उत्तरयात्रा नॉर्वेची

गेल्या दिवाळीच्या सुमारास मुंबई गोवा अशी अलिशान ऐशोआरामी बोटीतून होणारी आंग्रीया(Angriya, शिवाजी महाराजांच्या आरमारातील आद्य दर्यावर्दी सरखेल कान्होजी नावाची यांच्या नावाची) नावाची सफर सुरु झाली आहे अशी बातमी आली होती. आपण टायटॅनिक हा प्रसिद्ध सिनेमा पाहिलेला असतो. १९१२ मधील अशीच ती सुप्रसिद्ध अलिशान सागर सफारीसाठी प्रसिद्ध अशी अनेक मजली बोट, आणि तिची दुर्दैवी कहाणी. आन्ग्रीया त्या मनाने खुपच लहान आहे अर्थात. माझ्या एका कार्यालयीन सहकारीने एक-दोन वर्षांपूर्वी गेंटिंग ड्रीम(Genting Dream Cruise Liner) नावाच्या एका अलिशान बोटीतून मुंबई श्रीलंका असा प्रवास केला होता. एखादी अलिशान बोट मुंबईत(आणि भारतात) नांगर टाकते असा तो पहिलाच प्रसंग होता. माझे स्वप्न आहे अश्याच कुठल्यातरी सागर सफरीवर आलिशान बोटीतून प्रवास करण्याचे. नाही म्हणायला मी पूर्वी लक्षद्वीपला गेलो तेव्हा बोट प्रवास केला होता २-३ दिवस, पण ती अर्थातच साधी प्रवासी बोट होती.

पुण्यातील एके ठिकाणच्या जुन्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात परवा मीना प्रभू यांचे उत्तरोत्तर ताजे पुस्तक हाती लागले. ते मी पटकन उचलले. त्यांनी नॉर्वे सफरीची, जे उत्तर धुर्वाजवळ असलेला, उत्तर युरोपातील देशाच्या सफरीची कहाणी सांगणारे जाडजूड पुस्तक लिहिले आहे. तेवढेच नाही तर, ते पुस्तक क्वीन मेरी-२ (Queen Mary-2, QMT) या अलिशान बोट प्रवासाबद्दल देखील तितकेच आहे. त्या पुस्तकावर, त्या दोन्ही गोष्टींवर आजचा हा ब्लॉग.

मीना प्रभूंच्या प्रवासवर्णनाच्या पुस्तकांचा अख्खा संच माझ्याकडे आहे. हे पुस्तक नव्हते. मस्त पुस्तके असतात त्यांची, अतिशय वाचनीय. सर्वात आवडते पुस्तक म्हणजे माझे लंडन. त्यांच्या कुठल्याच पुस्तकांवर मी पूर्वी कधी लिहिले नाही. पण ह्या पुस्तकावर लिहावेसे वाटले. त्यांचे उत्तरोत्तर हे पुस्तक अगदी undownputable असेच. त्यात दोन भाग आहेत. पाहिला भाग, जो मोठा आहे, तो आहे उन्हाळ्यात इंग्लंडवरून नॉर्वेचा बोटीने केलेला प्रवास आणि मध्यरात्रीचा सूर्य त्यावेळेस जो पाहिला त्या बद्दल. दुसरा भाग हा हिवाळ्यात इंग्लंडवरून विमानाने नॉर्वेचाच प्रवास, पण ऑरोरा(अर्थात northern lights or aurora) पाहण्यासाठी केलेला या बद्दल आहे.  त्यांचा हा बोट प्रवास ठरेपर्यंतचा प्रवास, बोटीवर चढल्यावर त्या बोटीचे वर्णन, सुखसोयी, त्यांना भेटलेले विविध लोक, त्यांचे स्वभाव, त्यांच्या गमती जमती, त्यांनी बोटींवर अनुभवलेले विविध अनुभव यांचे रसभरीत वर्णन केले आहे. अशा अलिशान बोटींवर प्रवासी काय करू शकतात याची पण त्यांनी झलक वाचकांना दिली आहे. या सर्वांबद्दल लिहिताना जवळ जवळ पहिली १५० पाने खर्ची घातली आहेत, इतके त्यांनी भरभरून लिहिले आहे.

नॉर्वे हा देश देखील अखातातील दुबई, सौदी अरेबिया सारख्या देशांसारखा १९६०-७०च्या दशकात खनिज तेलाच्या शोधामुळे अचानक श्रीमंत झालेला देश. पण विविध नैसर्गिक वैशिष्ट्याने नटलेला देश. त्याची झलक मीना प्रभूंनी पुस्तकात करून दिली आहे. इंग्लंड मधील Southampton येथील बंदरातून त्यांचा क्वीन मेरी-२ या अलिशान बोटीचा प्रवास सुरु होतो. बोटीचा नॉर्वेच्या आधी जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे नांगर पडला आणि त्यांना हे शहर देखील पाहायला मिळाले, तसेच मीठाकरता प्रसिद्ध असलेले ल्युनबर्ग सुद्धा. नंतर नॉर्वेची राजधानी असलेले ऑस्लो येथे १३० मैलांचा ऑस्लो फिओर्डमधून बोट ऑस्लो बंदराला लागली. ऑस्लो शहर दर्शनाची माहिती, गुस्ताव्ह व्हीग्लंडची उघड्यावरील शिल्पे, कॉन टिकी संग्रहालय(एका नॉर्वेच्या साहसवीराने प्रशांत महासागरात केलेल्या धाडसी प्रवासाची महती सांगणारे) देखील पहिले त्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. नंतर येथे त्यांची बोट Stavanger या गावी गेली. तेथे त्यांनी ऑईल म्युझियम पहिले त्याबद्दल लिहिले आहे. त्यात तेथे त्यांनी पेट्रोपोलीस नावाचा माहितीपट पाहिला. त्यानंतर बर्गन या गावी, जी नॉर्वेची जुनी राजधानी आहे, तेथे गेले. अकराव्या शतकात व्हायकिंग लोकांनी वसवलेले ते शहर. पुढे त्याची बोट आलेसुंड येथे गेली. तिथे ती पहिल्यांदाच गेली असे ते लिहितात. छोटेसेच बंदर, त्यामुळे क्वीन मेरी-२ सारख्या बोटीला तेथे नांगर टाकायला धक्का नाही. समुद्रात दूर कुठेतरी थांबून छोट्या बोटीतून किनाऱ्यावर यावे लागते. शेवटी नॉर्थ केपजवळ मध्यरात्रीचा सूर्य त्यांना पाहता आला त्याची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. हे वाचताना प्रसिद्ध लेखक अरुण प्रभुणे यांनी २०१९च्या पद्मगंधा दिवाळी अंकात लिहिलेल्या एका लेखाचे स्मरण झाले. अमेरिकेतील अलास्का राज्याच्या उत्तर टोकावर स्थित आर्क्टिक प्रदेश, आर्क्टिक (गोठलेला) महासागर परिसरात सहकुटुंब फिरायला गेले असता आलेले रोमांचकारी अनुभव, मध्यरात्रीचा सूर्य, न मावळणारा सूर्य हे सर्व पहिले त्याबद्दल तो लेख होता.

असो. दुसऱ्या भागात मीना प्रभूंच्या पुस्तकात, हिवाळ्यात नॉर्वेला लंडनहून विमानाने प्रवास करून ऑरोरा पाहायला गेल्यावेळचा अनुभव ते कथन करतात. ऑरोरा हा देखील निसर्गाचा मनमोहक अविष्कार नॉर्वेत त्राम्स येथून दिसतो. हा ऑरोरा अमुक एका वेळेस अमुक एका ठिकाणी दिसेलच असे नाही. दोन-तीनदा प्रयत्न करून शेवटी तो त्यांना दिसला. त्याची रोमहर्षक कहाणी, त्या ऐन थंडीतील, बर्फातील दिवसांबद्दल रसभरीत लिहिले आहे.

आता थोडेसे त्यांच्या बोटीवरील अनुभवांबद्दल. मैल दीडमैल लांब असलेली १३ मजली ती बोट, जणू एक गावच. २५०० पेक्षा अधिक प्रवासी, १२०० पेक्षा अधिक कर्मचारी वर्ग, भोजन, उपहार यासाठी असलेली विविध ठिकाणे, मनोरंजनासाठी असलेले विविध पर्याय, ज्यात चित्रपट, संगीत, विविध व्याख्याने(विशेषतः जेव्हा बोटीचा sea day असतो तेव्हा), जादूचे प्रयोग, तारांगण, पब्स, नाईट क्लब्स, नाचण्यासाठी बॉलरुम्स; विविध खेळ खेळण्याची व्यवस्था, आरोग्य, स्वास्थ्याकरिता व्यायामशाळा, स्पा, पोहण्याचे तलाव, हॉस्पिटल वगैरे वगैरे. बोटीवरील विविध शिष्टाचार, वेशभूषा करण्याचे नियम, याची देखील त्यांनी मनोरंजक माहिती ओघवत्या भाषेत दिली आहे. त्या सफरीत विविध विषयांवर बोलण्यासाठी वेगवेगळया तज्ञ मंडळीना बोटीवर बोलावलेले असते, आणि तशी अनेक व्याख्याने त्यांनी ऐकली, अनुभवली. क्वीन मेरी-२ बोटीची, तसेच क्युनार्ड कंपनीचा इतिहास सांगणारे, नॉर्वेचा इतिहास सांगणारे, संगीताबद्दल, अवकाश आणि सूर्यमाला यांची माहिती सांगणारी व्याख्याने त्यांनी ऐकली.

मीना प्रभूंची भाषा अतिशय ओघवती, असे वाटावे की आपण त्यांच्यासोबत बोटीत आणि इतरत्र फिरत आहोत. पाहिलेल्या, ऐकलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची तपशीलवार माहिती, पण नुसती रुक्ष यादिवजा नाही, तर वाचनीय, मनोरंजक, आपल्याला खिळवणारी अशी. शब्दरचना तर इतकी वेगळी, नादमय आणि आनंद देणारी. परवाच बातमी वाचली की नॉर्वेमध्ये तेथील फिओर्डच्या(fjord) खाली floating underwater tunnel तयार करणार आहेत, जेणेकरून वाहतूक विना अडथळा व्हावी. मी हा ब्लॉग लिहिता लिहिता क्वीन मेरी-२ सहलींची माहिती त्यांच्या म्हणजे Cunrad च्या वेबसाईटवर पाहतो आहे. कधी जमणार हे सगळे असा विचार येतो आहे!

युरोप दिग्विजय, भाग#१ लंडनमध्ये पायउतार

जगभर भटकायचे माझे स्वप्न आहे. असे म्हणतात की आयुष्यात मोठी मोठी स्वप्ने  उराशी बाळगावी. तासे माझे हे मोठे स्वप्न आहे. अमेरिका भटकंतीतर कित्येक वर्षांपासून होत असते. युरोप माझ्या लिस्टवर खूप वर होतेच. आठ वर्षांपूर्वी तिथे जाऊन देखील आलो. पण एकदा जाऊन आल्यानंतर कुतुहल शमले पाहिजेना, नाही तर परत परत जावेसे वाटत राहते. येत्या काही लेखांमध्ये या माझ्या युरोप भटकंतीचे पुराण लावणार आहे.  मी युरोपला जाण्यासाठी मेचा महिन्याचा पाहिला आठवडा निवडला होता. भारतात रणरणते उन, तर तिकडे हिवाळा नुकताच संपून मस्त वसंत ऋतूची चाहूल लागण्याचा मोसम. पहिला मुक्काम इंग्लंडच्या राणीचे लंडन.

मुंबईहून मी निघालो ते तुर्की विमान कंपनी(Turkish Airlines) च्या विमानाने. आधी तुर्की राजधानी इस्तंबुल, मग पुढील ठिकाणचे, म्हणजे लंडनचे विमान. इस्तंबुलच्या आतातुर्क विमानतळावर उतरलो. एवीतेवी इस्तंबुलला गेलोच होतो, तेथे एक-दोन दिवस राहून पुढे प्रयाण करायला हवे होते असे राहून राहून वाटत राहिले. खुष्कीच्या मार्गाने(म्हणजे रस्त्याने हो!) गेलात तर इस्तंबुल हे शहर लागते, आणि त्यापलीकडे युरोप खंड. म्हणून इस्तंबुलला युरोपचे द्वार असे म्हणतात. इस्तंबुल म्हणजे पूर्वीचे प्राचीन कॉन्स्टेटीनोपल, जिचा पंधराव्या शतकात पाडाव झाला, रोमन लोकांचा पराभव होऊन इस्लामी राजवट सुरु झाली. नाही म्हणायला विमान उतरताना आणि निघताना इस्तंबुलशहर वरून दिसले, त्यातही तेथील मशिदींचे मनोरे नजरेस पडलेच. तेवढेच समाधान!

IMG_2414लंडन हिथ्रो विमानतळावर उतरून सगळे सोपस्कार पर करून बाहेर येई पर्यंत संध्याकाळचे सहा वाजत आले होते.  या पूर्वी एकदा अमेरिकेला जाताना लंडनवर पुढचे विमान पकडण्यासाठी उतरलो होतो. ऐन थंडीचा मोसम होता. सगळीकडे बर्फ पडलेला. अजून आठवते ते दृश्य, पण अर्थात बाहेर पडलो नव्हतो. असो. यावेळी दुसरा दिवस लंडन मध्ये भटकणार होतो. एकच दिवस होता लंडनमध्ये. मीना प्रभूंचे माझे लंडन हे पुस्तक वाचलेच होते. त्या तेथेच राहतात कित्येक वर्षे, आणि त्यांनी पुस्त्क्त अगदी चवीने लिहिले आहे लंडनबद्दल. पण मला सगळेच लंडन भटकणे शक्यच नव्हते.  इंग्रजांचे, ब्रिटीश राज्यसत्तेचे लंडन आपल्याला शाळेपासूनच माहिती असते. लंडन म्हणजे विक्टोरिया राणी, तिचा राजवाडा, आद्य लोकशाहीचे चिन्ह असलेले संसद, लंडन ब्रीज, शेक्सपिअर, क्रिकेटचे लॉर्ड्स मैदान, टेनिसचे विम्बल्डन गाव वगैरे गोष्टी आठवतात. या शहारात मी पायउतार झालो आहे यावर विश्वास बसत नव्हता.

IMG_2375पहिले ठिकाण St Paul’s Cathedral. उंच, मोठे घुमट असलेले चर्च. सकाळी नाश्ता वगैरे करून हॉटेल पासून येथे आलो तोवर हलकासा पाऊस आणि वारा सुरु झाला. थोडेसे ढगाळ होतेच. पण पाऊस लगेच थांबला, उनही पडले. त्यामुळे सगळीकडे चकचकित दिसू लागले. घुमट देखील चकाकू लागले होते. पर्यटकांची गर्दी होतीच. ख्रिस्तोफर रेन नावच्या वास्तुशिल्पीने हे सतराव्या शतकात निर्मिलेली ही वास्तू भव्यच आहे. ख्रिस्त चरित्रातील दृश्ये चितारलेली दिसतात, खिडक्यांवर रंगबेरंगी स्टेन्ड ग्लास पेंटिंग देखील दिसते. तिथे जास्तीचे न रेंगाळता पुढे ट्रफ्ल्गार स्क्वेअर या सुप्रसिद्ध चौकात गेलो. अर्थात मराठीत चौक म्हणायचे कारण चार रस्ते येऊन मिळतात म्हणून. इंग्लंडचा फ्रेंच-स्पेनवरील केप ट्रफ्ल्गार किनाऱ्यावरील युद्धात विजय मिळवल्याच्या निमित्ताने या चौकात स्मारक, सुशोभिकरण केले गेले. भलेमोठे सिंह, मोठे सुशोभित असे खांब, कारंजे, कित्येक कबुतरे, अनेक पुतळे इत्यादींनी नटलेले हे चौक म्हणजे happening place असे आहे. राजकीय चळवळी, भाषणे, वक्तृत्व यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. आजूबाजूला भव्य अश्या इमारती, मोठाली दुकानेही आहेत.

तेथून नंतर पिकाडेली सर्कस आणि जवळच असलेले ऑक्सफोर्ड स्ट्रीट येथे गेलो, थोडे इकडे तिकडे पाहत फिरलो. मोठमोठाली चकचकीत दुकाने, रंगीत इलेक्ट्रोनिक दिव्यांनी सजलेले नामफलक हे येथील वैशिष्ट्य. उंची हॉटेल्स, बार्स, नाट्यगृहे, नाईट क्लब, वगैरेंची दाटी असलेली रंगेल लंडनची झलक इथे दिसते. त्यानंतर वेस्टमिन्स्टर एबी येथे गेलो. हे ही एक चर्च आहे, पण त्याचे वैशिष्ट्य असे की, इंग्लंडच्या राजघराण्यातील विविध व्यक्तींच्या कबरी येथे आहेत. राजघराण्यातील विविध विवाह  सोहळेदेखील येथे झाले आहेत. नुकतेच पार पडलेले राजपुत्र हॅरी याचा विवाह येथे नाही झाला, तो ऐतिहासिक Windsor Castle येथे झाला. मी त्यावर एक लेख राजपुत्राचा विवाह या नावाचा लिहिला होता. ही चर्चची दगडी इमारत बरीच उंच आहे, आणि हजार वर्षांहून जुने आहे. येथे Poet’s Corner म्हणून एक जागा आहे, तेथे प्रसिद्ध कवी मंडळी चिरनिद्रा घेत आहेत, पण इतरही अनेक गतकालीन प्रसिद्ध मंडळी येथे आहेत.

IMG_2466टेम्स नदी अधूनमधून दिसत होतीच. पूर्वी कधीतरी Three Men in a Boat ही Jerome K Jerome यांची विनोदी कादंबरी, ज्यात, टेम्स नदीतील प्रवासाचे वर्णन येते, ती वाचली होती, तिची आठवण येत होती. टेम्स नदीवरील वेस्टमिन्स्टर ब्रीजवरून Houses of Parliament किती मस्त दिसते. मूळ इमारत अकराव्या शतकातील, पण दुसऱ्या महायुद्धात ते बेचिराख झाले, आणि १९४५ मध्ये ही आत्ताची नवीन इमारत उभी केली. येथे पूर्वी इंग्लंडच्या राणीचे निवासस्थान होते. पंतप्रधानांचे कार्यालय 10 Downing Street देखील दिसते. पुढे Parliament Square आहे. जवळच बिग बेन हे जुने घड्याळ असलेला टॉवर आहे. नंतर आमचा मोर्चा बकिंगहॅम पॅलेसकडे वळला. तेथे सुप्रसिद्ध असे Changing of Guards समारंभ पाहायला जायचे होते. बकिंगहॅम पॅलेस हे सध्या राणीचे निवासस्थान आहे. मस्त गर्दी होती. हा पर्यटकांचे आवडते ठिकाण. राणीचा बडेजाव अजून टिकून आहे हे दिसते.

IMG_2447दुपार टळून गेली होती. आता आमची टोळी आता Madame Tussaud wax museum येथे निघाली. मेणाचे पुतळे आता बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतात. त्याचे विशेष कौतुक नव्हते. मात्र हे मूळ आणि पहिले असे ठिकाण म्हणून त्याचे महात्म्य. आत जाऊन विविध प्रसिद्ध व्यक्तींबरोबर फोटो काढले. आमची लंडनची सहलीचा शेवट London Eye Millennium Wheel भेटीने होणार होता. नव्या सहस्रकाच्या निमित्ताने लंडनने दोन स्थळांची निर्मिती केली. एक म्हणजे London Eye Millennium Wheel, आणि दुसरे म्हणजे Millennium Dome, दोन्ही टेम्स नदीवर, पण ७ मैल एकमेकांपासून दूर. London Eye Millennium Wheel हे नावाप्रमाणे मोठाले असे चक्र(१२० मीटर), ज्यात बसून लंडन शहाराचा नजरा एका दृष्टीक्षेपात घेता येतो. हे चक्र शहराच्या अगदी मधोमध आहे. त्यात बसायला मजा आली. जवळच टॉवर ब्रीज देखील आहे, तोही पाहिला, त्यावर फिरून देखील आलो.

दमून भागून, जेवण वगैरे उरकून, रात्री उशिरा परत हॉटेलला परतलो, ते उद्याच्या प्रवासाचे बेत आखतच. अर्थातच लंडनची नवलाई कितीही सांगितली तरी संपणार नाही. कुणी तरी म्हटलेच आहे-No one can see the whole of London in his life! ते खरे वाटू लागते. लंडन मध्ये आणि एकूणच इंग्लंड मध्ये कितीतरी पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे अर्थातच आहे, ते नंतर पुन्हा कधीतरी परत. नाही का?

 

 

अफ्रिकन अमेरिकन इतिहासाचे संग्रहालय

२०१८ हे वर्ष अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांच्या हक्कासाठी, समानता या करता (civil rights) असलेल्या चळवळीचे अर्ध्वयू मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांची पन्नासावी पुण्यतिथीचे वर्ष. एप्रिल ४, १९६८ ह्या दिवशी त्यांची हत्या झाली. या निमित्ताने प्रसिद्ध दूरचित्रवाणी वाहिनी सीएनएन वर एप्रिल मध्ये एक कार्यक्रम झाला होता, त्याचे पुनःप्रसारण मी काल(ऑगस्ट २८) पाहिले. पुनःप्रसारण करण्याचे कारण मार्टिन ल्युथर किंग यांचे प्रसिद्ध भाषण I have a dream ऑगस्ट २८ या दिवशी ते झाले होते, त्याची आठवण जागवणे हे होते . मी काही महिन्यांपूर्वीच फिलाडेल्फिया मधील अफ्रिकन अमेरिकन लोकांचा इतिहास सांगणारे एक संग्रहालय आहे तेथे भेट दिलेली त्याची आठवण झाली.

सोळाव्या शतकात अमेरिकेत गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या या कृष्णवर्णीय नागरिकांचे अमेरिकेच्या जडण घडणीत मोठे योगदान आहे. पण त्यांना मिळत गेलेली दुय्यम दर्जाची वागणूक, ही आपल्याकडे, भारतातील, जातिव्यवस्थेत दलित, हरिजन लोकांना जशी मिळत गेली, तशीच काहीशी होती, आणि आजही थोडीफार ती अजूनही आहे. भारतात तर हा प्रश्न अजूनही मोठाच आहे, त्यातच आरक्षण, आणि मग त्यासाठी आंदोलन, त्याचे राजकारण वगैरे सारख्या गोष्टीनीची भर पडते आहेच. भारतात जसे महात्मा गांधी, आंबेडकर, महात्मा फुले या नेत्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी काम केले, तसेच अमेरिकेत अश्याच सामाजिक परिवर्तनासाठी मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर आणी इतरही अनेक जण झटले. त्याचा इतिहास हे संग्रहालय मांडते. आपल्याकडे कश्या अधून मधून जातीयतेच्या निमित्ताने घटना घडत असतात, किंवा ठिणग्या पडत असतात, तसेच तेथेही अधून मधून होत असतात. नुकतीच एक घटना घडली. नॉर्थ केरोलीना विद्यापीठात अमेरिकेत झालेल्या यादवी युद्धाचे निशाण म्हणून बंडखोर संघटनेच्या सैन्याचे(ज्यांचा कृष्णवर्णीय लोकांच्या गुलामगिरीला पाठींबा होता) प्रतिक असलेल्या Silent Sam या पुतळ्याचे उच्चाटन करण्यात आले.

African American Museum of Philadelphia

Main entrance of AAMP

फिलाडेल्फिया मधील या संग्रहालयात या सारख्या घटनांचा इतिहास मांडला आहे. अर्थात इतरही बऱ्याच गोष्टी तेथे आहेत. अमेरिकेत असे संग्रहालय असलेले फिलाडेल्फिया हे पहिलेच शहर आहे. शहरातील ऐतिहासिक Independence Mall या भागात हे संग्रहालय आहे. African American Museum of Philadelphia (AAMP) असे लांबलचक नाव असलेल्या या संग्रहालयात अनेक दालने आहेत. फिलाडेल्फिया शहराला देखील कृष्णवर्णीय चळवळीचा मोठा इतिहास आहे, त्या साठी Audacious Freedom या नावचे खास आगळेवेगळे दृक्‌श्राव्य दालन देखील आहे. यात अमेरिकेच्या स्वातंत्र्यापासून पुढची १०० वर्षांचा म्हणजेच १७७६ ते १८७६ पर्यंतचा इतिहास आहे. त्या दिवशी मी फिलाडेल्फिया मध्ये सकाळ पासूनच अधाश्या सारखा पाहत तंगडेतोड करत फिरत होतो. शहरात अनेक ठिकणी कृष्णवर्णीय लोकांच्या संवेदना दाखवणारी चित्रे, म्युरल्स चितारलेली आहेत, ती दिसत होती, आणि मनात विविध प्रश्न येत होती.

Audacious Freedom

Poster of Philadelphia Black History Gallery

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास ते गुलाम म्हणून येण्यापासूनच सुरु होतो. संग्रहालयात गुलामगिरीविरुद्ध लढ्याचा इतिहास चित्रबद्ध केला आहे. हा लढा हैती मधील गुलामांनी केलेल्या उठावापासून प्रेरणा घेत सुरु झाला. नंतर अमेरिकी यादवी युद्धानंतर गुलामगिरी नष्ट झाली, त्यांना नागरिकत्वाचा हक्क देण्यात आला. इतर दालनात कृष्णवर्णीय समाजाने कला, क्रीडा, संगीत, हॉलीवूड, आणि इतर अनेक क्षेत्रात केलेली कामगिरीचा आढावा मांडला आहे. या समाजाची लोकसंख्या अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्यांत शेती आणि इतर उद्योगांमुळे अधिक होती आणि आजही आहे. अमेरिकेत जाझ संगीताचा उगम दक्षिणेकडील लुझीयाना राज्यात कृष्णवर्णीय लोकांच्या मध्ये झाला. त्या बद्दल मी पूर्वी येथे लिहिले होते. (Blues या संगीत प्रकारातून जाझ पुढे आले, त्या Blues, Soul संगीताची सम्राज्ञी Queen of Soul असे संबोधले जाणारी Aretha Franklin या कृष्णवर्णीय गायिकेचे निधन नुकतेच झाले)या समाजात एकत्र कुटुंब, नातेसंबंध या सारख्या गोष्टींना अजूनही महत्व आहे, याचे देखील चित्रमय दर्शन येथे आहे. मध्ये मी अमेरिकेतच एक नाटक पहिले होते, नाव होते Sistas The Musical. ते नाटक म्हणजे अमेरिकेतील कृष्णवर्णीय स्त्रियांच्या प्रश्नांचा संगीतमय आढावा होता.

 

 

अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या त्यांच्या समस्या जसे की शिक्षणचा अभाव, गरीबी, गुन्हेगारी अजूनही आहेत. आजही अंगमेहनतीची कामे जसे की शेतीची, किंवा शहरात बांधकाम, साफसफाई आणि इतर कामे हीच मंडळी प्रामुख्याने करतात. प्रत्येक शहरात त्यांची मोठी लोकसंख्या असलेली भागात जाऊ नये असा स्थानिक सल्ला देतात. मला आठवते दोन दशकांपूर्वी कॅलिफोर्नियात बे एरिया राहत असताना ओकलंड भागात कृष्णवर्णीय समाजाची मोठी वस्ती आहे, तेथे आम्ही जाण्याचे शक्यतो टाळत असू. आणि त्याच वेळेस O J Simpson या प्रसिद्ध कृष्णवर्णीय फुटबॉलपटूची कोर्टकेस प्रकरण जोरात चर्चेत होते.

aamp

संग्रहालयात कृष्णवर्णीय समाजाच्या इतिहासातील एक पर्व Harlem Renaissance ह्या बद्दलही होते. Harlem हा न्यूयॉर्क मधील एक भाग, जेथे १९२० मध्ये मोठी कला, साहित्य, संस्कृतिक चळवळ जन्माला आली. पुढच्या न्यूयॉर्क भेटीत तेथे गेले पाहिजे. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर (ज्यांनी महात्मा गांधी यांच्या पासून अहिंसावादी चळवळीची प्रेरणा घेतली होती, आणि त्याच्या Black Panther वरून आपल्याकडे दलित पँथर आली) आणि इतरांमुळे या समाजाच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली हे आहेच. बराक ओबामा सारखी कृष्णवर्णीय व्यक्ती देशाचे अध्यक्ष होण्यापर्यंत मजल गेली आहे, पण अजूनही बरीच मजल मारायची बाकी आहे. या संग्रहालय भेटीमुळे हा सर्व अमेरिकेतील कृष्णवर्णीय इतिहास दृक्‌श्राव्य माध्यमातून पाहता आला. अर्थात तेथे प्रदर्शन तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या जीवनाशी, संस्कृतीशी निगडीत कार्यक्रम कायम होत असतात. असो. या संग्रहालयात शिरण्यापूर्वी मी अमेरिकेतील ज्यू लोकांच्या इतिहासाचे संग्रहालय देखील पाहून आलो होतो. त्याबद्दल मी येथे लिहिले आहे. जरूर वाचा!

 

 

Visit to Fairmount Park and UPenn

I have been visiting Philadelphia since 2014, and I cannot stop writing about it. Every time I find something new to do there. Philadelphia (like New York) is best explored by walking. Today I am going to write about my walking experience for the entire of Sunday.

I have stayed typically around center city every time I have visited Philadelphia. This time I got to stay little far on the banks of river Delaware. If you look at the map of city of Philadelphia, you will notice that most of the city is tucked between two rivers. One on the east, Delaware river, and other on west Schuylkill river. Last time I visited Philadelphia was winter. In fact, prior visit have been during the winter. This one was, just last month, which is summer. I had written about my experience frozen Delaware river by night in the past. I have explored most of the city which is tucked between these two rivers, most of it is historical, with many monuments, museums, which has touch of Benjamin Franklin. This time I decided to go westward, near Schuylkill river, which is where Fairmount Park is situated. In fact, it is on both the banks. I also wanted to visit UPenn and surrounding area which is even further west, and west of the river too.

That Sunday I woke to beautiful Sun rise vistas of Franklin Bridge over the Delaware river from my hotel window.

Delaware River

View of the Delaware river and Benjamin Franklin bridge

My westward journey started soon after. I decided to walk on Market Street, the famous, and equally historical, which connects both east and west, the two rivers. The city between two rivers is nicely planned, with square grid of roads, like Manhattan in New York. I quickly reached city hall at the center of the city, and walked past that towards Philadelphia Museum of Art. I could have continued on Market Street and crossed the Schuylkill river, but I wanted to enter the Fairmount Park, hence decided to go by the museum.

I have been at the museum in the past. More about it later though, but for now, as I started getting inside the park, behind the museum, I got sight the river, and the woods, bushes beyond west bank. It was Sunday morning. I could see quite a few people walking, running, and even biking on the nicely laid out trails, walkways. The weather was fantastic, I could sense the freshness in the air here. Right behind the museum, there is historic site of water works building which is not in use now. It is called National Historic Mechanical Engineering Landmark. There were few sculptures created by America’s first sculptor William Rush. There is an old bund or small dam on the river near the water works. This also is an rowing area. I kept on walking towards north, with river on my left hand (west side) soon I found myself walking by Kelley Drive.

There was a cycle rental shop on the way, also old houses belonging to rowing clubs. This area is called Boathouse Row. Soon I was under one of many old bridges over the river connecting east side to west side. This is called Girard Avenue Bridge. I walked another mile and half on the trail, I came across another railway bridge. I was looking to cross over to the other side of the park and the river, but none of these bridges had way for that. I decided to return back, taking the same trail, crossed the point where I had started, and walked till I hit Market Street bridge, where I found a way to cross the river. My next point in this walking tour was famous Ivy League university, fondly called UPenn, founded by Benjamin Franklin( I have written about his legacy in the city of Philadelphia here earlier).

I walked on Market Street till intersection of 36th Street, crossing historic Amtrak station at 30th Street, Drexel University buildings.

Market Street Bridge

Beautiful facade of the bridge over Schuylkill river on Market Street

As I entered the campus area, I noticed Institute of Contemporary Arts. It was noon time, I was hungry. I made a pit stop at Cosi near the institute for food. I noticed Penn Book Store by the restaurant, which was huge book store, also selling UPenn merchandise. Next, I wanted to visit world famous business school located here, Wharton School of Business. I soon found it, but could not enter it. As I walked further, I found myself in the beautiful area called Locust Walk. This is very famous tree-lined pedestrian walkway, housing many old and new buildings. Further walk down, got me on the little bridge called Class of 1949 Generational Bridge over 38th Street below.

Then I went to the main building of the UPenn, which is called College Hall built in 1871, has impressive Gothic style features. There is sitting statue of none other than Benjamin Franklin in front of it. I rested there for a while, it was quite Sunday afternoon, having mainly visitors, as schools were off for summer vacation.

The campus is spread cross various crossing streets on Market, Walnut, Chestnut, Spruce, Locust streets which have been part of center city since the very beginning.

IMG_2840

My last stop was at Penn Museum. This is  museum operated by university’s archaeology and anthropology department. This department is famous for its various expeditions, discoveries since beginning. It houses many of artifacts collected are showcased across multiple floors of the museum. With a 10 dollar fee, it is certainly worth a visit. I spent about three hours there. The building itself is classic building built in 1899. There is a Japanese style specialty fish pond in front of the building called Koi Pond. I recalled my visit to Pune’s own Deccan College of Archaeology and Anthropology’s museum sometime back.

My walk did not stop there. I returned back to hotel walking all the way again towards Delaware river. Thereby completing my Delaware river to Schuylkill river round trip!

 

Historic Rail Parks

I got an opportunity to travel Philadelphia again last month. I have written about my Philadelphia sojourns in the past. I also try to visit New York during my Philadelphia trips. I am going to write today about couple of unique parks, that too, about railways, I visited in both these cities. I had visited New Delhi’s National Rail Museum way back in 2003. I am yet to write about it, but these two rail parks are not railway museums. Read on to find as to what they are then.

Who does not like railways? These monster machines continue to amuse, despite the jet set world we live in these days. Both Philadelphia and New York are comparatively older cities in USA. The have rich continued preserved history for past 350-400 years. Railways(they call railroads in the USA) also have a very fascinating history in making of these cities, and other ones in entire USA, in terms growth in various sectors. Both these cities had very strong, and busy rail networks, both on ground, underground, and elevated rail lines, serving passenger movement, as well as goods movement, supporting industries in and around these cities. The famous Reading Terminal, now a major shopping hub, in Philadelphia, is right in the city center. I do make a visit to it every time I am in Philadelphia.

The  recently opened The Rail Park in Philadelphia happened to right behind the building on North Broad Street where my office was located. Actually, it is just a phase one of the entire plan which is supposed to cover more than 3 miles. It was designed based on similar park which was created in New York. The Rail Park is situated on two obsolete train lines that served the Reading Terminal, bringing passengers and freight in and out of Center City. The area around abandoned rail line is beautified with greenery, nice pathways, sitting areas, and also public art display.  This stretch of discontinued rail line area which was in shackles and rambles, is part of magnificent railroad history of Philadelphia.

The following weekend while my stay in Philadelphia, I made plans to visit New York. I did not have plans to visit The High Line Park in New York, though someone had informed me about it earlier. I watched famous Broadway musical show The Phantom of the Opera. I also visited few other iconic, historic landmarks such as Grand Central Terminal, Madison Square Garden, Bryant Park, Times Square etc. In the evening, I returned to Megabus terminal to catch my bus taking me back to Philadelphia. I accidentally bumped on entrance of High Line Park near the bus terminal. I obviously was delighted, I had time in my hand, and quickly ventured into The High Line Park. This has been around for quite some time now.

This park is located middle of Manhattan, on the west side. This park is designed to preserve abandoned freight rail line which ran through West Side area of Manhattan. It was elevated rail line, carrying goods from industries around this area during 1934 to 1980. With the advent of interstate highways, it was not used much. I entered it from 34th Street entrance, soon to find myself on a bridge, which overlooked Hudson Yard, where I could spot of many subway trains, and large of rail lines. This nicely designed park in the air, has gardens, sculptures, sit outs, overlooking neighborhood on both the sides. One can view skyline of Chelsea area, and on other side, one can view Hudson river bay.

It was fascinating to walk on this historic rail line, unexpectedly that day. I had walked all day in New York(which is the best way to see it!), despite that, I stretched myself for another 45 minutes to walk and experience this park.

The Phantom of the Opera

मी जेव्हा जेव्हा न्यूयॉर्कला जातो, तेव्हा तेव्हा काय पाहू आणि काय नको असे होऊन जाते. इतकी विशाल महानगरी, अद्भूत जगच, चारशे वर्षांचा इतिहास, अगणित गोष्टी पाहण्यास, अनुभवण्यास आहेत. ह्या वेळेस, जुलै/ऑगस्ट मध्ये जेव्हा माझे जाणे ठरले, तेव्हाच मी ठरवले होते की न्यूयॉर्कच्या ब्रॉडवेवर The Phantom of the Opera चा प्रयोग पहायचा. मागील वेळेस गेलो तेव्हा मी एक नाटक (Sistas the Musical) पाहिले, पण ब्रॉडवेवर नाही, तर तो एक ऑफ-ब्रॉडवे शो होता, तेही ऐनवेळेस जमले म्हणून.

ब्रॉडवे हा न्यूयॉर्क मधील भागातील एक रस्ता, पण तो जगभर नाट्यरसिकात नाट्यपंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. हा रस्ता या भागातील आखीव, रेखीव रस्त्यांना अडवा तिडवा छेदून जातो. यांचे कारण हा रस्ता या भागातील कित्येक शतके मूळ रहिवासी रेड इंडियन लोकांचा वहिवाटीचा रस्ता होता. न्यूयॉर्क जसे विस्तारू लागले, तसे या रस्त्यावरच्या काही भागात एका मागून एक अशी नाट्यगृहे, ओपेरा हाउस अशी उभी राहिली. आणि हा भाग नाटकांसाठी, त्यातही संगीतीकांकरिता प्रसिद्ध होत गेला. हा सर्व इतिहास मनोरंजक आहे, तो विकिपीडियावर पाहता येईल, त्याची पुनुरावृत्ती करत नाही. या भागात कधीही फिरा, विविध नाट्यगृहे, त्यात सुरु असलेल्या नाटकांच्या मोठमोठ्याला जाहिरात्ती, झगमगाट आपले लक्ष वेधून घेतातच. फिलाडेल्फिया शहराला देखील अशीच नाटकांची, जुन्या नाट्यगृहांची मोठी परंपरा आहे. त्याबद्दल मी पूर्वी येथे लिहिले आहे. न्यूयॉर्कला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये ब्रॉडवे आणि त्यात सुरु असलेली नाटके पाहणे हा लोकप्रिय कार्यक्रम असतो. भली मोठी नाट्यगृहे, आणि व्यावसायिक नाटके, चकचकीत, संगीत, नृत्य, गाणी असलेली, भव्य दिव्य अशी नाटके हे येथील वैशिष्ट्य. ब्रॉडवे पासून थोडे लांब, आजूबाजूला छोटी छोटी, प्रयोगिक नाटकांसाठी, ज्यांना ऑफब्रॉडवे, किंवा अजून लांब असलेल्या नाट्यगृहांना ऑफऑफब्रॉडवे असे म्हणतात.

IMG_2688

The Phantom of the Opera हे ब्रॉडवे वरील अतिशय प्रसिद्ध असे नाटक आहे. त्याचे तिकीट मी आठवडाभर आधीच राखून ठेवले होते. ब्रॉडवेवरील नाटके खूप महाग असतात. माझे तिकीट ५५ डॉलर्सचे, २० डॉलर्स वरील चार्ज, आणि एवढे करून अगदी मागील आसन मिळाले होते. खर्च होतो, पण हौसेला मोल नाही, असे म्हणत मी पैसे खर्च करत असतो! या नाटकाबद्दल बरीच वर्षे ऐकत होतो. गेली तीस वर्षे, म्हणजे १९८८, पासून ते ब्रॉडवेवरील Majestic Theater मध्ये याचे प्रयोग सुरु आहेत. Gaston Leroux याने १९११ लिहिलेल्या याच शीर्षकाच्या कादंबरीवर हे नाट्य आधारित आहे. ही कादंबरी मला २०१५ मध्ये जुन्या पुस्तकांच्या दुकानात सापडली. Peter Haining याची अभ्यासपूर्ण प्रस्तावना देखील आहे. या कादंबरीवर आधी चित्रपट देखील निर्माण झाले आहेत.

माझा प्रयोग दुपारी दोनचा होता. सकाळी सकाळी फिलाडेल्फिया वरून प्रयाण केले. दुपारी एक पर्यंत Grand Central Terminal, Madison Square Garden, Bryant Park, Times Square असे भटकून, जेवून Majestic Theater धडकलो. पाहतो तर काय, आत जाण्यासाठी भली मोठी रांग आधीच लागली होती. आत गेलो. थिएटर ओपेरा हाउसच्या धर्तीवर दिसत होते. पूर्वी ते ओपेरा हाउसच असावे. मी मुंबईतील, आणि भारतातील एकमेव असे रॉयल ओपेरा हाउस पहिले होते, हे ही तसेच वाटत होते. भले मोठे नाट्यगृह, जवळ जवळ १०००-१२०० आसन क्षमतेचे, पाहता पाहता भरून गेले. आत गेल्यावर हातात नाटकाची एक पुस्तिका प्रत्येकाला दिली गेली. तेथे तशी प्रथा आहे, त्या पुस्तिकेला playbill असे म्हणतात.

नाटकाची(तसेच कादंबरीची) कथा ही पॅरिस मधील एका ओपेरा हाउस मधील एका भूताची, आणि त्यातील प्रमुख गायिकेची. त्यामुळे मांडणी रहस्यात्मक, थरारक, आणि चमत्कृतीपूर्ण आहे. Phantom म्हणजे भूत. नाटक सुरु होते ते ओपेरा हाउसच्या व्यवस्थापकांकडून त्यातील वस्तूंचा लिलाव होत आहे ह्या दृश्यापासून. तितक्यातच आवाज, आणि प्रकाश येऊन टांगलेले झुंबर असे सरकन वर जाते. ओपेरा हाउस मधील भुताच्या अस्तित्वाची सगळ्यांना कल्पना येते. इथेच तांत्रिक करामतींची सुरुवात होते. ओपेरा हाउस मधील एका गायिकेवर ह्या भुताचे मन बसलेले असते. त्यामुळे तीला प्राप्त करण्यासाठीचा खटपटी, त्यामुळे होणारी इतरांची धावाधाव, आणि हे सगळे सादर करण्यासाठी विविध तांत्रिक करामती, या सर्वामुळे हे नाटक अचंबित करून टाकते. रंगभूमीवर ओपेरा हाउस जवळील तळे, त्यातील हलती फिरती बोट असे सगळे नेपथ्याची, प्रकाश, ध्वनी यांची अद्भूत तंत्रे पाहता, अनुभवता येतात. रंगभूमीवर असेही करता येते, अश्याही तांत्रिक शक्यता आहे, हे लक्षात येते. रंगभूमीवरील आवृत्ती आणि कादंबरी यात काही फरक देखील आहेत, पण ते ठिक आहे.

IMG_2710

दोन अंकी नाटक संपले, कलाकारांचे अभिवादन देखील झाले. नाट्यगृह दिव्यांनी उजळले. ह्या भव्य दिव्य नाटकाचा हा सर्व छान अनुभव होता. बाहेर येईपर्यंत दुपारचे साडे चार वाजून गेले होते. ब्रॉडवे वरील हे नाटकाने अनेक रेकॉर्ड्स केली, तोडली, आणि नवीन केले आहेत. १९८८ मध्ये जेव्हा प्रथम आले, तेव्हाच Tony Award हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता(हा पुरस्कार ऑस्करच्या तोडीचा आहे असे समजतात).

आता माझी अजून एक इच्छा आहे, ती म्हणजे लंडन मधील वेस्टएन्ड भागात, थिएटर डिस्ट्रीक्ट आहे, तेथे एखादे नाटक पाहायचे, शेक्सपिअरच्या देशात, त्याच्या गावी फिरून यायचे आहे. बघू कसे काय जमते ते.

गवंड्यांचे मंदिर

शीर्षक वाचून काय आहे हे असे वाटले असेल नाही? पुढे वाचा!

एक दोन दिवसांपूर्वीच्या पुण्यातील एका इंग्रजी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. शहरात रोजंदारीवर बांधकामाच्या ठिकाणी राडारोडा, वाळू, कॉन्क्रीटची घमेली टाकण्याचे काम करणाऱ्या काही महिलांना गवंडी कामाचे(इंग्रजीत skilled masons) महिनाभराचे प्रशिक्षण देण्यात आले. मला ही बातमी वाचून लहानपणापासून पाहत आलेले बांधकामस्थळावरील दृश्य डोळ्यासमोरून तरळून गेले. पुरुषच असलेली ही गवंडी मंडळी त्यांची हत्यारे वापरून नीटपणे दगड, किंवा विटा रचून भिंती बांधत आहे, त्यावर प्लास्टरचे कसबी हात फिरत आहेत, आणि महिला कामगार घमेली वाहून त्यांना विटा, आणि इतर माल पुरवत आहेत. आता हे चित्र बदलेल, जी नक्कीच चांगली गोष्ट आहे. ह्या निमित्त आणखीन एक गोष्ट आठवली ती म्हणजे माझ्या अमेरिकेतील भेटीदरम्यान पाहिलेले Masonic Temple, शब्दशः अर्थ गवंड्यांचे मंदिर!

मी अमेरिकेतील फिलाडेल्फिया या ऐतिहासिक गावी बऱ्याच वेळेस गेलो आहे. त्याबद्दल बरेच लिहिले देखील आहे. फिलाडेल्फिया हे तसे ऐतिहासिक शहर. मी नेहमी शहराच्या मध्यभागी(Philadelphia City Center) जेथे अश्या ऐतिहासिक वास्तूंची गर्दी आहे तेथेच राहत असतो. माझ्या तेथील राहण्याच्या ठिकाणापासून जवळच बऱ्याच जुन्या वास्तू आहेत त्या मला पाहायला आवडते. २०१४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा तेथे गेलो होतो, त्यातील एका वास्तूने मला खरेतर चकित केले होते. त्याचे नाव Masonic Temple. मी मनात म्हटले गवंडी लोकांचे कसले आले देऊळ. त्यावेळेस वास्तू बंद असल्यामुळे मी आत जाऊ शकलो नाही. नंतर परत गेलो. पण दरम्यान त्याबद्दल थोडी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग समजले की ते सगळे वेगळेच प्रकरण आहे. एक विशिष्ट विचारसरणी, जीवनपद्धती अचारणाऱ्या लोकांचे ते भेटण्याचे स्थळ होते. त्याचा आणि गवंडी लोकांचा आज तरी काही अर्थाअर्थी संबंध नाही. अर्थात इतिहास असा सांगतो ह्याची सुरुवात चर्च, आणि इतर धार्मिक स्थळांचे बांधकाम करणारे गवंडी लोकं जी होती, त्यांची एक संघटना असे त्याचे स्वरूप होते. त्याला इंग्रजीत guild असे म्हणतात. अशी guilds प्राचीन भारतात देखील होती पूर्वी, ज्याला श्रेणी असे म्हणत. शिल्पशास्त्रात पारंगत, दगडी देवळे, मूर्ती कोरणाऱ्या, व्यापाराची, आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या  लोकांची guilds असत. हे मी माझ्या Indology अभ्यासक्रमात शिकलो होतो. प्रशिक्षण देणे, आर्थिक मदत करणे, काम मिळवून देणे हा प्रमुख उद्देश. बारा बलुतेदार लोकांची अशी guilds देखील होती.

Masonic Temple

Boston Masonic Temple

फिलाडेल्फिया मधील त्या Masonic Temple ची इमारत भव्य आणि सुंदर होती. संपूर्ण दगडी बांधकाम होते. नॉर्थ ब्रॉड स्ट्रीट आणि फिल्बर्ट स्ट्रीट ह्या दोन रस्त्यांच्या छेदावर ही वास्तू आहे. माझे कामाचे ठिकाण नॉर्थ ब्रॉड स्ट्रीटवर पुढे असल्यामुळे मला ती भव्य वास्तू नेहमीच दृष्टीस पडे. Freemasonry नावाच्या संस्थेच्या Grand Lodge of Pennsylvania चे ते मुख्य केंद्र आहे. अमेरिकेत नंतर मी असेच अजून एक स्थळ पहिले ते माझ्या बोस्टन या दुसऱ्या ऐतिहासिक शहरी. त्याचे नाव होते Boston Masonic Building किंवा Grand Lodge of Massachusetts असेही म्हणतात. पण ही इमारत स्थापत्यदृष्ट्या काही विशेष आकर्षक नाही.  ह्या दोन्ही इमारतींवर Freemasonry चे मानचिन्ह होते. ते देखील गवंडी कामाशी, बांधकाम अभियांत्रिकीशी निगडीत अशीच आहे, त्यात अंतर मोजण्याची पट्टी(rule), ओळंबी(level), vector, compass,  अशी हत्यारे आहे. हे सगळे त्यांचे भूमितीशी असलेले नातेच सांगते. तुम्ही जर कधी गवंड्याला काम करताना पाहिले असेल तर, ही आणि इतर अनेक हत्यारे तुम्ही पाहिली असतील. ही सगळी हत्यारे म्हणजे या पंथाची तत्वे चिन्हे आहेत. ही दोन्ही स्थळे पाहून, त्यांच्याबद्दल थोडेसे वाचल्यावर एका वेगळ्याच विषयाची माहिती मिळाली होती. एका विशिष्ट उद्देशाने मध्ययुगात सुरु झालेली ही stonemason’s guild कशी एका वेगळ्याच स्वरूपात एक विचारसरणी, जीवनदर्शन मानणारी, अध्यात्मिक उद्देशाची संघटना, पंथ(cult अश्या अर्थाने) या रूपात झाली हे पाहून आश्चर्य वाटत होते. मला एक छान व्हिडियो सापडला, हे सर्व समजून सांगणारा.

परत पुण्यात आलो. काही महिने गेले. एके दिवशी पुण्यातील माझ्या कार्यालयात जात असताना खडकी, बोपोडी भागातून मी चाललो होतो. अचानक मला एका जुन्या इमारतीवर Masonic Temple अशी अक्षरे वाचायली मिळाली. माझ्या डोक्यात घंटी वाजली. काही दिवसांनी सवडीने तेथे मुद्दाम परत गेलो. ती खडकीच्या लष्करी भागातील जुनी अशी इमारत मी नेहमी पाहत होतो. पण कधी उत्सुकता वाटली नव्हती. मी आत गेलो. सगळीकडे झाडंझुडपं वाढली होती. इमारतीच्या नामफलकावर mason guild चे मानचिन्ह देखील दिसत होते. आत गेल्यावर इमारतीवरील संपूर्ण नाव वाचले. ते आहे Horsamjee N Merchant Masonic Temple. बाजूला कोणाचे तरी एक घर होते. त्यातून एक गृहस्थ बाहेर आले, त्यांनी मला त्या वास्तूबाद्द्ल, आणि Freemasonry बद्दल सांगितले. Freemasonry guild म्हणजे काय, त्याचे सदस्य कसे होता येते, तेथे काय काम चालते वगैरे. हे होरासमनजी मर्चंट, ज्यांच्या नावाने ही इमारत आहे, ते कोण होते, हे मात्र समजले नाही. जो पर्यंत तुम्ही सदस्य होत नाही, त्या वास्तू मध्ये प्रवेश मिळत नाही. पुणे शहरात देखील लष्कर भागात Freemasons Hall आहे हे देखील समजले. तेथे जायला हवे कधीतरी. नंतर घरी येऊन इंटरनेटवर शोधाशोध केली , तर भारतात बऱ्याच ठिकाणी अशी Masonic Temples ब्रिटीश काळापासून आहेत हे समजले. त्याबद्दल विशेष माहिती सहज उपलब्ध नाही असे दिसते, अर्थात काही अपवाद आहेत.

असो, तर अशी ही हटके ठिकाणे, एक विशिष्ट, अनोळखी इतिहास असलेली.

 

Monterey Bay and Around

Last week, I stumbled upon John Steinbeck’s novel Cannery Row while searching for something else on my book shelf. This is novel is set in 1940s in California, specifically in the Pacific coast area which is popularly known as Monterey Bay. Cannery Row is a sea-side town, then famous for food processing industry, mainly, sea-food. John Steinbeck used to live in the nearby town of Salinas and valley around it. This novel brought my memories about my visit to this area way back in 2004.

I have not written much about my travels in California, where I used to live long time back. Eventually, I will write on all that, but today, I want satisfy my itch to write about Monterey Bay visit. In 2004, I had gotten an opportunity to make a trip to Bay Area for business. Me and my colleagues took time out over the weekend to go around Pacific Coast south of Bay Area. The area around San Francisco Bay Area, on both sides, that is, north and south, is very unique. There is Pacific coast on the west, the Sierra Nevada mountain range run about 20-25 miles from the coast, which creates various valleys. The beautiful and scenic highway named Pacific Coastal Highway#1(PCH#1) runs north south, right by the coast. The longer and more famous highways 101 and Interstate Highway 5 also run parallel. State of California has close to 900 miles of coast line, almost double that of Maharashtra in India.

I have been to as far as Big Sur down south, and Point Reyes on the north on this Pacific Coastal Highway#1. This drive is quite scenic, as the two lane spiral road winds as you go, most times you have company of blue Pacific ocean on one side, and Redwoods forest on the other. You need to be careful though while driving as occasionally wild animals such as deer do stray on the highway. The peculiarity of this coast line is the rocky cliffs which are dotted throughout. Another historic significance of the Pacific coast is that it is dotted with churches set up by Spanish Christian missionaries who came in since 1700 AD. I had been to couple of them around Los Angeles area, I will cover that later in this blog.

During this specific trip, we left our hotel in Newark, which is on the center of the east bay, and joined beautiful Highway 17. This winds through deep forest of Redwood trees. This highway took us on Pacific Coastal Highway#1 near Santa Cruz. If you are passing by Santa Cruz, stopping here for the beach is must. I had heard about Santa Cruz long time back during my college days, when I had heard about a variant of Unix operating system, SCO UNIX, made by company called Santa Cruz Operations(SCO). There is another famous place called Mystery Spot(about which in the next blog) nearby, but we avoided the temptation to go there, as many of us had been there multiple times.

Santa Cruz Beach Boardwalk is typical fun area, with a nice beach front, and amusement park style rides off the beach. It also has a wooden walkway which is called as boardwalk overlooking the sea. I don’t remember taking any rides as such, but we did roam around on the beach, on the boardwalk. It was month of May, hence it was bright and sunny.

After a brief stop at Santa Cruz boardwalk, we proceeded on highway 1 towards south to reach Monterey Bay Aquarium. This is located off the ocean, and has impressive display of marine life, sea animals. I saw sea lions, sea otters also in the aquarium. These animals can be spotted in huge numbers on the Pacific coast, as one drives on highway 1. I have seen much bigger marine life parks such as Sea World in San Diego, Marine World/Africa USA in Vallejo(which became Six Flags Discovery Kingdom). This is certainly not as big as those sea world parks, but has a rich history. Cannery Row and surround coastal area around Monterey Bay was famous sea food processing industry(canneries), which collapsed in 1970s, and after that this aquarium came to being.

Our next stop was scenic Pebble Beach which is famous for its golf courses by the Pacific ocean cliffs. We took beautiful 17-Mile Drive road to reach Pebble Beach. This road is actually a private road of residents of the community near Pebble Beach, visitors need to pay entry fee to use it. We had lunch at a restaurant there where we could overlook golf course.

We did not venture towards Salinas and the valley around it, though it is not too far from Monterey Bay itself(about 25 miles). Neither did I realize that time that the area called Cannery Row near town of Monterey is a subject of his novel. It was just that I was not so much into reading those days, and I did not know about Salinas as a place famous for John Steinbeck. When I go to Bay Area again, I will make it a point that I visit this area again with the focus of following trail of John Steinbeck.

Fire flies at Koyna Forest

Months of April and May are peak seasons for traveling, tourism in the country. Many of us venture out during these months. I also love to travel, trek, explore wilderness, uncharted country side. I even had booked my first every Himalaya trek(Hampta Pass) next month, but then I had to cancel it for some reason. A guilt feeling was setting in. The weather is also not forgiving in these months, especially, in May. It has been very bad this year, as they say.  Last week one of my colleagues in the office, asked me whether I was interested in joining him for a weekend trip to Koyna forest, for the fire flies show. I instantly agreed.

I had been to Koyna forest in the past, in fact three times, once during the trek of Vasota fort, second time during my trek to fort Bhairavgad, and lastly when I visited, now world famous Kaas Plateau of wild flowers. It is pretty big wild life sanctuary, is part Sahyadri Tiger Reserve. But this trip was going to be a visit to a southern part of the forest, where I had not gone so far. I also had witnessed fire flies show few years back in Chorla Ghat on the way to Goa. Off late, tourism board is promoting this unique experience of mother nature, which takes place especially during month of May. My colleague is part of organization called Pune Hiking Enthusiasts(PHE). When I got hooked on trekking two decades back, I used to keep track of various formal, informal organizations, clubs engaged into trekking, wildlife outings. Very soon, I had listed down about 80 odd such organizations. As my trekking activities reduced I stopped tracking these. Since last few years, the focus is not on pure trekking, or even wildlife, but it is more on adventure. White water rafting, rappelling, off beat hikes(such as gorges, valleys), camping(especially in the tents), even heritage tours, got added to the list. And because of my trekking engagements, I got to know of many experts in the fields of history, wildlife, etc, such as Sachin Joshi.

Last weekend, with PHE, I finally ventured out and went to Koyna forest. This forest is about 200 kilometers towards south of Pune, at the heart of which a dam on the river Koyna is located, along with hydroelectric plant. The large expanse of backwater flows through the forest. We started off from Pune Saturday morning, via towns of Satara, Umbraj, Patan. By the time we reached the forest, it was lunch time. We headed off straight to waterfall located inside the forest, called Ozarde waterfall near village of Navaja.

You must be wondering, visiting waterfall, in the summer season is crazy idea, as most of them run dry. But I was in a pleasant surprise. A small hike, that too most of it through rocks of waterfall way, was very different. Weather was not all that forgiving, though it was inside the forest, it was still warm and humid. But as we reached the bottom cliff(semi-circular) of height of 200 meters, the place was cool, and very different one. The water was still falling from the top, but of course, a minor stream was showing the existence of that though.

As the evening was setting in, we were looking for the fire flies show, which was star attraction. We got down from falls, and headed towards a place where fire flies can be sighted. This sight was near a Chaitraban Farms(near village Helwak), where we stopped for our evening tea. We also had a guided tour of the farm. This farm specializes in vertical farming, using green house, hydroponic system. They grow orchids, and other flowers. It was education for me to understand how hydroponic system works. By the time we came back from the tour, Sun had set, it was getting dark. The moon started showing up in the skies. We started off for a night trail in the adjacent forest. We started sighting glowing fire flies on trees on both sides of the trail. We walked for about 90 minutes, spellbound with the views and wonder of nature. Though there was quite a moon light, it was still delightful. Of course, photographers among us were slightly disappointed, as clicking flocks of fire flies was getting challenging. The onset of monsoon is a mating season for fire flies, which make them active with glowing light. And when this happens to thousands of flies, it is a sight similar to lit up Christmas Tree.

We headed towards our camp site for the night’s stay, which was near village Humbarli. The food was waiting for us. Once the dinner was done, tents were setup. It was amazing experience being in the tent in the middle of forest, with a moon in the skies. From the back of the camp site, the stream of backwater was visible, in the gorges nearby.

Koyna Wildlife Sancturay

Tents at the camp site

Next day a morning trail to the top of the mountains was planned, which was part of the core zone of the sanctuary. With due permissions, we hiked to it through deep forest. It had rained last night in that area. The colorful foliage under our feet as we walked as damp and wet. It was much cooler a well. We were accompanied by sanctuary guides who talked to us about flora and fauna of this evergreen forest. The peak provided wonderful vistas of Sahyadris, which it is famous for. The fort of Janagli Jaygad was visible, one could also spot hydro-electric generation plant deep in the valley. The dam, and the electricity generation plant is an engineering marvel, as it uses something called lake tapping technology. This dam is always in news due to active earthquakes happening in this area.

We also visited site of worship called Ram Baan, which happens to be a huge rock, that has cracks on it. These cracks got developed, as it is believed, by Lord Rama’s arrows. This place is worshiped by local devotees. The final surprise of the trip was still ahead. We visited the banks of Koyna river for a dip. It was much needed. The water was shallow at the place where we ventured inside, though it had quite a force and water was flowing. We enjoyed to our hearts’ content in that cold, refreshing waters of Koyna river, to head back to Pune, mesmerizing two days with nature.

Last year, in the rainy season, I had been to similar offbeat destination called Ahupe, for a wild vegetables festival. Read about it here(Ahupe Part#1, Ahupe Part#2). Do drop in your comments.

Boston Tea Party

मी अमेरिकेतील बोस्टन या ऐतिहासिक तसेच अत्याधुनिक शहराला भेट देऊन आलो. त्यावेळेस भटकंती दरम्यान बोस्टन टी पार्टी(Boston Tea Party) या नावाने प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनारी असलेल्या अनोख्या संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला. त्याबद्दल आज थोडेसे लिहिण्याचा मानस आहे.

बोस्टन टी पार्टी हा विषय शाळेत असताना इतिहासात अभ्यासलेला असतो. त्यावेळेस असे कधी वाटले नव्हते की या घटनेचे जतन केलेल्या संग्रहालयाला भेट देऊन याच देही याच डोळा ते पाहता येईल. तो इतिहास थोडक्यात इथे सांगणे आवश्यक आहे, पुढचे कथन करण्याच्या अगोदर. ही खरे तर अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय महत्वाची घटना, जी डिसेंबर १६, १७७३ रोजी बोस्टनच्या बंदरात घडली. ब्रिटीश संसदेने अमेरिकेतील वसाहतींच्या हक्कांवर गदा आणली होती. त्याचा निषेध म्हणून विविध आंदोलने, विरोधी गोष्टी अमेरिकेतील तेरा वसाहतींमध्ये होत होत्या. ब्रिटनवरून ईस्ट इंडिया कंपनी मार्फत अमेरिकेतील वसाहतींना चहा निर्यात होत असे. हा करयुक्त महाग चहा त्यांना नको होता, त्यांना आपला चहा थेट चीनमधून आयात करण्याचा हक्क हवा होता. ह्या आणि इतर मागण्यांच्या साठी होणाऱ्या आंदोलनाचा भाग म्हणून बोस्टनच्या स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी त्या दिवशी बंदरात आलेल्या बोटींवरील चहाची खोकी समुद्रात बुडवून निषेध व्यक्त केला. त्यांनी मूळ राहीवासी इंडियन लोकांच्या सारखा वेश परिधान करून ही गनिमी कावा वापरून कारवाई केली. ह्या सर्वांची परिणीती पुढे प्रखर विरोध, आणि शेवटी युद्ध होऊन अमेरिका देश जन्मास आला.

मी गेलो त्या दिवशी, जानेवारीतील अतिशय थंड आणि जोरदार वारा होता. नुकताच बॉम्ब सायक्लोन येऊन वाताहत करून गेला होता. पण थोडेफार कोवळे उन मात्र दिवसभर होते. तेवढाच दिलासा. हे संग्रहालय समुद्र किनारीच आहे. बोस्टन शहर अटलांटिक महासागराच्या Massachusetts Bay जवळ वसलेले आहे. ह्याचा नजरा संग्रहालयाजवळून अतिशय विहंगम दिसतो. तिकीट काढून संग्रहालयाच्या दाराशी पोहचलो तर तेथे जुन्या काळातील वेश(१७व्या, १८व्या शतकातील colonial लोकांचा) परिधान करून काही स्त्रिया, पुरुष उभे होते. त्यांनी स्वागत केले. आणि हातात एका पक्ष्याचे लांबूडके असे पीस दिले आणि आतील दालनात(The Meeting House) बसवले. ते पीस डोक्याला लावायचे, कारण पर्यटकांना मूळ रहिवासी इंडियन यांच्या सारखा वेशभूषा करायची होती. त्यांनी एकूण कार्यक्रम सांगितला. पर्यटकांना बोस्टन टी पार्टीचा खराखुरा अनुभव देण्यासाठी पहिला भाग असा होता की Samuel Adams सारख्या नेते मंडळींची भूमिका करणाऱ्यांची भाषणे, जनतेला(म्हणजे आम्हा पर्यटकांना) आव्हान असा होता. यात पर्यटकांना सहभागी घेऊन, त्यांना घोषणा वगैरे देण्यास सांगून, आत मध्ये बोटीवर नेले गेले. त्यांची लोकंही होती आमच्याबरोबर. बोटीवर चहाची मोठमोठी गाठोडी(अर्थात लुटूपुटूची) ठेवलेली होती. पर्यटकांना ती गाठोडी समुद्रात बुडवून त्याचा अनुभव घेण्यास सांगितले. हे सर्व अतिशय छान आणि अगदी वेगळाच असा अनुभव होता. ती बोट ही त्याकाळची सजावट असलेली होती. पर्यटकांना त्या काळात नेण्याचा तो प्रयत्न होता(ज्याला immersive experience असे म्हणतात). तेथे दोन बोटी आहेत, Beaver आणि Elanor या नावाच्या, ज्या त्या वेळच्या बोटीसारख्या आहेत.

त्यानंतर बोटीवरून किनाऱ्यावर(Griffin’s Wharf) परत आल्यावर, एका दालनात नेले गेले. तेथे तर आणखीनच वेगळा अनुभव. पर्यटकांना काहीतरी वेगळे देण्याची, कल्पकतेची ह्या अमेरिकनांची हातोटी वाखाणण्याजोगी जोगी आहे. तेथे holographic projection technology वापरून colonial वेश परिधान केलेल्या दोन स्त्रिया(खऱ्याखुऱ्या नव्हेत!); ज्यातील एक वसाहतवादी(loyal), दुसरी वसाहतविरोधी(patriot) स्वातंत्र्याची कल्पना काय ह्या वर मनात चाललेले द्वंद ते हावभाव, आणि मागे सुरु असलेले संवाद यावरून ते खरेखुरे वाटावे, अश्या पद्धतीने सादर केले गेले(Reenactment). हे मला इतके भावले, की पुढे मी काही दिवसांत फिलाडेल्फियाला गेल्यावर खरेदीच्या वेळेस याच तंत्रावर आधारित एक खेळणे मला मिळाले, त्याचे नाव Merge Cube(AR/VR holograms), ते मी लगेच घेऊनच टाकले.

दुपारचे १ वाजून गेले होते. भूक लागली होती. थोडी चौकशी केल्यावर समजले की संग्रहालयात एक क्षुधाशांतीगृह(हॉटेल!) होते. त्याचे नाव Abigail Tea Room. तेथे जाऊन पाहतो तो काय, परत तेच colonial वातावरण. आणि तेथील वैशिष्ट्य म्हणजे पाच प्रकारच्या चहाची चव चाखायची सोय. बोस्टन टी पार्टी संग्रहालयात चहा हवाच, नाही का? चहा प्यायला, थोडेफार काहीतरी खाल्ले आणि मोर्चा वळवला तो तेथील souvenir shop कडे. किती प्रकारच्या वस्तू तेथे, त्या घटनेची, काळाची आठवण करून देणाऱ्या कित्येक गोष्टी! अशी ही बोस्टन टी पार्टी संग्रहालयाची भेट, त्या महत्वाच्या घटनेची आठवण करून देणारी, अनोखा अनुभव देणारी!