एका अनुवादाची कहाणी

मी अनुवादित केलेल्या अमीरबाई कर्नाटकी या कन्नड पुस्तकाचे प्रकाशन होवून आता एक वर्ष उलटून गेले आहे. एक दोन नवीन पुस्तकांच्या अनुवादाचे काम देखील सुरु झाले. मूळ कन्नड पुस्तकाचे लेखक जे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आहेत, ते रहिमत तरीकेरी परवा पुण्यात आले असता मला भेटले. त्यांनी मला सुचवले की मी केलेल्या अनुवादाच्या प्रक्रिये संबंधी लिहून काढावे. म्हणून हा आजचा ब्लॉग-प्रपंच. इतक्यातच आज मराठी भाषा दिन आपण साजरा केला. त्यानिमित्ताने अनुवाद साहित्याबद्दल देखील बोलले गेले. अनुवाद हा साहित्य प्रकार आता मराठी रुजू पहातोय, त्याला वाचकांची पसंती मिळते आहे, मराठी भाषा आणि साहित्य त्यामुळे समृद्ध होते आहे.

माझी मातृभाषा कन्नड आहे. पण मी पुण्यातच वाढलो, मराठी माध्यमात शिकलो. मी दहावीत असताना सुट्टीत कन्नड लिहायला आणि वाचायला शिकलो. दोन्ही भाषेची पुस्तके, मासिके आणि इतर साहित्य यांचे थोडेफार वाचन कायमच घरात होत असे. अनुवादाच्या आयडियाची कल्पना माझ्या ध्यानीमनी नसताना डोक्यात आली. त्याचे झाले असे की साधारण २००९ च्या सुमारास, ‘मयूर’ नावाच्या एका कन्नड मासिकात, मला गोहरबाई आणि बालगंधर्व यांच्यावर रहमत तरीकेरे यांचा एक लेख आढळला. बालगंधर्वावर कन्नडमध्ये असलेला तो लेख पाहून मला जरा आश्चर्यच वाटले. तो लेख वाचल्यानंतर, आणि रहमत तरीकेरे यांच्या बरोबर ईमेल आणि दूरध्वनीवर झालेल्या चर्चेत मला या विषयाची व्याप्ती समजली. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा आताच्या कर्नाटकातील काही भाग बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये होता. मराठी आणि कन्नड जनात वेगवेगळया पातळीवर सांस्कृतिक देवाणघेवाण होत असे. संगीत नाटकं, बालगंधर्वांची नाटकं कन्नड प्रदेशात जात, तेथे प्रयोग होत, त्यांचा प्रेक्षक वर्ग तेथे होता. तर मी त्या लेखाचा मी मराठीत अनुवाद करून, तो लेख मी ग्रंथालीचे आणि ‘थिंक महाराष्ट्र‘चे दिनकर गांगल यांच्याकडे तो पाठवला. त्यावर त्यांनी संपादकीय संस्करण करून त्यांनी तो येथे प्रसिद्ध केला आणि मला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. त्या विषयावर काम करणारे आणि त्याचा अभ्यास असणारया बऱ्याच व्यक्तींशी परिचय झाला. रहमत तरीकेरे यांनी अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्रावर पुस्तक लिहित आहे असे कळवले. तत्काळ मी त्यांना त्याचा अनुवाद करण्याची परवानागी मागितली आणि ती त्यांनी आनंदाने दिली. आणि माझे सौभाग्य असे की ग्रंथाली यांनी देखील तो अनुवाद प्रकाशित करण्याची तयारी दर्शवली.

यथावकाश कन्नड मधील अमीरबाई यांच्या चरित्राचे प्रकाशन झाले(२०१२) आणि मला ते पुस्तक प्रो. तरीकेरे यांनी पाठवले. पुस्तक तर ३०० पानाच्या आसपास होते. माझ्या मनात धडकीच भरली, हे कसे आणि कधी होणार. मी संगणक क्षेत्रात कार्यरत आहे, आणि त्यामुळे वेळेचा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. पण मी मनाचा हिय्या केला आणि काम सुरु केले. रहिमत तरीकेरे यांच्या पुस्तकाची कन्नड भाषा तर ग्रांथिक होती. पुस्तक संशोधनात्मक होते, भरपूर तळटिपा, संदर्भ साहित्य यांची रेलचेल होती. भाषा ललितलेखांप्रमाणे सरळ आणि सोपी नव्हती. मूळ वाक्य, वाक्यरचना, त्याचा मतितार्थ समजायला बरेच कष्ट पडले. माझ्याकडे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने प्रकाशित केलेला जुना कन्नड-शब्दकोश आहे, तो हाताशी घेतला. महाराष्ट्रातील, आणि मराठी, तसेच मुंबई, तेथील चित्रपटसृष्टी याचे संदर्भ बरेच असल्यामुळे पुढे पुढे समजायला सरळ होत गेले. सकाळी लवकर उठून १-२ तासांची बैठक मारून काम करायला लागलो, आणि हळूहळू अनुवादाला आकार येवू लागला. माझे सारे कुटुंबीय कर्नाटकातील विजापूरचे. त्यामुळे तेथील संदर्भांबद्दल चर्चा करता आली. कन्नड भाषेतील शब्दांच्या छटाबद्दल त्यांच्या बरोबर चर्चा करता आली. त्यातच मी २-३ महिन्यांसाठी अमेरिकेला गेलो, आणि काम बंद झाले. तेथून आल्यावर परत सुरु केले, आणखी माहितीबद्दल प्रो. तरीकेरे यांच्या बरोबर चर्चा सुरु झाल्या.

त्यातच २०१३ मध्ये मी, रहमत तरीकेरे यांचा पुण्यात सुदर्शन रंगमंच तर्फे चैतन्य कुंटे यांच्या बरोबर सुदर्शन संगीत सभा अंतर्गत, एक कार्यक्रम पुण्यात घडवून आणला. तो होता अमीरबाई आणि गोहारबाई यांच्या जीवनावर. त्याचे नाव होते -‘बिळगी भगिनी-शतमान स्मरण‘. त्यावेळेस ते पुण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यक्ष चर्चा करता आली, आणि बरेच मुद्दे आणखीन समजले. याच पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर तरीकेरे यांनी बंगळूरू येथील लेखिका मंगला सर्वा यांच्याकडे दिले होते, त्यांचे देखील काम सुरु झाले होते. २०१४ मध्ये  मी बंगळूरूयेथे गेले असता, प्रो. तरीकेरे, आणि मंगला सर्वा यांची भेट मंगला यांच्या घरी झाली. तेथे झालेली चर्चा अतिशय उद्बोधक होती. असे करता करता मुख्य पुस्तकाचे काम झाले आणि तो मसुदा मी ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांच्याकडे पाठवला. त्यांची चिकित्सक नजरेने भाषिक दोष, वाक्यरचनेतील दोष, भाषांतरातील दोष, तसेच काही तपशीलातील दोष माझ्या निदर्शनास आणून दिले. तरीकेरे यांच्या सुचनेनुसार मुंबईचे प्रकाश बुरडे, धारवाड येथील प्रो. यार्दी, मुधोळचे आनंद झुंजूरवाड, मुंबईचे प्रकाश दिवाण इत्यादी जाणकारांना कच्चे खर्डे तपासून द्यायला पाठवले. त्या सर्वानी देखील बहुमोल सूचना दिल्या, आणि त्याचा देखील पुस्तक आकारास येण्यास उपयोग झाला. त्याच सुमारास मी रहिमत तरीकेरे यांनी लिहिलेल्या अमीरबाई कर्नाटकी यांच्या चरित्राचा संशोधनाचा निमित्ताने आलेल्या अनुभवांवर एक कन्नड लेख लिहिला, तो मी अनुवादित केला आणि तोही थिंक महाराष्ट्र वर येथे प्रसिद्ध झाला.

ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर यांनी मला कळवले की ग्रंथालीच्या ४०व्या वर्धापनदिनी डिसेंबर २५, २०१४ ला मुंबईत पुस्तक प्रकाशन करायचे आहे असे ठरले आहे. मुंबईत तो दिवस ग्रंथाली वाचकदिन म्हणून साजरा करते. दिवसभर कार्यक्रम असतो. संध्याकाळी पूर्वनियोजित पुस्तकांचे प्रकाशन असते. माझी त्यामुळे तारांबळ उडाल्यासारखी परिस्थिती झाली. अजून कितीतरी कामे राहिली होती. पुस्तकातील छायाचित्रांची यादी, त्यांची माहिती, छायाचित्रे ग्रंथालीला द्यायची होती. आणि मनोगत लिहायचे होते, मुखपृष्ठ करायचे होते. जसे काही काऊंटडाऊनच सुरु झाले होते. मुखपृष्ठासाठी पुण्यातील National Film Archives of India(NFAI) मधील आरती कारखानीस यांची माहिती तरीकेरे यांनी कळवली. आणि त्यांनी तत्परतेने एक अतिशय लोभस आणि दुर्मिळ असे अमीरबाई यांचे छायाचित्र  उपलब्ध करून दिले. इतर सगळे सोपस्कार झाले आणि ग्रंथालीची आमंत्रण पत्रिका धडकली. रहमत तरीकेरे माझ्याकडे पुण्यात आले आणि आम्ही सर्वजण मुंबईस गेलो आणि प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आणि गंगेत घोडे न्हाले.

हा अनुवाद करण्याचा माझा हेतू एवढाच होता की, अमीरबाई यांच्या चरित्राशिवाय, त्यांच्या आणि गोहरबाई यांच्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सांस्कृतिक देवाणघेवाण कशा प्रकारची होती यावर कर्नाटकातील संशोधकाच्या/अभ्यासकाच्या दृष्टीने टाकलेला झोत मराठी रसिकासमोर यावा. मला हा अनुवाद करताना खुपच मजा आली, दोन्ही भाषेच्या माझ्या आकालानात आणखीन भर पडली तसेच तो काळ समजून घेण्यातही मदत झाली. त्या दृष्टीने रहमत तरीकेरे यांच्या सोबत झालेल्या चर्चा, माझी पत्नी अनिता हिच्या बरोबर कन्नड भाषेतील बारकाव्यावर आणि शब्दार्थाच्या छटा यावर झालेल्या चर्चा खुपच उपयोगी पडल्या.

पुस्तक प्रकाशनानंतर यथावकाश पुस्तकाबद्दल अभिप्राय येवू लागले, फोन येवू लागले, मला एकूणच आणखीन मजा येवू लागली. पुस्तकाच्या दुकानात जाऊन  मी माझे पुस्तक पाहू लागलो. पुस्तक प्रकाशित झाल्यावर पुण्यातील प्रसिद्ध संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांना मी पुस्तक अभिप्रायासाठी दिले होते. त्यांनी काही दिवसापूर्वी, प्रत्यक्ष भेटी दरम्यान काही चुका निदर्शनास आणून दिल्या, पुस्तकातील काही निष्कर्षांबद्दल मला त्यांचे मत त्यांनी कळवले. ह्या सर्व गोष्टी मला रहमत तरीकेरे यांच्याशी बोलून, माझ्या अनुवादातील चुका दुरुस्त करून, दुसरी आवृत्ती करायची आहे, पाहुयात कसे जमते ते!

खेळघर

रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ असे लांबलचक आणि संपूर्ण असे नाव असलेल्या लेखकाचे खेळघर हे पुस्तक मी नुकतेच वाचले. त्याबद्दल थोडेसे येथे.

ही कादंबरी म्हणजे एका सेवाभावी संस्थेचा, तसेच ती निर्माण करण्याऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा लेखाजोखा आहे. समाजात प्रत्येक पिढीत कोणीतरी असे असते जे समाज बदलण्याचा विचार करून काहीतरी वेगळे करण्यासाठी झटत असतात. आणि त्याबद्दल लिहीत असताना, एक विचित्र योगायोग होत आहे. आज महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी. टीव्हीवर बेन किंग्सलेचा गांधी हा सिनेमा सुरु आहे. गांधीजीनी देखील हाच प्रयोग करून, पुढे स्वातंत्र्य चळवळीत त्याचे रुपांतर केले.

तर, ती व्यक्ती म्हणजे माधव कऱ्हाडकर, आणि ती संस्था म्हणजे खेळघर. कादंबरी सुरु होते ती त्याच्या मुलीच्या, मैत्रेयीच्या, प्रवासातील घटनांनी. तिचा प्रवास असतो तो सारंगपाडा ह्या गावाला, जेथे खेळघर निर्माण झालेले असते. ती तरुण मुलगी अभिनयाच्या क्षेत्रात असते, आणि स्वतंत्र विचारांची, आजच्या युगातील स्त्रीचे ती प्रतिनिधित्व करते आहे. ज्या मैत्रेयीने आयुष्यभर तिच्या पित्याचा तिरस्कार केला आहे, ती त्याला भेटायला जात आहे. ती तेथे गेल्यावर, तिला समजते की त्याचे निधन झाले आहे. यानंतरची कादंबरी म्हणजे, तिने माधवच्या रोजनिशीच्या माध्यमातून खेळघरचा समजावून घेतलेला इतिहास, त्यातून तिला समजलेला तिचा पिता, आणि पुढे खेळघरसाठी काम करण्याचा निश्चय यापर्यंत येतो.

माधव हा डाव्या विचारसरणीचा, अस्वस्थ, आणि काहीतरी बदल घडवण्यासाठी धडपडत असलेला, कार्यकर्ता आहे. पण त्याला पुरागमित्व देखील हवे आहे. एका महिलेच्या आत्मसन्मानाचे निमित्त होवून तो तिची बाजू घेतो, पण त्यासाठी त्याला पहिली पत्नी (जिच्या बरोबर त्याचे खटके उडत असतात, संबंध दुरावलेले असतात) आणि लहान मुलगी मैत्रेयी ह्यांना सोडून जावे लागते. आणि त्यानंतरचा प्रवास हा खेळघरच्या निर्माणाच्या दिशेने सुरु होतो. त्याच्या संकल्पनेतील खेळघर म्हणजे एक अशी वसाहत, असा समाज, जो मुक्त आहे, पुरोगामी आहे, स्वावलंबी आहे, निसर्ग-नियमांच्या बरोबर जाणारा, पर्यावरणाचा विचार करणारा, तसेच आधुनिक तंत्रज्ञान आपलेसे करणारा, व्यक्ती-व्यक्तीचा सन्मान करणारा आहे, विचारसरणीच्या अवतीभोवती असलेले नीती-नियम पाळणारा आहे. मी काही वर्षापूर्वी तमिळनाडू येथील पुडुचेरी (Pondicheri) गेलो होतो. तेथे महर्षी अरविंद यांच्या कल्पनेतून निर्माण झालेले गाव Auroville आहे. खेळघर ही कल्पना त्यासारखीच वाटली. कादंबरीचा पट खुपच मोठा आहे, आणि ते साहजिक आहे. वैचारिक प्रवास, जडणघडण दाखवताना मोठ्या काल-पटलाचा विचार करावा लागतो. आणि येथे तसेच झाले आहे. कित्येक विषयांवर मंथन, विचार येथे येत राहते. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, स्वावलंबन, इच्छामरण(euthanasia), नर्मदा धरण आंदोलन, स्त्री-मुक्ती आंदोलन, माहिती-तंत्रज्ञान क्रांती, मार्क्सवाद, सुधारित शेती आणि ग्रामीण विकास, धार्मिक मुलतत्ववाद आणि इतर बऱ्याच विषयावर चर्चा दिसते, आणि ते सर्व वाचताना, समजावून घेताना दमछाक होत राहते.

खेळघर संकल्पना प्रत्यक्षात येत असताना, त्याला जोडत गेलेल्या व्यक्ती, त्यांचे विचार, त्यांचे मतभेद, यश, अपयश, याचेदेखील वर्णन कादंबरीत येते. तसेच मैत्रेयीला देखील या सर्वातून प्रेरणा मिळून, आणि तिला समविचारांचा साथीदार, ऋत्विक मजुमदार, मिळतो खेळघर, आणि ह्या टप्प्यावर येवून कादंबरी थांबते.  हे दोघेही खेळघरचे काम पुढे एकत्र नेण्याचा निर्णय घेतात. मैत्रेयी आणि ऋत्विक यांच्या संवादाच्या विषयाच्या दरम्यान स्त्री-मुक्ती, तसेच बंगाल मधील विनोदिनी दासी हिच्या आयुष्याचा संदर्भ येतो, त्या निमित्ताने बालगंधर्व, आणि गोहरबाई कर्नाटकी यांच्या संबंधाचा विषय निघतो. पुस्तकात गोहरबाईचा उल्लेख गोहारजान असा आला आहे, तो चुकीचा आहे. रहमत तरीकेरी यांच्या अमीरबाई कर्नाटकीवरील कन्नड पुस्तकाचा मी केलेल्या मराठी अनुवादात याचे अधिक तपशील मिळू शकतील. १९३०-४० च्या दशकात उदय पावलेल्या गोहरबाई आणि अमीरबाई भगिनी होत्या, आणि त्या बिळगी भगिनी नावाने प्रसिद्ध आहेत.

महराष्ट्रात अशा पुरोगामी विचारसरणी असलेल्या व्यक्तींची तसेच संस्थांची मोठी परंपरा आहे. ह्या कादंबरीच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपातका होईना, त्यांच्या एकूण जडणघडणीचा प्रवास उलगडला गेला आहे असे म्हणता येईल.

 

 

Sawai Gandharva Music Festival

I am music lover and like to listen music of various genres, including classical music. Though although it will be brave of me to claim that I understand it, but I like to study musicological aspects to enhance my listening. Music festivals such Pune’s Sawai Gandharva Music Festival(सवाई गंधर्व संगीत महोत्सव) have played big role in spreading classical music. In this blog, I am not going talk about the music programs of this festival. It is already discussed by expert at many other places. But instead want to talk of other interesting activities which take place away from main venue. This venue is Sawai Gandharva Smarak Samiti at Shivajinagar. They are related to music but instead of performances this focuses on musicological aspects of this art. They do it by showing documentaries on life of musicians enabling audiences to understand motivation, upbringing of that artist during his/her era. They also conduct live interviews of artists to explore facets of their art form. I have attended quite a few sessions in the past. The film show program is titled Shadhja(षड्ज) and interview program is called Antarang(अंतरंग). The other music festival of Pune arranged after Pandit Vasantrao Deshpande, titled Vasantotsav, has more serious undertaking called Vasantotsav Vimarsh, apart from music performance itself. I have talked about that here.

This year’s(2015) edition of Sawai Gandharva Music Festival’s Shadhja and Antarang had interviews with Pandit Jasraj and Pravin Gotkhindi, and it had following films:

Sangeet Martand Jasraj  by Madhura Jasraj
Bansuri Guru Pandit Hariprasad Churasia by Rajiv Churasiya.
Jamuna Ke Tir:Abdul Karim Khan by Meena Fatarpekar
Hirabai Badodekar interview by Vamanrao Deshpande

I was able to watch Saturday’s session which had two films. One was on Abdul Karim Khan, founder of Kirana gharana and the other was recording of interview of Hirabai Badodekar.

The Film titled ‘Jamuna Ke Tir’, on Ustad Abdul Karim Khan was made by Meena Fatarpekar, who is part of same Kiarana gharana herself. The contribution and life of Abdul Karim Khan is pretty well known and documented, though it had interesting snippets such as his enemies tried to feed him betal leaves and shendur(शेंदूर, red colored lead powder) to damage his voice. This was similar to what was shown in recent movie Katyar Kaljat Ghusali. The film also had photograph where a trained dog him would accompany him at certain times during music performance. It also had photographs of he going for hunting and one with killed leopard. The film also traced how his lineage has developed and how it is alive by covering various artist of his lineage.

The other recording related to Hirabai Badodekar’s interview also was entertaining to say the least. At the interview’s recording time, she was probably counting her last days. The interviewer touched many topics and tried to get information from her on various topics and interesting episodes in her life such as he training, her public performances, her entry to music theater, film singing, her disciples, rivalry with Roshan Ara Begum. I wish it had covered her relation with other artists such Goharbai and Amirbai Karnataki, both related to music theater and film singing along with her during the pre-independence era. The interesting memory of hers where she was invited to sing at Delhi’s parliament house on the eve of function organized on Aug 15, 1947 during the declaration of independence. She also was part of singing group on Jan 26, 1950, in Red Fort in Delhi, on the occasion of first Republic Day, when India adopted constitution.

A note on BRT experience

Today morning, I traveled by a bus, to the venue of the above program, via Bus Rapid Transport System(BRT or BRTS) which has started recently by PMPML with big fanfare in PCMC area. I cannot resist to share the experience here. The BRT stations as they call to refer the bus stops, are nicely done and remind railway platforms as one see commuters waiting there for their bus. The automatic doors at the stations still work. They open as the bus enters the station and closes after it leaves. The buses seem be in good shape from outside, but quality inside is not good. Automatic doors make pretty bad noise while opening and closing. I noticed a continuous beep in shrill voice at these doors. I don’t understand why these buses have names such as Vajra(वज्र) followed by route number. Vajra or Vayu Vajra buses are brand names of similar buses in Bengaluru. The buses still have conductors who tenders tickets to commuters, which could have either automated by vending machine at the bus stop or at the driver’s seat.

All in all, bus travel via BRT is one step further, better safety due to closed doors, though some might think thrill of hanging in the open doors is now lost.

 

रहमत तरीकेरी-लोकसंस्कृती संशोधक आणि लेखक

मी केलेल्या अमीरबाई कर्नाटकी या कन्नड पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या निमित्ताने माझा त्या पुस्तकाचे लेखक रहमत तरीकेरी यांचा जवळून परिचय झाला. आता माझा आणि साहित्य, लेखक यांच्याशी असा परिचय यापूर्वी असण्याचे काहीच कारण नव्हते. मला थोडीफार वाचनाची आवड आहे इतकेच. त्यामुळे त्यांचा परिचय झाला ही माझ्यासाठी विशेष बाब आहे. येथे आज त्यांची थोडी ओळख करून द्यावे असा विचार करून लिहायला बसलो आहे.

गोहारबाई आणि अमीरबाई

२०१० मध्ये हा सिलसिला सुरु झाला. एका कन्नड मासिकात बालगंधर्व आणि गोहारबाई यांच्यावर रहमत तरीकेरी यांनी लिहिलेला मी लेख माझ्या वाचनात आला. त्यांच्याशी संपर्क करून, मी तो लेख मराठीत करूयात अशी विचारणा केली. त्यांनी थोडेसे कचरतच मला परवानगी दिली, याचे प्रमुख कारण, त्यात गोहारबाई यांची बाजू मांडली गेली होती, आणि त्यांना धास्ती अशी होती की मराठी रसिकजन ते कसे स्वीकारतील. मी मराठीत तो लेख भाषांतरीत करून ग्रंथालीचे आणि थिंक महाराष्ट्रचे दिनकर गांगल यांच्याकडे पाठवला. त्यांनी तो प्रसिद्ध केला. वाचकांना तो आवडला आणि बरीच मतमतांतरे झाली. पुढे काही दिवसांनी तरीकेरी मला अमीरबाई कर्नाटकी पुस्तकाबद्दल सांगितले. त्याचे मराठी भाषांतर करायलाही त्यांनी मला परवानगी दिली.

लोकसंस्कृती संशोधक, साहित्य समीक्षक

तो पर्यंत रहमत तरीकेरी हे काय प्रकरण आहे याचा मला अंदाज आला होता. त्यांचा चिक्कमंगळूर जिल्ह्यातील समतळ येथे जन्म(१९५९) झाला. पुढे तरीकेरी, शिमोग्गा, मैसूर येथे शिक्षण झाले. हम्पी येथील कन्नड विद्यापीठात साहित्याचे प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे. वेगवेगळे उपासना पंथ/भक्ती संप्रदाय, साहित्य समीक्षा, साहित्य मीमांसा, संस्कृती चिंतन, नियतकालीकातून लेखन, लोकसाहित्य क्षेत्रात संशोधन आणि लिखाण, आणि त्यानिमित्ताने भारतभर प्रवास त्यांनी केला आहे. त्यांच्या काही साहित्यकृती अश्या आहेत-प्रतीसंस्कृती, मरदोळगण किच्चू, कर्नाटकद सुफीगळू, कर्नाटकद नाथपंथ, कित्तीयंचीन दारी, चिंतनेय पाडू, इल्ली यारू मुख्यरल्ला, मातु तलेयत्तुव बगे, अंडमान कनसु, कदळी होक्कूबंदे, धर्मपरीक्षे, नडेदोशट्टुनाडू, नुडी संकर साहित्य, कन्नड साहित्य वाग्वादगळू इत्यादी. १९९३, १९९८, २००० मध्ये कर्नाटक साहित्य अकादेमी, २००८ मध्ये जीएसएस, लंकेश हामाना, २०१० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ह्यातील काही पुस्तके मी मागवली आणि त्यांचेही भाषांतर करावयाचा मानस आहे. जसे त्यांचे पुस्तक ज्यात कर्नाटकातील सुफी पंथाविषयी त्यांनी अतिशय विस्ताराने, त्या सुफी संतांबरोबर फिरून, संशोधन करून लिहिले आहे. तसेच त्यांचे कर्नाटकातील नाथपंथ याविषयीचे पुस्तक तर नक्कीच मराठीत यावे. त्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांच्याशी त्यांची ओळख झाली. मराठी आणि कन्नड भाषेतील संस्कृतीचा अजून एक समान धागा ह्यामुळे जोडला गेला.

त्यांची पहिली पुणे भेट

माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट व्हायला २०१३ साल उजाडावे लागले. तो पर्यंत माझा आणि त्यांचा फोन, ईमेल असाच संवाद होत होतं. २०१२ च्या मे मध्ये मी हम्पीस गेलो होतो, पण मला वेळ नसल्यामुळे मला त्यांची भेट घेता नाही आली. पुण्यात भेट होण्यास निमित्त ठरले ते मी आणि चैतन्य कुंटे असे दोघे मिळून सुदर्शन संगीत सभेच्या अंतर्गत त्यांचे बिळगी भगिनी(Bilagi Sisters, अर्थात अमीरबाई आणि गोहरबाई कर्नाटकी) याविषयावर सदीप व्याख्यान ठेवले होते. त्यांच्या प्रथम दर्शनाने तर मला चकितच केले. अतिशय साधे कपडे, पाठीवर हॉवरसक. अतिशय चिकित्सक नजर, भरभर चालणे, आणि सतत पडणारे प्रश्न ही काही ठळक वैशिष्टे.

With Rahmath Tarikeri

रहिमत तरीकेरी यांच्या समवेत

त्यांची ही काही पुण्यास पहिलीच भेट नव्हती. अमीरबाई यांच्यावरच्या पुस्तकाच्या निमित्ताने ते पुण्यातील FTII मध्ये आले होते एक-दोनदा. मी माझ्या यथामती त्यांचे विचार आणि प्रेरणा समजावून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती, भाषा, पुण्याचा इतिहास, मराठी-कन्नड भाषेत यापूर्वी काम केलेले अनेक व्यक्ती याबद्दल आमच्या चर्चा झाल्या. त्यांची एकूणच जीवनातल्या आणि संस्कृतीच्या प्रत्येक क्षेत्रात रुची होती, माहिती होती-खाद्य संस्कृती असो, भाषेमधील लकबी आणि विशिष्ट शब्द असोत, त्यांचे विचार त्यांनी मनमोकळेपणाने माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबियाबरोबर वाटले. त्यांची कन्नड भाषा जी अतिशय वेगळी आणि कर्णमधुर वाटत होती. त्या वेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने २ दिवस माझ्याकडे राहिले आणि आम्ही समृद्ध होवून गेलो. माझ्या घरच्या वास्तव्यात त्यांनी अगदी मनमोकळेपणे, कसलाही अहं न दाखवता, अतिशय मितभाषीपणे संवाद साधला, त्यांच्याकडे असलेली त्यांच्या हम्पी येथील घराची छायाचित्रे त्यांनी आम्हाला दाखवली. त्यांचा सुदर्शन रंगमंच येथील कार्यक्रमही सुंदर झाला. त्यांच्या अमीरबाई कर्नाटकी पुस्तकाच्या संशोधनाच्या निमित्ताने अनेकांशी त्यांचा संपर्क झाला आहे, तसेच त्यांनी बरीच माहिती, आणि गाणी, जुनी छायाचित्रे त्यांनी गोळा केली होती. त्याचा वापर करून त्यांनी अतिशय खुबीने कार्यक्रम रंगवला.

मराठी भाषांतर आणि प्रकाशनाच्या निमित्ताने

त्यांची दुसरी भेट अमीरबाई पुस्तकाच्या मराठी भाषांतराच्या प्रकाशनाच्या निमित्ताने झाली. त्याधीही, त्यांच्या बरोबर, १-२ वर्षे सततचा फोन, ईमेल वर संपर्क होताच. भाषांतर अचूक आणि त्यांनी सुचवलेले पर्याय यावरून त्यांचा व्यासंग, आणि आपले काम परफेक्ट करण्याचा त्यांचा असलेला कायमचा प्रयत्न दिसून आला. तसेच अमीरबाई आणि गोहरबाई यांचे आयुष्य आणि त्यांनी केलेला संघर्ष जगासमोर आणण्यासाठीची त्यांची मनापासूनची तळमळ मला कायम दिसून आली. मराठी आवृत्तीसाठी त्यानीच मला FTII कडे असलेले अमीरबाई यांचे दुर्मिळ आणि सुंदर छायाचित्र घेण्यास सुचवले. डिसेंबर २०१४ मध्ये प्रकाशन होते मुंबईस. ते पुण्याला आल्यानंतर आमच्याबरोबर मुंबईस प्रकाशन सोहळा पाहण्यास आले. त्यांना अतिशय उत्सुकता होती, की मराठी साहित्य विश्वात, कसे काय कार्यक्रम होतात, आणि ते प्रत्यक्ष पाहण्याची. तो सोहळा त्यांना खूप भावला आणि समाधान व्यक्त केले. त्याचे दुसरे असे कारण होते की ज्या अमीरबाईने मुंबई हे आपले कार्यक्षेत्र निवडले होते, तेथे त्याच्यावरच्या पुस्तकाचा प्रकाशन होत होता.

तर असे हे रहमत तरीकेरी. कन्नडमधील पुरोगामीवृत्तीचे संस्कृती आणि साहित्य समीक्षक, साहित्य संशोधक, लेखक. त्यांची इतरही पुस्तके मराठीत आली पाहिजेत, आणि मराठी जगताला त्यांच्या कार्याचा आणखीन परिचय व्हायला हवा.

Kattale Belaku

I happened to make a flying visit to Bengaluru last week. I make it a point to engage into difference experience whenever I am there. It has been my quest to keep enhancing my understanding of Kannada, its cultural backdrop across different modes(such as music, drama, literature, language etc). I did not miss the opportunity on Friday July 10, to catch a Kannada play Kattale Belaku(literally means darkness and light) , the moment I read that morning about the various shows in the newspaper.

This play Kattale Belaku is a classic written by legendary Kannada playwright Shriranga. The play was at iconic theater Ranga Shankara. I always have been fascinated by the environs of this theater. It is a melting pot of Kannada(and even pan Indian) theater talent. There is a book and audio/video shop in the premises. The auditorium is very unlike the ones I have seen in Pune. The structure is almost like The Colosseum in Rome. I have watched many plays there and always enjoyed being there and spending time.

This particular 80-minute play was about the playwright himself who is declares in the opening monologue that he does not want to write anymore. The rest of the events after this monologue is all out attempts to change his mind and make him write again. The play seems to be a commentary on society’s general attitude towards plays as only entertainment device whereas he, the playwright does not want it to be treated that way and also does not wish to write to the demands of the market or to the likes and dislikes of the audiences.

The play has many humorous incidents as other key stake-holders in the theater ecosystem(drama company owner and its manager) try to speak it out with the playwright and make him write plays as per their wishes which, of course, are focused towards making better business. Please remember the play was written in 1959. Those days were he golden days of music dramas with greats such as Balgandharva, Gubbi Veernna and Narayanrao Huilgol and many others. For those curious ones reading this blog, who wish to know more about that era, please refer to my blog which covers translation of biographical work on Amirbai Karnataki who along with Goharabai Karnataki played roles in such plays.

rangashankara-kattale-belaku 20150710_205013

The duo tries to ignite his mind by suggesting different popular plots around love story, murder mystery, historical and mythological events. But nothing works, though when these story ideas are described to the playwright, the same scenes take place around his house, indicating intermix of real and abstract to the audience. The play does not  answer this intermix. The playwright’s determination is highlighted in the climax that he will not budge to the demands and pressure of stake-holders, but would really write only to his inspiration.

Article on Goharabai translated by me(Kannada to Marathi)

It is interesting to know other shades of life of Balgandharva and Goharabai.

This is a article on relations between Goharabai and Balgandharva, translated from Kannada to Marathi by me. Original article appeared in Kannada monthly called Mayur in Oct 2010. Here is the link of this article on ThinkMaharashtra.com portal.

Update on May 21, 2015:

Some time back I had translated article on Amirbai Karnataki also, it was published on ThinkMaharashtra.com portal recently. Please check it out here.