स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्या असतात. तेथे गेलो कि त्या त्या देशाचा ‘फील’ येतो. पण लेव्हनवर्थ हे अख्खे गावच वेगळे आहे. तसाच काहीसा अनुभव मला पूर्वी अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात गेलो असता आला होता. त्या शहरापासून जवळच आमिश (Amish) लोकांची वस्ती असलेले एक वेगळेच गाव आहे. त्यांचे जीवन बरेच वेगळे असते, त्याबद्दल पाहायला मिळाले. तसेच सिएटल शहराजवळ अजून एक गाव, Poulsbo नावाचे, आहे जे नॉर्वेच्या स्थलांतरित लोकांनी वसवले आहे. तेथे मी गेलेलो नाही.

सिएटल शहरातून निघून पुढे दोन क्रमांकाच्या हमरस्त्यावर Stevens Pass नावाचा घाटरस्ता येतो. या भागात मी साधारण महिन्याभरापूर्वी , ख्रिसमसच्या आदल्या दिवशी, आलो होतो. येथे Heybrook Lookout नावाचा छोटासा पदभ्रमण करण्यासाठी डोंगररस्ता आहे तेथे गेलो होतो. आणि पुढे Skykomish नावाचे छोटेसे गाव आहे. तेथे जुन्या काळातील (१८९० ते १९७४) Great Northern & Cascade Railway चे स्टेशन होते. सगळा भाग बर्फाखाली गडाला गेला होता. ह्या वेळी आम्ही तसेच पुढे घाटरस्ता पार करून पुढे गेलो आणि लेव्हनवर्थच्या अलीकडे काही मैल Lake Wenatchee नावाच तलाव आहे आणि त्याच नावाचे state park आहे. तेथे आम्ही गेलो. जवळपास अर्धेअधिक तलाव बर्फ झाले होते. सगळीकडे बर्फच बर्फ होते. बर्फात विविध खेळ खेळण्याची व्यवस्था तेथे होती, तसेच तंबू टाकून मुक्काम करण्याची देखील सोय होती. दोन तीन तसे तंबू देखील दिसले. तेथे जवळच एक छोटेसे हॉटेल होते. त्याच्या बाहेर मस्त शेकोटी पेटवून ठेवली होती. मस्त शेकत गरम गरम कॉफी प्यायली.

पुढे मग लेव्हनवर्थ गावात गेलो. अमेरिकेची प्रवासी रेल्वे Amtrak चे स्टेशन आहे. गाव तसे मोठे नाही. पर्यटन येथील प्रमुख उद्योग. त्यातही आजूबाजूच्या डोंगरांवरून हिवाळ्यातील खेळांसाठी प्रसिद्ध. उन्हाळ्यात विविध डोंगररस्त्यांवरून भटकंती साठी देखील प्रसिद्ध. वर्षभर कायम काही काहीना उत्सव होत असतात, पर्यटकांसाठी आकर्षित करण्यासाठी. जर्मन गाव असल्यामुळे त्यांचे आवडते पेय बियर ठिकठिकाणी मिळते, ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबरफेस्ट होतो. गावात प्रवेश केल्या केल्या माहोल बदलला. रस्त्यांवर जर्मन नावे दिसू लागली. दुकानांची, हॉटेल्सची नावे देखील जर्मन नावे. अचानक एका चौकात घोडागाडी दिसली! त्यात बसून लोकं सैर करत होते. जवळच बर्फात खेळण्यासाठी सोय केली होती, बरीच मुले तेथे घसरगुंड्यासारखे खेळ खेळत होते. एका कोपऱ्यात मला nutcracker museum अशी पाटी दिसली, पण ते बंड होते. मला ते पहायची खूप इच्छा होती. नुकतेच मी The Nutcracker नावाचे नाटक पाहिले होते. Nutcracker हे जर्मन परंपरेचा भाग आहे.

अमेरिकेत हिवाळ्याच्या दिवसात पर्णहीन वृक्षांवर रोषणाई केलेली दिसते. ती अगदी हिवाळा संपेपर्यंत असते. याचे प्रमुख कारण म्हणजे दिवस छोटा, रात्र मोठी. त्या छोट्या दिवसात देखील सूर्य उगवणे, सूर्यदर्शन होते हे दुरापास्त. हे दिवस त्यामुळे तसे मानसिक खच्चीकरण करणारे असतात. ह्या रोषणाई मनाला थोडीफार उभारी मिळते. ख्रिसमस आणि नूतन वर्षांच्या आसपास तर अशी रोषणाई पुष्कळ ठिकाणी असतेच. लेव्हनवर्थचे हि अशी रोषणाई प्रमुख आकर्षण आहे. अतिशय मनोवेधक रोषणाई आम्हाला पाहायला मिळाली.

शेवटी मग अजून एक आगळे वेगळे आकर्षण म्हणजे रेनडियर (Reindeer) फार्म पाहायला गेलो. आपण सगळ्यांनी ख्रिसमस सणाच्या निमित्ताने रेनडियर बद्दल ऐकले असते, पाहिले असते. रेनडियर ओढत नेत असलेल्या गाडीवर सांताक्लोज बसून फिरतो आहे असे दृश्य पहिले असते. शाळेत असताना एस्किमो लोकांबद्दल शिकताना रेनडियर आणि त्यांच्या जीवनातील त्याचे महत्व याबद्दल वाचले असते.

गावाच्या एका टोकाला हे फार्म वसले आहे. खरे तर रेनडियर हा प्राणी फक्त उत्तर ध्रुवावर आढळतो. पण अमेरिकेत अनेक ठिकाणी लोकांनी खासगी रित्या त्या भागातून रेनडियर आणून त्यांचे संगोपन करत आहेत, काही ठिकाणी छंद म्हणून तर काही ठिकाणी त्याचा व्यावसायिक फायद्यासाठी देखील! तसाच काहीसा प्रकार येथे देखील पाहायला मिळाला. आमच्या सारख्या पर्यटकांना रेनडियर दाखवून त्यातून ते थोडीफार कमाई करतात. फार्म मध्ये २५-३० रेनडियर दिसले, विविध वयोगटाचे, लहान मोठे असे. ते चांगलेच माणासाललेले होते. आम्ही आत गेलो तर त्यांना बिलकुल भीती, भीड नव्हती. अगदी सहज ते आमच्या जवळपास फिरकत होते. हात लाऊन देत होते. आम्हाला रेनडियरन भरवण्यासाठी त्यांचे खाद्य देण्यात आले होते, ते आम्ही आत गेलो आणि अगदी सहजपणे ते रेनडियरन भरवत होतो. मजा आली.

आम्हाला आत सोडण्याच्या आधी १०-१५ मिनिटे आधी फार्मबद्दल, त्यांच्या उपक्रमाबद्दल, रेनडियर प्राण्याबद्दल बरीच मनोरंजक माहिती देण्यात आली. हा सारा उपद्व्याप ते सारे कुटुंबच करत आहे. जगातील अनेक ठिकाणी असे रेनडियर फार्म्स आहेत. मंगोलिया, चीन, युरोप मध्ये देखील आहेत. रेनडियर हे खरे तर त्यांच्या डोक्यावर असलेल्या शिंगांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे असे अनेक शिंगे (antlers) होती, ती त्यांनी आम्हाला हाताळू दिली, बरीच वजनदार होती.

अशी हि फार्मची सैर संपल्यानंतर जाताना गरम गरम apple cider, hot chocolate देण्यात आले, त्या थंडीत त्याची लज्जत काही औरच होती.

Klondike Gold Rush Museum

परवाच , जानेवारी १७, २०२२ रोजी,अमेरिकेतील नागरी हक्कांच्या साठी चळवळ उभे करणारे आफ्रिकन-अमेरिकन नेते, आणि आफ्रिकन-अमेरिकन लोकांच्या इतिहासातील मोठे नाव मार्टिन ल्युथर किंग यांच्या जयंतीचा दिवस(तिसरा सोमवार, मूळ तारीख जानेवारी १५) साजरा झाला. मी सध्या ज्या अमेरिकेतील सिएटल शहरात आहे, ते शहर वॉशिंगटन राज्याच्या किंग कौंटी प्रांतात येतो. तो प्रांत मार्टिन ल्युथर किंग यांच्या नावेने आहे. खरे तर तो पूर्वी अमेरिकेचे या भागातील एक उपाध्क्ष्य यांच्या नावेने हा प्रांत अस्तित्वात आला होता. पण नंतर मार्टिन ल्युथर किंग यांच्या नावाने केला गेला.

असो. मी आज सिएटल शहरात असलेल्या एका अनोख्या संग्रहालयाबद्दल लिहिणार आहे. २०१९ च्या मे महिन्यातील सिएटल भेटी दरम्यान येथे आलो होतो. सिएटल शहराला emerald city असे देखील नाव आहे, कारण शहरात असलेली हिरवाई, आणि ते वसले आहे सात टेकड्यांवर! आणि ते खरेच आहे. सिएटल शहराचे नाव येथील एका आदिवासी जमातीच्या प्रमुखाच्या नावाने आले आहे. त्या प्रमुखाला चीफ सिएटल असे म्हणतात आणि त्याचा पुतळा एक दोन ठिकाणी उभारला गेला आहे. आपल्याला माहित असेल अमेरिकेतील पश्चिम भाग, म्हणजे मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील भाग हा गोऱ्या लोकांनी स्थानिक लोकांवर (native Indian) अत्याचार करून, त्यांना हुसकावून लावून आपल्या काब्ज्यात घेतला आहे. हा अतिशय दुर्दैवी असा इतिहास आहे. ह्या बद्दल, एका इंडिअन रिजर्वेशनच्या भेटीच्या निमित्ताने मी लिहिले आहे. मी एक पुस्तक नुकतेच वाचले, ज्याचे नाव डाकोटा असे आहे, लेखक Matt Braun, ज्यात रूझवेल्ट नावाच्या एका अमेरिकेच्या अध्यक्षाच्या या डाकोटा भागातील जीवनावर, तेथे त्याचे स्थानिक आदिवासी यांच्या असलेले संबंध, आणि एकूण गोपालन(cattle ranch) व्यवसाय याबद्दल आहे. ह्या आदिवासींच्या म्हशी/रेडे/गवे यांना मारून, आदिवासींना कसे निष्प्रभ करून आपला cattle ranch व्यवसाय ह्या गोऱ्या लोकांनी वाढवला या बद्दल माहिती आहे. अभिनेता केव्हिन कॉस्टनर याच्या Dances with Wolves नावाच्या चित्रपटात देखील या प्रकारचे चित्रण छान आले आहे.

पुढे अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी सोन्यामुळे सिएटल शहराचे रूपच पालटले, अतिशय भरभराट झाली. सिएटल मधील Kondike Gold Rush National Historic Park हे संग्रहालय त्या दिवसांबद्दल माहिती देणारे असे आहे.

खरे तर कॅलिफोर्निया मध्ये १९४८-४९ मध्येच सोने सापडले आणि तिकडे लाखो लोकं येऊ लागले आणि त्यामुळे त्या भागाची अतिशय भरभराट झाली. आणि अर्थात सोने मिळणे अवघड होऊ लागल्यावर, बरीच लोकं ती गावे सोडून गेली आणि ghost towns देखील तयार झाली. मी या भागात काही वर्षांपूर्वी फिरलो होती, त्याबद्दल लिहीन नंतर कधीतरी. पण तसाच प्रकार सिएटल मध्ये देखील १८९६ मध्ये झाला. अर्थात सोने खुद्द सिएटल मध्ये नव्हते सापडले, तर ते सापडले ३००-४०० मैल उत्तरला, आत्ताच्या कॅनडा मध्ये Klondike गावात. पण अमेरिकेतील लोकांना तेथे जाण्यासाठी सोयीचे ठिकाण म्हणून सिएटल चांगले होते. त्यामुळे इथे लोकांचे लोंढे येऊ लागले. त्यामुळे सारेच बदलले. चार्ली चाप्लीनचा The Gold Rush नावाचा १९२५ चा तुफान विनोदी चित्रपट Klondike वर आधारित आहे असे म्हणतात.

पण हे सारे रामायण घडण्याच्या काही वर्ष आधी(१८८९), सिएटल शहरात एक मोठी आग लागली आणि त्यात जवळ जवळ सारे शहर भस्मसात झाले. ते परत उभे राहिले आणि ह्या gold rush मुळे आणखीन त्याची वाढ झाली.

ते संग्रहालय पायोनिअर स्क्वेअर भागात आहे. दोन मजली इमारत आहे ह्या संग्रहालयाची. या gold rush च्या दिवसांबद्दलच्या अनेक गोष्टी त्यांनी जतन करून ठेवल्या आहेत. त्यावेळी हि लोकं नदीतून सोने कसे चाळून (pan) काढत असत त्याचे प्रात्यक्षिक तेथे दाखवले जाते, तसेच आपल्यालाही करता येते. त्यावेळी लोकांनी वापरलेल्या विविध वस्तू, विविध भागातून सिएटल मध्ये लोकं कसे आले, आणि येथुन Klondike ला कसे गेले याची माहिती, चित्रीफित वगैरे आहे. सिएटल बंदराची देखील या घडामोडीमुळे खूपच वाढ झाली. येथूनच समुद्रमार्गे लोकं उत्तरेला कॅनडात जात आणि पुढे मग इप्सित स्थळी जात असत. तो सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग होता. पण पुढे गेल्यावर कॅनडात अतिशय त्रासदायक. भयंकर थंडी, बर्फ, पर्वतरांगांतून सगळे समानसुमान घेऊन जाणे, हे एक दिव्यच होते. सिएटल मध्ये प्रवासात जाण्यासाठी लागणारे समान, गरम कपडे, खाण्यापिण्याची बेगमी करत. त्या लोकांना सिएटल मध्ये राहण्यास अनेक हॉटेल्स उभी राहिली. एकूणच दळणवळण वाढीस लागले. या सर्वांची माहिती त्या संग्रहालयातील park rangers अगदी समरसतेने, न कंटाळता, रोचक रीतीने सांगत असतात. त्यातीलच सिएटल मधील एक कंपनी, Frye-Bruhn Meat Packing Company, जी Charles Frye याने सुरु केली होती. या लोकांना विविध प्रकारचे डबेबंद मांस पुरवेल. तिची देखील भरभराट झाली. त्याच्या नावाने सिएटल मध्ये एक कला संग्रहालय (Frye Art Museum) आहे, तेथे गेलो असता मला हि गोष्ट समजली.

Klondike भागातील स्थानिक आदिवासींवर देखील या घुसखोरीमुळे संकट आले. त्याबद्दल देखील येथे सांगितले जाते. त्यांची कशी त्या भागातून हकालपट्टी करण्यात आली, त्यांना क्रूरपणे, शास्त्रात्रांच्या बळावर त्यांना हाकलले गेले. Klondike नदीच्या भागात बेसुमार वृक्षतोड झाली. अर्थात कालांतराने जसे सोने मिळणे अधिक खर्चिक आणि अवघड होऊ लागले, हा व्यवसाय, हि धामधूम ओसरली. त्याचेही दुष्परिणाम Klondike भागावर झाले. पण सिएटल शहराने मागे वळून पाहिले नाही. तिची उत्तरोत्तर भरभराट होतच राहिली आहे. सिएटल बंदर उत्कर्षाला पावले होते, त्यामुळे आपसूकच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जहाज बांधणी व्यवसाय जोमात सुरु राहिला. आणि नंतर विमान बांधणीचा बोईंगचा उद्योग ह्या शहराला आणखीन पुढे घेऊन गेला.

पुढे मागे केव्हा तरी कॅनडाला गेल्यावर Klondike आणि आसपासचा भाग बघायला हवा. बघूयात कसे जमते ते!

Mt Rainier and Olympic National Parks

Today, I want to write about my experiences with two of the beautiful national parks which can be accessed from city of Seattle. In the past, I have written about some of the national parks I have visited in the past, during my earlier visits to various parts of USA. You may read about Joshua National Park, for example.

National Park Service (NPS) is one of the most significant federal government projects took up by USA more than 100 years ago. All across the country, it earmarked and reserved huge forest area to protect wildlife, flora and fauna and most importantly the serene, natural beauty of these areas. More than 400 national parks cover about 4% land of the country. The NPS is a quite active organization. The parks are well maintained, visitor centers, access roads, various facilities inside the park are kept up-to-date year round. The park rangers are helpful and courteous.

During my visit to Seattle, which began in November of 2021, I made a trip to Mount Rainer National Park the next weekend. It is located south of Seattle. This mountain and other mountain called Mount Baker (located north-east of Seattle) are ever visible, always snow capped. It was fag end of fall season. There was cold in the air and rains too. Fortunately, that day it was not raining and it was sunny as well.

Mount Rainier National Park is nation’s fifth park. The mountain itself is 14,410 feet tall, which also has a volcano. It usually snow covered, but at times one can see black colored basalt rock beneath at times. This mountain has been important place for native American tribes of Pacific Northwest region.

By the time we reached the parking lot, it was almost afternoon. It was sunny. The visitor information center was closed. One of the things you do is to explore those many trails the park has. Due to limited time, we had to contend ourselves with one trail called Rampart Ridge Trail.

On the way back, we stopped at Paradise area for food. It had an Ukrainian cuisine restaurant near Ashford town, located in Paradise Village Hotel area.

Mount Rainier National Park is something you keep going again and again, if you live in Seattle. Every season has different thing to offer. Even they allow night treks too and have heard that one can spot millions of stars from the mountain on a clear day. Other day, I visited Seattle’s Frye Art Museum where I found a painting of Mt Rainier by American painter Eustace Paul Ziegler (1881-1869). I could not resist sharing it here, this undated oil painting on canvas titled Pack of Horses.

In the month of January of 2022, I made a trip to Olympic National Park, which is towards north-west of Seattle, bordering Canada on one side. This park also has a Mount Olympus inside it. It was early winter. But it has been snowy conditions for quite a few days already. It was a sunny weekend though.

We traveled to town called towards south of Seattle, beyond Tacoma, via town of Olympia(which is capital of state of Washington). After a an hour or so on the highway, we entered the Olympic National Forest area from south west side. Our first stop was at Kalaloch Beach. This is just off the road, easily accessible. It was low tide time as put our feet on the expansive sandy beach. There is a peculiar tree somehow survived it seems, called Tree of Life.

After that we went deeper inside of the park. There is an interesting trail, which takes you to a rain forest middle of the park. It is called Hoh Rain Forest. Mild winters, cool summers and up to 12 feet of annual precipitation produce giant conifers in the forest. Maple trees hosts mosses on them, which are called plants on plants. The area having those trees with mosses is called Hall of Mosses. I also witnessed many dead and downed trees on the trail way, which are decaying, and hosts these mosses in large quantity. I also got a glimpse of Hoh river which seems to originate on glaciers of Mount Olympus in the park.

It was late afternoon already. We were targeting to reach resort by 5, just after sunset. We stopped in town of Forks on the way and grabbed Mexican food and chose to eat inside of the car, instead of dining inside. Our resort was located right beside the ocean, on First Beach. It was inside Quileute Indian Reservation, about which I have written about here. The hotel did not have wi-fi, neither did it have mobile network, and television. It was feeling as if we are now with Quileute Indians of the bygone era!

First Beach at near La Push town

But this helped us to enjoy more the nature around us, and the group had some bonding too. Interestingly, the resort folks had kept few books about local tribes, their history and art. It was good to spend time reading that. The heaters in couple of rooms did not work, hence summoned repair man. He was seemingly of native tribe.

Wooden log at Forks town

Next day early morning, after a quick tour of La Push town, we headed to Second Beach. It was 0.8 mile trail, with a climb up and down to reach the serene beach, surrounded by rocks.

After starting from there, just on the outskirts of Forks town, we spotted Roosevelt Elks, native of this forest. Later we stopped at Lake Crescent. We also went to town of Port Angeles. One can see up close the Canadian side across the strait from the town.

Our last stop was to be at Hurricane Ridge. The road to the ridge was about 17 miles from Port Angeles and is situated at the altitude of 5242 feet. The parking lot on the ridge was full, and hence park rangers were controlling entry for additional vehicles only after a parking bay opened up. The road had lot of snow still, and on the sides of the road. The ridge is famous for winter sports activities such as skiing, snowshoeing, snow tubing, snow boarding. It was sunny and cold. It was now all over. One could see sun lit mountain range on all the three directions from the ridge.

The way back was a treacherous drive home, though we quickly got out of the ridge area before everyone starts driving back, to avoid the returning traffic jam.

Year-end Wander in Seattle

The year of 2021 began with me going for a hike early morning Pashan to Baner hill trail. It was nice and cold. I was feeling content to begin the year by being in the nature. Things were slowly getting relaxed in terms of COVID-19 related restrictions in Pune area, after an horrible year of 2020. I witnessed the first sunrise of year atop the hills. It was a great start. And, in fact, the exploration of hills around Pune continued through the first quarter. It was a great to experience them again. I had written about hills around Pune in a blog sometime back, especially in the context of saving them from rampant construction and deforestation on and around them.

As far as travel is concerned, it was not all that great. India was hit by another wave of COVID-19. As things got better again by August, I made a trip to Bangalore. The trip did not happen for long time due to pandemic again. It was a welcome break of two weeks there.

I got to travel to USA middle of November to the city of Seattle, after the country relaxed travel ban for foreigners. I have had few chances of visiting few places around Seattle and have written about it on my blog. And interesting nugget here, comparing Pune and Seattle, as far as topic of hills is concerned. Seattle is a city atop seven hills. Out of that one hill called Denny Hill was regraded(ie. flattened) completely almost hundred years ago. It would interesting to learn more about what happened to environment because of this, as we speak of saving hills. BTW, the best way to see the new city is take up a zigzag walk, as famous author Ruskin Bond says in his book Potpourri. He says, ‘…The only way you could really come to know a place well was to walk in truly haphazard way. To make the zigzag walk, you to take first turning to left, and then to the right, and the first left and so on. It can be quite fascinating provided you are not in hurry to reach your destination…’. And this is exactly, I did when I was exploring Seattle downtown!

Anyways, as the winter started setting slowly in the city of Seattle and days began shorter, one can see trees decorated with lights all over them. It is pretty good sight. Very quickly Thanksgiving Day passed, and so did Christmas. The country started seeing rage in terms of COVID-19 cases, particularly Omicron variant and also snow blast across the country. It was both difficult and scary to go for any long journey.

The year end day finally arrived. Just to make year end special, I planned couple of things. On the last day 2021, it was bitter cold and lot of snow still around (as it has snowed the whole of last week of the year), but it was quite sunny at the same time, I decided to visit Seattle Asian Art Museum atop Volunteer Park. Earlier, I had decided to walk up there, but later resorted to going there by car. It was bit challenging driving up the hill of Volunteer Park the hardened snow on the road. Once reaching the top, I came across in front of me, the park’s vast expanse was blanketed by at least a feet of snow all over. Right in front of the museum building, I saw the pond, of which, water had turned into ice. Before going to the museum, I walked over to the cemetery which having burial site of famous actor and martial arts person Bruce Lee. But unfortunately, the entry was closed for some reason.

This museum is managed Seattle Art Museum foundation which has couple of other museums under its purview. I have visited both. One is Olympic Sculpture Park and other one is Seattle Art Museum. This one at Victoria Park is more focused on Asian art. It has collection of artifacts from India, Pakistan, China, Japan, and other Asian countries such as Cambodia. I also found paintings of Gwalior’s Scindia rulers and also Holkar rulers, of Maratha period, of Maratha period. The building which was built in 1933, itself is a majestic building. Right at the entrance, one finds 12th century sculpture of Kamdev and on the backside, a sculpture of Ganesh. There are many sculptures of Buddha and his time, also of his various incarnations.

Later in the day, I went to Alki Beach. I wanted to be there to witness last sunset of the year 2021. This was my second visit to the beach. Due to closure of West Seattle bridge for repairs, it was a long detour. The bitter cold breeze welcomed as soon as we alighted from the car. The sidewalk had all hardened ice on it. The bitter cold breeze was flowing. The waves were banging the guarding wall. The sand on the beach is not quite white though. The far end has the house right on the beach and the beach area there is a private one. The Alki Beach area where the first settlers arrived from east coast in 1851. Their names are there on the pillar which is erected, that has a note thanking native community for their help that time. These first settlers are called The Denny Party. Since they came from New York city, you will find mini Statute of Liberty also here on the beach. The beach also has a pillar commemorating first transcontinental motorized caravan from Plymouth Rock to Alki, displaying the rock stone bought from Plymouth Rock area.

As the sunset neared, we went across the area called Alki Point, from where the sunset view is fabulous, as sun drops in the waters. Alki Point lighthouse was visible in the waters. This is located in west Seattle area. We bid goodbye to the last sunset of the year from Alki Point. The residential buildings across the street were lit in gold as the sun set. As the it turned dusk, we started our return journey. I was astonished to see the golden glitter of Seattle skyline which is visible from the beach. The marvelous effect of the dusk light on those glass building created a vista worth of watching.

The year and the day ended with watching fireworks at Seattle’s famous icon Space Needle. The fireworks did not happen last two years due to pandemic. This year also, it was not certain, due to rising Omicron and general corona cases in the US. Even though Space Needle itself was closed to public on a precautionary note, lot of people flocked the area to get a glimpse of fireworks. The climax happened as the clock ticked 12 midnight and the year of 2022 began. Take a look at video shared by Space Needle.

2021 Year-end firework at Space Needle in Seattle

Happy New Year, 2022!

Under the hood of Paramount Theater

Paramount Theater च्या अंतरंगात

मी सिएटल मध्ये राहत असलेल्या जागेपासून ऐतिहासिक असे Paramount Theater एखादा मैल असेल नसेल एवढ्या अंतरावर आहे. नेहमी दृष्टीस पडे. पण एखादे musical किंवा नाटक आवर्जून पाहावे असे काही लागत नव्हते. नुकतेच मी The Nutcracker देखील पहिले होते. पूर्वी देखील फिलाडेल्फिया आणि न्युयॉर्क भेटी दरम्यान काही नाटके पहिली होती. त्यामुळे अमेरिकेत नाटके पाहण्यातील नाविन्य तसे गेले होते. आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देखील तीन तीन हजार लोकांसोबत नाटके पाहण्याचे टाळत होतो. Paramount Theater ची सैर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी असते हे कुठूनतरी समजले होते. त्यामुळे मी २०२२ च्या पहिल्या दिवशी, जो शनिवार होता, त्या दिवशी मी सकाळी सकाळी लवकर उठून दहाच्या आधीच तेथे धडकलो. अश्या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या अंतरंगात शिरायला, इतिहास ऐकायची संधी मी सोडणार नव्हतो. मी मुंबईच्या ऐतिहासिक Royal Opera House मध्ये गेलो होतो काही वर्षांपूर्वी. त्यावेळेस मी जमेल तसे ते नाट्यगृह पहिले होते. पण असा इतिहास सांगणारा कार्यक्रम तेथे नव्हता आणि अजून नाही.

Paramount Theater च्या बाहेर सगळीकडे सामसूम होती. रस्त्यावर आजूबाजूला घट्ट झालेला बर्फ अजून तसाच पडला होता. मी सोडून तिकडे कोणी अजून फिरकले नव्हते. लोकं आज येतील कि नाही शंकाच होती आणि तसेच त्यामुळे नाट्यगृह दर्शनाचा कार्यक्रम रद्द होतो कि काय असे वाटत होते. मी नाट्यगृहाच्या तिन्ही बाजूला चक्कर मारून आलो. जुनी इमारत होती. विटांचे बांधकाम दिसत होते. My Fair Lady चा दुपारी प्रयोग होणार होता. त्याचे फलक लागले होते. पु ल देशपांडे यांचे ती फुलराणी हे नाटक याच नाटकाचे रुपांतर आहे, याची मनात आठवण झाली. बरोबर दहा वाजता एक जण माझ्याजवळ आला आणि मला नाट्यगृहाच्या दर्शनाच्या सैरी साठी आलो आहे के ते विचारले. मी हो म्हटले. त्याने मग काही वेळ इतर काही जण येत आहेत का ते पाहूयात आणि सैर करू यात असे म्हटले. मला आश्चर्याचा धक्का बसला. मला वाटले तो म्हणले जेवढे हवे तेवढे लोकं नाही म्हणून सैर होणार नाही असे म्हणेल. ती व्यक्ती नाट्यगृहाची व्यवस्थापक होती, त्याचे नाव Mason Sherry.

आणि काही वेळाने खरेच त्याने मला एकट्याला घेऊन सैर सुरु केली. जवळ जवळ दीड तास तो मला घेऊन नाट्यगृह, त्याचा इतिहास अगदी उत्कटपणे नमूद करत होता. त्याचा एक सहकारी देखील काही वेळाने तेथे आला आणि त्याने एका ऐतिहासिक पियानो बद्दल माहिती तेवढ्याच उत्कटपणे दिली. गेली दोन वर्षे हा कार्यक्रम झाला नव्हता. २०२१ च्या ऑक्टोबर मध्ये परत सुरु करण्यात आला होता. हे नाट्यगृह सुरु झाल्यापासून त्याची मालकी, हस्तांतरण, देणगीदार याबद्दल देखील त्याने सविस्तर माहिती दिली.

आम्ही आत गेलो तो समोर रंगमंचावर My Fair Lady च्या दुपारच्या प्रयोगाचे नेपथ्य करून झाले होते. १९२८ मध्ये Seattle Theater नावाने सुरु झालेल्या ह्या नाट्यगृहाबद्दल सांगायला सुरुवात केली. १९२० चे दशक अमेरिकेत मूकचित्रपटाने व्यापले होते. खरे तर हे मूकचित्रपट दाखवायला म्हणून हे ३००० आसनक्षमतेचे चित्रपटगृह म्हणून सुरु झाले. तो म्हणाला कि सुरुवातीची बॉक्स ऑफिसची जागा मुख्य दरवाजाच्या मध्यभागी होती. नंतर ती एका बाजूला करण्यात आली. Grand Lobby मध्ये उभे राहिल्यावर दिसणारा आजूबाजूचा भाग, भिंतीवरची सोनेरी फुलापानांची कलाकुसर, भले थोरले chandelier, दरवाज्याच्या वरच्या भागात The Lion King नाटकातील सिम्बाच्या चेहऱ्याचे शिल्प, ख्रिसमस ट्री उलटा टांगायला असलेले मजबूत असा आकडा असे सर्व तो अखंड बडबड करत सांगत होता.

नाट्यगृहातील आसन व्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचे तो वर्णन करू लागला. मुख्य भागातील जवळ जवळ दोन हजार आसने एका बाजूला सारून भलेमोठे पटांगण तयार होईल अशी व्यवस्था नाट्यगृहात आहे. तशी व्यवस्था जगात कुठेच नाही. त्याने मला नंतर खाल्याचा मजल्यावर गेल्यावर ती व्यवस्था कशी चालते याचे दर्शन मला घडवले. असंख्य hydraulic systems द्वारे ती व्यवस्था होती. तश्या तयार झालेले पटांगण विविध कार्यक्रम करायला वापरले जाते. एखादी rock concert, ballroom असेल, किंवा अगदी ice skating सारखे कार्यक्रम देखील झाले आहे असे तो मला म्हणाला. दोन्ही बाजूला मोठ्या अश्या जाळीदार panel च्या मागे ऑर्गनचे सूर ऐकू येण्याची व्यवस्था आहे असे त्याने सांगितले. वरती छताकडे बोट दाखवत घुमटासारखे काहीतरी होते, छान पिवळ्या दिव्यांनी ते उजळले होते. त्या घुमटाचा देखील ध्वनी परिवर्तीत करण्यामध्ये उपयोग होतो अशी माहित त्याने पुरवली. हिवाळ्यात वाफेचा वापर करून नाट्यगृह कसे गरम राखले जाते याबद्दल त्याने सांगितले. रस्त्याच्या पातळीच्या वर जेवढी इमारत आहे, तेवढी खाली देखील आहे.

रंगमंचाच्या खाली orchestra pit होते ते दाखवले. आणि मला थेट रंगमंचावर नेले. माझा स्वतःवर विश्वास बसेना. समोर तीन हजार खुर्च्या, भले मोठे नाट्यगृह आणि My Fair Lady च्या नेपथ्य झालेल्या रंगमंचावर त्यांच्या सोबत उभा! समोर एक दिवा मिणमिणत होता, बाकी तसा अंधार होता. त्या दिव्याला ghost light म्हणतात असे त्याने सांगितले आणि त्याचा उपयोग सांगितला. गेली दोन वर्षे नाट्यगृह बंद होते. तरीदेखील तो दिवा कायम लावला गेला होता, जेणेकरून ते परत सुरु होणार हा संदेश देत असल्याची भावना त्यामागे होती, असे तो भावूकपणे सांगत होता. त्यानंतर मला त्याने नाट्यगृहातले प्रमुख आकर्षण म्हणजे ऑर्गन(Wurlitzer Organ) दाखवला, ज्याचे sound pipe नाट्यगृहात दोन बाजूला भिंतीवर गेले आहेत.

Posters of past shows in green room

नंतर त्याने मला green room, कलाकारांसाठी असलेल्या विविध सुविधा, त्यांच्या खोल्या ह्या दाखवल्या. मी पूर्वी फक्त एकदा पुण्यातील बालगंधर्वच्या ह्या भागात गेलो होतो. तेथील दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले, आणि इथली व्यवस्था पाहून स्वतःची कीव आली. नंतर त्याने मला रंगमंचाच्या खालच्या भागात नेले. तो भाग दाखवला. तेथील भिंतींवर जुन्या गाजलेल्या नाटकंचे, musicalsचे, आणि इतर कार्यक्रमांचे पोस्टर्स लावले गेले होते.

नाट्यगृहाच्या अगदी वरच्या भागात जेथे चित्रपट दाखवण्यासाठी म्हणून लागणारी प्रोजेक्टर व्यवस्था असते तेथे नेले. एका भागात जुने निकामी झालेले प्रोजेक्टर्स पडले होते. त्यांची व्यवस्था एका संग्रहालयात करण्यात येणार आहे त्याने नमूद केले. कार्बनच्या पेटत्या दांड्याने प्रोजेक्टर कसा फिल्म प्रोजेक्ट करत असे त्याबद्दल त्याने माहिती दिली. तेथील भिंतीवर असंख्य स्टेनसिल आर्ट प्रकारातील रंगरंगोटी दिसली. त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला कि हे प्रोजेक्टर ऑपरेटर लोकं तो उद्योग करत असत असे त्याने सांगितले. खालच्या मजल्यावर येत, त्याने मला महिलांच्या स्वछ्तागृहाकडे नेत म्हणाला कि तुम्हाला मी छानशी गोष्ट दाखवतो. मी मनात म्हणालो इथे काय असेल बुवा पाहण्यासारखे. त्या जागेवर पूर्वी प्रेक्षकांना नाटकाच्या प्रयोगात मध्यांतरात एकत्र होण्यासाठीची जागा होती. एका भिंतीवर एक छोटीशी पाटी होती. त्यावर एका महिलेच्या लग्नाच्या दिवशी येणाऱ्या लोकांचे स्वागत करणारा तो फलक होता. त्याची त्याने कथा सांगत म्हणाला कि एका महिलेने ते नाट्यगृह लग्नासाठी राखले होते. पण व्यवस्थापनाने नंतर एका नाटकाच्या प्रयोगासाठी तिचे आरक्षण रद्द केले. त्यावर तिने भरपाई म्हणून पैसे मागितले, दुसरीकडे लग्नासाठी जागा मागितली आणि शेवटी Paramount Theater मध्ये आम्ही उभे होतो त्या ठिकाणी तो फलक लावावा अशी मागणी केली, आणि ती पुरी करण्यात आली!

त्याच भागात मला एक छोटेखानी पियानो जे play piano होते ते पाहायला मिळाले. Kurt Morrison जो याची देखभाल करतो त्याने मला piano roll घातले कि वाजते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

२०२२ सालचा पहिला दिवस असा सार्थकी लागल्याचे समाधान मला लाभले होते. मी क्षणाचाहि विचार न करता भारावून शंभर डॉलर त्या दोघांच्या हातावर देत म्हणालो हि तुमच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेविषयी, उत्कटपणे तुम्ही हे सगळे जगताय , ह्या साठी माझी छोटीशी भेट. ती त्यांनी स्वीकारली, पण लगेच नाट्यगृहाच्या फंडात ती जमा करू असे त्यांनी सांगितले. त्यांच्या आपल्या कामाच्या जागेबद्दल, कामाबद्दल, नाट्यकले बद्दल असणारे प्रेम, आणि एकूणच जाणीव या सर्वाना मी सलाम करून भारावलेल्या मनाने घरी परतलो.

Pike Place and Around

माझ्या सिएटल भटकंती बद्दल मी आजकाल ब्लॉग वर लिहितो आहे. आज शहरातील सर्वात जुन्या भागांपैकी एक असलेल्या Pike Placeआणि अवतीभोवती च्या परिसराबद्दल लिहायचे आहे. Pioneer Square हा शहरातील पहिली वसाहत आहे असे मानले जाते. त्या ठिकाणी असलेले Klondike Gold Rush National Historic Park मी गेल्या भेटीच्या वेळेला पाहिले होते. त्याबद्दल लिहायचे राहिले आहे, पण नंतर कधीतरी.

तर Pike Place Market हा खरे तर आपल्या पुण्यातील तुळशीबागेसारखे ठिकाण आहे. प्रशांत महासागराचे पाणी जे उत्तरेकडून कॅनडा सीमेजवळून शहरात खूप आतवर घुसले आहे आणि अनेक बेट निर्माण झाली आहेत. तर हे ठिकाण ह्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या एका किनाऱ्यावर (Elliot Bay) वसले आहे. जवळच अनेक छोटी छोटी बंदरे(pier) आहेत, जेथून ह्या बेटांवर बोटीने जाता येते. त्यातील Bainbridge Island भटकंती बद्दल मी लिहिले आहे. Pike Place Market स्थानिक छोटे मोठे किरकोळ विक्रेते, व्यापारी, तसेच शेतकरी, मच्छिमार त्यांच्याकडील माल विकण्यासाठी वसलेले ठिकाण आहे. हे विक्रते दररोज सकाळी त्यांचा माल घेऊन येतात, दिवसभर विकतात, आणि संध्याकाळी परत घेऊन जातात. ह्या मार्केटला लागून असलेल्या रस्त्यावर खाण्याची, कॉफीची, तसेच इतर छोटी मोठी खरेदी करण्यासाठीची दुकाने देखील आहेत. त्यातील Le Panier हे कॉफी तसेच विविधी बेकरी पदार्थ मिळण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे. तेथे मी एकदा गेलो होतो. नुकतेच जोरदार बर्फवृष्टी होऊन गेली होती. प्रचंड गारठा होता. एखादे doughnut किंवा cinnamon roll आणि गरम कॉफी प्यावी ह्या उद्देशाने आत गेलो. दारातच एक जण काही तरी बडबडत उभा होता. बहुतेक homeless होता. मला त्याने काहीतरी खायला घेऊन द्यायला सांगितले. मी काही बोललो नाही. शहरातील जुन्या भागांतून असे homeless दुर्दैवाने दिसतात. रस्त्यांवरून फिरत असतात, चौकात एखादी पाटी घेऊन उभे असतात, कित्येक ठिकाणी पदपथांवर तंबू ठोकून त्यात राहत असलेले दिसतात राहतात. Salvation Army नावाची संस्था जमेल तशी त्यांना मदत करते. आत हॉटेल मध्ये गेल्यावर मी ऑर्डर दिली. माझ्या कडे ७-८ डॉलर असे नेमके नव्हते, तर शंभरची नोट(येथे bill म्हणतात) होती, आणि दोन डॉलर होते. तिच्याकडे उरलेले पैसे द्यायला नव्हते. तिने थोडा विचार केला, मी देऊ केलेले दोन डॉलर घेतले आणि मला सगळे पदार्थ दिले, अगदी हसतमुख आणि वर म्हणाली, “Don’t worry, it is on us! It is very cold out there, isn’t it?” मी आवक झालो. मी तिला नंतर उरलेली रक्कम आणून देण्याचे वचन दिले आणि बाहेर आलो. आणि तो homeless मनुष्य दिसला. त्याला मी घेतलेले doughnut दिले , त्याचे आशीर्वाद घेतले आणि दोन्ही हृद्य अनुभव उराशी साठवत कॉफीचा घुटका घेत पुढे निघालो.

त्याच रस्त्यावर The Souk नावाचे दुकान होते. Souk हा अरबी शब्द म्हणजे बाजार. दुबई भेटी दरम्यान हा शब्द कानावर पडला होता. त्या दुकानात भारतातील, पाकिस्तानातील, तसेच तुर्की, इजिप्त आणि त्या भागातील देशांतील अनेक वस्तू, खाण्याचे पदार्थ होते.

आणखीन पुढे Starbucks Coffee ह्या जगप्रसिद्ध कॉफीचे दुकान होते. ह्या कॉफीची सुरुवात ह्याच १९१२ मध्ये शहरात झाली आणि मी ज्या दुकानासमोर उभा होतो, ते त्यांचे पहिले वाहिले दुकान होते. दुकानासमोर भली मोठी रांग. फोटो काढायला, सेल्फी काढायला, आत जाऊन कॉफी घ्यायला. मी देखील ते काढले! Starbucks Reserve नावाचे अजून एक आगळे वेगळे खास असे कॉफीशॉप सिएटल मध्ये या ठिकाणाहून दोन मैल लांब आहे, जे कॉफीच्या रसिकांना कॉफीचे विविध अनुभव देण्यासाठी उभारले गेले आहे.

ह्या मार्केटच्या एका बाजूला Post Alley नावाची एक बोळ आहे. पुण्यातील बोळीसारखी जुनाट, अंधारी अशी बोळ आहे. तिथे हजारो खालेल्ल्या chewing gums वापरून बोळीतील दोन्ही बाजूंची भिंतीवर ‘कलाकारी’ केली आहे. त्याला Gum Wall असे म्हणतात. पाहताना किळस वाटत होती, तेथून पटकन पाय काढला.

Post Alley Gum Wall at Pike Place Market

Pike Place Market च्या अगदी पिछाडीला समुद्राचा आणि आजूबाजूचा नजरा पाहण्यासाठी छानशी जागा आहे. तेथे कायम वर्दळ असते, प्रामुख्याने जोडप्यांची! तेथून Seattle Great Wheel अर्थात आकाश पाळण्याचे चक्र दिसते, संध्याकाळी /रात्री दिव्यांनी हा सारा आसमंत उजाडून जातो. आपल्याकडे भारतात एरवी फक्त जत्रेत दिसणारा हा आकाश पाळणा, आजकाल मोठ्या शहरात कायमस्वरूपी असतो असे दिसते. असाच आकाश पाळणा लंडन मध्ये देखील आहे. दोन्ही ठिकाणी बसून त्यातून फिरानायाचा अनुभव घेतला आहे. लंडनचा आकाश पाळणा अतिशय मोठा आहे. तेथूनच पलीकडे Seattle Steam Company चा शंभर एक वर्षे जुना कारखाना आणि त्याच्या आकाशात धूर ओकणाऱ्या दोन-तीन मोठ्या चिमण्या दिसतात. कारखान्यात तयार झालेली वाफ आसपासच्या इमारतीमध्ये हवा गरम करण्यासाठी वापरली जाते.

Harbor Steps Park

जवळच अजून एक हटके असे ठिकाण आहे , ज्याचे नाव आहे Harbor Steps Park. सिएटल शहर खरेतर अनेक छोट्या मोठ्या टेकड्यांवर वसले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीव्र चढ उतार आहेत. अश्याच एका उतारचा, जो पाण्याकडे, म्हणजे waterfront, फायदा घेऊन पायऱ्या बांधून तयार केले छोटेसे विरुंगळा केंद्र तयार केले आहे. मी गेलो तेव्हा पायऱ्यांवर हलकासा बर्फ पडला होता. दोन्ही बाजूला छोटी बुटकी झाडे होती, त्यावर दिवे लकाकत होते. ठिकठिकाणी खुर्च्या, टेबल ठेवलेली होती. ह्या पार्क समोरच रस्त्याच्या पलीकडे Seattle Symphony चे केंद्र होते, आणि ते वसले होते त्याचे नाव होते Benaroya Hall. २०२१ सालच्या शेवटच्या दिवशी तिथे Viennese New Year नावाची concert होणार होती. जायची खूप इच्छा होती, पण कोरोना मुळे मन आवरते घेतले.

तेथून हाकेच्या अंतरावरती Seattle Art Museum आहे. त्याकडे आपले लक्ष वेधते जाते ते कोपऱ्यात असलेल्या The Hammering Man ह्या नावाच्या उंच अश्या हलत्या art installationने. कामगार वर्गाला सलामी देण्यासाठी हा असा हातोडा मारत असलेल्या मनुष्याचा हलता देखावा १९९२ मध्ये उभारला गेला.

The Hammer Man at Seattle Art Museum

तर ह्या चित्र संग्रहालयात मी गेल्या महिन्यात गेलो होतो, आणि नेमका तो दिवस सगळ्यांसाठी मोफत होता. अमेरिकेतील अनेक ठिकाणी अशी सोय करून ठेवली आहे, जेथे महिन्यातील एका विशिष्ट दिवशी सर्वाना संग्रहालय खुले ठेवले जाते. शहराबाहेर Volunteer Park येथे Seattle Asian Art Museum तेथे पण जायचे . थोड्याश्या अंतरावर, एका टेकडीवर Olympic Sculpture पार्क हे खुल्या हवेतील आणि तसेच सर्वाना खुले असलेले शिल्प उद्यान पाहिले होते. एका बाजूला आत घुसलेल्या पाण्याचे दर्शन, आणि एका बाजूला थोड्या थोड्या अंतरावर मांडलेली शिल्पांच्या कलाकृती. मस्त परिसर आणि माहौल होता. विसाव्या शतकातील उत्तराधार्त सिएटल हे अमेरिकेतील प्रथितयश चित्रकारांचे माहेरघर होते, त्यांना Northwest School अशी संज्ञा आहे. ह्याचे मुख्य प्रेरणास्त्रोत म्हणजे सिएटल शहर आणि त्याच्या आसपास असलेला अमेरिका देशाचा वायव्य भाग आणि तेथील निसर्ग. ह्याचे दर्शन ह्या संग्रहालयातील प्रदर्शांतून दिसते. त्या दिवशी एक खास दालन देखील होते, ते म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कार्यरत असलेल्या स्त्री छायाचित्रकार Imogen Cunningham यांच्या कारकीर्दीवर. तेही पाहता आले.

View of Seattle Public Library

Seattle Public Library नावाची अतिशय नमुनेदार इमारत ह्याच भागात, 5th Avenue वर आहे. अमेरिकेत आल्यावर माझ्या यादी मध्ये जवळच्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन येणे हा एक कार्यक्रम असतोच असतो. तसाच या माझ्या सिएटल वास्तव्यात आठवड्यातून एकदा तिकडे जात असे. भारतातील सार्वजनिक वाचनालय आणि इथले यांची तुलनाच अशक्य आहे. हे वाचनालय सर्वाना खुले असते. लोकांना बसून वाचण्यासाठी भली मोठी जागा, अनेक वर्तमानपत्रे, मासिके असतात. वाचनालयात एक विभाग असा आहे कि जिथे असलेली पुस्तके कोणीही यावे, आणि नोंद न करता घेऊन जावे. वाचून परत आणून जागेवर ठेवावे. लोकांवरती किती विश्वास आणि वाचन संकृतीला किती पोषक. एखादे पुस्तक मागितले तर, तत्काळ शोधून, आपल्यासमोर करतील, ते देखील नम्रपणे. वर त्या पुस्तकाबद्दल आपली स्वतःची खास टिप्पणी देखील आपल्याला सांगतील. असा सगळा माहौल. मला तर अश्या ठिकाणी तासंतास वेळ घालवायला, वाचायला, संवाद साधायला अतिशय आवडते. मी देखील तेथून थोडी हटके पुस्तके मिळाली म्हणून घरी आणून वाचली. त्यातील एक होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील(The Last Bookshop in London) आणि दुसरे अमेरिकेतील civil war च्या आसपासच्या काळातील (News from World).

Seattle Monorail

ह्याच 5th Avenue रस्त्यावर Fifth Avenue Theater नावाचे जुने नाट्यगृह आहे. तेथे Broadway shows होतात. तश्या प्रकारचे मी राहत असलेल्या ठिकाणापासून जवळच अजून एक जुने नाट्यगृह आहे, ज्याचे नाव Paramount Theater.तेथे देखील नाटके, म्युझिकल्स होतात. याच रस्त्यावरून Seattle Monorail ची line देखील आहे, जी रस्त्याच्या मधोमध पसरली आहे. त्यावरून थोड्या थोड्या वेळाने जाणारी दोन डब्याची monorail पाहत जाणे मजेशीर वाटते!

तर अशी हि सिएटल मधील Pike Place Market च्या आसपासच्या काही ठिकाणांची सैर! कशी वाटली ते जरूर सांगा.

The Nutcracker Ballet

मला नाटकांचे वेडआहे. मिळेल तिथे, मिळेल तशी मी नाटकं पाहत असतो. त्याबद्दल लिहितहि असतो. पुण्यात पाहत असलेल्या नाटकांबद्दल, कर्नाटकात बंगळूरूला गेल्यावर तिथली कन्नड नाटकं पाहतो, त्याबद्दल लिहितो. अमेरीकेतीही मी अधून मधून जात असतो तेव्हा जमेल तशी नाटकं पाहत असतो. काही वर्षांपूर्वी मी The Phantom of Opera हे गाजलेले नाटक पहिले होते, तेही न्युयॉर्क मधील प्रसिद्ध Broadway वर! मी सध्या अमेरिकेतील सिएटल(Seattle) शहराची सैर करत आहे. हिवाळ्यामुळे येथे हवा अतिशय थंड , दिवसही लहान. त्यात ख्रिस्तमसचे दिवस. रात्री सगळीकडे रोषणाई. आणि मला ख्रिस्तमसच्या सुट्टीत अमेरिकेत कित्येक दशकांपासून पहिले जाणारे नाटक पाहायला मिळाले. त्याचे नाव The Nutcracker. हे नाटक खरे पहिले तर ballet नृत्यप्रकार वापरून सांगितलेली पारंपारिक गोष्ट आहे.

सिएटल सेंटर भागात असलेल्या McCaw Hall मध्ये ह्या नाटकाचा प्रयोग होता. मी राहत असलेल्या ठिकाणापासून १५-२० मिनिटांची पदयात्रा होती. ती मी करून तेथे पोहचलो. प्रयोगाची वेळ संध्याकाळची ७.३० ची होती. अमेरिकेतील नाटकांना, संगीत कार्यक्रमांना तो सुरु झाल्यावर सहसा प्रवेश देत नाहीत. हे माहित असल्यामुळे मी अमंळ लवकर निघून लवकरच पोहोचलो होतो. पाहतो तो काय, नाट्यगृहाचा परिरसर लोकांनी फुलून गेला होता. चित्ताकर्षक रोषणाई केली होती. नाटकाचे रंगीबेरंगी मोठाले भित्तीपत्रके लावली गेली होती. लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती.

McCaw Hall

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने आपले नागरिक सोडून इतरांना देशात प्रवेश करायला जी सर्वसाधारण बंदी आणली होती, २०२१ च्या मे महिन्यापासून, ती बंदी नोव्हेंबर मध्ये उठवली गेली. माझे अमेरिका प्रयाण जे गेली काही महिने कोरोना मुळे रखडले होते, मी लगेच जायचा निर्णय घेऊन, अमेरिकेत धडकलो. एका आठवड्यातच ओमायक्रोनची (Omicron) बातमी आली आणि परत निर्बंधांचे सावट आले. मी देखील तिसरा बुस्टर डोस देखील घेतला आणि मनात धाकधूक ठेवूनच मी ह्या नाटकाला जाण्याचा निर्णय घेतला होता. मुद्दामच शनिवार रविवार सोडून आडवारी गेलो होतो. तर तेथे हि गर्दी. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला!

मास्क आणि कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघून आत सोडत होते. त्यामुळे जरा बरे होते. मास्क देखील लोकांनी त्यांच्या नाटकाला जायच्या नेहमीच्या पोशाखावर लोकांनी चढवले होते. त्यामुळे एकूण दृश्य मजेशीर दिसत होते. एक दोन कोपऱ्यात मोठमोठाले चंदेरी चकचकीत रोषणाई केलेले ख्रिस्तमस ट्री उभे केले होते. तेथे छायाचित्र काढायला लोकांची गर्दी उसळली होती. अमेरिकेत नाटकाला जाणाऱ्या प्रत्येकाला नाटकाची एक पुस्तिका(playbill) दिली जाते, ती तशी ह्या देखील नाटकाला दिली गेली. ती घेऊन मी आत गेलो, आणि मी तडक रंगमंचाकडे गेलो. त्याजवळ असलेल्या बेचक्यात पाश्चात्य संगीत वाजवणाऱ्या वादकांचा चमू बसला होता आणि प्रत्येक जण समोर असलेल्या नोटेशन मध्ये पाहून काहीना काही वाजवत आपलाले वाद्य तपासून घेत होते.

नाटक तसे दहा मिनिटे उशिरा सुरु झाले. दोन अंकी नाटक होते. Balletनृत्य असल्यामुळे संवाद नसणार होते. फक्त संगीत आणि नृत्य, हावभाव. पुस्तिकेवरून साधारण अंदाज आला. अतिशय भव्य असा रंगमंच, वेगवेगळी दृश्ये बदलण्याची खास व्यवस्था हे सारे प्रेक्षणीय होते. ह्या नाटकाला तसा बराच मोठा इतिहास आहे, आणि गमतीची बाब अशी कि हे नाटक अमेरिकेतील कुटुंबासाठी त्यांच्या ख्रिस्तमस सोहळ्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. हे ballet नृत्य १८१६ मध्ये जर्मन लेखक Hoffmann याच्या एका लघुकथेवर आधारित, १८९२ मध्ये प्रथम त्यावेळच्या सोविएत रशियात प्रदर्शित झाले. मूळ सोविएत रशियाच्या जॉर्जिया प्रांताचा असलेला आणि नंतर अमेरिकेन नागरिक झालेला George Balanchine या ballet नृत्य रचनाकाराने रचलेल्या , पण मूळ संगीत रचना त्याच कायम ठेऊन, १९५४ मध्ये सादर केलेल्या प्रयोगाची हि आवृत्ती होती, ती Pacific Northwest Ballet (PNB) या विविध ballet नृत्य सदर करणाऱ्या सिएटल स्थित कंपनीची. Ballet नृत्य प्रकारात प्रामुख्याने पायांच्या बोटांवर तोल सांभाळत , नजाकतीने नृत्य करतात. अतिशय अवघड प्रकार आहे, पाहताना सारखे कसे करत असतील असे वाटत राहते. हा नृत्य प्रकार इटलीत जन्माला आला, आणि पुढे रशिया, फ्रान्स देशातही तो चांगलाच फोफावला. तिची स्वतःची एक नृत्य भाषा आहे.

या नाटकाची कथा थोडक्यात अशी आहे. खरेतर हि एक परीकथाच आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आता nutcracker म्हणजे काय या पासून. याचा शब्दशः अर्थ आहे तो अडकित्ता. हो , आपण वापरतो तो सुपारी काताराण्यासाठी असलेला अडकित्ता. जर्मन प्रदेशात तो विविध प्रकारचा सुका मेवा जसे अक्रोड फोडण्यासाठी वापरत असत. कालांतराने, त्याचे शुभचिन्ह, दुष्ट शक्तींपासून घराचे रक्षण करणारे, घरात ठेवण्याची वस्तू, म्हणून वापर सुरु झाला. त्यामुळे प्रत्येक घरात असे लाकडी, रंगीत, बाहुली सारखे nutcracker असतात. तसेच ते तेथील मुलांच्या खेळण्यातील देखील भाग झाला.

दोन अंकात ह्या नृत्य नाटिकेचे सादरीकरण आहे. पहिल्या अंकात एका घरात ख्रिस्तमस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असते. बरीच लहान मुले, आणि कुटुंबातील इतर मोठी माणसे रमत गमत, हसत खिदळत ,नाचत हा सोहळा साजरा करत असतात. त्या घरातील क्लारा नावाच्या मुलीला एक लाकडी nutcracker भेट म्हणून देतात. तिचा दुष्ट भाऊ, फ्रिट्झ, असूयेपोटी त्याचे तुकडे करतो आणि ख्रिस्तमस ट्री मध्ये लपवून ठेवतो. क्लारा तो जवळ घेऊन झोपी जाते. आणि गंमत सुरु होते. पुढील सर्व प्रयोग तिच्या स्वप्नात आहेत असे दाखवले आहे. रात्री बाराच्या ठोक्याला, सगळे गाढ झोपेत असता, जवळचा ख्रिस्तमस ट्री आपोआप वाढू लागतो. तो लाकडी nutcracker जिवंत होतो. उंदरांची फौज रंगमंचावर येते. त्यांची आणि फ्रिट्झच्या खेळण्यातील सैनिक जे मोठे झालेले असतात, ते आणि उंदरांची झटापट सुरु होते, त्यात शेवटी उंदरांचा प्रमुख nutcracker कडून मारला जातो. पुढच्या दृश्यात nutcracker चे रुपांतर देखण्या राज्पुत्रात होते. तो आणि क्लारा बर्फाने आच्छादलेल्या जंगलात गेलेले दाखवले आहे. तेथे त्यांचे प्रेक्षणीय ballet नृत्य आपल्या पुढ्यात येते. पहिला अंक येथे संपतो, आणि टाळ्यांच्या गजरात पडदा पडतो.

दुसऱ्या अंकात तो राजपुत्र साखरेच्या दुनियेत जातो(Land of Sugar).तेथे विविध देशांच्या गोड खाद्यपदार्थ रुपी पऱ्या दाखवल्या आहेत. अरेबियाची कॉफी, चीनचा चहा, रशियाची candy अश्या स्वरूपात त्या सर्व पऱ्या आपल्या समोर येतात, त्या त्याचे balletनृत्य कौशल्य दाखवतात आणि टाळ्या मिळवतात. ह्या अश्या नाच गाण्यांत, पुढे क्लारा आणि राजपुत्र रेनडीअरच्या रथात बसून परत आपल्या जगात येतात, आणि तेथे तिचे स्वप्न थांबून , तिला जाग येते. आणि नाटक तेथे समाप्त होते.

जसे सिएटल मधील PNB हि संस्था The Nutcracker सादर करते, तसेच अमेरिकेतील इतर अनेक ballet नृत्य संस्था देखील हे नाटक सादर करतात. न्यूयॉर्क शहरात देखील New York City Ballet ने देखील ह्या वर्षी ह्याचे प्रयोग सुरु केले होते, पण आजच बातमी आली आहे कि, वाढत्या कोरोना संक्रमणामुळे, त्या शहरात निर्बंध कडक करण्यात आले आहेत, आणि त्यामुळे ह्याचे प्रयोग आता तात्पुरते तरी दुर्दैवाने थांबले आहेत.

Ferry to Bainbridge Island

This year, finally, again got to travel to Seattle, after travel restrictions by USA were lifted in the month of November, after a gap of seven months. This is my third visit in consecutive years. I enjoy this city’s overcast, wet weather, and also numerous opportunities for outing around Seattle. I had written three blogs on my visits to various places during the last visit. You may check them here: Amazon Spheres, Boeing Flight Museum, General Magic.

Due to its unique geographic location on the west coast, Seattle has many islands around it. The Pacific Ocean water has entered the land around the city, forming something called Puget Sound. The term “sound” was new to me, and understood its meaning after goggling for it. This terms refers to an area which has ocean water inlets forming large islands. The area around Seattle is exactly that.

I had visited once such island called Bainbridge Island last year, but never got to write about it. Soon after I landed in Seattle, I made another trip to the island. Last time, it was late winter(February last week), and this time it is early winter time(November). During my last visit, I had stayed north of Seattle, in area called University District. This time got to stay in downtown itself. There are ferries, from piers in the downtown, which ply between many surrounding islands and city of Seattle itself. I took one such ferry to Bainbridge Island one fine sunny morning. I just latched on the opportunity to make most of the sunny day in Seattle, which otherwise is mostly wet and overcast, needless to say cold. The ferry is run by Washington State Ferry.

The ride to the island lasted for about 20 minutes. The ferry itself was 3 storied ship, carrying cars at the bottom. As it headed towards the island, one could see sun-lit view of Seattle downtown, from the deck area of the ship and also at the far distance towards south, omnipresent snow capped Mount Rainier.

There are many things you can do and spend your day at the island. I had decided to explore it walk. Incidentally, the day when I visited, the island was celebrating free art studio tours for art students, art appreciators. One of the first things I do at a new place is to get to know as much as history of it as I can. This is exactly I did at Bainbridge Island. The island offers also great outdoors, such as cycling, sailing, hiking etc.

I visited a museum located at a short distance from the ferry terminal. It is called Bainbridge Island Historical Museum which is situated in historical Bainbridge Island schoolhouse(started in 1908).

There are couple of other museums too. But could not go there. One of them is Bainbridge Island Japanese American Exclusion Museum and Suquamish Museum. The former one is interesting one. As it so happened that, after Pearl Harbor attack by Japanese forces, migrants from Japan who were living in this area, were ousted from the society. At the time of the Japanese attack on Pearl Harbor in 1941, about 120,000 persons of Japanese ancestry lived on the US mainland, mostly along the Pacific Coast(including Bainbridge Island). About two thirds were full citizens, born and raised in the United States.

The other museum is about native American tribe called Suquamish living on the island. It also the place where Chief Seattle lived during winters. Chief Seattle was head of Suquamish(and Duwamish) tribe, after whom the city has been named as such. As an honor to him, Seattle’s one of the oldest areas, Pioneer Square, has his bronze bust installed there.

The Bainbridge Island Historical Museum is a nice little museum containing lot of audio, video, textual archives and artifacts. It is free and self-guided museum. The Bainbridge Island, has been epicenter of lumber trade in the USA those days. This island also was used during World War II by USA, for radio signal interception. The museum also has displayed one interesting exhibition, which is about a game called pickleball, invented here on the island.

After visiting the museum, I strolled down the road, to one of the bookshops called Eagle Harbor Book Co, after lingering at Blackbird Bakery across the road, for a nice hot cup of coffee. I found an interesting book called The Boys in a Boat, which is about USA’s rowing team which won gold medal in infamous Olympic games of the year 1936 which took place in Germany. The interesting thing is that one of the team members was resident of the island. Couple of years back, I had met an American author in Philadelphia, who has written a book on history of boathouses, in which, she has covered about this rowing team. You may find this blog on it interesting.

On the way back to ferry terminal, I lingered a bit at place called Waypoint Park. It is a nice little park, with lot signboards depicting the history of the island. I was curious to understand how the island got its name. And I got the answer on one of the signboards. As we all know, continental America was inhabited by various native India tribes. The Puget Sound area, which Seattle is part of, was inhabited by Suquamish and Duwamish, tribes. A foreigner, English voyager, arrived on the island in 1792 for the first time. In 1841 Lieutenant Charles Wilkes(of the USA) visited the area. He named several locations on the island and even gave it the name Bainbridge in recognition of Commodore William Bainbridge who was famous from the War of 1812.

All in all it was a great time spent that day. It began getting dark, at around 4.15 pm. I was already at the terminal for my ride back starting at 4.50 pm. The ferry ride ticket is of USD 9.50. I did not realize that it was return ticket. I rushed to get myself another ticket way back in the evening, only to find that it is already covered, to my pleasant surprise! As the ship started its journey back to Seattle, standing on the deck was next to impossible due to chill though the fantastic view of Seattle downtown lit in the night could not be missed.

Amazon Spheres

It was last year during May/June, I was in the USA, particularly, in Seattle. I did not imagine the situation would turn around, a year later, so dramatically. First, the pandemic itself, which is anyway worldwide, but the USA quite surprisingly got badly hit. And the second, the protests, unrest due to George Floyd’s tragic death by the hands of the police. This event has created unprecedented turmoil in the country right now. Sitting at home and going down the memory lane brought the time I had spent in Seattle last year and also brought the memories of visit to African American history museum in Philadelphia.

View of Seattle Downtown

View of Seattle Downtown

The other day I happened to tune into CNN and stumbled upon a show on Amazon. It was called The Age of Amazon. I remained on that channel till the show was over. It was breathtaking experience to watch Amazon’s progress and where it is headed, and many other aspects including protests, HQ2 etc. All that reminded me about my last year’s trip to Seattle, as mentioned above.  Few days later after I returned, it was Amazon’s 25th anniversary on July 5. And I said wow to myself. I was in Seattle, around this remarkable day. Later, I also got my hands on an old book by on Amazon’s journey, in a local used books exhibition. It also outlines Jeff Bezos’, now famous, story and gives early account of his success(it was published in year 2000, just 5 years after Amazon was founded). The book is titled Amazon.com: Get Big Fast by Robert Spector.

Amazon Spheres

Amazon Spheres, Seattle, May 2019

During my stay in Seattle, I happened to visit Amazon Spheres. It is also known as Seattle Spheres. This is unique structure right in the downtown Seattle, where you find cluster of Amazon’s offices. This three-dome structure, surrounded by Amazon’s buildings, is quite amazing. It is having huge glass panels from outside. I got to get inside tour that day. It seems it was lucky day for me. The Amazon Spheres houses world’s one of the biggest flowers. But this flower is also has quite foul, lousy smell. And it is aptly called corpse flower, as it smells like rotten dead body. The day when I was inside Amazon Spheres, it had bloomed. It seems that it blooms only every seven years!

The Amazon website maintains a page dedicated for this flower. It also has live streaming of the flower, and has time lapse of the blooming of the flower. It’s scientific name is Amorphophallus titanum. The page can be seen here. Fortunately, Amazon was allowing photography inside, so was able to take some snaps.

The Amazon Spheres which is multi-level building, has cafeterias, work spaces-both closed and open. But it contains plants from all over the world. It almost as if Amazon tried to create a greenhouse forest. The name of the company anyways derived from Amazon forests, which unfortunately, got burnt out last year in massive wild-fire, as we all know.

There is a Amazon Go shop as well right near this building. I also happened to step inside to get an experience of shopping without actually paying at the counter. It was certainly nice experience, of course, it is right now limited only to food items. It was around noon time, when I got inside the shop. It seemed to me that many Amazon employees or may be employees of nearby companies came down there for a quick bite, lunch or coffee. I also visited the Amazon Bookstore as well located in University Village area, near University of Washington.

It was indeed amazing to see by your own eyes, how technology can change the world. The city(Seattle) which was known as Boeing city earlier, and then later Microsoft city, now is known as Amazon city. Truly inspiring! Anyways, my other two blogs on last year’s Seattle visit can be found here: General Magic, Boeing Visit.

BTW, before concluding, let me share the news I read about Amazon today, in the context of racism incidents, that they are banning use of facial recognition technology by police in the USA for next one year. This comes as part of their effort to combat systemic racism. A welcome step, I would say.

 

Boeing Future of Flight Museum

बोईंग! जगातील विमान बनवणारी एक अग्रगण्य कंपनी. कालच बातमी वाचली होती बोईंग मधील जवळ जवळ १२ हजार लोकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे, कारण अर्थातच कोरोना विषाणूने घातलेला धुमाकूळ. तसेच असेही वाचले कि 737 MAX ह्या कुप्रसिद्ध विमानांचे पुन्हा उत्पादन सुरु करणार आहे. ह्या विमानांवर गेल्या वर्षी अमेरिकन सरकारने सुरक्षेच्या कारणांवरून बंदी आणली होती. हे सगळे वाचून गेल्यावर्षी मे महिन्यातच अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात बोईंग कंपनी आणि तेथील अनोखे संग्रहालय पाहायला गेलो होतो त्याची आठवण झाली. हे आहे सिएटल या शहरात. सिएटल(Seattle) म्हटले कि आधी Microsoft, आत्ता आत्ता Amazon हे आठवतात. पण फार कमी जणांना माहिती असते कि या दोघांच्याही आधी सिएटल म्हटले कि बोईंग कंपनी डोळ्यासमोर येते. सिएटल विमानतळावर उतरल्या उतरल्या हे शहर विमानांचे शहर हे समजते.  तेथील आगमन विभागात छतावर एक विमान टांगले आहे, ते लक्ष वेधून घेते. बाजूला भिंतीवर विमानाचा इतिहास सांगणारे छोटेसे माहितीफलक आहे.

Airplane Model Exhibit Hanging

Airplane Model Exhibit Hanging at SeaTac Airport, Seattle

बोईंगचा सिएटल मध्ये, उत्तरेला Everett या ठिकाणी कारखाना आहे आणि  Future of Flight नावाचे संग्रहालय देखील उभारले आहे. कारखान्यात विमानांची बांधणीचे काम  कसे होते हे पाहायला सुद्धा घेऊन जातात. विमानांचा शोध लागून शंभर वर्षे होऊन गेली. बोईंग कंपनी देखील सुरु होऊन शतक लोटले. पहिल्या वहिल्या विमानापासून ते आतापर्यंतचा विमानांचा प्रवास थक्क करणारा आहे. बोईंगच्या विमानांतून कित्येक वेळेला प्रवास केला आहे. आत त्या ठिकाणी जाऊन तो सगळा माहौल अनुभवणे, विमाने कशी बनवतात हे पाहणे अतिशय उत्सुकतेची बाब होती.

Inside of Paper Plane Cafe

Inside of Paper Plane Cafe at Future of Flight, Seattle

त्या दिवशी अमेरिकेत मेमोरिअल डे(Memorial Day) निमित्त सुट्टी होती. छान ऊन पडले होते. सिएटलकरांना ह्या उन्हाचे कोण अप्रूप, कारण जवळ जवळ वर्षभर तेथे पावसाची भुरभूर असते, वातावरण ढगाळ असते. आम्हाला  निघायला अंमळ उशीरच झाला. त्यात आम्ही रस्ता चुकलो आणि बोईंगच्या दुसऱ्या कुठल्यातरी कारखान्याच्या आवारात पोहोचलो. तेथून परत Everett येथील निर्धारित स्थळी पोहचे पर्यंत जेवणाची वेळ झाली होती. आधी तेथील cafeteria(त्याचे नाव अनोखे होते-Paper Plane Cafe) मध्ये पोटोबा केला.

त्या नंतर लगेच आम्ही बोईंग कंपनीची सैर करण्यासाठी त्यांच्या एका गाईड सोबत बस मधून निघालो. भले थोरले आवार,  आणि त्यात २५-३० विमाने पार्क केलेली दिसत होती. दुरुस्तीला आली होती कि काय कोण जाणे. त्या विमानांवर त्या त्या विमान प्रवास कंपन्यांची मानचिन्हे दिसत होती. बस मधून उतरल्यावर एका दालनातून आम्हाला नेण्यात आले. पुढे दोन बोगद्यातून चालत नेत, पुढे एके ठिकाणी लिफ्ट मधून दुसऱ्या मजल्यावर नेण्यात आले. तेथून खाली विमानांची assembly line दिसत होती, अनेक लोकं काम करताना दिसत होती. ही प्रत्यक्ष factory ची सैर असल्यामुळे चालणे भरपूर आहे. आम्ही साधारण दीड तास त्या भागात फिरत सगळे पाहत होतो. सुरक्षेच्या कारणासाठी आम्हाला आत मध्ये छायाचित्रे काढता आली नाही.

केवढा तो भव्य परिसर होता आत मध्ये! एकाच वेळेस ३-४ विमानांची जुळणीचे काम चालू होते असे दिसत होते. आम्ही ते सर्व दृश्य वरून २५ फुटांवरून पाहत होतो. विमानांचे विविध भाग, जसे कि पंख, इंजिन्स, शेपटाकडील भाग असे सगळे जमिनीवर विखुरलेले दिसत होते. पाच सहा वर्षांपूर्वी मी अमेरिकेतच Rockwell Collins मध्ये तीन महिने काम केले होते. ही कंपनी विमानांचे सुटे भाग, विमानच्या आतील यंत्रणा वगैरे गोष्टी तयार करते. अशाच एका यंत्रणेच्या(In-flight Entertainment System) software चे काम मी केले होते. त्याबद्दल मी येथे लिहिले आहे. त्या वेळेस विमानच्या आतील भागाचे  प्रारूप वापरून त्यावर काम केले होते, त्या दिवसांची मला आठवण झाली. मला विमानात अजूनही बसले कि अजूनही मानवाने केलेल्या या प्रगतीचे राहून राहून आश्चर्य वाटत राहते. जेमतेम शंभर वर्षे होऊन गेली, विमानांचा शोध लागून, अर्थात त्यानंतर जी दोन महायुद्धे जी झाली त्याने ह्या तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली, आणि येथवर आपण आलो आहोत.

परत आल्यावर आम्ही विमान विषयक विविध गोष्टींची, इतिहासाची माहिती देणारे प्रदर्शन, संग्रहालय पाहायला गेलो. बोईंगच्या विविध विमानांच्या उत्पादनाचा इतिहास सांगणारी, तसेच विमानांचे अंतरंग दाखवणारी, cockpit कसे असते हे दाखवणारी अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शने तेथे होती. ते पाहण्यात अजून एक तास-दीड तास कसा निघून गेला, हे कळले देखील नाही. बोईंग कंपनीचा संस्थापक विल्यम बोईंग याने १९१६ मध्ये हि कंपनी सुरु कशी केली त्याचा इतिहास, जुनी छायाचित्रे लावलेली होती.

सध्याच्या परिस्थिती अर्थातच तुम्ही तिथे जाऊ शकणार नाही. त्यासाठी बोईंगने घरी बसल्या बसल्या प्रतिरूप सैर घडवण्याची सोय केली आहे. तुम्ही ती ह्या संकेतस्थळी(Museum of Flight Virtual Tour) जाऊन नक्कीच अनुभवू शकता. सिएटल शहरामध्ये, दक्षिणेला विमानांचे अजून एक संग्रहालय उभारले आहे. त्याचे नाव आहे Museum of Flight. ते गेल्या वर्षी पाहायचे राहून गेले. ह्या वर्षीच्या अमेरिका भेटी दरम्यान पाहायचे होते, पण लॉकडाऊन मुळे ह्या विमानांचे उड्डाणच स्थगित केले असल्यामुळे जाता आले नाही. बघुयात, पुढे मागे कधी तरी!