तीन चित्रकार, तीन पुस्तके, तीन चित्रपट

ह्या लॉकडाऊनच्या काळात माझ्याकडील पुस्तकांची आवारावर करताना चित्रकला आणि चित्रकार यांच्या वरील मी गोळा केलेली काही पुस्तके पुढ्यात आली. आणि थोडीशी उसंत असल्यामुळे, चित्रकारांची चरित्रे, त्यावरील पुस्तके वाचावीत आणि चित्रपट पाहावेत अशी मनाने उचल खाल्ली. त्याबद्दल आज लिहायचे आहे. तसे पाहिले तर भारतीय चित्रकला आणि पाश्चिमात्य चित्रकला ह्यांचा तुलनात्मक अभ्यास, तसेच अमूर्त चित्रकला(abstract painting) हे विषय आधीपासून डोक्यात आहेत, पण त्याबद्दल नंतर कधीतरी. पूर्वी कधीतरी अनंत सामंत यांच्या चित्रकार, चित्रकला हा विषय घेऊन लिहिलेल्या एका कादंबरीबद्दल लिहिले होते(ऑक्टोबर एंड).

एके दिवशी सहज म्हणून माधवी देसाई यांचे कांचनगंगा हे पुस्तक, कधी तरी आणून ठेवले होते, ते वाचायला हाती  घेतले. त्यात एकोणिसाव्या शतकातील मुंबईतील तीन मैत्रिणींची कथा आहे गायिका अंजनी मालपेकर, चित्रकारांसाठी मॉडेल म्हणून काम करणाऱ्या सुरंगा मुळगावकर आणि नाटककार हेमा पेडणेकर. सगळ्या मुळच्या गोव्याच्या. त्यातील सुरंगाबद्दल उत्सुकता वाटली. ती चित्रकार राजा रवि वर्मा (१८४८-१९०६) याच्यासाठी मॉडेल म्हणून काम करत असे असा उल्लेख आला. मी वाचलेल्या रणजीत देसाई यांच्या राजा रवि वर्मा ह्या कादंबरी-वजा चरित्रात सुगंधा असा उल्लेख आला होता. ते पुस्तक परत कपाटातून काढले आणि वाचले. सुगंधा हि अर्थात नाव बदलेली सुरंगा होती हे समजले. राजा रवि वर्मा याच्या जीवनावर बेतेलेला रंग रसिया हा २००८ मधील चित्रपट देखील पहिला. एकोणिसावे शतक आणि न्यूड मॉडेल, पुराणातील प्रसंग रेखाटणे, राजा रवि वर्माचे काळापुढे असणे हे सर्व अतिशय रोमांचित करणारे वाटले. राजा रवि वर्माचे भारतीय चित्रकलेच्या इतिहासात मोठे स्थान आहे. भारतात आधुनिक चित्रकला त्यांच्या पासून सुरु झाली असे म्हणतात. त्या आधी अर्थात कित्येक शतके चित्रकला होतीच, नाही असे नाही. पण त्यांनी  तैलरंगात वास्तववादी चित्रे काढली. त्यांच्या काळात अजून जे जे  कला महाविद्यालय मुंबई मध्ये सुरु झाले नव्हते. नंतर चित्रकलेतील विविध आधुनिक प्रवाह येत गेले. कला महाविद्यालय झाल्यानंतर विद्यार्थ्यांना न्यूड मॉडेल पाहून रेखाटने करायला शिकवले सुरु झाले(नुकताच मराठी मध्ये ह्या विषयावर न्यूड हा चित्रपट येऊन गेला होता). इतर अनेक शैली, अनेक विचारप्रवाह देखील सुरु झाले.

Raja Ravi Varma

Raja Ravi Varma

मग मी मोर्चा वळवला तो माझ्याकडे असलेल्या दोन पाश्चात्य चित्रकारांच्या चरित्रात्मक पुस्तकांकडे. प्रसिद्ध चित्रकार विन्सेंट व्हॉन गॉगचे (१८५३-१८९०) चरित्र लस्ट फॉर लाइफ परत कपाटातून बाहेर काढले, पूर्वी केव्हातरी वाचायला घेतले होते, पंधरा-वीस पाने वाचून झाली होती. दुसरा पाश्चिमात्य चित्रकार ज्याचे चरित्र माझ्याकडे होते तो म्हणजे लोत्रेक(१८६३-१९०१). त्याच्या चरित्राच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे जयंत गुणे यांनी केलेले स्वैर रुपांतर होते. मुळ लेखक पिएर ल मूर. ते देखील वाचले. दोघांवर चित्रपट निघाले होते. ते देखील शोधले आणि पाहिले. ह्या दोघांच्या जोडीला तिसरा चित्रकार पॉल गोगँची  (जयंत गुणे यांचाच पॉल गोगँची वरील मौज २०१४ च्या दिवाळी अंकात आलेला लेख मी वाचला होता). हे तिघे पॅरिसमधीलच समकालीन, आणि एकमेकांना भेटलेले, मित्र असलेले. पण पॉल गोगँची बद्दल नतंर केव्हातरी. लोत्रेक मातृप्रेमी, तर व्हॉन गॉग बंधूप्रेमी. दोघेही अल्पायुषी पण वादळी आयुष्य जगलेले. दोघेही चांगल्या घरातील, पण आयुष्यभर दारिद्र्यात जगले, तळागाळातील लोकांबरोबर राहिले. अर्थात त्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांत दिसते.

असो. आधी लोत्रेक बद्दल आणि जयंत गुणे यांनी केलेय पुस्तकाच्या अनुवादाबद्दल. लोत्रेकचा जन्म फ्रान्स मधील राजघराण्यातला, एकोणिसाव्या शतकातील. लहानपणी कसल्याश्या आजारामुळे दुर्दैवाने त्याच्या कंबरेखालचा भागाची वाढ खुंटते, थांबते. आई वडिलांचा, त्यातही वडिलांचा भ्रमनिरास होतो. आई त्याची अशी अवस्था पाहून मनातल्या मनात दुःखीकष्टी असते. त्यातच त्याला चित्र काढण्याचा नाद लागतो, आणि आयुष्यात चित्रकार बनायचे असे स्वप्न बाळगतो. पॅरिसला जातो, तेथून जवळच असलेल्या मोंमात्र येथे समाजातील निम्न स्तरातील लोकांत मिसळतो, वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली, स्त्रिया, मोलमजुरी करणाऱ्या लोकांची, नाईट क्लब, हॉटेल्स मधील दिसणाऱ्या दृश्यांची चित्रे काढत राहतो. आयुष्यात एखाद्या स्त्रीशी लग्न करून संसार थाटायचे स्वप्न मात्र साकार होत नाही, त्याच्या बेढब शरीरयष्टीमुळे त्याच्या जवळहि कोणी येत नसत. तो एकाकी, व्यसनाधीन, मनातून खचलेला होता. त्याच्या चित्रांना प्रसिद्धी मिळत होती, नाही असे नाही, त्याचे नाव देखील होत होते. पण ह्या इतर गोष्टींचा परिणाम होऊन तो वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी निर्वतला. लस्ट फॉर लाइफ या पुस्तकात एक प्रसंग आहे.  एकदा पॉल गोगँ आणि विन्सेंट व्हॉन गॉग पॅरिस  मध्ये बोलत असता लोत्रेकचा विषय निघाला. पॉल गोगँ म्हणतो, ‘….He is a damn fine painter, but he is crazy. He thinks that if he sleeps with five thousand women, he will vindicate himself for not being a whole man. Every morning he wakes up with gnawing inferiority because he has no legs; every night he drowns that  inferiority  in liquor and woman’s body. But it is back with him next morning. If he weren’t crazy, he would be one of our best painters….”.

Moulin Rouge (मुलॉं रूज)  नावाचा त्याच्या जीवनावर एक चित्रपट आहे (YouTube वर आहे). मुलॉं रूज नावाचे पॅरिस मध्ये एक प्रसिद्ध night-club आहे, आणि तो तिथे नेहमी जात असे. त्याच नावाचे त्याचे एक चित्र देखील आहे. म्हणून त्याचेच नाव चित्रपटाला आहे. दहा एक वर्षांपूर्वी युरोप सफरीच्या दरम्यान पॅरिसला धावती भेट होती, तेव्हा Paradis Latin नावाच्या एका night-club मध्ये देखील गेलो होतो. पॅरिस हे कला संस्कृती साठी प्रसिद्ध आहे, परत एकदा सवडीने तेथे जाऊन आले पाहिजे. पॅरिस मध्ये तर त्यावेळी अनेक चित्रकार राहत होते, ते एकमेकांना भेटत, चर्चा करत, मदतही करत, वादविवाद, हेवे-दावे होत. एकूण कलेला पोषक असे वातावरण होते असे दिसते या दोन्ही पुस्तकांतून. आता काय परिस्थिती आहे कोणास ठाऊक.

आता विन्सेंट व्हॉन गॉग बद्दल. जगभरात अतिशय प्रसिद्ध चित्रकार. लस्ट फॉर लाइफ हे त्याच्या आयुष्यावरील पुस्तक वाचनीय आहे. त्याचे जीवन आणि त्याची चित्रकला दोन्ही एकमेकांत मिसळले होते. बऱ्याच जणांना आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे खूप उशिरा समजते किंवा समजत देखील नाही. व्हॉन गॉगला देखील त्याला चित्रकार व्हायचे आहे हे खूप उशिरा उमगते. घरची परिस्थिती अतिशय चांगली होती, चित्रे आणि शिल्पं विकण्याचा व्यवसाय होता. दोन-तीन असफल प्रेमप्रकरणे, पैश्यांची कायम चणचण. त्याचा भाऊ थिओ (art dealer) याच्या जीवावर तो, त्याने प्रत्येक महिन्याला पाठवलेल्या पैश्यांवर जगत होता. दोघांचे एकमेकांवर अतिशय स्नेह होता, आणि त्या दोघांत खूप मोठा पत्रव्यवहार आहे. विन्सेंटला त्याच्याकडे उपजत कला नाही आणि त्याच्या चित्रांना काहीही तंत्र नाही असे कायम आयुष्यभर ऐकावे लागले. त्याने असे असूनसुद्धा आपल्या मनाचे ऐकत, त्याला जशी चित्रे काढायची होती तशीच त्याने ती काढली. तो हायात असे पर्यंत उभ्या आयुष्यात एकच चित्र विकले गेले. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चित्रांना अमाप प्रसिद्धी लाभली. व्हॉन गॉगने वयाच्या ३७व्या वर्षी गोळी मारून घेऊन आत्महत्या केली.

त्याच्यावर असलेले तीन चित्रपट माझ्या पाहण्यात आले. तसे बरेच आहेत. पहिला Loving Vincent, दुसरा Vincent and Theo, आणि तिसरा Lust for Life जो त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. Loving Vincent हा painted animation चित्रपट आहे, २०१७ मधील, Amazon Prime वर आहे. आणि हा चित्रपट त्याच्या शेवटच्या काही  दिवसांमधील घटनांवर आधारित आहे, आणि खूपच वेगळा चित्रपट आहे.  Vincent and Theo आहे त्याच्या आणि भावाच्या संबंधावर आधारित आहे, १९९० मधील, YouTube वर आहे. शेवटचा आहे १९५६ मधील, Kirk Douglas ची प्रमुख भूमिका असलेला. अजून एक विशेष म्हणजे, त्याच्या आयुष्यातील विविध स्थळांची, गावांना भेट देऊन त्याचे जीवन समजावून घेण्यासाठी एक guided tour आहे. त्याची माहिती येथे आहे, आणि त्याच्यावर एक लेख येथे आहे. Kenneth Wilkie याने व्हॉन गॉग वर बरेच संशोधन केले आहे. त्याची माहिती व्यंकटेश माडगुळकर यांनी लेखकाचं गाव लेखकाचं घर या पुस्तकात दिली आहे. कधीतरी हा प्रवास करायचे मनात आहे, पाहूयात.

अशी ही तिघा चित्रकारांची विलक्षण आयुष्यं, चांगल्या घरातून असूनही, चित्रकलेसाठी त्यांनी आयुष्य वेचले. साधारण एकाच काळात, पण एक स्वातंत्र्यपूर्व भारतात, तर दुसरे युरोप मध्ये कार्यरत असलेले. त्यामुळे त्या काळात दोन्ही ठिकाणी कलेची एकूणच परिस्थिती कशी होती याची कल्पना येते. तसे मी काही चित्रे,  किंवा चित्रप्रदर्शने खूप अशी पहिली नाहीत. खूप पूर्वी औंध (सातारा जिल्हा, यमाई देवी) मधील पंतप्रतिनिधी यांचा चित्र संग्रह(भवानी म्युझियम) पहिला आहे, अमेरिकेत Philadelphia Museum of Art, Barnes Foundation येथे असलेला चित्र संग्रह पाहिला आहे. त्या सर्वांबद्दल बद्दल परत कधीतरी. या तिन्ही चित्रकारांची चित्रे मी पाहिली आहेत कि नाही ते माहित नाही; पाहिली असली तरी किती कळली हे अलविदा! पण त्यांची चरित्रे वाचून, पाहून हे सर्व मांडावेसे वाटले, इतकेच. भारतातील चित्रकारांच्या चरित्रात्मक/आत्मचरित्रात्मक पुस्तके तशी बरीच आहेत, पण चित्रपट नाहीत. प्रसिद्ध चित्रकार गायतोंडे, किंवा मकबूल फिदा हुसैन यांच्या जीवनावर चित्रपट यायला हरकत नाही.

 

आधुनिक कला आणि सामाजिक परिवर्तन

आज गिरीश कार्नाड यांचा पहिला स्मृतीदिन. गेल्या वर्षी(म्हणजे २०१९ मध्ये) १० जूनला त्यांचे निधन झाले. पाच-सहा वर्षांपूर्वी माझी त्यांचासोबत ईमेल वर बातचीत झाली होती. निमित्त होते ते त्यांच्या एका कन्नड पुस्तकाचे मी करत असलेल्या भाषांतराचे. आगोम्मे ईगोम्मे असे त्याचे कन्नड नाव. भाषांतर तसे अजूनही संपलेले नाही. ह्या वर्षी होईल असे वाटले होते, पण झाले नाही, त्यातच लॉकडाऊनचे देखील निमित्त झाले.

त्या पुस्तकातील मी पूर्वी काही भाषांतरित लेख ह्याच ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते. पहिला ब्लॉग एका कथेचे भाषांतर होते(सर्व काही संपल्यावर). दुसरे होते ते नाटक कलेच्या मुळाबद्दलच्या एका पौराणिक कथेचे(Origin of theatrical arts). तसेच त्यांनी गुरुदत्तच्या चरित्राच्या पुस्तकाला  लिहिलेल्या प्रस्तावनेचे देखील मी नुकतेच भाषांतर केले होते(गुरुदत्त कोण?). आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचाच पुस्तकातील एक वैचारिक लेख भाषांतरित स्वरूपात येथे देत आहेत. गिरीश कार्नाड प्रसिद्ध होते म्हणजे त्यांचे स्पष्ट आणि परखड विचार. ते भाषणे देखील भरपूर करत, त्यांना विविध ठिकाणी व्याख्यानाला बोलावणे येत असे. पुण्यात एकदा मी त्यांचे संगीताबद्दल विचार, शुभा मुदगल यांनी आयोजित केलेल्या बाजा गाजा या संगीत महोत्सवामध्ये, ते देखील इंग्रजीत.

हा लेख देखील म्हणजे त्यांचे एक भाषण आहे. ते देखील मुळ इंग्रजीत होते. त्यांचे कन्नडमधील भाषांतर त्यांच्या उपरोल्लिखित पुस्तकात त्यांनी प्रसिद्ध केला होता(आधुनिक कले मत्तू सामाजिक परिवर्तने असे त्या लेखाचे कन्नड शीर्षक). भाषणाचे निमित्त होते नेदरलँड्मधील एक कार्यक्रम. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित तेथील Royal Tropical Institute ने India’s Culture in Motion हा कार्यक्रम आयोजित केला होता, १९९८ मध्ये. त्यावेळी त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण म्हणजे हा लेख होय. मुळ लेख बराच मोठा आहे. सोयीसाठी मी दोन भागांत ब्लॉग रुपात प्रसिद्ध करणार आहे. खाली दिलेले भाषांतर पहिला भाग आहे. पुढचा भाग नंतर प्रसिद्ध करणार आहे.

Girish Karnad

Girish Karnad. Photo from back-cover of his Kannada book Agomme Igomme

जाता जाता, गिरीश कार्नाड यांच्या चरित्राचे परिचय करून देणारा ब्लॉग(नोडनोडता दिनमान, आडाडाता आयुष्य#१) मी लिहिला होता. तसेच त्यांनी रचलेल्या तलेदंड नाटकाच्या प्रयोगाबद्दल देखील मी लिहिले होते(बसवण्णा, गिरीश कार्नाड आणि तलेदंड). ते देखील जरूर वाचा आणि ह्या श्रेष्ठ आणि बहुरंगी अश्या व्यक्तिमत्वाच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करूयात!

आधुनिक कला आणि सामाजिक परिवर्तन

भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने हे संमेलन आयोजित केले गेले आहे. याचा प्रमुख उद्देश असा आहे की, भारतात गेल्या अर्ध-शतकात, समाजात कलेच्या क्षेत्रात झालेलं वेग-वेगळे बदल आणि त्यांचा मागोवा, आणि त्यांचे विश्लेषण करणे हा आहे. सांस्कृतिक क्षेत्रात तरी स्वातंत्र्य-पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळ असे निश्चित असे कालखंड आहेत असे म्हणता येते. स्वातंत्र्योत्तर काळात क्रियाशील असलेल्या शक्ती ह्या स्वातंत्र्य-पूर्व काळातील वसाहतवादी युगात उगम पावून वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे ह्या शक्तींचा परिचय करून घेताना, त्यामागील प्रक्रिया देखील जाणून घेणे अगत्याचे आहे.

माझ्या विवेचनाच्या आरंभी मला ब्रिटीश काळातील दोन आयमाकडे आपले लक्ष वेधायचे आहे. पहिला आयाम म्हणजे, शिक्षण आणि राज्यकारभारात/व्यवहारात झालेले इंग्रजी भाषेचे आगमन हे होय. १९३३ मध्ये, लॉर्ड मॅकॉलेने लिहिलेल्या टिप्पणी असे म्हणते, ‘येथील मुळनिवासी जनतेला इंग्रजी साहित्य, तसेच विज्ञान समजण्यासाठी इंग्रजी भाषा शिक्षणाचे माध्यम होणे गरजेचे आहे, तसेच, सर्व पौर्वात्य शिक्षणासाठी देण्यात येणारी सरकारी मदत थांबवण्यात येत आहे’. या धोरणामुळे आमच्या सुशिक्षित समाजाची विचार प्रक्रियाच शासकीय भाषेनुसार नियंत्रित झाली. स्वतः भारतीयांत आपल्या जीवनाच्या विविध अंगांचा, पाश्च्यात परिकल्पनाचा झालेल्या परिचयामुळे, साम्राज्यवादाच्या चौकटीत ठेवून विवेचन करण्याची सुरु झाली. याचा परिणाम असा झाला की भारतीय बुद्धीजीवी समाजात स्वतःकडे पाहण्याची पद्धतीच बदलून गेली.

त्याच बरोबर, आमच्या समाजात एक नवी मूल्यव्यवस्था निर्माण झाली. आमच्या दैनदिन जीवनात देखील, काय बरोबर, किवा काय चुकीचे आहे, हे पाश्च्यात तर्क-पद्धतीनुसार ठरवू लागलो.

दुसरा आयाम असा की, मद्रास, कलकत्ता, मुंबई या सारखी नगरे निर्माण झाली आणि त्यांची वाढ झाली/होऊ लागली. अशा शहरीकरणामुळे, एका नवीनच मानसिकता समाजात वाढीस लागली. ब्रिटिशांच्या आधी सुद्धा, भारतात शहरे होती, नाही असे नाही; पण त्यांची मनोभूमिका वेगळी होती. त्या काळी समुद्र-किनारी असलेल्या राज्यांच्या व्यतिरिक्त, भारतातील बहुतेक शहरे ही समुद्र किनाऱ्यापासून लांब, अंतर्गत भूभागावर वसली गेली होती. ब्रिटीश संस्कृती ही ह्याच्या अगदी विरुद्ध अशी समुद्रगामी अशी होती. त्यांचा सर्व व्यापार हा सागरावर अवलंबून होता. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी समुद्रकिनारी शहरे वसविली. त्यामुळे भारतात त्यांनी ज्या तीन ठिकाणी नवीन शहरे निर्माण केली, त्यांना त्यांचा स्वतःचा असा पूर्वेईतिहास काही नव्हता. ह्या शहरात त्यांनी थाटलेल्या कारखान्याच्या आसपास, आणि ब्रिटीशांनी दिलेल्या सवलतीमुळे, एतद्देशीय भारतीय व्यापारी आकर्षित होवून ह्या शहरात येवू लागले. त्यामुळे हळूहळू ब्रिटीश साम्राज्य आपले पाय रोवू लागले. साहेबाच्या प्रती निष्ठा, कौतुक वाढीस लागले, त्याच्या सारखेच दिसावे ही भावना देखील वाढीस लागली. तसेच एका तऱ्हेचा Bourgeois समाजच निर्माण झाला, जो ब्रिटीश व्यापाराचा केंद्रबिंदू झाला.

पुरातन अथवा मूळच्या भारतीय नगरांत आणि वसाहतवादी अर्थव्यवस्थेतून नवीनच उदयास आलेल्या ह्या तीन शहरात मध्ये सुरुवातीपासूनच एक सांस्कृतिक भेद होता. भारतातील मुळच्या नगरात जरी लोक राहत असले तरी, त्या नगरांच्या आसपास असलेल्या गावामधून राहत असलेला समाज, याची जीवन मूल्ये ही साधारण एकच असत. देव, धर्म, जाती, कुटुंबव्यवस्था, सामाजिक संबंध वैगरे गोष्टी, त्या दोन्ही समजातील लोकाच्या आचरणात विशेष भेद नसे.

याविरुद्ध, ब्रिटीश वसाहतवादी काळातील ह्या नवीन नगरात ‘शहरी’ आणि ‘ग्रामीण’ असा भेद तीव्र होत गेला, असे दिसते. मुक्त अर्थव्यवस्थेवर आधारित व्यापार, वैयक्तिक कर्तृत्व शक्तीला मिळालेला वाव, तसेच सामाजिक जीवनात, धर्म-जाती-मत यांचे झालेले निराकरण, अशी ही सर्व ह्या नवीन शहरी संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. एकूणच आधुनिक आणि पाश्चिमात्य नागरी जीवन हे लक्ष्य होते.

यामुळे, ग्रामीण भागातील लोक, ह्या दृष्टीने मागे राहू लागले, त्यांच्या मध्ये अज्ञान वाढीस लागले. शहरातील जीवन हे पुढारलेले आहे, अशी भावना वाढीस लागली, या सर्वामुळे, शहरे आणि ग्रामीण भाग यातील अंतर आणखीन वाढू लागले. ब्रिटीशांनी, शहरी भागात शाळा, महाविद्यालये, आधुनिक हॉस्पिटल इत्यादी सुविधामुळे, ह्या भावनेला आणखी चालना मिळाली.

इथे एका गोष्टीचा उल्लेख करावयास हवा. हा शहरी समाज कितीही पुढारलेला होऊ लागला, पाश्चिमात्यांचे अनुकरण करू लागला असला तरी, घरात त्याचा प्रवेश झाला नाही. कुटुंबात, जाती-मत-कुलाचार, संप्रदाय, याथाप्रकार चालूच राहिले. यामुळे, शहरी जीवनात एक प्रकारचे द्वंद आणि दांभिकता निर्माण झाली(ह्या विषयावर विचारवंत आशिष नंदी यांनी लेखन केले आहे).

नाट्य आणि संस्कृती

पाश्चिमात्यांचे अनुकरण हा शहरी समाजाच्या जीवनाच्या शैलीचा भाग झाला, हे जरी खरे असले तरी, सांस्कृतिक अनुकरण सार्वजनिक क्षेत्रात सोपे असते. घरातील व्यवहार त्याने दुषित होत नाहीत. ह्या नवीन मध्यमवर्गाने, हा सांस्कृतिक बदल, कोठे आणला असेल तर तो रंगभूमी वर.

असे दिसून येते की, येथील मनोरंजनाचे स्वरूपच ब्रिटिशांच्या रंगभूमीच्या दोन आयामांमुळे बदलून गेले. पहिला बदल झाला तो शहरी/नागरी रंगभूमीवर असलेला procemium arch. सांप्रदायिक भारतीय रंगभूमीवर, प्रेक्षक आणि रंगभूमी ह्या दोघात कायम देवाणघेवाण, संवाद असे. तो यामुळे तुटला. नवीन प्रकाश्योजानेद्वारे, आता रंगभूमीवरील नटांवर/कलाकारांवर तो केंद्रित झाला, आणि प्रेक्षागृहात अंधार ठेवण्याची प्रथा सुरु झाली. रंगभूमीवरचे नाट्य आत्ता जणूकाही लांबवर एका कक्षात घडत असलेले स्वप्नवत भासू लागले(अपवाद अर्थात, गाण्याला अथवा सांगितला मिळणारा वन्समोअर, किंवा हास्य-विनोदाला मिळणारी प्रेक्षकांची प्रतिक्रिया)

दुसरा महत्वाचा बदल घडून आला, तो नाटकासाठी असलेली तिकीट-विक्रीच्या व्यवस्थेमुळे. नाटकामुळे मनोरंजन करून घ्यायचे असेल तर, त्यासाठी उचित दाम मोजला पाहिजे अशी वृत्ती वाढू लागली. या आधी, राजे-राजवाडे, समाजातील धनिक व्यक्ती, देवस्थान वगैरे ही मंडळी, नाटकाच्या प्रयोगाचा खर्च उचलत असत, ज्या मुळे प्रेक्षकांना काही दाम द्यावा लागत नसे.

ब्रिटिश रंगभूमी आणि त्यांची इंग्लिश शिक्षण पद्धती या दोन उपक्रमामध्ये एक सिद्धांत अंतर्भूत होता. तो म्हणजे, शेक्सपियरच्या नाटकात ब्रिटीश समाजाचे यथार्थ चित्रण आले आहे, यावर असलेला दृढ विश्वास, हा होय आणि त्याच्या नाटकात चितारलेला ब्रिटीश समाज हा जगातील इतर समाजापेक्षा श्रेष्ठ आहे, असा मुद्दा उपस्थित केला जाई. भारतातील बुद्धीजीवी समाजात, ह्या एका नाटकाने टाकलेला प्रभाव हा अभूतपूर्व असा होता. ब्रिटिशांचे अनुकरण करणे आणि आपण त्यांच्या पेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही, मागे नाही, ही त्या बुद्धीजीवी समाजाची त्या वेळी गरज बनली होती.

आपल्याकडे तत्व-ज्ञान, पुराण, महाकाव्य, ही सर्व असल्यामुळे, ब्रिटिशांची बरोबरी स्थापन करण्यास मदत झाली. ब्रिटीशांनी अकस्मातपणे नाटकाकडे मोर्चा वळवला. शेक्सपियरच्या तोडीस तोड भारतीय नाटककार उभा करणे आवश्यक झाले. सर विलियम जोन्स याने शाकुन्तालाचे भाषांतर केले होते आणि त्यांची प्रशंसा केली होती. जर्मन महाकवी गटे याने तर शाकुंतल नाटकाला डोक्यावर घेतले होते. भारतात कालिदासाला जरी श्रेष्ठ नाटककार म्हणून मान्यता मिळाले असले तरी, तो राष्ट्रीय अस्मितेचा भाग तो पर्यंत तरी बनला नव्हता. आता त्याला शेक्सपियर ऑफ इंडिया असे नामाभिधान त्याला बहाल करण्यात आले.

शेक्सपियरच्या उदाहरणावरून त्यावेळचे भारतीय बुद्धिजीवी समाज किती ढवळून निघाला हे जर पाहायचे असेल तर १९व्या शतकात आलेल्या भाषांतरांची संख्या पहिली तर लक्षात येईल. शेक्सपियरच्या नाटकाची नव्हे, तर कालीदासाच्या नाटकांची! १९व्या शतकात उत्तरार्धातील केवळ २० वर्षात, ‘शाकुंतल’ ची चार मराठी भाषांतरे, तर २ कन्नड भाषांतरे आली होती.

अण्णासाहेब किर्लोस्कर(ज. १८४३) हे मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक. त्यांनी रंगभूमी वर आणलेले पहिले नाटक हे ‘शाकुंतल’ हेच होते. त्यांनी अश्या संस्कृत कृती वर आधारित नाटके आणून नाटक कंपन्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली, हे खरे आहे. पण त्यांनी असेही म्हटले आहे की मला ‘इंग्लिश’ पद्धतीची रसनिर्मिती करायची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

ब्रिटीश सरकार सारख्या विदेशी राज्यकर्त्यांचा विरोध करायला हवा असे मानणाऱ्या राजकीय विचारवंतामध्ये ही शेक्सपियर मुळे कशी संदिग्धता निर्माण झाली होती, त्याचे मराठी नाटककार कृष्णाजी खाडिलकर हे उत्तम उदाहरण आहेत. त्यांचे एक नाटक ‘कीचकवध यांच्या नाटकात, सैरंध्री आपल्या आप्तजनांना गमावते, त्या वेलची तिची दर्शवलेली विपन्नावस्था ही सरळ सरळ त्या काळातील भारतमातेच्या अवस्थेशी मिळते जुळते असे आहे. त्या नाटकात सैरंध्रीचा पाणउतारा करणारा, तिच्या वर हात टाकणारा कीचक, हा त्यावेळी भारताचा प्रमुख लॉर्ड कर्झन आहे हे ही स्पष्ट होते.ब्रिटीशांनी ह्या नाटकावर, राजकीय हिंसेला खतपाणी मिळेल ह्या विचाराने, बंदी आणली. त्याच खाडीलकारांचे दुसरे नाटक ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ ह्यात नायकाचे पात्र ह्याम्लेटवर तसेच खलनायकाचे पात्र हे इयागोवर आधारित होते.

खाडीलकरांचे समकालीन नाटककार राम गणेश गडकरी ह्यांनी तर ‘शेक्सपियरच्या पुढ्यात मी अपूर्ण आहे. त्याची ३६ नाटके आणि माझी फक्त १८च नाटके आहेत’ असे जाहीर केले. किर्लोस्कर, खाडीलकर, गडकरी, ह्यासारख्या उच्चवर्णीय व्यक्तींनी, मराठी समजात चाललेल्या ब्रिटीश विरोधी चळवळीबद्दल असणाऱ्या भावनांना वाट करून दिली, तसेच खतपाणी देखील घातले.

१९व्या शतकाच्या मध्यात ब्राम्हण तसेच इतर उच्चवर्णीय समाजात नाटकाच्या प्रती तिरस्काराची भावना होती. देवळातील उत्सवाशी निगडीत अथवा धार्मिक उद्देशाने केल्या जाणाऱ्या अशा उपक्रमाव्यतिरिक्त नाटक निषिद्ध होते. तसे केल्यास जातीभ्रष्ट होण्याची भीती त्यात असे. धार्मिक कारणाव्यतिरिक्त, मनोरंजासाठी म्हणून कथा सांगणे, नृत्य, संगीत तसेच जादूचे खेळ हे सर्व इतर जातीच्या समाजात प्रचलित होते. (इथे एखादे उदाहरण पुरेसे आहे. रायचूरचे अपराळ तम्मण्णा १९०० मध्ये ‘श्री कृष्णपारिजात’ नाटक लिहून रंगभूमीवर आणले. ते लोकप्रिय झाले. तसे असले तरी त्यावेळच्या माध्व ब्राम्हण समजाचा रोष ओढवून घेतला. नाटकावर बहिष्कार टाकण्यात आला. तेव्हा तम्मण्णा यांच्या बंधूनी ते नाटक मठाधिपतींच्या समोर सादर करून आणि त्यांना हे नाटक धर्मप्रसाराचे काम करते आहे असे पटवून दिले, आणि बहिष्कार काढून टाकण्याची विनंती केली. आणि याउपर धर्मकार्य केल्यावाद्दल तम्मण्णाला शाबासकी देण्यात आली.)

हिंदू-मुस्लीम समाजामध्ये त्यावेळी नाटककलेच्या प्रती असलेला पूर्वग्रह एका बाजूला, तर ब्रिटीश समाजात नाटकाचे स्थान अत्यंत महत्वाचे होते. ब्रिटीश भारतात पाय ठेवल्यापासून, त्यांनी ब्रिटन मधून नाटक कंपन्या भारतात येत राहिल्या. त्यांच्या विलासी नाटक प्रयोगांना भरपूर उत्तेजन मिळे. त्यातील स्त्री भूमिका ‘मेमसाहेब’ करत असत. ह्यावरून नाटककलेला असलेली प्रतिष्ठा दिसून येते.

मुंबईतला पारसी समाज ब्रिटिशांचे अनुकरण करण्यात पुढे होता. त्यांनी १८५० मध्ये मुंबईमध्ये पारसी नाटक मंडळ स्थापन केली. १८५३ मध्ये लखनौचे नवाब वाजीद अली शाह हे एका फ्रेंच सांगितीकेवरून प्रभवित होवून ‘इंदर सभा’ हे संगीत नाटक लिहून घेतले. ते त्याचे प्रयोग करीत आणि स्वतः त्यात नृत्य करीत असत. त्यावेळेस देशभर त्याचे शंभराहून अधिक प्रयोग झाले.

१८८० च्या सुमारास महाराष्ट्रात ब्राम्हण आणि इतर उच्चवर्गीय समाजातील लोक, तसेच बंगाल मधील ब्रिटीशांनी पोसलेले जमीनदार यांनी नाटकाचे आधीचे संकेत मोडून स्वतःची अशी व्यावसायिक नाटके रंगभूमीवर आणली. किर्लोस्कर आदी मंडळीना मिळालेल्या यशामुळे नाटक कंपन्यांची एक समृद्ध अशी परंपराच सुरु झाली, जी पुढील ७५ वर्षे टिकून राहिली. procemium arch, सुमधुर नाट्यसंगीत, आणि ह्या नाटक कंपन्यांची असलेली एक विशिष्ट अशी आर्थिक व्यवहार पद्धती ह्या सर्व गोष्टी ह्या नवीन रंगभूमीची वैशिष्ट्ये होती. पौराणिक-ऐतिहासिक नाटके सुद्धा ब्राह्मण्य शैलीमध्ये सादर केली जायची, ज्याचे उदात्तीकरण होण्यास हे नाटकासारखे नवीन माध्यम पूरकच ठरले. त्याच वेळेला लोकसंगीतातून स्फूर्ती घेवून सादर केले जाणारे लोकनाट्य तसेच ग्रामीण नाट्य प्रकार हे कनिष्ठ दर्जाचे आहेत असा समज दृढ होत गेला. शतकानुशतके आपली लोकनाट्य परंपरा जीवित ठेवणाऱ्या ह्या कलाकारांना नुकत्याच उदयास आलेल्या व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश मिळाला नाही.(ह्या बाबतीत पारसी रंगभूमीने त्यांचे स्वागत करून अधिक उदारपणा दाखवला)

आमच्या संस्कृतीच्या व्याख्येमध्ये एक नवीन, मुलभूत बदल होवू घातला होता; जो देशातील वेगवेगळया भागात, वेगवेगळ्या कलाप्रकारात; वेगवेगळया रीतीने, जरी दिसायला सुरुवात झाली असली तरी, त्याचे मूळ स्वरूप आणि परिणाम एकच होता असे दिसते. उच्चवर्गातील समाजाने आतापर्यंत ज्या परंपरागत व्यवसायांना आपल्या पासून दूर ठेवले होते, त्याच गोष्टी आता ‘संस्कृती’, ‘कला’, ‘दोन हजार वर्षांची परंपरा” ह्यासारखी लेबलं लावून स्वीकारार्ह होत गेल्या.

आमच्याकडे अनादी काळापासून काही कलाप्रकार कनिष्ठ वर्गातील समाजाने आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून जपून ठेवले, त्याचे संवर्धन केले. ह्या समाजाला, वर्गाला, शहरातील नाट्य चळवळीबाहेर जाणून बुजून ठेवण्यात आले. ह्या नवीन नाटक कंपन्या शहरी संस्कृतीच्या गौरवाचा, अभिमानाचा विषय ठरू लागला. नाट्यकलेने स्वतःची जात बदलली असे म्हणावे लागेल.

(क्रमशः)

Eternal Gandhi

I had written a  blog few days ago on the occasion of 150 birth anniversary of Mahatma Gandhi. While writing that I recalled that, I had attended a exhibition on Mahatma Gandhi titled Eternal Gandhi Multimedia Exhibition. This was unique experience, which I thought I should share here on the blog. I had been to this one, way back in 2008, when it was in the city. It was at International Convention Center in Pune. Now, I believe this exhibition has turned into permanent museum in Delhi.

The exhibitions which we usually see are “Touch Me Not” kind of exhibitions. This one is not that, but opposite, encouraging viewers to touch and feel. This exhibition, as the name says, not a regular exhibition, but it employs multimedia technologies. This exhibition, conceived by Ranjit Makkuni and her team of Scared World Research Laboratory, explores modern art, design and interactive technology showcasing Gandhian thoughts and values. It presents language of physical interface actions derived from classical symbols of spinning wheel, turning of the prayer wheels, touching symbolic pillars, the act of hands touching sacred objects, also collectively chanting as part of Gandhi’s satsanga. These interactions allow people to access multimedia imagery and multidimensional mind of Mahatma Gandhi. Each object in the exhibition spreads Gandhian views such as dignity of hands/labor, healing of divides, leveraging village creativity and diversity in the face of homogenization.

Some snapshot of objects I experienced in this exhibition.

Pillar of World without Caste: This art installation requires one to hold hands to light up a pillar of light symbolizing destruction of caste prejudice. E-Harmonium: In this installation, the keys of the harmonium. During Gandhiji’s prayer programs, this musical instrument was used, and in general also it is popular instrument for accompaniment. In the exhibition, it triggers off various interfaith songs.

E-Prison: This installation enables viewers to recall the scenes of Mahatma Gandhi’s life when he was jailed in the prison, through there interactive prison rods. Ashram Story: Ashram was Gandhiji’s concept of house without boundaries of caste, creed, gender, religion. It is embodiment of truth. Here all could live together to serve common cause and also find individual fulfillment. He borrowed this concept from Tolstoy Farm, South Africa, Sevagram, Sabarmati ashram.

Dimensions of the Salt March: Dandi Salt March is significant step in the India’s freedom struggle. This installation enables viewers to pickup salt from the urn, as it plays back dimensions of the Dandi March. To Do or Die: In this sculptural installation, a shrine is dedicated to 79 men/women who were carrying out Satyagraha, from Sabarmati to Dandi. There is a video display inside the shrine, which plays back the scenes of the march.

Charkha Mandala: In this art installation, small diamond like spinning wheel(Charkha) are displayed in an interlocking pattern, suggesting the notion of togetherness and collective power of individual action oriented towards achieving a common goal. From Mohandas to Mahatma: This is time line browser showcasing his life on the time line of 1869 to 1948. The act of walking along side of a wall is transformed into a retrieval device. It brings up images and events from Gandhiji’s life as a social revolutionary to his search for spiritual enlightenment. Traversing space along this narrow corridor enables you to hold a mirror to what made this man so extraordinary. Historic archival footage, photographs, and interviews with various eminent scholars and Gandhians create an information mosaic.

E-Train: This interactive art installation allows viewers to trace Mahatma Gandhi’s journeys in India, the places he visited, mainly by train. Soon after he returned from South Africa, he embarked on train journey to rediscover India, travelling third class, to feel one with masses and identify with their needs. He realized that political emancipation and social reform need to go hand in hand. Global Gandhi: This art installation provides an anthropomorphic computer, it can listen, see, speak with and understand its environment and viewer within its range. Here it expounds Global Gandhi, that is, Gandhi as seen by contemporary historians and academics in relation to current day values and the needs of the people in the 21st century,

Pillar of Truth: The pillar is typically a scared object, in many cultures. This art installation denotes pillar of truth, is located at the heart of the exhibition, with purpose. Eleven rotatable discs spin around the axis. The turning of the prayer wheel triggers off a visual representation of Mahatma Gandhi’s 11 vows, mandatory for Satyagrahis, in order for him or her a man or woman of truth. Vaishno Hands: This installation allows one to touch hands folded in prayer to explore meaning of popular song Vaishnanva Janato.

Gandhi Harp: This art installation imagines Mahatma Gandhi in the form musical instrument harp, where each string, when struck, plays different songs associated with him. Next installation which is titled In Praise of Gandhi, has various dolls, representing world leaders, talking about Mahatma Gandhi. Kaleidoscope art installation, allows viewer to look into it and experience the stories of Mahatma Gandhi for children. Raghupati Xylophone: This art installation takes Xylophone and transforms it into musical instrument tuned to the devotional song Raghupati Raja Ram. Each tone of Xylophone can be recognized digitally, and allows for creation of digital mosaic mural. E-Charkha: This installation allows viewers to spin the wheel to understand role of Charkha in Sarvodaya and Swadeshi movement, particularly in the context of economic sustainability of the freedom struggle.

This was great experience, which I still remember after, almost a decade. Against the backdrop of globalization, the Eternal Gandhi encompasses new boundaries. This exactly was my topic of the aforementioned blog, finding relevance in this age. Do visit it next time when it is around or if you get a chance to be in Delhi.

गवंड्यांचे मंदिर

शीर्षक वाचून काय आहे हे असे वाटले असेल नाही? पुढे वाचा!

एक दोन दिवसांपूर्वीच्या पुण्यातील एका इंग्रजी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. शहरात रोजंदारीवर बांधकामाच्या ठिकाणी राडारोडा, वाळू, कॉन्क्रीटची घमेली टाकण्याचे काम करणाऱ्या काही महिलांना गवंडी कामाचे(इंग्रजीत skilled masons) महिनाभराचे प्रशिक्षण देण्यात आले. मला ही बातमी वाचून लहानपणापासून पाहत आलेले बांधकामस्थळावरील दृश्य डोळ्यासमोरून तरळून गेले. पुरुषच असलेली ही गवंडी मंडळी त्यांची हत्यारे वापरून नीटपणे दगड, किंवा विटा रचून भिंती बांधत आहे, त्यावर प्लास्टरचे कसबी हात फिरत आहेत, आणि महिला कामगार घमेली वाहून त्यांना विटा, आणि इतर माल पुरवत आहेत. आता हे चित्र बदलेल, जी नक्कीच चांगली गोष्ट आहे. ह्या निमित्त आणखीन एक गोष्ट आठवली ती म्हणजे माझ्या अमेरिकेतील भेटीदरम्यान पाहिलेले Masonic Temple, शब्दशः अर्थ गवंड्यांचे मंदिर!

मी अमेरिकेतील फिलाडेल्फिया या ऐतिहासिक गावी बऱ्याच वेळेस गेलो आहे. त्याबद्दल बरेच लिहिले देखील आहे. फिलाडेल्फिया हे तसे ऐतिहासिक शहर. मी नेहमी शहराच्या मध्यभागी(Philadelphia City Center) जेथे अश्या ऐतिहासिक वास्तूंची गर्दी आहे तेथेच राहत असतो. माझ्या तेथील राहण्याच्या ठिकाणापासून जवळच बऱ्याच जुन्या वास्तू आहेत त्या मला पाहायला आवडते. २०१४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा तेथे गेलो होतो, त्यातील एका वास्तूने मला खरेतर चकित केले होते. त्याचे नाव Masonic Temple. मी मनात म्हटले गवंडी लोकांचे कसले आले देऊळ. त्यावेळेस वास्तू बंद असल्यामुळे मी आत जाऊ शकलो नाही. नंतर परत गेलो. पण दरम्यान त्याबद्दल थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग समजले की ते सगळे वेगळेच प्रकरण आहे. एक विशिष्ट विचारसरणी, जीवनपद्धती अचारणाऱ्या लोकांचे ते भेटण्याचे स्थळ होते. त्याचा आणि गवंडी लोकांचा आज तरी काही अर्थाअर्थी संबंध नाही. अर्थात इतिहास असा सांगतो ह्याची सुरुवात चर्च, आणि इतर धार्मिक स्थळांचे बांधकाम करणारे गवंडी लोकं जी होती, त्यांची एक संघटना असे त्याचे स्वरूप होते. त्याला इंग्रजीत guild असे म्हणतात. अशी guilds प्राचीन भारतात देखील होती पूर्वी, ज्याला श्रेणी असे म्हणत. शिल्पशास्त्रात पारंगत, दगडी देवळे, मूर्ती कोरणाऱ्या, व्यापाराची, आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या  लोकांची guilds असत. हे मी माझ्या Indology अभ्यासक्रमात शिकलो होतो. प्रशिक्षण देणे, आर्थिक मदत करणे, काम मिळवून देणे हा प्रमुख उद्देश. बारा बलुतेदार लोकांची अशी guilds देखील होती.

Masonic Temple

Boston Masonic Temple

फिलाडेल्फिया मधील त्या Masonic Temple ची इमारत भव्य आणि सुंदर होती. संपूर्ण दगडी बांधकाम होते. नॉर्थ ब्रॉड स्ट्रीट आणि फिल्बर्ट स्ट्रीट ह्या दोन रस्त्यांच्या छेदावर ही वास्तू आहे. माझे कामाचे ठिकाण नॉर्थ ब्रॉड स्ट्रीटवर पुढे असल्यामुळे मला ती भव्य वास्तू नेहमीच दृष्टीस पडे. Freemasonry नावाच्या संस्थेच्या Grand Lodge of Pennsylvania चे ते मुख्य केंद्र आहे. अमेरिकेत नंतर मी असेच अजून एक स्थळ पहिले ते माझ्या बोस्टन या दुसऱ्या ऐतिहासिक शहरी. त्याचे नाव होते Boston Masonic Building किंवा Grand Lodge of Massachusetts असेही म्हणतात. पण ही इमारत स्थापत्यदृष्ट्या काही विशेष आकर्षक नाही.  ह्या दोन्ही इमारतींवर Freemasonry चे मानचिन्ह होते. ते देखील गवंडी कामाशी, बांधकाम अभियांत्रिकीशी निगडीत अशीच आहे, त्यात अंतर मोजण्याची पट्टी(rule), ओळंबी(level), vector, compass,  अशी हत्यारे आहे. हे सगळे त्यांचे भूमितीशी असलेले नातेच सांगते. तुम्ही जर कधी गवंड्याला काम करताना पाहिले असेल तर, ही आणि इतर अनेक हत्यारे तुम्ही पाहिली असतील. ही सगळी हत्यारे म्हणजे या पंथाची तत्वे चिन्हे आहेत. ही दोन्ही स्थळे पाहून, त्यांच्याबद्दल थोडेसे वाचल्यावर एका वेगळ्याच विषयाची माहिती मिळाली होती. एका विशिष्ट उद्देशाने मध्ययुगात सुरु झालेली ही stonemason’s guild कशी एका वेगळ्याच स्वरूपात एक विचारसरणी, जीवनदर्शन मानणारी, अध्यात्मिक उद्देशाची संघटना, पंथ(cult अश्या अर्थाने) या रूपात झाली हे पाहून आश्चर्य वाटत होते. मला एक छान व्हिडियो सापडला, हे सर्व समजून सांगणारा.

परत पुण्यात आलो. काही महिने गेले. एके दिवशी पुण्यातील माझ्या कार्यालयात जात असताना खडकी, बोपोडी भागातून मी चाललो होतो. अचानक मला एका जुन्या इमारतीवर Masonic Temple अशी अक्षरे वाचायली मिळाली. माझ्या डोक्यात घंटी वाजली. काही दिवसांनी सवडीने तेथे मुद्दाम परत गेलो. ती खडकीच्या लष्करी भागातील जुनी अशी इमारत मी नेहमी पाहत होतो. पण कधी उत्सुकता वाटली नव्हती. मी आत गेलो. सगळीकडे झाडंझुडपं वाढली होती. इमारतीच्या नामफलकावर mason guild चे मानचिन्ह देखील दिसत होते. आत गेल्यावर इमारतीवरील संपूर्ण नाव वाचले. ते आहे Horsamjee N Merchant Masonic Temple. बाजूला कोणाचे तरी एक घर होते. त्यातून एक गृहस्थ बाहेर आले, त्यांनी मला त्या वास्तूबाद्द्ल, आणि Freemasonry बद्दल सांगितले. Freemasonry guild म्हणजे काय, त्याचे सदस्य कसे होता येते, तेथे काय काम चालते वगैरे. हे होरासमनजी मर्चंट, ज्यांच्या नावाने ही इमारत आहे, ते कोण होते, हे मात्र समजले नाही. जो पर्यंत तुम्ही सदस्य होत नाही, त्या वास्तू मध्ये प्रवेश मिळत नाही. पुणे शहरात देखील लष्कर भागात Freemasons Hall आहे हे देखील समजले. तेथे जायला हवे कधीतरी. नंतर घरी येऊन इंटरनेटवर शोधाशोध केली , तर भारतात बऱ्याच ठिकाणी अशी Masonic Temples ब्रिटीश काळापासून आहेत हे समजले. त्याबद्दल विशेष माहिती सहज उपलब्ध नाही असे दिसते, अर्थात काही अपवाद आहेत.

असो, तर अशी ही हटके ठिकाणे, एक विशिष्ट, अनोळखी इतिहास असलेली.

 

आगळ्या वेगळ्या जगात नेणारा ‘न्यूड’

गोव्यात गेल्यावर्षी(नोव्हेंबर २०१७) पार पडलेल्या International Film Festival of India(IFFI) एस् दुर्गा आणि न्यूड या दोन सिनेमांची जोरदार चर्चा होती. त्यांच्यावर अश्लील म्हणून शिक्के बसले. तेव्हापासूनच रवी जाधव यांचा मराठी सिनेमा न्यूड, जो अनोळखी जगाची कवाडं किलकिली करणारा असा सिनेमा म्हणून अधूनमधून विविध माध्यमांतून येत राहिले. शेवटी एप्रिल मध्ये तो प्रदर्शित झाला. आज जाऊ, उद्या जाऊ असे करत करत अर्धा मे महिना गेला. इतर चित्रपटांच्या भाऊगर्दीत हा अजूनही चालू होता. मी तो एकदाचा पाहिला. मी इस्मत चुगताई यांचे १९४० मधील अश्लील ठरवलेल्या पुस्तकाचे मराठी भाषांतर कविता महाजन यांनी केले वाचतो आहे. त्यात त्यांनी इस्मत चुगताई यांना झालेल्या त्रासाची कहाणी दिली आहे, ते वाचून रवी जाधव यांना झालेला त्रास काहीच नाही असे वाटतेय!

चित्रपटाचा विषय अर्थातच स्फोटक आहे, म्हणूनच तर एवढी उलथापालथ झाली. चित्रकला शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मानवी शरीर जसे दिसते तसे कागदावर उतरवण्याचे प्रशिक्षण देतात. त्यासाठी स्त्री, पुरुष मॉडेल्स हवी असतात जी नग्न रूपात ह्या विद्यार्थ्यांसमोर बसू शकतात. अश्याच एका स्त्री मॉडेलची जीवनगाथा म्हणजे ह्या चित्रपटाचा विषय. खरे तर चित्रपटातील हा विषय तसा मला नवीन नव्हता.  मुंबईच्या सतीश नाईक संपादित चिन्ह ह्या चित्रकला ह्या विषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नग्नता ह्या विशेषांकात त्याची सविस्तर चर्चा केली होती (२०१०-११ दिवाळी विशेषांक, चित्रातील नग्नता आणि मनातील). संगीत, चित्रकला, शिल्पकला, त्याचे उपयोजन, यांसारख्या कलांबद्दल, कलाकारांबद्दल आस्वादक रीतींनी, कलेच्या निर्मितीबाबत, कलाकारांकडून विशेष असे लिहिले जात नाही. अर्थात काही सन्मानीय अपवाद आहे. सतीश नाईक हे त्यातील एक. त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी. प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा याची मुंबईतील(पण मुळची गोव्याची) स्त्री मॉडेल सुरंगा मुळगावकर प्रसिद्ध आहे.

तसे पहिले तर चित्रपट हा एका स्त्रीच्या(यमुना) अन्यायविरोधी संघर्षाची कहाणी आहे. ही स्त्री सकारली आहे ती कल्याणी मुळे हिने. कल्याणी मुळेला मी पूर्वी एका नाटकात पहिले होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका खेडेगावातील, का तालुक्याच्या गावातील एका स्त्रीचा नवरा व्याभिचार करून तीला आणि त्याच्या मुलाला घर सोडून देण्यास भाग पाडतो. मराठी, आणि बरेक कन्नड संवाद ह्यांच्यात आहेत. मला मजा वाटली यामुळे, कारण मी कन्नडही जाणतो. मग ही स्त्री मुंबईला तिच्या नातेवाईकाकडे काहीतरी काम करून जगावे यासाठी येते. ही कोणी दूरची मावशी(अक्का) असते. ही साकारली आहे छाया कदम (हिचा अजून के छान सिनेमा रेडू देखील मी पाहिला) हिने. पण दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती असते. मुंबईत अतिशय गलिच्छ वस्तीत, गरिबीत, एका पत्र्याच्या घरात ते राहत असतात. बिनकामाचा नवरा पूर्वी मुंबईतील गिरिणी कामगार असावा असा उल्लेख येतो. मावशीच्या नोकरीवर घर चालत असते. नोकरी कसली तर मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स(मागील मुंबई भेटीत येथे जायचे राहूच गेले) मध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम, पण वर वर सफाई कामगाराची नोकरी.

nude-marathi-film

यमुनेच्या पुढे उदरनिर्वाहाचा, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आवासून उभा असतो. अक्केला ती नोकरी पाहायला सांगते. यमुनेला अक्केच्या व्यवसायाची माहिती समजल्यावर ही हादरते, तीला किळस वाटते. पण पुढे तीही तेच काम पत्कारते. ते ती कसे करते, मनाची कशी उलथापालथ होते, तिच्या मुलाला हे सर्व कळते का, हे सगळे चित्रपटातून पाहायला हवे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या निमित्ताने हे अनोळखे जग आपल्यासमोर मांडले आहे. परिस्थितीमुळे संघर्ष करून जगण्यासाठी असाही मार्ग स्वीकारणाऱ्या न्यूड मॉडेल्स, प्रामुख्याने स्त्री मॉडेल्सची, जीवनगाथा मांडली आहे. कलाजगत या विषयाकडे कसे पाहते, त्यांचे विचार काय, सध्या परिस्थिती काय वगैरे गोष्टी थोड्याफार ओघाने येतात, पण तो चित्रपटाचा विषय नसल्यामुळे त्यावर भर नाही. पण अभिनेत्री छाया कदम आणि कल्याणी मुळे यांनी मात्र कमाल केली आहे. न्यूड मॉडेल्स म्हणून चित्र काढणाऱ्या मुलांच्या पुढे बसणे हे सगळे त्यांनी कसे केले असेल हे पाहून चकित व्हायला होते. चित्रपटात एकूणच सहजता आहे, ओढून ताणून काही आले असे वाटत नाही, किळसवाणे, विकृत असे देखील बिलकुल वाटत नाही, उलट चकितच व्हायला होते. हे श्रेय दिग्दर्शकाचेच असते.

nude-cinema

Poster of the cinema, courtesy Internet

न्यूड मॉडेल्स, आणि कलाशिक्षण ह्या विषयाच्या तश्या आणखीही काही बाजू आहेत. त्या सगळ्याच चित्रपटात येणे शक्य नाही. त्या सविस्तर अश्या वर उल्लेख केलेल्या विशेषांकात आल्या आहेत(त्याबद्दल लिहीन नंतर कधीतरी). अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा, वा इतर वस्तूचा गुण नसून, तो तसा आरोप करणाऱ्यांच्या मनाचा गुण आहे आहे असे विचारवंत आणि लैंगिकतज्ञ डॉ. एलिस म्हणतात. पण चित्रपटातच न्यूड मॉडेल्सच्या समर्थनार्थ एक वाक्य आले आहे की आपण जर कुत्री, मांजरी, आणि इतर प्राणी यांची चित्रे काढतो, तशी माणसांची देखील काढली तर काय हरकत आहे. हे थोडेसे बालिश आहे असे मला तरी वाटते. कलेच्या अभिव्यक्तीसाठी काही बंधन नसावे हे प्रमुख कारण त्याचे समर्थन करण्यासाठी पुरेसे आहे.

जाता जाता या बाबतचा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. मी २००४ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतविद्या(MA in Indology) हा अभ्यासक्रम हौस, आवड म्हणून शिकत होतो. इतर विषयांच्या जोडीला, भारतीय चित्रकला, शिल्पकला, मुर्तीविज्ञान व त्याचा इतिहास यांसारखे  विषय असल्यामुळे बरेच जण कला क्षेत्रातील होते. त्यातील एकाने(जो पेशाने चित्रकार, शिल्पकार होता), ज्याच्याबरोबर चांगली मैत्री झाली होती, त्याने मला न्यूड मॉडेल म्हणून त्याच्यासमोर बसणार का असे विचारले होते. मीही अगदी तत्काळ उत्साहाच्या भरात त्याला होकार दिला होता. पण तो विषय पुढे निघाला नाही, का कोणास ठाऊक. नंतर त्या विषयाचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे मीही अर्थातच काढला नाही. पण माझी न्यूड मॉडेल बनण्याची संधी हुकली!

विलोभनीय अशी सय

परवा बऱ्याच दिवसातून घराजवळ असलेल्या वाचनालयात जायला मिळाले. पुस्तके चाळत असता, प्रसिद् चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचे आत्मचरित्र हाती लागले. सई परांजपे हे तसे समांतर चित्रपट चळवळीतील महत्वाचे नाव. खरे तर अभिनेता नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र देखील नुकतेच आले होते(English-Then One Day) आणि आणि त्यांनी त्याचे केलेले मराठी भाषांतर(आणि मग एक दिवस) देखील आले होते. मागील महिन्यातच मी चित्रपट रसास्वाद शिबिराला उपस्थित राहिलो होतो, तेथे त्याचा उल्लेख झालाच होता. त्यामुळे ते नाव तसे डोक्यातच होते. त्यामुळे मी ते पुस्तक लगेच घेतले आणि वाचले. त्याचे शीर्षक सय-माझा कलाप्रवास. सय म्हणजे आठवणी, स्मरणरंजन. हे पुस्तक बरोबर एक वर्षापूर्वी प्रकाशित झाले होते. पुस्तक वाचल्यावर, त्याचे आयुष्य, म्हणजे कला जीवन किती विविध अंगांनी सजले होते, हे समजते. नसीरुद्दीन शाह आणि सई परांजपे तसे साधारण एकाच कालखंडातील. त्याकाळचा इतिहासाचा आणखीन उलगडा होतो. नसीरुद्दीन शाहचे आत्मचरित्र देखील वाचायाले हवे. असो.

सई परांजपे यांचे आजोबा(आईचे वडील) म्हणजे प्रसिद्ध गणिती रँग्लर परांजपे. त्याचे वडील हे रशियन होते. ते चित्रकार होते, त्यांच्या बरोबर औटघटकेचा संसार करून त्यांची आई शकुंतला परांजपे, लहानग्या सई बरोबर पुण्यात येते, येथून आत्मचरित्राची सुरुवात होते. शकुंतला परांजपे, या देखील लेखिका, तसेच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम केले, त्याबद्दल त्या लिहितात. इथेच वाचकाला आश्चर्याचा धक्का बसतो, ही माहिती मला तरी नव्हती. त्यानंतरची प्रकरणे ही सलग एका मागून एक अशी पुणे आकाशवाणी, पुण्यातील बालरंगभूमी, दिल्लीचे National School of Drama, पुण्यातील FTII, दूरदर्शन, Children’s Film Society of India, आणि परत दूरदर्शन, मधील त्यांचे दिवस याबद्दल ते लिहितात. या प्रकरणातून आपल्याला उमजते की त्यांनी किती प्रकारे वेगवेगळी माध्यमांतून प्रवास केला आहे. दूरदर्शनच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात त्यांनी दिल्लीत, चांगली सात-आठ वर्षे काम केले. तेथे त्यांनी लघुपट, माहितीपट, टेलिफिल्म, टेलीप्ले इत्यादी प्रकार आणले. दूरदर्शन मध्ये असताना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बर्ट हान्सट्रा यांची मुलाखत घेतली याची आठवण त्यांनी सांगितली आहेत. बर्ट हान्सट्रा यांची एक फिल्म ग्लास ही मी नुकतीच चित्रपट रसास्वाद शिबिरात पाहिली होती.

IMG_1295

Sai Paranjpe

शेवटील पाच-सहा प्रकरणे ही त्यांनी आपल्या चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रातील वावराविषयी लिहिले आहे. त्यांनी काही मोजकेच चित्रपट केले, आणि सर्वच्या सर्व हे एखाद्या विषयाला धरून होते, कुठलेही तद्दन व्यावसायिक असे नव्हते. मी अर्थात कथा, चष्मेबद्दूर हे चित्रपट पाहिले आहेत, आणि स्पर्श देखील पाहिल्याचा आठवतो आहे. त्यांचा पहिला चित्रपट स्पर्श. प्रत्येक चित्रपटासाठी एक प्रकरण, आणि ही प्रकरणे म्हणजे त्या त्या चित्रपटाची पडद्यामागची कुळकथाच. स्पर्श, चष्मेबद्दूर, कथा, दिशा, पपीहा, साज हे ते सहा चित्रपट. प्रत्येकाचा विषय वेगळा. त्या त्या विषयाला न्याय देण्यासाठीची धडपड त्यांनी अतिशय आत्मीयतेने मांडली आहे. चित्रपटांची पटकथा तेच लिहीत असत. पपीहा हा चित्रपट चिपको आंदोलनावर आधारित आहे. प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते जगदीश गोडबोले यांनी देखील सह्याद्री साठी बरेच काम केले होते, त्यांनी देखील पुस्तके लिहिली आहेत. त्यांची भेट घेऊन चर्चा केली, इत्यादी संदर्भ त्यांनी दिले आहेत. जगदीश गोडबोले यांच्या कामावर मी पूर्वी एक ब्लॉग(पश्चिम घाट बचाओ) लिहिला होता.

सई परांजपे यांची आणखीन एक प्रमुख ओळख म्हणजे नाट्यसृष्टीतील त्यांची मुशाफिरी. त्यासाठी त्यांनी ह्या आत्मचरित्रात सात-आठ प्रकरणे खर्ची घातली आहेत. प्रसिद्ध अभिनेता अरुण जोगळेकर त्यांचे पती, पुढे दोघे विभक्त झाले. अभिनेत्री विनी परांजपे त्यांची मुलगी. त्यांनी आणि अरुण जोगळेकर यांनी नाट्यद्वयी ही नाट्यसंस्था सुरु केली. ह्या सर्वांच्या कित्येक आठवणी ह्या प्रकरणातून आल्या आहेत. त्यांचे सर्वात प्रसिद्ध नाटक सख्खे शेजारी. ते मी खूप पूर्वी केव्हा तरी दिवाळीत एका दूरचित्रवाणी वाहिनी(त्यांचा शब्द प्रकाशवाहिनी, मस्त आहे ना?) वर पहिले होते. इतर प्रसिद्ध नाटके मोगरा फुलला, नांदा सौख्यभरे, जास्वंदी, आलबेल, आणि इतर नाटकांच्या कुळकथा याबद्दल त्यांनी लिहिले आहे. त्यांची काही नाटके हिंदी, पंजाबी भाषांत देखील त्यांनी केली आहेत, तसेच इतर नाटककारांची जसे की विजय तेंडूलकर यांचे गिधाडे, व्यंकटेश माडगुळकर यांचे बिकट वाट वहिवाट ही त्यांनी हिंदीत केली.

त्यांच्या वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांना युरोपला जाण्याची संधी मिळाली, त्यावेळी त्यांनी आपल्या पित्याची भेट घेतली, सावत्र आई, बहिण यांच्याबरोबर घालवले तेथील दिवस, तसेच तेथील विविध अभ्यासदौरे, तेथील नाटके पाहणे,  इत्यादी बद्दल देखील त्यांनी लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांचे पहिले लेखन नव्हे असे वाचताना आपल्याला समजते. नाटकं तर त्यांनी लिहिले आहेतच, आणि ती प्रकाशित आहेत. पण त्यांनी वेळोवेळी कथा, लघुकथा, ललितलेख देखील लिहिले आहेत. त्यांचा एखादा संग्रह आहे की काय हे शोधले पाहिजे. उदाहरणार्थ, त्यांनी युरोप मधील एका विशिष्ट्य अनुभवाबद्दल जिगोलो ही पुरुष वेश्या ह्या विषयाभोवती एक लघुकथा लिहिली होती असे ते ‘सय’ मध्ये नमूद करतात. पुस्तकाच्या शेवटी वाचकाला ते सुचवतात की अजून त्या आपल्या कला-जीवनाबद्दल, आयुष्याबद्दल लिहिणार आहेत. असे असेल तर ते चांगलेच आहे.

विविध क्षेत्रात, विविध ठिकाणी, विविध भाषेत काम केलेल्या सई परांजपे यांचे समृद्ध कलाजीवन जाणण्यासाठी हे पुस्तकं नक्कीच वाचले पाहिजे. तसेच हे पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवावे असे आहे, ते तर मी घेणार आहेच, तसेच नसीरुद्दीन शाहचे पुस्तक देखील घ्यावेसे वाटते आहे. इंग्रजी आवृत्ती ३००-३२५ रुपयात मिळत आहे, मराठी जवळ जवळ ७००! विजया मेहता(त्याही ह्या दोघांच्या समकालीनच) यांचे झिम्मा हे आत्मचरित्र मी विकत घेतले होते, त्यावर देखील लिहायचे आहे, पाहुयात, पुढे मागे.

सिनेमामय आठवडा, भाग#7

हा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील सातवा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. आजचा दिवस शिबिराचा शेवटला दिवस. आठवडाभरानंतर आम्ही सिनेमाच्या, जे दृक्‌श्राव्य  माध्यम आहे, त्याच्या जगातून बाहेर येणार. पण खरंच बाहेर येणार का? कारण शिबिरातच कुणीतरी असे म्हटले होते की जसा मासा पाण्याने कायम वेढलेला असतो, तसे आजकाल आपण सर्व दृक्‌श्राव्य  माध्यमाने कायमचे वेढले गेलो आहोत, त्याबद्दल आता सजग राहणे ही काळाची गरज झाली आहे. असो. लोकप्रभाचे संपादक विनायक परब कालच निघून गेले होते. सकाळी नाश्त्याच्या वेळेस एक-दोन जण, जे अहमदनगर वरून आले होते, त्यांची भेट झाली. दोघेही mass communication विषयाचे विद्यार्थी होते. पण बोलण्यातून, एकूण अविर्भावातून, त्यांना सारखे अनिश्चित वाटत असणार असे समजत होते. तेही खरेच म्हणा, या अफाट जगात, सिनेमाच्या जगात, त्यांना काहीतरी करायचे होते, पण कसं काय होणार याची चिंता होती, हे नक्कीच.

आजचा पहिला वर्ग हा खुल्या गटचर्चेचा होता. ३-४ दिवसांपूर्वीच आम्हा सर्व शंभर एक शिबिरार्थींचे काही गट पडले होते. त्यांच्यात, आपापसात मुद्दे चर्चिले जाऊन ते त्या गटातील एकाने मांडायचे होते. शिबिराबद्द्ल प्रतिक्रिया, सूचना सांगणे अपेक्षित होते. तो चांगला तासभर रंगला. श्यामला वनारसे यांनी सुद्धा शिबिराच्या उद्देश्याच्या पुनरुच्चार करताना सांगितले की चित्रपटांविषयी बोलणे, प्रतिक्रिया देणे आणि रासास्वदाच्या दृष्टीने विचार करणे या वेगवेगळया गोष्टी आहेत. कलाव्यवहारात अनुभव, आस्वाद, समीक्षा, आणि सौंदर्यशास्त्र अश्या चढत्या पायऱ्या आहेत याची जाणीव करून दिली.

दुसरे सत्र होते ते प्रकाश मकदूम यांचे, जे National Film Archive of India(NFAI) चे संचालक आहेत. त्यांचा विषय NFAI बद्दलच होता. खरे तर ह्या संस्थेच्या कामामुळे आणि ती ज्या क्षेत्रात आहे, त्यामुळे चे नाव वृत्तपत्रांमधून कायम येत असते. मी आधीच्या ब्लॉग मध्ये म्हटल्याप्रमाणे, इंडियन एक्सप्रेसने NFAI च्या कारभारातील काही त्रुटींवर ५-६ भागाच्या लेखमालेतून बोट ठेवले होते. तर आदल्या दिवशीच अमेरिकेतील चित्रपट जतन, संवर्धन क्षेत्रातील दोन तज्ञ व्यक्ती(Milton ‘Milt Shefter, Rick Utley) NFAI ला भेट दिल्याची बातमी आली होती.

NFAI ती संस्था काय आहे, काय काम करते, तिचे महत्व काय, इतिहास काय हे प्रकाश मकदूम यांनी आपल्या व्याख्यानातून छान मांडले. १९६४ मध्ये स्थापन झालेली ही संस्था, चित्रपटांची रिळे जपून ठेवण्याचे काम करते. खरे तर ही संस्था सुरु होण्यास जवळ जवळ ५० वर्षे उशीर झाला, कारण भारतात चित्रपट सुरु होऊन तोपर्यत कित्येक सिनेमे आले होते, आणि त्यातील कित्येक कायमचे नाहीसे झाले आहेत. वारसा जतन आणि दस्तऐवजीकरणाची अनास्था ह्याची याही क्षेत्राला झळ पोहोचली. १९६४ पासून जरी ही संस्था काम करते आहे, कित्येक चित्रपट जपले गेले आहेत, तरी सुद्धा साऱ्या भारतात ही एकच संस्था आहे, आणि त्यामुळे तिच्या कामावर मर्यादा येतात. प्रकाश मकदूम यांनी  NFAI कडे असलेल्या खजिन्यापैकी काही नमुने आम्हाला दाखवण्यासाठी आणले होते. १९१९ मधील बिल्वमंगल हा चित्रपट, १९३५ मधील बंगाली देवदास, दुसऱ्या महायुद्धाचे जवळ जवळ ३० तासांचे असलेले चित्रीकरण,  Johnny Gorkha ही war film, इत्यादींची त्यांनी आम्हाला झलक दाखवली. फिल्म्स गोळा करण्यात येणाऱ्या अडचणी, फिल्म्स जतन करण्याच्या विविध पद्धती त्यांनी विषद केल्या. Henri Langlois असे म्हणून गेला आहे की, Best way to preserve film is to screen it, त्याची नक्कीच प्रचीती आली. NFAI ही संस्था खरे तर चित्रपट रसिकांसाठी, फिल्म सोसायटीच्या लोकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तिची वाटचाल, इतिहास आणि अडचणी याबद्दल थोडीशी माहिती मिळाली आणि त्याबद्दल आणखीनच आपुलकी वाटू लागली. नुसती चित्रपट रिळे नाही तर, चित्रपटांसंबंधित पोस्टर्स, पुस्तके, छायाचित्रे, आणि इतर गोष्टींचेही जतन केले जाते. माझ्या अमीरबाई कर्नाटकी पुस्तकासाठी अमीरबाईचे दुर्मिळ चित्र त्यांनी मला दिले जे मुखपृष्ठासाठी वापरले.

मी पुण्यातील Indology मधील आद्य आणि नामवंत अश्या Bhandarkar Oriental Research Institute(BORI) संस्थेचा आजीव सदस्य आहे. तिचे एक काम म्हणजे प्राचीन भुर्जपत्रांचे(manuscripts) जतन, संवर्धन करणे हे आहे. भारत सरकारने National Mission for Manuscripts नावाचा उपक्रम सुरु केला त्यात ती भाग घेते. मला NFAI चे देखील काम तश्याच प्रकारचे, पण चित्रपटांसंबंधी, वाटले. ही संस्था सुद्धा National Film Heritage Mission च्या अंतर्गत चित्रपट जतन, संवर्धनाचे काम करते.

जेवणाची वेळ टळून गेली होती, तरी सुद्धा कळाले देखील नाही. भोजनादरम्यान पुणे विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापकांची ओळख झाली. माझा अवतार(दाढी वाढवलेली, अंगावर असलेला झब्बा) पाहून, त्यांना खरे वाटले नाही की मी सॉफ्टवेअर क्षेत्रात आहे, त्यांना वाटले की मी लेखक वगैरे आहे. मी म्हटले तेही खरेच आहे. मग मी माझे नेहमीचे पुराण लावले. अमीरबाई कर्नाटकी, कन्नड भाषांतर वगैरे. त्यांना कन्नड साहित्याबद्दल थोडीफार माहिती होती. त्यांनी एक लघुपट बनवलेला होता. कशाबद्दल होता ते विचारायचे राहून गेले.

दुपारचे जेवणानंतरचे पहिले सत्र हे संयुक्त सत्र होते. प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी आले होते. त्यांचाच सिनेमा ‘ती आणि इतर’ आम्ही काल पहिला होता. त्यांच्याशी त्याबद्दल थेट संवाद करण्याची संधी होती. नंतर तसेच समारोपाचा छोटेखानी समारंभ होता. चित्रपटासंबंधी बरीच साधक बाधक चर्चा झाली. चित्रपटाचा विषय, मांडणी, चित्रीकरणाच्या वेळच्या कल्पना, काय आणि कसे मांडायचे होते यामागचे त्यांचे विचार हे समजले. शिबिरार्थीपैकी एक दाम्पत्य जे आले होते, चित्रपटात मांडला होता(आपल्या आसपास चालत असलेल्या अनैतिक गोष्टी, घटना, आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रिया) त्यांनी अगदी तसाच अनुभव मांडला, आणि ते त्यातून कसे गेले हे सांगितले. चित्रपटाचा विष अगदी संवेदनशील होता, आणि समाज कसा मी आणि माझे असा विचार करून बोथट होत चालला आहे हे चित्रपटातून दर्शवले होते.

गोविंद निहलानी यांच्या हस्ते निवडक प्रातिनिधिक शिबिरार्थींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले आणि दुपारी तीनला कार्यक्रम संपला. चहाची वेळ झाली होती. आभाळ दाटून आले होते. शिबिराचा भाग म्हणून FTII ला भेट घडणार होती. मी पूर्वीच दिवसभर FTII मध्ये भटकून आल्यामुळे मी परत गेलो नाही. माझ्या मनात दुसरेच विचार चालू होते. परवाच बातमी वाचली होती की पुण्यातील ऐन मोक्याच्या ठिकाणचे(डेक्कन जिमखान्यावरील) आणखीन एक पुस्तकाचे दुकान बंद होणार होते. त्याचे नाव बुकवर्ल्ड, आणि पुस्तकं कमी दरात विकली जाणार होती. मी कित्येक महिन्यातून त्या दुकानाला भेट दिली नव्हती. म्हटले तेथे जावे आणि जमले तर काही पुस्तके घेऊयात. बाहेर पाऊस पडत होता, गेल्या ६-७ दिवसांत काय ऐकले, काय पहिले याची याची उजळणी करत, मी दुकानात शिरलो.

सिनेमामय आठवडा, भाग#६

हा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील सहाव्या भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. आता महिना झाला शिबीर सुरु होऊन गेल्याला. ‘वास्तव रूपवाणी’ मासिकाची वार्षिक वर्गणी भरून झाली आणि प्रभात चित्र मंडळचे अभिजीत देशपांडे यांच्याशी बातचीत झाली. आम्हा शिबिरार्थीच्या WhatsApp गटात विविध चर्चा आणि माहिती, व्हिडियो फिरतायेत. फिल्ममेकिंगविषयीची, रसास्वादाविषयीची विविध पुस्तके( प्रभात चित्र मंडळच्या वेबसाईटवर ती दिली आहेत) डोळ्याखालून घालतोय, आणि ह्या अजून हा विषय डोक्यातून गेलाच नाहीये. मध्येच आल्फ्रेड हीचकॉकच्या दोन चित्रपटांबद्दल एक ब्लॉगदेखील लिहून झाला. असो. परत शिबिराच्या सहाव्या दिवसाच्या अनुभवकथानाकडे येतो.

आजचा दिवस हा जागतिक समकालीन सिनेमा हा विषय घेऊन बोलणाऱ्या पुण्याचेच अभिजीत रणदिवे यांनी सुरुवात केली. आपल्याकडे जागतिक सिनेमा म्हणजे अमेरिकेतील हॉलीवूडचे सिनेमा असा धरला जातो. पण जगात इतर भागात, जसे, मेक्सिको, जपान, रशिया, युरोप मध्ये, आणि आता इराण मध्ये देखील दखल घेण्याजोगे सिनेमे बनत आहेत, आणि अजूनही बनत आहेत. त्यांच्या विषयाचा गोषवारा असा होता की जागतिक समकालीन सिनेमाचे वैशिष्ट्य असे की जे काही सांगायचे आहे मांडायचे आहे, ते सरळ सरळ न सांगता, ढोबळपणे सांगणे, किंवा विविध प्रतिमांचा वापर करून सांगणे याकडे कल असतो. त्यांनी विविध चित्रफिती दाखवून हा मुद्दा स्पष्ट केला. चीनमध्ये Three Gorges  नावाचे जे भले मोठे धरण बांधले आहे, त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न ह्या Still Life सिनेमात मांडले गेले आहेत. फ्रान्स मध्ये जे निर्वासितांचे प्रश्न आहेत, त्याबद्दल भाष्य करणारी, black comedy कडे थोडीशी झुकणारी एक चित्रफीत आम्ही पाहिली. Ameros Perros नावाची मेक्सिकन फिल्मची थोडीसी झलक देखील, जी dog fight या theme वर आधारित ३ वेगवेगळया गोष्टींची गुंफण आहे, ती पाहिली. एकूणच अश्या तऱ्हेने अभिजीत रणदिवे यांनी असे वेगळे चित्रपट पाहून जगात चित्रपट माध्यम हे, विवध प्रश्न मांडण्यासाठी, काहीतरी सांगण्यासाठी, कसे वेगवेगळया तऱ्हेने वापरले जाते हे स्पष्ट केले. 

नंतर गणेश मतकरी यांनी हिंदी सिनेमातील समांतर सिनेमाची जी चळवळ होती, त्याबद्दल, सुरुवात कशी झाली, सुवर्णकाळ, आणि नंतर कालौघात ती चळवळ कशी थंडावली, तिचे रुपांतर कशात झाले, याचे विवेचन केले. अर्थात हिंदी पाठोपाठ भारतातील इतर भाषांत देखील ही चळवळ सुरु झाली होती, पण त्यांनी तिचा विशेष आढावा घेतला नाही. पण भारतात एकूणच ही चळवळ बंगाली भाषेतील पाथेर पांचाली या सत्यजित राय यांच्या, आणि नंतरच्या दोन सिनेमांनी(अपूर संसार, अपराजीतो, Apu Trilogy) सुरुवात झाली. फ्रेंच New Wave Cinema ची लागण सत्यजित राय यांना झाली, आणि ही नवीन विचारधारा भारतातील चित्रपटांतून दिसू लागली. या विचार धारेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वास्तववाद, समाजातील प्रखर वास्तवाचे दर्शन. ह्याला समांतर सिनेमा म्हणजे parallel cinema किंवा art film असे म्हणतात. हिंदी मध्ये मग भीष्म सहानी यांचे सिनेमे, आणि श्याम बेनेगल, मणी कौल यांनी केले सिनेमे हे सर्व याच पठडीतील होते. बंगाली व्यतिरिक्त ही चळवळ इतर भाषांतून देखील पसरली, जसे कन्नड(गिरीश कासारवल्ली, मल्याळम्(अदूर गोपालकृष्णन). खूप पूर्वी दूरदर्शनवर रविवारी रात्री असे प्रादेशिक सिनेमे दाखवत असत(अजूनही असतात). मला आठवते, १९९० च्या आसपास, असाच एके रात्री, कन्नड चित्रपट काडीना बेन्की(ಕಾಡಿನ ಬೆಂಕಿ) हा अतिशय वेगळा तऱ्हेचा सिनेमा पहिला होता(सुरेश हेबळीकर दिग्दर्शक, गिरीश कर्नाड यांची देखील भूमिका होती, आणि विषय तसा बोल्डच होता), स्पंदन नावाचा असाच एक कन्नड चित्रपट देखील पहिला होता. असो, तर ही चळवळ हिंदी मध्ये खुपच वर्षे सुरु होती. चक्र, आक्रोश, अंकुर, निशांत, मंथन, आणि इतर बरेच सिनेमे याच काळातील. पेस्तोनजी नावाचा पारसी समाजावर भाष्य करणारा सिनेमा, विजया मेहता यांनी केला होता(त्या बद्दल येथे लिहिले होते). असा सुवर्ण काळ पाहिल्यानंतर, रंगीत दूरचित्रवाणी, व्हिडियो प्लेअर, यामुळे थोडी थंडावली, आणि तिने हळूहळू असे प्रयोग मुख्यप्रवाहातील सिनेमातच येऊ लागले. वेगवेगळया media company कडून चित्रपट क्षेत्रात गुंतवणूक आली, आणि जो काही गंगाजळी शिल्लक राहायला लागली ती अश्या कलात्मक, प्रायोगिक चित्रपट बनवण्यासाठी वापरू जाऊ लागला. त्यामुळे असे सिनेमे आजच येत्तात, आणि वेगवेगळया genre मध्ये काम करू पाहतात.

दुपारच्या भोजनानंतर परत गणेश मतकरी यांचेच सत्र होते, जिचा विषय हा श्वास चित्रपटानंतरचा मराठी चित्रपट, त्याची वाटचाल याबद्दल. त्यांनी उलगडलेला प्रवास बऱ्यापैकी माहितीचा होता. त्यामुळे विशेष काही हाती लागले नाही. तमाशापट, विनोदी चित्रपट, आणि कौटुंबिक चित्रपट ह्या लाटेतून श्वास चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला जरा बाहेर काढले. नवीन दमाचे दिग्दर्शक, नवीन आणि वेगळ्या जगाची ओळख ज्यांना झाली आहे असे ते, दळणवळण क्रांती, यामुळे ह्या पिढीला वेगवेगळया वाटा शोधण्यास वाटू लागले, आणि चित्रपट बदलू लागला.

image

समर नखाते

त्यानंतरचे व्याख्यान होते ते FTII  मधील प्रसिद्ध प्राध्यापक समर नखाते यांचे. त्यांचे व्याख्यान हे सर्वाना अगदी मुळापासून उखडून टाकणारे होते. त्यांनी अर्थातच film theory थोडा भर दिला. चित्रचौकट म्हणजे काय, काळ आणि अवकाश यांची चित्रपट कशी सांगड घालतो, शॉट(shot) हे चित्रपटाचे एकक(unit) आहे, अनेक शॉट्स मिळून दृश्य(scene) कसे बनते, दृश्यमालिका म्हणजे चित्रपट असे सांगून थोडा आमची शाळाच घेतली. संकालनाची(editing) किमया त्यांनी उदाहरणाद्वारे दाखवून दिली. संकलनातील Dissolve is smoother than transition वगैरे तात्विक गोष्टी सांगितल्या. Gaze Theory आणि Apparatus Theory सारखे सिनेमाकडे पाहण्याचा, मांडणीचा, कलात्मक दृष्टीकोन कसा असू शकतो, अश्या तात्विक वादांची जाणीव करून दिली. फिल्म हे माध्यम, त्याचे तत्वज्ञान, तात्विक बाजू काय आहे ह्याची झलक झाली.

दिवसाचा शेवट हा दोन सिनेमे दाखवून होणार होता. पहिला होता ‘ती आणि इतर’ हा मराठी चित्रपट. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि भारतीय सिनेमातील समांतर चळवळीतील एक प्रमुख नाव, गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला. हा अगदी तसा नवीनच चित्रपट. तो मी पूर्ण पहिला. एका सुखवस्तू, उच्च माध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी. बाहेरच्या जगातील घडामोडींकडे पाहण्याच्या, निष्क्रीय मानसिकतेचा पुरस्कार करणाऱ्या समाजाचे दर्शन त्यात घडते. एका घरातच प्रामुख्याने चित्रपट साकारला जातो, त्यामुळे की काय मला तो नाटकासारखा वाटला. दुसरा सिनेमा होता चिदंबरम्‌ नावाचा १९८६ मधील मल्याळम सिनेमा. त्यातील आकर्षण होते ते प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील हिची भूमिका. तिने मल्याळम सिनेमात काम केल्याचे मला माहिती नव्हते. मी थोडावेळ पहिला आणि निघून गेलो. अतिशय संथ कथा होती, केरळचे सृष्टीसौंदर्य अगदी बहारीने चित्रीत केलेले दिसत होते. स्मिता पाटील तर सुंदर दिसत होतीच, अगदी केरळी स्त्री वाटत होती, पण मी असे पर्यंत तिच्या तोंडी एकाही वाक्य नव्हते. मग कंटाळलो.

असो. तर हा असा होता शिबिराचा सहावा दिवस. पुढील ब्लॉग मध्ये, शिबिराचा सातवा आणि शेवटल्या दिवसाबद्दल. जरूर प्रतिक्रिया कळवा!

सिनेमामय आठवडा, भाग#५

हा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील पाचवा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. शिबिराचे एका मागून एक दिवस जात आहेत. चित्रपटांचे वेगळे जग, त्याचा इतिहास, त्यात लोकांनी केलेले काम, हे सगळे हळू हळू समजते आहे. चित्रपटक्षेत्राकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन किती संकुचित होता हे जाणवू लागले आहे. वरवर दिसणाऱ्या झगमगटापलीकडील, त्यातील कला, त्याची म्हणून काही जी मूलतत्वे आहेत ह्याची परत नव्याने ओळख होत आहे. आज परत नाश्त्याच्या वेळेला आणखीन काही जणांची ओळख झाली. आधीच्या ब्लॉग मध्ये म्हटल्याप्रमाणे, मुंबईवरून एक मोठा गट या शिबिरासाठी आला होता. लोकप्रभाचे संपादक विनायक परब पण त्यात होते. त्या गटातील शिबिरार्थीबरोबर गप्पा मारता मारता समजले की प्रशांत जोशी म्हणून एक गृहस्थ होते, ते नाट्यक्षेत्राशी संबंधित होते, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतात. मुंबईच्या पृथ्वी थिएटर, अविष्कार इत्यादी संस्थेबरोबर ते निगडीत होते. त्यांनी पृथ्वी थिएटर माजी सर्वेसर्वा शशीकूपर बरोबरच्या काही आठवणी सांगितल्या.

आजच्या पहिल्या सत्राची उत्सुकता होती. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हा सकाळी येणार होता. आत जाऊन विसावलो तितक्याच असे जाहीर करण्यात आली की उमेश कुलकर्णी उशिरा येणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत त्याने बनवलेला एक लघुपट(त्याची diploma film) दाखवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. आम्हाला दाखवण्यात आलेला लघुपट होता ‘गारुड'(The Spell). त्याला कथा अशी नाही. फक्त कॅमेरा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सरळ जात राहतो. संवाद नाहीत. पार्श्वसंगीत ऐकू येत राहते. जवळ जवळ मूकपटच. कुठेतरी वाचले होते की संवाद रहित मूकपटात दृश्यमाध्यमाच्या शक्यता जास्त  वापरल्या जातात, त्याचाच प्रत्यय आला. ह्या लघुपटाची रचना अतिशय विशिष्ट्यपूर्ण होती. आणि योगायोगाने उमेशच्या व्याख्यानाचा विषयच होता लघुपटाची रचना. तो आल्यावर त्याने थोडेसे स्वतः बद्दल सांगून, मग लघुपटाचे महत्व, त्याची बलस्थाने इत्यादी बद्दल बोलला. नंतर कला म्हणजे काय यावरच त्याने थेट हात घातला, कलेचे प्रमुख उदिष्ट काय असावे आणि त्या अनुषंगाने चित्रपट माध्यम कसे कला म्हणून पुढे येते यावर चर्चा त्याने केली. गिरणी हा त्याचा आणखीन एक लघुपट देखील दाखवला आम्हाला गेला, आणि त्यानंतर त्यावर चर्चा झाली. ह्या लघुपटात त्याने घरामध्ये लघुउद्योगासाठी घरघुती गिरणी आल्यावर, घरातील मुलाच्या भावविश्वात काय होते, याचे चित्रण येते. आधीच्या गारुड वर देखील थोडीशी चर्चा झाली असती तर चांगले झाले असते. उमेश कुलकर्णी याने लघुपटांचे महत्व अधोरेखित केले, तसेच लघुपटाकडे चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याचे पहिले पूल म्हणून पाहू नये, असे त्याचे म्हणणे होते.

उमेशच्या नंतर मुंबईहून आलेले अभिजीत देशपांडे यांचे फिल्म सोसायटी बद्दल व्याख्यान झाले. त्याचा इतिहास, वाटचाल, भारतातील त्याचे कार्य, महत्व, चित्रपट साक्षरता निर्माण करण्यात असलेला मोलाचा वाटा, इत्यादी बद्दल सांगितले. चित्रपटची म्हणून एक स्वतःची भाषा असते, आणि ती गणित आणि संगीत याप्रमणे वैश्विक असते, हे त्यांनी नमूद केले. Edmond Benoit Levy याने जगातील पहिला फिल्म क्लब १९०७ मध्ये फ्रान्स मध्ये सुरु केला.  सत्यजित राय, मेरी सेटन(Marie Seton) यांचे फिल्म सोसायटी स्थापन करून दिलेले योगदान त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले. केरळ मध्ये अदूर गोपालकृष्णन यांनी १९६० मध्ये केरळ मधील पाहिली फिल्म सोसायटी स्थापन आणि ती चळवळ इतकी वाढली, की आजमितीला केरळ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ११८ फिल्म सोसायटी चालू आहेत. पुण्यातही आशय फिल्म क्लब आहे, चा देखील फिल्म क्लब आहे. त्यात जायला हवे असे मनात नोंदवले. उमेश कुलकर्णी याने देखील लघुपटांसाठी म्हणून अरभाट फिल्म क्लब सुरु केला आहे. तोही बराच प्रसिद्ध आहे.

दुपारी भोजनानंतर जरा पाय मोकळे करावे म्हणून बाहेर दूरदर्शन केंद्रापर्यंत गेलो. गेली ३-४ चार दिवस, भोजनानंतर, NFAI च्या परिसरात फेरफटका मारण्याचा मी शिरस्ता पाडून घेतला होता. आधी सांगितल्याप्रमाणे हा परिसर अतिशय रम्य आणि हिरवागार आहे.

दुपारचे पहिले सत्र हे निखिलेश चित्रे यांचे साहित्य आणि चित्रपट यावर होता. ते खुपच रंगले. काही वाद झडले. त्यांनी सुरुवातच अल्बर्ट कामू याच्या प्रसिद्ध अश्या The Castle या कादंबरीवरून तयार केलेले तीन चित्रपट याबद्दल बोलून केली. त्या तिन्ही चित्रपटातील सुरुवातीची ५ मिनिटे कशी चित्रित केली गेली, आणि प्रत्येकात काय फरक होता, का फरक झाला, याबद्दल चर्चा झाली. सिनेमातत्व आणि साहित्यतत्व ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, आणि एकमेकांची तुलना करू नये असा सर्वसाधारण सूर होता.सिनेमा हे कालबद्ध माध्यम आहे, तसेच ते समजण्यापेक्षा जाणवण्याचे माध्यम अधिक आहे, आणि साहित्य वाचून आलेली अनुभवांचे माध्यमांतर चित्रपटात होत असते हे लक्षात आणून दिले.

नंतर दोन लघुपट आम्ही पहिले. पहिला होता तो प्रत्येक चित्रपट रसास्वाद शिबिरातून दाखवला जाणारा प्रसिद्ध असा लघुपट Big City Blues हा दाखवण्यात आला. त्याची फिल्म आता जगात कुठेच नाही असे सुषमा दातार यांनी सांगितले. नावावरून मला वाटले की मोठ्या शहरातून राहण्याचे काय त्रासदायक अनुभव असतात त्यावर असेल. पण येथे Blues चा अर्थ संगीत प्रकाराशी निगडीत आहे. १९६२ मधील मूकपट आहे, पण पार्श्वसंगीत आहे, आणि ते अर्थात jazz/blues आहे. वीस मिनिटात आपल्याला व्यक्तींच्या विविध छटा दाखवून देतो. तो दाखवून झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा रंगली. दुसरा लघुपट होता, तो वर उल्लेख केलेल्या प्रशांत जोशी यांनी त्यांनी स्वतः बनवलेल्या अवयवदानाचे महत्व सांगणारा ‘देणं” हा लघुपट दाखवला. तो एका महत्वाच्या विषयावरील नक्कीच चांगला प्रयत्न होता.

आणि दिवसाच्या शेवटी हा Separation हा २०११ मधील इराणी प्रसिद्ध सिनेमा दाखवण्यात आला. ह्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ह्याचा दिग्दर्शक असघर फरहादी आहे. अतिशय नाट्यमय चित्रपट आहे. पती-पत्नी मधील ताण तणाव, कोर्टातील वाद, त्यांच्या किशोरवयीन मुलीची आगतिकता यांचे सुरेख चित्रण त्यात आहे. मला तरी तो चित्रपट अस्सल भारतीयच वाटला. हा दुसरा इराणी चित्रपट होता. एकूणच इराणी चित्रपटांचे आजकाल एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे असे वाटते आहे.

सिनेमामय आठवडा, भाग#३

हा ब्लॉग माझ्या सिनेमामय आठवडा मालिकेतील तिसरा भाग. Film Appreciation(रसास्वाद सिनेमाचा) शिबिराच्या अनुभवावर आधारित ही मालिका आहे. त्यातील आधीचे भाग येथे वाचायला मिळतील. आजचा शिबिराचा तिसरा दिवस. आता इतर शिबिरार्थी सहकाऱ्यांची थोडीफार ओळख झालेली होती. सकाळी नाश्त्याच्या वेळेला, काही मुंबईहून आलेल्या लोकांची ओळख झाली. मला लोकप्रभाचे संपादक विनायक परब यांना भेटायचे होते. त्यांची भेट झाली, थोडेफार बोलणे झाले. पुढे मागे त्यांना काही लेख द्यायचे आहेत. बोलता बोलता ते म्हणाले की शिबिराचा शेवटला दिवस ते उपस्थित राहू शकणार नाही कारण त्यांना मुंबई विद्यापीठात पुरातत्वशास्त्राची कुठली तरी कॉन्फरन्स आहे तेथे जायचे होते. नाश्ता, चहा वगैरे झाल्यावर वर आलो, तो पाहतो की सभागृहाच्या बाहेर असलेल्या नावनोंदणी कक्षाजवळ झुंबड उडाली होती. आयोजकांनी चित्रपट रासास्वादशी निगडीत पुस्तके विकायला ठेवली होती. मी देखील काही पुस्तके घेतली(सुषमा दातार यांचे चित्रपट सौंदर्यशास्त्र, सुधीर नांदगावकर यांचे सिनेमा संस्कृती इत्यादी). पहिल्या दिवशी मी श्यामला वनारसे यांची डीव्हीडी घेतली होतीच.

आजचा दिवस गाजवला तो जुने जाणते बुजुर्ग असे विकास देसाई यांनी. नंतर कळाले की गतकाळचे प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई त्यांचे काका. विकास देसाई FTII मधून शिक्षण घेतले, आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले. तर, त्यांची आज सकाळची दोन सत्रं, तसेच भोजनानंतर अजून एक सत्र असे आयोजन होते. त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीमुळे आम्हा सर्वाना खिळून ठेवले, बोलते केले. धमाल आली. त्यांचा विषय होता चित्रपट कसा बनतो. त्यातील विविध तांत्रिक गोष्टी, चित्रपट बनताना काय विचार केला गेला असतो, यांची माहिती त्यांनी करून दिली. त्यांनी विविध लघुपटातील दृश्ये दाखवली. चित्रपट काल(time) आणि अवकाश(space) या दोन गोष्टींचा कसा वापर करून घेतो हे समजावले. चित्रपटाची भाषा म्हणजे काय असते याची त्यांनी सोदाहरण स्पष्टीकरण दिले. पटकथेचे, संकलनाचे महत्व काय असते, चित्रपट बनवताना हे नमूद केले. चित्रपटात ध्वनी कसा वापरला जातो, जसे, sound folly, sync sound, ambiance sound, background music, यातून अनुभवात कसा फरक पडतो हे विषद केले. डबिंग(dubbing) हे फक्त भारतीय चित्रपटातून होते, इतर देशातील चित्रपटात होत नाही, हे सांगून आश्चर्याचा धक्का दिला.

विकास देसाई

Vikas Desai @NFAI Pune

Sound Mixing चे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्यांनी आम्हाला The Untouchables या चित्रपटातील दृश्य दाखवले, जे Chicago Union Station मध्ये चित्रित झाले आहे. मला निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या काय देवाणघेवाण होते, कलेच्या दृष्टीने, हे समजावून घेण्यासाठी प्रश्न विचारला, आणि त्याचे त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. संकलनाच्या वेगवेगळया रिती त्यांनी सांगितल्या. संकलनातील transition ही संकल्पना त्यांनी Lawrence of Arabia मधील दृश्य दाखवून समजावले, आणि प्रतिमेच्या भाषेचा कसा उपयोग करून घेतला आहे हे समजले. Rules of film making (तसे पहिले तर आयुष्याला देखील हे लागू होते) म्हणजे Feel, Belief, Commit हे सांगून थांबले.

नंतर अभिजीत रणदिवे यांचे व्याख्यान होते. त्यांची दोन सत्रं होती. ते मुंबईच्या प्रभात चित्र मंडळाचे(50 year old film society) सदस्य देखील आहेत. आधी ‘वास्तव रूपवाणी’ मासिकाची ओळख करून देण्यात आली. त्या मासिकाचा विशेषांक उपलब्ध होता, जो प्रभात चित्र मंडळाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काढला होतां. रुपवाणी हा सुंदर शब्द रविंद्रनाथ टागोर यांनी चित्रपट यांनी दिला होता असे समजले. चहाच्या वेळेत अभिजीत रणदिवे यांची मी भेट घेतली. ऐसी अक्षरे मध्ये माझ्यासारखे ते देखील लिहितात, त्यामुळे भेट रोचक झाली. अभिजीत रणदिवे यांचा विषय होता, चित्रपट ह्या माध्यमाचा कलेकडे, किंवा एक अभिव्यक्तीचे माध्यम याकडे कसा प्रवास झाला. तेही प्रामुख्याने अभारतीय चित्रपटांच्या वाटचालीकडे. तो त्यांनी चित्रपटाच्या, लघुपटाच्या विविध दृश्ये दाखवून, त्याबद्दल विवेचन करून, सिद्ध केला. त्यांनी Trip to Moon ह्या १९०२ मधील मूकपट थोडासा दाखवून सुरुवात केली. तो खरे तर पहिला वाहिला science fiction सिनेमा म्हटला पाहिजे. वेगवेगळया काळातील कलेच्या इतर क्षेत्रात जसे विविध विचारसरणीचे प्रतिबिंब पडत होते, तसेच त्यावेळच्या सिनेमातून ते पडत गेलेले दिसते. तसेच दोन महायुद्धे, आणि त्याचा समाजजीवनावर झालेला परिणाम यांचे देखील चित्रण नववास्तववाद रुपाने प्रकट झाला(Bicycle Thief) जो आम्हाला सोमवारी दाखवण्यात आला होता. Sergei Eisenstein दिग्दर्शित Battleship Potemkin मधून प्रतीत होणारी प्रतिमांची भाषा यांचे उदाहरण त्यांनी दिले. जीवनात वास्तव काय आहे याबद्दल संभ्रम निर्माण होणाऱ्या घटना दाखवणारे उदाहरण म्हणून त्यांनी राशोमोन(Rashomon by Akira Kurosawa) हा प्रसिद्ध चित्रपटातील दृश्ये दाखवली. Breathless या फ्रेंच सिनेमाची काही दृश्ये दाखवली, त्यात, Paris मधील Champs Elysee या प्रसिद्ध रस्त्यावरील चित्रीकरण दिग्दर्शकाने कसे केले, त्याचा वेगळा परिणाम कसा झाला याची त्यांनी चर्चा केली.

सर्वात शेवटी आमिर खान, आशुतोष गोवारीकर यांचा लगान हा चित्रपट कसा बनला याची हकीकत सांगणारा एक चित्रपट ‘चले  चलो’ हा चित्रपट होता. तो मी तासभर पहिला. तो पर्यंत चित्रपटाची कल्पना, पटकथा, बजेट, चित्रीकरणाची आखणी, चंपानेर गाव कुठे वसवायचे याचा शोध या पासून, ते कच्छच्या रानातील भुज गावाची निवड, नितीन देसाई यांचा गावाचा पूर्ण सेट उभे करणे इत्यादी पर्यंत कथा आली होती. नंतर नंतर थोडे कंटाळवाणे होऊ लागले होते. दिवसही संपला होता, मग उठून निघून घरी गेलो. पण हा परत पाहायला हवा सिनेमा.

त्या रात्री वर्तमानपत्रे चाळताना ज्या NFAI ने हे शिबीर आयोजित केले आहे, त्याबद्दल बातमी होती, आणि ती तितकीशी चांगली नव्हती. त्या बातमीचा गोषवारा असा होता की, NFAI कडील बऱ्याच जुन्या चित्रपटांची रिळे ही खराब झाली आहेत, आणि ती परत कधीही पाहता येणार नाही, ती नष्ट झाली आहेत, ज्या मुळे मूल्यवान वारसा कायमचा हातातून गेला. हे वाचून मन खट्टू झाले.